Total Pageviews

Tuesday, 28 July 2020

कट्‌टरवादी कम्युनिस्ट, इस्लामपंथींचे उदारवादाचे ढोंग!
29-Jul-2020  
राष्ट्रिंचतन 
- उमेश उपाध्याय-tarun bharat


कम्युनिस्ट आणि इस्लामी जिहादी सध्या आपण उदारवादी असल्याचे खूप ढोंग करीत आहेत. रूप बदलण्यात तरबेज असलेले हे धूर्त धोकेबाजाचा अनुपम नमुना आहेत. बहुरूपी धूर्तांप्रमाणे हे कम्युनिस्ट व जिहादी कट्‌टरपंथी आजकाल सार्‍या जगात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्यकांचे अधिकार, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सहिष्णुतेची वकिली करताना दिसत आहेत. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर पाहिले, तर या दोन्ही विचारधारांहून अधिक असहिष्णू आणि विरोधकांप्रती निर्दयी दुसरे कुणीच नसेल. यासाठी कुठल्या पुराव्यांची गरज नाही. या दोघांचे मूळ ग्रंथ जरी वाचले तरी पुरेसे आहे. या दोन्ही विचारधारांच्या असहिष्णुतेच्या अनेक उदाहरणांनी इतिहासाची पानेच्या पाने भरून आहेत. परंतु, मी काही ताज्या घटना समोर ठेवू इच्छितो.
 
मागील आठवड्यात तुर्कीची राजधानी इस्तंबुलमध्ये राष्ट्राध्यक्ष इर्दोगन यांनी हागिया सोफिया संग्रहालयाची मशीद करून टाकली. हागिया सोफिया मुळात एक चर्च आहे आणि त्याची भव्य इमारत 537 साली रोमन सम्राट जस्टिनियन यांनी उभारली होती. 1453 मध्ये तुर्कीचे सुलतान मोहम्मद द्वितीय यांनी इस्तंबुलवर ताबा मिळविला आणि त्यांनी या इमारतीचे मशिदीत रूपांतर केले. नंतर उदारवादी तुर्कीचे निर्माता कमाल अतातुर्क यांनी या भवनाला एका संग्रहालयात रूपांतरित केले. त्यांनी हागिया सोफियाला सर्व मजहब आणि संस्कृतींसाठी खुले केले. तुर्कीचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इर्दोगन कट्‌टरपंथी विचारांचे आहेत. त्यांच्या या निर्णयावर िंकग्ज कॉलेज लंडनच्या प्राध्यापिका जूडिथ हेरिन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, इर्दोगन यांनी ‘प्रतीकात्मक रूपात सहिष्णुतेच्या वारशाचा अंत केला आहे.’ इस्तंबुल शहरात शतकांपासून ख्रिश्चन, मुसलमान आणि ज्यू एकत्र राहात आले आहेत. हेनिन म्हणतात की, हागिया सोफिया ही संयुक्त राष्ट्र संघाद्वारे घोषित वारसा इमारत आहे. ती संपूर्ण जगाची ठेव आहे. तिला केवळ मुसलमानांना सोपविणे, एकप्रकारे ‘सांस्कृतिक सफाई’प्रमाणे आहे.
 
चीनमध्ये माओनेदेखील ‘सांस्कृतिक सफाई’ केली होती आणि आजही िंसकियांग प्रांतात उइगर मुसलमानांच्या सफाईचे अभियान पद्धतशीरपणे सुरू आहे. उइगर मुसलमानांच्या अल्पसंख्यक अधिकारांचे कसे हनन होत आहे, हे सांगणारे अगणित अहवाल उपलब्ध आहेत. या महिलांना गर्भ धारण करू न देणे, ‘रोजा’च्या काळात उपवास करू न देणे तसेच विरोध करणार्‍यांना लाखोंच्या संख्येत सुधारगृहरूपी छळ-छावण्यांमध्ये ठेवणे, तिथे नित्याचेच झाले आहे. पाकिस्तानची राजधानी- इस्लामाबाद येथे िंहदूंसाठी मंदिर बनविण्याचा प्रयत्न या महिन्यात करण्यात आला, तर तिथे अनेक जणांनी मंदिराच्या िंभतींना तोडून टाकले. तोडणार्‍यांनी सांगितले की, पाकिस्तान एक इस्लामी देश आहे आणि इथे मंदिर बनविणे त्यांच्या मजहबच्या विरुद्ध आहे. एवढेच नाही, मागील आठवड्यात बलुचिस्तानात घर बांधताना तथागत बुद्धांची एक प्राचीन मूर्ती सापडली तर तिला लोकांनी फोडून टाकली. महत्त्वाचे म्हणजे, या घटनांवर भारतातील बुद्धिवंत सामान्यत: शांतच राहिले आहेत. याचप्रमाणे, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने हॉंगकॉंगमध्ये नागरी अधिकारांवर बोलणार्‍यांना चिरडून रातोरात कायदा कसा बदलला, हे सर्वांनी बघितले आहे.
 
जगातील कम्युनिस्टांचे सध्याचे आदर्श- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग सध्या विस्तारवादाच्या घोड्यावर स्वार आहेत. दुसर्‍या देशांची जमीन बळकावून तिला चीनच्या कब्ज्यात करणे, शक्तीचा अनाठायी वापर करून देशांना धमकाविणे, हा सध्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा नवा उद्योग झाला आहे. भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, जपान, तायवान, हॉंगकॉंग इत्यादी, शी जिनिंपग आणि कम्युनिस्ट पार्टीच्या या विस्तारवादी धोरणाचे एकापाठोपाठ एक, बळी ठरले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला आंतरराष्ट्रीय कायदे, मर्यादा आणि देशांमधल्या आपापसातील करारांची कुठलीच िंचता नाही. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीप्रमाणे इस्लामी जिहादीदेखील दुसर्‍यांचे हित व अधिकार मानायला तयार नसतात.
परंतु, आश्चर्य याचे वाटते की, अमेरिकेतील ‘ब्लॅक लाईफ मॅटर्स’पासून ते भारतातील सीएएविरुद्धच्या आंदोलनात कम्युनिस्ट आणि इस्लामी जिहादी दोघेही एकत्रितपणे नागरी अधिकार, मानवाधिकार, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सहिष्णुतेच्या गप्पा हाकताना दिसत आहेत. जो चीन आपल्या देशात फेसबुक, टि्‌वटर आणि अगदी टिकटॉकलाही परवानगी देत नाही, तो भारताने टिकटॉकवर बंदी घातली म्हणून अक्कल सांगत असतो. याच दोन्ही विचारांचे लोक, भारतातही नागरिकता कायदाविरोधी आंदोलनात ‘शाहीनबाग’ म्हणजे एक नव्या क्रांतीचा उद्घोष आहे, म्हणून सांगत होते. नंतर याच लोकांनी या आंदोलनाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिल्ली दौर्‍याच्या काळात दंगलीत रूपांतरित केले. ओठांवर ‘ला इलाह इल्लाह’ आणि हातात लाल बावटा घेणार्‍यांची ही ताजी युती, विजोड तर आहेच, पण अत्यंत धोकादायकही आहे.
या दोन्ही विचारधारांनी उदारवादाचा बुरखा जाणीवपूर्वक घातला आहे. त्यांना माहीत आहे की, उदारवादी लोकशाही समाजात अधिकारांची चर्चा करणे फॅशनेबल आहे. त्यामुळे मुळात िंहसावादी असलेल्या या विचारधारांना प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र मिळते. म्हणून उदारवादी लोकशाहीत प्रदर्शन-आंदोलनाच्या अधिकाराचा वापर करून ही मंडळी या देशांमध्ये उग्र िंहसात्मक कारवाया करीत असतात. वास्तव हे आहे की, कट्‌टरवादी इस्लाम आणि वामपंथी दोघांनाही लोकशाही व्यवस्था आणि त्याच्या मूल्यांशी काहीही देणेघेणे नाही. ही मंडळी लोकशाही अधिकारांचा उपयोग, त्याच लोकशाही व्यवस्थांना नष्ट करण्यासाठी करीत असतात. हे अराजकतावादी, म्हणायला तर फारच थोडे आहेत; परंतु बुद्धिजीवी, मीडिया आणि शैक्षणिक संस्थांमध्ये यांचा अतिशय प्रभाव आहे. त्याचा वापर करून ही मंडळी उदारवादी लोकशाही समाजांमध्ये असंतोष, क्रोध, निराशा, प्रतििंहसा आणि सामाजिक वैमनस्याची भावना निर्माण करीत आहेत. सार्‍या जगात सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. या परिस्थितीत कट्‌टरपंथी इस्लाम आणि कम्युनिस्ट दोघांनाही वाटते की, कोरोनामुळे उत्पन्न परिस्थितीचा वापर करून ते लोकशाही व्यवस्थांना दुबळे करू शकतात.
अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी आपल्या युरोप दौर्‍यात स्पष्टच सांगितले की, कोरोना संकटाचा लाभ उचलून चीनने लडाख आणि दक्षिण चीन महासागरात आपले शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. परंतु, तुर्की आणि चीनच्या वागण्यावर भारतातील बुद्धिजीवींचे रहस्यमय मौन, आश्चर्यचकित करणारे आहे. जी मंडळी दिवसरात्र अयोध्येतील रामजन्मभूमीवर रुग्णालय, धर्मशाळा इतकेच नाही तर सार्वजनिक शौचालये उभारण्याचा सल्ला देत होते, ती मंडळी हागिया सोफियाला मशीद बनविण्याच्या बळजबरीच्या निर्णयावर मात्र एकदम चूप आहेत. भारतात नागरी अधिकारांसाठी ओरडा करणारे, हॉंगकॉंगमधील नागरी अधिकारांवरील अतिक्रमणावर मौन धारण करून आहेत. हे असे का?
 
मुळात, इस्लामी जिहादी आणि कम्युनिस्ट दोघेही उदारवादी लोकशाहीमध्ये मिळालेल्या अधिकारांचा उपयोग व्यूहरचनेसाठी करीत असतात. त्यांची श्रद्धा ना लोकशाहीत आहे, ना लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारात आहे. अल्पसंख्यक अधिकार, महिलांचे अधिकार आणि सहिष्णुता हे सर्व यांच्यासाठी श्रद्धेचे विषय नाहीत, उलट व्यूहरचनेची उपकरणे आहेत. ते जोपर्यंत अल्पमतात आहेत तोपर्यंत ते याचा वापर करतात.
 
ज्या समाजात ते अल्पमतात असतात, तिथे हे आणखी एक मुद्दा उचलतात. तो म्हणजे ‘व्हिक्टिमहूड’ म्हणजे स्वत:ला पीडित दाखविणे. या दोन्ही शक्ती या खेळात तरबेज आहेत. दोघांची ताजी उदाहरणे देणे पुरेसे होईल. भारतात सध्या वरवरा राव नावाच्या कट्‌टर वामपंथी कार्यकर्त्यावरून हा मुद्दा समोर आणला जात आहे. परंतु, वरवरा राव स्वत:च म्हणून चुकला आहे की, त्याचा सशस्त्र क्रांतीवरच विश्वास आहे. त्याचे विचार, त्याची कृत्ये यांची चर्चा न करता, आता त्याचे अधिक असलेले वय, त्याचे लेखन यांचीच चर्चा त्याचे समर्थक करू लागले आहेत. जर कायदा सर्वांसाठी समान आहे, तर मग या कार्यकर्ता दिसणार्‍या लोकांसाठी वेगळी मागणी का म्हणून? कम्युनिस्ट स्वत:च्या सत्ता-काळात अशी दयाबुद्धी दाखवितात का, हे त्यांना विचारले पाहिजे.
 
अशीच घटना ब्रिटनमध्ये शमीमा बेगम नावाच्या इसिससंबंधित जिहादी दहशतवादी महिलेची आहे. मूळ बांगलादेशी, परंतु आता ब्रिटिश नागरिक असलेली शमीमा, वयाच्या 15 व्या वर्षी सीरियात पळून गेली आणि इस्लामिक राज्याच्या लढाऊ गटात सामील झाली. ती तिथे आत्मघाती तुकड्यांसाठी बारुदी जॅकेट तयार करायची. परंतु, आता शमीमा ब्रिटनला परत येऊ इच्छिते.
 
ब्रिटनमध्ये ‘तिच्या अधिकारां’ची चर्चा सुरू आहे. तिचा निष्पाप चेहरा एकप्रकारचे पोस्टर बनले आहे. शमीमाला असे दाखविण्यात येत आहे की, जणू ती परिस्थितीने गांजली गेली आहे आणि त्या ‘बिचारी’वर खूपच अत्याचार होत आहेत. लोकशाही व्यवस्थेतील उदारता आणि नरम कायद्यांचा वापर, लोकशाहीचे विरोधक अगदी व्यवस्थितपणे करीत आहेत.
 
इस्लामी अथवा कम्युनिस्ट, जगात कुठेही सत्ता सांभाळताच, आधी आपल्या विरोधकांचा प्रत्येक अधिकार, इतकेच नाही, तर जगण्याचा अधिकारही हिसकावून घेतात. या दोन्हीही विचारधारा, शांतिपूर्ण सहअस्तित्वाच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवत नाहीत. उदार असल्याचा बुरखा घालून समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये खोलपर्यंत घुसून बसलेले लोक सर्वाधिक धोकादायक आहेत. या शक्ती, लोकशाही अधिकारांचा उपयोग, लोकशाहीला दुबळे आणि अंतत: नष्ट करण्यासाठी आतल्या आत करीत आहेत. त्यांचे मूळ ध्येय, भारतासारख्या उदार लोकशाही व्यवस्थेला दुबळे करणे आणि ती ध्वस्त करणे आहे. अशा धूर्त, चलाख लोकांचे बुरखे फाडणे फार गरजेचे आहे.


https://www.tarunbharat.net//Encyc/2020/7/29/Radical-communists-Islamists-pretend-to-be-liberals-.html

Monday, 27 July 2020

२०१४ मध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी विवेक विचार आयोजित विमर्श व्याख्यानात चीनशी वागायचं कसं या विषयावर मांडणी केली होती. ती मांडणी आज तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे.


प्रतिनिधी । जपान आणि इतर अनेक शेजारी देशांबरोबर चीनचे वादाचे संबंध आहेत. शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने त्या देशांबरोबर आपली मैत्री वाढवत चिनी ड्रॅगनशी मुकाबला करणे शक्य आहे. केंद्रातील नवे सरकार मोदींच्या नेतृत्त्वाखाली या दिशेने पावले टाकत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन यांनी केले.

विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार मासिकाने "चीनशी वागायचं कसं?' या विषयावर २१ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विमर्शचे आयोजन केले होते. ज्ञानप्रबोधिनी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख बसवराज देशमुख होते. व्यासपीठावर मासिकाचे संपादक सिद्धाराम पाटील व केंद्राचे सहसंचालक दुर्गाप्रसाद मिणीयार उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात केंद्राचे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे रिजनल मॅनेंजर जितेंद्र जोशी, डॉ. प्रतिभा पाटील यांचा सत्कार झाला. अप्पासाहेब हत्ताळे यांनी सूत्रसंचालन, अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी आभार मानले. विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हरिभाऊ गोडबोले, प्रा. प्रशांत स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेशावर चीन सातत्याने दावा सांगतो आहे. या दुर्गम राज्यामध्ये राज्यामध्ये विवेकानंद केंद्राचे व रामकृष्ण मिशनचे सुरू असलेले सेवाकार्य मी जवळून पाहिले आहे. देशभक्तीचे हे कार्य अजोड आहे, असे उद्गार श्री. महाजन यांनी काढले.
तो राजकीय नेतृत्वाचा पराभव
१९६२ च्या चीन युध्दात भारताचा पराभव झाला, असे मी मानत नाही. कारण त्यावेळी फक्त आपले दहा टक्के सैन्य लढले. ९0 टक्के सैन्य, शंभर टक्के नौदल युध्दात सहभागीच नव्हते. या स्थितीत भारताचा पराभव झाला, असे कसे म्हणायचे? तो तर राजकीय नेतृत्वाचा पराभव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अज्ञानातून टीका केली जात आहे. वस्तुत: मोदींचे पाऊल योग्य दिशेने पडत आहे. त्यांच्या दौर्‍यामुळे भारतावर नाराज असलेल्या नेपाळशी मैत्री झाली आहे. चीनचा शत्रू जपान, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सशी भारताची मैत्री दृढ झाली आहे, असे ब्रिगेडियर महाजन म्हणाले.
पाक नव्हे चीन हाच खरा शत्रू
पाकिस्तान हा भारताचा फार मोठा शत्रू नाही आणि काश्मीरही मोठा प्रश्न नाही. सीमेपलीकडून जी सशस्त्र घुसखोरी होत आहे, त्यातील ९0 टक्के अतिरेकी सीमेवरच मारले जातात. पाकिस्तान हा शुन्याचा पाढा आहे. त्या देशाशी मैत्री करणं, हे दिवास्वप्न आहे. त्यामुळे त्यात वेळ दवडू नये. चीन हाच आपला क्रमांक एकचा शत्रू आहे,असे निरीक्षण नोंदवून चीनचा मुकाबला करण्यासाठी सैन्याचे आधुनिकीकरण जलद गतीने करणे गरजेचे आहे.
विवेकानंदांनी दिला होता इशारा
स्वामी विवेकानंद जेव्हा चीनच्या दौर्‍यावर गेले होते, तेव्हा तेथे साम्यवादही नव्हता; पण स्वामीजींनी भारताला चीनपासून धोका असून, तो देश भविष्यात महासत्ता बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. चीन हा निद्रीस्त राक्षस आहे, असे उद्गार स्वामीजींनी काढले होते. त्यानंतर योगी अरविंद घोष, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनीही हा धोका सांगितला होता.
केवळ मागील सरकारशी स्पर्धा नको
चीन भारताशी पारंपरिक आणि अपारंपरिक पध्दतीने युध्द करू शकतो. त्या देशाची शक्ती प्रचंड आहे. या शक्तीचा सामना करण्यासाठी भारताला सैन्याचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. मागील सरकारच्या तुलनेत या सरकारने पावले उचलली आहेत. हे सरकार याकामी पुढेही गेले आहे; पण सध्याच्या सरकारने केवळ मागच्या सरकारशी स्पर्धा न करता सुधारणांचा वेग आणखी वाढविला पाहिजे.
अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक
चीन आणि भारताचा तुलनात्मक अभ्यास केला असता चीन आपल्या पुढेच आहे. चीनमधील साक्षरतेचे प्रमाण ८१.५ टक्के आहे; तर भारताचे ५२.१. चीनचे सकल देशांतर्गत उत्पन्न ७.६ आहे. भारताचे ५ टक्के आहे. तेथील दरडोई उत्पन्न ३६५0 डॉलर्स आहे; तर भारताचे १६८0 डॉलर्स आहे. ही आकडेवारी पाहिल्यास भारताने अर्थव्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.
आपल्यासाठी चांगली बाब
चीन हा देश कच्चा माल पुरवठादार देशांचा नेता आहे.चीनने भारताच्या सीमेपर्यंत रस्ते, रेल्वेचे जाळे उभे केले आहे. भारताची रेल्वे मात्र आसामच्या पुढे गेली नाही. पर्यावरणाचे कारण देत आपलेच सरकार आपल्याच देशात रस्ते आणि रेल्वे उभारणीला विरोध करत होते. मोदी सरकारने मात्र सीमेवरील विकासकामांना पर्यावरण नियमांच्या चौकटीतून बाहेर काढले आहे. भारताची अर्थव्यवस्था जोपर्यंत मजबूत होत नाही, तोपर्यंत चीनचा प्रश्न सुटणार नाही कारण सैन्याला देण्यासाठी भारताकडे पुरेसा पैसा नाही. भारतीय सीमेचा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे चीन अत्याधुनिक अवजारे आणू शकत नाही, ही बाब आपल्यासाठी चांगली आहे.
चार प्रकारचे शत्रू
आर्य चाणक्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी देशाला चार प्रकारचे शत्रू असल्याचे सांगितल्याचा उल्लेख ब्रिगेडियर महाजन यांनी केला. एक – बाहेरचा शत्रू आणि देशांतर्गत लोकांकडून मदत. दोन – देशांतर्गत शत्रू आणि त्याला देशबाह्य शक्तींकडून मदत. तीन – देशांतर्गत शत्रू आणि त्याला देशातील काही लोकांची मदत. आणि चार – देशाबाहेरील शत्रू आणि देशाबाहेरील शत्रूंचीच त्यांना मदत. या चारही प्रकारात देशांतर्गत शत्रू हा सर्वाधिक घातक असतो. आधी त्याला नष्ट केले पाहीजे, असे महाजन म्हणाले.