SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label USA.DONALD TRUMP. Show all posts
Showing posts with label USA.DONALD TRUMP. Show all posts
Monday, 5 November 2018
Friday, 7 September 2018
अमेरिकेचे व्यापारयुद्ध आणि ‘अर्थबंबाळ’ देश-SAMNA-सनतकुमार कोल्हटकर
आशियामधील कोरियन आणि तत्सम इतर कंपन्यांच्या समोर या कंपन्याही गाडय़ांच्या किमती नियंत्रणात ठेवू शकल्यामुळे ताठ उभ्या राहू शकल्या, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे या विविध अमेरिकन कंपन्यांपुढे ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उद्भवली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या व्यापारयुद्धातून माघार घेण्यासाठी अमेरिकेतूनच दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. तो दबाव ट्रम्प किती प्रमाणात घेतात की संपूर्णपणे दबाव झुगारून लावतात हे बघावे लागेल.
अमेरिकेचे चीन, युरोपीय महासंघ आणि कॅनडा वगैरे देशांबरोबर व्यापारयुद्ध सुरू होऊन महिना उलटला असून त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत हे निःसंशय. ऑटोमोबाईल (दुचाकी आणि चारचाकी उत्पादक), अमेरिकेतील निर्यातप्रधान असे सोयाबीन, सफरचंद, बदाम उत्पादक हे प्राथमिक फेरीतच या युद्धात होरपळणारे उद्योग असतील असे दिसू लागले आहे. अमेरिकेने जाहीर केलेले विविध उत्पादनांवरील नवीन आयात कर 6 जुलैपासून लागूही झाले आहेत. यातील जो माल ‘ट्रान्झिट’मध्ये होता तोही वेळेत संबंधित बंदरात पोहोचवण्यासाठी आयात – निर्यातदारांची तारांबळ उडाल्याचे सांगितले गेले.
जागतिकीकरणाच्या काळात अमेरिकेतून अनेक यंत्र उत्पादनांचे आणि त्यांचे सुटे भाग बनविणारे कारखाने अमेरिकेबाहेर युरोप, चीन व आशियामधील अनेक देशांमध्ये स्थलांतरित झाले. अमेरिकन ‘ब्रँण्डेड’ शूज, तयार कपडे उत्पादने बाहेरील देशांमध्ये बनविली जाऊन परत अमेरिकेत विक्रीसाठी येऊ लागली. फोर्ड, जनरल मोटर्ससारख्या अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांचे कारखाने युरोप, हिंदुस्थान, चीनमध्ये थाटले. या देशांमधील अमेरिकन कामगारांच्या तुलनेत खूप स्वस्तात मिळणारे कामगार आणि गाडय़ा बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खूप कमी किमतीत मिळत असल्याने या कंपन्या खूप स्पर्धात्मक किमतीमध्ये आपल्या गाडय़ा अमेरिकेतील बाजारात आणून विकत होत्या.
आशियामधील कोरियन आणि तत्सम इतर कंपन्यांच्या समोर या कंपन्याही गाडय़ांच्या किमती नियंत्रणात ठेवू शकल्यामुळे ताठ उभ्या राहू शकल्या, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे या विविध अमेरिकन कंपन्यांपुढे ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उद्भवली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टीलवर 25 टक्के आयात शुल्क लादल्याने स्टीलच्या अमेरिकेतील किमतीत (लॅण्डेड कॉस्ट ) तेवढीच वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या या वाढीव किमतीमुळे या कंपन्यांना आपल्या गाडय़ांची विक्री किंमतही वाढवावी लागेल. ती वाढीव किंमत शेवटी ग्राहकांच्याच माथ्यावर मारावी लागेल, परंतु ही वाढीव किंमत किती प्रमाणात वाढतेय याचे विविध कंपन्यांनी दिलेले काही आकडे बघून ग्राहक ही किंमत स्वीकारणारच नाहीत हे निश्चित. अर्थात या कंपन्यांनी या वाढीव किमतीतील किती भाग ग्राहकाच्या गळ्यात बांधायचा विचार केला आहे हे स्पष्ट नाही.
‘आम’ या अमेरिकन ऑटोमोबाईल संघटनेने या व्यापारयुद्धामुळे अमेरिकेतील गाडय़ांची सरासरी विक्री किंमत 5000 ते 6000 डॉलर्सने वाढू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. एवढी वाढ कोणत्याही देशाचा नागरिक स्वीकारणार नाही.
तर लक्झरी श्रेणीतील मर्सिडीज एस क्लास, लेक्सस या गाडय़ांच्या विक्री किमतीत 10 हजार डॉलर्सने वाढ होईल असे सांगितले जाते. या आकडय़ांमुळे या व्यापारयुद्धाचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. या व्यापारयुद्धामुळे व्यापारातील प्रत्येक सहभागी देश अक्षरशः ‘अर्थबंबाळ ’ होणार आहेत. सुरुवातीला काही कंपन्या कामगार कपात करून खर्च कमी करावयाचा प्रयत्न करू शकतात. ज्याला कोलॅटरल डेमेज म्हणतात ते सहभागी देशांच्या अर्थव्यवस्था व अंतिम ग्राहक यांचे होईल. जागतिक चलनांच्या विनिमय किमतीतही खूप ‘उछाल’ दिसण्याची शक्यता वाटते. चीन त्यांचे चलन युआनचे डॉलरशी विनिमय मूल्य घटवू शकतो असेही बोलले जाते.
एल.एम.सी. ऑटोमोटिव्ह ही अमेरिकेतील ऑटोमोबाईल गाडय़ांचे उत्पादन, विक्री याबद्दलचा तपशील गोळा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या दाव्यानुसार या नवीन आयात शुल्कामुळे अमेरिकेतील गाडय़ांच्या विक्रीला जोरदार फटका बसून त्यामुळे अमेरिकेत पुढील एका वर्षात सुमारे 10 लाख कमी गाडय़ा विकल्या जातील. जपान सरकारच्या मते या आयात शुल्कवाढीमुळे या विविध कारखाने, त्याची अनेक ठिकाणी पसरलेली विक्री केंद्रे आणि या सर्वांशी संलग्न उद्योगधंदे हे सर्वजण लक्षात घेता अमेरिकेत सुमारे 2 लाख अमेरिकन कामगारांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते, तर ‘असोसिएशन ऑफ ग्लोबल ऑटोमेकर्स’ या अमेरिकेतील वॉशिंग्टनस्थित संस्थेनुसार हजारो अमेरिकन लोकांना त्यामुळे रोजगार गमवावा लागू शकतो. अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्यांचा सर्वसाधारणपणे जपानी आणि कोरियन ऑटोमोबाईल उत्पादकांवर विशेष राग आहे. या कंपन्या आपली उत्पादने फार स्पर्धात्मक कमी किमतीत अमेरिकेत विकतात. त्यामुळे अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रीला जोरदार फटका बसतो. हिंदुस्थानात अमेरिकेतून हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकींची आयात होते. याशिवाय कॅलिफोर्नियामधून बदाम, सफरचंदे आयात होतात. तसेच आता संरक्षण साहित्यही अमेरिकेतून यापुढे आयात केले जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या व्यापारयुद्धातून माघार घेण्यासाठी अमेरिकेतूनच दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. तो दबाव ट्रम्प किती प्रमाणात घेतात की संपूर्णपणे दबाव झुगारून लावतात हे बघावे लागेल.
अमेरिकेने व्यापारयुद्ध छेडण्यामागे अजून एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे नजीकच्या भविष्यात येऊ घातलेले दूरसंचार क्षेत्रातील ‘5जी’ तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाने मोठी क्रांती अपेक्षित असून अमेरिकन कंपन्या आणि चिनी कंपन्या हुवेई आणि झेडटीई या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी सज्ज झाल्या आहेत. या तंत्रज्ञानाने सुमारे 12 ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या जागतिक बाजाराचे ( हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र धरून) दरवाजे उघडले जाणार आहेत. 5जीमुळे इंटरनेटचा वेग अफाट वाढणार आहे. या तंत्रज्ञानाचा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), चालकविरहित गाडय़ा, इंटरनेट ऑफ थिंग्स यामध्ये वापर होणार असून अमेरिकेला चीनकडून या बाजारावर ताबा मिळवण्यापासून रोखायचे असल्याचे सांगितले जाते. या व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थकारण ढवळून निघणार आहे. अमेरिकन काँग्रेस हे व्यापारयुद्ध थांबविण्याबद्दल पूर्णपणे हतबल आहे की काय अशी लोकांना शंका येते आहे. शेवटी अमेरिकन ग्राहकांना जास्त खर्च करून वस्तू विकत घ्याव्या लागतील आणि ते याला कितपत तयार होतील हे येणाऱ्या काळात दिसून येईल½
Tuesday, 7 November 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला महत्त्वाकांक्षी आशिया दौरा-डॉ. शैलेंद्र देवळाणकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला महत्त्वाकांक्षी आशिया दौरा नुकताच सुरू झाला आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदा आशियाच्या दौर्यावर आले आहेत. या 12 दिवसांच्या दौर्यादरम्यान ते पाच देशांना भेटी देणार आहेत. काही बहुराष्ट्रीय संघटनांच्या वार्षिक परिषदांमध्येही त्यांची उपस्थिती असणार आहे. ‘आसियान’ या संघटनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एक विशेष बैठक होणार आहे. या बैठकीला ट्रम्प उपस्थित राहणार आहेत. याखेरीज एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन संघटनेच्या एका बैठकीलाही ते उपस्थित राहाणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौर्यामध्ये प्रामुख्याने जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन या देशांचा समावेश होतो. हा दौरा पाच नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी जपानला भेट दिली आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि चीन व त्यानंतर व्हिएतनाम, फिलिपाईन्स असा त्यांच्या दौर्याचा कार्यक्रम आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या दौर्याचा मुख्य उद्देश हा उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांच्याकडून सातत्याने दिल्या जाणार्या धमक्या आणि उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, आशिया प्रशांत क्षेत्रातील युद्धजन्य परिस्थिती यांची पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या 19 व्या परिषदेत शी जिनपिंग यांची पुनर्निवड करण्यात आली असून, तेथील राज्यघटनेमध्ये माओनंतरचे सर्वोच्च प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून झिनपिंग यांची नोंद करण्यात आली आहे; हीदेखील पार्श्वभूमी ट्रम्प यांच्या या दौर्याला
आहे.
दुसरीकडे, आज फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम हे चीनच्या विस्तारवादी धोरणाने घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे चीनबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत. चीनच्या दौर्यानंतर या देशांना आश्वस्त करण्याचे कामही ट्रम्प करणार आहेत. चीनच्या विस्तारवादाला घाबरू नका, अमेरिका तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास या देशांना ट्रम्प यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचे पूर्वसुरी असणार्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असा दौरा केला होता. या दोन्हींमागचा उद्देश स्पष्ट असून, आशिया प्रशांत क्षेत्रात अमेरिकेला स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा संपूर्ण दौरा हा सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
आहे.
दुसरीकडे, आज फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम हे चीनच्या विस्तारवादी धोरणाने घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांचे चीनबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत. चीनच्या दौर्यानंतर या देशांना आश्वस्त करण्याचे कामही ट्रम्प करणार आहेत. चीनच्या विस्तारवादाला घाबरू नका, अमेरिका तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास या देशांना ट्रम्प यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचे पूर्वसुरी असणार्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असा दौरा केला होता. या दोन्हींमागचा उद्देश स्पष्ट असून, आशिया प्रशांत क्षेत्रात अमेरिकेला स्वतःचा प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा संपूर्ण दौरा हा सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारले आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत ट्रम्प यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करारांतून माघार घेण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आशिया खंडात चीनचा प्रभाव वाढू लागला आहे. परिणामी, अनेक देश घाबरले आहेत. त्यामुळे येथे अमेरिकेला एक आश्वस्त वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या दौर्याच्या माध्यमातून हीच गोष्ट ठसवण्याचे प्रयत्न ट्रम्प करतील. आणखी एक मुद्दा म्हणजे ट्रम्प यांनी मध्यंतरी जपान आणि दक्षिण कोरिया यांनी स्वसंरक्षणाचा विचार करावा, स्वतःचे अणुबॉम्ब तयार करावेत. अमेरिका त्यांचे रक्षण करणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याचबरेबर ओबामांच्या काळात आखल्या गेलेल्या पीव्हॉट टू एशिया या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे 20 टक्के नौदल हे आशिया प्रशांत क्षेत्रात ठेवले जाणार होते; पण त्यासंदर्भातही पुनर्विचार करण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले होते. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप या बहुराष्ट्रीय करारातूनही त्यांनी माघार घेण्याचे सूतोवाच केले होते. अलीकडेच ‘युनेस्को’तून अमेरिकेने माघार घेतली आहे. या सर्वांमुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अमेरिका आपल्या पाठीशी राहील का, अशा स्वरूपाच्या भीतीचे वातावरण आशिया खंडातील देशांमध्ये होते. अशा परिस्थितीत हा दौरा आखण्यात आला आहे. या दौर्यातून आशिया खंडाच्या संरक्षणाविषयीची अमेरिकेची बांधीलकी पुन्हा एकदा दिसून येत आहे. उत्तर कोरिया हे तात्कालिक कारण असले तरीही या दौर्याच्या माध्यमातून अमेरिकेने पुन्हा एकदा आशिया खंडाकडे लक्ष वळवले आहे. अलीकडेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाविषयीचे अमेरिकेचे धोरणही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यात भारताला त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे . या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण, अमेरिकेने माघार घेतल्यामुळे आशियातील सत्तासमतोलाच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी चीन भरून काढण्याची शक्यता आहे. ही बाब भारतासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अमेरिकेचे लक्ष पुन्हा एकदा आशिया खंडाकडे वळणे, अमेरिकेने आशिया प्रशांत क्षेत्रात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करणे हे भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारत या दौर्याला पाठिंबाच देईल. ट्रम्प यांच्य दौर्यामुळे उत्तर कोरियाला चिथावणी मिळणार आहे. त्यातून उत्तर कोरियाची अरेरावी वाढू शकते. किम जोंग पुन्हा अणू परीक्षण करू शकतो आणि त्यातून जगाला आव्हानही देऊ शकतो.
त्यामुळे येणार्या काळात काय घडते, हे पाहावे लागेल. कदाचित, या दौर्यामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होण्याची शक्यता आहे.
Wednesday, 28 June 2017
दहशतवाद मातीत गाडण्याचा वज्रनिर्धार!
Saturday, 24 June 2017
भारत-अमेरिका संबंधांची नवी पहाट
Tuesday, 20 June 2017
पाकसाठी अमेरिकन सापळा? By pudhari
या आठवड्याच्या अखेरीस राष्ट्रपतिपदाचे भाजप उमेदवार रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल केला जायचा आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी व्हायचे आहेत. ते काम उरकले, मग विनाविलंब पंतप्रधान अमेरिका भेटीसाठी जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच खास आमंत्रणावरून मोदी तिकडे जाणार असून, या भेटीला शिखर बैठक असेही मानले जात आहे. गतवर्षी आपल्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी वारंवार मोदींचा उल्लेख केलेला होता आणि त्यांच्या विजयानंतर मोदींनीही त्यांना शुभेच्छा पाठवल्या होत्या; पण ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेऊन सहा महिने होत आले असतानाही, अजून या दोन नेत्यांची प्रत्यक्षात भेट होऊ शकलेली नाही. दरम्यान, अनेक जागतिक विषयात त्यांचे मतभेद समोर आले आहेत आणि अनेक बाबतीत सामंजस्यही दिसलेले आहे. अमेरिकनांनाच रोजगार मिळावा म्हणून आग्रही असलेल्या ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच परदेशी तंत्रज्ञ व कुशल कर्मचार्यांना व्हिसा नाकारण्याची वा त्यांची संख्या कमी करण्याची भूमिका घेतली. त्याचा मोठा फटका तिथे कामधंद्यासाठी जाणार्या भारतीयांना बसलेला आहे. त्याखेरीज पर्यावरणविषयक पॅरिस करारातून बाहेर पडताना ट्रम्प यांनी चीन व भारताला अधिक सूट मिळण्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केलेले होते. त्यालाही मोदींनी आक्षेप घेतलेला होता. अशा पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीच पुढाकार घेऊन मोदींना तिकडे येण्याचे आमंत्रण दिल्याने कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे; पण मोदी तिकडे जाण्यापूर्वीच ट्रम्प सरकारने सूचित केलेल्या काही गोष्टी व भूमिका पाकच्या पोटात धडकी भरवणार्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अफगाण प्रदेशात तालिबान्यांच्या बंदोबस्तासाठी वापरल्या जाणार्या ड्रोन हल्ल्याची व्याप्ती पाकिस्तानी प्रदेशातही होऊ शकते, हा इशारा! तो इशारा अमेरिका किती अंमलात आणेल याची शंका आहे; पण त्यातून भारताला खूश करण्याचा प्रयत्न ट्रम्प सरकार करते आहे, यात शंका नाही. मोदींच्या कारकिर्दीत अमेरिका व भारत यांचे संबंध खूप गुण्यागोविंदाचे झाले, यात शंका नाही; पण आता अकस्मात ट्रम्प यांनाही भारताची गरज वाटू लागण्याची प्राथमिक कारणे वेगळी असू शकतात. प्रामुख्याने मध्य आशियातील बिघडणारी राजकीय स्थिती आणि सौदीला आव्हान देणारे शिया व कतारी राजकारण यातून अमेरिकेचा गोंधळ उडालेला असू शकतो. त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिलेले चीन व भारत हे दोनच देश आहेत आणि त्यात भारत अमेरिकेला जवळचा वाटत असावा, असा याचा अर्थ आहे. जागतिक व आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने महत्त्वाच्या भूमिका घेण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील असावेत काय, अशी म्हणूनच शंका येते. म्हणजे भारत-पाक वितुष्टाचा संबंध आपोआप येतो.
अफगाणिस्तानात अमेरिकन सेना दीर्घकाळ आहे आणि तिथे अफगाण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने खूप झळ सोसली आहे; पण त्यात मोठा व्यत्यय पाकमध्ये आश्रय घेतलेले तालिबान व पाकप्रणीत जिहादी आणत असतात. त्यांचा शस्त्रांनी पुरेसा बंदोबस्त होऊ शकलेला नाही. पाकला त्यासाठी शस्त्रांची व पैशांची मदत देऊनही परिणाम शून्यच मिळाला आहे. साहजिकच, अफगाणिस्तानात भारताला हस्तक्षेप करण्याची मोकळीक देऊन, तिथून पाकचे नाक दाबण्याच्या डावपेचांची कल्पना पुढे आणली जात असेल काय? अफगाण प्रदेशाच्या नव्या उभारणीत भारताने खूप सहाय्य केलेले आहे. भारतीय सेनेचा एक घटक असलेली सीमारस्ते संघटना तिथले मोठे हमरस्ते व महामार्ग उभारण्याच्या कामात अनेक वर्षे गुंतलेली आहे. त्याच संघटनेचा व पर्यायाने भारतीय सेनेचा अफगाण शांततेसाठी संयुक्तपणे उपयोग करण्याची कल्पना यातून आकाराला येऊ शकते. पाक सेना व त्यांनी पोसलेले जिहादी ही अवघ्या जगाची डोकेदुखी झालेली आहे. भारताला तर शेजारी म्हणूनच त्यांचा त्रास सोसावा लागतो आहे. त्याचा थेट उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या सौदी भेटीत व मुस्लिम देशांच्या परिषदेत बोलताना केलेला होता. त्या दहशतीचा बळी भारत असल्याचे बोलून दाखवताना नवाज शरीफ यांना भेटही नाकारण्याचा ताठरपणा ट्रम्प यांनी दाखवला होता. आता त्याच्या पुढले पाऊल उचलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे एका बाजूला पाकची आर्थिक व लष्करी मदत कमी करणे, तर दुसरीकडे अफगाण सीमेवरूनही पाकसेनेची कोंडी करणे, असा खेळ होऊ शकतो. त्याचे अनेक पदर व छटा असतात. त्याचे तपशील सहसा समोर आणले जात नाहीत; पण इस्लामी दहशतवादाचे केंद्र व त्यामुळे अराजक माजलेला पाकिस्तान, ही अमेरिका व जगासाठी समस्या बनलेली आहे. त्याचा सर्वात मोठा बळी म्हणून भारतानेच पाकला ठेचावे, अशी काही कल्पना अमेरिकेने योजलेली असू शकते काय? आजवर चीनने पाकला खूप आश्रय दिला असला, तरी अमेरिका वा सौदी यांच्याच पैशांवर पाकने मस्ती केली आहे. त्या दोघांनी हात आखडता घेतल्यास पाकसेनेची नाकेबंदी होऊ शकते. अफगाण प्रदेशातली अशांती संपवण्यासाठी तशी काही संयुक्त योजना असल्याची चाहूल अमेरिकेतून मिळू लागली आहे. पाकविषयक कठोर पवित्रा आणि अमेरिकन लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनीशी करण्यात आलेला करार; त्याची लक्षणे दाखवत आहे. ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांना अगत्याने आमंत्रण दिल्यानंतरच्या काही बातम्या व घटना त्याचीच चाहूल देत आहेत. त्यात जगाला डोकेदुखी झालेल्या पाकिस्तानची जिहादी नांगी ठेचण्याचा काही आराखडा अमेरिकेत शिजल्याचेच संकेत मिळतात
Monday, 5 June 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी जे फुत्कार सोडले आहेत अमेरिकेतील जनमत ट्रम्प यांच्या वर्तनामुळे बदलत आहे. त्यांचा विरोध वाढीला लागला आहे. ही भारताच्या दृष्टीने तरी चांगली बाब आहे. सध्या ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ चा प्रयोग भारताला करावा लागत आहे. पंतप्रधानांची आगामी काळात खरेच परीक्षा आहे.
Sunday, 5 February 2017
डोनाल्ड ट्रम्प आणि संस्कृतीचा संघर्ष
Saturday, 4 February 2017
वादळाचे अंतरंग उलगडणारी पुस्तके ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे सचिन दिवाण
वादळाचे अंतरंग उलगडणारी पुस्तके
ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्याच्या परिणामांची जगाला आता केवळ चुणूक दिसत आहे. अशावेळी या ट्रम्प नामक वादळाची जडणघडण कशी झाली आहे हे जाणून घेतल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचे मार्गही कदाचित त्यातून दिसू शकतील. त्यासाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत..
कोणी निंदा किंवा वंदा, डोनाल्ड ट्रम्प नावाची व्यक्ती आजमितीला अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेली आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जर महाभियोग चालवून त्यांना पदच्युत केले गेले नाही, तर पुढील किमान चार वर्षे जगाला त्यांना झेलावे लागणार आहे. बरं, प्रश्न दुसऱ्या कोणत्याही साध्यासुध्या देशाच्या अध्यक्षाचा किंवा प्रमुखाचा असता तर वेगळा, पण इथे गाठ आहे जगातील एकमेव महासत्तेच्या सर्वोच्च पदी स्थानापन्न झालेल्या एका विक्षिप्त माणसाची. असं म्हणतात की ‘व्हेन अमेरिका कॅचेस कोल्ड, होल वर्ल्ड स्निझेस.’ आधीच जगाचा ‘अनसर्टन्टी इंडेक्स’ यंदा आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. मग अमेरिकेची सूत्रे अशा तुफानी व्यक्तिमत्त्वाकडे गेल्यावर जगाला कापरे भरले नाही तरच नवल! आता या पाश्र्वभूमीवर या वादळाच्या केंद्रस्थानी जाऊन त्याला समजून घेता आले तर जरा फायद्याचे ठरू शकते. वादळाच्या अंतरंगात डोकावण्याची ही संधी ट्रम्प यांच्यासंबंधीची काही पुस्तके उपलब्ध करून देतात. त्यात त्यांचे चरित्रकार मायकेल डी’अँतोनिओ यांचे ‘द ट्रथ अबाऊट ट्रम्प’, पत्रकार एझरा लीवंट यांचे ‘ट्रम्पिंग त्रुदाँ – हाऊ डोनाल्ड ट्रम्प विल चेंज कॅनडा इव्हन इफ जस्टीन त्रुदाँ डझंट नो इट यट’ आणि खुद्द ट्रम्प यांनी पत्रकार टोनी श्वाट्र्झ यांच्या साथीने १९८७ साली लिहिलेले ‘ट्रम्प : द आर्ट ऑफ द डील’ या पुस्तकांचा समावेश होतो.
ट्रम्प नावाचे रसायन नेमके काय आहे, त्याची जडणघडण कशी झाली आणि जगात सध्या जे काही घडू घातलेले आहे त्यावर या प्रक्रियेचा कसा ठसा उमटणार आहे हे ट्रम्प चरित्रकार मायकेल डी’अँतोनिओ यांनी सीन इलिंग यांना दिलेल्या मुलाखतीत अत्यंत मार्मिकपणे वर्णिले आहे. त्यांचे पुस्तकही याची मोठी दृष्टी प्रदान करते. डी’अँतोनिओ यांनी ट्रम्प यांच्यासोबत खूप काळ व्यतीत केला असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांच्या मते ट्रम्प हे एखाद्या नटासारखे आहेत. जॉन वेन जसा आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका जगत आला तसे ट्रम्प आयुष्यभर विविध भूमिका जगत आले आहेत. आपली ही ओळख त्यांना अत्यंत प्रिय आहे. एका यशस्वी उद्योजकाच्या भूमिकेतून बिनधास्त वक्तव्ये करणाऱ्या आणि जोखीम पत्करू इच्छिणाऱ्या अध्यक्षीय उमेदवाराच्या भूमिकेत त्यांनी केलेल्या स्थित्यंतराने अमेरिकी मतदारांवर गारुड केले आणि ते अध्यक्षपदी निवडूनही आले. त्यांच्या या धोका स्वीकारण्याच्या वृत्तीचा माग एक व्यावसायिक आणि व्यक्ती म्हणून असलेल्या पूर्वायुष्यातही दिसून येतो. जगाच्या दृष्टीने ज्या गोष्टी प्रमाण आहेत त्या धुडकावून लावण्यात त्यांना आनंद मिळतो. मला सामान्यांसारखे जगण्याची-वागण्याची गरज नाही हे दाखवण्याची ऊर्मी त्यामागे असते.
मग या सगळ्यातून ट्रम्प यांना आपली काय प्रतिमा निर्माण करायची आहे, आपण काय आहोत हे सिद्ध करायचे आहे? डी’अँतोनिओ यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकी जनरल जॉर्ज पॅटन यांच्यासारखी प्रतिमा ट्रम्प यांना निर्माण करायची आहे. डी’अँतोनिओ म्हणतात की, जेव्हा ट्रम्प पॅटन यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांना आपल्याला काय आवडते, किंवा आपण कसे बनू इच्छितो हेच ते सुचवत असतात. पॅटन यांच्या आक्रमकतेशी, अधिकारवाणीशी ते साधम्र्य साधू पाहात असतात. लोकांनी आपल्याकडेही तसेच उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून पाहावे अशी त्यांची इच्छा असते. ट्रम्प यांच्या आदर्श व्यक्तींमध्ये त्यांचे वडील, ते एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत असतानाचे अधिकारी आणि प्रसिद्ध वकील रॉय कॉन यांचा समावेश आहे. या सर्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये काही समान धागे आहेत. ते सर्व आक्रमक आणि दांडगाईखोर होते, आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची ते ताकदीमध्ये मोजत आणि आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी साधनशूचितेच्या पालनावर त्यांचा फारसा कटाक्ष नसायचा.
डी’अँतोनिओ उल्लेख करतात, की ट्रम्प यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते, ‘यू आर अ किलर, यू आर अ किंग’ आणि त्यावर ट्रम्प यांनी ठाम विश्वास ठेवला. डोनाल्ड यांचा थोरला भाऊ फ्रेडी वडिलांच्या अपेक्षांना उतरू शकला नाही. मग डोनाल्ड यांनी वडिलांच्या अपेक्षेबरहुकूम बनण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तर ट्रम्प यांची आई कमालीची दिखाऊ वृत्तीची होती. प्रत्येक कार्यक्रमात सर्वाचे लक्ष आपल्यावरच खिळून राहावे असा तिचा कटाक्ष असे. त्यामुळे ट्रम्प यांनी वडिलांकडून बेदरकार व निष्ठूर वृत्ती आणि आईकडून दिखाऊपणा उचलला, असे त्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करताना डी’अँतोनिओ यांनी म्हटले आहे.
आपल्या विरोधकांवर आणि प्रसारमाध्यमांवर ट्रम्प करीत असलेल्या शरसंधानाबद्दल डी’अँतोनिओ म्हणतात की, स्वत:शिवाय अन्य कोणत्याही स्रोताकडून येणारी माहिती खोटी आहे हे ट्रम्प यांना दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी अन्य सर्व माहितीच्या स्रोतांना अवैध ठरवणे हे त्यांच्या विरोधाचे सूत्र आहे. तसे केल्याने आपलेच खरे असून आपल्यावर विरोधक व प्रसारमाध्यमे अन्याय करत असल्याचे दाखवून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हेतू असतो.
मग ट्रम्प नेमके कसे अध्यक्ष असतील याचे उत्तर देताना डी’अँतोनिओ म्हणतात, ट्रम्प कधीच एक यशस्वी नेता नव्हते. ते त्यांच्या कॅसिनो आणि एअरलाइन्सच्या व्यवसायातील कामगिरीवरून दिसून आले. त्यामुळे ट्रम्प आपला कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चालवतील. त्यांचा प्राधान्यक्रम ‘डीलमेकिंग’ला असेल. त्यांच्यासाठी अध्यक्षपद हे एक डामडौल करण्याचे पद आहे. लोकांनी आपल्याला छान-छान म्हणावे, आपले कौतुक करावे यातच त्यांना रस असेल.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रवादाला चुचकारले आहे. अमेरिकेच्या हितालाच प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यापारी र्निबध लादण्याचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली मुस्लिमांच्या अमेरिका प्रवेशावर र्निबध लावले जात आहेत. शेजारच्या मेक्सिकोतून होणारे स्थलांतर आणि तस्करी रोखण्यासाठी सीमेवर २००० मैलांची भिंत बांधण्याचा जंगी प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या या धोरणांची पाळेमुळे त्यांच्या ‘द आर्ट ऑफ द डील’ पुस्तकात दिसून येतात असे लेखकांचे व विश्लेषकांचे म्हणणे आहे. ट्रम्प आपल्याला एक उत्तम ‘डीलमेकर’ समजतात. त्यांचा मोठमोठय़ा संकल्पना, विचार, प्रतिमांवर विश्वास आहे. त्याच नजरेतून त्यांच्या मेक्सिको सीमेवरील २००० मैल लांब भिंतीकडे पाहता येते. प्रत्यक्षात ती बांधून होईल का नाही माहीत नाही. पण मोठय़ा संकल्पना लोकांना भुलवतात. मेक्सिकोबरोबर नुकत्याच झालेल्या चर्चेत त्यांनी काही ठिकाणी भिंतीऐवजी कुंपण घालण्याचे संकेत दिले. त्याचेही सूत्र पुस्तकात मिळते, सर्व पर्याय खुले ठेवा हे त्यांचे धोरण आहे. त्याबरोबरच व्यावसायिक म्हणून एखाद्या प्रकल्पाची किंमत कमी करण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच या भिंतीचा खर्च मेक्सिकोकडून वसूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण लोकांना नुसतेच झुलवत ठेवता येत नाही. त्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते. म्हणूनच थोडय़ा लहान प्रमाणात का होईना हा प्रकल्प पूर्ण करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली वचने पटापट पूर्ण करण्याकडे त्यांचा असलेला कल हेच स्पष्ट करतो.
याशिवाय या लेखकांना ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जाणवलेला एक पैलू म्हणजे ते परिस्थितीवर कायम प्रतिहल्ला करत आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक प्रस्थापित व्यवस्था असो की प्रसारमाध्यमे, ‘अरे’ला ‘का रे’ करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.
ट्रम्प यांच्या कारकीर्दीचा संपूर्ण जगावरच भलाबुरा परिणाम होणार आहे. तूर्तास त्याची झळ मेक्सिको आणि कॅनडा या शेजारी देशांना बसत आहे. यापैकी कॅनडावर कळत-नकळत होणाऱ्या परिणामांचा परामर्श पत्रकार एझरा लीवंट यांनी त्यांच्या ‘ट्रम्पिंग त्रुदाँ’ या पुस्तकात घेतला आहे. ट्रम्प अद्याप अमेरिकेचे अध्यक्ष झालेही नव्हते. पण त्यांच्या प्रचाराचा आणि त्यातील मुद्दय़ांचा शेजारच्या कॅनडाचे लिबरल पक्षाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदाँ यांच्या धोरणांवर कसा परिमाम झाला हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे. त्रुदाँ यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर सरसकट टीका सुरू केली. ट्रम्प जे काही बोलतील त्याचा विरोधी सूर त्रुदाँ लावू लागले आणि त्यातून आपल्या देशांतर्गत विरोधकांवर नेम धरण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे लीवंट यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या बाबतीत जस्टीन त्रुदाँ त्यांचे वडील पिअरी त्रुदाँ यांनी १९७० च्या दशकात जो अमेरिकाविरोधी सूर लावला त्याचीच री ओढत आहेत. ट्रम्प निवडून आल्यानंतरच्या काही आठवडय़ांतच त्रुदाँ यांनी अमेरिकेचा पारंपरिक प्रतिस्पर्धी क्युबाची राजधानी हवानाला भेट दिली, गाझा पट्टीतील ‘हमास’शी संबंधित संस्थांना २५ दशलक्ष डॉलरच्या देणग्या दिल्या आणि कॅनडातील एका मोठय़ा तंत्रज्ञानविषयक कंपनीची मालकी चिनी कंपनीला घेण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे, तर इराण आणि जागतिक हवामानबदल आदी विषयांवरही त्रुदाँ यांनी अमेरिकाविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत विरोधकांवर मात करण्यासाठी त्रुदाँ हे उद्योग करत असले तरी त्यातून अमेरिका व कॅनडा हे शेजारी अधिकाधिक दूर जात आहेत. वास्तविक अमेरिका व कॅनडा यांचे आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक बाबतीत पूर्वापार सौहार्दपूर्ण संबंध आहेत. पण केवळ ट्रम्प यांच्या आगमनाने त्यात फरक पडू लागला आहे.
ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्याच्या परिणामांची जगाला आता केवळ चुणूक दिसत आहे. अशावेळी ही पुस्तके या परिणामांना सामोरे जाण्याचे मार्ग दाखवू शकणारी आहेत. ती जशी ट्रम्पच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतात, तसाच त्याला पर्यायी राजकारण उभारण्याची आशाही व्यक्त करतात.
सचिन दिवाण
Tuesday, 24 January 2017
भारत हा अमेरिकेचा खरा मित्र देश आहे असे वर्णन करीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षअखेरीस अमेरिकेला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले आहे. तसेच, दहशतवादाविरोधातील जागतिक पातळीवरील लढ्यामध्ये भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून उभे राहतील, असा निश्चय यावेळी दोन्ही नेत्यांनी केला.
Subscribe to:
Posts (Atom)