Total Pageviews

Showing posts with label TECHNOLOGY. Show all posts
Showing posts with label TECHNOLOGY. Show all posts

Tuesday, 21 August 2018

“जे सबळ आहेत, ते अथवा जे सर्वाधिक बुद्धिमान आहेत, ते जिवंत राहतील असे नाही, तर जे बदलांना प्रतिसाद देत त्यांचा स्वीकार करतील तेच जिवंत राहतील.”- facebook.com/MahaMTB/

डार्विनचे एक सुंदर वाक्य - “जे सबळ आहेत, ते अथवा जे सर्वाधिक बुद्धिमान आहेत, ते जिवंत राहतील असे नाही, तर जे बदलांना प्रतिसाद देत त्यांचा स्वीकार करतील तेच जिवंत राहतील.” याचा अर्थ काय, तर ग्राहकांनी आणि ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स दोघांनीही नवे बदल स्वीकारणे गरजेचे असून त्यामुळे हा पन्नास टक्क्यांचा मामला निस्तरू शकतो.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...
 
गुगलची सल्लागार बेन अ‍ॅण्ड कंपनी आणि फिलॉन्थ्रॉपिक व्हेंचर फंड ओमीड्यार नेटवर्क यांनी संयुक्तपणे केलेल्या पाहणीत भारतातील सुमारे ५ कोटी लोक ऑनलाईन शॉपिंग करत असल्याची आणि ५ .४ कोटी लोक एकदा ऑनलाईन शॉपिंग केली की, नंतर त्यापासून परावृत्त होत असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली. ही आकडेवारी गेल्या १२ महिन्यांतील असून घटलेल्या ग्राहकसंख्येमुळे भारतातील ई-कॉमर्स क्षेत्राला ५ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले. हे नुकसान भरून निघण्यासाठी आणि ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी जवळपास ५ वर्षांचा कालावधी लागणार असल्याची बाबही यातून उघड झाली. ऑनलाईन क्षेत्रासाठी ही बाब चिंताजनक आहेच, पण देशाच्या विकासाच्या आणि रोजगाराच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब ठरते. यामागची कारणे नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. जे ५ .४ कोटी खरेदीदार एकदा ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर त्यापासून परावृत्त झाले, त्यात कमी उत्पन्न गटातल्या ज्यांनी प्रथमच ऑनलाईन खरेदी केली त्यांचा आणि इंग्रजीऐवजी प्रादेशिक भाषांशी जवळीक असणार्‍या लोकांचा समावेश होतो. आपल्याला माहितीच आहे की, बहुसंख्य भारतीयांची वा आपण असे म्हणूया की, ग्राहकांची इंग्रजी ही दैनंदिन वापरातली भाषा नाही. इंटरनेटवरील कोणतीही ऑनलाईन शॉपिंगसाठीची वेबसाईट सुरू केली की त्यावरून इंग्रजीचाच भडीमार सुरू होतो. त्यामुळे ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही, अशा लोकांना या वेबसाईट्स आपल्याशा वाटतच नाहीत. कित्येक युजर्सना तर नव्या जमान्यातल्या ऑनलाईन दुकानांवरील शॉपिंग कार्ट आयकॉनचीही माहिती नाही, ज्याचा परिणाम ग्राहकसंख्या घटण्यात झाला. दुसरीकडे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचा जटिलपणा, त्यांची गुंतागुंतीची रचना, २८ टक्के इतक्याच भारतीयांचा इंटरनेट वापर आणि ऑनलाईन खरेदी करणार्‍या ग्राहकांपैकी महिलांची निम्मी संख्या या कारणांमुळेही ही संख्या घटली. त्यामुळे आपली ग्राहकसंख्या घटल्याने चिंताग्रस्त झालेल्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सना या मुद्द्यांचाही विचार करावा लागेल.
 
देशात जसजसा नवनवीन तंत्रज्ञानाचा, इंटरनेटचा प्रसार झाला, तसतशी वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या वेबसाईटची लाटच आली. मध्यंतरीच्या काळात तर ई-कॉमर्स वेबसाईट्सनी विक्रीचे नवनवे उच्चांकही गाठले. एका बाजूला ग्राहकसंख्या घटताना दिसत असली तरी ई-कॉमर्स क्षेत्राचा प्रभावदेखील सातत्याने वाढतोच आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाईट म्हणजे अ‍ॅमेझॉन. जेफ बेझोस यांनी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीपासून सुरू केलेली ही वेबसाईट आज मोबाईल, टी.व्ही. बेबीकेअर प्रॉडक्टस ते धान्य व फळांपर्यंत प्रत्येक वस्तूची ऑनलाईन विक्री करते. अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ईबे, होमशॉप १८ , येभी, जंगली, मिन्त्रा या वेबसाईट्सही या क्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहेत. अशा सर्वांपुढेच नव्या पाहणीतून आव्हानांचे अडथळे समोर उभे राहिल्याचे दिसते. आता या वेबसाईटस्नी खरे म्हणजे या आव्हानांचा सामना करून त्यावर तोडगा काढण्याला प्राधान्य द्यायला हवे, ज्याचा फायदा भारतीयांना, ग्राहकांना आणि अर्थव्यवस्थेलाच होणार आहे.
 
भारतात पहिल्यांदा संगणक आला तेव्हा रोजगार गमावण्याची भीती व्यक्त केली गेली. मात्र, झाले नेमके त्याउलट. संगणक क्रांती रोजगाराची नवी क्षेत्रे घेऊन आली. शिक्षणसंस्था, सेवा कंपन्या अशी नवनवी दालने उघडत गेली. भारतात आता उत्पादन क्षेत्राप्रमाणेच सेवा हे नवे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे झाले आहे. महाराष्ट्रातील पुणे तर देशातील बंगळुरू, हैदराबाद, नोएडा ही शहरे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची केंद्रे म्हणून विकसित झाल्याचे आपण पाहतच आहोत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सबद्दलही सुरुवातीला अशीच भीती व्यक्त करण्यात आली. या वेबसाईट्समुळे रोजगार गमावण्याची, लहान दुकानदारांवर संकट कोसळण्याचे दावे केले गेले. पण तसे खरेच झाले का? तर नाही. उलट ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमुळे अनेकानेक लहान-लहान नवे रोजगार निर्माण झाले. अगदी एखादी वस्तू पॅक करून ग्राहकाच्या घरी पोहोचविण्यापर्यंतची साखळी तपासून पाहिली असता त्याची खात्री पटते. पॅकिंगसाठी वापरले गेलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स तयार करणारा, वेष्टने तयार करणारा, वस्तू घरपोेच पोहोचविणारा डिलीव्हरी बॉय, कुरिअर कंपन्या अशा प्रत्येकाला या क्षेत्रामुळे रोजगार मिळाला वा आधीचा रोजगार वाढला. एखाद्याला अन्य कुठलेही कौशल्य अवगत नसले तरी पत्ता वाचता येणे आणि दुचाकी चालवता येणे एवढ्या गोष्टीवरून रोजगार मिळू लागला. आता तर झोमॅटो, स्विगी, फुडपांडा आदी हॉटेलमधील खाद्यपदार्थ घरपोच करणार्‍या वेबसाईट्समुळेही कित्येकांना रोजगार उपलब्ध झाला. म्हणजेच आधी जी रोजगार गमावण्याची भीती व्यक्त केली गेली, ती खोटीच ठरली. आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये झालेल्या घटीचा या सर्वच गोष्टींवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यावर निश्‍चितच योग्य ते ठोस उपाय योजले पाहिजेत.
 
ऑनलाईन शॉपिंगमध्ये अडसर ठरणारा मुद्दा म्हणजे इंग्रजी भाषा. देशात कितीतरी लोक असे आहेत, ज्यांची ऑनलाईन शॉपिंग करण्याची इच्छा आणि क्षमता दोन्हीही आहे, पण केवळ भाषेच्या अचडणीमुळे त्यांना या वेबसाईटवरून शॉपिंग करता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सनी इंग्रजीचा आग्रह सोडला तर यात नक्कीच वाढ होऊ शकते. भारताची बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात वसते. तिथे इंटरनेट आणि कुरिअर सेवा या दोन्हींची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसतेच. अशा ठिकाणांपर्यंत आपली सेवा कशाप्रकारे देता येईल, त्याचाही या वेबसाईट्सनी विचार केला पाहिजे. केवळ शहरी भागाकडे लक्ष न देता ग्रामीण भागात या वेबसाईट्सनी आपले नेटवर्क उभारल्यास त्यांचे चिंतेचे दिवस दूर होतील. शिवाय त्या त्या भागात रोजगारही उपलब्ध होईल, हा आणखी एक फायदा.
 
ई-कॉमर्सचा अर्थव्यवस्थेला होणारा फायदा म्हणजे केलेल्या व्यवहारांच्या खुणा मागे शिल्लक राहतात, त्याची नोंदणी होते. मुख्य म्हणजे अनावश्यक रोख रक्कम निर्माण होत नाही. त्यामुळे काळ्या पैशाच्या निर्मितीलाही चाप बसतो. आज आपण एखाद्या किराणा वा स्टेशनरी दुकानात गेल्यास प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी आपण घेतलेल्या वस्तूची पावती मिळेलच याची खात्री नसते. ई-कॉमर्स वेबसाईट्समुळे कोणत्याही छोट्या अथवा मोठ्या वस्तूची खरेदी पावती तर मिळतेच, पण एखाद्याकडे असलेल्या काळ्या पैशातून त्याने खरेदी केली तरी तो पैसा मुख्य प्रवाहात-पांढर्‍या पैशात रुपांतरित होऊनच येतो. ई-कॉमर्स वेबसाईट्समुळे ग्राहकांना होणारा फायदा म्हणजे कोणतीही वस्तू घरपोच मिळते. मोठ्या प्रमाणावर सवलतही मिळते. ‘ट्रीवागो’ वा ‘मेक माय ट्रिप’ सारख्या ऑनलाईन पर्यटन, हॉस्पिटॅलिटी सेवा देणार्‍या वेबसाईटमुळे तर बाहेर फिरायला गेल्यावरही मोठ्या प्रमाणात बचत होते. म्हणजेच ग्राहकांच्या दृष्टीने ऑनलाईन शॉपिंग फायदेशीर व किफायतशीर ठरते. त्यामुळे या सेवा, या वेबसाईट्स नक्कीच वाढणे, जगणे गरजेचे वाटते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बाजारपेठेतील दुकानांपासून गल्लीबोळातील दुकाने आणि आता ऑनलाईन खरेदीची दुकाने हे एक स्थित्यंतर आहे. याच्याशी सर्वांचा कसल्या ना कसल्या प्रकारे संबंध येतोच आहे. अशावेळी डार्विनचे एक सुंदर वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो की, “जे सबळ आहेत, ते जिवंत राहतील असे नाही, जे सर्वाधिक बुद्धिमान आहेत, ते जिवंत राहतील असेही नाही, तर जे बदलांना प्रतिसाद देत त्यांचा स्वीकार करतील तेच जिवंत राहतील.” याचा अर्थ काय, तर ग्राहकांनी आणि ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स दोघांनीही नवे बदल स्वीकारणे गरजेचे असून त्यामुळे हा पन्नास टक्क्यांचा मामला निस्तरू शकतो

Friday, 27 July 2018

‘इस्रो’चा बहिर्ग्रहशोध आणि ‘चांद्रयान-२’ची कामगिरी महा एमटीबी

भारतीय अंतराळ संशोधन मंडळाने (ISRO) सौरमालिकेच्या बाहेरील ग्रह शोधणे व ‘चांद्रयान-2’च्या मोहिमेची तयारी करणे इत्यादी अभिमानास्पद कामे 2018 मध्ये केली. त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.
 
बहिर्ग्रहाचा शोध
 
‘इस्रो’च्या अहमदाबाद शाखेच्या संशोधन विभागातील (P-R-S-1) शास्त्रज्ञांनी जगाला दाखवून दिले की, भारतीय शास्त्रज्ञांकडूनही नवीन ग्रहाचा शोध लागू शकतो. हा बहिर्ग्रह उपशनी वा मोठ्या नेपच्यून ग्रहासारखा आहे. या बहिर्ग्रहाचे वजन पृथ्वीच्या वजनाच्या २७ पट आहे व ग्रहाची त्रिज्या पृथ्वीच्या सहापट आहे. हा बहिर्ग्रह सूर्यासारख्या दिसणाऱ्या ताऱ्याभोवती फिरत असतो. त्याग्रहाचे नाव ‘एपीक २११९४५२०१ ब’ असे ठेवले आहे.
 
हा शोध माऊंट अबू येथील पीआरएलच्या गुरूशिखर वेधशाळेमधील स्पेक्ट्रोग्राफ असलेल्या १.२ मी व्यास-दुर्बिणीच्या साहाय्याने लावला गेला. सध्याच्या मर्यादित साधनांनी न शोधलेल्या ग्रहांचे वजन पृथ्वीच्या १० ते ७० पट असेल व त्रिज्या पृथ्वीच्या ४ ते ८ पट मर्यादेत असेल, तरच अशा ग्रहांचा शोध घेण्याकरिता संपूर्ण जगात या माऊंट अबू वेधशाळेसकट फक्त २३ ठिकाणीच सोय आहे. यापेक्षा कमी-जास्त वजनांच्या वा वेगळ्या त्रिज्यांच्या ग्रहांचा शोध घ्यावयाचा असेल, तर शोधसाधने मोठी घ्यावयास हवीत.
 
जून महिन्यात ‘एपीक’ नावाच्या ग्रहाचा शोध लावून भारत आता सूर्यमालेच्या बाहेरचे ग्रह शोधणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन पोहोचला आहे. भारताने त्या बहिर्ग्रहाच्या वजनाची माहिती मिळविली. सध्या अशी अचूक माहिती मिळवणारे देश फक्त थोडेच आहेत. हा ‘एपीक बहिर्ग्रह’ सूर्यासारख्या दिसणाऱ्या, परंतु ६०० प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या ताऱ्याभोवती फिरत असतो. खगोल-अंतराळात असे असंख्य सूर्यतारे व त्याभोवती फिरणारे ग्रह आहेत. अशा बहिर्ग्रहांचा अभ्यास शास्त्रज्ञांकडून २०१२ पासून होत आहे. या ‘एपीक’ ग्रहाचा अभ्यास भारतीय शास्त्रज्ञांकडून गेले दीड वर्षे सुरू आहे. जानेवारी २०१८ मध्ये समजले की, हा एपीक ग्रह, एपीक ताऱ्या भोवती फिरत आहे. परंतु, त्यासंबंधी इतर शास्त्रीय तपशील नंतर मिळाले. या ग्रहावर ७० टक्के लोखंड, बर्फ व सिलिकेट द्रव्ये आहेत व तो ३० टक्के गॅसने भरलेला आहे. हा ग्रह नेपच्यून ग्रहाला वा छोट्या शनीला मिळताजुळता आहे. या ग्रहाचे एक वर्ष म्हणजे पृथ्वीचे साडे एकोणीस दिवस आहेत. या ग्रहावरच्या पृष्ठभागाचे तापमान ६०० अंश सेल्शिअस असल्याने तेथे मानवी वस्ती राहूच शकत नाही. हा ग्रह सूर्य-पृथ्वीच्या अंतरापेक्षा या ताऱ्याच्या सातपट जवळ आहे.
 
शोध लावत असताना अशा ग्रहांच्या प्रतिमा थेट मिळणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. ‘नासा’ने व इतरांनी अशा ग्रहांचा शोध घेण्याकरिता नवीन स्पेक्ट्रोग्राफसह तंत्रज्ञानाचा वापर केला. जगात असे स्पेक्ट्रोग्राफ पाच-सहा ठिकाणीच आहेत. युरोपीय देशात, अमेरिकेमध्ये व आता भारताकडेही असे स्पेक्ट्रोग्राफ आहेत. बहिर्ग्रहाचा शोध घेण्याकरिता तो ग्रह ताऱ्याभोवती फिरत असल्याने अस्थिर बनत असतो. तारा अस्थिर आहे हे समजल्यावर त्या ताऱ्याच्या ग्रहाची कक्षा (orbit), वजन इत्यादी माहिती मिळविण्याकरिता उत्सुकता वाढत असते. भारताने पृथ्वीच्या जवळचे बहिर्ग्रह शोधण्याचा चंग बांधला आहे व लवकरच २०२० सालापर्यंत २.५ मी व्यासाची दुर्बिण व मोठा स्पेक्ट्रोग्राफ माऊंट अबूला बसविले जातील व ग्रहांचे शोधकार्य व संशोधन विभाग 2 मध्ये (P-R-S-2) मोठ्या प्रमाणात सुरू केले जाईल. ‘इस्रो’ या बहिर्ग्रहाचा जास्त अभ्यास करण्याकरिता अंतराळयान पण सोडण्याचा विचार करत आहे.
 
‘चांद्रयान-2’च्या मोहिमेची तयारी
 
‘चांद्रयान-1’ चंद्रकक्षामध्ये गेले होते, परंतु काही थोड्या महिन्यांत तेथील पृष्ठभागावरील चुंबकीय जलामुळे दुर्दैवाने २००८ मध्ये ते कोसळले. १५० दशलक्ष डॉलर मूल्यांचे ‘चांद्रयान-२’ ही शोधकार्य मोहीम रशियाच्या साहाय्याने तीन वर्षांपूर्वी हातात घेतली होती. परंतु, रशियाने ठरविलेले ‘लँडर’ दिले नाही म्हणून या मोहिमेला विलंब झाला व भारताने ही मोहीम स्वत: करण्याचे ठरविले आहे. हे ‘चांद्रयान-२’ श्रीहरीकोटा येथून सोडले जाईल. म्हणूनच ‘इस्रो’कडून ‘चांद्रयान-२’च्या मोहिमेची तयारी जोरदार होत आहे. सर्व चाचण्या अंतीम टप्प्यात आल्या आहेत. प्रथमच अशा नाजूक ठिकाणी व अचूक माहिती मिळण्याच्या प्रयत्नांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा जवळून वेध घेण्यासाठी मार्च २०१८ मध्ये ‘चांद्रिय रोव्हर’ची तयारी केली. कारण, या मोहिमेत मानवविरहीत ३ इंजिने, कक्षात जाणारी, फिरणारी बग्गी चालवण्याची साधने (orbiter, rover and lander) वापरावयाची ठरली आहे.
 
दक्षिण गोलार्धात ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर चांद्रयान उतरावयाचे व ऑक्टोबरचा मुहूर्त असे निश्चित केले आहे. ‘जीएसएलव्ही मार्क-२’ या प्रक्षेपकातून ‘चांद्रयान-२’ चंद्रावर उतरेल. त्याबरोबर एक लँडर व रोव्हर प्रथमच तेथे दोन खडकाळ प्रदेशाच्या मध्ये सपाट प्रदेशात उतरवले जातील. या मोहिमेत चंद्रभूमीचा अभ्यास केला जाणार आहे. ‘इस्रो’च्या उपग्रह केंद्रामध्ये ‘चांद्रयान-२’ मोहिमेची रंगीत तालीम सुरू आहे. चंद्रावर जसे वातावरण असते तसे भासवणारे वातावरण तेथे निर्माण केले आहे. या मोहिमेत विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रयोग केले जातील. रोव्हर-बग्गीचा वापर चंद्रपृष्ठभागावर केला जाईल. रासायनिक चाचण्या घेतल्या जातील. सर्व मिळालेली नवीन माहिती पृथ्वीवर पाठविण्याची व्यवस्था कक्षांमधून केली जाईल. ‘इस्रो’ला या मोहिमेत यश मिळाले, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील भागाचा चांद्रशोध प्रथमच लावला जाईल. ही माहिती शुक्र ग्रह व मंगळ ग्रहाच्या शोधकार्याकरिता नक्की उपयोगी ठरेल. लँडर व रोव्हरच्या साहाय्याने चंद्रपृष्ठभागावरील पातळ प्लास्मा व हेलियम-३ सारख्या आयसोटोपची माहिती मिळेल. ही रासायनिक माहिती फ्युजन एनर्जी रिअॅाक्टर्सकरिता फार उपयोगी ठरेल. ‘चांद्रयान-१’च्या शोधकार्यात चंद्रावर पाण्याचे रेणू मिळाल्याची माहिती मिळाली होती.
 
लँडर इंजिनाच्या साहाय्याने जेवढी विज्ञानमाहिती मिळविता येईल तेवढी घेतली जाईल. लँडरबरोबर दोन स्पेक्ट्रोमिटर असतील. लँडर बॅगेचे वजन त्यात अनेक उपकरणे असल्याने २५ किलोग्रॅमपर्यंत होईल. प्रथम चांद्रदिवसाच्यावेळी ही सुरुवात होईल. कारण १ चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीचे १४ दिवस असतात. चांद्रशोध लावताना मोठी चांद्र-रात्र आली, तर काम करणे कठीण जाईल. या लँगमूर तंत्राने चंद्रावरील प्लास्माची माहिती मिळेल. पातळ पृष्ठभागावर धुलिकण तरंगलेले असतात. लँडरबरोबर सिस्मोमिटर यंत्र पण आहे ते चंद्रावरील घडलेली भूकंपने (moon-quakes) मोजतील. जर भूकंपने प्रमाणापेक्षा जास्ती आढळली, तर पृष्ठभागाच्या प्रकाराचे निदान करण्यात मदत मिळेल. चंद्राच्या अंतर्भागात घन वा पातळ द्रव्ये आहेत त्याचा शोधदेखील घेता येईल. जुन्या माहितीप्रमाणे चंद्र-पृष्ठभाग म्हणजे मॅग्मा समुद्रापासून मोठे खडक बनले आहेत, असे समजत आहोत ती माहिती नवीन चांद्रशोधात ताडून बघता येईल.
 
जगातील इतर देशांकडून चंद्रावर अनेक मोहिमा राबविल्या गेल्या आहेत. अमेरिकेने मानवी मोहिमा यशस्वी करून दाखविल्या आहेत. ‘चांद्रयान-२’ मोहीम ही भारताच्या कर्तृत्वाची एक झलक व अभिमानाची गोष्ट ठरेल. बरेच देश भारताच्या चांद्रमोहिमेकडे डोळे लावून बसले असतील, कारण ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या भागामध्ये होणार आहे. या भागावर चांद्रयानातील उपकरणे उतरवली तरी तो एक भारताच्या मोठ्या यशस्वितेचा भाग ठरेल. ही पूर्ण ‘चांद्रयान-२’ मोहीम भविष्यात यशस्वी ठरली, तर इतर देशांच्या चांद्रशोध मोहिमेला पण उपयुक्त ठरेल.
 
‘इस्रो’च्या इतर मोहिमा
 
‘जीसॅट-११’ उपग्रह मोहीम दळणवळण संदेश कामासंदर्भात व ब्रॉडकास्टींगकरिता उपयोगी ठरणारी असेल. ती २०१८ सालच्या मध्यात फ्रेंच गियानाच्या मदतीने नियोजित केली आहे. ‘जीसॅट’ची सर्व साधने भारतात बनतात. त्यांच्या कक्षांची वेळ पृथ्वीच्या फिरण्याच्या वेळेस जुळणारी असते. ‘जीसॅट-२९’ ही उपग्रहसेवा पण दळणवळण सेवेकरिता आहे व ग्रामीण भागातील अंकीय तंत्रज्ञानाच्या सुविधांकरिता उपयोगी ठरणार आहे. ‘जीसॅट-७ अ’ ही उपग्रहसेवा एअर फोर्सच्या मदतीकरिता होणार आहे व २०१८ च्या दुसऱ्या भागात कार्यरत होणार आहे. ‘जीसॅट ७’ ही उपग्रहसेवा नाविक दलाच्या मदतीला सप्टेंबर २०१३ पासून सेवेत आहे.
 
‘रिसॅट-१ अ’ किंवा ‘रेडार’ प्रतिमात्मक उपग्रह हा आता तिसरा उपग्रह ठरेल. याआधी ‘इस्रो’ने ‘रिसॅट १’ व ‘रिसॅट २’ उपग्रह सोडले होते. ‘रिसॅट १’ ची सेवा त्यासारखीच असणार आहे. ‘रिसॅट २’ हा उपग्रह दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा शोध घेण्याकरिता इस्रायलच्या मदतीने हा उपग्रह सोडला होता. या उपग्रहांच्या साहाय्याने शेतीकरिता वा जंगलखात्याकरिता नैसर्गिक भूरचनांचा तपास करण्याकरिता होतो. जानेवारी ते एप्रिल २०१८ काळातील उपग्रह - यात तीन मोहिमा होत्या. ‘कार्टोसॅट-२,’ ‘जीसॅट-६ अ’ आणि दळणवळणाकरिता ‘आयआरएनएसएस- ११’ या आहेत. ‘कार्टोसॅट-२’ उपग्रह ‘इस्रो’चा १०० वा उपग्रह आहे. पीएसएलव्ही परत अंतराळात पाठविला गेला. गेल्या ऑगस्टमध्ये तो प्रयोग अयशस्वी झाला होता. ७१० किलोग्रॅम वजनाचा ‘कार्टोसॅट-२’ या बरोबर १० किलोग्रॅम नॅनो उपग्रह व १०० किलोग्रॅमचा मायक्रोसॅट आणि २८ परदेशातील उपग्रह सोडले.
 
अशातऱ्हेने ‘इस्रो’ भारताकरिता फार महत्त्वाचे काम पार पाडत आहे आणि त्या संस्थेकडून अंतराळामधील संशोधन होत आहे, ही सर्व ‘इस्रो’साठी व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे

Friday, 20 July 2018

आता वेध ‘फाईव्ह जी’ चे महा एमटीबी

-मनोज मनोहर-TARUN BHARAT
तंत्रज्ञान वेगानं बदलत असतं. तसंच लोकही बदलत असतात. मोबाईल, इंटरनेट या सेवा इतक्या कमी काळात लोकांनी स्वीकारल्या की आता लोकांकडूनच अधिक वेगवान सेवेची अपेक्षा होऊ लागली आहे. भारताच्या इंटरनेट सेवेचा वेग आणि दर जगात सर्वाधिक असल्यानं आपण कमी पडत होतो. आता मात्र भारतात फाईव्ह जी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटचं विश्वच बदलून जाईल.
कोणतंही तंत्रज्ञान बाजारात येतं तेव्हा स्वीकारलं जाण्याचं प्रमाण कमी असतं. एकदा हे तंत्रज्ञान अंगवळणी पडलं की पुढचे बदल लवकर स्वीकारले जातात. इंटरनेटचंही तसंच आहे. अवघ्या तीन दशकांमध्ये इंटरनेटचा फर्स्ट जनरेशन ते आता फिफ्थ जनरेशन हा प्रवास थक्क करणारा आहे. केंद्र सरकारनं पुढच्या वर्षी देशात फाईव्ह जी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी प्रारंभिक तरतूद पाचशे कोटी रुपयांची आहे. तज्ज्ञ समिती त्यावर विचार करत आहे. पहिल्यापेक्षा दुसरं तंत्रज्ञान अधिक वेगवान आणि सुसह्य असतं. त्यापेक्षा पुढच्या पिढीतलं तंत्रज्ञान आणखी गतिमान असतं. तंत्रज्ञानाची प्रत्येक पिढी अधिक गतिमान आणि सुसह्य होत जाते. माणूस आणि इंटरनेट यांचं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे. संगणकांवर लॅनच्या माध्यमातून चालणार्‍या इंटरनेटनं केव्हाच कात टाकली आणि वायरलेस इंटरनेटची ओळख जगाला झाली. आता वाय-फायचा जमाना आहे. वायफायमुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊ लागलं आणि स्पर्धा सुरू झाली. इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत फर्स्ट जनरेशनते फोर्थ जनरेशनपर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. इंटरनेटचं नवं तंत्रज्ञान वापरणारी पिढी तंत्रस्नेही आहे. या पिढीच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन सेवेत बदल केले जात आहेत. वेग वाढवण्यातही सेवा पुरवठादारांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. आता तर दहा गीगाबाईट्‌स प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारं इंटरनेट भारतात दाखल व्हायला फार काळ राहिलेला नाही. आणखी वर्षा-दीड वर्षात भारतात 5-जी सेवा सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण देशानं हे तंत्रज्ञान अंगीकारलेलं असेल.


मोबाईल आणि इंटरनेट ही आता केवळ सुशिक्षितांची मक्तेदारी राहिलेली नाही. खेड्यापाड्यातील महिलाही आता मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असतात. व्हॉट्‌स अॅप, फेसबुकसारख्या सेवांना इंटरनेटची गरज लागते. अगदी दोन-तीन वर्षांची मुलंही इंटरनेटवर यु ट्युबवर व्हिडीओ पाहत असतात. ते चांगलं की वाईट, हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. परंतु, इंटरनेट आणि मोबाईल हे जीवनाचे अविभाज्य भाग कसे झाले आहेत, हे समजण्यासाठी ही दोन उदाहरणं पुरेशी आहेत. बदलत राहणारं तंत्रज्ञानसुद्धा आता आपल्या जगण्याचाच एक भाग झालं आहे. वन जी-ची सेवा सुरू झाली तेव्हापासून, म्हणजे 1980 च्या दशकापासून त्याच्या वायरलेस सेवेची ओळख देशाला झाली. त्यानंतर या सेवेवर बरंच संशोधन झालं. 10 वर्षांनी ही सेवा सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. या सेवेद्वारे केवळ व्हॉईस कॉल केला जाऊ शकत होता.
थ्रीजीच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वेग होता 2 मेगाबाईट्‌स प्रती सेकंद. त्यानंतर आलं फोर जी तंत्रज्ञान. या जनरेशनच्या मोबाईलवर इंटरनेटचा वेग हवा 100 मेगाबाईट्‌स किंवा एक गीगाबाईट प्रती सेकंद. मात्र, तसं घडत नाहीये.


या पार्श्वभूमीवर देशात येत्या काही दिवसांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू होत आहे. सध्या भारतातला इंटरनेटचा वेग एक गीगाबाईट प्रतिसेकंद आहे. तो फाईव्ह जी तंत्रज्ञान आल्यानंतर 10 गीगाबाईट्‌स प्रती सेकंद होईल. केंद्र सरकारनं फाईव्ह जी साठी समिती नेमल्यानंतर लगेच मोबाईल कंपन्यांमध्येही फाईव्ह जीची सेवा देण्याबाबत स्पर्धा सुरू झाली आहे. आता भारतातील 40 कोटींहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करतात. ते तर लगेच मोबाईल बदलतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला अन्य लोकही तयार होतात. त्यातून किमान दहा कोटी लोक नवे मोबाईल घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात हजारो कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भारतातल्या जवळपास सर्व मोबाईल ऑपरेटर कंपन्या 5 जी सेवा सुरू करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईलवर आवडता चित्रपट डाऊनलोड करण्याचं प्रमाण भारतातही वाढलं आहे. फोर जी तंत्रज्ञान असलेल्या मोबाईलमध्ये एक जीबी फाईल साईजचा सिनेमा डाऊलोड होण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागातही अर्धा तास लागतो.


फाईव्ह जी तंत्रज्ञान आलं तर हा सिनेमा फोटो क्लिक करण्याइतक्या कमी वेळेत डाउनलोड होऊ शकेल! भारतात ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं विस्तारत आहे. त्यातही केंद्र सरकार आणि मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी जिथं जास्त महसूल तिथं जास्त लक्ष, असं धोरण ठेवलं आहे. त्याचा परिणाम अजूनही ग्रामीण भाग वेगवान मोबाईल सेवा तसंच ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानापासून वंचित आहे. त्या तुलनेत शहरांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. बहुतांश शहरी आणि निमशहरी भागापर्यंत फोर जी सेवा पोचली आहे. कदाचित फाईव्ह जी सेवा देशाच्या सर्व भागात फोर जीच्या अगोदर पोहोचलेली असेल.
केंद्र सरकारनं अजून फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव केलेला नाही. थ्रीजी आणि फोर जीच्या लिलावावरून झालेला वाद आणि त्यानंतर त्याचा त्या सरकारला बसलेला फटका लक्षात घेऊन हे सरकार या लिलावातून किती पैसे मिळतील, याचा अभ्यास करत आहे. मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धेमुळे आता कंपन्यांची आर्थिक स्थिती पूर्वीइतकी सुदृढ राहिलेली नाही. उलट, कंपन्यांचे ताळेबंद तोटा दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर फाईव्ह जी सेवेच्या स्पेक्ट्रम लिलावाला मोबाईल ऑपरेटर कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता आहे. फोर जी सेवा अजून देशात सगळीकडे पोचलेली नसताना फाईव्ह जी सेवा आली तर जनता तिचं कसं स्वागत करेल, याची चाचपणी सरकार करत आहे. असं असलं, तरी मोबाईल ऑपरेटर्स आणि मोबाईल कंपन्या फाईव्ह जीचं तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत उत्साही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सरकार फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची शक्यता आहे.


देशातल्या इंटरनेट-यूजर्सची संख्या 2021 मध्ये दुपटीनं वाढून 82.9 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ देशातली जवळपास 59 टक्के जनता इंटरनेटचा वापर करत आहे. याव्यतिरिक्त डिजिटल क्रांतीचा भाग बनलेल्या उपकरणांची संख्या 2021 मध्ये दोन अब्जांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या वापरात असलेल्या उपकरणांची संख्या 1.4 अब्ज आहे. शिवाय आयपी ट्रॅफिकचा वेगही येत्या पाच वर्षांमध्ये सरासरी 30 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे फाईव्ह जी सेवा असलेल्या मोबाईल हॅण्डसेटची संख्या वाढवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवान ग्राहककेंद्रित सेवा पुरवणं हे एक मोठं आव्हान असेल. ज्यांच्याद्वारे सिग्नल प्रसारित केले जातात, अशा ध्वनिलहरींच्या उपलब्धतेवर फाईव्ह जी सेवा अवलंबून आहे. त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.


फाईव्ह जी तंत्रज्ञानानुसार सरकारनं शहरी क्षेत्रांमध्ये 10,000 मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस) आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये 1000 एमबीपीएसच्या गतीने इंटरनेट स्पीड उपलब्ध करण्याची योजना बनवली आहे. बीएसएनएल आणि नोकियानंही सध्याच्या नेटवर्कला फाईव्ह जी मध्ये अपग्रेड करण्याबाबत करार केल्याचं वृत्त आहे. सध्या याबाबतची तयारी सुरू असून ही सेवा व्यावसायिकदृष्ट्या लॉंच करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. ज्या दिवशी फाईव्ह जी सेवा जागतिक स्तरावर सुरू होईल, त्याच दिवशी ती बीएसएनएलकडून भारतात सुरू केली जाईल, असं बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अनिल जैन यांनी सांगितलं. बीएसएनएलनं फाईव्ह जी सेवांच्या चाचणीसाठी जपानच्या एनटीटी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची भारतीय भागीदार व्हर्गो कॉर्पोरेशनबरोबर सामंजस्याचा करार केला आहे. नोकिया भारतात 5 जी नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार्‍या 5 जी सेवेसाठी बंगळुरूत विकास केंद्र उभारणार आहे. 2020 पर्यंत नोकियाचं 5-जी नेटवर्क कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सध्या भारती एअरटेल आणि बीएसएनएलच्या मदतीनं भारतात प्रायोगिक तत्त्वावर 5-जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे

Monday, 2 July 2018

होय.... गुगल पैसे पण देते!महा एमटीबी


गुगलची सुरवात, त्याचा इतिहास, त्याच्या बद्दलची माहिती आपण या पूर्वीच्या लेखामध्ये वाचली होती. आता या लेखामध्ये आपण एकूण गुगलचे उत्पन्न, त्यासाठी सर्वसामान्य माणसाचा हातभार कसा लागतो, त्याचबरोबर सर्वसामान्य माणूससुद्धा गुगलच्या माध्यमातून कशाप्रकारे उत्पन्न मिळवू शकतो, हे पाहणार आहोत.
 
गुगलच्या एकूण उत्पन्नापैकी मुख्य उत्पन्न हे जाहिरातींद्वारे मिळणारे आहे आणि या जाहिराती गुगलची सहायक कंपनी ‘ऍडसेन्स’ हिच्यामार्फत इंटरनेटवरती प्रसिद्ध केल्या जातात. यामध्ये दोन प्रकारच्या जाहिरातींचा समावेश असतो. एक असते कंटेटसाठी आणि दुसरी असते ती सर्चसाठी. तर या दोन्ही प्रकारातून गुगलवरती जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. एखाद्या वेबसाईटवर ऑनलाईन लेखाबरोबर ज्या गुगल जाहिराती असतात, त्या कंटेटच्या ‘ऍडसेन्स’चे साधन असेत. ज्याला इंटरनेट युझर्स ’ads by google‘ या नावाने ओळखतात. वेगवेगळ्या वेबसाईट्सवर गुगल सर्चचा ऑप्शन दिला जातो आणि त्याला सर्च एड्सन्सच्या साहय्याने नियंत्रित केले जाते. यासंबंधी संपूर्ण पारदर्शकता गुगलकडून ठेवली जाते. जे काही जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे, त्याची इत्यंभूत माहिती ही गुगलकडून दिली जाते आणि त्याच्यातून ६८ टक्के भाग हा ज्याच्या मार्फत जाहिरात मिळाली आहे, त्याला दिला जातो. सर्चच्या माध्यमातून ज्या जाहिराती मिळतात, त्यातही त्या वेबसाईटना ५१ टक्के इतका उत्पन्नातील वाटा दिला जातो. यामध्ये अगदी लहान कंपन्यांपासून घेऊन ते अगदी मोठ्या कंपन्यापर्यंत सर्व कंपन्या गुगल बरोबर काम करतात. या ‘ऍडसेन्स’ची सुरुवात २००३ मध्ये झाली होती. त्यामध्ये काहीच मोठे बदल केले गेलेले नाहीत. २००५ मध्ये सर्चच्या ऍडसेन्समध्ये बदल केला गेला होता. त्यामध्ये एकूण वेबसाईटची भागीदारी वाढवण्यात आली होती. कदाचित भागीदारीत बदल होऊ शकतो, मात्र मुख्य उत्पन्नाचे साधन तेच आहे. गुगल मोबाईल, गुगल गेम्स किंवा बातम्यांसाठीसुद्धा जाहिराती दिल्या जातात. परंतु, त्यातून मिळणारे उत्पन्न हे तुलनेने कमी असते. आता हे ‘ऍडसेन्स’ कसे काम करते किंवा सर्वसामान्य माणूस कशाप्रकारे काम करू शकतो हे पाहू.
 
ब्लॉगिंगद्वारे उत्पन्न
 
बरेच जण ब्लॉगिंगचे काम करत असतात किंवा काहीजण ऑनलाईन काम करतात. हे ऑनलाईन किंवा ब्लॉगिंगचे काम करतानाच जर त्यांना उत्पन्न मिळाले तर ते किती फायदेशीर असेल, असा विचार केला जातो. त्यामुळे जे कोणी ऑनलाईन असतात, ते ऑनलाईन राहूनच कसे पैसे कमाविता येतील, याचे मार्ग शोधतात. अर्थात, त्यासाठी त्याला मेहनत करणे आवश्यक आहेच. म्हणजे फक्त इंटरनेट घेतले आणि फक्त ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट सुरु केली म्हणजे आपले उत्पन्न गुगलच्या जाहिरातींमधून सुरु होणार असे नाही, तर थोडसे गंभीरतेने ही गोष्ट करणे आवश्यक आहे. याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच उत्पन्न मिळू शकते.
 
‘गुगल ऍडसेन्स’ही गुगलचीच एक कंपनी आहे, जी गुगलच्या जाहिरातीचा पूर्ण व्यवहार सांभाळते. एका दृष्टिकोनातून ही जाहिरात कंपनी आहे असे आपण म्हणू शकतो. गुगलचेच हे एक उत्पादन आहे. ‘ऍडसेन्स’द्वारे काय केले जाते, तर जे कोणी प्रकाशक आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती किंवा ब्लॉगवरती टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडिओ स्वरुपात जाहिराती दाखवल्या जातात. बरेचसे ब्लॉगर्स यावरतीच उत्पन्नासाठीही अवलंबून असतात. तुमचा ब्लॉग समजा, ऍडसेन्सने मान्यताप्राप्त असेल, तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती अशा वेगवेगळ्या जाहिराती टाकू शकता. त्याच्यातून दोन वेगवेगळ्या पद्धतीतून उत्पन्न मिळू शकते. त्या दोन पद्धती म्हणजे ‘इम्प्रेशन्स’ आणि ‘क्लिक.’ ‘इम्प्रेशन’मध्ये किती वेळा लोकांनी तुमच्या जाहिराती बघितल्या, त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातात. उदाहरणादाखल, एक हजार व्ह्यूज असतील तर त्याला साधारण एक अमेरिकन डॉलर दिले जातात. दुसरा प्रकार म्हणजे क्लिक. क्लिक म्हणजे तुमच्या जाहिरातींवरती किती वेळा क्लिक केले गेले, यावर उत्पन्नाचे प्रमाण अवलंबून असते. ज्याला ‘click per ad' असे म्हटले जाते. एकदा जर ऍडसेन्समध्ये account मान्य झाले की, मग तुम्ही त्याप्रमाणे आपल्या ज्या काही जाहिराती आहेत, त्या तिथे प्रदर्शित करू शकतात आणि लोकांकडून त्या जाहिराती मिळूसुद्धा शकतात. तुमच्या ब्लॉला जे भेट देणारे आहेत, ते त्या जाहिराती बघून क्लिक करतील, तेव्हा आपोआप तुम्हाला त्याचे उत्पन्न मिळत जाते.
 
तुमचा ब्लॉग लोकप्रिय असल्यास गुगलकडून तुम्हाला जाहिरातींसंदर्भात विचारणा केली जाते, नाही तर तुम्ही स्वतःसुद्धा जाहिराती विकू शकता. एकदा का १०० डॉलर जमा झाले की, ते धनादेश किंवा बँक खात्यामार्फत तुम्ही मिळवू शकता आणि याचाच एक पुढचा भाग म्हणजे युट्यूब. युट्यूबवर लोक व्हिडिओला प्राधान्य देतात. त्यामुळे युट्युबद्वारे देखील जाहिराती मिळवून ब्लॉगर्सना फायदा होऊ शकतो. समजा, तुमचा ब्लॉग कोणी वाचत नसेल, तर त्यावर जाहिराती टाकून काही उपयोग नाही आणि गुगलसुद्धा अशावेळी जाहिराती लावण्याची परवानगी देत नाही. कारण, हे जाहिरातीचं नेटवर्क असल्याने त्यादृष्टीनेच त्याचे कार्य चालते.
 
हे काम नेमके कसे चालते?
 
जे लोक आपल्या वेबसाईटवर जाहिराती टाकतात, त्यांना ‘पब्लिशर’ (प्रकाशक) म्हटले जाते. ज्यांच्या जाहिराती आपण दाखवतो, ते जाहिरातदार. समजा, तुम्ही एखाद्या कंपनीची जाहिरात दाखवलीत, तर ती कंपनी जाहिरातदार आहे आणि तुम्ही त्या कंपनीची जाहिरात आपल्या ब्लॉगवर दाखविण्यासाठी त्यांच्याशी बोलून ती जाहिरात दाखवू शकता. यासाठी गुगलदेखील मदत करते. गुगल ने AdWords नावाचे नवीन उत्पादन सुरु केले आहे. या आधारे मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा आपल्याला जाहिराती देऊ शकतात. त्याआधारे आपल्याला काही उत्पादनाच्या जाहिरातीसाठी नोंदणी करून नंतर जाहिराती मिळू शकतात. याखेरीज कीवर्ड हा देखील महत्त्वाचा घटक आहे. मोठमोठ्या कंपनीत कीवर्ड वापरले जाते. वेबसाईटवर एखाद्या उत्पादनाविषयी कीवर्ड असतो. तो सर्च केल्यावर त्यासंबंधी जाहिराती आपल्याला दिसतात. जो कोणी जाहिरात पाहणारा असेल, तो ती जाहिरात पाहायची की नाही, हे ठरवू शकतो. उदा. जर आपण एखाद्या स्मार्टफोन संबंधित ब्लॉग असेल तर त्यासंबंधी कीवर्ड टाकून जाहिरात बघू शकता किंवा फोन कनेक्ट असल्याने आपोआप त्या कीवर्ड संबंधित जाहिराती दिसतात. आजकाल ई-कॉमर्समुळे वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन या गोष्टींचा इतिहास आणि माहिती ब्राऊझरमध्ये सुरक्षित राहते आणि त्याविषयी बर्याचदा शिफारस देखील केली जाते. ऍडसेन्स लोकांना रुची असणाऱ्या सर्व जाहिराती दाखवितात. जर आपल्याला ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर त्यासंबंधी सर्व जाहिराती ते दाखविणार आणि मग आपोआप त्या खरेदी संबंधी उत्पन्न मिळणार.
 
गुगलद्वारे उत्पन्न मिळवण्याचे इतर मार्ग
 
गुगलच्या आधारे घरी बसलेल्या व्यक्ती पैसे कमवू शकतात, याचे आणखीन काही मार्ग आहेत. गुगलने 'गुगल ओपिनियन रिवार्ड' असे एक उत्पादन सुरु केले आहे. यात काही सर्वेक्षणासाठी आपल्याला काय वाटते, हे आपल्याला सांगावे लागते. या मोबदल्यात प्रत्येक सर्वेक्षणामागे दहा रुपये मिळतात. काहीवेळा गुगलकडून स्क्रीननुसार 'मीडिया पॅनल अॅप' आपल्या फोनमध्ये ठेवले जाते. त्याला साईन अप केल्यावर १०-१० रुपये मिळतात. गुगल आपला पाठलाग करून आपण काय काय बघतो, हे देखील बघत असतो. 'गुगल मॅप' यात आपण फोटो टाकू शकतो. त्यात गाईड पण असते. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात. त्यासाठी इतर लोकांना काही सांगण्यासाठी मार्केटचे फोटो किंवा रिव्ह्यू अपलोड करू शकतात किंवा काही नवीन जागा मॅपवर फोटो टाकून सार्वजनिक करू शकता आणि त्याचे देखील उत्पन्न मिळू शकते आणि घरी बसल्या गुगलद्वारे उत्पन्न मिळते. अशाप्रकारे घरी बसून ऑनलाईन राहून गुगलच्या आधारे विविध मार्गांनी उत्पन्न मिळवता येते.
 
- गजेंद्र देवडा

Sunday, 29 April 2018

द ऑल न्यू जीमेल-TARUN BHRAT


जीमेलही सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरली गुगलची ई-मेल सेवा. बदलती वेळ आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे गुगलने गेल्या काही काळात अनेक बदल केले आहेत. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल करून, ते अधिक सुलभ करण्यावर भर देत, आता जीमेलमध्येही काही नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिक युझर फ्रेंडली जीमेलअनुभवायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने युझर्सच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. गुगलमध्ये काय बदल झाले आहेत हे आपण पाहूयात.



सर्वप्रथमजीमेलअकाऊंटच्या सेटिंग्समध्ये जाऊन, ’ट्राय न्यू जीमेलया ऑप्शनवर क्लिक केल्यास, आपल्याला जीमेलचे नवे रूप पाहता येणार आहे. जीमेलमध्ये कोणत्याही ई-मेलवर कर्सर आणल्यास मार्क रेड, आर्काइव्ह, डिलिट आणि सून्झहे ऑप्शन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये सून्झहा नव्याने देण्यात आलेला पर्याय आहे. एखादा विशिष्ट मेल विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी पाहायचा असेल, तर ती वेळ आणि तारीख याद्वारे आपल्याला सेट करून ठेवता येऊ शकते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट वेळेलाच तो मेल आपल्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये दिसणार आहे. यापूर्वी केवळ पाठवण्यात येणार्‍या ई-मेलसाठी उपलब्ध होती. मात्र, यापूर्वी हा ऑप्शन केवळ मेल पाठवण्यासाठी देण्यात आला होता.



तर नव्या जीमेलमधील आणखी एक फीचर म्हणजे जीमेलच्या इनबॉक्समध्ये कीप, टास्क आणि गुगल कॅलेंडरसारखे काही ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या ऑप्शन्सचा वापर करून आलेल्या ई-मेल्सनुसार आपल्याला कामाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. एखादी विशिष्ट नोंद करण्यासाठी कीपचा तर आठवड्याभरातील किंवा दिवसभरातील करायच्या कामांची यादी टास्कया ऑप्शनच्या माध्यमातून करता येणार आहे.



नव्या अपडेटमध्ये हाय प्रोफाईल नोटिफिकेशनचे फीचर देण्यात आले आहे. याचाच वापर करून, नोटिफिकेशनचा फिल्टर सेट करता येणार आहे. या फीचरमुळे आपल्याला येणार्‍या महत्त्वाच्याच मेलचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याला सततचे येणारे नोटिफिकेशन्स ९७ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचा दावा गुगलने केला आहे, तर आणखी एक नवे फीचर म्हटले, तर यात डिफॉल्ट, कॉम्पॅक्ट आणि कम्फर्टेबल असे नवे तीन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. याचा वापर करून, आपल्याला आलेल्या मेलमध्ये कोणती अटॅचमेंट आहे किंवा नाही हे आपल्याला मेल न उघडताच पाहता येणार आहे, तर कम्फर्टेबलया ऑप्शनचा वापर केल्यास, पूर्वी वापरत असलेल्या जीमेलनुसारच अटॅचमेंट पाहता येणार आहेत. अनेकदा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते किंवा इंटरनेटचा स्पीड कमी असतो. त्यामुळे जीमेलवापरण्यात अडथळे येत असतात. अगदी ही बाब हेरत जीमेलचे नवे ऑफलाईन व्हर्जनदेखील उपलब्ध होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना, ऑफलाईन पद्धतीने जीमेलच्या सेवेचा वापर करता येणार आहे. यापूर्वीही या सेवेचा लाभ मिळत असला, तरी आता या सेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये मेल सिंक करण्यात येणार असून, इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर तो मेल अपलोड होणार आहे. आपण कामात व्यस्त असताना अनेकदा वेळेअभावी रिप्लाय देत नाही. यावरही गुगलने एक नवा पर्याय शोधून काढला आहे. ओके, थँक यू!अशा शब्दांचे पर्याय गुगलने दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक शब्द टाईप करत बसण्याची गरज नाही. कामात व्यस्त असतानाही गुगलने दिलेल्या पर्यायांचा वापर करून रिप्लाय देणे शक्य होणार आहे, तर आपल्या कम्प्युटर, लॅपटॉपवर जीमेलवापरताना आपल्याला नवनव्या थीम्सचा पर्याय देण्यात येणार आहे, तर आपल्या जीमेलच्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्येही काही बदल करण्यात आले आहे. याद्वारे आपल्या जीमेलमध्ये आपण सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्‌स हे आपल्याला एखाद्या व्हिजिटींग कार्डप्रमाणे दिसणार आहेत. काळाप्रमाणे बदल करण्याची गुगलची परंपराच राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही नवे फीचर्स अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे