Total Pageviews

Monday, 30 March 2020

एकच प्याला द्या मज पाजुनी!-tarun bharat- 30-Mar-2020 विजय कुलकर्णी


‘लॉकडाऊन’च्या या परिस्थितीत अशा तळीरामांना व्यसनमुक्त करण्याऐवजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी मात्र भलतीच भानगड केली. त्यामुळे देशातील सर्वात सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याने कसे वागू नये, याचा तंतोतंत आदर्शच या महाशयांनी घालून दिला.
‘लॉकडाऊन’ला अवघे सहा दिवस होत नाही, तोवर तळीरामांची चलबिचल सुरू झाली. कारण, राज्यातीलच नव्हे, तर देशातील दारूच्या दुकानांवरही गंडांतर आले. मागच्या दाराने दारूच्या बाटल्या रिचवणार्‍यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यामुळे काही तळीरामांचा जीव कासावीस झाला. एक प्याल्याशिवाय जगणेच जणू अशक्य म्हणून त्यापैकी काही अगदी भान हरपून बसले. त्यांचे होश, चैनबैन सगळे काही सहा दिवसांत भंग पावले. देवदास उदास झाले. देशभरात कमीअधिक प्रमाणात अशा तळीरामांचा एक प्याला सोडा, एक मद्याचा थेंबही घशाखाली न गेल्यामुळे मन पुरते बिथरले. पण, या सगळ्यात कहर केला तो केरळने. होय, देशातील सर्वात सुशिक्षित राज्यात या ‘लॉकडाऊन’ दरम्यान हाती एकही प्याला न आल्याने तब्बल नऊ जणांना आपले जीव गमवावे लागले. यापैकी सात जणांनी चक्क आत्महत्या केली, एकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि एका महाशयांना तर दारूची इतकी तलफ लागली की शेव्हिंग लोशनची बाटलीच थेट ‘देशी’ समजून गटागट गिळली.

म्हणजे कोरोनामुळे जितके मृत्यू केरळमध्ये ओढवले नाही, त्याहीपेक्षा अधिक तळीरामांनी एकही प्याला न मिळाल्याने स्वतःच मृत्यूच्या बाटलीत उडी मारली. बर्‍याच जणांनी सरकारकडे दारूची दुकानेही पुन्हा उघडण्याची मागणी केली. पण, अखेरीस ती मागणी पूर्ण न झाल्याने तळीरामांनी आपल्या जीवाला राम राम ठोकला.
खरं तर केरळची २०१८ सालची आकडेवारी लक्षात घेता, २ लाख नागरिकांना दारूच्या समस्येने ग्रासले असल्याचे समजते. त्यापैकी काही हजार तळीरामांना दारू मिळाली नाही तर डिप्रेशन, फिट्स असा त्रास संभवतो, असेही या सर्वेक्षणात सांगण्यात आले. यावरून केरळमधील परिस्थितीची भीषणता ध्यानात यावी. महसुलाच्या बाबतीतही २०१८-१९ या आर्थिक वर्षात दारूतून राज्य सरकारला मिळालेले उत्पन्न होते २५२७ कोटी आणि विक्री होती १४ हजार, ५०८ कोटी.

‘लॉकडाऊन’च्या या परिस्थितीत अशा तळीरामांना व्यसनमुक्त करण्याऐवजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी मात्र भलतीच भानगड केली. त्यामुळे देशातील सर्वात सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याने कसे वागू नये, याचा तंतोतंत आदर्शच या महाशयांनी घालून दिला. तेव्हा, अशा या मुख्यमंत्र्यांचा सल्ला आणि त्यावरील इलाज वाचून डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही.

रोगापेक्षा मुख्यमंत्रीच भयंकर !


देशाचा पंतप्रधान, तसा राज्याचा मुख्यमंत्री. आपल्या राज्याच्या जनतेच्या बर्‍यावाईटाचा, सुखदु:खाचा तोही भागीदार, खासकरून अशा आरोग्य आणीबाणीच्या काळात. परंतु, केरळच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी तळीरामांच्या समस्येवर सूचवलेल्या उपायाने रोगापेक्षा इलाज नाही, तर ‘रोगापेक्षा मुख्यमंत्रीच भयंकर’ अशी परिस्थिती केरळमध्ये निर्माण झाल्याचे दिसते.


दारू मिळाली नाही म्हणून केरळमध्ये नऊ लोक दगावले. यावर देशातील सर्वाधिक सुशिक्षित राज्य म्हणून एरवी मिरवणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तसाच उपाय शोधायला पाहिजे होता. पण नाही, या मुख्यमंत्री महाशयांनी अक्कल गहाण ठेवूनच चक्क एक अजब सूचना केली. केरळचे मुख्यमंत्री म्हणतात, “डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर संबंधिताला दारू हवी असल्याचे लिहून द्यावे, त्यानंतर त्या तळीरामाला दारू उपलब्ध करून दिली जाईल.” दारू विकत घेण्यासाठी कुठला डॉक्टर बरं प्रिस्क्रिप्शन देतो? अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा तळीरामांचे चोचले पुरवण्यासाठी त्यांना कागदावर दारू विकत घेण्याचे परवाने देत बसायचे काय? मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीच्या अशा बेजबाबदार विधानानंतर जर डॉक्टरांच्या क्लिनिकसमोर तळीरामांची प्रिस्क्रिप्शनसाठी झुंबड उडाली तर त्या अनियंत्रित गर्दीला जबाबदार कोण? याचा मुख्यमंत्र्यांनी क्षणभर तरी विचार केलेला दिसत नाही. ते तळीराम केवळ आपल्या पक्षाचे मतदार आहेत, म्हणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एका राज्याचा मुख्यमंत्री अशा कुठल्याही पातळीवर खाली उतरू शकतो, याचेच हे विदारक उदाहरण. एवढ्यावर हे मुख्यमंत्री थांबले नाहीत, तर ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्यायही म्हणे त्यांनी चाचपडून पाहिला. त्यामुळे एकीकडे देशभरात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी नागरिक झटत असताना केरळमधील या प्रकाराने सुशिक्षितांमागची अशिक्षित विचारसरणी समोर आली आहे. केरळच्या डॉक्टरांनी तसेच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नेही मुख्यमंत्र्यांच्या या अजब उपचारांना विरोध दर्शवित त्यांचाही समाचार घेतला आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेळीच स्वत:ला आवरावे आणि राज्यालाही सावरावे

तिथल्या तिथे ठेचा अफवा-tarun bharat-


 ज्याच्या प्रकाशाने तारकाधिपती चंद्रही निस्तेज होतो, त्या सूर्याला ग्रहण लागले असता त्याच्यापुढे क्षुद्र काजवेही चमकू लागतात, अशा अर्थाची एक अन्योक्ती फार प्रसिद्ध आहे. सध्या कोरोनामुळे देशात आणि जगभरातही जे वातावरण तयार झाले आहे, लोक आशंकित आहेत, भयभीत आहेत, अतिशय हळवे झाले आहेत, अशा वेळी काही लोक या क्षुद्र काजव्यांसारखे अफवा पसरविण्याच्या कामात व्यग्र आहेत. एरवी साधारण परिस्थितीत या लोकांचे कुणी ऐकलेही नसते. परंतु, परिस्थिती असाधारण झाल्याचे पाहून ही मंडळी आपापल्या बिळातून बाहेर येतात आणि नको ते उद्योग सुरू करतात. त्यांना माहीत
असते की आजच्या वातावरणात आपण जे काही प्रसृत करू ते खपले जाईल. अशा लोकांपासून सर्वांनीच सावध असले पाहिजे.

हे अफवा पसरविणारे लोक कुठल्या जमातीचे आहेत, कुठल्या विचारधारेचे आहेत, त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे, हे हुडकून काढणे कठीण नाही. सर्वप्रथम यांचा उद्देश हा असतो की, सर्वसामान्य जनतेत गोंधळ निर्माण व्हावा. अफरातफरी व्हावी. दुसरा उद्देश, सरकार व प्रशासन यांच्यावरील लोकांचा विश्वास उडावा. या दोन गोष्टी साध्य झाल्या की, मग देशात जो भडका उडेल, त्यावरून सरकारला दोष देण्यात हीच मंडळी पुढे येतात. आपण सर्वांनी या नतद्रष्ट लोकांच्या मनसुब्याला मातीत गाडले पाहिजे. या अफवा पसरविण्यात सोशल मीडियाचा फार मोठा हात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरच रममाण होणार्‍यांनी, त्यांच्यापर्यंत आलेली कुठलीही अनधिकृत माहिती, फॉरवर्ड न करता, तिथल्या तिथे नष्ट केली पाहिजे. िंवचू दिसला की त्याची बातमी इतरांना सांगण्याआधी जसे आपण त्याला तिथल्या तिथे आणि ताबडतोब चिरडून टाकतो, अशी आपली कृती या अफवांच्या बाबतीत असली पाहिजे. देशाच्या भल्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
अफवा पसरविणार्‍यांमध्ये जसे भारतातील काही लोक आहेत, तसे आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही लोक, संस्था भलत्याच सक्रिय झालेल्या आहेत. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. भारतासारखा 130 कोटी लोकसंख्येचा देश इतक्या शिस्तीत आणि शांतपणे कोरोनासारख्या महामारीला कसे काय तोंड देत आहे? हा त्यांना छळणारा प्रश्न आहे. कारण या मंडळींनी नेहमीच ‘वेस्ट इज बेस्ट’ (म्हणजे जे पश्चिमेकडचे तेच सर्वोत्कृष्ट) असे मानले आहे. आज त्यांनी जगभरात पसरविलेला हा भ्रम उद्ध्वस्त झाला आहे. ते काम कोरोना नामक एका विषाणूने केले आहे. कोरोना विषाणूचा धिंगाणा युरोप व अमेरिकेसारख्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशांना तर काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. सार्वजनिक स्वच्छता, शिस्त, आरोग्य या बाबतीत या देशातील नागरिक अतिशय जागृत आणि जागरूक असतात असे आम्हाला सतत सांगण्यात आले आहे. मग असे काय घडले की, या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव िंचताजनक वाढत आहे? इटली- लोकसंख्या 6 कोटी. कोरोना बळी 7503. स्पेन-लोकसंख्या 4.67 कोटी. कोरोना बळी 3647. अमेरिका- लोकसंख्या 33 कोटी. कोरोना बळी 1036. इंग्लंड- लोकसंख्या 6.77 कोटी. कोरोना बळी 465. या पृष्ठभूमीवर 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात एवढे कमी बळी कसे? हे यांना सलत आहे. त्यातही भारताचे नेतृत्व नरेंद्र मोदींसारखा त्यांच्या दृष्टीने अतिशय तिरस्कृत व्यक्ती करत आहे. मोदींचे हे यश यांना पचत नाही असे दिसते आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय लोक भारताबाबत नाही नाही त्या अफवा पसरवित आहेत. त्यांनाही आपण ओळखले पाहिजे. या आंतरराष्ट्रीय ठगांचे काही चेलेचपाटे भारतातही आहेत. विशेषत: इंग्रजी मीडिया. ते यांची री ओढत असतात. परंतु, भारतातील सध्याचे वातावरण बघता, त्यांना उघडपणे अशा चिथावणीखोर बातम्या पेरता येत नाहीत म्हणून ही मंडळी अशा बातम्या शर्करावगुंठित रीतीने समाजासमोर, देशहिताचा आव आणत उघड करीत आहेत.

आता या मंडळींना कोरोनाचा भारतातील प्रसार कसा थांबेल आणि भारतात एकही नवा रुग्ण बळी जाणार नाही, याची िंचता नाही. त्यांना आता िंचता आहे, कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी राहील, याची. त्यावरूनच यांची झोप उडाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशांची आजकाल फारच िंचता या लोकांना पडली आहे. भारत सरकार तसेच सर्व राज्यांतील सरकारे विविध उपाययोजना करीत आहेत. विविध सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. कुठे काही न्यून लक्षात येताच, प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने तिथे पोहचत आहे. सर्व काही एका शिस्तीत, सुरळीत सुरू आहे. परंतु, हे यांना बघवत नाही, असे दिसते. यांचा पोटशूळ उमळला आहे. सर्वसामान्यांनी या लोकांकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले पाहिजे. आपल्या भारताचे सुदैव म्हटले पाहिजे की, या अतिशय संकटाच्या काळात आपल्याला नरेंद्र मोदींसारखे कठोर पण करुणामय नेतृत्व लाभले आहे. इतर कुठले दुसरे राजकीय नेतृत्व असते तर काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

नेतृत्व नालायक असेल तर काय होऊ शकते, याचे उदाहरण आपला शेजारी पाकिस्तानने जगासमोर ठेवले आहे. तिथे काय सुरू आहे, तिथल्याच लोकांना कळेनासे झाले आहे. देशाचे नेतृत्व पंतप्रधान इम्रान खान करत आहे की, राज्याचे मुख्यमंत्री की, लष्कर? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पंतप्रधान इम्रान खान संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानात 25 टक्के लोक गरिबीरेषेखाली आहेत. लॉकडाऊन केले तर त्यांचे पोट कसे भरेल? त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्याइतपत आपल्या देशाची स्थितीच नाही. असे इकडे पंतप्रधान म्हणत असताना, पंजाब आणि िंसध प्रांतात तिथल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषितही करून टाकले. लोकांचे म्हणणे आहे की, हे लष्कराच्या निर्देशावरून करण्यात आले. इम्रान खान म्हणतात की मीडियाच्या दबावाखाली येऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. लोक सैरभैर आहेत. पंतप्रधान इम्रान खान लोकांना अमेरिका, इटली, इंग्लंड, स्पेनची उदाहरणे देत आहेत. तिथल्या इतकी गंभीर परिस्थिती अजून पाकिस्तानात आलेली नाही म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.

Sunday, 29 March 2020

अफगाणी शिखांचा संहार -तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही-महाMTB

अफगाणिस्तानातील गुरुद्वारात मुजाहिदांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांत २७ शिखांचा बळी गेला. तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही.सध्या संपूर्ण जगाला कोरोना विषाणूजन्य महामारीने विळखा घातलेला असून प्रत्येक ठिकाणी मदतकार्य, बचावकार्य सुरू असल्याचे दिसते. देशादेशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन वाचले-वाचवले पाहिजे, अशी भावना अनेकांच्या मनात जागत असल्याचेही पाहायला मिळते. मात्र, अशा संकटाच्या काळातही जिहादी-दहशतवादी मानसिकतेच्या संस्था, संघटना धर्मांधपणापायी आपल्याहून भिन्न धर्मीयांचा जीव घेत आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरातील शोर बाजार परिसरात असलेल्या एकमेव गुरुद्वारावरील झालेला फिदायीन हल्ला त्याचाच दाखला. गुरुवारी इथल्या गुरुद्वारामध्ये १५० हून अधिक शीख भाविक वैशाखीसाठी एकत्र जमले होते आणि त्याचवेळी आत्मघाती मुजाहिदांनी बॉम्बहल्ला केला. मुजाहिदांच्या या हल्ल्यात २७ शिखांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले.


भारताने व भारतीयांनी गुरुद्वारावरील या हल्ल्याचा निषेध केला तसेच मृत्युमुखी पडणार्‍यांप्रति सहानुभूतीही व्यक्त केली. दरम्यानच्या काळात गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट म्हणजेच ‘इसिस’ या संघटनेने घेतली. इसिसच्या या कबुलीजबाबातूनच हे स्पष्ट होते की, इराक व सिरियात या संघटनेचा खात्मा झाल्याचे दिसत असले तरी अफगाणिस्तानात ही संघटना सक्रिय आहे. तसेच जगावर भीषण आपत्ती कोसळलेली असताना आम्ही आमच्या कट्टरतेसाठी निरपराधांचे प्राण घेतच राहू, हेही या संघटनेने दाखवून दिले. अर्थात केवळ माझाच धर्म श्रेष्ठ अशा वर्चस्ववादी प्रवृत्तीचे लोक इतरांच्या विध्वंसावरच लक्ष केंद्रित करणार! तथापि, अफगाणिस्तानात हे आजच घडत नसून इथल्या अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, शीख, बौद्ध, जैन वगैरेंचा संहार अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिणामी, तिथे मुस्लीम वगळता इतर सर्वच धर्मीयांची संख्या नगण्य झाल्याचे दिसते.


अफगाणिस्तानातील हिंदू-शिखांसहित इतरांच्या कत्तलींची सुरुवात १९७० पासून झाली. हिंदू व शिखांना संपवण्यात इथले मुजाहिदी लढवय्ये आणि तालिबानी दहशतवादी आघाडीवर होते. मुजाहिद म्हणजे रशियाच्या लाल सेनेविरुद्ध अमेरिका आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी युद्ध करणारे लढवय्ये. हे लढवय्ये जिहादसाठी लढत असून तालिबान आणि त्यांच्यात थोडाफार फरक आहे. रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसल्यापासून मुजाहिदांना अमेरिका व पाकिस्तानने पाठबळ दिले. तेव्हापासून रशियन सैन्याबरोबरच अल्पसंख्य हिंदू व शिखांनाही त्यांनी मारायला सुरुवात केली. ५० वर्षांपूर्वी काबूल व परिसरात ७ लाखांपेक्षा अधिक हिंदू व शीख राहत होते. परंतु, अफगाण युद्ध संपेपर्यंत १९९० साली त्यांची संख्या लाखावर आली आणि १९९० साली लाखभर असणार्‍या हिंदू व शिखांची संख्या पुढच्या ३० वर्षांत केवळ ३ हजारांवर आली.


म्हणजेच गेल्या पाच दशकांच्या कालावधीत अफगाणिस्तानातील हिंदू व शीख होत्याचे नव्हते झाले. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या हिंदू व शिखांचे नेमके काय झाले? तर मुजाहिद आणि तालिबानी दहशतवादी या दोघांनीही इथल्या अल्पसंख्याकांवर जुलूम-जबरदस्ती केली. सामाजिक बहिष्कार आणि दडपशाही ही तर रोजची बाब झाली. इथल्या हिंदू व शिखांची घरे ओळखीच्या खुणांनी रंगवली गेली. मंदिरांची, गुरुद्वारांची तोडफोड केली, घरेदारे, दुकाने लुटली. अनेकांचे एकतर धर्मांतर केले किंवा जे त्याला तयार नव्हते, त्यांची हत्या केली. तसेच जे वाचले त्यांनी अफगाणिस्तानातून पलायन करत अन्य देशांत आश्रय घेतला. २१ व्या शतकातली शिखांवरील अत्याचाराची दोन उदाहरणे तर अतिशय हिडीस आहेत. २०१० साली तालिबानी दहशतवाद्यांनी दोन शिखांची हत्या करून त्यांचे मुंडके गुरुद्वारावर लटकावले, तर २०१८ साली अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार्‍या शिखांच्या बसवर हल्ला करत २० पेक्षा अधिकांचा बळी घेतला. परंतु, इथल्या हिंदू व शीख समुदायावर सातत्याने हल्ले होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ किंवा जागतिक मानवाधिकार आयोग वगैरेंनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. जागतिक समुदायाने अफगाणिस्तानातील हिंदू व शिखांप्रति सहानुभूतीही दाखवली नाही. म्हणूनच बॉम्ब व बंदुकीच्या हल्ल्यांत ठार होणार्‍या या हिंदू-शिखांना जगण्याचा अधिकार नाही का, नव्हता का? हा प्रश्न निर्माण होतो.अफगाणिस्तानातील मुजाहिदांच्या हल्लेखोरीमागे पाकिस्तानचाही हात आहे. भारत सरकारने गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानमध्ये अनेक विकासकामे केली. तसेच कित्येक अफगाणी विद्यार्थी भारतात येऊन शिक्षणही घेत आहेत. विकासकामांमुळे व अफगाणी जनतेच्या प्रगतीसाठी काम केल्यामुळे तिथली जनता भारतावर प्रेम करताना दिसते तर पाकिस्तानबद्दल त्यांना आपुलकी वाटत नाही. परिणामी, अफगाणिस्तानच्या विकासातील भारताच्या योगदानामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. मागील काही महिन्यांपासून तालिबान व अफगाण सरकारमध्येही शांतता चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळेही पाकिस्तान खवळला व त्याने तिथल्या अल्पसंख्याकांना लक्ष्य करायला सुरुवात केली, जेणेकरून अफगाणिस्तान सरकारची प्रतिमा खराब होईल. पाकिस्तानने यासाठी अफगाणिस्तानातील ‘इसिस’ संघटनेला कामाला लावले व म्हणूनच आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यामागे पाकिस्तानचाही हात असल्याचे समजते. अशा परिस्थितीत भारत सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे महत्त्व लक्षात येते. कारण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन वगैरे अल्पसंख्याकांवर अन्याय होतच आहे. त्याची उदाहरणे आताही समोर येत आहेत.

जगातली कोणतीही संस्था, संघटना त्यांच्या साह्यासाठी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे भारतालाच या सर्वांची जबाबदारी घेणे क्रमप्राप्त होते व तेच काम मोदी सरकारने केले. दरम्यान, अफगाणिस्तानातील गुरुद्वारावरील हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही भारत सरकारला विनंती केली. अफगाणिस्तानातील सर्वच शीख समुदायातील नागरिकांना एअरलिफ्ट करावे, जेणेकरून त्यांचे जीव वाचतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानातील हिंदू व शिखांवरील अन्याय-अत्याचाराची तीव्रता यातूनच स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर नागरिकत्व कायद्यात हिंदू, शीख आदी अल्पसंख्यकांचाच उल्लेख का, असा प्रश्न देशातल्या तमाम शहाण्यांनी केला होता. अशा सर्वच कथित बुद्धीमंतांना त्याचे उत्तर आताच्या गुरुद्वारावरील हल्ल्यातून मिळाले असेल, अशी अपेक्षा बाळगायलाही हरकत नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) - चिनी ताटाखालील मांजर-प्राची चितळे जोशी-ICRR.जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी चीनच्या पाठिंब्यावर मे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत WHO चे महासंचालक हे पद जिंकले.चीनमुळे उद्भवलेल्या कोरोना व्हायरसची जबाबदारी चीन घेऊ इच्छित नाही आणि त्यांच्या या कृत्याला टेड्रोस यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र संघटनेचा भरवसा असलेली जागतिक आरोग्य संघटना आपले समर्थन देतेय.उलटपक्षी सर्व पुरावे असूनही, आपण त्यातले नाहीच असे चीन भासवत आहे. चीनमध्ये हा व्हायरस दुसऱ्या देशातून आला असल्याची चीन बोंब मारतोय. परदेशी विषाणूला चीन बळी ठरला असून त्यावर चीनने नियंत्रण मिळवले असल्याचे चीन सांगतोय.चीनच्या या पारदर्शकतेचं टेड्रोस यांनी कौतुक केले आहे. एवढेच नाही तर चीनचा आपण सर्वानी आदर्श ठेवला पाहिजे असेही ते म्हणाले. चीनने जगापासून सत्य परिस्थिती लपवली असली तरी त्यावर भाष्य न करता पडदा टाकण्याकडेच त्यांचा कल आहे.


tedros_1  H x Wज्या शास्त्रज्ञांनी डिसेंबरमध्ये या विषाणूचा शोध लावला त्या शास्त्रज्ञावर चिनी सरकारने दबाव टाकून या विषाणूविषयी सगळे पुरावे नष्ट करण्यास भाग पाडले. या विषाणूने सगळीकडे थैमान घालायच्या खूप आधी या शास्त्रज्ञाने लोकांना सावध करायचा प्रयत्न केला होता. त्याने याविषयी ऑनलाईन काही पुरावे दिले होते ते पुरावे चिनी सरकारने नष्ट केले. चीन सरकारवर टीका करणारा रिअल इस्टेट मधील एक मोठा माणूस तेव्हापासून गायब आहे.


२२ जानेवारीला चीनने वुहानमधील लोकांना प्रवास करण्यावर बंदी घालण्यापूर्वी जवळजवळ ७ दशलक्ष चिनी लोकांनी वुहान सोडून चीन आणि जगातील इतर ठिकाणी प्रवास करून या रोगाचा प्रसार केल्याचे द न्यूयॉर्क टाइम्स ने म्हटले आहे.एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा रोग पसरत नाही किंवा एकमेकांना स्पर्श केल्याने हा रोग होत नाही अशी बतावणी सुरुवातीच्या काळात चीनने केली. आणि WHO ने त्याचीच री ओढली. आणि १४ जानेवारीला त्यांनी तसेच ट्विट केले. "चीनने या भयंकर आपत्तीला किती धीराने तोंड दिले आणि ज्याप्रकारे आपत्तीचे निवारण केले याकरिता चीन कौतुकास पात्र आहे. संपूर्ण जगाला चीनने उत्तम उदाहरण घालून दिले आहे." अश्या शब्दात टेड्रोस यांनी चीनचे जाहीर कौतुक केले.चीनमधील भयंकर परिस्थितीकडे टेड्रोस यांनी डोळेझाक केली आणि जानेवारीमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग याना भेटून आल्यानंतर तर त्यांनी तेथील विषाणूच्या उद्रेकांविषयी चकार शब्दही न काढता चीनचे कौतुकच सुरु ठेवले असे द हिल वृत्तपत्राने म्हटले आहे.टेड्रोस यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. टेड्रोस यांनी वेळेवर यात लक्ष घातले असते आणि योग्य तीच माहिती लोकांपर्यंत आली असती तर आज लोकांचे प्राण वाचले असते. निदान हा रोग साथीचा आहे किंवा तो एका माणसाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होणार आहे असे जरी त्यांनी जगाला सावध केले असते तरी हा रोग एवढा फैलावला नसता.वुहान मधील परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आली असल्याचे चीन सांगत आहे आणि आता WHO तीच  गोष्ट लोकांच्या मनावर ठसवत आहे. परंतु चिनी अधिकारी पुन्हा एकदा जगाला फसवत असल्याचे वुहान येथील डॉक्टरांनी जपानी मीडियाला सांगितले.टेड्रोस यांचे चीनशी संबंध ही काही नवीन बाब नाही. इथिओपियाचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी चीन सोबत काम केले आहे. इथिओपियामध्ये आरोग्यमंत्री म्हणून काम पाहत असताना तीन वेगवेगळ्या कॉलराच्या साथींकडे त्यांनी निवडणुकीच्या धामधुमीत लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या साथी पसरलेल्या असतानाही त्यांनी त्या नियंत्रित करायच्या ऐवजी WHO च्या निवडणुकीवर भर दिला. WHO चं प्रमुख पद केवळ पब्लिक हेल्थ मध्ये पीएचडी मिळवलेल्या माणसालाच मिळते. असे असूनही टेड्रोस हे डॉक्टर असूनही हे पद त्यांना मिळाले.WHO चा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही महिन्यात टेड्रोसने संयुक्त राष्ट्रसंघाचे गुडविल अँबॅसिडर म्हणून झिम्बाब्वेचे माजी हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांची नियुक्ती करावी म्हणून आग्रह धरला. मुगाबे हे मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे कुख्यात नेता म्हणून ओळखले जातात. नंतर आंतरराष्ट्रीय प्रक्षोभामुळे त्यांना त्यांचा आग्रह मागे घ्यावा लागला. मुगाबेच्या नाव ही एक राजकीय चाल होती. मुगाबेचे अनेक वर्ष चीनशी मित्रत्वाचे संबंध होते. पन्नास किंवा त्याहून अधिक आफ्रिकन राज्यांनी टेड्रोसच्या नेमणुकीला पाठिंबा दिला होता.वॉशिंग्टन पोस्टच्या स्तंभलेखक फ्रिडा घिटिस यांनी म्हटलेय," टेड्रोस यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या  डेव्हिड नाबारो या इंग्लंडच्या उमेदवाराला हरविण्यासाठी चीनने पडद्यामागून खूप सूत्रे हलविली. टेड्रोस जिंकून यावेत म्हणून चीनने अथक परिश्रम केलेत. टेड्रॉसचा विजय हा बीजिंगसाठीही विजय होता ज्याद्वारे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना आपली जगावरील पकड घट्ट करण्यास मदत झाली."एवढेच नाही तर अमेरिका आणि इतर देशांनी आपल्या सीमा चीन साठी बंद केल्या तेव्हा टेड्रोस यांनी त्या देशांना खडे बोल सुनावले." आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवास यांच्याबाबतीत असे निर्बंध लादण्याची काही गरज नाही. आम्ही सर्व देशांना पुराव्यावर आधारित कृती करण्यासाठी आवाहन करतो," असे ते म्हणाले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या विषाणूला " परदेशी विषाणू" असे संबोधले तेव्हा WHO ने त्यांना फटकारले. लगेचच १७ मार्चच्या आपल्या ट्विट मध्ये WHO ने ," व्हायरस कोणत्याही एका राष्ट्राचा नसतो हे लक्षात ठेवा." असे ट्विट केले. आणि त्यांचे हे ट्विट चीनच्या मीडियाने उचलून धरले.डब्ल्यूएचओचे एक संचालक माईक रायन म्हणाले, “विषाणूंना कोणतीही सीमा नसते, तो कोणत्याही एका वंशाचा नसतो, तुमच्या त्वचेचा रंग किंवा तुमच्याकडे किती पैसे आहे हे तो पाहत नाही. सर्वानी एकत्र येऊन या विषाणूशी लढण्याची गरज आहे. इथे कुणा एकालाच दोषी ठरविता येणार नाही."चीनने आपलं एक बाहुलं WHO च्या संचालक पदी बसवलं आहे. चीन जसं नाचवेल तसं ते नाचणार आहे. यापुढे WHO च्या रिपोर्ट्स वर विश्वास ठेवताना नीट विचार करण्याची गरज आहे.- प्राची चितळे जोशी.

करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?'


जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीस आयुर्वेदाचा आधार देत खालील गोष्टी आपण करू शकता;

१. कामासाठी बाहेर निघताना दोन्ही नाकपुड्यांत कोमट केलेल्या देशी गायीच्या साजूक तुपाचे २-२ थेंब टाकणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

२. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.

३. कामावरून घरी आल्यावर कडकडीत पाण्याने अंघोळ करणे.

४. घरामध्ये कडुनिंब, धूप, देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर असा धूप घालणे. (खोकला येत असणाऱ्या व्यक्तींपासून दूर ठेवावे.)

५. आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास रुमालाचा वापर करणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींशी बोलताना जास्त जवळ न जाणे.

६. सकाळच्या वेळी कपभर देशी गायीच्या गरम दुधात हळद आणि सुंठ घालून पिणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

७. 'मला एक बाईट/सिप दे ना' म्हणत म्हणत इतरांचे उष्टे खाणे, चहा इत्यादि पिणे सक्तीने टाळावे.

८. भाज्या आणि फळे व्यवस्थित धुवून मगच वापरावी. बाहेर मिळणारे सॅलड्स, सँडविच, फ्रुट डिश इत्यादि पदार्थ टाळावे.

९. नाक, तोंड आणि डोळे यांना शक्यतो हाताने स्पर्श करू नये. करायचा झाल्यास हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करावी.

१०. सध्या काहीकाळ तरी सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्या वैद्यांना त्वरित भेटणे.

आयुर्वेद सांगतो; जनपदोध्वंसापूर्वीच औषधींचा संग्रह वैद्यांनी करून ठेवावा. निसर्गाशी जवळीक साधली की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. देशी गायींबाबत काम करत असल्याने अशा संकटाची थोडीशी चाहूल लागली होती. वर दिलेल्या दहा टिप्स मी सोशल मीडियावर २५ जानेवारी रोजी शेयर केल्या होत्या. त्यावेळेस त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत; कारण भारतात करोनाचा प्रवेश होईल असं कोणालाही वाटत नसावं!

जनपदोध्वंसावर काही उपाय आहे का? चरक सांगतात; अर्हता पाहून पंचकर्म देणे आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेत राहणे हा उत्तम उपाय आहे. 'च्यवनप्राश दीर्घकाळ सेवन करण्याची गोष्ट आहे; महिनाभरापुरती बाब नाही.' अशीही पोस्ट च्यवनप्राश बनवला होता तेव्हा केली होती. आज त्यांचंही महत्व आपल्याला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधर्माचरण सोडायला हवं. फार खोलात जाऊ नका; किमान आपल्या वैद्यांना भेटून आयुर्वेदाला अपेक्षित दिनचर्या-ऋतुचर्या जाणून घ्या आणि आचरणात आणायला सुरुवात करा. जगभरात संशोधन करून आज हे सांगितलं जात आहे की प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाची मारकता घटेल. आयुर्वेद हे कित्येक शतकं सांगतोय. आज हळदीची मागणी वाढते आहे. यावर्षीची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. जग आयुर्वेदाकडे आशेने बघतंय. आपण करंटेपणा कधी सोडणार? आयुर्वेद ही आपली जीवनशैली आणि पहिली चिकित्सापद्धती बनवा. वैद्य बांधवांनीदेखील 'करोना काय करणार?' हा निष्काळजी पवित्रा ते 'करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?' हा नकारात्मक पवित्रा सोडायला हवा. हीच वेळ आहे घराघरांत आयुर्वेद नेण्याची. चला; या जनपदोध्वंसावरून तरी काही बोध घेऊया!

Saturday, 28 March 2020

आपणच बना आपले रक्षक! -ARVIND SURVE -TARUN BHARAT

कोरोना व्हायरसने सध्या धुमाकूळ घातला आहे. ही वैश्विक महामारी झाली आहे आणि जगभरात त्यात हजारो बळी गेले आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या परीने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती करत आहे. पोलिसांच्या गाड्या रस्तोरस्ती आवाहन करत फिरत आहेत. मात्र, लोकांना त्याचे गांभीर्य कळले असल्याचे अद्याप दिसत नाही. अजूनही लोक ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा पद्धतीने निर्धास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. १०-१५ मिनिटांत ३-३ वेळा इमारतीतून खाली येऊन काही कामानिमित्त रस्त्यावर येत आहेत. काही जण एखाद्या वसाहतीच्या गेटवर गप्पा छाटत बसलेले दृष्टीस पडते.


याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे, काही महिला कोरोनाचे संकट ही संधी समजून संचारबंदीच्या काळातही एक-दोघीच्या गटात नाचगाणी करत टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असल्याचे दृष्टीस पडत आहे. मुलांना रस्त्यावर खेळण्यासाठी सोडले जात आहे. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी पोलिसांना ‘१००’ नंबरवर कोणी फोन केल्यास तो नंबरही लागत नाही. पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेता आणि त्यांच्याकडे येणारा कॉल लक्षात घेता प्रत्येकाच्या कॉलला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बाळगणेही गैर आहे.


या आजारात कोरोना गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेद करीत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आपले रक्षक आपणच बनायचे आहे. शासनाचे प्रथम गर्दी न करण्याचे आवाहन केले, जमावबंदी केली, संचारबंदी केली. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे बंद करून शेवटी ‘लॉकडाऊन’ केले. पण, लोकांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही.


पोलिसांच्या गाड्या खबरदारीच्या सूचना देण्यासाठी दररोज रस्तोरस्ती फिरत आहेत. तरीही लोक रस्त्यावर येत आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्व. दादा कोंडके यांनी त्यांच्या एका चित्रपटातील गीतात ‘माणसापरिस मेंढरं बरी’ असे म्हटले आहे. मेंढपाळाने मेंढरांना एका जागेवर बसवले तर ते त्याच परिघात फिरत बसतात. मेंढपाळाच्या बरहुकूम रस्त्याने जातात. मग आपण तर सर्व प्राण्यांत सुबुद्ध आहोत. शासनाचे हुकूम आपण नको का मानायला?


संवाद असू द्यावा!

कोरोना ही वैश्विक महामारी आहे. तो रोखण्यासाठी एकमेकांपासून लांब राहणे हाच एक पर्याय आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला. ही एक प्रकारची रंगीत तालीम होती. लोकांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वतःला बंदिस्त करून घेतले असले तरी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) मध्यरात्रीपासून देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत हा ‘लॉकडाऊन’ राहणार आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचे नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे बजावले आहे. या वैश्विक महामारीपासून स्वतःला वाचविण्यासाठी, कुटुंबाला वाचविण्यासाठी आणि देशवासीयांना वाचविण्यासाठी घराबाहेर पडणार नाही यासाठी प्रत्येकाने दरवाजाबाहेर लक्ष्मणरेषा आखून घ्यायची आहे, स्वतःच संकल्प करायचा आहे. जे देश आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षाही अधिक आधुनिक अशा आरोग्यसुविधा आहेत, अशा बलाढ्य देशांनाही या भयंकर आजाराच्या संकटाने सोडलेले नाही. एकमेकांच्या संपर्कात न येणे हाच यावर एक पर्याय आहे. जेथे या आजाराची गंभीर समस्या आहे, त्या प्रत्येक राज्याने ‘लॉकडाऊन’ केले आहेच. त्यामुळे देशवासीयांच्या हितासाठी पंतप्रधानांनी देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. कोरोनाची लागण होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणीच जाहीर केली. तरीही तेथे बळींची संख्या १,२८८ झाली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १३४ कोटींच्या आसपास आहे. त्यामानाने आपल्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशात हजारो बळी गेले आहेत. आजच्या घडीला जगभरात पाच लाख, २६ हजार कोरोनाबाधित आहेत. २३ हजार, ९५४ मृत्यू आहेत, तर एक लाख, २१ हजार, ९७८ रिकव्हर झाले आहेत. त्यापैकी भारतात ६९४ कोरोनाबाधित आहेत. १६ जण मृत पावले आहेत आणि ४५ जण रिकव्हर झाले आहेत. यापुढची पायरी आपण ओलांडायची नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारने सुसंवाद साधणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी सांगायचे, “लक्ष्मणरेषा आखा”, मुख्यमंत्र्यांनी म्हणायचे,“घाबरू नका”, त्यामुळे आजाराच्या गांभीर्याविषयी लोकांत संभ्रम निर्माण होतो आणि मंत्र्यांनाच लष्कर बोलावण्याचा इशारा द्यावा लागतो.Friday, 27 March 2020

बंधूनो, हा संदेश संपूर्ण देशात आणि जगात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना पाठवा.* खूप महत्वाचे* *इटलीचा जगाला संदेश*उशीर होण्यापूर्वी पावलं उचलण्यास सांगितले:

*

इटलीचे एक पत्र,सर्वांसाठी शांती,आम्ही इटलीमध्ये राहतो - मिलान,
  या कठीण दिवसांमध्ये मी तुमच्या बरोबर आमच्या चुका सामायिक करीत आहे आणि समजावून सांगणार आहे की, “येथे जीवन मिलनमध्ये कसे आहे” आणि मला वाटते की आम्ही येथे ज्या चुका केल्या आणि त्यांचे झालेले दुष्परिणाम जगणे जाणून घ्यावेत.
  आम्ही सध्या अलग ठेवण्यात आलेलो आहोत. आम्ही घरातून बाहेर पडत नाहीत,
पोलिस सतत कार्यरत आहेत आणि घराबाहेर कुणी आल्यास त्याला अटक करत आहेत.
  सर्व काही बंद आहे! व्यवसाय, मॉल्स, स्टोअर्स, शाळा रस्ते सर्व निर्जन आहे.
  आमचे नष्ट होत असल्याची जाणीव होत आहे !!
  इटली, जगण्यात रंगत असलेला देश, एका क्षणापासून दुसर्‍या क्षणामध्ये परिवर्तित झाला आहे जणू तो युद्धाचा देश आहे.
  जन्मभरात आम्ही कधी असला विचारचं केला नव्हता
  लोक गोंधळलेले आहेत, दु: खी आहेत, चिंताग्रस्त आणि असहाय आहेत, त्यांच्यावर ही वेळ कशी आली आणि हे संपूर्ण भयानक स्वप्न कधी संपेल हे बर्‍याचदा समजत नाही.
     आमची सर्वात मोठी चूक अशी होती की पहिल्या हिटच्या वेळी आम्ही नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगत होतो, काम, मनोरंजन आणि साथरोगामुळे दिलेल्यासुट्टीच्या कालावधी आम्ही रस्त्यावर उतरुन मित्र आणि मेजवानीत एकत्र घालवला
  आमच्यातील प्रत्येकजण चुकीचा होता आणि म्हणूनच आम्हांवर ही वाईट वेळ आलेली आहे!
  आम्ही जगाला विनंती करतो की, सावधगिरी बाळगा, हा हास्य किंवा विनोदाचा विषय नाही.
  आपले प्रियजन, आपले आईवडील आणि आजी आजोबा यांचे रक्षण करा! हा रोग त्यांच्यासाठी धोकादायक आहे.
  येथे दररोज सुमारे 200 लोक पटापट मरत आहेत, कारण मिलानमधील एवढी औषधीही उपलब्ध नाही (मिलन येथे जगातीसर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या),परंतु प्रत्येकासाठीव आता वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे!
  कोण मरतील हे डॉक्टरचं ठरवतात!
हे केवळ सुरुवातीस आमच्या उदासपणामुळेच झालेलं आहे, आम्ही परिस्थितीची पर्वा न करता नेहमीप्रमाणे आपले आयुष्य चालू ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता!
  कृपया, आमच्या चुकांमधून तुम्ही शिका, आमचा एक छोटासा देश आहे जो एका महान शोकांतिकेच्या काठावर उभा आहे, ह्या चुका तुम्ही करू नका

आता चांगले ऐका ,,, 🙏 1.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
2.सार्वजनिक ठिकाणी काही खाऊ नका
3.यावेळी घरीच रहा!
4.आरोग्य मंत्रालयाची/प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे ऐका (ते विनोद करीत नाहीत!).
5.प्रत्येक व्यक्तीपासून एक मीटर अंतर ठेवा,
6.जवळ येऊ नका,
7.गोंधळ हकिंवा आणि गर्दी होऊ देऊ नका.
8.पूरक आणि प्रतिबंधात्मक उपचार मिळवा आणि इतरांच्या चुका जाणून घ्या.
9.आम्ही शिफारस करतो की आपण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या.
10. शासन आणि प्रशासन यांना साथीचा प्रसार रोखण्यात मदत करा ...

   आमचा संपूर्ण देश इटली एकांतवासात आहे, म्हणजे 60 दशलक्ष लोकांना अलग ठेवण्यात आलेले आहे!!
  जर आम्ही सुरुवातीपासूनच सूचना ऐकल्या असत्या तर हे टाळता आले असते.
  स्वतःची आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवनाची काळजी घ्या ❤❤

*जैविक युद्ध*तिसऱ्या महायुद्धाचा ऐक भाग*© सुमित शिर्के-RECEIVED ON WHATS APP


"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

               चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.

               जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.

               *आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं*....???
               *आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. *मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. *युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे*.केंद्र सरकारचा ‘अर्थ’दिलासा-tarun bharat-editorial


    दिनांक  27-Mar-2020 19:42:45
कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार गरीब, महिला, मजुरांची काळजी घेतानाच मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभे असल्याचेही या सगळ्यांतून दिसते. तसेच आम्ही उद्योजकांच्या, कंपन्यांच्या बरोबर असल्याचेही सरकारने दाखवून दिले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशात सध्या २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. अमेरिकेसारख्या भांडवलवादी देशाने मात्र अर्थव्यवस्थेची चिंता करत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ किंवा ‘शटडाऊन’चा निर्णय घेतला नाही. परिणामी, तो देश सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या रूपात त्याची किंमत मोजतानाही दिसतो. मोदी सरकारने मात्र ‘जान है तो जहान है’चा मंत्र जपत कोरोनासारख्या सांसर्गिक आजारापासून प्रत्येक भारतीयाचा जीव कसा वाचेल, यासाठी पुढाकार घेतला. तथापि, ‘लॉकडाऊन’मुळे बाजारातील पैशाचा प्रवाह एकाएकी थांबला. छोटी दुकाने, लघुउद्योग, कुटिरोद्योग, कापड उद्योग, शेती, मांस-मासे उद्योग, लहान-मोठ्या कंपन्या, पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, बांधकाम उद्योग, बचतगट, महिला स्वयंसहाय्यता गट आदी सर्वच व्यवसाय-व्यापार बंद झाल्याने इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचीच आर्थिक स्थिती बिकट झाली. विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही टाळे लागल्याने तिथे काम करणाऱ्यांच्या डोक्यावरही आर्थिक दुष्टचक्राची तलवार टांगली गेली. दैनंदिन घडामोडीत कार्यरत जनतेबरोबरच बेघर, बेवारस, अनाथ, दिव्यांग, वृद्ध, विधवा, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अशा समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. नरेंद्र मोदी सरकारने मात्र अर्थव्यवस्था ठप्प पडलेली असतानाही अशा सर्वच गरजवंतांच्या दोन वेळच्या अन्नाची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’ची घोषणा करत तब्बल १.७० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. सदर पॅकेजनुसार देशातील ८० कोटी गरिबांना प्रत्येकी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू आणि एक किलो डाळ असे सहा किलो धान्य पुढील तीन महिन्यांसाठी मोफत मिळेल. हे धान्य दोन हप्त्यांमध्ये घेता येईल. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा दोन आणि तीन रुपये दराने प्रत्येकी पाच किलो धान्य मिळते. आपत्ती काळातील मोफत धान्य हे नियमित मिळणाऱ्या पाच किलो धान्याच्या व्यतिरिक्त असेल. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांवर गरिबांना तीन महिन्यांसाठी ११ किलो धान्य मिळणार आहे. उज्ज्वला योजनेतील ८ कोटी महिलांना पुढचे तीन महिने मोफत स्वयंपाकाचा गॅस मिळेल. २० कोटी जन-धन खातेधारक महिलांना आगामी तीन महिने दरमहा ५०० रु. देण्यात येतील, तर दीनदयाळ योजनेंतर्गत महिला बचतगटांना १० लाखांऐवजी २० लाखांचे कर्ज देण्याचेही या पॅकेजमध्ये अंतर्भूत आहे. ८ कोटी, ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत थेट २ हजार रुपये जमा करण्याचेही या पॅकेजमध्ये म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना सानुग्रह अनुदान म्हणून १ हजार रु. दिले जातील. मनरेगा योजनेतील मजुरीही १८२ रुपयांवरून २०२ रु. करण्यात आली असून त्याचा लाभ ५ कोटी मजुरांना होईल. बांधकाम क्षेत्रातील ३.५ कोटी नोंदणीकृत कामगारांना दिलासा देत ३१ हजार कोटींच्या निधीची तरतूदही या पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, तर संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी आगामी तीन महिने केंद्र सरकार भरणार असून कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या पीएफपैकी ७५ टक्के निधी काढण्याची मुभादेखील असेल. सुमारे ४.८ कोटी पीएफधारकांना याचा फायदा होईल. एकूणच लॉकडाऊनमुळे देशातील ज्या ज्या घटकांवर विपरित परिणाम होईल, त्या सर्वांच्या मदतीसाठी मोदी सरकार धावून आल्याचे यावरून दिसते.

‘लॉकडाऊन’दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गतच अर्थमंत्र्यांनी भलेमोठे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेदेखील आपली जबाबदारी ओळखून विविध निर्णय घेतले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये कपात करत गृहकर्जांसह विविध कर्जांचा मासिक हप्ता घटवण्याचा रस्ता मोकळा केला. आरबीआयने रेपोरेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केल्याने तो आता ५.१५ वरून ४.४० टक्क्यांवर आला. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर रेपोरेटमधील कपातीच्या घोषणेमुळे कर्जाच्या मासिक हप्त्यांची रक्कम कमी होईल. सर्वसामान्य कर्जधारकांसाठी ही फार मोठी सवलत ठरणार आहे. इतकेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेने आगामी तीन महिन्यांपर्यंत गृहकर्ज, कारकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जाचे मासिक हप्ते स्थगित करण्याचा सल्लाही सर्वच बँकांना दिला. त्यानुसार तीन महिन्यांत कर्जधारकांना कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही तर ते तीन महिने एकूण कर्जफेडीच्या कालावधीत वाढतील. म्हणजे एखाद्या कर्जधारकाचे कर्ज डिसेंबर २०२५ ला संपत असेल तर ते तीन महिन्यांनी पुढे मार्च २०२६ पर्यंत जाईल. दिलासादायक बाब म्हणजे यामुळे कर्जधारकांच्या ‘क्रेडिट स्कोअर’वर कोणताही फरक पडणार नाही, त्यांना ‘डिफॉल्टर’ मानले जाणार नाही. तथापि, आरबीआयने तीन महिने मासिक हप्ता स्थगित करण्याचा केवळ सल्ला दिला आहे आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा, हे बँकांवर सोपवले आहे. पण, स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना आरबीआयच्या सल्ल्यावर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. एसबीआयने असे केल्यास इतरही बँका तशी पावले उचलतील, असे वाटते. दरम्यान, रेपोरेटमध्ये कपात केल्याने बाजारातही उत्साह संचारण्याची चिन्हे आहेत व हाती आलेला पैसा इतर कामांत खर्च करता येईल. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्येही १ टक्क्यांची कपात करत तो ३ टक्क्यांवर आणला. त्यामुळे बँकांकडे १.३७ लाख कोटी ते ३.७० लाख कोटी इतकी अतिरिक्त रक्कम उपलब्ध होईल व हा पैसा बाजारात लावता येईल.

गरीब, मध्यमवर्गीयांच्या आताच्या आणीबाणीच्या काळातील समस्या सोडवतानाच निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना, व्यापार्यांयना, करदात्यांनाही खुशखबर दिली. मार्च महिना म्हणजेच आर्थिक वर्षाची अखेर आणि याच काळात वर उल्लेख केलेल्या सर्वांची प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु, याच कालावधीत ‘लॉकडाऊन’ असल्याने अशा सर्वांसमोर प्राप्तीकर परतावा कसा भरायचा, हा प्रश्न उभा ठाकला होता. अर्थमंत्र्यांनी त्याचीच दखल घेत २०१८-१९ या वर्षाचा प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३० जून २०२० केली. सोबतच विलंबित प्राप्तीकरावरील व्याजदर १२ टक्क्यांवरून ९ टक्के इतके केले. टीडीएस जमा करण्याचा कालावधी वाढवला नसला तरी व्याजदर १८ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आणला. पॅनकार्ड-आधारकार्ड संलग्नतेचा कालावधीही पुढे ढकलला. सोबतच कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनवर विनाशुल्क वापरण्याची परवानगी दिली व तीन महिन्यांपर्यंत खात्यांवर किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल केली. सोबतच ५ कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या उद्योजकांना जीएसटी परतावा भरण्यासाठीचा कालावधी वाढवून दिला. तसेच कंपनी विवाद, कंपनी बोर्ड बैठक, कंपन्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ यांसारखे निर्णयही सरकारने घेतले. आर्थिक क्षेत्राबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लॉकडाऊन’चा निर्णय जाहीर करतेवेळी आरोग्यविषयक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी विशेष निधीची घोषणा केली होती. कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचार, कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही याची तपासणी सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साहित्य, आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि आरोग्यविषयक अन्य साधनसामुग्रीसाठी १५ हजार कोटी रुपये देत असल्याचे मोदी म्हणाले. सोबतच मेडिकल आणि पॅरामेडिकल मनुष्यबळाच्या प्रशिक्षणावरही काम करण्यात येईल, असे ते म्हणाले होते.

कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार गरीब, महिला, मजुरांची काळजी घेतानाच मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभे असल्याचेही या सगळ्यांतून दिसते. तसेच आम्ही उद्योजकांच्या, कंपन्यांच्या बरोबर असल्याचेही सरकारने दाखवून दिले. पंतप्रधानांनी शुक्रवारी ‘जी-२०’ देशांच्या परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संबोधित केले. वैश्विक समृद्धी, सहकार्यासाठी आपल्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आर्थिक हिताऐवजी मानवतेला ठेवले पाहिजे, हा संदेश यावेळी मोदींनी दिला. उल्लेखनीय म्हणजे, मोदी असे केवळ बोलले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रप्रमुखाच्या नात्याने तशी कृतीही आधी केली. म्हणूनच देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकदेखील एकत्रित काम करत असताना कोरोनाविरोधातील लढा भारत नक्कीच जिंकेल, असे वाटते


Thursday, 26 March 2020

सकारात्मक पाऊल- MAHARASHTRA TIMESसंपूर्ण देश 'करोना'शी छेडलेल्या युद्धामुळे एकान्तवासात गेला असताना, अर्थव्यवस्थेचे आणि त्याहीपेक्षा ती चालवणाऱ्या कोट्यवधी कष्टकरी-कर्मचाऱ्यांचे; तसेच शेतकऱ्यांचे काय होणार, हा गहन प्रश्न उभा राहिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा देशासमोर आल्या. गुरुवारी त्यांनी एक लाख ७० हजार कोटींचे जे पॅकेज जाहीर केले, त्याच्या आकड्यांपेक्षाही हेतू आणि व्यापकता महत्त्वाची आहे. विविध राज्ये तसेच अनुभवी तज्ज्ञांशी बोलून या योजनेत भर टाकण्याची सरकारने दाखवलेली तयारीही स्वागतार्ह आहे. आज देशाचे आरोग्य राखण्यासाठी झटणाऱ्या लाखो आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, सफाई कामगार या साऱ्यांचे मनोधैर्य दीर्घकाळ टिकणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी प्रतिव्यक्ती पन्नास लाख रुपयांचा विमा अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, हे फार चांगले झाले; तसेच 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने'नुसार दरमहा दरडोई पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. देशात आधीपासूनच 'अन्न सुरक्षा कायदा' आहे. या कायद्याच्या छत्राखाली जवळपास ऐंशी कोटी लोकसंख्या येते. या साऱ्यांना पुढचे तीन महिने जादा धान्य मिळायचे असेल, तर राज्यांच्या वितरण यंत्रणांना प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करावे लागेल. सध्या प्रचंड अडचणी असूनही माध्यमांना या कामावर लक्ष ठेवावे लागेल. जनधन खाते असणाऱ्या वीस कोटी महिलांच्या खात्यांमध्ये दरमहा थेट पाचशे रुपये टाकण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी ही रक्कम अपुरी आहे. रोजगार गेला असेल, तर या रकमेतून एका कुटुंबाचे एका महिन्याचे पीठमीठही येणार नाही. ही रक्कम आज ना उद्या वाढवावी लागेल. विधवा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना पुढच्या तीन महिन्यांत दोन हजार रुपये मिळणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेतही दोन हजार रुपये तातडीने दिले जातील. अर्थमंत्र्यांनी दिलेला शेतकऱ्यांचा हा आकडा आठ कोटी ६९ लाख आहे. 'मनरेगा' कामगारांच्या दैनंदिन मजुरीचा आकडाही १८२वरून दोनशे रुपयांवर नेला जाणार आहे. मात्र, 'मनरेगा'ची पुरेशी कामे सुरू ठेवणे आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत ती चालू ठेवणे, हेही पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम आहे. ते त्यांना नेटाने करावे लागेल. 'करोना'चा फटका बसण्याआधीच अर्थसंकल्प सादर झाला. तो आता कोलमडून पडणार, हे दिसतेच आहे. या नव्याने येणाऱ्या योजनांसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न अर्थमंत्र्यांना करण्यात आला. तो योग्य असला, तरी सुदैवाने भारताची आर्थिक स्थिती आज हे संकट पेलण्याइतकी मजबूत आहे. गंगाजळीत मुबलक पैसा आहे. इराण, जर्मनी, ब्रिटन आदी 'करोना'ग्रस्त देशांनी याआधीच अर्थव्यवस्थेत प्रचंड पैसा ओतायचे ठरविले आहे. त्यासाठी, जागतिक वित्तसंस्थांकडे कर्जेही मागितली आहेत; मात्र भारतापुढचे आव्हान कितीतरी पटींनी मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे आहे. कोट्यवधी नागरिकांची भूक भागवणे, आरोग्य यंत्रणा कार्यक्षम ठेवणे, हातावर पोट असणाऱ्यांचे बुडणारे उत्पन्न भरून देणे आणि हे सगळे महसूल व करसंकलनाला जबरदस्त ओहोटी लागलेली असताना तारून नेणे, हे आव्हान मुळीच सोपे नाही. अर्थमंत्री या घोषणा करीत असतानाच केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविले. त्यात औद्योगिक कर्जाचे हप्ते तसेच घरखरेदी कर्जांचे हप्ते वसूल करण्याला स्थगिती द्यावी, अशी सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक लवकरच ही घोषणा करू शकते. तो एक दिलासा असेल. देशभरातील वाहतूक ओसरत असली, तरी जीवनावश्यक वस्तूंची तसेच शेतमालाची ने-आण चालू राहणार. हजारो कर्मचारी-कामगारांनाही प्रवास करावा लागणार. त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली टोलमाफीची घोषणाही आवश्यक होती. आजवर केंद्र आणि राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी केली आहे. आता छोटे उद्योग, स्वयंरोजगार उभा करणारे छोटे व्यापारी किंवा उद्योजक यांनाही कर्जमाफी द्यावी का, याचा गंभीर विचार केंद्र सरकारला करावा लागेल. याशिवाय, गेले काही वर्षे संकटात असणारा व कोट्यवधी कामगारांना रोजगार देणारा बांधकाम उद्योग आता काही महिने बंद राहू शकतो. या उद्योगासाठी स्वतंत्रपणे ठोस काही करता येईल का, याचाही विचार केंद्रीय अर्थखात्याने करायला हवा. या सगळ्या विपरीत परिस्थितीत क्रूड तेलाचे घसरते भाव, ही एकच गोष्ट भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. तिचा फायदा घेऊन या संकटात उभे राहावे लागेल. त्यासाठीचे पहिले पाऊल तरी सकारात्मक पडले आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर -TARUN BHARAT-अनुवाद : महेश पुराणिक

पाकिस्तानात सार्वजनिक आरोग्य संरक्षण तंत्राचा तर जवळपास अभावच आहे. पाकिस्तानची बहुसंख्य जनता शिक्षित नाही आणि शिक्षित वर्गातही जागरुकता अतिशय कमी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

‘कोरोना’ विषाणूजन्य महामारी एका वैश्विक आपत्तीच्या रुपात समोर आली. जगातील १९५ देश कोरोना महामारीच्या कह्यात सापडले असून रुग्णांची संख्याही सातत्याने वाढतच आहे. जगातील अनेक देशांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यक असल्याचे स्वीकारले. परिणामी, जगातील बहुतांश देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ची परिस्थितीही पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय धोकादायकरित्या वाढत आहे. परंतु, कोरोनाचा प्रसार रोखण्यात त्या देशांतील धार्मिक कट्टरपंथी पुन्हा एकदा समस्या म्हणूनच उभे ठाकल्याचे चित्र आहे. आठवड्याभरापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देशातील शहरे ‘शटडाऊन’ केल्यास होणार्‍या आर्थिक परिणामांबद्दल सार्वजनिकरित्या बोलले होते. इमरान खान यांच्या विधानांतून आर्थिक दुष्प्रभाव व त्यामुळे भेडसावणारी चिंताही दिसून येत होती. तत्पूर्वी इमरान खान यांनी जगातील सक्षम देशांकडे कर्ज फेडण्यामध्ये सवलत देण्यासाठी एखादी व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली होती. जेणेकरून पाकिस्तान व त्यांसारखे देश आपली आर्थिक बिकटावस्था काही प्रमाणात सावरु शकतील.


कोरोना महामारीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे दिसते व तशा घडामोडी घडत असल्याचेही समोर आले. जसे की, मार्च महिन्यातच वैश्विक गुंतवणूकदारांनी पाकिस्तानच्या कॅपिटल मार्केटमधून सुमारे १.३८८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे भांडवल काढून घेतले. तसेच ‘हॉट मनी’ बाहेर जाण्याचे प्रमाणही १.२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. हा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा झटकाच म्हटला पाहिजे. सोबतच येत्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानला आयात रद्द झाल्याने दोन ते चार अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागेल. एकत्रितरित्या पाहिले तर एका अंदाजानुसार पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला येत्या काही महिन्यांत १.३ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजे ८.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झेलावे लागेल. पाकिस्तान सध्या एक अतिगंभीर स्थितीत अडकत चालल्याचेही दिसते. कारण, जर शहरे ‘शटडाऊन’ केली नाहीत, तर त्याच्या मोठ्या लोकसंख्येसमोर जगण्याचे संकट निर्माण होईल आणि ‘शटडाऊन’ केले, तर त्या देशाची आर्थिक व्यवस्था कोडमडून पडेल व देशातील लोक मोठ्या प्रमाणावर उपासमारीने मरतील.

धार्मिक कट्टरपंथीयांची भूमिका


अशा संकटाच्या परिस्थितीत पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरपंथी तेथील जनतेच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या रुपात समोर येत आहे. पाकिस्तानातील बहुसंख्य इस्लामी धर्ममार्तंड आणि मदरसे सरकराच्या ‘लॉकडाऊन’सारख्या मोहिमेत सामील होणार नाहीत, यावर अडून बसले आहेत. तसेच मशिदीतील जनसमुदायाचे एकत्रीकरण आणि नमाज पठन रोखण्याच्याही ते विरोधात आहेत. गेल्या शुक्रवारीच सरकारने दिलेले आदेश धाब्यावर बसवून मौलानांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील अनेक ठिकाणी जुम्म्याच्या नमाजासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते. सरकारचे अधिकार वा आदेशाची आम्हाला अजिबात पर्वा नाही, असा आविर्भाव या एकत्रीकरणातून व्यक्त होत होता.

पाकिस्तानातील सरकारे नेहमीच इस्लामीकट्टरपंथीयांच्या बाजूने झुकलेली असतात व त्याचे राजकीय निहितार्थदेखील आहेतच. परंतु, झिया-उल-हक यांच्यानंतर पाकिस्तानातील चालू सरकार देशातील कट्टरपंथीयांसमोर सर्वाधिक असाहाय्य आणि साधनहीन सिद्ध होऊ पाहत आहे. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानमध्ये उद्भवलेला कोरोनाचा सर्वात मोठा धोका चीनबरोबरील त्याच्या जवळीकीत असल्याचेही दिसते. परंतु, समुद्रापेक्षाही अथांग आणि मधापेक्षाही गोड असलेल्या या मैत्रीसाठी पाकिस्तानी शासकांनी आपल्या जनतेचाही बळी देण्यात मागेपुढे पाहत नसल्याचे स्पष्ट होते. कारण, डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये कोरोनाच प्रकोप होताच जगभरातील देश चीनमधील आपल्या नागरिकांना माघारी बोलावत होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे राष्ट्रपती मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीला आपल्या नागरिकांना चीनमधून माघारी बोलावण्याऐवजी हदीसमधील दृष्टांत देत होते. डॉ. आरिफ अल्वी यांनी सोशल मीडियावर आपले वक्तव्य सामायिक करत प्रेषित मोहम्मदाच्या एका हदीसचा उल्लेख केला होता. पाकिस्तान आपल्या जनतेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या चीनमधून बाहेर काढणार नाही, कारण असे करणे इस्लामिक विचारांविरुद्ध असेल, असे त्यांचे म्हणणे होते. अल्वी यांनी इमाम मुस्लीम इब्न हज्जाज यांच्या हदीसला उद्धृत करत म्हटले की, “जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्लेग पसरल्याचे समजले तर तिथे जाऊ नका आणि जिथे तुम्ही राहता त्या ठिकाणी प्लेग पसरला तर ती जागा सोडू नका.”

सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या कट्टरपंथाच्या या प्रभावावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानी शासन आणि प्रशासनाचा कोणताही कोपरा यापासून अस्पर्शी नाही. वर्तमान परिस्थितीत तेथील सरकार या कट्टरपंथी मौलाना आणि मदरशांसमोर आत्मसमर्पण करत असल्याचेही दिसते. इमरान खान यांच्या ‘लॉकडाऊन’विषयक वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी एक बैठक आयोजित केली होती व त्यात अनेक धार्मिक मुल्ला-मौलवी उपस्थित होते. बुजदार यांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानमधील कोणतीही मशीद बंद करता कामा नये. पंजाब प्रांताच्या कायदेमंत्र्यानेदेखील सरकारबरोबरील मौलानांचे गठबंधन एक सकारात्मक परंपरा असल्याचे त्याआधी म्हटले होते. याच प्रांताच्या माहितीमंत्र्याने एकदा बालकांमधील विकलांगता ईश्वरीय अभिशाप असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानातील लोकसंख्येचा एक फार मोठा भाग याच मौलानांच्या प्रभावाखाली आहे. सोबतच ५० लाख मुलांच्या शिक्षणासाठी उत्तरदायी असलेली संपूर्ण मदरसा प्रणालीदेखील अशाचप्रकारच्या तर्कहीन आणि कट्टरपंथी शिक्षणाच्या प्रसाराचे सर्वात मोठे साधन झाले आहे. सध्याच्या स्थितीत पाकिस्तानात धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक शिक्षणासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचे दिसते. मौलाना धार्मिक आधारावर वैज्ञानिक बाबींची व्याख्या करू लागतात, तेव्हा परिस्थिती आणखी बिघडते आणि हेच सध्या पाकिस्तानात पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या प्रसारात साहाय्यक!

धार्मिक यात्रा आणि आयोजन सध्याच्या घडीला पाकिस्तानात कोरोना संक्रमणाचे सर्वात मोठे साधन झाले आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू हा सौदी अरेबियातच संक्रमित होऊन आलेल्या एका धार्मिक यात्रेकरूंचाच होता. अशाचप्रकारे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या इराणमधूनही धार्मिक यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात परत येत आहेत आणि त्यामुळे कोरोनाने संक्रमित होऊन मरणार्‍यांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. तथापि, या आपत्तीनंतरही पाकिस्तानातील मोठ्या धार्मिक आयोजनांवर लगाम कसल्याचे दिसत नाही. मार्चच्या सुरुवातीलाच पाकिस्तानमध्ये ‘तबलीगी’ जमातने एक मोठे संमेलन आयोजित केले होते आणि त्यात जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी सामील झाले होते. स्थानिक माध्यमांतील वृत्तांनुसार या कार्यक्रमात अडीच लाखांपेक्षा अधिक लोक एकत्रित झाले होते. तद्नंतर पाकिस्तानात ‘कोव्हिड-१९’शी संबंधित ज्या चाचण्या केल्या गेल्या, त्यातील १२ संक्रमित लोक या कार्यक्रमांत असल्याचे आढळले. सोबतच या कार्यक्रमात हजर असलेला एक पॅलेस्टिनी व्यक्तीही संक्रमित असल्याचे दिसले.

दरम्यान, आताच्या गहन आपत्तीवेळी जगभरातील धार्मिक क्षेत्र, सरकारला सातत्याने सहकार्य करत आहे, तर पाकिस्तानबाबत ही स्थिती नेमकी उलट आहे. इथले धार्मिक क्षेत्र पाकिस्तानातील सरकारविरोधात उभे ठाकले असून इस्लामी मूल्य आणि श्रद्धांचे महात्म्य सांगत बचावाच्या उपायांमध्ये अडथळे आणण्याचेच काम करत आहे. ज्यामुळे पाकिस्तानात ही समस्या दिवसेंदिवस अधिकच वेगाने वाढत आहे. विद्यमान सरकार तर पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वाधिक दुबळे सरकार सिद्ध होत आहे. कारण, या सरकारने धार्मिक कट्टरपंथीयांसमोर पूर्णपणे समर्पण केले असून त्यांच्या प्रत्येक दुराग्रहासमोर ‘हांजी हांजी’ करण्याव्यतिरिक्त या सरकारकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. जर कोरोना आपत्तीचा वेगाने प्रसार झाला, तर पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या पाकिस्तान सरकारची तयारी पाहता या महामारीपासून बचावासाठी ती पुरेशी नाही. पाकिस्तानकडे सध्या योजना व उपाय आणि त्यांच्या पालनामध्ये समग्रता व एकतेचा अभाव असल्याचे दिसते. पाकिस्तानात सार्वजनिक आरोग्य संरक्षण तंत्राचा तर जवळपास अभावच आहे. पाकिस्तानची बहुसंख्य जनता शिक्षित नाही आणि शिक्षित वर्गातही जागरुकता अतिशय कमी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे म्हटल्यास त्यात काहीही वावगे ठरणार नाही. म्हणजेच येणारा काळ पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय खडतर असल्याचेच ही सर्व माहिती सिद्ध करत असल्याचे दिसते.

Wednesday, 25 March 2020

FOR CAA OPPOSERS-Pak-backed Haqqani-LeT behind Kabul gurdwara attack,

Mar 25, 2020, 10.39 PM IST

While the ISIS-Khorasan claimed responsibility for the
devastating terror attack on a gurdwara in Kabul on Wednesday, India’s
security establishment believes the actual perpetrators of the attack are
the Haqqani group in cahoots with the ISI of Pakistan.
The attack, which claimed the lives of 27 people, Sikhs and other faiths,
drew sharp criticism from India. In a statement, the MEA spokesperson
said, “Such cowardly attacks on the places of religious worship of the
minority community, especially at this time of Covid-19 pandemic, is
reflective of the diabolical mindset of the perpetrators and their backers.”
After the initial claim of responsibility, a second statement purportedly by the ISIS said the killings were revenge for Indian
actions in Kashmir. If the first statement was not enough, the second made it clear that this was a Pakistan agenda at work,
senior security officials here said.
Hussain Ehsani, a researcher in Kabul working on fundamentalist groups like ISIS-Khorasan said he believes the attack
happened because the Haqqani group and their collaborators, Lashkar-e-Taiba together wanted to take revenge on India for
the recent riots in Delhi. “The best place for revenge is Afghanistan. The collaboration between Lashkar-e-Taiba and the
Haqqani group, indicates us that LeT and Haqqani group accomplished this attack.”
It should be remembered that the chief of the Haqqani group, Sirajuddin Haqqani, is also the deputy leader of the Taliban. Both
groups are supported by Pakistan’s ISI.
Just last week, the Taliban, in a post on their official website stated they had virtually wiped the IS-Khorasan from Afghanistan.
“Special forces of the Islamic Emirate, after Zabul, Jawjzan and Nangarhar defeated ISIS in Kumar province and destroyed its
fort and wiped it out from across the country. Taking shelter in the Singhlakh mountains and hiding there, they planned to reorganize the group with their supporters, but the Islamic Emirate of the Islamic Republic took the initiative to silence the last
voice of the ISIS.” If the ISIS has been effectively “removed” from Afghanistan as the Taliban has claimed, how did they conduct
an attack of the magnitude of the one on Wednesday?
So, why did the ISKP/ISIS claim responsibility for today’s attack? Ehsani says its a kind of shadow game being played by the
Haqqani group. “A number of attacks have been executed in Kabul recently, with responsibility being claimed by the ISIS. But
the ISKP does not have tactical and strategical capabilities for executing such complex attacks. The Haqqani group realised the
importance of ISKP brand and put itself behind the scenes.”
This is borne out by the preliminary investigations by the Indian security agencies. Pakistan, working through the Taliban-LeTHaqqani combine, is seen to be behind today’s attack, possibly the worst against the Sikh minorities in Afghanistan. As
investigators sift through the evidence in Kabul, the Indian government is more convinced that Pakistan was behind the attack,
which happened just a couple of kilometres away from the city’s most secure green zone, implying a degree of sophistication
that the ISIS-Khorasan is not known to possess.
In a recent report by the Afghan Institute of Strategic Studies, the authors quoted Afghan security experts like Amrullah Sales
3/26/2020 Pak-backed Haqqani-LeT behind Kabul gurdwara attack, thinks Indian security establishment - Times of India

as saying, that ISKP is “the manifestation of an ‘intelligence game’ being played by Afghanistan’s neighbors.” Saleh said, “the
presence of ISIS in Afghanistan is not genuine. It is an intelligence game played by some of our neighbors.” Pakistan, the report
says, supports the ISKP as part of a “hedging strategy.”
The timing of the attack, sources here said, should be seen in the context of the prevailing political and security situation in
Afghanistan — the uncertainty of the peace process, the unstable government and the relative disinterest of the US post the
peace deal with the Taliban.
Indian security sources believe this could be the beginning of more Pak-sponsored attacks against Indian interests in
Afghanistan in the coming weeks and month

चीन संकटात, भारताला संधी-शैलेंद्र देवळणकर-navprabha

कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण पुरवठासाखळी विस्कळित झाली आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याची सुवर्णसंधी भारताला चालून आली आहे. अमेरिकेसह अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे पहात आहेत. भारतात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक आहे. पण आजवर आपण मागणीच्या शोधात होतो.
चीनच्या वुहान प्रांतातून उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील १४५ हून अधिक देशांमध्ये झाला आहे. कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. या सर्व परिस्थितीचे अत्यंत दूरगामी सामाजिक परिणाम दिसून येत आहेतच; परंतु त्याबरोबरीने याचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणामही येत्या काही काळात समोर येणार आहेत. विशेषतः चीनमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जागतिक महासत्ता बनू पाहणार्‍या या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मागील काळात सार्स नावाच्या विषाणूचा असाच प्रसार झाला होता. त्यावेळी जगाच्या जीडीपीत चीनचा वाटा होता ८ टक्के. परंतू आज कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना चीनचा जागतिक जीडीपीतील वाटा २० टक्के आहे. चीन हा जगातील पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चीनची निर्यात अब्जावधी डॉलर्सची आहे. एकट्या अमेरिकेबरोबर चीनचा ७०० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जपानबरोबरचा चीनचा व्यापार ४५० डॉलर्सचा आहे. संपूर्ण जगाला कच्चा माल पुरवणारा कारखाना म्हणून चीनकडे पाहिले जाते. बहुतांश अमेरिका आणि युरोपियन देश हे चीनकडूनच कच्चा माल घेतात. परंतु आज चीनमधील ५० टक्क्यांहून जास्त उद्योगधंदे बंद पडले आहेत. चीनकडून होणारी निर्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. चीन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे घोषित केले असले तरी तेथील बंद झालेले उद्योग, कारखाने सुरू होण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.
आजघडीला चीनमधील केवळ २५ टक्के उद्योग उघडण्याच्या मार्गावर आहेत. यत लोक पुन्हा कामावर जाण्याच्या विचारात आहेत. चीनमधील कोळश्याची विक्री ७५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कोळशाचे उद्योग ठप्प झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अलीकडेच अंतराळातील काही छायाचित्रे घेतली आहेत. त्यामध्ये चीनमधील प्रदुषण झपाट्याने कमी झाल्याचे दिसून आले. यामागचे कारण म्हणजे चीनमध्ये सुमारे ५० लाख उद्योगधंदे बंद पडले आहेत. परिणामी त्यातून होणारे कार्बन उत्सर्जनही बंद झाले आहे.
आज जगभरातील विविध देशांमध्ये असंख्य प्रकारच्या पक्क्या वस्तू निर्माण कऱण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल चीनकडून निर्यात केला जातो. यामध्ये वाहनाचे सुटे भाग, रसायने, सिरॅमिक्स, रबर, कपडे तसेच कार्बन यांचा समावेश होतो. पण गेल्या महिन्याभरापासून हा पुरवठा बंद झाला आहे. तत्पूर्वी जवळपास दोन वर्षे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू होते. त्याकाळात अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला पर्याय शोधायला सुरूवात केली होती. एवढेच नव्हे चीनला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग गुंडाळायला सुरूवात केली. उदाहरणच घ्यायचे तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स जगतातील दिग्गज कंपनी असणार्‍या सॅमसंग या कंपनीचे ५० टक्के मोबाईल चीनमध्ये उत्पादित होत असत. पण त्यांनी ते युनिट बंद केले असून उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हे युनिट उभारण्याचा निर्णय झाला आहे. अशाच प्रकारे आता अन्य अनेक कंपन्याही कच्च्या मालासाठी पर्यायांचा शोध घेत आहेत.
या शोधप्रक्रियेदरम्यान त्यांचे प्रामुख्याने लक्ष भारताकडे आहे. गेल्या एक महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे हे सिद्धही होते. सिरॅमिक्स, रबर, रसायने, गाड्या, कपडे आणि दागिने यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये युरोपियन देश, अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भारताकडे पुरवठ्याविषयी चौकशी केली जात आहे. १०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कराराविषयी चौकशी सुरू आहे. मलेशियासारख्या देशाने भारताला कोरोना विषाणूविरोधात ५० लाख मास्क निर्मितीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. परंतु सीएए आणि एनआरसी विरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पाकिस्तानची तळी उचलल्यामुळे भारताने मलेशियाला आपण निर्यात थांबवली आहे. तरीही मलेशियाने मागणी कायम ठेवली आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, आज संपूर्ण जग चीनचा पर्याय म्हणून भारताकडे पाहात आहे. अमेरिकेनेही चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आणले आहे.
भारताने या संधीचा ङ्गायदा नेमका कसा घ्यायचा याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने काही पावले आपण उचलायला सुरूवात केली आहे. भारतात सुमारे ५७ अब्ज डॉलरच्या चीनी वस्तू बाजारात विकायला येतात. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा पुरवठा होतो तो भारतात तयार होणार्‍या औषधांसाठीच्या कच्चा मालाचा. भारतात जी प्रतिजैविके बनवली जातात त्याचा कच्चा माल चीनकडून येत असतो. भारत त्याबाबत चीनवर अवलंबून होता. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २ अब्ज डॉलरची योजना तयार केली आहे. आजवर चीनबरोबर आपण स्पर्धा करू शकत नव्हतो; कारण चीन उत्पादनात महाअग्रेसर आहे. चीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि प्रचंड सवलती यांमुळे भारतातील स्थानिक उद्योगांना चीनी मालाशी स्पर्धा न करता आली नाही. परंतु कोरोनाच्या साथीने त्रस्त चीनमधून या वस्तू येणे बंद होईल तेव्हा स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. ह्याचा ङ्गायदा घेणे आवश्यक आहे. भारताला याबाबत सजग होऊन प्रत्यक्ष कार्यरत राहाणे गरजेचे आहे. यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्या लागतील. उत्पादन साखळीतील एक भाग होण्याची ही सुसंधी दवडता कामा नये. भारत पुढाकार घेऊ शकला नाही तर याचा ङ्गायदा दक्षिणपूर्व आशियाई देश घेऊ शकतात. विशेषतः कंबोडिया, व्हिएतनाम तसेच मलेशिया हे देश रबर, रसायने यांच्या उत्पादनात भारताला मागे टाकू शकतात आणि तेच अमेरिका आणि युरोप या देशांना पुरवठा सुरू करतील. म्हणजेच चीनमुळे कच्च्या मालाची विस्कळीत झालेली साखळी पूर्ववत करण्याचे काम कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया यांसारखे देश भरून काढू शकतात. त्यामुळे भारताने गाङ्गिल राहून चालणार नाही.
जागतिक निर्यातीत भारताचा वाटा २ टक्के असला पाहिजे असे उद्दीष्ट ठेवले आहे. सद्यस्थितीत भारताची निर्यात १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ती वाढवण्याची उत्तम संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आपल्या देशातील निर्यातदारांना योग्य आणि कमी व्याजदरांमध्ये कर्जपुरवठा कसा करता येईल, या दृष्टीकोनातून भारताने त्वरीत पावले उचलली पाहिजेत. याखेरीज निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसंगी निर्यातानुदान देण्याची गरज आहे. भारतात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. याचा ङ्गायदा घेत देशात गारमेंट इंडस्ट्रीची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आज आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरही आयात करत असतो. या सर्वांचे उत्पादन आता भारतात सुरु करण्याची वेळ आली आहे. सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात भारताची एकेकाळी दादागिरी होती. पण आज आपण ते चीनकडून आयात करतो आणि वापरतो. तसे न करता या क्षेत्राला पुन्हा चालना दिली गेली पाहिजे. या प्रयत्नांमुळे मेक इन इंडिया, स्किल इंडिया या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांना नवी भरारी मिळू शकेल.

चीनचे सर्वांत मोठे नाटक*-forward received from sharad mestry on whats app-requires more analysis and investigation

Sharad Mestry Mahanagr: *
 मास्टर स्ट्रोक
*अंक पहिला*
पडदा उघडतो : चीन आजारी पडतो, महारोगाच्या संकटात प्रवेश करतो आणि आपल्या स्वतःच्या व्यापाराला हानी करतो. पडदा बंद होतो.
*अंक दुसरा*
पडदा उघडतो : चिनी चलनाचे अवमूल्यन (चलन घसरते) केले जाते. पण चीन काही करतच नाही. पडदा बंद होतो.
*अंक तिसरा*
पडदा उघडतो : चीनमधे असलेल्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचा व्यापार कमी झाल्यामुळे त्यांचे शेअर्स त्यांच्या मूल्यांपेक्षा 40% पर्यंत खाली घसरतात.
*अंक चौथा*
पडदा उघडतो : आता जग महामारीच्या रोगाने (कोरोनामुळे) आजारी पडत आहे, अशा वेळी चीन त्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचे 30% शेअर्स अत्यंत कमी दराने विकत घेतो. पडदा बंद होतो.
*अंक पाचवा*
पडदा उघडतो : चीनने आता हा कोरोना रोग नियंत्रित केला आहे आणि त्या युरोप, अमेरिकेन कंपन्यांची चीनकडे मालकी आहे.  आणि तो निर्णय घेतो की, या कंपन्या चीनमधेच राहतील आणि त्यांतून 20,000 अब्ज डॉलर्सची कमाई निश्चित फायद्याची असेल. पडदा बंद होतो.
कसे वाटले हे नाटक?
आणि सहाव्या अंकात *"चेकमेट*"
*आश्चर्य आहे ना?...  परंतु सत्य आहे*
काल आणि आजच्या दरम्यान दोन व्हिडिओ आले, ज्याने मला संशयास्पद गोष्टीची खात्री पटली, परंतु त्याला माझ्याकडे पहिले कोणताही आधार नव्हता. ती फक्त माझी जाणीव होती. पण आता मला खात्री झाली आहे की, कोरोना व्हायरस हेतु पुरस्सर स्वत:च चिनी लोकांनी तयार केला होता.
सर्व प्रथम ते ह्या महामारीला आधीच पूर्ण तयार झाले होते. तीन आठवड्यांनंतर, त्यांचा रोल सुरु झाला. 14 दिवस आणि 12,000 खाटांची 12 रुग्णालये आधीच तयार आणि त्यांनी खरोखरच दोन आठवड्यांत ती रुग्णालये तयार केली आहेत.
अप्रतिम आहे ना...?
काल त्यांनी जाहीर केले की, त्यांनी हा साथीचा रोग थांबविला आहे. त्याबद्दल ते आनंद साजरा करत असलेल्या व्हिडिओंमध्ये घोषित करतात की, त्यांच्याकडे अगदी लस (vaccine) देखील आहे. एखाद्या रोगाचे मुळातले ज्ञान नसताना ते इतक्या लवकर लसी कसे तयार करु शकले? बरं... जर आपणच एखाद्या रोगाचे मूळ द्योतक असाल, तर त्याची लस बनवणे मुळीच कठीण नाही.
आणि... आज मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला आहे ज्यामध्ये *Den Xiao Ping* यांनी पश्चिमेकडे अर्धा आर्थिक साठा कसा दिला हे स्पष्ट करते. कोरोना व्हायरसमुळे, चीनमधील पाश्चात्य कंपन्यांच्या हालचाली नाटकीय रित्या घसरल्या. जेव्हा ते आणखी खाली घसरतील तेव्हा त्यांना चीनकडून पूर्ण आर्थिक साठा विकत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता या कंपन्या, ज्या अमेरिकेने आणि युरोपने चीनमधे तयार केलेल्या आहेत, त्यांचे सर्व तंत्रज्ञान अमेरिकेच्या हाती अशा देवाणघेवाणीने तयार केल्या आहेत, त्यांची भांडवल सूत्रे चीनच्या ताब्यात असतील. पण आता तेथील कार्यप्रणाली चीनच्या सर्व तांत्रिक क्षमतांनी वाढत आहे आणि चीनच्या इच्छेनुसार वस्तूंच्या किंमती ठरविण्यास ह्या कंपन्या सक्षम असतील. त्या वस्तू त्याच किंमतीत पाश्चात्य व अन्य देशात विकल्या जातील.
मग कसा काय वाटला चीनचा हा masterstroke?
हे काहीही योगायोगाने घडलेले नाही. काही वृद्ध माणसे मरण पावली अशी चिंता चीनने कोणाला दाखवली? ते वृद्ध ज्यांची कमी वयाची पेंशन, परंतु त्यातील लूट खूप मोठी होती. त्यात सध्या पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या पूर्ण पराभूत झाले आहे, संकटात आहेत, महामारीच्या आजाराने स्तब्ध आहेत आणि काय करावे हे त्यांना आता कळत नाही आहे.
कुशलपणे खेळलेले नाटक, एक राक्षसी कृत्य... नक्कीच...
यात भर अशी की, चीन आता अमेरिकेच्या तिजोरीचे सर्वात मोठे मालक झाले आहेत. जपानला मागे टाकत 1.18 ट्रिलियन डॉलर्स त्यांच्या मालकीचे आहेत.
*संभाव्यता आणि साम्यता*
रशिया आणि उत्तर कोरियामध्ये कोविड -19 (कोरोना) चे प्रमाण कमी किंवा शून्य कसे आहे?... कारण ते चीनचे कट्टर सहयोगी आहेत.
दुसरीकडे यूएसए / दक्षिण कोरिया / युनायटेड किंगडम / फ्रान्स / इटली / स्पेन आणि आशियाला ह्या महारोगाचा जोरदार फटका बसला आहे.
*Wuhan शहर अचानक ह्या प्राणघातक विषाणूपासून मुक्त कसा काय होते?*
चीनचे म्हणणे आहे की, त्यांनी घेतलेले प्रारंभिक उपाय फारच कठोर होते आणि wuhan शहरातून ह्या आजाराला इतर भागात पसरवण्यासाठी बंदिस्त केले होते.
पण मग बीजिंगला फटका कां बसला नाही? फक्त wuhan च का?... यावर विचार करणे मनोरंजक आहे ना... बरोबर?
बरं मजेची गोष्ट म्हणजे... Wuhan आता व्यापार व्यवसायासाठी खुलेदेखील झाले आहे.
*कोविड -19 (कोरोना) हा आजार अमेरिकेने चीनला व्यापार युद्धामध्ये हातोहात धुतल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकेला दिलेली चपराक आहे.*
आता अमेरिका आणि वरील सर्व देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. लवकरच चीनने आखल्याप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल. कारण चीनला हे माहित आहे की, अमेरिकेला सैन्याने पराभूत करू शकत नाही कारण सध्या अमेरिका हा सैन्य दृष्टीने जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. (ही तिसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती)
*मग अशा व्हायरसचा वापर करा, जी इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला पांगळा करण्यासाठी आणि देश व त्याची संरक्षण क्षमता लुप्त करण्यासाठी कामी येईल.*
मला खात्री आहे की, Trump ला पळवून लावण्यासाठी नॅन्सी पेलोसीचा यात सहभाग असणार... !
अलीकडेच अमेरिका अध्यक्ष Trump नेहमीच सांगत आले होते की, ग्रेट अमेरिकन अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर कशी सुधारत आहे आणि सर्व नोकऱ्या अमेरिकेत पुन्हा आल्या आहेत.
*आणि... अमेरिकेला ग्रेट बनविण्याच्या त्यांच्या ह्या दृष्टीकोनाचा नाश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्थिक मंदी तयार करणे.*
Trump ला निवडणूक माध्यमातून खाली आणण्यात नॅन्सी पेलोसी असमर्थ होती... म्हणून व्हायरस माध्यमातून Trump चा नाश करण्यासाठी तीसुद्धा चीनबरोबर काम करण्यास तयार झाली.
*Wuhan चा साथीचा रोग हे केवळ एक प्रदर्शन होते.*
हा आजार अगदी साथीच्या शिखरावर असताना, चीनचे अध्यक्ष Xi Jinping... त्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्या भागात भेट देण्यासाठी *फक्त एक साधा आरएम-1 फेसमास्क* घालून होते.
एक देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी डोके ते पायापर्यंत झाकलेले असायला हवे होते... परंतु तसे झाले नाही.
कारण त्यांना विषाणूपासून होणाऱ्या संसर्गापासून प्रतिकार करण्यासाठी आधीपासूनच इंजेक्शन दिले गेले होते .... याचा अर्थ असा की, व्हायरस निघण्यापूर्वीच त्याची औषधी तयार होती.
तीव्र आर्थिक महामंदीच्या काठावर असलेल्या सर्व देशांकडून शेअर्स आणि भांडवल खरेदी करून जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा हा चीनचा दृष्टिकोन आहे... नंतर आपोआपच चीन त्यांच्या वैद्यकीय संशोधकांनी विषाणू नष्ट करण्यासाठी औषधी मिळवली असल्याचे जाहीर करेल.
आता चीन सर्व पाश्चात्य संग्रहाचा आर्थिक साठा आपल्या हाती घेईल आणि उर्वरित सर्व देश लवकरच त्यांच्या नवीन मास्टरचे गुलाम होतील... *तो मास्टर म्हणजेच चीन!*

Tuesday, 24 March 2020

माकडाच्या हाती शॅम्पेन- लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री #JayeshMestry


माकडाच्या हाती शॅम्पेन

कोरोना व्हायरसने जगभरात उद्रेक माजवला आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असतानाही देश नरेंद्र मोदींसारख्या नेत्याच्या हातात असल्यामुळे कोरोनाने भारतात अजून हाहाकार माजवलेला नाही. इटली हा आपल्यापेक्षा प्रगत देश असूनही आणि त्यांची वैद्यकीय सुविधा आद्ययावत असूनही तिथे कोरोनाग्रस्त आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या भयंकर आहे. आपण जर खबरदारी घेतली नाही तर येणारा काळ भयंकर असणार आहे. 

भारतात महाराष्ट्र राज्यात कोरोनाची जास्त भीती आहे. तरी राज्यात उद्धवजी आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्या नेतृत्वाखाली सगळेच उत्तम काम करत आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर शक्यतो घरात राहणे गरजेचे आहे... म्हणून नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. पण नरेंद्र मोदींचे विरोधक इतक्या खालच्या थराला गेले आहेत की राजकीय मुद्दे कधी उपस्थित करायचे याचे भान त्यांना राहिलेले नाही. 

2002 ते 2020 असा या लबाड लोकांचा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ 18 वर्षे हे नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करतायत. मोदी गुजरातचे सीएम होते, आता देशाचे पीएम झालेत. या टीकाकारांची खरी वेदना ही आहे की आम्ही मोदींना राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला, खुनी, हत्यारा सगळं सगळं म्हटल आम्ही, तरी लोक ह्यांना निवडून कसे देतात? 2014 ला गुजरात दंगलीच्या आरोपीला निवडून देऊ नका असा प्रचार केला असतानाही लोक निवडून देतातच कसे? ही त्यांची खरी समस्या आहे. मग नोटबंदी ही देशासाठी किती घातक होती, सीएए, एनआरसी, ट्रिपल तलाक,  असे एकामागोमाग एक निर्णय मोदींनी घेतले, या लोकांनी हे निर्णय घातक होते अस सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक मोदींच्याच मागे का जातात? 

पण आपल्याला मोदी कळला नाही, आपल्याला भारत कळला नाही आणि आपल्याला भारतीय जनता सुद्धा कळलेली नाही व इथली समस्या सुदधा कळलेली नाही, हे मान्य ते करायला तयार नाहीत. हा हुच्च शिक्षितांचा अडाणीपणा यांना लपवायचा होता म्हणून यांनी एक नवीन शब्द शोधून काढला, भक्त... 

या महामुर्ख लोकांनी मोदींच्या मतदाराला भक्त म्हणायला सुरुवात केली आणि एकदा फॉर अ चेंज म्हणून वोट केलेला मतदार हा मोदींचा कायमस्वरूपी मतदार झाला. मोदींनी जनता कर्फ्यु घोषित केल्यावर त्यांना खुल्या दिलाने साथ द्यायची किंवा प्रसंगावधान ओळखून गप्प बसावं. पण नाही... यांनी इथेही माती खाल्ली. मोदी कोरोनाचा इव्हेंट करतायत असा आरोप केला गेला. पण झालं काय? अपवाद सोडला तर सर्व भारतीयांनी या जनता कर्फ्युला भरभरून पाठींबा दिला, 5 वाजता शंखनाद, थाळ्या आणि टाळ्या वाजवून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. 

एक माणूस कोणतीही जबरदस्ती न करता, केवळ हात जोडून आवाहन करतो आणि देशातील बहुसंख्य लोक ते ऐकतात हे या नतद्रष्ट्याना कसं सहन होईल? म्हणून यांनी नकारात्मक व्हिडीओ पसरावयला सुरुवात केली. काही अति उत्साही लोक अभिवादन करण्याच्या नादात गरबा खेळले, सामूहिक आरती केली... या त्यांच्या गोष्टी चुकीच्याच होत्या, भारतीय लोकांना प्रबोधनाची खूप गरज आहे. अहो, आपण रांगेत उभे राहू शकत नाही आणि सिग्नल पाळत नाही तर असला मुर्खपणा करणे स्वाभाविकच आहे. पण ही संधी मोदी द्वेष्ट्याना मिळाली आणि सोशल मीडियावर पोस्टी सुरू झाल्या की बघा लोकांनी इव्हेंट केला. पण यात मोदींचा काय दोष? तरी मोदींवर टीका करण्याची आपली तृष्णा ह्यांना शांत करायचीच होती.  

माझ्या एका फेसबुकीय मित्राने आपला उद्दामपणा दाखवण्यासाठी हद्दच केली. त्याने खेळण्यातला माकड टाळ वाजवतो असा व्हिडीओ पोस्ट केला म्हणजे मोदींच्या सांगण्यावरून टाळ बडवणारे माकडं आहेत. 
मला या गोष्टीच फार दुःख वाटलं... एक कलाकार इतक्या उलट्या काळजाचा कसा असू शकतो? पण नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या भक्तांवर टीका करण्याची एकही संधी आम्हाला सोडायची नसते. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरला जाऊ... बरं वर आमचा नालायकपणा लपवण्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांसरख्या महामानवाचे दाखले देऊ, वर समोरच्याला अंडभक्त म्हणून हिणवू... आणि हे संविधनवादी... वाह...

मुळात बहुसंख्य लोकांच्या भावनांचा आदर ज्याला करता येत नाही तो सांविधानवादी काय तर माणूस म्हणवण्याच्याही लायकीचा नसतो.

मी स्वतः भावनिक नाही, मला भावना नाही असं नव्हे पण माझा स्वभाव भावनिक नाही. त्यात घडायच्या काळात तात्यारावांचा प्रभाव पडला. तरी मानवी भावना खूप महत्वाच्या असतात अस मला वाटतं. जग आणि देश कोरोनाच्या उद्रेकात चोपून निघत असताना नरेंद्र मोदींनी केलेलं भावनिक आवाहन अत्यंत म्हत्वाचंच होतं. एक दिवस पूर्णपणे घरात राहून आपण कोरोना ज्या झपाट्याने पसरतोय त्याला आळा घातला. यापुढचे दिवसही आपल्याला शक्यतो घरातच राहायचं आहे. थाळ्या, टाळ्या वाजवून आपण सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मोदींनी कृतज्ञतेचा इव्हेंट केला. इव्हेंट केला यात चूक काय? आजच्या युगातल्या लोकांना जी भाषा कळते त्या भाषेत मोदी सवांद साधतात. लोकांना ते पटतं आणि लोक त्यांचं ऐकतात. 

इव्हेंट करायची मूळ प्रेरणा लोकमान्य टिळकांची आहे. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा इव्हेंट केला. लोकांना हीच भाषा कळते. त्यातून क्रांतिकार्य उभं राहिलं... 

पण या जळणाऱ्या लोकांच्या मात्र अशा घटनेने पोटात दुखायला लागत आणि स्वतःला मानवतेचे कैवारी स्वतःच म्हणवून घेणारे हे अभद्र लोक राक्षसी वृत्ती दाखवतात आणि ही राक्षसी वृत्ती लपवण्यासाठी हे लोक आंबेडकर, शाहू, फुले अशी नावे घ्यायला लागतात. या महापुरुषांच्या आड लपून हे नीच कृत्ये करीत सुटतात. पण जनतेला यांचा हलकटपणा आता कळून चुकलेला आहे. लोकांनी दुसऱ्यांदा मोदींना बहुसंख्येने निवडून दिलेलं आहे. आता कोरोनाच्या उद्रेकात सगळा  भारत मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना हे लोक टीका करून मोदींच्या मतदारांची  (ह्या दळभद्री लोकांच्या भाषेत भक्त वा अंडभक्त) संख्या वाढवत आहेत. या लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवणारे लोक माकडं वाटतात. पण मुळातच माकडं हेच लोक आहेत... 

सावरकरांनी काशीच्या ब्राह्मणांना उल्लेखून माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन असा लेख लिहिला होता, त्या लेखाची आठवण मला झाली... माकडाचा माणूस झाला अस आपण ढोबळ मनाने म्हणतो. पण काही लोकांची बुद्धी अजूनही माकडासारखीच आहे. देश एकजूट होत असताना ह्यांना माकडचाळे सुचतात आणि ही माकडे देशाच्या बाजूने उभे राहणाऱ्यानाच माकडे म्हणतात... माकडाच्या हातात कोलीत मिळालं की ते सगळीकडे आग लावत फिरतय... आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर माकडाच्या हातात शॅम्पेन दिलं की ते फवारेच मारत राहतय... शेवटी माकडच ती...

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#JayeshMestry

बेजबाबदारपणाचे वर्तन!-tarun bharat-24 MAR-काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला


   कोरोनाचा वाढता उद्रेक ही फक्त भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. साधी समस्या नाही, तर अतिशय चिंताजनक आणि प्राणघातक अशी समस्या झाली आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटली आणि इराणमध्ये तर कोरोनामुळे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतही त्यातून सुटणे शक्य नव्हते. भारतातही कोरोना या प्राणघातक विषाणूचा शिरकाव झाला आहे. भारतात चारशेवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत जवळपास दहा जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संशयित अशा काही हजार लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे युद्धपातळीवर कामाला लागली आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत.

देशात आरोग्यविषयक आणिबाणी लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील 75 मोठ्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे आपल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी झटत असताना, काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची वागणूक परिस्थितीचे गांभीर्य घालवणारी आहे. काही उत्साही नागरिकांचाही याला अपवाद नाही.

कोरोनाचा प्रसार हा सामान्यपणे तीन टप्प्यांतून होत आहे. पहिला म्हणजे परदेशातून याची लागण होऊन आलेले पर्यटक, प्रवासी आणि अनिवासी भारतीय. दुसरे म्हणजे या लोकांच्या संपर्कात आलेले लोक. जोपर्यंत कोरोनाची लागण एवढ्या लोकांपर्यंत मर्यादित होती, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, याचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. कोरोनाचा तिसरा टप्पा आहे समाज संसर्गाचा. यातून कोरोनाचा संपर्क कित्येक पटीने वाढण्याची भीती आहे.


तिसर्‍या टप्प्यातून होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामागचा उद्देश अतिशय स्तुत्य आणि देशवासीयांच्या हिताचा होता. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळात लोकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन मोदी यांनी केले. कारण, माणसे सार्वजनिक ठिकाणी जेवढी गर्दी करतील, एकदुसर्‍याच्या जितक्या जास्त संपर्कात येतील, तेवढा कोरोनाचा संसर्ग होण्याची सध्या भीती आहे. त्यामुळेच मोदी यांनी हा सारा प्रकार टाळण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.


यासोबतच अशा आणिबाणीच्या परिस्थितीतही आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस, यासोबतच स्वच्छता कर्मचारी, पायलट आणि विमानतळावरील अन्य कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, वीज आणि जल विभागाचे कर्मचारी आणि प्रसिद्धिमाध्यमांचे लोक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना धन्यवाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दारात, खिडकी तसेच बाल्कनी आणि घराच्या गच्चीवर एकत्र येत टाळ्‌या वाजवण्याचे, घंटी, ताटली-चमचा वाजवण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी दिवसभर जनता कर्फ्यूला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. पण, सायंकाळी 5 वाजता जे घडले त्यामुळे दिवसभराच्या मेहनतीवर आणि गांभीर्यावर पाणी फेरले गेले.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना काही मर्यादांचे पालन करणे आवश्यक होते. पण, काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला, तो अतिशय धक्कादायक होता. या अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर लाऊडस्पीकर लावूून मिरवणुका काय काढल्या, घोषणा काय दिल्या, नाच काय केला, हे सर्वच चीड आणणारे होते. यात हातात भाजपाचे झेंडे घेतलेले नेते आणि कार्यकर्तेही होते. हे करताना रस्त्यावर गर्दी करू नये, एकदुसर्‍याच्या जवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर ठेवावे, या मूलभूत सिद्धांतालाच हरताळ फासण्यात आला.


रस्त्यावर उतरलेल्या या सर्वांचा उत्साह जणू भारताने विश्वचषक जिंकल्यासारखा होता. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्याचा आवेग प्रत्येकाच्या वागण्यातून दिसत होता. मुळात पंतप्रधान मोदींनी कोणत्या उद्देशाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि झाले काय? मोदींनी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अशा वागणुकीची अपेक्षा केली नसावी. हे चित्र पाहून मोदी अतिशय संतप्त झाले होते. आपल्या कपाळाला हात लावत ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असे म्हणण्याची वेळ मोदींवर, त्यांचे समर्थक म्हणवणार्‍यांनी आणली, हे दुर्दैवी आहे. एक दिवस जनता कर्फ्यू पाळून आम्ही कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकत नाही, तर आम्हाला एक आठवडा, दोन आठवडे, वेळ पडली तर महिनाभर जनता कर्फ्यू पाळावा लागणार आहे.


जनता कर्फ्यूच्या आवाहनातून, मुळात आजपासून आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई सुरू करायची आहे, असे मोदी यांना म्हणायचे होते; तर याला काही मूठभर देशवासी तसेच उत्साही नेते आणि कार्यकर्ते यांची वागणूक, कोरोनाविरोधातील निर्णायक लढाई आपण जिंकल्याचे प्रदर्शन करणारी होती. आपल्या अशा वागणुकीतून आपण आपल्या नेत्याची बदनामी करतो, प्रतिमा मलिन करतो, याचे भानही या उत्साही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठेवता आले नाही, याचे वाईट वाटते. अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सारा प्रकार करण्यात आला, त्यांनाही हे सारे अपेक्षित नसावे. समाज आणि देशाप्रती आम्ही आपले कर्तव्य बजावतो, मात्र तुम्ही काहीच करू नका, असे या लोकांनी व्यथित अंत:करणाने म्हटले असेल. मुळात भारतीय लोक हे उत्सवप्रिय आहेत. पण, आपण कशाचा उत्सव साजरा करतो, याचे भान ठेवण्याची गरज आहे.


कोरोनामुळे इटली आणि इराणमधील परिस्थिती पाहून अतिशय वेदना होतात. तशीच परिस्थिती आपल्या देशातील लोकांवर येऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. पण, काही लोक त्या सार्‍या मेहनतीवर पाणी फिरवतात, हे योग्य नाही. कोरोनाविरुद्धची लढाई लढताना संयमासोबत संकल्पाचे आवाहन मोदी यांनी केले आहे. ही लढाई आम्हाला दीर्घकाळ लढायची आहे. दृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे असते, पण अदृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे नसते, तर अतिशय कठीण असते. कोरोनाचा विषाणू हा मानवजातीचा असाच अदृश्य शत्रू आहे. या विषाणूवरील प्रतिबंधक लस आणि औषध अद्याप तयार झाले नाही. ही लस आणि औषध तयार व्हायला आणखी किती काळ लागेल, तेही कोणी सांगू शकत नाही.


त्यामुळे देशातीलच नाही, संपूर्ण जगातील मानवजातीचा प्राणघातक शत्रू असलेल्या कोरोनाविरुद्धची लढाई लढताना हिंमत, संयम आणि आत्मविश्वासाची गरज आहे. यासोबत सार्वजनिक शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालनही आम्हाला करावे लागणार आहे. कोरोना हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. या शत्रूविरुद्धची लढाई सोपी नसली तरी कठीण आणि अशक्यही नाही. गरज आहे, संयमाची, सहनशीलतेची आणि सामूहिक शक्तीची. यापुढे तरी अशा गंभीर प्रसंगी आम्ही बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करणार नाही आणि आमच्या नेत्यावर मान खाली घालण्याची वेळ आणणार नाही, अशी अपेक्षा करायची काय


https://www.tarunbharat.net/Encyc/2020/3/24/Irresponsible-behavior.html