Total Pageviews

Sunday, 28 August 2011

50 CRORES FOR MAULANA AZAD

मौलाना आझाद महामंडळावर केली ५० कोटींची खैरातमुंबई, दि. २८ (विशेष प्रतिनिधी) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी कॉंग्रेसऐवजी आता राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे आणि या घुसखोरीत नेहमीप्रमाणे आघाडीवर आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार! कॉंग्रेसच्या अखत्यारीत असलेल्या खात्यातही ते दादागिरी करत असल्याच्या तक्रारी यापूर्वी असताना आता त्यांनी थेट अल्पसंख्याकांच्या खात्यात घुसखोरी करीत मौलाना आझाद महामंडळावर ५० कोटींच्या खैरातीचा निर्णय त्यांनी घेतला आहे
मौलाना आझाद महामंडळाच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यासाठी ५० कोटींचा निधी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाच कोटींचा निधी त्वरित वितरित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.
या बैठकीला कॉंग्रेसचे अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान उपस्थित नव्हते, मात्र राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री फौजिया खान,महामंडळाचे अध्यक्ष अमीन पटेल, अल्पसंख्याक विभागाच्या अप्पर मुख्य सचिव टी. एफ. थेक्केकरा तसेच वित्त विभाग व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
वित्त व नियोजन हे महत्त्वाचे खाते अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे कुठल्याही खात्यात पैशाचा विषय निघाला की थेट त्यांच्यापर्यंत जातो आणि राजकीयदृष्ट्या फायदेशीर असल्यास परस्पर घोषणा करून ते मोकळे होतात असेच आतापर्यंतचे चित्र आहे. याविषयी वर्षा गायकवाड तसेच नसीम खान या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती, पण त्या तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कायम मवाळ भूमिकेमुळे राष्ट्रवादी शिरजोर होत चालली आहे, असे कॉंगे्रसचे नेते खाजगीत बोलत आहेत.
निर्णय अगोदरचाच - नसीम खानमौलाना आझाद मंडळाला ५० कोटी वितरित करण्याचा निर्णय अगोदरच झाला होता. त्यात नवीन काहीच नाही. मी माझ्या पक्षाच्या कामामुळे या बैठकीला हजर राहू शकलो नाही, इतकेच! अशी बोलकी प्रतिक्रिया नसीम खान यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment