लाचखोर पोलिस उपअधीक्षकाला वाचविण्याची धडपड सुरू
-
Monday, August 22, 2011 AT 03:00 AM (IST)
ठाणे - ठाणे ग्रामीणचा लाचखोर पोलिस उपअधीक्षक नागनाथ संबटवार याला भाजपच्या नेत्याकडून चार लाखांची लाच घेताना मुंबई व ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक करून चार दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप त्याला राज्याच्या गृह मंत्रालयाने सेवेतून निलंबित केलेले नाही. कॉंग्रेस नेत्यांशी राजकीय लागेबांधे असलेल्या संबटवारला वाचविण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. त्याला पोलिस कोठडी नाकारण्यात आल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या संबटवारच्या जामीन अर्जावर उद्या ठाणे न्यायालयात निर्णय होणार आहे.
संबटवार सलग 48 तास पोलिस कोठडीत राहिल्यास त्याला पोलिस सेवेतून निलंबित व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्याची गेल्या 24 वर्षांतील पोलिस सेवा, तसेच त्याच्या कुटुंबाला होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिस कोठडी न देण्याची विनंती त्याचे वकील गोसावी यांनी न्यायलयाला केली होती. ठाणे लाचलुचपत पोलिसांनी त्याला जोरदार विरोध करणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. पोलिस तपासासाठी आणखी आठ दिवस तरी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे करण्यात आली. मात्र, संबटवार यांच्या घराची झडती घेण्याचे काम पूर्ण झाले असून, पोलिसांना काहीही वादग्रस्त सापडले नसल्याचे गोसावी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायमूर्तींनीच त्यांच्या घरात आठ लाखांची रोकड सापडल्याचे सांगितले. त्यानंतर ही रक्कम संबटवार यांच्या मुलाची असून, त्याचे कर विवरणपत्र तो दर वर्षी भरत असल्याचे गोसावी यांनी सांगितले आणि पोलिस कोठडीऐवजी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयीन कोठडी मिळताच संबटवारतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्याची सुनावणी शनिवारी होणार होती; मात्र ती न झाल्याने आता उद्या सोमवारी त्याच्या जामीन अर्जावर निकाल होण्याची शक्यता आहे. सलग 48 तास पोलिस कोठडीत गेल्याने संबटवारला सरकारी नियमानुसार निलंबित व्हावेच लागणार आहे. त्याला निलंबनाच्या कारवाईपासून वाचविण्याची जोरदार धडपड पडद्याआडून चालू आहे.
निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राजेशकुमार मोर यांच्याशी संपर्क साधला असता, संबटवार याला निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र अद्याप त्यांना निलंबित करण्यात आलेले नाही. निलंबन प्रक्रियेला वेळ लागतो, असे ते म्हणाले.

No comments:
Post a Comment