Total Pageviews

Wednesday, 31 August 2011

HOW TO LIVE LONGER

नीट न झोपणारे अल्पायुषी- रोज साडेचार तासांपेक्षा कमी व साडेनऊ तासांपेक्षा जास्त झोपणारे अल्पायुषी होतात. शक्यतो सूर्यास्ताला किंवा त्यानंतर लवकरात लवकर घरी यावे. जैन लोक सूर्यास्ताआधीच जेवतात ते सगळ्यात छान! तसे घरी यावे, आंघोळ करावी, सर्वांनी एकत्र येऊन देवाची प्रार्थना करावी. एकत्र वेळ घालवावा. जेवावे व जेवल्यानंतर दोन तासानंतर झोपावे. रात्री उत्तेजक टीव्ही पाहिल्यास झोप लागत नाही. म्हणून रात्री सूर्यास्तानंतर टीव्ही बघणे टाळणे हे सर्वात चांगले. घरामध्ये खूप प्रखर आवाज व उजेड असताना झोप येत नाही. म्हणून घरामध्ये मंद, कमीत कमी उजेड असावा. अभ्यासासाठी, वाचनासाठी टेबल लॅम्प वापरावा. जेवताना आपला घास आपल्या नाकात जाऊ नये यासाठी आवश्यक तेवढाच उजेड ठेवावा. चहा कॉफी हे उत्तेजक द्रव्य आहे, ते दुपारनंतर घेतल्यास झोपमोड होते. दुपारनंतर चहा-कॉफी घेणे शक्यतो टाळावे. रात्री मच्छरदाणी जरूर वापरावी. डास चावल्याने आपली झोपमोड होते. सुताच्या मच्छरदाणीपेणक्षा नायलॉनची मच्छरदाणी चांगली. त्याचा दोरा बारीक व त्याची भोके मोठी असतात. नाकावरून पांघरूण घेऊन झोपू नये. मंद दिवा लावल्यास किंवा शून्याचा दिवा लावला तरी झोप खराब होते तेव्हा रात्री दिवे ठेवू नये. ज्यांना रात्री उठावे लागते त्यांनी सोबत विजेरी ठेवावी. जन्माआधी मुलं नऊ महिने आईच्या पोटात अंधारातच असतात. पालक मुलांना भीती वाटू नये म्हणून उजेड ठेवतात. याची गरज नाही. चांगली झोप झाल्यावर सकाळी आपोआप माणूस उठायला पाहिजे. तो ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे चार वाजतात उठायला पाहिजे. त्याला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली पाहिजे. ज्याला गजर लावून उठावे लागते तो माणूस चांगला झोपत नाही. रात्री लवकर झोपले पाहिजे, ताजेतवाने उठले पाहिजे. ज्याला उठल्यावर चहा-कॉफी लागते तो चांगला झोपत नाही. शाळेतल्या मुलांना जेवल्यावर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणिताचा अभ्यास करायला सांगावा, ती लगेच झोपतील. मुलांना रोज झोपताना हितोपदेश, पंचतंत्र, गोष्ट वाचून सांगणारे, वाचणारे व ऐकणारे व्यवहाराकुशल व सुखी होतील. आपण मुलांना चहा कॉफी पाजतो त्याने मुले बारीक व अल्पायुषी होतात. त्यांची चहा-कॉफी पिण्याची सवय टाळली पाहिजे. शास्त्रीय संशोधन असे दाखवते की, दिवसभरात एकदाही पातळ अन्न दिले तर मुले खुरटतात. बारीक व बुटकी होतात. मुलांना चहा, कॉफी, दूध इत्यादी पातळ वस्तू देऊ नयेत. त्यांना तहान लागली की ते पाणी पितील. आपण काळजी करू नये. स्वानुभवावर लेख आधारित आहे. जशी चहा, कॉफीची सवय लावता येते तशी ती सोडताही येते. त्याला मात्र जिद्द हवी, निश्‍चय हवा. आपण काही करून दाखवू शकता का? आपला चहा सोडून दाखवा बरं. आपण किती जिद्दी आहात ते आपल्याला समजेल. २) चांगले खा- ज्यांची पूर्ण वाढ झाली आहे त्यांच्यासाठी आयुर्वेद म्हणतो हितभूक मितभूक कोरूख, म्हणजे जो हितकर आहे तो खातो, जो गरजेच्या निम्मे खातो तोच सुखी होतो. जेव्हा आपली खात्री होते की, पुन्हा आपल्याला कधीही जेवायला मिळणार नाही तेव्हाच पोटभर जेवायला पाहिजे. अन्यथा अर्धपोटीच जेवावे. जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. हितकर अन्न म्हणजे आपल्या घरचे अन्न. घराबाहेरचं अन्न खाऊ नये. स्वयंपाक म्हणजे स्वत: अन्न शिजवून खाणे. आपण आपले अन्न स्वत: शिजवून खायला पाहिजे. किमान आपल्या घरचेच अन्न खाल्ले पाहिजे. जेव्हा गरज पडेल तेव्हा, अडीअडचणीत दुसर्‍याच्या घरचे खाल्ले तरी चालेल. हॉटेलमध्ये पाच-पंचवीस लोक अन्नाला हात लावतात. त्यापैकी बरेच लोक आजारी असतात व ते आजार आपल्याला होतात म्हणून घराबाहेर खाऊ नये. मुंबई, पुणे, ठाणे, अकोला, कलकत्ता येथील संशोधन असे दाखवते की, पाचवेळा घराबाहेर अन्न खाल्ले तर चारवेळा पोट बिघडते. अगदी मंदिराच्या तीर्थप्रसादानेसुध्दा पोट बिघडते. तेव्हा घराबाहेरचे अन्न खाऊ नये. ३) साधे अन्न खा- फळे, काशिंबिरी, वरण, भात, भाजी, पोळी, भाकरी व मांसाहारींसाठी थोडे मटण, चिकन, मच्छी. साधे आहार खाणारे दीर्घायुषी होतात. जे फार तळलेले, तुपकट व वारंवार शिजवलेले डबाबंद अन्न खातात ते अल्पायुषी होतात. चीनने चीन काराकोरम रस्ता बांधला. त्या भागातले लोक ११० वर्षे जगायचे. पण मॅकडोनाल्डसारखे दुकान आल्याबरोबर त्यांच्याकडे ब्लडप्रेशर, हार्टऍटॅक, डायबेटीसमुळे अल्पायुषीपण आलं. जेथे जेथे प्रगती पोहोचते तेथे आयुष्य कमी होत चालले. पोटसुटे अल्पायुषी- आपण गरजेपेक्षा जास्त खाल्ले तर जादा अन्नाची चरबी बनते. ती जमा होऊन पोट पुढे येते व ते अल्पायुषी होतात. आपले पोट दिसत असेल तर भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक लागली की पातळ अन्न घ्या व जेवळ टाळा किंवा जेवण कमी करा व आपला व्यायाम वाढवा. व्यायामाने चरबी गळून आपले पोट कमी होईल. गालबसे अल्पायुषी- गाल आत बसलेले असतील तर आपण बारीक आहोत, आपल्याला पुरेसे अन्न मिळत नाही. साध्या अन्नापेक्षा तेला-तुपामध्ये दुप्पट उर्जा असते. ज्यांचे गाल आतमध्ये आहेत त्यांनी तेल-तुपाचा आहार वाढवायला हवा. जो खाईल त्याला वरून तेल-तूप घाला. त्याने वजन लवकर वाढते व खिशामध्ये चणे शेंगदाणे ठेवा. ते नकळत दिवसभर खाल्ले तर तब्येत सुधारेल व आयुष्यही वाढेल. ४) सफल जगा- फलाहार करा. उपवासाच्या दिवशी फराळ करतात. फलाहारापासूनच फराळ हा शब्द तयार झाला आहे. फराळ करा म्हणजे फलाहार करा असा हा अर्थ आहे. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे व अमेरिकेतील संशोधन असे दाखवते की जे शंभर टक्के फलाहार करतात ते शंभर वर्षे जगतात. आपल्याकडे होणारी सर्व ताजी फळे पपई, बोर, जांभळे, द्राक्ष, पेरु, चिकू, डाळिंब, अननस, कलिंगड आदि दहा रुपये किलोने मिळतात. आपल्याकडची मुबलक फळे खाल्ल्यास आपण दीर्घायुषी होऊ. याने स्वयंपाकघरातील कामे कमी होतील. फलाहारात स्त्रीमुक्ती आहे. घराबाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा फळ घेऊन खाल्ल्यास आयुष्य वाढते आणि पैसे वाचातात, वेळ पण वाचतो. आपण जे अन्न खातो व ते पचवताना प्राणवायुचे मुक्त कण तयार होतात, हे शरीराला इजा करतात व आपण म्हतारे होतो. फळे या मुक्त कणांना नष्ट करतात, आपल्याला जीवनसत्वे देतात, साखर देतात, अन्न देतात आणि स्वादही देतात. ताज्या रसरशीत फळाचा स्वाद कुठल्याही शिजवलेल्या अन्नाला येऊ शकत नाही. ही माहिती मुलांसाठीपण वापरा. ५) रोज व्यायाम करा- रोज व्यायाम न करणारे भारतीय अल्पायुषी आहेत. आम्ही लोळा गोळा झालो आहोत. म्हणजे आम्ही रात्री बिछान्यावर लंोळतो व इतर वेळा गोळ्यासारखे बसतो, सकाळी टीव्ही नाश्त्याला, मग गाडीवर पुन्हा ऑफिसमध्ये बसतो. नंतर घरी जेवायला बसतो व रात्री झोपतो. हालचाल व अंगमेहनत कमी झाली. शरीर कमजोर झाल्यामुळे आपण अल्पायुषी होतो. रोज तासभर व्यायाम/ अगंमेहनतीचे काम करा, घाम गाळा, धावा, पळा, ऑफिसला जलद चालत जा. जर तुमची कामाची जागा घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असेल तर तुम्ही दररोज जलद गतीने ऑफिसला जा. पाच किमीपर्यंत असेल तर तुम्ही सायकल वापरा व त्यापेक्षा जास्त असेल तरच गाडी वापरा. मुलांनाही पायी वा सायकलने शाळेत पाठवा. नाच हा सर्वोत्तम व्यायाम आहे. तो मन व शरीराला चिरतरुण ठेवतो

No comments:

Post a Comment