Total Pageviews

Monday 1 August 2011

रमजानमध्ये मुस्लिम कैद्यांना शिरकुर्मा, खजूर आणि फळे
उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध तुरुंगांतील मुस्लिम कैद्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉम्बस्फोटांच्या आरोपींपासून छोट्यामोठ्या गुन्ह्यातील सर्व मुस्लिम कैद्यांना ‘रमजान’च्या महिन्यात मांसाहार, शिरकुर्मा, खजूर आणि फळे असा पौष्टिक खुराक दिला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या तुरुंग विभागाला ‘रमजान’च्या महिन्यात ‘योग्य’ आहार देण्याचे आदेशच दिले असून, त्यानुसार ही सरबराई केली जाणार आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या एका दोषी आरोपीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रातील तुरुंगांच्या कॅन्टीनमधून कैद्यांना मांसाहारी खाद्यपदार्थ देण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवावी, अशी मागणी या आरोपीने याचिकेत केली आहे. न्या. रंजना देसाई आणि न्या. आर.व्ही. मोरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आज सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या तुरुंग खात्याला स्पष्टच सांगितले की, रमजानचा महिना आता सुरू आहे. या कालावधीत तुरुंगातील मुस्लिम कैद्यांना त्यांच्या गरजांनुसार ‘योग्य’ तो आहार, त्यांना हवे असलेले खाद्यपदार्थ देण्यात यावेत. त्यावर सरकारी वकील पांडुरंग पोळ यांनी न्यायालयात सांगितले की, रमजानच्या काळात सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर मुस्लिम कैद्यांना शिरकुर्मा, खजूर आणि फळफळावळांनी युक्त असा आहार दिला जाईल. मांसाहार देण्याच्या मुद्यावरही वरिष्ठ तुरुंग अधिकार्‍यांची लवकरच एक बैठक घेतली जाईल.
तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून एकदा ‘नॉनव्हेज’ खाद्यपदार्थ आणि दररोज ‘ब्रेकफास्ट’मध्ये अंडी देण्याविषयी विचार करावा, असे निर्देश मागच्याच आठवड्यात खंडपीठाने सरकारला दिले होते

No comments:

Post a Comment