Total Pageviews

Showing posts with label ENERGY SECURITY. Show all posts
Showing posts with label ENERGY SECURITY. Show all posts

Wednesday, 18 September 2019

पश्चिम आशिया : वणवा पेट घेत आहे दिनांक 17-Sep-2019 21:20:04 अनय जोगळेक


सौदीमधील ‘अरोमको’ कंपनीवरील ड्रोन हल्ल्यामुळे तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असली, तरी त्या आकाशाला भिडण्याची, म्हणजेच बॅरलला १०० डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. सध्या तेल उत्पादक देशांकडे तेलाचे मोठे साठे असून त्यांच्या तेल उत्खनन करण्याच्या क्षमतेतही मोठी वाढ झाली आहेया टंचाईमुळे काही दिवस किंमती थोड्या चढ्या राहतील, पण महिनाभराच्या आत त्या कमी होऊ शकतील.


पश्चिम आशियात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दि. १४ सप्टेंबरला सौदी अरेबियाच्या मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ले झालेएकूण १७ ड्रोन्सपैकी १० आपल्या लक्ष्यांवर आदळण्यात यशस्वी झाले. या प्रकल्पात दररोज ८४.५ लाख बॅरल तेल शुद्ध करण्यात येत होतेहा आकडा भारत आणि रशियामधील दररोजच्या तेलाच्या एकत्रित खपापेक्षा मोठा आहेया हल्ल्यामुळे प्रकल्पाची क्षमता ५७ लाख बॅरलने कमी झालीसाहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये एका दिवसात १५ टक्क्यांनी वाढ झाली. येमेनमधील हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. २०१५ पासून येमेनमध्ये यादवी युद्ध सुरू असून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी अध्यक्ष अब्दरब्बुह हादी यांना समर्थन दिले आहेतर इराणने बंडखोर हुतींना. हादी सुन्नी आहेत, तर हुती मुख्यतः शिया. या युद्धात ७० हजारांहून अधिक लोक मारले गेले असून सव्वा कोटींहून अधिक लोक उपासमार आणि अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेतसौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार असून एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या १२ टक्के शस्त्रास्त्र खरेदी करतो.आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्यामुळे इराणने गनिमी युद्धशास्त्रात नैपुण्य मिळवले आहे. गाझापट्टीत हमास, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, सीरियामध्ये असाद राजवट, शियाबहुल इराक आणि येमेनमधील हुती यांच्या माध्यमातून इराणने पश्चिम अशियात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. केवळ पश्चिम आशियाच नाही, आपल्या हस्तकांद्वारे इराण जगाच्या कानाकोपर्‍यात दहशतवादी हल्ले घडवून आणू शकतो. आजवर हुतींनी मुख्यतः त्यांचे वर्चस्व असलेल्या दक्षिण येमेनपासून जवळ असणार्‍या सौदीच्या मध्य आणि पश्चिम भागातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ले केले होते. पण, हा हल्ला दक्षिण येमेनपासून एक हजार किमी अंतरावर असणार्‍या प्रकल्पांवर केला गेला.


हुती बंडखोर हल्ल्यांसाठी इराणकडून मिळालेल्या ‘समद १ड्रोनचा वापर करतात. त्याची रेंज सुमारे ५०० किमी आहे. ‘समद ३’ ड्रोनला इंधनाची टाकी असल्यामुळे तो १५०० किमीपर्यंत जाऊ शकतोअसे असले तरी या ड्रोनची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता फारशी नाहीतसेच ते ड्रोनविरोधी रडार यंत्रणेला चकवा देऊ शकत नाहीत. त्यामुळे या हल्ल्यात कुड्स’ (जेरुसलेमचे अरबीतील नाव) ड्रोनचा वापर केल्याची शक्यता बळावते. कुड्सड्रोन क्रुझ’ क्षेपणास्त्राप्रमाणे हवेत वेडावाकडा प्रवास करून आपल्या लक्ष्यावर आदळतातत्यांची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमताही क्षेपणास्त्रांइतकी असली तरी रेंज ‘समदच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे मग हा हल्ला येमेनमधून न होता इराक किंवा इराणमधून झाला असावा या तर्काला पुष्टी मिळतेअमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिओ यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले असले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे आपण इराणविरुद्ध प्रतिहल्ला करण्यास सज्ज असल्याची धमकी दिली असलीतरी समोर आलेल्या पुराव्यांतून इराणचा हात असल्याचे निर्विवादपणे सिद्ध करणे कठीण होतेसौदी अरेबियानेही घटनेबाबत संयत प्रतिक्रिया देताना इराणचे नाव घेण्याचे टाळले. त्यामुळे मग अमेरिकेनेही आपली भूमिका सौम्य केली.


या घटनेमुळे तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असलीतरी त्या आकाशाला भिडण्याचीम्हणजेच बॅरलला १०० डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाहीसध्या तेल उत्पादक देशांकडे तेलाचे मोठे साठे असून त्यांच्या तेल उत्खनन करण्याच्या क्षमतेतही मोठी वाढ झाली आहे. सौदीने ओपेक’ देशांना अतिरिक्त उत्खनन करण्यापासून थोपवून धरले. कारणत्यांनी उत्पादन वाढवल्यास बाजारातील आपला वाटा कमी होण्याची त्यांना भीती आहे. या टंचाईमुळे काही दिवस किंमती थोड्या चढ्या राहतील, पण महिनाभराच्या आत त्या कमी होऊ शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबिया आपल्या ‘अरामको’ या राष्ट्रीय ऊर्जा कंपनीची जागतिक भांडवली बाजारात नोंद करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘अरामकोचे सुमारे पाच टक्के समभाग विकून त्यातून उभा राहणारा पैसा पायाभूत सुविधा आणि भविष्यातील उद्योगांमध्ये गुंतवून आपल्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा सौदीचा प्रयत्न आहे. पण नकटीच्या लग्नाला सोळा विघ्नंया म्हणीप्रमाणे सौदीच्या प्रयत्नांमध्ये वेगवेगळ्या अडचणी उभ्या राहत आहेत. तेल-प्रकल्पांवर हल्ला झाल्यामुळे अरामकोची अपेक्षित किंमत कमी होणार असून सौदीला आपली योजना पुढे ढकलावी लागेल१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने इराणचे अध्यक्ष हसन रुहानी न्यूयॉर्कला जाणार आहेतअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भेट घेण्याची तयारी दाखवली असलीतरी इराणने निर्बंध हटवण्याची अट घालत बैठकीला नकार दिलाअमेरिकेच्या निर्बंधांमुळे जगातील सर्व महत्त्वाच्या देशांनी इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले आहे. सौदी अरेबिया तेलाचे अतिरिक्त उत्पादन करून इराणच्या तेलाची भरपाई करत आहे. इराणने आपला अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास कार्यक्रम पुढे रेटण्याची धमकी दिली असली, तरी सध्या तरी इराणला युरोपीय महासंघ, चीन आणि रशियाशी फार वाकड्यात शिरण्यात रस नाही. त्यामुळे मग आपल्यावरील निर्बंधांची झळ केवळ आपल्यालाच नाहीतर संपूर्ण जगाला बसेल असे दाखवून देण्याचा त्यांचा विचार असू शकतो.


दि१७ सप्टेंबरला इस्रायलमध्येही निवडणुका झाल्या. २०१९ साली होणार्‍या या दुसर्‍या निवडणुका होत्या. दि. ९ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये कोणताच पक्ष किंवा आघाडी बहुमतापर्यंत न पोहोचल्याने पंतप्रधान नेतान्याहूंनी संसद विसर्जित करून पुन्हा एकदा निवडणुका घेतल्याया निवडणुकीत पक्षीय बलात फारसा फरक पडणार नसला तरी मतांची टक्केवारी झाल्यास नेतान्याहूंचे पंतप्रधानपद धोक्यात येऊ शकतेइस्रायलमध्ये मतदार उमेदवाराला नाही तर पक्षाला मतदान करतात. ३.२५ टक्क्यांहून अधिक मतं मिळवणार्‍या पक्षांना १२० जागा त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात वाटल्या जातात. भारतात ३५ टक्के मतं मिळवणारा पक्ष अनेकदा पूर्ण बहुमत मिळवतो. पणइस्रायलमध्ये त्याला १५ टक्के मतांसाठी अनेक छोट्या पक्षांसोबत आघाडी करावी लागतेआपल्याप्रमाणे तिथेही छोटे पक्ष पुरेपूर किंमत वसूल करूनच सरकारला पाठिंबा देतातबेंजामिन नेतान्याहू नुकतेच इस्रायलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेसोबतच भारत, रशियाजपान आणि चीनशी असलेल्या संबंधांमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणलीअरब राष्ट्रं आणि इराण यांच्यातील शीतयुद्धाचा फायदा घेत नेतान्याहूंनी अनेक अरब देशांशी घनिष्ठ पण छुपे संबंध प्रस्थापित केले. नेतान्याहूंच्या लिकुड पक्षाला आव्हान देणार्‍या कहोल-लेवान पक्षाचे नेतृत्त्व बेनी गांट्झ आणि गाबी अश्कनाझी हे दोन माजी सैन्यप्रमुख आणि माजी संरक्षणमंत्री मोशे यालोन करत आहेत. पणत्यांच्यापैकी कोणी आंतरराष्ट्रीय पटलावर सहजासहजी नेतान्याहूंची जागा घेऊ शकेल, असे वाटत नाही. भारत-इस्रायल संबंध मजबूत पायावर उभे असल्यामुळे कोणीही पंतप्रधान झाल्यास त्यांच्यावर काही परिणाम होणार नाहीअसे असले तरी येणारे काही आठवडे पश्चिम आशियाच्या तसेच जागतिक राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत.


Tuesday, 16 July 2019

रोजगारनिर्मिती करणारी 'ग्रीन इकॉनॉमी' महा एमटीबी 15-Jul-2019



देशाच्या सौर व पवनऊर्जा क्षेत्राचा सध्या झपाट्याने विकास होत असून त्यामुळे रोजगारातही वाढ होत असल्याचे गेल्या पाच वर्षांत उपलब्ध झालेल्या १ लाख रोजगारातून दिसते. 'हरित ऊर्जे'मध्ये ऊर्जा क्षेत्राबरोबरच शेती, पर्यावरणपूरक बांधकाम उद्योग आणि घनकचरा व्यवस्थापनामध्येही मोठ्या संधी आहेत.

संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पापूर्वी २०१८-१९ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला व 'हरित अर्थव्यवस्थे'चा मुद्दा मांडला. 'हरित अर्थव्यवस्थेचा'चा संबंध 'हरित ऊर्जेशी'शी असून तिच्या निर्मितीतून, उपलब्धतेतून, विनियोगातूनच अशी अर्थव्यवस्था साकारू शकते. भारताच्या 'हरित अर्थव्यवस्थे'च्या वाढीसाठी २०२२ पर्यंत ८० अब्ज डॉलर्सची आवश्यकता असून ती २०२३-३० या कालावधीत २५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल, असेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता, आगामी काही काळात भारत जगातील सर्वात मोठा 'हरित किंवा नवीकरणीय ऊर्जा' उत्पादक देश होईल. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत भारताला 'हरित अर्थव्यवस्था' वा 'हरित ऊर्जा' उत्पादक देश म्हणून उभे करण्यासाठी पुरेपूर परिश्रम घेतले. परिणामी, सध्याची भारताची या क्षेत्रातील ऊर्जा उत्पादकता ८० गिगावॅट इतकी असून ती २०२० पर्यंत १७५ गिगावॅट तर २०३० पर्यंत ५०० गिगावॅट इतकी करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रमही सरकारने आखला आहे. परंतु, 'हरित ऊर्जा'चे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या 'हरित अर्थव्यवस्थे'चे महत्त्व काय? देशाच्या विकासात 'हरित अर्थव्यवस्थे'चे योगदान कसे असेल? 'हरित अर्थव्यवस्थे'चा रोजगारावर काय आणि कसा परिणाम होईल? हे प्रश्न या विषयाचा विचार करताना समोर येतात.
 
वस्तुतः 'हरित ऊर्जा-हरित अर्थव्यवस्था' म्हणजेच ऊर्जेच्या पारंपरिक स्त्रोतांचा वापर न करता अपारंपरिक स्त्रोत वापरात आणणे. सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचा यात प्रामुख्याने समावेश होतो. सध्या जगात भारताचा सौरऊर्जानिर्मितीत पाचवा तर पवनऊर्जानिर्मितीत चौथा क्रमांक आहे. पारंपरिक ऊर्जानिर्मिती जसे की, कोळशावर वा पाण्यावर आधारित प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि त्याच्या निर्मितीचा खर्चही मोठा असतो. सोबतच, पेट्रोलियम उत्पादनांचाही यात अंतर्भाव केला जातो. भारताची तर अशी अवस्था आहे की, आपल्याला सुमारे ८३-८४ टक्के कच्चे तेल हे 'ओपेक' देशांकडून आयात करावे लागते. शिवाय 'ओपेक' देश तेलाचा दर नफा कमावण्याइतका स्थिर राहील इतकेच तेलाचे उत्पादन करतात. त्यामुळे भारताकडून कमी उपलब्धता असलेल्या, दर स्थिर वा चढते असलेल्या तेलाच्या आयातीवरच अमूल्य असे परकीय चलन सर्वाधिक खर्च होते. परंतु, देशात उपलब्ध असलेल्या सौर आणि पवनऊर्जेचा वापर केल्यास हे आयातीचे व पैशाच्या खर्चाचे प्रमाण अतिशय कमी होऊ शकते. कारण, विविध वाहनांत, कंपन्यांत वगैरेत ऊर्जा म्हणून लागणाऱ्या तेलाऐवजी विजेचा वापर करता येईल. इथेच 'ग्रीन एनर्जी'चे महत्त्व अधोरेखित होते. उल्लेखनीय म्हणजे केंद्र सरकारनेही सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून 'फेम' योजना कार्यान्वित केली आहे. ई-वाहनांच्या संबंधाने नागपूरचे उदाहरण सुसंगत ठरेल. आगामी काही वर्षांत नागपूर हे देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची संख्या असलेले शहर ठरु शकते आणि त्या दिशेने कामही सुरु आहे.त्याचबरोबर देशाच्या विकासातही 'हरित ऊर्जे'ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह निर्मला सीतारामन यांनीही देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, भारतात जगाची १८ टक्के लोकसंख्या राहत असूनही आपण केवळ जगाच्या ६ टक्के इतकाच ऊर्जावापर करतो. इथे भारताची 'ऊर्जा दारिद्य्र' 'उत्पन्न दारिद्य्रा'पेक्षाही अधिक असल्याचे दिसते. परंतु, 'हरित ऊर्जे'च्या देशांतर्गत उत्पादनातील वाढीने आणि ती स्वस्त असल्याने 'दरडोई ऊर्जेचा वापर' वाढेल. परिणामी, 'सकल राष्ट्रीय उत्पादन' म्हणजेच 'जीडीपी' पाच हजार डॉलर्सचा टप्पा गाठेल. उत्पन्न वाढल्याने साहजिकच बाजारपेठेत खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढते आणि त्याचा फायदा वस्तू उत्पादकांना, घरबांधणी क्षेत्राला आणि अखेरीस अर्थव्यवस्थेला होतो.
 
'हरित ऊर्जा-हरित अर्थव्यवस्थे'चा रोजगारावर कसा परिणाम होतो, हा यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. कारण, नवे काही धोरण वा विषय मांडला की, आधी रोजगाराचा-रोजगार घटेल की वाढेल, हा प्रश्न उपस्थित केला जातो. तत्पूर्वी, आपण २०१८ साली 'फ्रीलान्सिंग इन अमेरिका' या नावाने प्रकाशित अहवाल पाहिला असता काही बाबी ठळकपणे दिसतात. सदर अहवालानुसार, अमेरिकेतील ९३ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्याला चार वर्षांच्या पदवी प्रमाणपत्र शिक्षणाऐवजी त्यानंतर मिळालेल्या 'कौशल्य प्रशिक्षणा'चाच नोकरी करताना वा मिळवताना अधिक फायदा झाल्याचे सांगितले, तर ७९ टक्क्यांनी पदवीचा उपयोग होत असल्याचे सांगितले. २०१६ साली 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या एका अहवालानुसार, १० वर्षांपूर्वी जे उद्योग वा रोजगारक्षेत्र अस्तित्वात नव्हते, तेच आताच्या घडीला सर्वाधिक रोजगार देणारे ठरले आहे. दोन्ही अहवाल पाहता पारंपरिक शिक्षणाऐवजी 'कौशल्य प्रशिक्षण व विकासाला' अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते.विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन शिक्षण हे बऱ्याचदा वर्षानुवर्षे एकाच पठडीतले असते. त्यामुळे त्याचा उपयोग नव्या उद्योगधंद्यात होत नाही किंवा तंत्रज्ञानातील बदल इतके वेगाने होतात की, ते लक्षात घेऊन तसे अभ्यासक्रम आखले जात नाहीत. आता देशात 'हरित ऊर्जा-हरित अर्थव्यवस्थे'शी संबंधित पदवी-पदव्युत्तर पदवी शिक्षण देणाऱ्या संस्था किती आहेत? तर त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल, इतकीच असू शकते. अशावेळी पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडणाऱ्यांना 'कौशल्य प्रशिक्षण' आवश्यक असल्याचे लक्षात येते.
 
अशा 'कौशल्य प्रशिक्षणा'मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होतो. आजच 'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड वॉटर', 'नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल' आणि 'स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स' संस्थांनी संयुक्तपणे सादर केलेली 'पॉवरिंग जॉब्स ग्रोथ विथ ग्रीन एनर्जी' ही आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरते. सदर आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत 'हरित ऊर्जा' क्षेत्रात सुमारे १ लाख जणांना रोजगार मिळाला. २०१४ साली हीच संख्या १९ हजार, ८०० इतकी होती. विशेष म्हणजे यातील ३० हजार रोजगार हे २०१९ या आर्थिक वर्षातील आहेत. देशाच्या सौर व पवनऊर्जा क्षेत्राचा सध्या झपाट्याने विकास होत असून त्यामुळे रोजगारातही वाढ होत असल्याचे यातून दिसते.तसेच २०२२ पर्यंत या क्षेत्रातील रोजगार ३ लाख, ३० हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाजही यात वर्तविण्यात आला आहे, तर 'हरित अर्थव्यवस्थे'मध्ये ऊर्जा क्षेत्राबरोबरच शेती, पर्यावरणपूरक बांधकाम उद्योग आणि घनकचरा व्यवस्थापनामध्येही मोठ्या संधी आहेत. तसेच 'हरित ऊर्जा'च्या वापराने कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात २०१७-१८ साली सुमारे १०८.२८ दशलक्ष टन इतकी घट झाली. परिणामी,प्रदूषण घटले आणि स्थिर व निरोगी पर्यावरणावर आधारित अशा शेती, मासेमारी, वन्य उत्पादनांशी संबंधित उद्योगांना आवश्यक अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यातले रोजगारही वाचले. या सर्वच मुद्द्यांवरून 'हरित ऊर्जे'तून 'हरित अर्थव्यवस्था', प्रदूषणातली घट,परकियांवरील देशाचे अवलंबित्व कमी होणे आणि त्यासंबंधीच्या कौशल्य विकासामुळे सातत्यपूर्ण रोजगार निर्मिती होत असल्याचे दिसते. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे मोठे योगदान राहील, हेच यातून स्पष्ट होते

Monday, 24 December 2018

ओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन... महा एमटीबी

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे पार पडलेल्या ओपेक, या जगातील तेल निर्यातदार संघटनेचे अखेर तेल उत्पादन कपातीवर शिक्कामोर्तब झाले. 12 लाख बॅरेल तेलाचे उत्पादन दिवसाला कमी करण्याचा निर्णय ओपेकमध्ये झाला. यात ओपेक आठ लाख, तर रशिया चार लाख बॅरेल तेल उत्पादनात कपात करणार आहे. ही कपात सहा महिन्यांसाठी आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढणार आहेत. रशिया हा ओपेकचा स्थायी सदस्य नाही. तो फक्त निरीक्षक म्हणून उपस्थित राहतो. पण, ओपेकच्या बैठकीत तेलकपातीवर एकमत होत नसल्याने रशियाचे पेट्रोलियम मंत्री रशियाला निघून गेले. त्यासाठी सांगता होण्याच्या दिवसाची पत्रपरिषदच ओपेकने रद्द केली. आता सर्वकाही सुरळीत झाले, असे समजण्याचे कारण नाही. कारण, दोन दिवस चाललेल्या या बैठकांमध्ये ओपेक सदस्यांमध्ये प्रचंड मतभेद पाहायला मिळाले. त्याची परिणती म्हणून इराण, व्हेनेझुएला आणि लिबिया या देशांना कपातीतून वगळण्यात आले. कतारने आधीच ओपेकचे सदस्यत्व सोडले आहे. दुसरी बाब म्हणजे, या बैठकीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही प्रचंड दबाव होता. ओपेकने कोणतीही कपात करू नये, असा ट्रम्प यांचा ठाम आग्रह होता.
 
 
जागतिक आर्थिक संतुलन कायम ठेवण्यासाठी कपात ही घातक होईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे; तर मोदी यांनी दर वाढवू नयेत, अशी मागणी केली होती. ऑक्टोबर महिन्यात तेलाचे दर प्रचंड वाढल्यामुळे भारतासह सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यासाठी सौदीसोबत चार बैठकाही भारताने घेतल्या. भारतातील बैठकीत स्वत: मोदी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि तेलाचे दर व ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याचा आग्रह धरला. त्याचे पडसाद व्हिएन्नाच्या बैठकीत उमटले. मोदींना आपल्या नागरिकांच्या अडचणींना सोडविण्याची किती कळकळ आहे, ते सौदीनेच नमूद केले. त्यामुळेच दर ठरविण्याआधी आम्ही भारतासोबत चर्चा करू, असे ओपेकने म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी तर ठामपणे सांगितले की, ट्रम्प ज्याप्रमाणे कपातीसाठी उघडपणे बोलतात, त्याचप्रमाणे मोदीही बोलतात. त्यांचेही मत विचारात घेण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे, भारताच्या तेलाच्या 82 टक्के आयातीपैकी 85 टक्के आयात ओपेक देशांकडून होते. भारत हा चीननंतरचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेत प्रचंड प्रमाणात तेल उत्पादन होते. जवळजवळ तेवढेच उत्पादन रशिया करतो. रशियाचा कपातीला विरोध होता.
 
 
पण, नंतर मात्र रशिया चार लाख बॅरेल कपातीवर तयार झाला. इराणची समस्या वेगळीच आहे. या देशावर ट्रम्प महाशयांनी निर्बंध लावले असले, तरी ते फक्त सहा महिन्यांसाठी आहेत. ते फक्त तेल निर्यातीच्या बाबतीतील आहेत. या सहा महिन्यांत अमेरिकेच्या मित्रदेशांना इराण तेल निर्यात करू शकेल. त्यामुळे इराणने पहिल्याच दिवसापासून आम्हाला कपातीतून वगळण्याचे तुणतुणे वाजविण्यास प्रारंभ केला होता. भारत इराणकडून सुमारे 14 दशलक्ष टन तेल खरेदी करतो. शिवाय चाबहार बंदरामुळे तेल आयात वाहतुकीचा मोठा खर्च वाचतो. इराककडून सर्वाधिक आयात होते. दुसर्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे. सौदीला ट्रम्प यांनी, पत्रकार खशोगी यांच्या हत्येचाही हवाला दिला होता. पण, सौदीने भारताची बाजू घेतली. भारताला सौदी मुळीच कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्या देशाने दिली आहे. सौदीमध्ये सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायूही निर्माण होतो. सौदीसह ओपेकच्या अनेक देशांकडून भारत नैसर्गिक वायूही आयात करतो. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भारतावर केंद्रित झाले होते. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तेलाचे जे भाव होते, ते गेल्या महिनाभरात 30 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे भारतातील जनतेला दररोज दिलासा मिळत आहे. आता कपातीमुळे दर किती वाढतात, यावर जगातील देशाचे भाव निश्चित होतील. आताच भारतात ब्रेन्ट क्रूड ऑईलचे दर तीन ते चार डॉलर प्रतिबॅरलने वाढले आहेत. तिकडे फ्रान्समध्ये इंधनाचे दर वाढल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.
 
 
ती जाळपोळ करीत आहे. ती थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे त्या देशाला तेलावरील सर्व कर रद्द करावे लागले. तेलाच्या दरामुळे अन्य सर्व मोठ्या देशांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे ओपेकने, दरही संतुलित राहावेत आणि तेलाच्या निर्यातीचा ओघही सामान्य राहावा, याचा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला. पण, ओपेक सदस्य देश हा निर्णय तंतोतंत अंमलात आणतील काय, याबाबत संदिग्धता आहे. याचे कारण म्हणजे, ओपेक सदस्यांपैकी सहा देश हे आखातातील आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्थाच मुळात तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. सौदी अरेबियाला एकूण महसुलापैकी 90 टक्के महसूल हा तेल निर्यातीतून येत असतो. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले, तर त्यांची अर्थव्यवस्थाच कोसळू शकते. त्यामुळे ओपेकचे दर आणि जागतिक दर यांचे संतुलन राखले जावे, असे ओपेक सदस्य असलेल्या देशांचे म्हणणे आहे. पण, त्यांना ही भीतीसुद्धा आहे की, आपण जर दर वाढविले तर रशिया किंवा अमेरिका ओपेकच्या ग्राहकांना आकर्षित करून तेल पुरवेल. रशियाची अर्थव्यवस्था तेल निर्यातीवर 50 टक्के अवलंबून आहे आणि येत्या तीन वर्षांत जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणून समोर येण्याचा इशारा त्या देशाने दिला आहे.
 
 
अमेरिकाही मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन करते. पण, स्वत:चे तेल निर्यात करून आखाती देशातून तेलाची आयात करते. यात सौदीचा वाटा 7.9 दशलक्ष बॅरेल प्रतिदिन एवढा आहे. अमेरिकेच्या डब्ल्यूटीआयचे दर ब्रेन्टपेक्षा कमी आहेत. सध्याच्या दरात ओपेकने वाढ करू नये, तेल उत्पादनात कपात करू नये, अशी भूमिका ट्रम्प यांची आहे. गेल्या दोन महिन्यांत तेलाचे दर 30 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे प्रामुख्याने सौदी, इराण, इराक यांना मोठ्या महसुलाला मुकावे लागले होते. त्यामुळे त्यांना दर वाढवून हवे आहेत, तर जगाला ते नको आहेत. अशा विचित्र कोंडीत हा तेलाचा प्रश्न सापडलेला आहे. भारताने आपले तेल उत्पादन वाढविण्यासाठी तेलाच्या स्रोतांचा देशभरात शोध घेण्याची मोहीम तातडीने हाती घ्यायला हवी, हाच याचा बोध आहे. तोपर्यंत वीज, इथेनॉल, जैवइंधन, सौरऊर्जा यांसारख्या संसाधनांची वाढ केली पाहिजे. कारण, मोठा निधी या तेलाच्या आयातीवरच खर्च होत असतो. तेलाची आयात कशी कमी करता येईल, याकडे भारताला प्राधान्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. शेवटी ग्राहक हाच केंद्रिंबदू समोर ठेवावा लागेल. ओपेकच्या तेलकपातीमुळे काय परिणाम समोर येतात, हे पाहण्यासाठी काही दिवस जावे लागणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच भारताला करावी लागणार आहे.

Sunday, 9 December 2018

ओपेक आणि मोदी, ट्रम्प, पुतीन... महा एमटीबी

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे पार पडलेल्या ओपेक, या जगातील तेल निर्यातदार संघटनेचे अखेर तेल उत्पादन कपातीवर शिक्कामोर्तब झाले. 12 लाख बॅरेल तेलाचे उत्पादन दिवसाला कमी करण्याचा निर्णय ओपेकमध्ये झाला. यात ओपेक आठ लाख, तर रशिया चार लाख बॅरेल तेल उत्पादनात कपात करणार आहे. ही कपात सहा महिन्यांसाठी आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाचे भाव वाढणार आहेत. रशिया हा ओपेकचा स्थायी सदस्य नाही. तो फक्त निरीक्षक म्हणून उपस्थित राहतो. पण, ओपेकच्या बैठकीत तेलकपातीवर एकमत होत नसल्याने रशियाचे पेट्रोलियम मंत्री रशियाला निघून गेले. त्यासाठी सांगता होण्याच्या दिवसाची पत्रपरिषदच ओपेकने रद्द केली. आता सर्वकाही सुरळीत झाले, असे समजण्याचे कारण नाही. कारण, दोन दिवस चाललेल्या या बैठकांमध्ये ओपेक सदस्यांमध्ये प्रचंड मतभेद पाहायला मिळाले. त्याची परिणती म्हणून इराण, व्हेनेझुएला आणि लिबिया या देशांना कपातीतून वगळण्यात आले. कतारने आधीच ओपेकचे सदस्यत्व सोडले आहे. दुसरी बाब म्हणजे, या बैठकीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही प्रचंड दबाव होता. ओपेकने कोणतीही कपात करू नये, असा ट्रम्प यांचा ठाम आग्रह होता.
 
 
जागतिक आर्थिक संतुलन कायम ठेवण्यासाठी कपात ही घातक होईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे; तर मोदी यांनी दर वाढवू नयेत, अशी मागणी केली होती. ऑक्टोबर महिन्यात तेलाचे दर प्रचंड वाढल्यामुळे भारतासह सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झाला होता. त्यासाठी सौदीसोबत चार बैठकाही भारताने घेतल्या. भारतातील बैठकीत स्वत: मोदी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि तेलाचे दर व ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याचा आग्रह धरला. त्याचे पडसाद व्हिएन्नाच्या बैठकीत उमटले. मोदींना आपल्या नागरिकांच्या अडचणींना सोडविण्याची किती कळकळ आहे, ते सौदीनेच नमूद केले. त्यामुळेच दर ठरविण्याआधी आम्ही भारतासोबत चर्चा करू, असे ओपेकने म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी तर ठामपणे सांगितले की, ट्रम्प ज्याप्रमाणे कपातीसाठी उघडपणे बोलतात, त्याचप्रमाणे मोदीही बोलतात. त्यांचेही मत विचारात घेण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे, भारताच्या तेलाच्या 82 टक्के आयातीपैकी 85 टक्के आयात ओपेक देशांकडून होते. भारत हा चीननंतरचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेत प्रचंड प्रमाणात तेल उत्पादन होते. जवळजवळ तेवढेच उत्पादन रशिया करतो. रशियाचा कपातीला विरोध होता.
 
 
पण, नंतर मात्र रशिया चार लाख बॅरेल कपातीवर तयार झाला. इराणची समस्या वेगळीच आहे. या देशावर ट्रम्प महाशयांनी निर्बंध लावले असले, तरी ते फक्त सहा महिन्यांसाठी आहेत. ते फक्त तेल निर्यातीच्या बाबतीतील आहेत. या सहा महिन्यांत अमेरिकेच्या मित्रदेशांना इराण तेल निर्यात करू शकेल. त्यामुळे इराणने पहिल्याच दिवसापासून आम्हाला कपातीतून वगळण्याचे तुणतुणे वाजविण्यास प्रारंभ केला होता. भारत इराणकडून सुमारे 14 दशलक्ष टन तेल खरेदी करतो. शिवाय चाबहार बंदरामुळे तेल आयात वाहतुकीचा मोठा खर्च वाचतो. इराककडून सर्वाधिक आयात होते. दुसर्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे. सौदीला ट्रम्प यांनी, पत्रकार खशोगी यांच्या हत्येचाही हवाला दिला होता. पण, सौदीने भारताची बाजू घेतली. भारताला सौदी मुळीच कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्या देशाने दिली आहे. सौदीमध्ये सर्वाधिक प्रमाणात नैसर्गिक वायूही निर्माण होतो. सौदीसह ओपेकच्या अनेक देशांकडून भारत नैसर्गिक वायूही आयात करतो. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भारतावर केंद्रित झाले होते. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तेलाचे जे भाव होते, ते गेल्या महिनाभरात 30 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे भारतातील जनतेला दररोज दिलासा मिळत आहे. आता कपातीमुळे दर किती वाढतात, यावर जगातील देशाचे भाव निश्चित होतील. आताच भारतात ब्रेन्ट क्रूड ऑईलचे दर तीन ते चार डॉलर प्रतिबॅरलने वाढले आहेत. तिकडे फ्रान्समध्ये इंधनाचे दर वाढल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.
 
 
ती जाळपोळ करीत आहे. ती थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे त्या देशाला तेलावरील सर्व कर रद्द करावे लागले. तेलाच्या दरामुळे अन्य सर्व मोठ्या देशांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे ओपेकने, दरही संतुलित राहावेत आणि तेलाच्या निर्यातीचा ओघही सामान्य राहावा, याचा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला. पण, ओपेक सदस्य देश हा निर्णय तंतोतंत अंमलात आणतील काय, याबाबत संदिग्धता आहे. याचे कारण म्हणजे, ओपेक सदस्यांपैकी सहा देश हे आखातातील आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्थाच मुळात तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. सौदी अरेबियाला एकूण महसुलापैकी 90 टक्के महसूल हा तेल निर्यातीतून येत असतो. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले, तर त्यांची अर्थव्यवस्थाच कोसळू शकते. त्यामुळे ओपेकचे दर आणि जागतिक दर यांचे संतुलन राखले जावे, असे ओपेक सदस्य असलेल्या देशांचे म्हणणे आहे. पण, त्यांना ही भीतीसुद्धा आहे की, आपण जर दर वाढविले तर रशिया किंवा अमेरिका ओपेकच्या ग्राहकांना आकर्षित करून तेल पुरवेल. रशियाची अर्थव्यवस्था तेल निर्यातीवर 50 टक्के अवलंबून आहे आणि येत्या तीन वर्षांत जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणून समोर येण्याचा इशारा त्या देशाने दिला आहे.
 
 
अमेरिकाही मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन करते. पण, स्वत:चे तेल निर्यात करून आखाती देशातून तेलाची आयात करते. यात सौदीचा वाटा 7.9 दशलक्ष बॅरेल प्रतिदिन एवढा आहे. अमेरिकेच्या डब्ल्यूटीआयचे दर ब्रेन्टपेक्षा कमी आहेत. सध्याच्या दरात ओपेकने वाढ करू नये, तेल उत्पादनात कपात करू नये, अशी भूमिका ट्रम्प यांची आहे. गेल्या दोन महिन्यांत तेलाचे दर 30 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे प्रामुख्याने सौदी, इराण, इराक यांना मोठ्या महसुलाला मुकावे लागले होते. त्यामुळे त्यांना दर वाढवून हवे आहेत, तर जगाला ते नको आहेत. अशा विचित्र कोंडीत हा तेलाचा प्रश्न सापडलेला आहे. भारताने आपले तेल उत्पादन वाढविण्यासाठी तेलाच्या स्रोतांचा देशभरात शोध घेण्याची मोहीम तातडीने हाती घ्यायला हवी, हाच याचा बोध आहे. तोपर्यंत वीज, इथेनॉल, जैवइंधन, सौरऊर्जा यांसारख्या संसाधनांची वाढ केली पाहिजे. कारण, मोठा निधी या तेलाच्या आयातीवरच खर्च होत असतो. तेलाची आयात कशी कमी करता येईल, याकडे भारताला प्राधान्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. शेवटी ग्राहक हाच केंद्रिंबदू समोर ठेवावा लागेल. ओपेकच्या तेलकपातीमुळे काय परिणाम समोर येतात, हे पाहण्यासाठी काही दिवस जावे लागणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच भारताला करावी लागणार आहे

Friday, 1 June 2018

इंधन दरवाढीचे दुष्टचक्र महा एमटीबी 01-Jun-2018 जयदीप उदय दाभोळकर-अभय कुलकर्णी PUDHARI





इंधन दरवाढीसाठी अनेक मुद्दे कारणीभूत असले तरी प्रामुख्याने दोन मुद्द्यांचा विचार करावा लागेल.
या सर्वत्र गाजणारा मुद्दा आणि सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे इंधन दरवाढीचागेल्या काही वर्षांमधला उच्चांकी दर सध्या पेट्रोल आणि डिझेलने गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाचे गणित बिघडले आहे, शिवाय भाजीपाल्याचे भावही कडाडण्याची भीती वर्तविली जात आहे. मात्रइंधन दरवाढीवरून वातावरण तापत असताना गेल्या दोन दिवसांत केवळ एक पैसा आणि सात पैसे अशी इंधनाच्या दरात कपात करण्यात आलीदोन दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात साठ पैशांची कपात केल्याची माहिती समोर आली होती. ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळणारअशी अपेक्षा असतानाच तांत्रिक चुकीमुळे ६० पैशांची कपात दाखवली गेली असून ती केवळ एक पैसा असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांकडून नंतर स्पष्टीकरण देण्यात आले.
त्यातला पहिला मुद्दा म्हणजेआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे वाढणारे दर आणि डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला रुपया. दुसरा मुद्दा म्हणजेपेट्रोल आणि डिझेलच्या दरावर राज्य सरकारकडून आकारला जाणारा करडॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालल्याने इंधन आयातीवर होणारा खर्च वाढत आहेया परिस्थितीत दर कमी केल्यास मोठ्या आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परंतु, इंधन दरवाढ अशीच सुरू राहिली, तर देशातील महागाईचा भडका उडण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. यात राज्य सरकारने आपल्या करांपैकी काही कर कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्यास तो निर्णय नक्कीच स्वागतार्ह असेल. मात्र,त्याद्वारे होणारा तोटा भरून काढण्यासाठी पर्याय निवडणे तितकेच महत्त्वाचे आहेकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोलवरील अधिभार कमी करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होतापरंतु राज्य सरकारने त्यावर पुन्हा अधिभार लावल्याने त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोहोचू शकला नाहीत्यातच केंद्राने राज्य सरकारांना आपले कर कमी करण्याच्या सूचना करत चेंडू राज्यांकडे टोलवला आहे. पण, कर कमी केल्यास विकासकामांसाठी निधी कुठून उभारायचा, असा प्रश्‍न सरकारसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी काही उपाययोजना करून इंधन दरवाढीच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडणे, हे आव्हानात्मक ठरेल, हे नक्की.
करांचा बोजा
आपल्याकडे प्रामुख्याने केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून इंधनावर कर आकारला जातो आणि त्याचे प्रमाणही मूळ इंधनाच्या रकमेइतके आहेमहाराष्ट्रात त्यावर उपकरदेखील आकारला जात असल्याने मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट दर हा आजघडीला आकारला जात आहेराज्याप्रमाणेच करांचे प्रमाणही बदलते आहेराज्याराज्यांमध्ये सहा टक्क्यांपासून चाळीस टक्क्यांपर्यंत कर आकारला जात असल्याने निरनिराळ्या राज्यांमध्ये इंधनाचे दर हे वेगवेगळे असल्याचे पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच पेट्रोल-डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट राज्यांनी कमी करण्याच्या सूचना पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केल्या होत्या.त्यातच काही राज्यांकडून इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्रबुडता महसूल पाहता किंवा अन्य कोणत्या पर्यायाशिवाय जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयावर एकमत होण्याची शक्यता तितकीच धूसर आहेसुरुवातीपासूनच इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी अनेक राज्यांनी विरोधही केला होताइंधनाच्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या तसेच मालवाहतुकीच्या दरात वाढ होणे, हे स्वाभाविक आहे. त्यातच पूर्वीपासूनच कंबरडे मोडलेल्या एसटी महामंडळानेही भाडेवाढीचे सुतोवाच केले आहेत्यातच इंधनाच्या उत्पादनशुल्काच्या आधाराची गरज असल्याने जीएसटीमध्ये इंधनाचा समावेश करण्याबाबत सरकारला फारशी रूची दिसत नाहीपेट्रोलियम उत्पादनांवरून २.५७ लाख कोटींचा महसूल मिळणार असल्याची आशा केंद्र सरकारला आहे. परंतुएका ठिकाणी केंद्राचा महसूल वाढणार असला तरी वाढती महागाई हीदेखील सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहेकच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण हे आगामी काळात केंद्राचा इंधनावर होणारा खर्च वाढवणारे ठरु शकतात. असे असले तरी इतर बाबींचा विचार करून त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. असेच करावर कर आकारले गेल्यास इंधनाचे दर गगनाला भिडतील यात काही शंकाच नाही. विरोधकांच्या हातीही आयते कोलीत सापडल्याने सत्ताधार्‍यांसाठी पुढील काळ कसोटीचा ठरु शकतो. त्यातच यावर काही पर्याय ठरवून इंधन दरवाढीवर तोडगा काढणे आवश्यक आहे.






आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव चढत असल्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चिंता व्यक्‍त केली जात आहे. तेल उत्पादक देशांच्या हातात तेलाचे उत्पादन आणि दर ठरविण्यासंबंधीचे हक्‍क एकवटलेले  असल्यामुळे भावातील चढ-उतारांचा सर्वच देशांना मुकाबला करावा लागतो. अर्थव्यवस्थेचा वेग ऊर्जेवर आणि ऊर्जानिर्मिती इंधनावर अवलंबून असते. त्यामुळे बहुतांश देश ओपेक म्हणजेच तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून वेळोवेळी घेतल्या जाणार्‍या निर्णयांमुळे प्रभावित होतात. दुसरीकडे, जीवाश्म इंधनाच्या अतिरिक्‍त ज्वलनामुळे प्रदूषणाचा प्रश्‍नही सर्व जगात गंभीर बनला आहे. अशा वेळी या इंधनावरील अवलंबित्व कमी करणे दुहेरी द‍ृष्टिकोनातून चांगले आहे.
जगातील अनेक देशांनी कच्च्या तेलाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. इंधनाची उपलब्धता आणि पर्यावरण अशा दोन्ही द‍ृष्टींनी हे आवश्यक बनले आहे. आगामी कालावधीत इलेक्ट्रिक मोटारींना सर्वाधिक मागणी असेल, असे भारतातही अनेक व्यासपीठांवरून बोलले जाऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण भविष्यात डोकावणे आणि पेट्रोल-डिझेलच्या महागड्या इंधनाला जगात कोणकोणते पर्याय शोधले जात आहेत, हे पाहणे गरजेचे ठरते.

जगभरात मोटारींची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून चीन ओळखला जातो. हा देश जीवाश्म इंधनावर म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मॉर्केल यांनीही अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे की, आगामी काळ या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा असेल. अनेक देशांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याच्या द‍ृष्टीने गंभीर प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रिटनने 2040 पर्यंत पेट्रोल-डिझेलवर चालणार्‍या वाहनांवर पूर्णांशाने बंदी घालण्यास आपण वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. यामागे पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार आहे. 2050 मध्ये ब्रिटनच्या रस्त्यांवरून धावणारे प्रत्येक वाहन प्रदूषणमुक्‍त असेल, असे सांगण्यात आले आहे.
सध्या फ्रान्समध्ये इलेक्ट्रिक आणि अन्य पर्यायी इंधनावर चालणार्‍या वाहनांची संख्या एकूण वाहनांच्या केवळ चार टक्के आहे; परंतु ही संख्या वेगाने वाढतानाही दिसते आहे. या बाबतीत नॉर्वेची वाटचाल जगात सर्वाधिक वेगाने सुरू आहे. या देशात 2016 मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांमधील तब्बल 40 टक्के वाहने इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहने आहेत. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, जपान, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन आणि कोरियानेही इलेक्ट्रिक मोटारींच्या निर्मितीसाठी भक्‍कमपणे वाटचाल सुरू केली आहे. अमेरिकेत अशा प्रकारचे कोणतेही एकात्मिक धोरण अद्याप निश्‍चित केलेले नाही; मात्र तेथील आठ राज्यांनी यासंदर्भातील आपली उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत.
भारतात तर पेट्रोल आणि डिझेलवर धावणारी लक्षावधी वाहने ही एक प्रचंड डोकेदुखी होऊन बसली आहे. या वाहनांमुळे अनेक शहरांतील प्रदूषण धोकादायक पातळी ओलांडून पुढे चालले आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वाधिक शहरांचा समावेश असणे चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर, 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची विक्री बंद करून दरम्यानच्या काळात प्रदूषणमुक्‍त वाहनांची संख्या वाढविण्याचा निश्‍चय भारताने व्यक्‍त केला आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार, जगभरात विजेवरील वाहने वाढल्यास कच्च्या तेलाचा वापर 8 दशलक्ष बॅरलने कमी होऊ शकतो. दुसरीकडे विजेचा वापर पाच टक्क्यांनी वाढू शकतो; परंतु प्रदूषणावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, हा सर्वांत मोठा फायदा असेल. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पूर्ववत करणे हे सर्वच देशांपुढील महत्त्वाचे आव्हान आहे. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व आज ना उद्या कमी करावेच लागणार आहे. 
चीन आणि ब्राझील या दोन्ही देशांपुढील आव्हाने भारताप्रमाणेच आहेत. दोन्ही देश लोकसंख्येच्या बाबतीत भारतासारखेच आहेत. या देशांकडून कोणकोणते प्रयत्न यासंदर्भात सुरू आहेत, हे पाहणे भारताच्या द‍ृष्टीने उचित ठरेल. चीन हा जगातील सर्वांत मोठा कार निर्यातदार देश आहे. या देशात 16 कोटी मोटारी रस्त्यांवरून धावत आहेत. 2016 मध्ये सुमारे 2.8 कोटी मोटारींची विक्री चीनमध्ये झाली. संपूर्ण जगभरात झालेल्या मोटारींच्या विक्रीच्या तुलनेत ही खरेदी एक तृतीयांश आहे; परंतु तरीही 2040 पर्यंत सर्व प्रकारच्या पेट्रोल आणि डिझेल कारवर ब्रिटन आणि फ्रान्सप्रमाणेच बंदी घालण्याचा निर्णय चीन घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. अर्थात पेट्रोल आणि डिझेलच्या मोटारींना पर्याय असणार्‍या इलेक्ट्रिक मोटारी हा संंपूर्ण प्रदूषणमुक्‍त किंवा संपूर्ण कार्बनमुक्‍त पर्याय नाही; परंतु या सर्व बाबी जाणूनसुद्धा चीनने पेट्रोल आणि डिझेलपासून हळूहळू दूर जाणार्‍या रस्त्यावर वाटचाल सुरू केली आहे. या मार्गावरील चीनची वाटचाल अमेरिकेपेक्षा अधिक गतिमान आहे. 2016 या वर्षात चीनमध्ये 3 लाख 36 हजार इलेक्ट्रिक मोटारींची विक्री झाली. ही संख्या अमेरिकेतील संख्येच्या दुप्पट आहे. सौर आणि पवनऊर्जेच्या क्षेत्रातही चीनमध्ये जोमाने काम सुरू आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे हाच यामागील हेतू आहे. 

Saturday, 26 May 2018

काय आहेत रुपया घसरण्याची कारणे? By -सागर शहा-प्रभात वृत्तसेवा


रुपयाच्या मूल्यात होत असलेली घसरण मुख्यत्वे तीन कारणांमुळे होत आहे. एक म्हणजे, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असून, तेल उत्पादक देशांमधील अंतर्गत राजकीय स्थिती गंभीर आहे. तिसरे कारण भारतातील अंतर्गत राजकारण हे आहे. कच्च्या तेलाचे दर कमी असताना सरकारने राखीव निधी उभारला नसल्यामुळे सध्याची इंधन दरवाढ सर्वसामान्यांनाच सहन करावी लागत आहे.
परदेशी गुंतवणूकदार जेव्हा आपला पैसा भारतीय शेअर बाजारातून काढून घेतात, तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होते. गेल्या महिनाभरात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली. परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरणे स्वाभाविक आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे वाढलेले दर हीसुद्धा एक नवीनच समस्या आहे. कच्च्या तेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. देशांतर्गत वापरापैकी 80 टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते. केंद्रात सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारच्या कार्यकाळातील पहिल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 50 डॉलर प्रतिबॅरलपेक्षाही खाली राहिले होते. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मात्र तेलाची किंमत वाढत जाऊन आता ती 70 डॉलर प्रतिबॅरलपेक्षाही जास्त झाली आहे. त्यामुळे भारताचा कच्च्या तेलाचा आयात खर्च जवळजवळ 115 अब्ज डॉलर इतका झाला आहे.
या घटनेचा तिसरा पैलू राजकीय आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर सत्तेसाठीची रस्सीखेच यामुळेही इंधनाच्या दरावर परिणाम झाला. जोपर्यंत मतदान होत नव्हते, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू दिले गेले नाहीत. त्यानंतर अचानक दर वाढले. याखेरीज कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात आघाडी होऊन ही आघाडी कर्नाटकात सरकार स्थापन करणार, अशी बातमी आल्याबरोबर रुपयाचे मूल्य आणखी घसरले. परंतु जेव्हा राज्यपालांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले, त्यानंतर रुपयाच्या मूल्यात थोडीबहुत सुधारणा झाली. पहिल्या बातमीनंतर रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 68 पर्यंत घसरले होते, ते 67 पर्यंत वर चढले. म्हणजेच, रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीला आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर, परदेशी गुंतवणूकदारांनी रक्कम काढून घेणे आणि देशांतर्गत राजकारणाचा प्रभाव असे तीन घटक कारणीभूत ठरले आहेत.
रुपयाचे मूल्य घसरण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेनेही काही उपाययोजना सुरू केल्या. रिझर्व्ह बॅंकेच्या हाती “स्टर्लाइझेशन’ नावाची एक तरतूद आहे. त्याअंतर्गत रुपयाच्या मूल्यातील घसरण थांबविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक बाजारातून डॉलरची खरेदी करू शकते. जेव्ही डॉलरची खरेदी केली जाते तेव्हा विनिमय बाजारात (फॉरेक्‍स मार्केट) स्थैर्य येते. रिझर्व्ह बॅंकेने परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने मंगळवार आणि बुधवारपासून बाजारातून डॉलरची खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात काही प्रमाणात स्थिरता आली.
भारतातून वस्तू आणि सेवांची निर्यात करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. ज्वेलरी, किमती खडे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा, सॉफ्टवेअर, विविध वस्तू आदींची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना या परिस्थितीचा फायदा होतो. कारण प्रत्येक डॉलरसाठी त्यांना अधिक रुपये मिळतात. दुसरीकडे, आयातदारांना या परिस्थितीचा मोठा फटका बसतो. कारण त्यांना प्रत्येक आयात वस्तूची किंमत म्हणून अधिक डॉलर मोजावे लागतात. यामुळे चालू खात्यातील तूट आणि व्यापारी तूट या दोहोंमध्ये वाढ होणार आहे. भारतात कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या कंपन्यांचा तोटा वाढणार आहे.
काही वर्षांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वस्तू नियंत्रणमुक्त केल्या होत्या. म्हणजेच, या दोन्ही वस्तूंचे दर बाजारातील परिस्थितीनुसार रोजच्या रोज निर्धारित होतात. गेल्या काही वर्षांत कच्च्या तेलाचे दर कमी होते. परंतु या काळाचा फायदा घेऊन सरकारने योग्य अशी रणनीती आखायला हवी होती, ती आखली गेली नाही. कोणताही राखीव निधी सरकारने या कालावधीत उभारला नाही. अन्यथा किमती वाढण्याच्या स्थितीत या निधीतून किमती नियंत्रित करता येणे शक्‍य झाले असते.
सरकारसाठी एक चांगली संधी होती; मात्र नफा “पास थ्रू’ करण्याऐवजी सरकारने आपली तिजोरी भरण्यास प्रारंभ केला. पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आले. हे कर केंद्राचे आणि राज्यांचेही होते. कच्च्या तेलाचे भाव कमी असण्याच्या स्थितीचा लाभ सरकारने अशा प्रकारे उचलला. गेल्या काही वर्षांत किमान अशा आठ संधी सरकारकडे उपलब्ध होत्या, जेव्हा नफा “पास थ्रू’ करणे सरकारला शक्‍य होते. परंतु सरकारने पेट्रोलवर अबकारी कर लावला आणि सरकारी झोळी भरली. सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीकडे लक्ष न देता सरकारने आपली तिजोरी भरणे महत्त्वाचे मानले. कच्च्या तेलाचे दर जेव्हा 30 ते 40 डॉलर प्रतिबॅरलच्या दरम्यान होते तेव्हा यासाठी खास निर्माण केलेल्या राखीव निधीत सरकार ही रक्कम भरू शकले असते.
भारतात एकीकडे व्यापारातील तूट आणि आयातीचे बिल वाढत असताना दुसरीकडे ग्राहकांवर तेलाच्या दरवाढीचा अतिरिक्त बोजा पडत आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 75 रुपये प्रतिलिटर असले तरी अन्य राज्यांमध्ये 80 रुपये प्रतिलिटरचा टप्पा केव्हाच ओलांडला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पेट्रोलवरील कर कमी करणे ही अत्यावश्‍यक गोष्ट सरकारने सर्वांत आधी करणे अपेक्षित आहे. गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या विविध करांच्या माध्यमातून 2,83,000 कोटी रुपयांच्या महसुलाची कमाई केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारांनी या माध्यमातून 1,74,000 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळविला आहे. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देण्याची गरज निर्माण होताना दिसत आहे. जेव्हा कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 80 डॉलरपेक्षा अधिक होईल, तेव्हा तर अनुदान द्यावेच लागेल. त्यामुळे प्रमुख तेल उत्पादक कंपन्या पुन्हा तोट्यात जाऊ शकतात. यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती सर्वांना असणे आवश्‍यक आहे. ती म्हणजे, कच्च्या तेलाच्या दरात एक डॉलरने वाढ झाली तर भारताचा “तेल पूल तोटा’सुमारे 4000 कोटी रुपयांनी वाढतो. वेळीच राखीव निधी न उभारल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वसामान्यांकडून तीन वर्षांहून अधिक काळ करवसुली करणाऱ्या सरकारने आता त्यांना दिलासा देणे आवश्‍यक आहे.

Thursday, 17 May 2018

भारतातील सहा लाख गावे विजेने उजळविण्याचा पंतप्रधानांचा संकल्प हा केवळ आपल्या देशापुरता मर्यादित राहात नाही, तर तो निराळ्या प्रकारे प्रकाशवाटाही निर्माण करतो.


 
 
दि. ३१ मार्च २०१८ हा दिवस राष्ट्र म्हणून भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस. कारण, या दिवशी भारतातील सहा लाखांहून अधिक गावे विजेमुळे उजळून निघाली. आपल्याच देशातील काही छिद्रान्वेषी माध्यमवीरांनी पंतप्रधानांच्या या स्वप्नावरही प्रश्‍न उपस्थित केले. मात्र, गावागावांमध्ये वीज पोहोचविण्याच्या या प्रयत्नांकडे उर्वरित जगाने कसे पाहिले, हे आता जाणवायला लागले आहे. जॉर्डन, सीरियासह काही आफ्रिकन देशांनी त्यांच्या ग्रामीण भागात भारताच्या मदतीने विजेने उजळून निघण्यासाठी सहकार्याची अपेक्षा केली आहे.विकसनशील देश म्हणविल्या जाणार्‍या एका देशाकडे त्याच्यापेक्षा लहान असलेल्या देशांनी अशा प्रकारच्या सहकार्याच्या अपेक्षा ठेवणे, हे पहिल्यांदाच घडले असावे. विकसित आणि विकसनशील या संज्ञाच एखाद्या व्यापक कटाचा भाग असाव्यात, अशी शंका येण्यासाठी अनेकदा वाव असतो. याचे मुख्य कारण म्हणजे, ज्यांना गेली अनेक वर्षे ‘विकसनशील’ म्हटले गेले, ते आजही ‘विकसित’ म्हणून ओळखले जात नाहीतच. भारताकडून या मंडळींनी जी अपेक्षा ठेवली आहे, त्यामागे एक मोठे कारण आहे. या सगळ्यांचाच भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. जॉर्डन, पॅलेस्टाईन व अरब देशांचा नरेंद्र मोदींनी दौरा केला होता. त्यानंतर दोन पावले पुढे येऊन ही मंडळी आज अपेक्षा व्यक्त करीत आहेत. भारत आपल्या देशात कुठलाही विस्तारवादाचा हेतू न ठेवता चांगले काम करु शकतो, असा विश्‍वास त्यांच्या मनात जागृत झाला आहे. ‘रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून भारतात जे स्वप्न सत्यात उतरले, त्याच कंपन्यांकडे या देशांनी विचारणा केली आहे. या कंपन्यांनीही हे शिवधनुष्य पेलायची तयारी दाखविली आहे.
आपल्याकडल्या मोदीद्वेष्ट्या मंडळींना या काविळीमुळे जे काही दिसत आहेते सोडून दिले तरीसुद्धा अन्य राष्ट्रे या सगळ्या प्रक्रियेकडे कशी पाहातातते पाहाणे महत्त्वाचे आहे. भारताने विकासाची जी काही प्रारूपे तयार केली आहेतती पाहाता कमीत कमी खर्चात ती उभी करण्याची व किमान नकारात्मक परिणाम असणारी ही प्रारूपे आहेत. वीजनिर्मितीच्या क्षेत्रात जलविद्युत, पवनचक्क्या, सौरऊर्जा या सगळ्याच क्षेत्रात जगाला मदत करता येऊ शकेलअसे काम भारताने निश्‍चितच केले आहे. शेती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अशी क्षेत्रे आपल्याकडे अशाच प्रकारे उदयास आली आहेत. आपल्यापेक्षा निरनिराळ्या कारणांनी निरनिराळ्या समस्यांशी झुंजणारी ही लहान राष्ट्रे भारताकडे मोठ्या भावाच्या भूमिकेतून पाहातात. सीरियातील युद्धामुळे तिथल्या सगळ्याच एकंदरीत रचना कोलमडल्या आहेत. अरब देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी चालू असलेले संघर्ष लोकशाही मार्गाने मुळीच सुरू नाहीत. ते हिंसक आहेत. या सार्‍याचा परिणाम म्हणून वीजपुरवठ्यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्रभारताकडेच या मंडळींनी आशेने पाहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारताची पारदर्शक व विश्‍वासार्ह प्रतिमा. विसाव्या व एकविसाव्या शतकात अशा समस्या सोडविणारा देश म्हणून महासत्ता अमेरिकेकडे पाहिले जात होते. आपल्या महाकाय कॉर्पोरेशन्सच्या मदतीने अमेरिकेने असे अनेकविध प्रकल्प जगभरात उभी केल्याची उदाहरणेदेखील जगात आहेत. सर्वच अरब देशांना आधुनिकतेच्या नावाखाली ऐषोआरामाची चटक लावण्याचे काम अमेरिकन उद्योगसमूहांनीच केले. ज्यांच्याकडे तेलाची भांडारे होती तिथे विकास वायुवेगाने पोहोचला, पण त्याचबरोबर अमेरिकन हितसंबंधांचे रक्षण करणारे राजकारणही पोहोचले. ‘व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले,’ ही ब्रिटिशांच्या बाबतची म्हण नंतर अमेरिकनांच्या बाबतीत वापरली जाऊ लागली.
अशा प्रकारे मदत करणार्‍यांमध्ये अमेरिकेनंतर सध्या नाव घेतले जाते ते चीनचे. चीनच्या कामाची पद्धत म्हणजेचीन केवळ मदत करीत नाही तर तांत्रिक साहाय्याबरोबरच वित्तपुरवठा करण्याचीही चीनची तयारी असते. मात्रवर उल्लेख केलेल्या देशांपैकी कुणालाही चीनची मदत नको आहे. असे जाहीरपणे म्हणण्याचे धाडस कुणीही करीत नसलेतरीही चीनच्या विस्तारवादी आणि गूढ वागणुकीची सगळ्यांनाच भीती वाटते. या भीतीचे मूळ कारण चीनच्या स्वभावातच दडले आहे. चीनची जमिनीची भूक सर्वश्रुतच आहे. आज श्रीलंका आणि बांगलादेशात चीनने कर्ज देऊन अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. यात वीजप्रकल्प आहेत, धरणे आहेत, रस्ते व बंदराच्या कामातही चीन आहे. आता मुद्दा असा की, या बदल्यात चीन काय घेणार? याचे उत्तर जाहीररित्या कुणीही द्यायला तयार नसले तरी आज ना उद्या चीन इथली भूमी गिळंकृत करेल, ही भीती आहे. पाकिस्तानसारख्या अस्थिर देशात चीन जेव्हा इतका पैसा ओततो, तेव्हा त्याचा उद्देश दडून राहात नाही. आज भारताकडे अपेक्षेने पाहणारी सारीच राष्ट्रे या घडामोडी पाहात असतात. या सगळ्या गदारोळातही भारत त्यांना विश्‍वासाचा वाटतो. इराणमधील चाबहार या बंदराची व्यवस्था भारताकडे देण्याविषयी जेव्हा चर्चा होते, तेव्हा याचाच प्रत्यय येतो. “इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षात भारताची भूमिका महत्त्वाची असेल,” असे विधान जेव्हा पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष करतात, तेव्हा त्याकडे या बदलांची नांदी म्हणूनच पाहावी लागेल

Saturday, 12 May 2018

आयआयटी मुंबईतील एका चमूने नुकतीच सौर चूल तयार केली आहे. यानिमित्ताने सौरउर्जेतील संशोधन, वापर आणि भविष्य याचा वेध घेणारा लेख...

सूर्य रोज पृथ्वीवर प्रकाशाची उधळण करतो. कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतच्या टापूत म्हणजेच उष्ण कटिबंधात तर तो सौरउर्जेचे घडेच्या घडे रिते करतो. आणि तरीही त्या प्रदेशातल्या अनेक राष्ट्रांतल्या नागरिकांना अद्याप उर्जेचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्या समस्येवर तोडगा शोधायला आंतरराष्ट्रीय करारही होत आहेत. पण देशात सौरउर्जेचा वापर कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जे फुकट मिळतं त्याची आपल्याला किंमत नसते. ते आपण वाया जाऊ देत असतो. ज्याचं मोल मोजावं लागतं, ते मात्र जपून जपून वापरत असतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सौरउर्जा. तळपत्या सूर्याची ही ऊर्जा वापरून आपण आपल्या देशाची वीजेची गरज भागवू शकतो. हे सर्व स्तरावर मान्य झाले आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र आजही ते प्रयत्न तोकडे पडत आहेत. याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे असतीलही; पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन या क्षेत्रात अनेकजण संशोधन आणि विकास करत आहेत. यामुळेच आज शहरात याचा जोरात वापर होऊ लागला आहे. 

आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी नुकतीच सौरचुलीची निर्मिती केली आहे. त्यांचा हा प्रयोग इतका उपयुक्त ठरला, की देशभरातील १५०० प्रयोगांमधून त्यांनी ओएनजीसीची स्पर्धा जिंकली आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. देशात सौर उर्जेचा वापर करून गावगावातील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास सोळंकी यांनी घेतला. पीएचडी करत असताना त्यांनी सौर उर्जा साठवून ठेवणाऱ्या उपकरणाच्या निर्मितीसाठी ते संशोधन करत होते. याचा वापर करून त्यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौर दिवे वाटलेत. इतकेच नव्हे तर तेथील सुमारे तीन हजार महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना सौरदिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तेच विकून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे सर्व करत असताना त्यांचे लक्ष सौरचुलीकडे वेधले गेले. सौरचूल तशी नवीन नाही. देशात बऱ्याच वर्षांपासून अशा सौरचुली आहेत. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या सौरचुली म्हणजेच सोलर कुकर हे अन्न शिजवण्यासाठी बाहेर उन्हात नेऊन ठेवाव्या लागतात. म्हणजे जेव्हा ऊन नसेल तेव्हा या चुलींचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. मग सोळंकी यांनी यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पूर्वीच्या संशोधनाला जोडून त्यांनी नवीन सौरचुलीची निर्मिती केली.



ही सौरचूल म्हणजे एखाद्या इंडक्शन कूकरसारखीच दिसते. यामध्ये बॅटरी लावण्यात आली आहे. दिवसभर साचणारी सौरउर्जा या बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते. त्याद्वारे यावर रात्री स्वयंपाक करणेही शक्य होते. हे संशोधन पूर्ण होत असतानाच 'ओएनजीसी'ने स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेत अशी चूल द्यायची होती, की ज्याचा वापर एलपीजी चुलीप्रमाणेच होईल. दिवसातील कोणत्याही वेळात ती वापरता यायला हवी तसेच अन्न शिजवण्याचा वेगही सामान्य चुलीप्रमाणेच असायला हवा. या सर्व अटींची या सौरचुलीत पूर्तता होणे शक्य होते. यामुळे त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १५०० स्पर्धकांतून निवडलेल्या अंतिम सहा स्पर्धकांच्या प्रयोगांमध्ये या प्रयोगाचा समावेश झाला आणि दिल्लीत दोन दिवस सोळंकी आणि त्यांच्या चमूने दिलेल्या वेळेत दिलेले शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न शिजवून दाखवले. यामुळे सोळंकी यांनी तयार केलेल्या या सौरचुलीची प्रथम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये तयार होणारी ही सौरचूल वर्षभरातील १५ एलपीजी गॅस वाचवू शकते. तसेच यासाठी येणारा खर्चही कमी आहे. ही सौरचूल आवश्यकतेनुसार तयार करून दिली जात असल्यामुळे ती दोन हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध आहे. भविष्यात गावागावात ही चूल देऊन आजही जेवण तयार करण्यासाठी सुरू असलेला लाकूड, कोळशाचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा मानस असल्याचे सोळंकी सांगतात. सौरदिव्यांप्रमाणेच सौरचुली तयार करण्याचे प्रशिक्षण गावागावांतील महिलांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सोळंकी यांचा मानस आहे. 

शहरातील सौर प्रयोग 

कुर्ला पश्चिम येथील प्रीमिअर रेसिडन्सेस डी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ५० किलोवॅटचा (३० आणि २० किलोवॅट्स असे प्रत्येकी एक) सौरउर्जा प्रकल्प तीन महिन्यांपूर्वीच कार्यान्वित केला आहे. सोसायटीतील बहुतांश रहिवाशांनी त्याला संमती दिली. सोसायटीमध्ये दोन लिफ्ट, सहा मोटर पंप, २०० ट्यूबलाइट्सचा वापर व्हायचा. त्यामुळे दर महिना सोसायटीला ७० हजार ते १ लाख रुपये वीजबिलापोटी भरावे लागत. आता सोसायटीचे वीजबिल जवळपास शून्य झाले आहे. सौरउर्जा प्रकल्पासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च आला. त्यापैकी १० लाख रुपये सरकारी अनुदान (सबसिडी) वजा जाता २० लाख रुपये सोसायटीने खर्च केले. 'सोसायटीच्या गच्चीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. महिन्यातून एकदा त्याची साफसफाई केली जाते. तेव्हाही शटडाऊन वगैरे काही करावे लागत नाही. वीजबिलापोटी वाचणारी रक्कम लक्षात घेता साधारणपणे दीड वर्षातच आम्ही प्रकल्पासाठी केलेला खर्च वसूल होईल', अशी माहिती सोसायटीचे सचिव मकबूल चौगुले यांनी दिली. हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना अक्षय बोरकर या तरुणाने मदत केली. 

शैक्षणिक संस्थाही आघाडीवर 

काही शैक्षणिक संस्थांनीही सौरउर्जेचा वापर सुरू केला आहे. शहापूरच्या शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटीच्या ३० एकर कॅम्पसमध्ये सौरउर्जा प्रकल्प पाच वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला आहे. या कॅम्पसमध्ये एकूण सात कॉलेजे आहेत. पाच वर्षांपूर्वी कॉलेजचा एकूण वीजवापर लक्षात घेता, तेव्हा दरमहिना साधारण तीन लाख रुपये वीजबिल येत होते. हे बिल सुमारे पाच लाखांवर गेले असते. त्यावेळी कॉलेजच्या संचालकांनी पुढाकार घेऊन सौरउर्जा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाची क्षमता १४० किलोवॅट (ऑफ ग्रीड) आहे. त्यानंतर काही दिवसांनी २५ किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड प्रकल्प सुरू करण्यात आला. तर, २०१६ मध्ये कॉलेजने ७२ किलोवॅट ऑनग्रीड सिस्टिम सुरू केली. या प्रकल्पातून जेवढी वीजनिर्मिती होते तिचा वापर कॅम्पसमध्ये तर केला जातोच. शिवाय, अतिरिक्त वीजही निर्माण होते. दर महिन्याला साधारणपणे २५ हजार युनिट्स विजचे उत्पादन होते. दिवसभराची विजेची गरज भागल्यावर रात्रीच्या वेळी कॉलेजला सुमारे दर महिना चार हजार युनिट्सची गरज भासते. ती विद्युत मंडळाकडून वीज घेऊन पूर्ण केली जाते. दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त वीज विद्युत मंडळाला देऊन केवळ उरलेल्या सुमारे २५०० ते ३००० युनिट्ससाठी कॉलेजला वीजबिलापोटी पैसे भरावे लागतात. सोनारपाडा येथील शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्येही ७० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प अलीकडेच कार्यान्वित करण्यात आला आहे. 

पर्यावरण वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्या देशाचे मौल्यवान परकीय चलन तेल आयात करण्यासाठी खर्च होते. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आपल्याकडून एक छोटा प्रयत्न म्हणून कॉलेजमध्ये हा सौरउर्जा प्रकल्प आम्ही पाच वर्षांपूर्वीच कार्यान्वित केला. सौरउर्जेमुळे हा खर्च दर महिना केवळ ७० हजार रुपये इतका होतो आहे. 

- हर्ष जोंधळे, संचालक, शिवाजीराव जोंधळे नॉलेजसिटी, शहापूर 

आज आपल्या देशात जे संशोधन सुरू आहे ते अद्याप कमी आहे. आपल्या देशात सौरउर्जा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक ते संशोधन झालेले नाही. जगभरात फोटोव्होल्टीक'वर संशोधन सुरू आहे. त्यानुसार भारतातही तसेच संशोधन सुरू आहे. प्रत्यक्षात धोरणात्मक बदल होऊन एकाग्रीत सौरउर्जेवर संशोधन होणे आवश्यक आहे

Wednesday, 2 May 2018

अखंड प्रकाशाच्या दिशेने... महा एमटीबी 01-May-2018

२०१५ साली जेव्हा मोदींनी सर्व गावात वीज पोहोचविण्याची घोषणा केली, तेव्हा त्यासाठी ७५ हजार ६०० कोटींची तरतूद केली होती. आज आपल्याला त्याच्याच परिणाम स्वरुप सर्व देश उजळलेला दिसतो. गावागावांत वीज पोहोचल्याने आता या गावांतील सर्वच घरांना वीजपुरवठा करणे शक्य होईल.
दि१५ ऑगस्ट २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून समस्त देशवासीयांना एक स्वप्न दाखवले - १००० दिवसांत देशातील सर्व गावांत वीज पोहोचविण्याचे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील ज्या १८ हजार ४५२ गावांमध्ये प्रकाशाचा किरणही पोहोचला नव्हता,त्या गावांत वीज पोहोचविण्याचे ध्येय पंतप्रधानांनी समोर ठेवले आणि सोमवारी ते ध्येय पूर्ण झाल्याची माहिती मोदींनी देशवासीयांना दिली.खरं तर मोदी आणि केंद्र सरकारचे यासाठी अभिनंदन केलेच पाहिजेआधुनिक युगात ‘ऊर्जा’ हा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी म्हटले होते, पण ही ऊर्जा-वीज देशांतील हजारो गावांत पोहोचलीच नसल्याने अशा गावांची शेतीपासून घरातली असंख्य कामे खोळंबून राहायची. त्यामुळे या गावांना देशाच्या अर्थव्यवस्थेत कधी सहभाग घेताच आला नाही. आज या सर्वच गावांत वीज पोहोचल्याने आता ही गावेही देशाच्या विकासाला हातभार लावू शकतील.
१९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९५० साली आपण राज्यघटनेचा अंगीकार करत शासनप्रणाली म्हणून लोकशाहीचा स्वीकार केला. पण, त्यानंतरही वर्षानुवर्षांच्या सत्तेनंतरही तळागाळापर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही पोहोचलीच नाही. भारतात अनेक शतके एकाच वेळी नांदतात, असे म्हटले जाते ते त्यामुळेच. म्हणजेच काही काळापूर्वी एका बाजूला आपल्याला शहरात २४ तास अखंडपणे वीज असल्याचे चित्र दिसत असे, तर ग्रामीण भाग आठ-आठ, सोळा-सोळा तासांच्या भारनियमनाने अंधारात खितपत पडलेला दिसत असेतर बहुसंख्य गावांत वीज म्हणजेच काय याचीही माहिती नव्हती. कारण, त्या ठिकाणी वीज पोहोचलीच नव्हती२०१४ साली ‘सबका साथ सबका विकास’ची घोषणा देत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला या परिस्थितीचे पूर्ण भान होतेचसोबतच आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे आणि आपणच ही परिस्थिती बदलू शकतो, हा विश्वास जनतेच्या मनात असल्यानेच त्यांनी आपल्याला सत्तापदी बसवले, याचीही मोदी सरकारला जाणीव होती. लोकांचा हाच विश्वास सार्थ ठरवत मोदी सरकारने देशातल्या सर्व गावांत वीज पोहोचविण्याचा विडा उचललापंतप्रधानांच्या या उद्दिष्टपूर्तीसाठी देशाच्या ऊर्जाविभागानेही लगेचच युद्धपातळीवर कार्यारंभ केलाअवघ्या एक हजार दिवसांत म्हणजे रोज सरासरी १८ गावांचे उद्दिष्ट गाठत ऊर्जा विभागाने हे कार्य पूर्ण करून दाखवलेया कामाच्या लक्ष्यपूर्तीसाठी अगदी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपासून ते शेवटच्या गावातील वीज कर्मचार्‍यापर्यंत सगळ्यांचीच कसोटी लागलीत्याचेच फळ म्हणून आज अवघा भारत प्रकाशमय झाल्याचे दिसते. आपल्या संस्कृतीत ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा श्लोक प्रसिद्ध आहेयाच मंत्राला अनुसरून ऊर्जा विभागाच्या सर्वच यंत्रणांनी काम करत देशाला अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे महत्कार्य केले.
२०१५ साली जेव्हा मोदींनी सर्व गावात वीज पोहोचविण्याची घोषणा केली, तेव्हा त्यासाठी ७५ हजार ६०० कोटींची तरतूद केली होतीआज आपल्याला त्याच्याच परिणामस्वरुप सर्व देश उजळलेला दिसतोगावागावांत वीज पोहोचल्याने आता या गावांतील सर्वच घरांना वीजपुरवठा करणे शक्य होईलसद्यकाळात पाणीपुरवठ्यापासून शेतीची बरीचशी कामे विजेवर आधारित झाल्याने शेतीलाही मोठा फायदा होईलवीज पोहोचल्याने ग्रामीण भागात लघु आणि घरगुती व्यवसायांची उभारणी करणे सुलभ होईलयामुळे विकासाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन नव्या अर्थव्यवस्थेची निर्मिती होईलआरोग्याच्या क्षेत्रात सुधारणा करता येईलतर वीज नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासाविना राहता येणार नाही. बँकिंग, एटीएम सेवा विजेमुळे अधिक दर्जेदार होतीलविजेच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक सुरक्षा वाढेल. शाळा, पंचायत, रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात वीजपुरवठा झाल्याने सामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. या १८ हजार ४५२गावांना या सर्वच फायद्यापासून वर्षानुवर्षे फक्त वीजपुरवठा नसल्याने वंचित राहावे लागले. पण, आता मोदी सरकारच्या कामाच्या धडाक्याने या सर्वच गावांना आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी आकाशच खुले झाले असल्याचे स्पष्ट होते.
आज देश एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. मोदी सरकारच्या निरनिराळ्या योजना, धोरणे आणि निर्णयांमुळे भारतात सकारात्मक वातावरण निर्मिती झाल्याचे आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. पण, या चांगल्या वातावरणातही काही लोकांना खुसपटे काढण्याव्यतिरिक्त दुसरे काही करताच येत नाही. आताही माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वच गावांत वीज पोहोचल्याचा जो दावा केला, तो ‘चुनावी जुमला’ असल्याचे म्हटले. मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या आधी देशात काहीही चांगले झाले नाही, असे समजायचे कारण नाही. त्याआधीही चांगले झालेच. पण, आता चिदंबरम महाशयांचे म्हणणे आहे की, मोदींनी सर्व गावांत वीज पोहोचविल्याचे श्रेय घेऊ नये. मोदींच्याही आधी  लाख ५० हजार गावांत आम्ही वीज पोहोचवली होतीचमोदींनी फक्त १८ हजार ४५२गावांतच वीज पोहोचवलीचिदंबरम यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, ‘आमच्या’ म्हणजे काँग्रेस सरकारच्या कर्मदरिद्रीपणामुळेच ही गावे अंधारात झाकोळली गेलीमोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना आमच्यामुळेच ही अंधारात चाचपडत असलेली गावे दिसलीआमच्या करंटेपणामुळेच मोदींना देशातल्या सर्व गावात वीज पोहोचविण्याचे कार्य करून दाखवता आलेत्यामुळे त्याचे श्रेयही आम्हालाच मिळाले पाहिजे, असेच पी. चिदंबरम यांचे म्हणणे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतेअसेच जर असेल तर काँग्रेसच्या करंटेपणाचे असे कितीतरी नमुने पाहायला मिळतीलपंतप्रधान मोदींनी तोच काँग्रेसी करंटेपणा मिटवण्याचा निश्चय केला आहे. सर्वच गावांत वीज पोहोचविणे, हा त्या निश्चयाचाच एक भाग.
मोदींच्या दृढनिश्चयाने देशातल्या सर्वच गावांत जरी वीज पोहोचली असली तरी हे फक्त एवढेच करणे पुरेसे नाही. कारण, केवळ वीज पोहोचली म्हणजे सरकारचे दायित्व संपले असे नाही, तर ही वीज या आणि देशातल्या सर्वच गावांत अव्याहत-अखंडपणे कशी सुरू राहील, याकडेही प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. विजेचे भारनियमन ही समस्या फार मोठी आहे. या भारनियमनाचे प्रमाण शून्यावर कसे आणता येईलयाकडे आता सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने आपला मोर्चा वळवला पाहिजेकारभारातील त्रुटींवर मात करत, वीजचोरी रोखत, नव्या योजना हाती घेत, नव्या प्रकल्पांची उभारणी करत, अधिकाधिक वीजनिर्मिती करत सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेने काम केले पाहिजेतर नक्कीच हा भारनियमनाचा शापही मिटून सर्वच गावांमध्ये २४ तास विजेचा लखलखाट होईलयात तीळमात्रही शंका नाही.