Total Pageviews

Tuesday, 23 August 2011

FREE RECRUITMENT TRAINING FOR POLICE RECRUITMENT

पोलीस भरतीसाठी विनामूल्य प्रशिक्षणवर्ग प्रशासकीय सेवेतील मराठी टक्का वाढावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे यासाठी येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पोलीस भरतीसाठी विनामूल्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.ऊर्जा युवा प्रतिष्ठान माजी सैनिक विकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबीर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राहणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी आपली नावे गंगापूर रोडवरील बालगणेश फाऊंडेशन येथे नोंदवायची आहेत. शिबिरात विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, लेखी परीक्षा शारीरिक चाचणीची पूर्वतयारी, व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन, सामान्यज्ञान गणित विषयांचे मार्गदर्शन वर्ग, मुलींसाठी स्वतंत्र वर्ग मार्गदर्शन, अनुभवी सैनिकी पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यावेळी सुधाकर भालेराव, माजी पोलीस सहआयुक्त अभिमन्यू सूर्यवंशी, मेजर डी. के. झरेकर, तेजस एल. वाय. कुलकर्णी, सुरेश सावंत, पी. एफ. दाते, मनोज जगताप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुधाकर भालेराव (९८२३२५७९११), नयना पंडित (९९६०८२२२५२), कुंदन दुसाने (९९२३६८४७७७) यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान, पोलीस भरतीमध्ये नाशिक जिल्ह्य़ातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे यासाठी मुंबई नाका युवक मित्र मंडळ कुसुमाग्रज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात विनामूल्य पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक राम खैरनार डॉ. जी. आर. पाटील हे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा तसेच पद्माकर घुमरे प्रा. हेमंत पाटील हे विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांची नावनोंदणी करून घेण्यात येईल. निवडक विद्यार्थ्यांची २६ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत सकाळी सहा ते साडेआठ या वेळेत मैदानावर शारीरिक क्षमता चाचणी सकाळी १० ते १२ यावेळेत लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत करून घेण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन . वसंत गीते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी करिअर विभागाचे सचिन चव्हाण (९४२२७५१७५९) यांच्याशी संपर्क साधावा

No comments:

Post a Comment