Total Pageviews

Showing posts with label CRIME. Show all posts
Showing posts with label CRIME. Show all posts

Sunday, 22 July 2018

मानवी तस्करीच्या पाऊलखुणा Source: तरुण भारतJul 17 2018-चारुदत्त कहू |



मदर टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीमध्ये जन्मलेली २८० मुले बेपत्ता असल्याची खळबळजक माहिती समोर येताच मानवी तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रांची येथील मिशनरीज ऑफ चॅरिटीतर्फे संचालित निर्मल हृदयसंस्थेतील मुलांच्या विक्रीचे प्रकरण आता देशव्यापी मानव तस्करीत बदलले आहे. केवळ झारखंडच नव्हे तर उत्तरप्रदेश, केरळ, बंगालसह काही राज्यांमध्ये मुलांना पाठविण्यात किंवा विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. मदर टेरेसा यांचे नाव ज्या संस्थेशी जुळलेले आहे, त्या संस्थेत असा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्याने खिस्ती मिशनर्‍यांच्या एकंदरीतच सेवाकार्याबद्दल पुनश्‍च एकवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. कुमारी मातांच्या पोटी जन्माला आलेली आणि अनाथालयात ठेवलेली २८० मुले बेपत्ता असल्याची माहिती बालहक्क आयोग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, पोलिस आणि इतर अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान समोर आली.
ह्युमन ट्रॅफिकिंग हा शब्द मानवी तस्करीसाठी वापरला जातो. भारतीय कायद्यानुसार मानवी तस्करी गुन्ह्यास पात्र आहे. तरीदेखील जसे कायदे केले तरी गुन्हे आटोक्यात येत नाहीत, त्याच प्रमाणे मानवी तस्करीविरोधी कायदे करूनही ती सुरू असते. अनेकदा सेवेच्या नावाखाली हा प्रकार घडतो आणि ज्यावेळी सारे उघडकीस येते तोवर बरेच नुकसान झालेले असते. शारीरिक शोषण, देह व्यापार, वेठबिगारी अथवा बाल कामगारांसाठी मानवी तस्करी केली जाते. एका आकडेवारीनुसार ८० टक्के मानवी तस्करी वेश्या व्यवसायासाठी केली जाते. गुन्हेगारीमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि शस्त्रांच्या दलालीनंतर मानवी तस्करीचा तिसरा क्रमांक लागतो. ज्या मुलांची तस्करी केली जाते ती अगदी गरीब घरची असतात. भारत हा तर मानवी तस्करीचा मोठा अड्डा समजला जातो आणि भारताच्या पूर्वेकडील अतिदुर्गम आणि मागास भागातील बहुतांश बालिका या गुन्ह्यांना बळी पडतात.
२०१५ ते २०१८ या कालावधीत मिशनरीज ऑफ चॅरिटीत़र्फे संचालित निर्मल हृदयच्या अनाथालयात ४५० गर्भवतींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी जन्मलेल्या फक्त १७० मुलांना बालहक्क आयोगासमोर हजर करण्यात आल्यामुळे उर्वरित २८० मुले बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. जन्मलेली मुले गेली कुठे, याचा तपास सध्या केला जात आहे. बालहक्क आयोगाने अनाथालयावर छापे घालून काही मुलांना ताब्यात घेतले आणि मिशनरी ऑफ चॅरिटीच्या कर्मचारी अनिमा इंदावार आणि नन कांसिलिया यांना अटक केली आहे. बिंग फुटल्याने या संस्थेच्या संचालकांनी आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
बांगलादेशी मुस्लिम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी तर मदर टेरेसांवर आरोप करून, त्या धुतल्या तांदळाच्या नव्हत्या, असे जगजाहीर केले आहे. समाजातील अनेक अमानुष, बेकायदा कृत्यांमध्ये मदर टेरेसा सहभागी होत्या असे त्यांचे म्हणणे आहे. मदर टेरेसा जी संस्था चालवायच्या त्या संस्थांवर मुले विक्रीचा आरोप यापूर्वीही झाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. झारखंडमधील २८० मुले बेपत्ता होण्याचे प्रकरण नवे नाही, असाच त्यांचा सांगायचा उद्देश होता. मदर टेरेसा प्रसिद्ध समाजसेवक होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका असेही तस्लिमाने ट्विटरवर नमूद केले आहे.
मानवी तस्करी भारतासाठी नवी नाही. सरकारच्या धोरणांची ज्या ठिकाणी योग्यरीत्या अंमलबजावणी होत नाही, अथवा ज्या ठिकाणी अंमलबजावणी करू दिली जात नाही, अशा ठिकाणच्या तसेच ज्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असून, दारिद्र्यही पाचवीला पूजलेले आहे, अशा ठिकाणचा मानवी तस्करीसाठी उपयोग केला जातो. या गुन्ह्यामध्ये स्थानिक एजंट्सदेखील भूमिका महत्त्वाची भूमिका बजावतात. महानगरांमध्ये अनाथ आणि अल्पवयीन बालिकांना घरकामगार म्हणून विकले जाते आणि त्यांच्याकडून १२ ते १६ तास रगडून काम केले जाते. मुलींची अशी विक्री करणार्‍या अनेक संस्था राजधानी दिल्लीसह महानगरांमध्ये पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून विनासायास बहरत आहेत. मानवी तस्करीचे प्रकार संस्थात्मक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळीवर चालतात. संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेली तस्करी उघडकीस येण्यास वर्षे लागतात पण वैयक्तिक प्रकरणे वर्ष-दोन वर्षात उघडकीस येतात. पण बाल-बालिकांचे पालक इतके गरीब असतात की, त्यांच्याकडे पोलिसांकडे जाण्याचा अथवा न्यायासाठी कोर्टाची पायरी चढण्याचादेखील पर्याय नसतो. शिक्षणाच्या अभावामुळे एजंट्च्या फसवणुकीला ते सहज बळी पडतात. प्रारंभी तर एजंट गरीब परिवारातील अल्पवयीन मुलींवर नजर ठेवून तिला शहरात चांगली नोकरी लावण्याचे आमिष पालकांना दाखवतात. एकदा का पालकांची सहमती मिळाली की काही पैसे पालकांच्या हाती ठेवून मुलींना महानगरातील मुले विक्री करणार्‍या एजन्सीजकडे सोपविले जाते. पुढे या एजन्सीज या मुला-मुलींना चढ्या दराने गरजवंतांना विकून मोठा नफा कमावतात. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षात मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हा गैरप्रकार वाढीस लागला आहे. तामिळनाडूत मानवी तस्करीच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद झालेली आढळते. या राज्यात आजवर ९,७०१ प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापाठोपाठ आंध्रपदेश, ५८६१, कर्नाटक ५४४३, बंगाल ४११० आणि महाराष्ट्रात ३६२८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही पाच राज्ये मानवी तस्करीसाठी ओळखली जातात आणि येथून मोठ्या प्रमाणात बालिकांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते, अशी ही आकडेवारी सांगते. मानवी तस्करीचा ७० टक्के वाटा या राज्यांचा आहे. नोंद न झालेलीही अनेक प्रकरणे आहेत, पण या ना त्या कारणाने त्यांच्या नोंदी शक्य होत नाहीत. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार तामिळनाडूत युवतींच्या तस्करीचे प्रमाण मोठे असून, येथून मुंबई, दिल्ली आणि अरबस्थानातही मुलींची विक्री केली जाते.
मानवी तस्करीसाठी भारतीय राज्यघटनेने कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात केलेली आहे. इम्मॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टनुसार व्यापार अथवा विक्रीच्या उद्देशाने मानवी तस्करी होते आणि त्यासाठी ७ वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रकरणात किती जणांचा गुन्हा सिद्ध होऊन, त्यांना शिक्षा ठोठावली गेली, याचा विचार करता, आजवर २३ टक्के गुन्हेगारांना मानवी तस्करीमध्ये शिक्षा ठोठावली गेली आहे. देशभरात अटक झालेल्या सुमारे ४५ हजार व्यक्तिंपैकी १० हजारांना शिक्षा झालेली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकार विभिन्न संस्थांना निधी प्रदान करते. यातून सुटका झालेल्या पीडितांच्या पुनर्वसनाचे कामही महिला व बाल विकास विभागाद्वारे केले जाते. मानवी तस्करीवर आळा घातला जावा म्हणून वेब पोर्टलही सुरू करण्यात आले आहेत. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे फायदे सहज दिसतात. पण त्यातील तोट्यांमध्ये मानवी तस्करीचा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. आज ही समस्या केवळ विकसनशील देशांची आहे, असे म्हणून चालणार नाही. विकसित देशांनाही या समस्येशी झुंज द्यावी लागत आहे. अनेकदा बाल-बालिकांची या भयानक बाजारपेठेतून सुटका केली जाते. पण त्यांचे पुनर्वसन योग्य प्रकारे होत नसल्याने वा यंत्रणांना त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात अपयश येत असल्याने ती पुन्हा याच व्यवसायात ढकलली जातात. त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना व्यवसायाला लावणे, त्यांना प्रस्थापित करणे आणि सुसंगती देणे, ही जबाबदारी समाजाची आहे. जगभरात हा मार्ग चोखाळणार्‍या संस्था यशस्वीतेचे मार्ग पादाक्रांत करताना दिसत आहेत. अनेकदा मानवी तस्करीचा संबंध फक्त वेश्या व्यवसायाशी जोडला जातो. ते खरेही असले तरी या संज्ञेला अनेक पैलूदेखील आहेत. रांचीमध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या ज्या दोन नन्सना अटक झाली आहे, त्यांनी पोलिसांनी दंडुका उगारताच काही मुलांची विक्री झाल्याची कबुली दिली आहे. पण अटकेतील मंडळी हे या काळ्या कृत्यातील छोटे मासे आहेत, मोठे मासे अजूनही राजरोसपणे फिरताहेत, त्यांनाही वेसण घालण्याची आणि सेवेच्या नावाने सुरू असलेल्या गैरप्रकारांना चाप बसवण्याची गरज आहे.


Sunday, 24 July 2011

DRIVE WITH CARE

Please drive with CARE...
Avoid Cell Phones.



If you watch it, your driving will never ever be the same again:-

http://www.mrpalm.com/list3.php?cont_id=2507

Tuesday, 12 July 2011

NEXUS BUILDERS & POLICE KILLS 10 LABOURS

'सुरक्षित' गुन्हा!
मुंबईला लागून असलेल्या काशिमिऱ्यात शुक्रवारी भिंत कोसळून दहा मजुरांचे बळी गेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रजिस् टरमध्ये बिल्डर,ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करून आपले एक कर्तव्य पार पाडले आहे. एकदम दहा जणांचे मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये निर्माण होणाऱ्या तात्कालीक संतापाची धार बोथट करण्यास ही कारवाई उपयुक्त ठरेल, मात्र ती ताकिर्क टोकाला नेऊन बिल्डर, ठेकेदार यांना किमान दहा-दहा वर्षांसाठी खडी फोडायला पाठवले जाईल काय, याचे उत्तर आजवरच्या अनुभवाने नाही असेच आहे. किंबहुना गरिबांच्या जीवाविषयी पूर्णत: उदासीन असलेल्या बिल्डर, ठेकेदारांच्या गुन्हेगारी टोळ्या याच भरवशावर माजल्या आहेत. स्थलांतरित मजूर, कंत्राटी मजूर यांच्या सुरक्षिततेसाठी कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी ज्या कामगार आयुक्तांच्या यंत्रणेने करायची, तेच या बड्या ठेकेदारांचे बांधिल गडी म्हणून वावरत असतात. जाब विचारण्याचे अधिकार असलेल्या सर्वांनाच विकत घेता येत असेल, तर पैशासाठी माणुसकीही कोळून प्यायलेले बिल्डर-कंत्राटदार मजुरांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी खचिर्क उपाययोजना कशाला करतील? त्यामुळेच काशिमिऱ्यात झालेली दुर्घटना ही या प्रकारची पहिली घटना नाही आणि शेवटचीही नाही. ही जीवघेणी बेदरकारी हा इतका 'सुरक्षित गुन्हा' का बनला आहे? बळी जाणारे बहुसंख्य मजूर परराज्यांतील असतात. शिक्षणाचा अभाव, आथिर्क असहायता आणि जेथे ते कामाला जातात, तेथे जगण्याच्या सर्व प्राथमिक गरजांच्या पूतीर्साठी ठेकेदारावरील अवलंबन, यामुळे ते स्वत: जाब विचारण्याच्या स्थितीत नसतात. त्यांच्यामागे स्थानिक समाजाचे पाठबळ नसते. त्यामुळे त्यांच्या दुदैर्वी मृत्यूच्या बातम्या वाचून हळहळण्यापलीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदविला यावरच समाधान मानले जाते, पण त्याचे पुढे काय होते याचा पाठपुरावा माध्यमे वा राजकीय नेते करीत नाहीत. बिल्डर-कंत्राटदार नव्या कंपन्या स्थापन करून कामे करायला मोकळे होतात. यात कारवाई करणाऱ्या यंत्रणांतील अप्रामाणिक व्यक्तींना जेवढी कमाई होते, तेवढीही भरपाई बळी पडलेल्या मजुरांच्या गावाकडील कुटुंबीयांच्या हातात पडत नाही. काशिमि-यातील मृत्युकांडाच्या बळींना न्याय मिळावा म्हणून फेसबुक आंदोलक सक्रिय होतील काय

Sunday, 10 July 2011

RAPE COMMON WOMEN

 IT HAS BEEN REPOTED  THAT ALL GOVT OFFICERS ARE MISUSING GOVT PAID MANPOWER  WHICH IS NOT AVAILABLE FOR PROTECTING COMMON MAN
शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या घरफोडीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेले स्टिंग ऑपरेशन एक्सलंट असून, कामचुकार पोलिसांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्यांची झाडाझडती घेतली होती. तसेच शहरातील घरफोडीच्या पाश्र्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेशही दिले होते. मात्र, या बैठकीच्या आदेशाचे पालन या अधिकार्‍यांकडून न झाल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनवरून दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी शहरात गस्त न घालता पोलीस यावेळी काय करत होते. याबाबत चार दिवसांत पुन्हा पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन जाब विचारणार असल्याचे गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शहरात घरफोडय़ांच्या पाश्र्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. असे असताना काही पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी झोपले असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनने स्पष्ट केले आहे. सेवेत कामचुकारपणा करणार्‍या पोलिसांची गय केली जाणार नाही. संबंधितांची माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पंढरपूर येथील यात्रेनिमित्त वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोनशे पोलीस बंदोबस्तासाठी गेले आहेत. दररोजची आंदोलने यामुळे पोलिसांना चोवीस तास डय़ुटी करावी लागत आहे. अशा वेळी काही पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी थोडा वेळ विश्रांती घेणार हे नाकारता येणार नाही. मात्र, पूर्ण वेळ सेवेत कामचुकारपणा करणार्‍या पोलिसांची गय केली जाणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.




वडिलांच्या दहाव्या दिवसासाठी आलेल्या दोन विवाहित मुलींवर त्यांची आई व इतर नातेवाईक महिलांसमोर बलात्कार करून दरोडा टाकण्याची नगर जिल्ह्यातील वीरगावच्या टेमगिरेवस्तीवरील घटना संतापजनक आहे. क्रौर्याचा हा कळस सुन्न करणारा आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व लयास गेल्याचे निदर्शक असणारी ही घटना माणुसकीची अब्रू वेशीवर टांगणारी आहे. गरीब माणसाची सुरक्षितता धोक्यात आणणार्‍या या भयानक घटनेचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. ज्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले त्यांच्या पुनर्वसनासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजी न करता सामान्य स्त्रियांना कोणत्या दहशतवादासाठी चिरडले गेले, याचा गंभीरपणे विचार आणि कृती केली पाहिजे. अत्यंत लाजिरवाण्या अशा या घटनेने राज्यकर्त्यांची झोप उडाली पाहिजे. विशिष्ट वस्तीवर मध्यरात्री जाऊन आया-बहिणींना विवस्त्र करून हैदोस घालण्याची हिम्मत कोठून आली याचाही छडा लावला पाहिजे. टेमगिरेवस्तीवर दरोडेखोरांनी ज्या पद्धतीने नंगानाच केला, त्याचे तपशील पाहता घटना पूर्वनियोजित असावी असे जाणवते. चाकू, कुर्‍हाडी, काठय़ांचा धाक दाखवून दोन विवाहित तरुणींवर ज्या नराधमांनी बलात्कार केला, त्यांना संबंधित परिसराची पुरेशी माहिती असणार हे उघड आहे. ज्याच्या पोटी आपण जन्माला आलो त्या वडिलांचे उत्तरकार्य करण्यासाठी आलेल्या मुलींवर जो आघात झालेला आहे, तो कधीही भरून येणारा नाही. कोणाला अटक केली आणि कोणाचा शोध सुरू आहे, यासारख्या निवेदनांनी त्यांचे मन सावरले जाणे कठीण आहे. अत्याचार झाल्यानंतर महिला पोलिसांची नियुक्ती करणे यात फारसे शहाणपण नाही. शस्त्रास्त्रे घेऊन वस्तीवर हल्ला चढविला जातो आणि पोलिसांना त्याची कल्पनाही नसते, ही गोष्ट महाराष्ट्राच्या सुरक्षिततेची लायकी स्पष्ट करणारी आहे. वयोवृद्ध महिलांना विवस्त्र करण्यापर्यंतचे वर्तन दरोडेखोरांनी केले याचा अर्थच पोलिसांचा धाक कोणत्या प्रकारचा आहे हे स्पष्ट करणारा आहे. एका महिलेच्या अंगावर थंडगार पाण्याचे दोन हंडे ओतण्याचे अमानुष काम ज्यांनी केले, त्यांना वेळेवर शिक्षा झाली पाहिजे. पुरावे कसे गायब केले जातात याचा अनुभव कोठेवाडी प्रकरणात आलेला होता. धान्याच्या पोत्यात अत्याचार झालेल्या मुलींना कोंबून ठेवण्याचे अमानुष काम कोणाच्या पाठबळावर केले हेही पुढे आले पाहिजे. विकृतीचा कळस केल्यानंतर दरोडेखोरांनी दशक्रिया विधीसाठी उसने आणलेले दहा हजार रुपये लुबाडले. संपूर्ण राज्यभर या घटनेचा निषेध होत असला तरीही यापुढे महाराष्ट्रात बायकांवर क्रौर्याची परिसीमा होणार नाही याची हमी कोण देणार? घटना घडल्यानंतर प्रारंभीच्या प्रतिक्रिया ओसरताच जो वेळकाढूपणा दिसतो तोही अमानुष ठरविला पाहिजे. ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांनाच अडथळ्यांची शर्यत भोगावी लागू नये या दृष्टीनेही प्रशासकीय यंत्रणेने काम केले पाहिजे. अनेकदा अशा विकृत आणि क्रूर घटनांनंतर राजकीय कार्यकर्त्यांचा आक्रमणपणा कायदेशीर प्रक्रियेत अडसर ठरू शकतो. त्यामुळे परिस्थिती हाताळताना वेळेचे भान ठेवून आणि माणुसकीची कदर बाळगून प्रशासन काम करते आहे, असे चित्र दिसले पाहिजे. ज्या बायकांवर अत्याचार झाले त्यांना केवळ पोकळ सहानुभूतीची गरज नाही. त्यांची ज्या पद्धतीने बेअब्रू झाली त्यासंबंधी संवेदनशील समाजाला आणि राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. वेळ मध्यरात्रीची असताना आणि बायका दरोडेखोरांच्या पाया पडल्या असताना त्यांनी जे थैमान घातले, त्याला केवळ विकृती म्हणूनही चालणार नाही. माणुसकी पायदळी तुडविणारा हा उन्माद वेळीच चिरडून काढला पाहिजे

VERY POOR POLICING & POOR LAW & ORDER

अतिशय दुर्गम आदिवासी अकोले तालुक्यात चोर्‍या, दरोडे नित्याचेच बनले आहेत. गेल्या महिना-दीड महिन्यापासून तालुक्याच्या पोलिस ठाण्याचे निरीक्षकपद रिकामेच आहे. या काळात अनेक ठिकाणी भुरट्या चोर्‍या मोठ्या प्रमाणात झाल्या असतानाही जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश प्रसाद यांनी अजूनही अकोले तालुका पोलिस ठाण्यास निरीक्षक नेमण्याची तसदीदेखील घेतली नाही. त्यामुळे या दुर्गम आदिवासी तालुक्याचा गाडा कनिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली हाकला जात आहे. विशेष म्हणजे हे कनिष्ठ अधिकारीदेखील तीन दिवसांसाठी जळगावला तंटामुक्तीच्या समितीबरोबर गेले होते. परिणामी, अकोले तालुका पोलिस ठाण्याचा कारभार ‘रामभरोसे’च होता. याच काळात नराधमांच्या टोळीने संधी साधत वीरगाव फाट्यावरील टेमगिरे वस्तीवर उच्छाद मांडला. दरोडेखोरांच्या टोळीकडून दरोडा टाकून रोकड, सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट करणे इतपर्यंत ठीक होते, पण दरोडा टाकण्याच्या प्रकारासह पाशवी बलात्कार करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात वाढीस लागला आहे. नगर जिल्ह्याचे पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश प्रसाद यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून सुरुवातीचे सहा-सात महिने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित होती. मात्र, कृष्णप्रकाश यांचा असलेला दरारा अलीकडच्या काळात ओसरतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांचा आलेख चढताच राहिला आहे. पोलिस अधिकारीदेखील कृष्णप्रकाश यांच्या नावाचा दरारा दाखवीत आपल्या ‘हप्त्या’त वाढ करून घेत आहेत. त्यावरून जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश प्रसाद कितीही कडक शिस्तीचे तसेच कायद्याचे तंतोतंत पालन करणारे असले तरी त्यांच्या सहकार्‍यांकडून त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, यावरच बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांनाच आता कठोर पाऊल उचलावे लागणार आहेत. ‘सिस्टिम’ला बदलणे म्हणजे सोपे काम नाही; तरीही त्यांना हे दिव्य पार करावेच लागणार आहे. नाहीतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे मुश्किल बनणार आहे. खून, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये स्थलांतरित गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. अशा गुन्हे आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. पण, जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांना जिल्ह्याचा व्याप पाहून तेवढा विचार करायलाही उसंत मिळत असेल का? याबाबत शंका वाटते. जिल्ह्याच्या उत्तर भागात गुन्हेगारांच्या टोळ्यांनी देखील मोठा धुमाकूळ घातला आहे. या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांचा मोठा वेळ खर्ची जात आहे. मोक्का, तडीपारीच्या माध्यमातून या टोळ्यांतील गुन्हेगारांना जरब बसविण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, या गुन्हेगारांच्या प्रस्तावातील त्रुटी हा नेहमीच वादाचा विषय बनला आहे. प्रस्ताव बनविणारे जाणीवपूर्वक प्रस्तावात त्रुटी ठेवत असल्याची उघड चर्चा आता होऊ लागली आहे. त्यावरून पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील संबंधांना पुष्टी मिळण्यास वाव आहे. नगरसारख्या जागरूक व प्रशासनिक व्यवस्थेत पुढारलेल्या जिल्ह्यात गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांना शिक्षा या दोन्हींचे प्रमाण आघाडीवर असायला हवे; पण ते तसे दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिमा मंत्रिमंडळातील त्यांच्या अन्य सहकार्‍यांपेक्षा उजळ आहे. उजळ प्रतिमेचे नेतृत्व असेल तर पोलिसांचे मनोधैर्य उंचावलेले असते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीत पडते, असा समज आहे. मात्र, सध्या येथे चित्र उलट दिसत आहे. पूर्ण पोलिस व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून, या यंत्रणेला प्रशासनिक नेतृत्व मिळत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. पोलिसांचा वचक आणि वातावरणावरील दबाव जाणवत नसल्याने भ्रष्ट आणि लुबाडणारी यंत्रणा यामुळेच सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी राग वाढतो आहे. असे वातावरण बदलण्यासाठी गृह विभागाला आपल्या खात्यांतर्गत काही योजना राबवाव्या लागतील. खात्यांतर्गत प्रशासनिक सुधारणा झाल्याशिवाय प्रत्यक्ष कामगिरीत प्रगती होणार नाही. नगर जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था सांभाळणे म्हणजे मोठे दिव्याचे काम असते. या जिल्ह्याचा व्याप मोठा असल्याने पोलिस अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच अकोलेसारख्या दुर्गम आदिवासी भागात काही अघटित झाल्यास पोलिसांच्या नाकीनऊ येते. वीरगाव फाट्यावरील माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटनेने संपूर्ण गावात घबराट पसरली आहे. या धक्क्यातून बाहेर पडणे मोठे मुश्किल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलिसप्रमुख कृृष्णप्रकाश यांना घटनेच्या चौकशीचे आदेश देत दरोडेखोरांना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. या घटनेने कोठेवाडी सामूहिक अत्याचार प्रकरणास उजाळा मिळाला आहे. त्यातील दरोडेखोरांना जन्मठेपेची शिक्षा होऊन या प्रकारावर पडदा पडला गेला. मात्र, कोठेवाडी हे नाव काढले तरी अंगावर शहारे अजूनही येतात. वीरगाव फाट्यावरील सदर अत्याचार प्रकरण राज्य विधिमंडळाच्या लवकरच होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात गाजणार, हे मात्र निश्‍चित आहे. या अधिवेशनात दरोड्यांच्या प्रश्‍नांवर लक्षवेधी सूचना, तहकुबी प्रस्ताव आदींचा पाऊस पडेल. गरीब ग्रामस्थांवर जे अत्याचार झाले, त्याचे तूप आपल्या पोळीवर ओढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची अहमहमिका चालेल. मग, सरकारतर्फे संबंधित अधिकार्‍यांच्या बदल्या, एखाद्या अधिकार्‍याचे निलंबन, सीआयडी चौकशी आणि अत्याचारग्रस्तांना भरपाई अशी उपाययोजना जाहीर होईल आणि मग वीरगाव फाट्यावरील टेमगिरे वस्ती सर्वांच्याच विस्मरणात जाईल. आणखी कुठेतरी असेच काही विपरित घडेपर्यंत सारे काही शांत शांत असेल. गेली अनेक वर्षे हे असेच चालू असल्याने जनतेचा पोलिस व सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडत चालला व समाजकंटकांनाही वर्दीतील मंडळी ‘विकाऊ माल’ वाटू लागली. एकूणच वीरगाव फाट्यासारख्या प्रकरणांमुळे प्रगत महाराष्ट्राची ‘काळी’ बाजू आणखी एकदा उजेडात आली

Saturday, 9 July 2011

POLICE HIDE GANG RAPE

पुन्हा कोठेवाडी: तरूणींवर बलात्कार ताराचंद म्हस्के , शिर्डी
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी कोठेवाडी सारखी निंदनीय घटना पुन्हा याच नगर जिल्हयात शनिवारी घडली. अकोले तालुक्यात विरगाव येथे पहाटेचे वेळी सहा दरोडेखोरांच्या टोळीने घरातील चार वृध्द महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या समोरच या नराधमांनी दोन तरुण महिलांवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यात अपयशी ठरलेल्या नगर जिल्हा पोलीसांच्या अब्रुची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली.
संगमनेर रोडवर अकोलेपासून एकरा किलोमीटर अंतरावर नामदेव नाईक (नाव बदलले आहे) यांचे विरगाव फाटयाजवळ घर आहे. त्यांना सात विवाहित मुली असून मुलगा नाही. ते पत्नी असेच दोघेच राहत होते. पाच दिवसांपूर्वी वृध्दपकाळाने त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे त्यांच्या दोन तरुण मुली माहेरी आलेल्या होत्या. घरात पुरुष कोणी नसल्याने आई इतर तीन नातेवाईक महिला सोबत घरात झोपलेल्या होत्या.
शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकला. ६० ते ६५ वयोगटातील चार वृध्द महिलांना अगोदर बेदम मारले , नंतर त्यांना विवस्त्र केले त्यांच्या समोरच दोन तरुण महिलांवर (वय २७ ३२ वर्षे) आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. तुम्हांला आई-बहिणी नाही का ? तुम्ही हे पाप कोठे फेडणार ? आमच्या लेकींवर असे काही करु नका अशी विनवणी आईने केली पण नराधमांनी त्याकडे दुर्लक्ष केले दोन तास बलात्कार करत राहिले. यावेळी दरोडेखोरांनी तीन तोळयाचे सोन्याचे दागीने पाच हजारांची रोकडे असा ऐवज घेवून पळून गेले . जातांना घराचा दरवाजा बाहेरुन बंद केला.
या धक्कादायक प्रकारामुळे भयभित झालेल्या या महिला रात्रभर जाग्या राहिल्या. सकाळी ही घटना शेजारच्यांना नातेवाईकांना सांगितल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या अत्याचारीत कुटूंबाला तातडीने अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथे रुग्णालयात दोघींवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांचा खोटेपणा उघड
सर्वांची मान शरमेने खाली घालायला लावणा-या धक्कादायक घटनेबाबत नगरचे पोलीस प्रशासन फारसे गंभीर नाही. नगरचे जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी खरी माहिती दडविण्याचा प्रयत्न केला. बलात्कार झाला पण सामुहिक नाही इतर महिलांना विवस्त्र केले नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले पण अत्याचारीत कुटूंबातील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार चार दरोडेखोरांनी दोघीजणीवर आळीपाळीने बलात्कार केला चार महिलांना विवस्त्र करुन हाणमार केली असे सांगितले.त्यामुळे पोलीस खरी माहिती दडवून ठेवत असल्याचे उघड झाले आहे.
कोठेवाडीची पुनरावृत्ती
नगर जिल्हयात १६ जानेवारी २००१ रोजी अकरा दरोडेखोरांनी कोठेवाडी (ता.पाथर्डी) येथे तीन महिलांवर सामुहिक बलात्कार केला होता. त्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. त्या निंदनीय घटनेच्या कटु आठवणी जीवंत असतांना शनिवारी विरगांव येथे घडलेल्या महिलांवरील सामुहिक अत्याचार प्रकरणामुळे पोलीसांच्या अब्रुचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाले आहेत. नगर जिल्हयात दरोडे , बँक लुट , बलात्कार , चो-या या गुन्हयात मोठी वाढ झाली असून त्यांना रोखण्यात जिल्हा पोलीस प्रशासन कुचकामी ठरले आहे.
बापाचे दु: आणि बलात्कारचे चटके
वडिलांचे निधन झाल्याने पोरक्या झालेल्या लेकी आईच्या मायेसाठी माहेरी आल्या असतांना नराधम दरोडेखोरांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याने हे कुटूंब अक्षरश: भयभित झाले आहे. त्यांना रडूही कोसळत नाही आणि तोंडातून शब्दही फुटत नाही इतके ते घाबरले आहे. या धक्कादायक निंदनीय घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात - शिवसेना
या घटनेने धक्का बसला असून या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली. .टा. शी बोलतांना त्या म्हणाल्या दरोडे नियंत्रक पथकाचे काम सक्षम झाल्याने या राज्यात गुन्हेगारी नियंत्रणात आलेली नाही. नगर. पुणे , बिड , परळी , परभणी , नाशिक येथे बलात्कार महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. विरगाव येथील अत्याचारीत कुटूंबाला भेटण्यासाठी रविवारी मी जाणार आहे असे त्यांनी सांगितले

Friday, 8 July 2011

MUMBAI POLICE UNSUCCESS FUL IN TACKLING CRIME

गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्यात पोलिस अपयशी
राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तिला आळा घालण्यात पोलिस यंत्रणेला येत असलेले अपयश हा काळजीचा विषय बनला आहे. पोलिस खात्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचा सामान्य नागरिकांना जाच होतो. या खात्यात आमूलाग्र सुधारणा घडविणे ही काळाची गरज आहे.
राज्यात एकीकडे आषाढी वारीचे, अध्यात्माचे वातावरण असताना दुसरीकडे चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार आणि कौटुंबिक हिंसेच्या गुन्ह्यांत वाढ झालेली दिसते आहे. वाढती लोकसंख्या, स्थलांतर, स्थानिक बेरोजगारी आणि वेगवान शहरीकरणामुळे महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या गेल्या सहा वर्षांत सातत्याने वाढत गेली आहे. गृह खात्याच्या दृष्टीने ही जेवढी चिंतेची बाब झाली आहे तेवढी ती सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना वाटते आहे, असे दिसत नाही. स्त्रीभ्रूणहत्येइतकाच या गुन्ह्यांचा प्रश्‍नही गंभीर आहे. पोलिस दप्तरी नोंद होणारे गुन्हे अंतिमतः भारतीय दंडसंहितेच्या कलमांमध्ये बसविले जात असले, तरी मूलतः गुन्ह्यांच्या वाढीला सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे. पोलिस खाते गुन्ह्यांना आळा घालण्यात पूर्ण अपयशी ठरत असून, गुन्ह्यांची नोंद आणि उकल करण्यातच त्यांची दमछाक होते आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 13 कोटींपर्यंत पोचली आहे. पोलिसांची संख्या जेमतेम दोन लाख भरेल. महाराष्ट्र आणि अन्य राज्यांची वेगवेगळ्या कारणांनी नेहमी तुलना होत असते. त्यात राज्यातील परिस्थिती बिघडत चालल्याचे नेहमी दाखविले जाते. पण वरिष्ठ पोलिस अधिकारी मात्र हे प्रतिपादन मान्य करताना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे प्रश्‍न हे प्रगत राज्याचे प्रश्‍न असल्याने त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे, असे सर्वसाधारण मत आहे. राज्यात होणारे स्थलांतर फार मोठे आहे. यापूर्वी ते मुख्यतः मुंबईत आणि मुंबईजवळच्या औद्योगिक पट्ट्यांपुरते मर्यादित होते. पण आता स्थलांतरित लोकसंख्या खेड्यापाड्यात पसरते आहे. औद्योगिकबरोबरच शेती क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोकसंख्या सामावून घेतली जात आहे. त्याचा परिणाम राज्यातील जनजीवनावर होतो आहे. मूळ रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीला लागली असून, स्थलांतरित होणाऱ्यांना आपली मुळे रोवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्थलांतरित कुटुंबे उपरेपणाची भावना मनात घेऊन, संपूर्ण वेगळ्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमीतून येत असल्याने खेड्यापाड्यातील आणि स्थानिक पातळीवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ दिसते आहे. खून, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये स्थलांतरित गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. अशा गुन्हे आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. पण महाराष्ट्रात त्यांना तेवढा विचार करायलाही उसंत मिळत नाही. उच्चभ्रू पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे भ्रष्ट अनुकरण करताना इथल्या कुटुंबव्यवस्थेलाही धक्के बसू लागले आहेत. आर्थिक गरजा, चकचकीत जीवनशैलीची आस आणि सुखासीनता यांची सांगड घालताना कुटुंबव्यवस्था ही अधिकाधिक आर्थिक हितसंबंधांकडे ओढली जात आहे. त्याचा पर
िणामही अनैतिक, विवाहबाह्य संबंधातून किंवा प्रेम प्रकरणातून निर्माण होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिसू लागला आहे. पोलिसांच्या पाहणीनुसार, गुन्ह्यांपैकी 80 टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार आणि पीडित हे परस्परांना ओळखणारे असतात. पोलिसांकडे सामाजिक गुन्हे शाखा आहे. आता बहुतांश प्रकरणे याच गुन्हे शाखेकडून हाताळली जायला हवीत, असे ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत नुकतेच सांगितले गेले.क्‍लिष्ट आणि वेळखाऊ न्यायव्यवस्था हेही गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण मानले जाते. राज्यात प्रत्येक गुन्हा नोंदवला जावा या दृष्टीने प्रयत्न होत असतात. ते पूर्णतः यशस्वी झालेले नाहीत. विशेषतः राजकीय नेते किंवा राजकीय पक्षाशी संबंधितांविरुद्ध तक्रार असेल तर ती नोंदविणे जडच जाते. कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक गुन्ह्यांसंदर्भातही दबाव टाकल्याशिवाय पोलिस आपली संवेदनशीलता प्रकट करत नाहीत! पण तरीही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिस दल काहीसे बरे आहे. नोंदविल्या गेलेल्या प्रकरणांची संख्या इथे जास्त दिसते. तपास करून गुन्हा नोंदविल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत फिर्यादीएवढेच पोलिसही हैराण होत असल्याने मुळात तपासकामातच ढिलाई दाखविली जाते. त्याचा परिणाम गुन्ह्यांची उकल होण्यावर व गुन्हेगाराला शिक्षा होण्यावर होत असतो. महाराष्ट्रासारख्या जागरूक व प्रशासनिक व्यवस्थेत पुढारलेल्या राज्यात गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांना शिक्षा या दोन्हींचे प्रमाण देशात आघाडीवर असायला हवे; पण ते तसे दिसत नाही. न्यायव्यवस्था अधिक जलद आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे. तसे झाले तर पोलिसांची कामगिरीही सुधारेल, असे मानले जाते. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिमा मंत्रिमंडळातील त्यांच्या अन्य सहकाऱ्यांपेक्षा उजळ आहे. उजळ प्रतिमेचे नेतृत्व असेल तर पोलिसांचे मनोधैर्य उंचावलेले असते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीत पडते, असा समज आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या चित्र उलट आहे. बदल्या आणि बढत्या यामधला "राजकीय रस' कमीत कमी असूनही पोलिसांची कामगिरी मात्र दिवसेंदिवस ढेपाळते आहे. पोलिस खात्यातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना कुठेही येत नाही. पूर्ण पोलिस व्यवस्था पोखरली गेली असून, या यंत्रणेला प्रशासनिक नेतृत्व मिळत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. पोलिसांचा वचक आणि वातावरणावरील दबाव जाणवत नाही. भ्रष्ट आणि लुबाडणारी यंत्रणा म्हणूनच सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी राग वाढतो आहे. असे वातावरण बदलण्यासाठी गृह विभागाला आपल्या खात्यांतर्गत काही कल्पक योजना राबवाव्या लागतील. खात्यांतर्गत प्रशासनिक सुधारणा झाल्याशिवाय प्रत्यक्ष कामगिरीत प्रगती होणार नाही.
- पद्मभूषण देशपांडे

Wednesday, 6 July 2011

DRUNKARD POLICE OFFICER KILLS A CHILD

मद्यधुंद पोलीस अधिकार्‍याने बालिकेस चिरडले
नाशिकरोड। दि. 6 (प्रतिनिधी)मद्यधुंद नशेत गाडी चालविणार्‍या मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षकाने चिरडल्यामुळे सातवर्षीय बालिका गतप्राण झाली. या घटनेत या बालिकेचे माता-पिताही गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त जमावाने सदर अधिकार्‍यास चोप देत वाहनांवर दगडफेक केली.

नाशिक - पुणे महामार्गावरील विजय-ममता पेट्रोल पंपाजवळ स्प्रिंग व्हॅली सोसायटीत महेश गायकर आपली पत्नी व सातवर्षीय कन्येसमवेत राहतात. कन्या शुभ्रता हिचा वाढदिवस असल्यामुळे तिचे छायाचित्र काढण्यासाठी गायकर परिवार येथील शिवाजी नगरातील दत्तमंदिर येथे गेले होते. छायाचित्र काढून पायी परतत असताना गायकर परिवाराला मागून येणार्‍या कारने जोरात धडक दिली. सदर सॅण्ट्रो कार (एमएच 19 एई 3199) मद्याच्या नशेत तर्र असलेले मुंबई कफ परेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक वसंत लक्ष्मण पवार (राहाणार रजनी सुधा अपार्टमेंट, आरटीओ कॉलनी, बोधलेनगर, नाशिक) बेधुंदपणे चालवित होते. त्यांच्या गाडीने जोराची धडक दिल्यामुळे महेश व त्यांची पत्नी जखमी होऊन रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर शुभ्रतासह सॅण्ट्रो कार विद्युत खांबावर जाऊन आदळली. त्यात तिला गंभीर मार लागला. तिला तातडीने बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले. तथापि प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नाशिकला हलविण्यात आले. खासगी रुग्णालयातून वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. गायकर पती-प}ीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकारानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पवार यांच्यासमवेत असलेल्या महिलेने जमावाबरोबर हुज्जत घालण्याचाही प्रय} केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने पवार यांना चांगलाच चोप दिला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेत त्यांची बिटको रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पवार यांच्यावर मद्याचा इतका प्रचंड प्रभाव होता की, उपनगर पोलीस ठाण्यात त्यांना विचारण्यात आलेल्या एकाही प्रo्नाचे उत्तर देता आले नाही. या अपघातात सॅण्ट्रो कारच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी तातडीने सदर गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. रात्री या घटनेची माहिती शिवाजीनगर समजताच परिसरातील संतप्त युवकांनी विजय-ममता समोरील रामदास स्वामीमार्गे पंचवटी कृषी बाजार समितीत जाणार्‍या भाजीपाला वाहतूक करणार्‍या चार वाहनांवर दगडफेक केली.

या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दुर्गा चौधरी करीत आहेत

Saturday, 2 July 2011

INHUMAN HOSPITALS

माणुसकी सोडलेल्या परिचारिकांमुळे गेला एक जीव
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 02, 2011 AT 01:15 AM (IST)
Tags: nagpur,   hospital,   nurse,   nagpur,   vidarbha
केवल जीवनतारे
नागपूर - तो दमा, क्षयरोगाने त्रस्त. वॉर्डात खाटेवरच त्याचे दिवस जात होते. अशक्तपणामुळे उठता येत नव्हते. तहानेने व्याकूळ झालेला जीव "पाणी...पाणी..' म्हणून विव्हळत होता. "शंभर रुपये घ्या; पण मला घोटभर पाणी द्या हो,' अशी केविलवाणी विनवणी तो करीत होता; परंतु वॉर्डातील परिचारिकांची माणुसकी हरवली होती... आणि अवघ्या तासाभरातच त्याने खाटेवरूनच दोन्ही हात जोडून वॉर्डाला अखेरचा सलाम केला. त्याच्या हृदयाची धडधड थांबली. त्याक्षणी आरोग्य मंदिरातील परिचारिकांकडून "माणुसकी'चा खून झाला. रुग्णसेवेप्रति परिचारिकांच्या आत्मसर्पणाच्या भावनेला येथे तडा गेला. मातेपेक्षाही अधिक वात्सल्य परिचारिका जोपासतात, हा समज या घटनेने खोटा ठरवला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना मेडिकलच्या टीबी वॉर्डात "वॉर्ड क्रमांक 43'मध्ये घडली.

या मृताचे नाव सुरेश पांडुरंग नासरे होते. वय पन्नाशीचे. बजरंगनगरात राहत होता. दमा आणि क्षयरोगाच्या वेदना झेलत जगत होता. पोटाच्या त्रासामुळे कधी-कधी खाटेवर शौच करायचा. वॉर्डातील परिचारिकांना ते किळसवाणे वाटायचे आणि येथील परिचारिकांनी सुरेशच्या जवळ जाणे टाकून दिले. अशावेळी त्याची बहीण गीता महाकाळकर त्याची सेवाशुश्रूषा करीत असे; परंतु एकटा असताना त्याला जेवण मिळत नसे. औषधही देणेही बंद झाले. परिचारिका त्याला टाकून बोलायच्या. जेवण केल्यानंतर खाटेवर शौच होत असे. यामुळे परिचारिका त्याला फटकारत. तो नैराश्‍यात गेला. त्याने जेवणही सोडून दिले. अशक्तपणा आला. "आयव्ही' लावण्यासाठी परिचारिका त्याच्या जवळ जात नसत. या वॉर्डातील परिचारिका रोहणकर-भांगे यांनी सर्वाधिक हेळसांड केल्याची तक्रार आहे. याशिवाय इन्चार्ज सिस्टर सनकाळे यांच्यावरही दोष ठेवला आहे.

अमानुषतेची हद्द
सुरेश दमाचा रुग्ण असताना, शौच केल्यानंतर अटेंडन्ट्‌च्या हाताने स्ट्रेचरवर घेऊन त्याच्या अंगावर थंड पाणी टाकले जात असे. दोनदा असा प्रकार परिचारिकांनी केल्याची माहिती खुद्द वॉर्डात भरती रुग्णांनी दिली. ओलाचिंब झाल्यानंतर निर्वस्त्र करून त्याला खाटेवर टाकून दिले जात असे. असा क्रूर जीवघेणा खेळ परिचारिकांनी जिवंत रुग्णाशी केला. थंड पाणी टाकल्याने दमा आणि क्षयग्रस्त सुरेश गॅस्पिंगमध्ये गेला. "गॅस्पिंग'मध्ये गेल्याचा कॉल डॉ. नितीन यांना परिचारिकांनी दिला नाही. अखेर सुरेशचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र साऱ्यांनी त्याच्या खाटेला वेढा घातला. कोणत्याही आजाराचा रुग्ण असो; परिचारिकांची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सहानुभूतीची असायला हवी. 12 मे रोजी "फ्लोरेन्स नाईटिंगेल' या महान परिचारिकेचा स्मरणसोहळा या परिचारिका दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा करतात; परंतु रोहनकर आणि इतर परिचारिकांना सुरेशसोबत कोरडी सहानुभूतीही दाखवता आली नाही. स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम परिचारिका करतात; परंतु वीस दिवस सुरेश वॉर्डात परिचारिकांकडून होणारा छळ सोसत होता. सेवाव्रती फ्लोरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेच्या आदर्शाला मूठमाती देण्याचे काम मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये झाले, ही जखम भरून न निघण्यासारखीच आहे.

सोमवारी चौकशी
वॉर्ड क्रमांक 43 मध्ये परिचारिकांनी दिलेल्या हीन वृत्तीच्या वागणुकीमुळे सुरेशचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृताची बहीण परिचारिका गीता यांनी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, क्षयरोग विभागप्रमुख डॉ. धमगाये यांना दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिष्ठात्यांनी दिले. सोमवारी (5 जुलै) या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

Wednesday, 29 June 2011

हकनाक हत्या मुंबईतील ख्यातनाम पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले. डे यांची हत्या छोटा राजनने करविली हे तर तपासात उघड झाले आहे, परंतु ही हत्या का झाली याचा उलगडा मात्र अद्याप व्हायचा आहे. वास्तविक डे यांची हत्या झाली तेव्हा पहिला संशय दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक छोटा शकील यांच्यावर घेतला गेला होता. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरवर मुंबईत प्राणघातक हल्ला झाला त्यासंदर्भात डे यांनी केलेल्या वार्तांकनामुळे खवळलेल्या दाऊदनेच त्यांची हत्या करविली असा वहीम प्रारंभी घेतला गेला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने डे यांना धमकी दिल्याचे प्रकरणही समोर आले होते. परंतु मुंबई पोलिसांनी चिकाटीने केलेल्या तपासात नवीच बाजू समोर आली. मात्र, दाऊदचा हाडवैरी असलेल्या छोटा राजनचा यात हात असल्याचा जो निष्कर्ष निघाला, त्यातून नवी प्रश्‍नचिन्हे उपस्थित झाली आहेत. छोटा राजन डे यांच्या जिवावर का उठला? त्याने वैयक्तिक कारणांसाठी हा सूड उगवला की कोणा उच्चपदस्थाच्या सांगण्यावरून डे यांचा काटा काढला हे अजून समोर यायचे आहे. छोटा राजन आणि त्याचा एकेकाळचा साथीदार आणि आताचा वैरी संतोष शेट्टी यांच्या संघर्षात डे यांचा बळी गेला असा एक तर्क पुढे आला आहे. छोटा राजन हा एकेकाळी दाऊदचा उजवा हात होता. पुढे त्यांचे बिनसले आणि दोघे एकमेकांचे पक्के वैरी बनले. त्यावेळी दाऊदच्या जबड्यातून म्हणजे दुबईहून पलायन करण्यासाठी छोटा राजनला संतोष शेट्टीने मदत केली होती. पुढे राजनने बँकॉकला आपला अड्डा बनवला तेव्हाही शेट्टी त्याच्या साथीला होता. २००० साली छोटा शकीलने दाऊदच्या सांगण्यावरून राजनच्या हत्येचा प्रयत्न केला, तेव्हाही शेट्टीच त्याच्या मदतीला धावून गेला होता. परंतु राजकारणाप्रमाणेच गुन्हेगारी जगतातही कोणी कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळेच संतोष शेट्टीचे पुढे छोटा राजनशी आर्थिक बाबींवरून बिनसले. दोघांमध्येही संघर्ष गेली काही वर्षे सुरू होता. मध्यंतरी दत्ता सामंत यांचा मारेकरी भरत नेपाळी याची हत्या झाली. या गुन्हेगारी सम्राटांचे एक असते. आपली दहशत आणि वर्चस्व अबाधित रहावे यासाठी त्यांची कायम धडपड असते. त्यामुळे भरत नेपाळी जेव्हा मारला गेला, तेव्हा आपणच त्याला ठार केल्याचे दावे छोटा राजन आणि संतोष शेट्टी या दोघांनी केले होते. त्यासंदर्भातील डे यांच्या वार्तांकनातून छोटा राजन डे यांच्यावर उलटला असावा असा एक तर्क आहे. ज्योतिर्मय डे अलीकडेमिड डे’ च्या सेवेत होते, पण त्यांची खरी कारकीर्द फुलली होती तीइंडियन एक्स्प्रेस’ मध्ये. गुन्हेगारी जगताची खडान्‌खडा माहिती पुरवणार्‍या त्यांच्या बातम्या विशेषत्वानेसंडे एक्स्प्रेस’मध्ये सातत्याने वाचायला मिळत असत. अशा मुरब्बी पत्रकाराच्या शब्दाला साहजिकच एक वजन प्राप्त होत असते. त्यामुळे मुंबईमधील आपल्या गुन्हेगारी साम्राज्याला अबाधित राखण्यासाठी डे यांचा वापर करण्याचा प्रयत्न या टोळीवाल्यांनी केला तर नवल नाही. डे यांचे काही विदेश दौरेही झाले होते असे सांगतात. ते नेमके कशासाठी होते, ते कोणाच्या संपर्कात होते या सार्‍या बाबी पुढे उघड होतीलच. पत्रकार कितीही निष्णात असो, कितीही मोठा असो, आपल्याला कोणी वापरून तर घेत नाही ना याबाबत त्याची विवेकबुद्धी सदैव जागृत असावी लागते. ती नसेल तर असे पत्रकार इतरांच्या हातचे बाहुले बनतात. जे असे बाहुले बनायला नकार देतात, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागते. डे यांना ही किंमत स्वतःचे प्राण त्यागून चुकवावी लागली. लेखणी हेच शस्त्र असलेला एक कसलेला पत्रकार अत्याधुनिक पिस्तुलाच्या गोळ्यांचा सामना करू शकला नाही. अवघ्या दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात सातजणांनी त्यांना ठार मारले. म्हणजे प्रत्येक हल्लेखोराच्या वाट्याला आले फक्त पन्नास हजार. नंतर छोटा राजनने आणखी तीन लाख त्यांच्यात वाटले हा भाग वेगळा. परंतु इतक्या कमी रकमेसाठी कोणाच्याही जिवावर उठायला माणसे तयार होतात हे वास्तव भयानक आहे. गरिबी, बेकारी, वाढती महागाई या सामाजिक समस्यांमध्ये या परिस्थितीचे मूळ आहे. त्यातूनच गुन्हेगारी मूळ धरते, फैलावते आणि निष्पापांचे मुडदे पाडते