Total Pageviews

Showing posts with label #PATRIOTIC INDIANS. Show all posts
Showing posts with label #PATRIOTIC INDIANS. Show all posts

Wednesday, 9 July 2025

सुरक्षित भारतासाठी सज्ज नागरिक: एक समग्र दृष्टीकोन -PART 1

 


प्रस्तावना

राष्ट्रीय सुरक्षितता ही केवळ सरकार किंवा सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून असते. जेव्हा नागरिक सजग, जबाबदार आणि सक्रियपणे देशाच्या सुरक्षिततेमध्ये योगदान देतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक सुरक्षित आणि विकसित राष्ट्र निर्माण होते. केवळ बाह्य धोक्यांपासून नव्हे, तर अंतर्गत आव्हानांपासूनही देशाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अनिवार्य आहे. हा अहवाल सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांची भूमिका, भारतासमोरील विविध धोके आणि असुरक्षित गटांच्या संरक्षणाचे उपाय यावर सखोल माहिती प्रदान करतो. याचे उद्दिष्ट नागरिकांना जागरूक करणे, त्यांना सुरक्षिततेच्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आवश्यक माहिती व संसाधने उपलब्ध करून देणे हे आहे.

नागरिकांची देशाच्या सुरक्षिततेतील भूमिका

राष्ट्रीय सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ लष्करी दले किंवा पोलीस यंत्रणाच नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातून देशाच्या सुरक्षिततेत हातभार लावू शकते.

जागरूकता आणि माहितीची देवाणघेवाण

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबत जागरूक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती किंवा असामान्य घटनांबद्दल पोलिसांना त्वरित माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे . ही माहिती केवळ गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठीच नव्हे, तर मोठ्या धोक्यांना वेळीच ओळखून त्यांना निष्प्रभ करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

सध्याच्या माहितीच्या युगात, नागरिकांना 'सुरक्षा रक्षक' म्हणून दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. त्यांना केवळ शारीरिक सुरक्षिततेच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही, तर डिजिटल माहितीच्या प्रसाराबाबतही अत्यंत दक्ष राहावे लागते. सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या (Fake News) आणि अफवा (Rumours) यांपासून सावध राहणे आणि त्या पुढे पसरण्यापासून थांबवणे हे सामाजिक शांतता राखण्यासाठी आवश्यक आहे . चुकीच्या माहितीचा प्रसार हा दहशतवादाला किंवा फुटीरतावादाला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतो, कारण हे गट अनेकदा खोट्या माहितीचा वापर करून समाजात फूट पाडतात आणि अशांतता निर्माण करतात. त्यामुळे, नागरिकांची माहिती साक्षरता आणि वृत्त साक्षरता ही आता केवळ वैयक्तिक कौशल्ये नसून, ती राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली 'सामूहिक संरक्षण यंत्रणा' बनली आहे.

माहिती साक्षरता म्हणजे माहिती ओळखण्याची, शोधण्याची, मूल्यांकन करण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता होय. यात मुद्रित आणि डिजिटल स्रोतांकडून माहिती शोधण्यासाठी बुलियन शोध तंत्रांचा वापर करणे, प्रासंगिकता आणि विश्वासार्हतेसाठी माहितीचे गंभीरपणे परीक्षण करणे, तसेच शोधलेल्या संसाधनाच्या लेखकत्व, तारीख, कॉपीराइट इत्यादी बाबी तपासणे (CRAAP चाचणी) समाविष्ट आहे. 

वृत्त साक्षरता म्हणजे बातम्यांचे अहवाल आणि माहितीची विश्वासार्हता तपासण्याची क्षमता, मग ते प्रिंट, टेलिव्हिजन, सोशल मीडिया किंवा इंटरनेटद्वारे आलेले असोत. यात पत्रकारिता आणि इतर प्रकारची माहिती, तसेच पत्रकार आणि इतर माहिती प्रदाता यांच्यात फरक करणे, पत्रकारितेच्या संदर्भात बातम्या आणि मत यांच्यात फरक करण्याची सवय लावणे, आणि फेक न्यूज ओळखण्यासाठी स्त्रोताच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करणे, स्त्रोत URL तपासणे, इतर विश्वसनीय स्त्रोत शोधणे, प्रकाशन तारीख तपासणे, आणि वस्तुस्थिती पुन्हा तपासण्यासाठी पार्श्वभाग वाचणे समाविष्ट आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जबाबदार वर्तन हे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे, कारण ऑनलाइन माध्यमे द्वेषपूर्ण किंवा प्रक्षोभक संदेश पसरवण्यासाठी वापरली जाऊ शकतात, ज्यामुळे सामाजिक अशांतता वाढते.  

सायबर सुरक्षितता

सायबर हल्ले हे आज भारतासमोरील एक प्रमुख आव्हान आहे, ज्यात आर्थिक फसवणूक, डेटा चोरी आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे समाविष्ट आहे . त्यामुळे, ऑनलाइन व्यवहार करताना, सोशल मीडिया वापरताना आणि ईमेल तपासताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक आहे . यात मजबूत पासवर्ड वापरणे, अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे आणि वैयक्तिक माहिती शेअर न करणे समाविष्ट आहे .

प्रत्येक नागरिकाची सायबर सुरक्षिततेची वैयक्तिक जबाबदारी ही केवळ वैयक्तिक डेटाचे संरक्षण नाही, तर ती राष्ट्रीय सायबर संरक्षणाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. जर मोठ्या संख्येने नागरिक सायबर हल्ल्यांना बळी पडले, तर त्याचा परिणाम केवळ वैयक्तिक आर्थिक नुकसानीवर होत नाही, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर आणि डेटा सुरक्षिततेवरही होतो. फिशिंग, डेटा चोरी आणि मालवेअरचा प्रसार अनेकदा वापरकर्त्यांच्या नकळत होतो , ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सायबर भेद्यता वाढते. सायबर साक्षरता आणि योग्य सायबर स्वच्छता हे केवळ 'चांगले ऑनलाइन नागरिक' बनण्यासाठी नसून, ते 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा दलाचे' अनधिकृत सदस्य बनण्यासारखे आहे.  

सायबर फसवणूक झाल्यास घाबरू नये. फसवणुकीची तक्रार ताबडतोब संबंधित बँकेच्या शाखेत किंवा त्यांच्या टोल-फ्री क्रमांकावर (उदा. बँक ऑफ इंडियासाठी 1800 103 1906) करावी. लवकर अहवाल दिल्याने गमावलेला निधी परत मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते. पुढील प्रक्रियेसाठी संपूर्ण तपशिलांसह सायबर क्राईमची औपचारिक तक्रार ३ दिवसांच्या आत शाखेकडे द्यावी. सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर देखील संपर्क साधता येतो.  

डिजिटल सुरक्षिततेसाठी काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे: आपले इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आणि ओटीपी कधीही सामायिक करू नयेत. लॉगिन तपशील प्रविष्ट करण्यासाठी व्हर्च्युअल कीबोर्ड वापरावा. मोबाइल सुरक्षा पॅचेस नियमितपणे अद्ययावित केले आहेत याची खात्री करावी. पिन आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करून मोबाइल फोन सुरक्षित करावा. गोपनीय माहिती (पासवर्ड/पिन) कुठेही लिहू/साठवू नये. अंदाज लावण्यास कठीण पासवर्ड वापरावे आणि जन्मतारीख, वर्धापनदिन, कुटुंबातील सदस्यांची नावे इत्यादी वैयक्तिक माहिती पासवर्डमध्ये वापरणे टाळावे. पासवर्ड किमान 8-15 अल्फान्यूमेरिक वर्ण लांब असावेत आणि सर्व खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरू नये. सार्वजनिक वाय-फाय इत्यादी कोणत्याही असुरक्षित सार्वजनिक नेटवर्कवरून बँकिंग व्यवहार करणे टाळावे.  

Tuesday, 18 February 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वतःला विचारा की मी देशाकरता आज काय करू शकतो

 



अनेक  थोर पुरुषांची प्रेरणा शि-वा-जी- या मंत्रात आहे,या मंत्राची प्रेरणा आज पण जरुरी आहे. आज देशा समोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गत काळाचा साक्षीदार,भावी काळाचा वाटाड्या असतो, जे राष्ट्र इतिहासा पासुन शिकत नाही ते कधीही महासत्ता बनु शकत नाही .राजांच्या असंख्य गुणांपैकी किती देशाच्या लोक प्रक्रुतीमधे उतरले हे महत्वाचेआहे.नर दुर्ग म्हणजे किल्यासारखी बुलंद,मजबुत,शुर,निष्ठावान,पराक्रमी माणसे महाराजांनी बनवली.

लढाईमध्ये सर्वांत महत्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य असते. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते, प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कसे लढतात यावर हरणे आणि जिंकण्याचा फैसला होतो. शिवाजी महाराजांनी धोकेदायक परिस्थितीमध्ये सर्वात पुढे लढाई करून सैनिकांचे नेतृत्व केले आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्यावेळेला महा पराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांची पुढुन नेतृत्व करायची परंपरा आज सुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानचा आपण धडा शिकवतो. परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकार्यांचे रक्त सांडून करावी लागते.

शिवाजी महाराज शूर होते आणि त्यांनी देशाप्रती आपली जबाबदारी निभावली. आपला इतिहास अभिमानास्पद आहे परंतु प्रश्न आज उठतो की आज आम्ही देशाकरता काय करत आहे किंवा रोजच्या जीवनामध्ये एक देशभक्त देशप्रेमी नागरिक म्हणून आम्ही देशाकरता काय करू शकतो. याविषयीचे माझे काही विचार खाली देण्यात आलेले आहेत.

 

स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?

कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये, देशाच्या सामान्य नागरिकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो . असे असेल तर भारतीय देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पणे निभावत आहे का? तर उत्तर नाही ,असे  आहे.

जबाबदार नागरिक बना

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, भडकावु पोस्ट सोशल मीडिया वरती टाकू शकतो ,त्यामुळे हिंसाचार झाला तरी पर्वा नाही.

भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये सुद्धा दिली आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे अनेक  दुर्लक्ष करतात.

 सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा बहुतेकांना  विसर पडतो. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं , जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ,सार्वजनिक अस्वच्छता हा नवीन विषय नाही. कार मधून रस्त्यावर प्लास्टीक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात,  किनाऱ्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच असतो, हे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करतात .परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,आपल्याकडील कचरा सर्रास रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपण टाकतो.येथे स्वच्छता राखा, असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा आहे.

आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी सरकार जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढतो. आज प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रुप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम अनेक पायदळी तुडवतात. आपण जबाबदार नागरिक का बनत नाही?

शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावा

वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जातात, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे ,अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केले जाते. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव आहे. वेगवेगळ्या मिरवणुका काढून शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी अजून कठीण करणे चालूच आहे.

वाहतूक पोलिसांची मजबूत फळी असावी. वाहतूक नियम तोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी.वाहतुकीचे नियम पाळुन आपण प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची बचत करू शकतो आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करू शकतो.

हिंसक आंदोलनाचा मोठा दुष्परिणाम देशावर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात, ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. शहरात हिंसाचार , दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले, त्यामुळे देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. दिल्लीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर दिल्लीचे रोज हजारो कोटी रुपयांची नुकसान होत होते.एवढे नुकसान कुठल्याही प्रकारच्या दहशतवादामुळे झालेले नाही.

हिंसक आंदोलने हा  दहशतवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे.

येत्या २०२5मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.मणिपूर मधल्या हिंसाचारामध्ये मैतेयी जमातीला कुकी जमातीचे नुकसान आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीचे नुकसान भरण्यास भाग पाडले पाहिजे. टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात .हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.

नागरिकांचा सहभाग

सामान्य माणसांनी पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे.कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना ते सक्षमपणे करता येणार नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते.

स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.

आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती

 

रस्त्यावरील सिग्नल पाळणं , रस्त्यावर न थुंकणं , स्त्रियांचा आदर करणं , दिलेली वेळ पाळणं , भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ,  आपल्याआधी लोकांचा विचार, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं , सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे.

 

मतदान करणं , योग्य उमेदवार निवडणं, ही देशभक्ती आहे,मात्र 50 टक्के भारतीय निवडणुकांमध्ये मतदान करत नाही आणि मतदान दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मजा करण्यामध्ये घालवतात.

स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, वाद न घालता काम करणं ,ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं , स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं , सार्वजनिक विकास कामांना अडथळा निर्माण करून देशाचा विकास थांबवणे, सध्या जोरात सुरू आहे. स्वत:पलीकडे पाहणं आणि खरं सांगायचं तर "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे.

प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.

शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती राज्यपद्धती आधुनिक भारताला आज सुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये मदत करू शकते..१००% शिवाजी होणे शक्य नसेल तर ४०-५०% ,२०-३० तरी शिवाजी बना.तसे झाले तरच आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो.


Thursday, 20 June 2024

examples from Marathi literature in Creating awareness about national security in Maharashtra and motivating young children ,the youth to build national spirit in Maharashtra?

 Marathi literature has been instrumental in creating awareness about national security and motivating young children and youth to build national spirit in Maharashtra. Here are some specific examples:

1. Veer Savarkar - "Saha Soneri Pane"

Vinayak Damodar Savarkar's "Saha Soneri Pane" (Six Golden Pages) is a historical account of six significant events in Indian history. Through his vivid narration and emphasis on the importance of strategic thinking, self-reliance, and courage, Savarkar instills a sense of duty and awareness about national security among readers. His works have been particularly influential in motivating the youth towards patriotic action.

2. Shripad Amrit Dange - "Kranti Gatha"

"Kranti Gatha" by Shripad Amrit Dange is a collection of patriotic songs and poems that highlight the sacrifices made by freedom fighters for India's independence. These poems serve as a reminder of the continuous need to safeguard the nation's security and inspire young readers to remain vigilant and proactive in protecting their country.

3. Vishnu Vaman Shirwadkar (Kusumagraj) - "Vishakha"

Kusumagraj's poetry collection "Vishakha" contains many poems that evoke a strong sense of nationalism and concern for the nation's security. His poems often reflect on the sacrifices made by soldiers and the importance of unity and vigilance, encouraging young minds to appreciate and contribute to national security.

4. Nath Madhav (Lt. Col. Bapusaheb Deshpande) - "Pavan Khind"

"Pavan Khind" by Nath Madhav, which is the pen name of Lt. Col. Bapusaheb Deshpande, recounts the heroic battle of Pavan Khind, where the Maratha warrior Baji Prabhu Deshpande made a supreme sacrifice to ensure Shivaji Maharaj's escape from enemy forces. This historical novel emphasizes bravery, strategic planning, and the importance of readiness to defend the nation, inspiring young readers with tales of valor and patriotism.

5. Babasaheb Purandare - "Raja Shiv Chhatrapati"

Babasaheb Purandare's "Raja Shiv Chhatrapati" is an extensive biography of Chhatrapati Shivaji Maharaj, one of Maharashtra's greatest warriors and a symbol of strategic acumen and national pride. This work highlights Shivaji's military strategies, his efforts in fortifying the Maratha empire, and his relentless dedication to protecting his people, serving as an inspirational guide for the youth on the importance of national security and leadership.

6. V. S. Khandekar - "Yayati"

V. S. Khandekar’s "Yayati", while mythological in nature, carries themes of duty, sacrifice, and strategic foresight. These themes are crucial for young readers to understand the broader aspects of national security, leadership, and the importance of making sacrifices for the greater good.

7. Acharya Atre - "Karheche Pani"

P. K. Atre's autobiography "Karheche Pani" delves into his experiences during the freedom struggle and his efforts in social and political reforms. His reflections on the importance of a strong, secure, and independent nation serve to motivate young readers to take an active interest in their country's security and well-being.

8. Vinda Karandikar - Patriotic Poems

Vinda Karandikar’s patriotic poems are known for their powerful language and themes of national pride and security. Poems like "Rakshabandhan" (Bond of Protection) underscore the importance of safeguarding the nation and inspire young readers to contribute towards national security.

9. Shivaji Sawant - "Mrityunjay"

Shivaji Sawant’s "Mrityunjay" narrates the story of Karna from the Mahabharata, emphasizing themes of valor, duty, and integrity. These themes resonate with the concepts of national security and inspire the youth to adopt a strong, principled approach towards protecting their nation.

Conclusion

Marathi literature has made significant contributions to creating awareness about national security and motivating the youth in Maharashtra to build a national spirit. Through historical narratives, patriotic poems, and inspirational biographies, these literary works have instilled a sense of duty, pride, and readiness in young readers, encouraging them to actively participate in safeguarding and building their nation.

Tuesday, 15 August 2023

#भारताच्या 75 वा स्वातंत्र्य दिनी स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करत...

हिंसक आंदोलनाचा मोठा दुष्परिणाम देशावर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात, ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. शहरात हिंसाचार , दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले, त्यामुळे देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सरकारी संपत्ती,राज्य परिवहनच्या बसेस, खाजगी वाहाने आणि खाजगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. एसटी हे गरीब जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे एसटी नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा गरिबांवर होतो.

शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.रोजची रोटी रोज कमावणार्यांना रोजी रोटी मिळत नाही.आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरता गावाच्या बाहेर पडलेल्याचे रस्ते बंद पडतात.

राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. दिल्लीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर दिल्लीचे रोज हजारो कोटी रुपयांची नुकसान होत होते.एवढे नुकसान कुठल्याही प्रकारच्या दहशतवादामुळे झालेले नाही.

हिंसक आंदोलने हा  दहशतवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे.

येत्या २०२३-२४मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.मणिपूर मधल्या हिंसाचारामध्ये मैते यी जमातीला कुकी जमातीचे नुकसान आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीचे नुकसान भरण्यास भाग पाडले पाहिजे. टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात .हिंसाचाराच्या बातम्यांना पान वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.