Total Pageviews

Showing posts with label LOVE JIHAD. Show all posts
Showing posts with label LOVE JIHAD. Show all posts

Sunday, 12 November 2017

केरळ कॅथलिक बिशप कौन्सिलने जाहीर आरोप करताना सांगितले की, केरळमध्ये ऑक्टोबर २००९ पर्यंत सुमारे साडेचार हजार तरुणींचे लग्न मुस्लिम युवकांशी झाले व त्यानंतर त्यांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले.-------एनआयएच्या तपासातून सत्य बाहेर येईल आणि दोषींचा पर्दाफाश होईल, अशी आशा

केरळमधील एका हिंदू युवतीने केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून, माझे जबरीने धर्मांतर करण्यात आल्याचे, नंतर सौदी अरेबियात नेऊन इसिसच्या अतिरेक्यांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद केल्यामुळे, ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपल्या पतीचे मनसुबे लक्षात येताच, या युवतीने आपल्या आईवडिलांशी संपर्क साधला आणि भारतात कशीबशी परत आली. माझे मोहम्मद रियाझ सोबत झालेले लग्न अवैध ठरविण्यात यावे आणि या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी विनंती या युवतीने याचिकेतून केली आहे. या युवतीने जी एक बाब सांगितली, ती शहारे आणणारी आहे. इसिसच्या अतिरेक्यांची वासना शमविण्यासाठी माझ्या पतीने मला इसिसला विकण्याचा डाव रचला होता, ही बाब. भारतातील, प्रामुख्याने केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील हिंदू व अन्य धर्मीय तरुणींशी लग्न करून नंतर त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अनेक अहवाल आतापर्यंत समोर आले. केरळ आणि कर्नाटकातील प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. २००९ पासून या प्रकरणांचा बोभाटा होऊ लागला. त्याला कारणही तसेच होते. आधी लपूनछपून होणार्‍या या घटना, नंतर शेकडो व हजारोंनी होऊ लागल्याने अन्य धर्मीय संघटनांनी आक्रोश सुरू केला. २००९ साली केरळ कॅथलिक बिशप कौन्सिलने जाहीर आरोप करताना सांगितले की, केरळमध्ये ऑक्टोबर २००९ पर्यंत सुमारे साडेचार हजार तरुणींचे लग्न मुस्लिम युवकांशी झाले व त्यानंतर त्यांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले. हिंदू संघटनांनी माहिती दिली की, एकट्या कर्नाटकात ३० हजार युवती आणि अल्पवयीन मुलींचे लग्न मुस्लिम युवकांशी झाले व नंतर सर्वांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. हिंदूच नव्हे, तर शीख धर्मातील काही युवतींनाही मुस्लिम युवकांनी लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले. या आरोपांनंतर मुस्लिम संघटनांनी एकच आरडाओरडा केला आणि यामागे ‘लव्ह जिहाद’ नसून सर्व युवतींनी स्वमर्जीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा त्यांनी कांगावा केला. तथाकथित पुरोगामी कावळ्यांनी ख्रिश्चनांवर कमी, पण हिंदूं संघटनांबद्दल प्रचंड कावकाव केली. भारतात प्रत्येक व्यक्तीस लग्न करण्याचे स्वातंत्र्य आहे, असा कांगावा केला. त्यामुळे मध्यंतरी दोन बाजूंमध्ये प्रचंड शाब्दिक संघर्ष झाला. नेहमीप्रमाणे वृत्तवाहिन्यांवर चर्चा झडल्या. पण, मूळ विषय बाजूला पडून यातून काहीच निष्पन झाले नाही. एवढे मात्र खरे की, हिंदू, ख्रिश्चन आणि शीख समुदायाने आपल्या मुलींना सावध राहण्यासाठी जनजागृती मोहिमा राबविल्या. यंदाच्या वर्षी हदिया या २४ वर्षीय हिंदू मुलीचे प्रकरण समोर आले आणि पुन्हा हा विषय ऐरणीवर आला. हदियाने शफी जहां या मुस्लिम युवकासोबत लग्न केल्याने, हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा आरोप करण्यात आला. मुलीने आपण स्वखुशीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगितले. पण, त्यांचे आईवडील व कुटुंबीयांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. हदियावर प्रचंड दडपण आणले गेले, असा त्यांनी आरोप केला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. केरळ उच्च न्यायालयाने याच वर्षी निकाल देताना सांगितले की, ‘लव्ह जिहाद’च्या धर्तीवरील हा विवाह वैध नसून अवैध आहे. त्यामुळे या विषयाकडे अजूनच लक्ष वेधलेे गेले. या निर्णयाच्या विरोधात पती शफी जहांने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत, आधी झालेले आरोप आणि हे प्रकरण याचा संपूर्ण तपास सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयएकडे) सोपविला. स्वतंत्रपणे सखोल तपास करून अतिशय निष्पक्ष असे पुरावे एनआयएने गोळा करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. एनआयएच्या प्रारंभिक तपासात अशी ९९ प्रकरणे आढळून आल्याचे संस्थेने म्हटले आहे. हदियाने येत्या २७ नोव्हेंबर रोजी स्वत: सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. हे जगजाहीरच आहे की, अन्यधर्मीय युवतींना आपल्या प्रेमजालात अडकवून त्यांच्याशी लग्न करायचे आणि नंतर त्यांचे धर्मपरिवर्तन करायचे, हा काही मुस्लिम संघटनांचा छुपा डाव आहे. मध्यंतरी दोन युवतींनीही समोर येऊन केवळ धर्मपरिवर्तनासाठी आपले धर्मांतर केल्याचा आरोप केला होता. आश्चर्याची बाब अशी की, केरळ आणि कर्नाटकमधील अल्पवयीन हिंदू मुलींना अरब शेखांना विकण्यासाठी अनेक दलाल उदयास आले आहेत. ही बाब स्टिंग ऑपरेशनद्वारे अनेक वाहिन्यांनी उघड केली आहे. पण, केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही. कारण, कारवाई केल्यास मुस्लिम मतपेढी नाराज होईल म्हणून. मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटना डोळ्यादेखत घडत असताना, या सरकारांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. केरळमध्ये तर ‘लव्ह जिहाद’च्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाने तपास करणार्‍या अधिकार्‍याची केस डायरी मागविली असता, त्यात जबरीने धर्मांतर केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावरून हायकोर्टाने त्या अधिकार्‍याला खूपच कठोर शब्दांत फटकारले होते. या सर्व घटना पाहता, सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय दिलासा देणारा आहे. कारण, केरळ आणि कर्नाटकातील गरीब घरातील सुस्वरूप मुलींच्या विक्रीसाठी पालकांना हजारो रुपये देणे आणि नंतर त्या मुलींना अरब शेखांंना विकणे हे सर्रासपणे सुरू आहे. मागे एका प्रकरणात एका आरोपीने असा कबुलीजबाब दिला होता की, जर एका हिंदू मुलीचे धर्मपरिवर्तन केले, तर तुला नवीकोरी मोटारसायकल भेट म्हणून मिळेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. यामागे आखाती आणि देशातीलच काही तत्त्वांचा अर्थपुरवठा होत आहे. या मुलींची विक्री करणारे दलाल भारतात आहेतच. त्यातून मग हा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. याचे लोण केवळ केरळ, कर्नाटकातच नव्हे, तर आता देशाच्या कानाकोपर्‍यात पसरले आहे. आपल्या महाराष्ट्रातही अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत आणि त्यावरून संघर्षही उद्भवले आहेत. या सर्व घटनांचा अतिशय सखोल तपास होण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानेही हातभार लावण्याची गरज आहे. या आयोगाला काही वैधानिक अधिकार आहेत. त्यांनी अशा प्रकरणांत लक्ष घालण्याची अधिक गरज आहे. कैलाश सत्यार्थी यांनी ‘बचपन बचाओ’ आंदोलन छेडले आहे. त्याला अनेक मुख्यमंत्री आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनीही समर्थन दिले आहे. काही प्रकरणी तर सत्यार्थी यांच्यावर दलालांनी प्राणघातक हल्लेही केले आहेत. पण, आपले आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यांकडे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यांना कायदेशीर तपास करण्यासाठी बाध्य करण्यात आले पाहिजे. आता एनआयएच्या तपासातून सत्य बाहेर येईल आणि दोषींचा पर्दाफाश होईल, अशी आशा आहे. 

Saturday, 26 August 2017

लव्ह जिहाद' म्हणजे काय ? महा त भा 2


1-Aug-2017 शेफाली वैद्य WhatsApp 426 समाज माध्यमांचा एक खूप मोठा फायदा म्हणजे वाचक तुमच्याशी थेट संवाद साधू शकतात. मला बऱ्याच वेळेला इनबॉक्स मधून अगदी खासगी स्वरूपाचे मेसेजेस येतात. काल तसाच एक मेसेज आला. पाठवणारी मुलगी युपीची आहे, कॉलेज मध्ये शिकते. तिचा प्रश्न 'लव्ह जिहाद' बद्दल होता. तिचं म्हणणं होतं की घटनेने कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला स्वतःला हव्या त्या व्यक्तीशी विवाह करायचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' समजायचा का? मी तिला सांगितलं की प्रत्येक आंतरधर्मीय विवाह हा अर्थातच 'लव्ह जिहाद' असू शकत नाही, पण बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकरणात दिला ते प्रकरण म्हणजे शफीन जहाँ ह्या मुसलमान तरुणाने अथिया ह्या हिंदू मुलीशी केलेला तथाकथित विवाह आणि त्या विवाहानंतर त्या मुलीने केलेलं धर्मांतर. मुलीचे वडिल अशोकन यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला होता आणि त्या विवाहाविरुद्ध ते कोर्टात गेले होते. सर्व साक्षी पुरावे पडताळून बघितल्यानंतर केरळ हायकोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करून शफिन जहा व अथिया यांचं लग्न रद्द करून अथियाचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे दिला आहे. शफिन जहा यांनी आपलं लग्न रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ह्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची बाजू मांडताना ही केवळ आंतरधर्मीय विवाहाची केस नसून हिंदू तरूणींना फूस लावून त्यांचं धर्मांतर घडवून आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केरळमध्ये होतोय आणि ह्या धर्मांतराची पाळेमुळे थेट इस्लामी दहशतवादापर्यंत पोचतात असे प्रतिपादन एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते. ह्या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने हा चौकशीचा आदेश दिला आहे. खरेतर हे 'लव्ह जिहाद' प्रकरण नवे नाहीच. २०१० मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन ह्यांनीही कडव्या इस्लामी संघटना 'मॅरेज एन्ड मनी' म्हणजे 'लग्न आणि पैसा' ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. केरळची चर्च आणि हिंदू संघटना ह्यांनीही ह्या आरोपाला पुष्टी दिली होती. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय न्यूज चॅनेलवरती देखील 'लव्ह जिहाद' होतो आहे आणि त्यासाठी काही कडव्या मुस्लिम संघटनांनी रेट कार्डही काढले आहेत असा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. तथाकथित 'प्रागतिक' विचारसरणीच्या लोकांचा ह्यावरच युक्तिवाद म्हणजे, प्रेम हे धर्मातीत असतं त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बरोबरच आहे, पण असे विवाह करणाऱ्या मुली कुठल्या कुटूंबातून येतात, विवाह करताना त्यांची मानसिक स्थिती काय असते, त्या मुसलमान होणार म्हणजे नक्की काय करणार, त्या एका निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काय फरक पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्यांना असते का हे सगळं विचारात घेणं महत्वाचं आहे. मुद्दा दोन भिन्नधर्मीय लोकांनी प्रेमात पडण्याचा नाही किंवा लग्न करण्याचाही नाही. मुद्दा आहे तो लग्नाआधी धर्मांतर करण्याचा. भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. प्रसंगी पतीबरोबर न पटल्यास तिला कोर्टात जाऊन घटस्फोट घेण्याचा, पोटगी मागण्याचा आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नी म्हणून अधिकार सांगण्याचा हक्क आहे. पण ज्या स्त्रिया लग्नापूर्वी धर्मांतर करून शरिया कायद्याखाली निकाह करतात त्यांना मात्र ह्या सगळ्या अधिकारांवर पाणी सोडावं लागतं. मुसलमान पुरुषाला शरिया कायद्यानुसार चार वेळेला विवाह करायचा अधिकार आहे. त्याला पत्नीला आवाजी घटस्फोट घ्यायचाही अधिकार आहे, जो अधिकार स्त्रीला नाही. मुसलमान पुरुष स्त्रीला तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देऊ शकतो पण स्त्रीला तो हक्क नाही. बहुतेक मुली खूप कोवळ्या वयात भावनेच्या भरात त्यांच्या प्रियकरांच्या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितले जाते की 'निकाह पुरता' धर्म बदलायचा आहे. एकदा लग्न झालं की मग ती मुलगी आपापल्या मूळ धर्माच्या चालीरीती पाळू शकते. त्या वेळेला मुलगी खूप दबावाखाली असते. तिच्या घरून तर अश्या लग्नाला बहुधा कट्टर विरोध असतोच, त्यामुळे पळून जाऊन लग्न करणे वगैरे आततायी निर्णय तिने घेतला की माहेरचा उरलासुरला आधारही तिच्यासाठी नष्ट होतो. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा उपायच नसतो. माझ्या ओळखीच्या एका हिंदू मुलीने असाच वयाच्या अठराव्या वर्षी पळून जाऊन धर्मांतर करून एका मुसलमान मुलाशी निकाह केला. पण काही महिन्यातच त्या माणसाचे खरे स्वरूप तिला कळून चुकले. तो माणूस तिला मारहाण करायला लागला. तिला आपल्या कुटुंबियांच्या करड्या नजरेच्या पहाऱ्यात कोंडून ठेवायला लागला. तिच्या सुदैवाने तिथल्याच एका सहृदय मुसलमान शेजारणीने तिला तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधायला मदत केली आणि त्यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. तिने मग रीतसर विधीपूर्वक परत हिंदू शरण स्वीकारला, वकिलीचा अभ्यास पूर्ण केला आणि आज ती हैद्राबादमध्ये प्रॅक्टिस करते. तिच्या सर्वाधिक पक्षकार आहेत ट्रिपल तलाकने पिडलेल्या मुसलमान महिला. ती मुलगी नशीबवान म्हणून त्या सापळ्यातून तिला बाहेर पडता आलं पण बरेच वेळेला अश्या मुलींना माहेरचा आधार तुटल्यामुळे आहे त्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. प्राप्त परिस्थतीशी जुळवून घेत घेत मग ती मुलगी हळूहळू स्वतःच कडवी इस्लाम धर्माभिमानी बनत जाते. प्रख्यात कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांच्या 'आवरण' ह्या कादंबरीत हा लव्ह जिहाद कसा होतो ह्याचे फार प्रत्ययकारी वर्णन आहे. पत्रकार सुनीला सोवनी ह्यांनी 'लव्ह जिहाद' च्या प्रत्यक्ष केसेस मध्ये अडकलेल्या तरुणी, त्यांचे आई-वडील, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि मानसोपचारतज्ज्ञ वगैरे लोकांशी बोलून, त्यांच्या मुलाखती घेऊन, विभिन्न घटकांमधल्या, विविध राज्यांमधल्या तरुणींना भेटून 'लव्ह जिहाद - दबलेले भयानक वास्तव' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे. ते वाचले म्हणजे ह्या प्रकरणांमधली सुसूत्रता लक्षात येते. एक म्हणजे ह्या लव्ह जिहाद प्रकरणात ज्या मुली प्रामुख्याने फसतात त्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अभाव असतो. कधी आई-वडिलांबरोबर संवादाचा अभाव, कधी घरात सतत होणारी भांडणे, कधी भीषण गरिबी, तर कधी मुळातच मुलीचा चंचल, बाह्य झगमगाटाला भुलणारा स्वभाव. सुनीला सोवनींच्या मते लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या बहुसंख्य मुली कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावे ह्यासाठी इतक्या आसुसलेल्या असतात की कुणीतरी रोज आपल्याकडे बघतो, त्याचं हसणं अगदी आमिर खान सारखं आहे इथपासून ते त्याच्याकडे मस्त मोटर बाईक आहे इथपर्यंतचे कुठलेही कारण त्यांच्यासाठी प्रेमात पडायला पुरेसे होते. एकदा मुलगी मुलाकडे आकर्षित झाल्यावर मुलाकडून तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात येतो. अगदी नेलपेंट, लिपस्टिक पासून ते महागड्या परफ्युम पर्यंत भेटवस्तू दिल्या जातात. पुढचा टप्पा म्हणजे मुलगा मुलीला फोन घेऊन देतो व घरच्यांना ह्या फोनबद्दल सांगू नको असे बजावतो. अश्या रीतीने मुलीच्या घरच्या लोकांना कळू न देता त्यांचा संपर्क बिनबोभाट सुरु होतो. त्यात मुलगी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात रहात असली तर प्रकरण अजूनच सोपे होते. केरळमध्ये आपापली गावे सोडून शिक्षणासाठी म्हणून राहिलेल्या मुली मोठ्या प्रमाणात अश्या प्रेम प्रकरणांच्या शिकार होताना दिसतात. एकदा 'प्रेम' प्रकरण सुरु झाले की दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक संबंध. सुनीला सोवनींच्या मते हा सगळ्यात धोकादायक टप्पा आहे. प्रेम सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रियकराबरोबर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मित्राच्या घरी राहणे. असे करण्यास नकार देणाऱ्या मुलींवर भावनिक दबाव आणला जातो. शारीरिक भूक तर असतेच, त्यामुळे मुलगी प्रियकराबरोबर जायला तयार होते. लग्नाचे वचन तर त्याने दिलेलेच असते. एकदा शारीरिक संबंध आल्यानंतर मग मुलगी पुरतीच फशी पडते. काही वेळेला तिचे चित्रीकरण वगैरेही केले जाते त्यामुळे ती बाहेर पडायचे मनात आले तरी ह्या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाही. ह्याच दरम्यान निकाहची पूर्वतयारी म्हणून मुलीला इस्लामी रीतिरिवाज पाळायचा आग्रह केला जातो. मुलगी घरी आपल्या आई-वडिलांबरोबर जरी राहत असली तरी तिला आई-वडिलांपासून लपवून नमाजपठण वगैरे करायला सांगितले वाचायला जाते. वाचायला पुस्तके दिली जातात. शेवटचा टप्पा म्हणजे पद्धतशीर धर्मांतर करवून निकाहनामा करणे. बहुसंख्य मुली आपल्या कायदेशीर हक्कांविषयी अगदीच अनभिज्ञ असतात त्यामुळे त्यांना धर्मांतर केल्यामुळे आपण कुठल्या हक्कांवर पाणी सोडतोय ते मुळात कळतच नाही. त्यातही एखाद्या शिकलेल्या, जागरूक मुलीने स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करायची गोष्ट काढलीच तर 'मला धर्माचे काही नाही, पण माझ्या आई-वडिलांच्या खुशीसाठी तू एवढेही करू शकत नाहीस का? हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम?' वगैरे भावनिक ब्लॅकमेल करून मुलीला निकाहनामा करण्यासाठी राजी केले जाते. एव्हाना मुलगी मुलामध्ये मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या इतकी गुंतलेली असते की ती सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेली असते. मुलीच्या आईवडिलांना कळलेच तर बरेचदा ते ही 'आता ती आम्हाला मेली' असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवतात, त्यामुळे तिच्यापुढे दुसरा काही पर्यायही राहिलेला नसतो. आपल्या मुलीच्या भल्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घेणारे अथियाच्या वडिलांसारखे पिता विरळाच. जरी एखाद्या केसमध्ये मुलीने धर्मांतर केले नाही तरी ह्या विवाहातून होणारी मुले मात्र इस्लाम धर्मियच असतील असा अलिखित करार असतो. एव्हाना ब्रेनवॉश झालेल्या मुली हे सगळं मान्यही करतात. ह्या सगळ्यासाठी आखाती देशांमधून प्रचंड प्रमाणात पैसे येतो असे एनआयएचे म्हणणे आहे. अश्या धर्मांतर झालेल्या कित्येक युवती केरळमधून आयसीसच्या 'धर्मयुद्धात' सामील होण्यासाठी सीरियाला गेल्याच्या केसेस केरळ पोलिसकडे आहेत. भिन्नधर्मीय विवाह होऊच नयेत असे कोणीच म्हणणार नाही. एकविसाव्या शतकात आपला जोडीदार स्वतः निवडायचा हक्क सगळ्यांनाच आहे, पण आपण धर्मांतर करतोय म्हणजे काय करतोय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? असे विवाह करणाऱ्या मुलींचं पुढे काय होतं? नवऱ्याने तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही. - शेफाली वैद्य

Sunday, 14 September 2014

LOVE JIHAD AN UPDATE

सुमारे 40-45 वर्षांपूर्वी पुण्यात आणि महाराष्ट्रात वृत्तपत्राद्वारे एक विवाह प्रकरण गाजलेले होते. यातील मुलगी हिंदू ब्राह्मण होती आणि तिने एका मुस्लीम तरुणाशी प्रेमविवाह केलेला होता. या आंतरधर्मीय विवाहाचे त्यावेळी पुरोगामी विचारांच्या मंडळींनी उत्साहाने स्वागत केले होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन समाजातील सौहार्दाचे प्रतीक अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले होते. त्या गाजलेल्या लग्नातली मुलगीच एक निराधार महिला म्हणून एका संस्थेत दाखल झाली होती. सध्या चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या चर्चेच्या संदर्भात मला वरील प्रसंग आठवला. इथे मी तो सांगितला. ‘हिंदू मुलींनो, बघा मुस्लीम युवकांशी तुम्ही लग्न केलेत तर तुमची कशी परवड होईल,’ असा इशारा देण्यासाठी मी हा प्रसंग सांगितलेला नाही. अशी परवड हिंदू मुलाशी लग्न करणाऱया मुस्लीम मुलींच्याही वाटय़ाला येऊ शकते. एकाच जातीतल्या मुला-मुलींच्या प्रेमविवाहानंतरही मुलीच्या वाटय़ाला अशीच परवड येऊ शकते. (परवड वाटय़ाला येते ती मात्र बहुतेक उदाहरणात मुलींच्याच!). भिन्न धर्मिय, भिन्न जातीय मुला-मुलींत लग्ने होतात ती बव्हंशी प्रेमलग्नेच असतात. दोन्हीकडल्या कुटुंबात मानसिक आणि वैचारिक मोकळेपणा नसेल, स्वागतशीलता नसेल, उदारमनस्कता नसेल तर सांस्कृतिक, जातीय, धार्मिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. त्या परिस्थितीत मुलगेच विचारांनी ठाम नसतील तर मुलीच्या वाटय़ाला दुःख आणि गुदमरलेपणाच येणार. हिंदू समाजात आता पुष्कळ प्रमाणात परघरातून आलेल्या मुलींना मोकळेपणाची आणि सन्मानाची वागणूक मिळते. पण मुस्लीम समाजात ती मिळत नसावी. (मी मुद्दामच ‘नसावी’ असे म्हटले आहे.) म्हणून मुस्लीम समाजातील जे मुलगे परधर्मीय मुलींशी प्रेमविवाह करतील किंवा करू इच्छित असतील त्यांनी पत्नीची परवड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातला हिंदू-मुस्लीम विवाह हा प्रेमविवाह होता. त्यात कपटकारस्थान किंवा अन्य कोणता हेतू नव्हता. सध्या ज्या ‘लव्ह जिहाद’ची चर्चा चालू आहे. त्यात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळय़ात ओढण्याचे डावपेच असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच प्रेमाचे राजकारण करण्यात येत असल्याचा संशय घेण्यात येत आहे. प्रेमाच्या जाळय़ात ओढून लग्न करायचे आणि लग्नानंतर मुलीचे सक्तीने धर्मांतर करायचे, असे कपटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या जबरदस्तीमुळेच अशा विवाहांना विरोध होत आहे. हा सक्तीचा प्रकार नसता तर आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना विरोध करण्याचे कारण नव्हते. विरोध होत आहे तो ‘लव्ह’ला नाही, तो होतो आहे ‘लव्ह’च्या आधारे होणाऱया ‘जिहाद’ला! समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील एक नेते आझम खान यांनी ‘लव्ह जिहाद’ या भाषेला विरोध करताना प्रतिप्रश्न करीत म्हटले आहे की, मुख्तार अब्बास नक्वी आणि शहानवाज हुसेन यांना विचारा की लव्ह जिहादचा खरा अर्थ काय आहे ते! कारण, या दोघाही भाजप नेत्यांच्या बायका हिंदू आहेत! अनेक नेत्यांचाही हिंदू-मुस्लीम प्रेमविवाहांना विरोध नसावा. विरोध होत आहे तो ‘प्रेमा’च्या नाटकाला आणि ते नाटक ज्या फसवणुकीच्या पायावर आधारित आहे, त्या फसवणुकीच्या पायाला! आझम खान यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हटले की, काही मोजकेच लोक लव्ह आणि जिहाद या दोन्ही शब्दांचा गैरवापर करीत आहेत. आणि दोन धर्मीयांत अंतर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताची सव्वाशे कोटी जनता या समाजभेद्यांना योग्य ते उत्तर देईल. आझम खान ज्या सव्वाशे कोटी जनतेचा संदर्भ देत आहेत, त्या जनतेत निदान ऐंशी-नव्वद कोटी हिंदूधर्मिय आहेत. या एवढय़ा मोठय़ा जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी आझम खान यांनी पंचवीस कोटी मुस्लीमांचे प्रबोधन केले पाहिजे. सव्वाशे कोटी जनतेला एकमेकांशी न भांडता भारतातच एकत्र नांदायचे आहे हे पटवून दिले पाहिजे. सव्वाशे कोटींपैकी नव्याण्णव टक्के जनतेला एकमेकांशी न भांडता एकाच भूमीवर नांदायचे आहे, हे पटलेलेच आहे. फक्त एकच शंका या नव्याण्णव टक्यांच्या मनात असते ‘हस के लिया पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान’ या घोषणेला आझम खान विरोध का करीत नाहीत? मुस्लीम मतांच्या व्होट बँकेला तर विरोध का करीत नाहीत? मुस्लीम समाजाच्या मतांचे राजकारण करण्याला विरोध का करीत नाहीत? किंबहुना ते स्वतःच मुस्लीम मतांचे राजकारण का करतात? भारतात हिंदू आणि मुस्लीम समाजात वर्षातील काही दिवसच परस्परांबद्दल अविश्वास निर्माण होतो. मुस्लीम समाजाबद्दलचे अविश्वासाचे वातावरण कमी करून विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी बिगर राजकारणी मुस्लीमांनी पुढे आले पाहिजे, असे मुस्लीम समाजातील विद्वानांना आणि युवकांनाच वाटू लागल्याचे सांगणाऱया एक-दोन बातम्या माझ्या वाचनात आल्या. त्या अशा- 1) अलिगड (वृत्तसंस्था)-हिंदू तरुणींशी प्रेमाचे नाटक करून त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱया ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना अलिगड मुस्लीम विद्यापीठातील विद्वानांनाही आता जाग आली आहे. ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पनाच इस्लाममध्ये अस्तित्वात नाही. खोटी वचने, आश्वासने देऊन मुलींची फसवणूक करणे इस्लामला मान्य नाही, असे या विद्वानांचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या सुन्नी तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख मुफ्मती झहीद अली खान आणि सहयोगी प्राध्यापक एम. सलीम यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ‘लव्ह जिहाद’चा निषेध केला आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू तरुणींची फसवणूक करून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न होत असेल, तर मुस्लिम संघटनांच्या निदर्शनास हा प्रकार आणून द्यावा. मुस्लीम संघटनांनी हे धर्मांतर रोखून संबंधित दोषीला शिक्षा करावी, असे या विद्वानांनी म्हटले आहे. (दै. सामना, 12 सप्टेंबर 2014). 2) अलिगड मुस्लीम विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांच्या ‘स्टुडण्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन’ या संघटनेने ‘ब्रिज द गॅप, ब्रिंग द चेंज’ (अंतर मिटवा, बदल घडवा) या नावाने एक यात्रा काढायचे ठरविले आहे. या संघटनेचे 20 हजार सदस्य आहेत. या यात्रेद्वारा हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. (टाइम्स ऑफ इंडिया. 10 सप्टेंबर 2014). ‘लव्ह जिहाद’ला विरोध होऊ लागल्याने मुस्लीम समाजातील अभ्यासक, विद्वान, शिक्षक, प्राध्यापक, कॉलेज विद्यार्थी असा सुशिक्षितांचा वर्ग धैर्याने बोलू लागला ही स्वागतार्ह बाब आहे. धार्मिक धुरीणांच्या वर्चस्वाखालून आणि धर्मनिष्ठ मतपेटय़ांच्या राजकारणातून मुस्लीम समाजाची सुटका होणे आता आवश्यक आहे. समाजप्रबोधनाचे वारे मुस्लीम समाजात जेवढय़ा वेगाने वाहतील, तेवढे स्वागतार्हच ठरेल!.

LOVE JIHAD MUST READ-THE VOICE FOR JUSTICE

*****न्या. सुरेंद्र भार्गव**** ‘दि व्हॉईस फॉर जस्टिस’ ही चेन्नईस्थित अ-राजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिथेजिथे मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले दृष्टोत्पत्तीस येतं तिथे तिथे ही संस्था पोहोचते. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी, त्यातील तथ्यशोधनासाठी, त्याचे तटस्थपणे विश्लेषण करून मानवाधिकारांची पुन:स्थापना करण्यासाठी ही संस्था काम करते. सर्वोच्च तसेच उच्च न्यायांलयातले निवृत्त न्यायमूर्ती, निष्णात वकील, निवृत्त आय.ए.एस./आय.पी.एस. अधिकारी, संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना एकत्र आणून ही संस्था काम करते. या व्यक्तींनी समोर असलेल्या सामाजिक प्रश्नाचा सखोल अभ्यास करावा, त्यातील तथ्य शोधतानाच समाजऐक्य टिकवण्यासाठी, समाजाचे आरोग्य राखण्यासाठी उपाय सुचवावेत अशी अपेक्षा असते. केरळमधील हिंदू घरातील मुली गायब होण्याच्या घटनांवर आधारित बातम्या, जन्मभूमी तसेच मल्याळम मनोरमा या प्रतिष्ठित नियतकालिकात वारंवार प्रकाशित झाल्या. या बातम्यांच्या आधारे ‘लव जिहाद’चा अभ्यास करायचे संस्थेने ठरवले. प. बंगाल आणि केरळ ही कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेली आणि म्हणूनच धर्मांध मुस्लिमांसाठी मोकळे रान ठरलेली दोन राज्ये. ‘लव्ह जिहाद’ या चळवळीने जोर धरला तो याच राज्यात. त्यानंतर हळूहळू अन्य राज्यांत तिने हातपाय पसरले. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून, देशाच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ने या प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या समितीमध्ये सिक्किम उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुरेंद्र भार्गव यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या 7 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा प्रा. सुवर्णा रावळ यांचा समावेश होता. या समितीने संस्थेला जो अहवाल सादर केला, त्या अहवालाचे साररूप म्हणजे हा लेख. ‘व्हॉइस ऑफ जस्टिस’ ही चेन्नई येथील एक स्वयंसेवी संस्था आहे. तिचे मुख्य उद्दिष्ट आहे मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे. या संस्थेमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, नामांकित कायदेतज्ज्ञ, निवृत्त आयएएस/आयपीएस अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी तसेच शिक्षणक्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि विशिष्ट विषयातील तज्ज्ञ व्यक्ती निवडल्या आहेत. आणि जेव्हा एखादी सामाजिक, कायदेविषयक समस्या उभी राहते, तेव्हा ही संस्था या तज्ज्ञ मंडळींना या समस्येचा सखोल अभ्यास करण्यास व त्यावरील उपाययोजना सुचविण्याची विनंती करते. भारतात मलबारमध्ये स्त्रियांना समाजात विशेष मानाचे स्थान आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच मलबारमध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला आणि चारित्र्याला धोका उत्पन्न झाला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यापैकी काही विकल्या गेल्या आहेत, परदेशात पाठविल्या गेल्या आहेत, म्हाताऱ्यांना दिल्या गेल्या आहेत किंवा गुन्हेगारांच्या/दहशतवाद्यांच्या सेवेसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आणि हे सर्व त्यांच्या ‘प्रियकरांनी’ केले आहे. अशा हरवलेल्या मुलींची संख्या केरळमध्ये हजारांनी आहे. ‘जागो इंडिया’च्या 2 सप्टेंबर 2009मध्ये इंटरनेटवर बातमी होती की, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये केरळ इस्लामिक ऑर्गनायझेशनने हिंदू असलेल्या मुलींना भुलवून त्यांचे धर्मांतर करण्याची मोहीम राबवली. गेल्या पाच वर्षांमध्ये केरळमध्ये 940 मुली बेपत्ता आहेत.’ अशाच एका प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नाकारताना न्यायमूर्ती शंकरन यांनी काही महत्त्वपूर्ण माहितीची नोंद केली. त्यापैकी काही अशी आहे. …एडीएफ आणि पीएफआय या संघटनांची विद्यार्थ्यांसाठी ‘कॅम्पस फ्रंट’ नावाची शाखा आहे. ती शैक्षणिक संस्थांमध्ये आणि व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणींना धर्मांतरास प्रोत्साहन देते. …सौदी अरेबियातील काही संस्था या धर्मांतराच्या कामास, तरुणांकरिता शिष्यवृत्ती या नावाखाली पैशांचा पुरवठा करते. …उत्तर प्रदेश, पुणे, बंगळुरू येथेही धर्मांतराची अशी प्रकरणे आहेत व बऱ्याच हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर केले गेले आहे. …गेल्या चार वर्षांत केरळमध्ये अशा प्रेमप्रकरणांतून मुलींच्या धर्मांतराच्या 300 ते 400 तरी घटना घडल्या आहेत आणि पोलीस खात्यानुसार असे विवाह हे समाजात तणाव निर्माण करू शकतात. न्यायमूर्ती शंकरन यांनी आणखी काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. …असे स्पष्ट झाले आहे की, एका विशिष्ट धर्मातील मुलीचे दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याचे प्रयत्न जाणूनबुजून केले जात आहेत आणि त्याला काही संघटनांचा आशीर्वाद आहे. सामान्य जनतेने आणि सरकारनेही त्याची दखल घेणे जरुरीचे आहे. नागरिकांचे हक्क व मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असते. घटनेमधील 25वे कलम कोणालाही जबरीने धर्मांतर करण्याचे अधिकार देत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकता, असा तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ होत नाही. …पालकांना त्यांच्या सज्ञान मुलांचेही आयुष्य घडविण्याचा हक्क आहे. ते मुलांना सल्ला देऊ शकतात. कोणीही तिऱ्हाईत त्या पालकांना तसे करण्यापासून अडवू शकत नाही. व्यक्तीचे स्वातंत्र्य राखणे हा कलम 25चा उद्देश आहे. कुटुंबसंस्था व संस्कृती नष्ट करण्याचा नाही. शैक्षणिक संस्था, जेथे तरुण मंडळी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात, या जागा धर्मप्रसारासाठी नाहीत. आपल्याकडील काही राज्यांनी बळजबरीने किंवा प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यावर बंदी घातली आहे. ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार केरळमध्येच चालू आहे असे नाही, तर पश्चिम बंगालमध्येही हा चालू आहे. ही दोन्ही राज्ये – केरळ आणि प. बंगाल ही कम्युनिस्ट विचारसरणीची आहेत आणि तेथे मुस्लीम कट्टरवादी, तसेच SIMI, SIO, JEL, HUJI, हिजबुल मुझाहिद्दीन आणि ISI यासारख्या दहशतवादी संघटनांना रान मोकळे आहे आणि बिनसरकारी संस्थांच्या माध्यमातून समाजावर इस्लामची पकड बसविण्याचा उद्योग करीत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आणि इतर राज्यांतूनही अशा प्रकरणांची नोंद आलेली आहे. फक्त हिंदू मुलींचे धर्मांतर होते असे नाही, तर ख्रिश्चन मुलीही याला बळी पडत होत्या. त्यांच्याही बाबतीत आधी प्रेम व नंतर धर्मांतर केले जात असे. काही ख्रिश्चन व हिंदू संघटनांनी या प्रकाराबद्दल आवाज उठविला, तर काही राजकारण्यांना या आवाज उठवण्यामागे राजकारण दिसले. प्रेमातून फसवून धर्मांतर याकडे सबंध भारताचे लक्ष वेधले गेले आहे. मानवी हक्कासाठी झटणाऱ्या संघटनांना आणि सामाजिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांस ते एक आव्हान होते. ‘व्हॉइस फॉर जस्टिस’नेही या घटनांची दखल घेतली आणि या प्रकरणांची शहानिशा करण्यासाठी व त्यातील सत्य जनतेपुढे आणण्यासाठी एक सत्यशोधक समिती नियुक्त केली. यामध्ये केरळ राज्य वगळून इतर राज्यातील नि:पक्ष तज्ज्ञमंडळी होती. 1. सुरेंद्र भार्गव – भूतपूर्व न्यायाधीश, सिक्कीमउच्च न्यायालय – जयपूर (राजस्थान) 2. टी.एस. राव – भूतपूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस – हैद्राबाद (आंध्र प्रदेश) 3. गुरुचरणसिंह गिल – भूतपूर्व अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल – जयपूर (राजस्थान) 4. डॉ. आय.बी. विजयालक्ष्मी MD, DM. बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्तंभलेखिका – बंगळुरू (कर्नाटक) 5. डॉ. सुवर्णा रावळ – अध्यक्षा, भटके-विमुक्त जाती विकास स्वयंसेवी संस्था – भिवंडी (महाराष्ट्र) 6. पी. गणपती – उद्योगपती – चेन्नई 7. एस. रवी – वकील – चेन्नई 8. रमेश पी. गर्ग – औषधनिर्मिती सल्लागार या समितीने काय शोधायचे होते? 1. वर्तमानपत्रामध्ये धर्मांतराबद्दलच्या ज्या बातम्या येतात, त्या घटना प्रत्यक्ष केरळमध्ये घडत आहेत का? 2. धर्मांतराच्या अशा घटनांमागे काही उद्देश आहे का? त्या घटनांमध्ये काही साम्य आहे का? का ती निव्वळ प्रेमप्रकरणे आहेत? 3. सूचना-उपाययोजना सुचविणे सत्यशोधक समितीची कार्यपध्दती समितीने केरळमध्ये जाऊन मुलाखती घेतल्या. त्यामध्ये फसवल्या गेलेल्या मुली, त्यांचे पालक यांचा आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. फसवल्या गेलेल्या मुलींनी मुलाखतीला येण्याचे टाळले. पण बरीच पालक मंडळी आली. त्यांच्या दृष्टीने हा वैयक्तिक प्रश्न राहिला नसून तो सबंध समाजापुढील समस्या बनलेला आहे. त्यांनी त्यांच्या मुली गमावल्या, पण दुसऱ्यांची तशी गत होऊ नये यासाठी त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्यास वाहून घेतले आहे आणि मुलींचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांविरुध्द लढा सुरू केला आहे. सामाजिक संस्थांमध्ये ख्रिश्चन असोसिएशन ऑफ सोशल ऍक्शन (सासा), विश्व हिंदू परिषद, मनशक्ती समुपदेशन केंद्र, जन्मभूमीचे संपादक यांनी आणि काही तज्ज्ञ मंडळींनी बरीच माहिती पुढे अाणली. सत्यशोधन समितीपुढे झालेल्या कथनांची झालक (फसवणूक झालेल्या काही व्यक्ती, पालक आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सत्यशोधन समितीसमोर अनेक हकिकती कथन केल्या. त्या कथनांमधील निवडक उतारे - 1. सुदेश हेराला – कासारगोड येथील श्रीशंभू व सुषमा राव यांचा मुलगा – कोट्टायम येथे माझी नाशीरशी ओळख झाली. त्यांनी माझी खादिनाशी ओळख करून दिली. ती पूर्वी हिंदू होती व तेव्हाचे तिचे नाव विनिता होते. मी पोन्नानी येथे दोन महिने होतो. तिथे माझे धर्मांतर झाले व माझा खादिनाशी विवाह झाला. मला दररोज रु. 50/- देत असत व जर मी आणखी हिंदूंना धर्मांतरासाठी आणले तर जादा पैसे देऊ असे सांगत. दोन महिने मी कुराण शिकलो. धर्मांतर झाल्यावर पहिल्यांदा मला गोमांस खावे लागले. त्याआधी माझी सुंता करण्यात आली. मला दररोज 300 रुपये देत, पण त्यापैकी 250 रुपये खादिनला द्यावे लागत. दोन महिन्यांनंतर तिने माझ्याबरोबर राहणे बंद केले. मला पैसे देणे बंद केले. मग मी तिथून पळालो. त्यांनी माझ्या हातात एक गंडा बांधला होता. तेव्हापासून मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत असे. पोन्नानी हे धर्मांतर करण्याचे केंद्र होते. तिथे देशभरातून माणसे आणली जात. बशीरकडे मोबाइल होता. पण त्याने मला नंबर दिला नाही. घरी परतल्यावर मी पोलिसांकडे गेलो, पण मला मदत करण्याऐवजी त्यांनी मलाच दम दिला. कासारगोड पोलीस ठाण्यात माझ्या प्रकरणाची नोंद आहे. मी यापुढे कोणाही मुस्लिमावर विश्वास ठेवणार नाही. पोन्नानी येथे चौदा पुरुष व तीस स्त्रिया होत्या. सर्वांचे धर्मांतर केले गेले होते. पोन्नाई हे धार्मिक स्थळ नाही, तर धर्मांतराचे केंद्र आहे. 2. फ्रान्सिस डिकसन ऍन्थनी – पावडीकुडी – चर्चेस असोसिएशनचे सेक्रेटरी. यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले - …त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत. त्यांना देशामध्ये एकता नको आहे. कुटुंबसंस्था मजबूत करण्यात देशाचे ऐक्य आहे. म्हणून त्यांना कुटुंबे उद्ध्वस्त करायची आहेत. केरळ शिक्षणात अग्रेसर आहे. जर शिक्षणक्षेत्र बिघडवले, तर सर्व देश बिघडेल, म्हणून त्यांनी शिक्षणसंस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोचीनमधील बहुतेक सर्व कॉलेजात – विशेषत: डायोसिस भागात ही कीड पसरली आहे. ऍक्विनॉस कॉलेजात बी.एड. शिकणाऱ्या एका ख्रिश्चन मुलीवर मुस्लीम मुलाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांनी तिला मोबाइल दिला नाही, तो या मुलाने दिला. आईने तो काढून घेतला आणि मुलगी रागावून घर सोडून गेली. अब्रू जाईल म्हणून पालक पुढे आले नाहीत. जेव्हा मुस्लीम मुलगा असला प्रकार करतो, तेव्हा त्याची सगळी जमात त्याला मदत करायला येते. पण आपल्याकडे अशा व्यक्तीला व कुटुंबाला मदत करायला कोणी पुढे येत नाही. … अशा कामांसाठी आइसक्रीम पार्लर्सचा – जेथे त्या मुलींना ड्रग्स देता येतात – वापर केला जातो. हे पार्लर्स मुस्लीम मुलांच्या मालकीचे असतात. तसेच ज्यूस सेंटर, मोबाइल चार्जिंग सेंटर व सायबर कॅफेही या कामांसाठी वापरली जातात. तीही बहुतेक मुस्लिमांच्या मालकीची असतात. परिणामी मुली फसतात, भुलतात. अशा प्रकरणात पालक गुंडांच्या भीतीने व समाजातील बदनामीच्या भीतीने तक्रार नोंदवत नाहीत. CPIपैकी एक गट अशा गुन्हेगारांना मदत करतो आणि यासाठी हवालातून येणारा पैसा वापरला जातो. सौदी अरेबियातून वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फरमार्फत हवाला पैसा येतो. हज यात्रेकरूंमार्फतही पैसा येतो, कारण त्यांची कसून तपासणी होत नाही. या मुस्लीम मुलांना पैसा व वाहने दिली जातात. ही मुले मुलींच्या पालकांना धाकदपटशाही दाखवितात. जेव्हा एखादी मुलगी मोबाइल रिचार्ज करायला येते, तेव्हा तिचा नंबर समजतो. तो दुसऱ्या मुलाला दिला जातो. तो मग तिला सुरुवातीला SMS पाठवतो किंवा फोन करतो व ‘राँग नंबर लागला’ म्हणून नम्रपणे बंद करतो. असे होता होता संभाषण वाढवितो. मैत्री सुरू होते. तेव्हा अगदी आदराने, नम्रपणे व स्तुती करीत असतो व मुलींवर चांगली छाप पाडतो. मग हळूच आइसक्रीम पार्लरवर वा ज्यूस सेंटरवर बोलावतो. तिथे गोडधोड संभाषण, कधीकधी ड्रग दिले जाते आणि मुली नादी लागतात. शेवटी फसतात. अशा पार्लर्सविरुध्द पोलिसात तक्रार केली, पण त्यांच्या विरोधात काही कारवाई करण्यात आली नाही. काही वेळा हिंदू मुलींचे मुस्लीम मुलाबरोबर फोटो काढले जातात व त्यावरून ब्लॅकमेलिंग केले जाते. वैदेही नायरच्या पालकांनी सांगितले - …तो मुलगा फक्त मोटार ड्रायव्हर आहे, तर वैदेही M.Sc.च्या शेवटच्या सत्राची विद्यार्थिनी आहे. तिला 84 टक्के गुण मिळाले आहेत. पण तिचे विचार बदलून, ब्लॅकमेलिंग करून व वशीकरणामुळे ती आता आमच्याकडे परत येत नाही. ही त्याची खूप सेवा करते, पण उद्या ‘तलाक तलाक तलाक’ म्हणून त्याने तिला सोडून दिल्यावर ती कुठे जाईल? …सुप्रसिध्द लेखिका कमला दास यांच्यापासून लव्ह जिहादची सुरुवात झाली. त्या एका मुस्लीम प्रोफेसरसोबत पुस्तक लिहीत होत्या. तो चांगला गातही असे. त्याला आधीच्या दोन बायका होत्या. कमला विधवा होती. तो तिच्याहून बराच लहानही होता. पण त्याने तिला लग्नाला तयार केले. तिने धर्मांतर केले व लग्न केले. तिचे नाव झाले कमला सुरैया. मात्र लग्नानंतर त्या नवऱ्याने तिला सोडून दिले. ती पुन्हा हिंदू धर्मात येऊ शकली नाही. मोबाइल फोन हा एक शापच आहे. एका गरीब घरात तीन मुली होत्या. बारावीत होत्या. त्यांच्या मुस्लीम मित्रांनी त्यांना मोबाइल फोन घेऊन दिले. एक दिवशी त्यांना निर्जन ठिकाणी नेण्यात आले. त्यांच्यावर बलात्कार केला, त्याचे छायाचित्रण केले आणि मग देहविक्रय करावा म्हणून ब्लॅकमेल करू लागले. मुली त्या त्रासाने हैराण झाल्या व त्यांनी आत्महत्या केल्या. सत्यशोधन समितीचे निष्कर्ष समितीने केरळमध्ये घेतलेल्या व्यक्तींच्या, संस्था चालकांच्या मुलाखती, न्यायमूर्ती शंकरन यांची टिप्पणी आणि वेगवेगळे अहवाल यांच्या आधारावर खालील निष्कर्ष काढले. - वर्तमानपत्रांमध्ये जी प्रकरणे प्रसिध्द झाली, ती बनवाबनवी नव्हती. अशी प्रकरणे केरळमध्ये रोज खरोखरच घडून येत आहेत. - बहुतेक प्रकरणांमध्ये एकच कार्यपध्दती आढळते. मोबाइलवर SMSने किंवा मिस्ड कॉलने प्रेमप्रकरणाची सुरुवात केली जाते. सुरुवातीला हे प्रेम खरे वाटते, पण पुढे त्यातून योग्य वेळ पाहून धर्मांतराचे प्रयत्न सुरू होतात. काही प्रकरणात प्रत्यक्ष धर्मांतर केले जाते, तर उरलेल्यांमध्ये धर्मांतर हाच उद्देश असतो. - मोबाइल फोनच्या दुकानात अशा प्रेमप्रकरणांची सुरुवात होते. रिजार्च घेण्यासाठी आलेल्या मुलींचे फोन नंबर व इतर माहिती गुन्हेगारांना दिली जाते. ज्यूस व आइसक्रीम पार्लरमध्ये भेटीगाठींची सुरुवात होते. - धर्मांतरासाठी परदेशातून पैसा येतो, तसेच फसलेल्या मुलींना देहविक्रयकरण्यास भाग पाडणे, दहशतवादी कृत्यांमध्ये वापरणे वा दहशतवाद्यांना पुरविणे याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारांची सखोल चौकशी होणे जरुरी आहे. गरीब तरुण प्रियकर मैत्रिणींना मोबाइल भेट देतात, टू-व्हीलर नवीन घेऊन देतात यावरून त्यांना बाहेरून पैसा पुरवला जातो, हे स्पष्ट होते. अशा दोषी तरुणांचे पालक त्यांना प्रत्यक्ष मदत करत नसले, तरी त्यांची समवयस्क मित्रमंडळी व जमातीतील लोक त्यांना पूर्ण प्रोत्साहन देतात व दहशतही उत्पन्न करतात. - काही प्रकरणांमध्ये संमोहन, मंत्रतंत्र, वशीकरण अशाचा वापर होतो. सरतेशेवटी त्या मुलींचे आयुष्य नासविले जाते. त्या स्थितीत तिचे पालकही तिला साहाय्य करीत नाहीत. त्या मुलींना नरकयातना सोसाव्या लागतात व त्या आत्महत्या करतात. - अशा प्रकरणांच्या विरोधी कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचीच सर्वच पोलिसांची प्रवृत्ती असते. अशा प्रकरणांमध्ये मतांवर परिणाम होण्याच्या भीतीने राजकारणीही दुर्लक्ष करतात. - सामाजिक संघटना, समाजसेवक, प्रसारमाध्यमे या बाबतीत फार चांगली भूमिका पार पाडत आहेत. परंतु सरकारने इतक्या दाहक वस्तुस्थितीची पुरेशी दखल घेतलेली नाही. इतर राज्यांतही अशी प्रकरणे घडण्याची शक्यता आहे. याची पुरती चौकशी व बंदोबस्त व्हायला हवा. - समितीपुढे आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये प्रियकर मुलगे मुस्लीम होते आणि फसलेल्या मुली हिंदू अथवा ख्रिश्चन होत्या. केरळमध्ये हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अशा प्रकरणांमुळे या समाजामध्ये वैमनस्य पसरण्याची व राज्यात मोठया प्रमाणात अशांतता माजण्याची शक्यता आहे. समितीने केलेल्या शिफारशी - अशा प्रकरणांबाबत जागृती व्हावी, यासाठी शाळा, महाविद्यालयात त्यांच्या संचालकांनी आणि सरकारने समाजसेवकांची, तज्ज्ञांची भाषणे, परिसंवाद आयोजित करावे. त्यामुळे निष्पाप मुली अशा प्रकारांना बळी पडणार नाहीत. - अशा प्रकरणांवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी पोलीस खात्यामध्ये, राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर विशेष दक्षता पथके स्थापन करावीत. त्यांना मदत करण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन सदस्य असलेली समुपदेशक समिती प्रत्येक जिल्ह्यात नेमावी. - अशा प्रकरणांसाठी होणारी परदेशी आर्थिक मदत, मुलींना वाममार्गास लावणे, दहशतवादी कृत्यांसाठी मुलींचा उपयोग करणे याचा उच्च पातळीवर तपास केला जावा. त्यामुळे राज्यात सर्वसामान्यांच्या हक्कांचे रक्षण होईल व खरे प्रजासत्ताक अंमलात येईल. - मुलांच्या वर्तणुकीबाबत मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पालकांमध्ये जागृती आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनासाठी कार्यशाळांचे/चर्चासत्राचे आयोजन करावे. - अशा बेकायदा धर्मांतरास आळा बसावा म्हणून केरळचे सरन्यायाधीश टी. शंकरन यांनी आणि केंद्र सरकारने सुचविल्याप्रमाणे ‘धर्मांतर बंदी कायदा’ लागू करावा. इतर राज्यांमध्येही अशा प्रकरणांबद्दल चौकशी केली जावी. अशा प्रकरणांचा मागोवा घेणे, तपास करणे व त्यांना आळा घालणे यासाठी राज्यस्तरावर एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. - अशी प्रकरणे होऊ नयेत अशी खबरदारी घेण्यामध्ये मानव हक्क संरक्षण संघटनांनीही महत्त्वाची जबाबदारी उचलावी. समितीला या सत्यशोधनाच्या कामात फसवणूक झालेल्या मुलींचे पालक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले. या सगळयांच्या सहकार्यामुळेच अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर समिती एका निष्कर्षाप्रत येऊ शकली. श्रीमती लीला मेनन (संपादिका, जन्मभूमी) …मध्य केरळातील दोन मुली मुस्लीम मुलांबरोबर पळून गेल्या. या मुली MBA करीत होत्या आणि ती मुले बस कंडक्टर होती. त्यांनी येनकेन प्रकारे मैत्री जमविली आणि मग त्यांना मुस्लीम धर्माचे ग्रंथ (कुराण) दिले व इतर रीतिरिवाज शिकवले. शेवटी त्या पळून गेल्या व त्यांनी लग्न केले. या सगळया लव्ह जिहाद प्रकरणात मुलींना मदरशात नेले जाते. तिथे कुराण शिकविले जाते आणि त्यांचे धर्मांतर केले जाते. …सुप्रसिध्द लेखिका कमला दास यांच्यापासून लव्ह जिहादची सुरुवात झाली. त्या एका मुस्लीम प्रोफेसरबरोबर पुस्तक लिहीत होत्या. तो चांगला गातही असे. त्याला आधीच्या दोन बायका होत्या. कमला विधवा होत्या. तो त्यांच्याहून बराच होता. पण त्याने कमला यांना लग्नाला तयार केले. कमला यांनी धर्मांतर केले आणि लग्न केले. त्यांचे नाव झाले ‘कमला सुरैया’. मग लग्नानंतर त्याने कमला यांना सोडून दिले. त्या पुन्हा हिंदू धर्मात येऊ शकल्या नाहीत. … असे ऐकले की त्या प्रोफेसरला, कमलाचे धर्मांतर करण्यासाठी आखाती देशातून एक कोटी रुपये दिले गेले होते. कारण ती एक सुप्रसिध्द व्यक्ती होती. …त्याला पैसा मिळाल्यावर त्याने तिला सोडले. त्याचा इतर बायकांशीही संबंध होता. त्याला कमलापाशी राहायचे नव्हते. शिकलेल्या मुली अशा नालायक मुलांवर भाळतात कशा? याचे कारण बहुतेक मुस्लीम मुले इतरांपेक्षा दिसायला चांगली असतात. त्यामुळे मुलींवर छाप चांगली पाडू शकतात. माझे असे म्हणणे आहे की, आया मुलींकडे दुर्लक्ष करतात म्हणून मुली बिघडतात. आई आणि मुलगी यांच्यात मोकळे बोलणे होतच नाही. बऱ्याच मुली सांगतात की त्यांच्या आईला त्यांच्याशी बोलायला वेळ नसतो. केरळमधील मुली बेपत्ता होण्याच्या घटना जिल्हा घटनांची तक्रारी सोडवलेल्या संख्या नोंदवल्या मुली त्रिवेंद्रम 216 26 6 कोळम 98 34 7 आलाप्पुझा 78 22 5 पथनमथित्तं 87 36 11 इडुक्की 156 18 9 कोट्टायम 116 46 13 एर्नाकुलम 228 52 26 त्रिसूर 102 41 19 पलाक्कड 111 19 9 मल्लापुरम 412 88 31 कोझीकोडे 364 92 29 कन्नूर 312 106 27 कासारगोड 585 123 68 (संदर्भ : ‘जन्मभूमी’ मल्याळी मासिक

Thursday, 4 September 2014

LOVE JIHAD IN INDIA-BALBIR PUNJ MEMBER PARLIMENT

‘‘जगाच्या दृष्टीने नजरेत तू भलेही माझी पत्नी असशील, पण माझ्या दृष्टीने तू अद्यापही माझी पत्नी झालेली नाही. जोपर्यंत तू तीन वेळेस ‘मुझे कबूल है, कबूल है, कबूल है’ असे म्हणत नाही.’’ हिंदू रीतिरिवाजानुसार एक हिंदू मुलगी विवाह करून जेव्हा पहिल्यांदाच सासरी गेली आणि त्याचवेळी जर तिला समजले की ज्या मुलाने स्वत:ला हिंदू असल्याचे सांगून तिच्याशी विवाह केला आहे, तो वास्तवात मुसलमान आहे, तर त्या मुलीची अवस्था कशी होईल? प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून सुंदर व सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगवून ज्याच्या हवाली तिने जीवनाची सारी सूत्रे सोपविली, तोच तिने इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून मधुचंद्राच्या दिवशी तिचा छळ करीत असेल, तर यापेक्षाही भयंकर आणखी काय असू शकेल? काही दिवसांपूर्वी झारखंडची राजधानी रांची येथे असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. राष्ट्रीय रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकवलेली तारा शाहदेवने स्वप्नातही विचार केला नसेल की, ज्या व्यक्तीसोबत आपला विवाह होत आहे, तो वास्तवात इस्लामी कट्टरपंथीयांकडून चालविण्यात येणार्‍या ‘लव्ह जिहाद’चा भागीदार आहे. स्वत:ला जगासमोर रंजितकुमार कोहली म्हणविणार्‍या ज्या व्यक्तीसोबत ताराने विवाह केला, तो वास्तवात रकीबुल हसन निघाला. प्रथम तर ताराला या प्रकरणाची हवाही लागली नाही. तिने विचार केला, आता जर विवाह केलाच आहे तर ‘कबूल है’ असे म्हणण्यात काय अडचण आहे? तिने ‘कबूल है’ असे तीन वेळा म्हटले. दुसर्‍याच क्षणी जेव्हा तिच्या हाती कुराण थोपवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले, तेव्हाच आपल्याशी मोठा विश्‍वासघात झाल्याचे तिला कळले. रकीबुलने, पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून पहिल्याच दिवसापासून तिचा छळ करणे सुरू केले. तिचे तारा हे नाव बदलवून ‘सारा’ असे ठेवण्यात आले. ताराने धर्मपरिवर्तन करण्यास नकार दिल्याने रकीबुल आणि त्याच्या आईने तिला मारहाण केली, तिला उपाशी ठेवले. तिला दहशतीत ठेवण्यासाठी तिच्यावर कुत्रे सोडण्यात आले. ताराला कोंडून ठेवण्यात येत होते आणि माहेरच्यांशी बोलण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. ताराचा मोबाईल रकीबुलने हिसकावून घेतला होता. तिच्या शरीरावर सिगारेटने चटके दिल्याच्या खुणा आहेत. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. तिला पुन्हा नेमबाजी करता येऊ नये म्हणून तिचा पाठीचा कणा तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आज ती व्यवस्थित चालूही शकत नाही. याविषयी कुठे वाच्यता केल्यास तुझ्या संपूर्ण कुटुंबालाच संपविण्यात येईल, अशी धमकी ताराला देण्यात आली होती. त्यामुळेच तिने बर्‍याच दिवसांपर्यंत तोंड बंद ठेवून छळ सहन केला. अखेर रकीबुलच्या अनुपस्थितीत तिने मोलकरणीच्या हातून आपल्या कुटुंबीयांकडे निरोप पाठविला, त्यानंतरच तिला मोकळा श्‍वास घेता आला. प्रकरणाचा भंडाफोड होताच रकीबुल आपल्या आईसह फरार झाला. पण, पोलिसांनी त्यांना शोधलेच. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रकीबुलच्या तीन घरांना सील ठोकले आहे. ही घरे २०-२० हजार रुपये प्रतिमहिना भाड्याने घेण्यात आली होती. रकीबुलची अर्ध्या डझनहून अधिक वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेची मीडियात चर्चा तर झाली. मात्र, कुणीही मूलभूत प्रश्‍न उपस्थित करण्याची तसदी घेतली नाही. काही दिवसांपासून पश्‍चिम उत्तरप्रदेश ‘लव्ह जिहाद’च्या मानसिकतेमुळे दंगलींच्या सावटाखाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटना सहजतेने घेतल्या असून ‘कुणाला प्रेम करण्यापासून कसे रोखणार?’ असा साळसूद सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे मल्टिकम्युनल व सेक्युलॅरिस्टांचे तर्कट आहे की ‘लव्ह जिहाद’ म्हणजे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी संघपरिवाराचे सुनियोजित कारस्थान आहे. येथे हा प्रश्‍न उपस्थित होतो की, केवळ हिंदू मुलीच मुसलमान मुलांच्या प्रेमपाशात का अडकत आहेत? जर विवाह दोन मनांचा संगम असेल, तर केवळ हिंदू मुलींना धर्मांतर करण्यास का भाग पाडले जाते? मुसलमान मुले धर्मांतर करून आपल्या प्रेमाचा दाखला का देत नाहीत? वास्तविकता तर या सेक्युलर तर्कटाच्या अगदीच विरुद्ध आहे. जेव्हा केव्हा मुस्लिम मुली हिंदू मुलांशी विवाह करतात, तेव्हा मुस्लिम समाजातील कट्टरपंथी लोक रस्त्यावर उतरून अक्षरश: हैदोस घालतात. तर दुसरीकडे हिंदू मुलीने मुसलमानाशी लग्न केल्यास आनंद मनविण्यात येतो? याउलट मुस्लिम युवती आणि हिंदू मुलगा यांच्यातील प्रेमसंबंध आणि विवाहावर आधारित ‘बॉम्बे’ चित्रपटाचा काय परिणाम झाला? तेव्हाही मुस्लिम कट्टरवाद्यांनी प्रचंड गदारोळ माजविला होता. कित्येक ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन त्यांनी होऊ दिले नव्हते. ऑगस्ट २००९ मध्ये मुस्लिमबहुल काश्मीर खोर्‍यातील अमीना यसुफ नावाच्या मुस्लिम युवतीने जम्मूचा हिंदू मुलगा रजनीश शर्माशी विवाह केला होता. जम्मूच्या आर्यसमाज मंदिरात दोघांचा विवाह झाला आणि अमीनाने स्वेच्छेने हिंदू धर्माचा स्वीकार करून आपले नाव ‘आंचल’ असे ठेवले. अमीनाच्या ‘रखवालदार’ वडिलांना ही बाब झोंबली आणि पोलिस कोठडीत रजनीशची हत्या झाली. खुद्द अमीनाने तेव्हा पत्रकारांसमोर हा आरोप केला की, जर रजनीशने धर्मपरिवर्तन केले असते तर माझे वडील माझ्या ‘निकाह’मध्ये आनंदाने नाचले असते आणि त्यांनी लाडू वाटले असते. ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा सेक्युलॅरिस्ट मान्य करीत नाहीत. पण, वस्तुस्थिती ही आहे की केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, झारखंड, उत्तरप्रदेश येथे ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी जाहीरपणे म्हटले होते की, संपूर्ण केरळचे इस्लामीकरण करण्याचे कारस्थान सुरू आहे. तेथे सुनियोजित पद्धतीने हिंदू मुलींसोबत मुस्लिम मुलांचा निकाह लावून देण्याचे कारस्थान सुरू आहे. डिसेंबर २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केटी शंकरन यांनी ‘लव्ह जिहाद’ वर अतिशय कठोर टिप्पणी करीत म्हटले होते, ‘असे संकेत मिळत आहेत की प्रेमाच्या आडून जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचे कारस्थान सुरू आहे. विश्‍वासघात आणि फसवणूक करून करण्यात आलेल्या धर्मपरिवर्तनास कदापि मान्यता दिली जाऊ शकत नाही.’ याच्याही फार पूर्वी सन २००६ मध्ये लखनौ खंडपीठानेही तत्कालीन राज्य सरकारला विचारणा केली होती की, केवळ हिंदू मुलीच इस्लामचा स्वीकार का करीत आहेत. निकाहसाठी मुस्लिम मुले आपला धर्म का बदलत नाहीत? न्या. राकेश शर्मा यांनी तेव्हा टिप्पणी केली होती, ‘‘न्यायालयासमोर सातत्याने अशी प्रकरणे येत आहेत, ज्यात हिंदू मुलींनी इस्लामचा स्वीकार केल्यानंतर त्यांचा निकाह मुस्लिम मुलांशी करून देण्यात येतो. मात्र, विवाहानंतर या मुलींचा कुठेही ठावठिकाणा लागत नाही.’’ न्यायालयांनी केलेल्या या टिप्पणीला सेक्युलॅरिस्ट व मल्टिकम्युनल नाकारू शकतील काय? ‘लव्ह जिहाद’साठी सीमेपलीकडील जिहादी संघटनांकडून कॉलेजमध्ये जाणार्‍या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुस्लिम मुलांना अधिकृतपणे नियुक्त केले जाते. आकर्षक, स्मार्ट दिसणार्‍या अशा मुस्लिम मुलांच्या हायफाय व खर्चीक राहणीमानाचा संपूर्ण भार संघटना आपल्या शिरावर घेते. अशा मुलांना श्रीमंत घराचा वारस दर्शविण्यासाठी त्यांना कार, मोटारसायकल, महागडे मोबाईल्स इत्यादी उपलब्ध करून देण्यात येतात. रकीबुलला कुठून पैसा मिळत होता याची झारखंड सरकारने अवश्य चौकशी केली पाहिजे. ‘लव्ह जिहाद’ च्या अंतर्गत हिंदू युवतींशी निकाह केल्यानंतर या मुलांचा खरा चेहरा पुढे येतो. अशा मुलींना बाहेरच्या जगाशी संपर्क साधू दिला जात नाही. त्यांचा बहुतांश वेळ दहशतवाद, जिहाद आणि शेवटी त्याद्वारे इस्लामचे गुणगान करणारे व्हिडीओ किंवा पत्रके, पुस्तके पाहण्यात-वाचण्यातच खर्च होतो. हा सर्व त्यांना जिहादी बनविण्याच्या आणि आत्मघाती मानवी बॉम्ब बनविण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग आहे. अगदी आजपर्यंत बहुतांश मुस्लिम युवक धार्मिक विखार व कट्टरवादी वृत्तीमुळे हिंदू युवतींशी प्रेमविवाह करीत होते आणि या ‘पवित्र’ कार्यात त्यांना बहुतेक वेळा त्यांच्या कुटुंबीयांचेही सहकार्य लाभत होते. कारण एक काफीर ‘मोमिन’ झाली. आता या धार्मिक विखाराला ‘जिहाद’चे अस्त्र बनविण्यात आले आहे. - बलबीर पुंज

Sunday, 31 August 2014

Denial of Love Jihad by Dumb Hindu Politicians

Denial of Love Jihad by Dumb Hindu Politicians and Ignorant Telemedia Anchors - Ram Kumar Ohri, IPS (Retd) ……………. Love jihad by Muslim Romeos is not something new. Nor is the narrative a canard cooked up by the BJP top brass to win elections, as mischievously alleged by some dumb politicians (most of whom have Hindu names) and many ignoramuses among telemedia anchors. The dangerous phenomenon had found mention at least twice in the US diplomatic cables released by WikiLeaks in the years 2010 and 2011. It is a pity that some dumb politicians, wearing the green-coloured secularism on their sleeves have chosen to deny its existence. What is far worse is that many telemedia anchors and column-writers have started denying that love jihad has already made deep inroads into several parts of India. Nearly five years ago there was a major furore across several States of South India due to increased activities of Muslim youth working overtime to entice Hindu and Christian girls of impressionable age. Our ignoramus politicians and inadequately read media anchors ought to know that according to Wikileaks a cable mailed by Andrew T Simkin, US Consul General in Chennai on February 26, 3010, had alerted his bosses in the USA that "An alleged conspiracy of "foreign-funded" Muslim men attempting to seduce, marry, and convert Hindu and Christian women, has led to state-level investigations and generated widespread suspicions” in South India. The public at large dubbed the so-called conspiracy a "Love Jihad," and finally top politicians in Karnataka and Kerala were forced to confront the issue in public forums. The same denouement is likely to be repeated in U.P. Bihar and Maharashtra in the coming months where battalions of love jihadis funded by gulf petro-dollars have been on rampage for last several years. The contents of the wiki-cable further highlighted that many Hindu and Christian groups were outraged at the ongoing Islamic 'plot', while Muslim groups were trying to defend their co-religionists against the conspiracy theorists belonging to Hindu and Christian communities. Though police investigations in South India have cast doubt on the existence of an organized campaign of 'Love Jihad', the recurring assertion of its existence demonstrated “ the suspicion and intolerance that exist among some of the religious communities in the region." Initially the pernicious effects of the origin of Love Jihad had been noticed in the coastal region of southern Karnataka and northern Kerala, where religious and communal violence used to occur almost regularly. While India’s dumb politicians and ill-informed telemedia anchors continue to cast doubts on the existence of any love jihad campaign sweeping across many States of India, the stark truth highlighted by many researchers cannot be rebutted easily. On the one hand, Manish Tiwari of Congress, Naresh Agarwal of Samajwadi Party and the Chief Minister of U.P., Akhilesh Yadav were waxing eloquent on 24/7 television channels denying and deriding the campaign of Love Jihad. On the other hand simultaneously the complaint of a prominent national shooter, Tara Shahdeo, surfaced in media which shocked the Hindus. Tara has alleged that a Muslim, Raqibul Hussain had enticed her into love marriage by pretending that he was Hindu named Ranjit Kohli. She alleged that she was tortured to force her to accept Islam as her religion. Tara showed her injuries to Mahua Majhi, Chairperson of the State Women;s Commission. Her complaint is a complete rebuttal of the lies being trotted by the secular chatterati of India’s warped political universe! Incidentally, in a power point circulated by the World Sikh Alliance 4 years ago it was mentioned that Muslim love- jihadis in the U K were enticing Sikh and Hindu girls by pretending to be Sikhs by wearing a ‘Karra’ (iron bracelet regularly worn by Sikhs) and by claiming to have a Sikh surname like ‘Gill’. A copy of the Power Point circulated by World Sikh Alliance is appended to this article. No wonder, the modus operandi used by Raqibul Hussain to entice the unsuspecting Hindu girl Tara Shahdeo was similar to the strategem used by love-jihadis of the United Kingdom, exposed by Sikh World Alliance. The wiki-cable sent by Andrew Simkin in February, 2010, to his bosses in the USA further warned that it will be hugely embarrassing for Hindu parents to reveal to friends and relatives that their daughter had been seduced by a Muslim man. The fact that it happened due to machinations of multiple foreign-funded organizations targeting innocent Hindu girls will make the parents of seduced girl often feel ashamed to explain to themselves and others what really happened and how things went wrong. The cable mailed by the Chennai-based American Consul General further added, 'Love Jihad' brouhaha also illustrates the perceived threat that many Hindus in the region feel from 'forced conversions', and the general encroachment of 'alien' religious forces into what they see as a Hindu religious space. These perceptions -- and the related tensions -- will likely continue regardless of the content of Karnataka's official report on the alleged 'Love Jihad'." It will not be easy for India’s secular chatterati to ridicule the existence of a vigorous campaign of 'Love Jihad' launched with help of foreign funds to entice Hindu and Christian girls. The truth is already out and more truth will come before the public in the months and years ahead to damn the falsehood preching politicians wearing Hindu names and surnames. Ultimately they will succeed in further painting themselves as anti-Hindu and anti-Christian mavericks trying to charm their Muslim votebank by denial of truth. The allegations are not only true, but the fact that they have gained so much attention in the popular perception will ensure that growing hostility between religious groups will extensively tear apart the fabric of social harmony. It will promote greater tensions in the badly fractured relations between Hindus, Muslims, and Christians all over India. It is a national shame that platoons of secularism doped Hindu politicians like Akhilesh Yadav, Gaurav Bhatia and Manish Tiwari are trying to assist the Jihadis to take over India through a demographic coup. It is not only Hindu girls who are being seduced and converted. The Christians of Kerala are also angry over the demeaning antics of jihadi Romeos. In an incisive article titled ‘Love Jihad: A Myth or a Mission’, posted on the website of Uday India an honest Muslim scholar, Syed Wazid Ali, has given some startling facts based on the statistics of a survey conducted by the Crime Record Bureau of Kerala Police and Kochi’s University of Advanced Law Studies. The survey revealed that the number of girls missing from Kerala was 2127 in 2006 and 2560 in 2008. The police is said to have no information in respect of nearly 600 girls out of a total of 4,687 girls trapped in two successive years by love-jihadis. It is only dumb Hindu leaders and “possibly paid media analysts” who are trying to rescue the fundamentalist fraudsters! It is time for Hindu leaders to speak out openly instead of trying to evade this dangerously deceptive demographic challenge to the Hindu identity of India. …………..

Wednesday, 27 August 2014

LOVE JIHAD IN JHARKHAND

झारखंडमधील भारताच्या एका खेळाडू महिलेने तिच्या आयुष्यात आलेल्या एका दाहक अनुभवाला जाहीरपणे वाचा फोडल्याने देशातील तमाम मल्टिकम्युनल मंडळीची चांगलीच गाळण उडाली आहे. मात्र, सोयीस्कररीत्या तथ्य मान्य न करता उलटा चोर कोतवाल को डॉंटे अशा आविर्भावात ही सगळी मंडळी बुद्धिभेद करण्याची आपली सगळी क्षमता पणाला लावून हिंदुत्ववादी संघटनांवर तुटून पडू लागली आहेत. वास्तविक, या प्रकरणात ज्या राष्ट्रीय खेळाडूने आपला दाहक अनुभव जगजाहीर केला, ती काही कोणत्या हिंदुत्ववादी संघटनेची कार्यकर्ता नाही की भारतीय जनता पक्षासारख्या राजकीय पक्षाची सदस्य नाही. तारा शाहदेव या राष्ट्रीय पातळीवर खेळणार्‍या महिला खेळाडूचा एका युवकाशी परिचय झाला. त्याने हिंदू पद्धतीचे नाव सांगून या महिला खेळाडूशी जाणीवपूर्वक मैत्री वाढविली. दोघांमध्ये प्रेम जमल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न होताच या तरुणाने या महिलेला आपण मुस्लिम असल्याचे सांगितले. तेवढ्यावर प्रकरण थांबले नाही, तर तिला मुस्लिम पद्धतीने निकाह करण्यासाठी आग्रह धरला. या प्रसिद्ध खेळाडू महिलेला मारहाण करणे, छळ करणे सुरू झाले. अखेर या तारा शाहदेव यांनी आपल्यावर आलेले हे संकट जगजाहीर करून टाकले. हे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यानंतर महिलांचा सन्मान, महिलांवरचे अत्याचार या बाबतीत एरवी किंचाळणारे, पोटतिडिकीने या प्रश्‍नासाठी आपले जीवन समर्पित करण्याची तयारी असल्याचे दर्शविणारे तथाकथित समाजवादी विचारवंत, कार्यकर्ते, स्त्रीवादी, सेक्युलॅरिस्ट हे सगळे आधी मूग गिळून गप्प बसले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात प्रावीण्य मिळविलेल्या एका खेळाडूच्या जीवनात केवळ धर्मवेडेपणामुळे कसे संकट आले, त्यावर आता या सर्व लोकांची बोलती बंद आहे. विश्‍व हिंदू परिषदेने व काही संघटनांनी या महिलेला न्याय मिळावा आणि झारखंड सरकारने या महिलेची फसवणूक करणार्‍या, तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक करून शासन करावे, या मागणीसाठी रांची बंदचे आवाहन केले. रांची बंदचे आवाहन करणार्‍या कार्यकर्त्यांवर तेथील राज्य सरकारच्या पोलिसांनी कठोरपणे लाठीमार करत बेदम झोडपले. त्याचे चित्रण बातम्यांमध्ये वाहिन्यांनी दाखविले. लगेच या देशातील कथित डाव्या, पुरोगामी विचारवंतांना आणि मल्टिकम्युनलांना कंठ फुटला. या लोकांनी टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत लव्ह जिहादवर चर्चा करत लव्ह जिहादची शिकार झालेल्या त्या महिला खेळाडूच्या बाजूने नव्हे, तर लव्ह जिहाद या नावापासून ते हिंदुत्ववादी संघटना या विषयाला कसे चुकीचे वळण देत आहेत, यावर टीका करण्यासाठी हिरिरीने आपली बुद्धी पाजळली. कोणत्याही प्रकारे दार ऊल हरब चे दार ऊल इस्लाममध्ये रूपांतर करणे यातच सगळे शौर्य आणि मोक्ष आहे, अशा कल्पनेने अन्य मार्गाने प्रार्थना करणार्‍यांना मारूनमुटकून मुसलमान करणे किंवा न झाल्यास त्यांना मारून टाकणे, अशा प्रकारची शिकवण, इच्छा, कृती करण्यालाच जिहाद हे नाव देण्यात आलेलेे आहे. मध्ययुगीन काळापासून तलवारीच्या टोकावर आपला धर्म इतरांवर लादण्याचे प्रकार ही मंडळी करत आली आहेत. आता भारतात या प्रकारची कारस्थाने करणार्‍या लोकांनी आपला धर्म, आपली प्रार्थनापद्धती इतरांवर लादण्यासाठी लव्ह जिहाद नावाचा एक प्रकार सुरू केला आहे. नाना लटपटी, खटपटी करून अन्य धर्माच्या, विशेषत: हिंदूंच्या मुलींना फूस लावायची. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून न्यायचे. बर्‍या बोलाने त्यांनी इस्लाम पंथ स्वीकारला तर चांगलेच, नाही तर त्यांच्यावर जबरदस्ती करायची. त्यांना धर्म बदलण्यासाठी दबाव टाकायचा. छळ करायचा. या मुलींनी धर्म बदलला तरी त्यांचे दुर्दैवाचे फेरे संपत नाहीत. त्यांची सुटका नाही. धर्म बदलल्यानंतरही काहींना मोलकरणीसारखी कामे करावी लागली, असा अनुभव आहे. चित्रपटातून, प्रेमकथांमधून स्वप्नाळू प्रेमाच्या गोड गुलाबी कल्पनेत या मुली या लोकांनी लावलेल्या जाळ्यात फसतात. या मुलींनी घर सोडून बाहेर पडेपर्यंत या मुलींच्या भोवती सर्व प्रकारचे जाळे विणले जाते. कथित प्रेमाच्या आणाभाका, मुलींना आवडणारे सर्वकाही, चित्रपट पाहणे, बाईकवरून हिंडवणे, त्यांना मोहात पाडणे असे केले जाते. या कामासाठी या तरुणांना हवे ते साहाय्य पुरविले जाते. पैसे, बाईक, पाठिंबा, यंत्रणा सर्व काही पुरविले जाते. भारतात गावोगावी अशी प्रकरणे घडू लागली आणि केवळ इस्लामीकरणाचा एक मार्ग म्हणून ही प्रेम प्रकरणे ठरवून केली जात आहेत, असे लक्षात आले तेव्हा त्याला लव्ह जिहाद असे नाव देऊन त्या विरोधात जनजागरण, मुलींमध्ये जागृती असे प्रयत्न सुरू झाले. अशा प्रयत्नात जर प्रेम नसताना फसवणूक असेल, तर इस्लाम त्याला मान्यता देत नाही, असे एका मौलवीनी टीव्हीवरच्या चर्चेत सांगितले. मात्र, या चर्चेत भाग घेणारे तथाकथित बुद्धिवंत, मल्टिकम्युनल कार्यकर्ते यांनी लव्ह जिहाद हा शब्द चुकीचा आहे इथपासून ते सगळ्याच जातीत, पंथात प्रेम केले जाते, मग विशिष्ट पंथातल्या मुलांशी केले म्हणून हा विरोध कशाकरता, असे प्रश्‍न विचारत वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार अगदी संभावितपणे केला. एका महाभागाने तर लव्ह आणि जिहाद हे एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, असे तारे तोडले. हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत आणि ही विसंगती एकत्र करून या देशात फूस लावून मुलींचे आयुष्य बरबाद करण्याचे कारस्थान चालले आहे, हाच तर प्रश्‍न आहे. या विषयात आधी प्रेमाचे जाळे फेकून, तसे न जमल्यास धमक्या देऊन, मुलींना जबरदस्तीने अपहरण करून त्यांच्यासोबत निकाह लावण्याचेही प्रकार घडलेले आहेत. नावानिशी तसे तपशील उपलब्ध आहेत. तारा यांच्या या प्रकरणात हे कारस्थान उघड झाले आहे. अगदी नियोजित पद्धतीने नाव बदलून या खेळाडूला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यात आले आणि एकदा फसल्यानंतर त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी आग्रह, छळ सुरू झाला. या खेळाडूने हे जगजाहीर केले, तरी मानवता, मानवी हक्क याबाबत एरवी किंचाळणारे आता सोयीस्कर मौन पाळून आहेत. नव्हे, लव्ह जिहाद हा शब्द निघताच जणू हे सर्व जिहादचे संरक्षक असल्यासारखे आपली बुद्धिमत्ता पाजळत किंचाळू लागले आहेत. प्रत्येक घरात आपापल्या मुलींवर चांगले संस्कार करणे, समाजातील गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि इतरांवर येनकेनप्रकारे आपली प्रार्थनापद्धती लादण्याची राक्षसी आकांक्षा ठेवणारे यांची जाणीव करून देणे, हा सर्वात चांगला आणि मूलभूत उपाय आहे. मात्र, अशा प्रकारे नियोजित कारस्थान केले जात असेल आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये अशा समस्या उभ्या राहात असतील, तर सरकार आणि प्रशासन यावर काही कारवाई करणार की नाही? एरवी समाजाचे भले करण्याचा आव आणत आपली बुद्धिमत्ता पाजळणारे कथित विचारवंत या अविचाराला विरोध करणार की नाही? की ते दुतोंडीपणा करत सोयीने बोटचेपी भूमिका घेत शब्दच्छल करत राहणार? शहाबानो प्रकरणासारख्या प्रकरणात अशा प्रकारच्या विषयात सरकार, बुद्धिवादी यांनी चुकीची भूमिका घेतल्याने या देशातील जनतेमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली त्याचे परिणाम अजून जाणवतात. तारा शाहदेव यांच्या प्रकरणात उघड उघड धर्मवेड्या उद्देशाने फसवणूक, छळवणूक झाली आहे. स्वत: सामाजिक अस्तित्व असलेल्या पीडित महिलेने स्पष्टपणे आपल्यावरचे संकट जगजाहीर केले आहे. इतके होऊनही जर या देशातील विचारवंत, राजकारणी, सेक्युलॅरिझम... सेक्युलॅरिझम असे वारंवार किंचाळणारे मल्टिकम्युनल लोक हे जर बोटचेपी भूमिका घेऊन दुतोंडी मते व्यक्त करणार असतील, तर आता यातील बदमाशी, कारस्थान आणि दुटप्पीपणा न कळण्याइतका समाज दूधखुळा राहिलेला नाही, याचे या लोकांनी जरा भान ठेवावे़! जागरूकपणे समाजाने लव्ह जिहादचे संघटित कारस्थान मोडून काढलेच पाहिजे़!

Friday, 14 September 2012

'लव्ह जिहाद'चा चक्रव्यूह-दिलीप धारूरकर

http://www.evivek.com/current/lekh001.htmlमुलींचे जीवन बरबाद करणारा हा एक भयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहाद' असे याला या गुंडांनी नाव दिलेले आहे. हा जिहाद करणे हे त्यांचे धर्मकार्यच ते मानतात. आता हळूहळू हे आक्रमण वाढले आहे. या लव्ह जिहादचे कधीतरी ऐकू येणारे उदाहरण आता रोजचेच झाले आहे. हळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढते आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढा. त्यांना इस्लाम बनवा. असा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठी काढण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना वाट्टेल ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या मुलींना या भयानक चक्रव्यूहाची नीट कल्पना देऊन, सतत सतर्क आणि जागरूक राहून हा प्रेमाचा जिहादी चक्रव्यूह भेदावा लागेल. त्यासाठी आता जागे होऊन सक्रीय होण्याची वेळ आली आहे.  
गेल्याच आठवडयातली घटना आहे. स्थळ समर्थनगर, कन्नड, जि. संभाजीनगर, मराठवाडा ! जयश्री प्रकाश त्रिभुवन ! इयत्ता दहावीत श्ािकणारी मुलगी. ती शाळेत जात असताना दोन महिन्यांपूर्वी काही मुस्लिम गुंडांनी तिची छेड काढली. बाबा मन्सुरी, अन्सार मन्सुरी निसार मन्सुरी हे तिच्या शेजारीच राहणारे गुंड. तेच तिची छेड काढत होते. पोलिसांमध्ये त्याविषयी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. जयश्रीचे शाळेत जाणे त्या घटनेपासून बंद झाले. त्या दिवशी ती दुधाची पिशवी आणण्यासाठी घराबाहेर पडली. गुंडांनी तिला हेरले. दुधाची पिशवी घेत असताना तिला गाठले. आमच्याशी लग्न कर, अशी थेट मागणी निर्लज्जपणे केली. तिने झिडकारताच तिला एक चापटही मारली. जयश्री घाबरली. रडत ओरडत घराकडे पळाली. थेट घरात श्ािरली. हे निर्ढावलेले तीनही गुंड तिच्या पाठीमागे पळत तिच्या घरात श्ारले. या तिघांची तक्रार ती ज्या आई, वडिलांकडे करत होती त्यांनाच या तीन गुंडांनी मारहाण करायला सुरुवात केली. तू ज्यांच्याकडे आमची तक्रार करतेस त्यांना आम्ही मारहाण करू शकतो. आता तुला आमच्या तावडीत येण्याव्यतिरिक्त दुसरा र्माग नाही, हे तिला कळावं यासाठीच हा मारहाणीचा र्माग त्यांनी निवडला असावा. जयश्री आतल्या खोलीत पळत गेली. गुंड आईवडिलांना धमकी देत निघून गेले. ही घटना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब त्रिभुवन यांचे घर गाठले. भेदरलेल्या, मार खाऊन रडत, ओरडत असलेल्या त्या त्रिभुवन दांपत्याला थोडा धीर आला. सर्वजणांनी मिळून पोलीस ठाणे गाठले. कायदा हातात घेऊन मुलीची छेड काढणाऱ्या  
आणि आईवडिलांना मारहाण करणाऱ्या या तीन खतरनाक गुंडांना अटक करून कारवाई करावी अशी तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी मात्र नेहमीप्रमाणे केवळ त्यांचा अर्ज ठेवून घेतला. कारवाई काहीच केली नाही. फक्त जुजबी आश्वासन देत तोंडाला पाने पुसली. तक्रारही दाखल झाली नाही. प्रकाश त्रिभुवन पत्नीसह घरी परत गेले. तर घरात त्यांच्यासाठी वेगळेच वाढून ठेवलेले होते. असाहाय्य जयश्री घरात अस्ताव्यस्त पडलेली. तोंडातून फेस आलेला. जयश्रीने मुस्लिम गुंडांच्या त्रासातून सुटण्यासाठी र्माग निवडला तो आत्महत्येचा. तिने घरातील विषारी औषध प्याले. तातडीने तिला दवाखान्यात तेथून संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  
या घटनेने हिंदू समाज संतप्त झाला. कन्नडच्या पोलीस ठाण्यामध्ये मोठया संख्येने जमाव जमा झाला. जयश्रीला छेडत गुंडग्ािरी करणाऱ्या त्या तीन गुडांना अटक केल्याश्ािवाय जयश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी जमावाने भूमिका घेतली. मात्र मागणी करणाऱ्या या जमावावरच पोलिसांनी लाठीमार केला. अखेर श्ािवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी यात हस्तक्षेप केल्यावर पोलिसांना जाग आली. त्यांनी आरोपींना अटक केल्यानंतर जयश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले.
या घटनेत जयश्रीला जीव गमवावा लागला तेव्हा समाज थोडा जागा होऊन पोलिसांना जाब विचारायला पुढे झाला. मात्र अशा अनेक घटनांमधल्या जयश्री आत्महत्या करत नाहीत तर या गुंडांच्या जाळयात अलगद अडकतात. त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याशी लग्न करतात. धर्मांतर करून मुस्लिम नाव धारण करतात. बुरखे घालतात. इतके करूनही त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीत. हिंदू मुलींचे जीवन बरबाद करणारा हा एक भयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहाद' असे याला या गुंडांनी नाव दिलेले आहे. हा जिहाद करणे हे त्यांचे धर्मकार्यच ते मानतात. आता हळूहळू हे आक्रमण वाढले आहे. या लव्ह जिहादचे कधीतरी ऐकू येणारे उदाहरण आता रोजचेच झाले आहे. हळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढते आहे. 'हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढा. त्यांना इस्लाम बनवा,' असा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठी काढण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना वाट्टेल ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रोज 200 रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा, असा सौदा आहे. हे काम करणाऱ्या या मुस्लिम तरुणांना केवळ पैसेच मिळतात असे नाही तर हिंदू मुलींना बाटवण्यासाठी जे लागेल ते दिले जाते. नवी कोरी करिज्मा मोटारसायकल त्यांना वापरायला दिली जाते. ब्रँडेड कपडे मिळतात. त्यांचे काम एकच, हिंदू मुलींना बाटवायचे ! हिंदू मुलींना बाटविण्याचे हे कारस्थान लपून छपून नाही तर अगदी उघडपणे चालले आहे. हिंदू मुलींना बाटवा आणि रोज दोनशे रुपये घ्या, असे आवाहन करणारी पत्रके छापून वाटली जात आहेत. या विषयावरचा लेख वाचून लातूर येथील एका तरुणाने फोन केला की एका मश्ािदीसमोरून जात असताना हे पत्रक त्याच्या हातात पडले.
गोविंदराव (नाव बदलले आहे. मूळ प्रकरण सर्व कागदपत्रांसह उपलब्ध) हे पापभीरू मध्यर्मवगीय गृहस्थ. त्यांना दोन मुली. त्यापैकी मोठी मुलगी श्ािक्षणात प्रथम श्रेणीर्त उत्तीण झाल्याने ते खुश होते. लहान मुलगीही ताईच्या पाठोपाठ महाविद्यालयात नाव काढेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना अनुभव वेगळाच येतो. दुसरी मुलगी कविता महाविद्यालयात, क्लासला जात असलेली. गोविंदराव यांचा एक मित्र त्यांच्याकडे या कविताची चौकशी करू लागतो. तुमची मुलगी एका मुलाबरोबर मोटारसायकलवर नेहमी दिसते, असे सांगू लागतो. ते जरा नजर ठेवू लागतात. चौकशी करतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. कविता रोज उशीरा घरी येते. क्लासचे सर जास्त वेळ श्ािकवतात म्हणून उशीर होतो असे सांगते. क्लासमध्ये चौकशी केली असता ते म्हणतात, आम्ही कधीच मुलींना असे उशीरापर्यंत बसवून घेत नसतो. आणखी चौकशी करता असे लक्षात येते की कविता एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्याच्याबरोबर फिरते, त्यासाठी क्लास बुडवते, महाविद्यालयातील तास बुडवते. गोविंदरावांना धक्का बसतो. ते मुलीला घरात दरडावून विचारतात, दोन थपडा मारतात. मुलगी सर्व गोष्टी कबूल करते. पश्चात्ताप झाल्यासारखे दाखविते. पुन्हा करणार नाही अशी शपथ घेते. तिला बाहेर पडण्याची परवानगी मिळते. काही दिवसानंतर ती पुन्हा त्या मुलाबरोबर फिरू लागते.
कशी फसली कविता ?
या प्रकरणात दिलेल्या निवेदनात गोविंदराव लिहितात, हे प्रकरण कसे सुरू झाले याची माहिती मुलीकडून काढली तेव्हा भयानक प्रकार समोर आला. त्यांच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक मुलांचा कंपू उभा असे. कुठल्यातरी निमित्ताने मुलींची ओळख करून घ्यायची, मोबाईल नंबर घ्यायचा आणि ओळख वाढवून प्रथम फिरणे, त्यानंतर सिनेमा असे हे तंत्र आहे. यात ते जेव्हा हॉटेलिंग करतात तेव्हा मुलीच्या चहात किंवा खाद्यपदार्थात ही मुले काहीतरी टाकतात. आणि त्यानंतर या मुलीर् पूणपणे त्यांच्या कह्यात जातात.
कवितावर वारंवार नजर ठेवून, दरडावून, मारहाण करून वडिलांनी समजावले मात्र ती काही काळ संभावितपणाचा आव आणत असे आणि पुन्हा तिचे त्या मुलाला भेटणे चालू होत असे. घरातील सोन्याच्या वस्तू, पैसे गायब करून कविता त्या मुलाला देऊ लागली असेही पुढे लक्षात आले. वास्तविक दोघांच्या सामाजिक स्थितीत प्रचंड अंतर होते. तो मुलगा फक्त आठवी श्ािकलेला आणि एका वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून काम करणारा. कविता अतिशय हुशार, महाविद्यालयात श्ािक्षण घेणारी. मात्र प्रेम आंधळं असतं वगैरे वाक्ये असल्या फसवणुकीच्या धंद्यात वापरली जातात. असे लव्ह जिहादसारखे प्रकार होता कामा नयेत असे विचार मांडणारे गोविंदराव नकळत या प्रकरणात फसले होते. त्यांची लाडकी मुलगी त्यात वाहत गेली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने कवितावर काही उपचार केले जातात. वशीकरणाच्या प्रभावातून तिला बाहेर काढले जाते आण्ाि मग तिला वास्तवाची जाणीव होते. त्यातून ती बाहेर येते.
गोविंदराव या निवेदनात सांगतात की मुली काय करतात, कोठे जातात, कोणाला फोन करतात यावर लक्ष असले पाहिजे. आपण घेऊन दिलेल्या वस्तू मुलींकडे आढळल्यास चौकशी करा आणि कोणी दिलेल्या वस्तू असतील तर त्या जाळून टाका असे गोविंदराव सांगतात. गोविंदराव स्वानुभवावरून म्हणतात की लव्ह जिहादचे एक प्रकरण झाले की एक हिंदू पालक मानसिकदृष्टया खच्ची होतो. समाजाचे नुकसान आणि एका हिंदू कुटुंबाचे खच्चीकरण होते. हिंदू मुलगी पळवून नेली की तिची अपत्ये हिंदू समाजाच्या मुळावर उठणारीच असतात. श्ािवाय या मुलींना पुढे कामवाल्या महिलांपेक्षाही हीन वागणूक मिळते. गोविंदरावांनी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने वेळीच कविताला या चक्रव्यूहातून प्रयत्नपूर्वक सोडविले आहे. ते लिहितात की या प्रकरणापासून सर्वांनी सावध राहावे. हा धोका केव्हाही तुमच्या दाराशी येऊ शकतो. वेळीच सावध असले तर हा धोका टळू शकतो. एका हिंदी वाक्प्रचाराचा आधार घेऊन ते सांगतात की, 'औलाद ना हो तो एक दुख, औलाद हो कर मर जाए तो सौ दुख, औलाद हो कर जिंदा रहे और नालायक निकले तो हजार दुख', हे दु: आपल्या वाटयाला आले ते कोणाच्याही येवो असे ते लिहितात.  
सध्या तावडीत सापडणाऱ्या कोणत्याही मुलींना फसविणे आणि नादी लावणे हेच एकमेव काम ही लव्ह जिहादवाली मंडळी करत आहेत. पांडुरंग सखाराम हा एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. श्ािवाय एका अपार्टमेंटचा वॉचमन असल्याने सगळे कुटुंब त्या इमारतीतच राहते. त्याची पत्नी इमारतीतील घराघरात धुणीभांडी करते. त्याची मुलगी सुनीता फक्त 14 वर्षांची आहे. तिला एका मस्लिम गुंडाने पळवून नेले. या अल्पवयीन मुलीला पांडुरंगने अनेकवेळा त्या गुंडाच्या तावडीतून परत आणले तरी ती पुन्हा पळून जाते. तिच्यावर बलात्कार झाल्याचा आण्ाि तिला वामर्मागाला लावले असल्याचा पांडुरंगचा दावा आहे. त्याने पोलिसांना याबाबत लेखी निवेदन दिले. या संदर्भात आरोपींवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आण्ाि अपहरणाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी त्याने केली. फेब्रुवारीत त्याने हा अर्ज केला.
केवळ महाविद्यालयीत मुलीच नव्हे तर विवाहित असाहाय्य किंवा संकटात सापडलेल्या स्त्रिया यासुध्दा या गुंडांच्या नजरेत आहेत. राधा विठोबा ही एक 29 वर्षांची विवाहित तरुणी. सासरी छळ होत असल्याने तिचे वडील तिला लग्नानंतर एकाच वर्षात परत माहेरी घेऊन आले. काही नातेवाईकांकडे राहताना, काम करत असताना एका मालकाशी अनैतिक संबंध आले. आधी त्यांनी मूल हवे अशी मागणी केली मात्र प्रत्यक्ष मूल होत असताना गर्भपात करण्याचा सल्ला दिला. घरच्या लोकांनीही तसाच आग्रह केला. मात्र राधाने मूल होऊ दिले. या मुलाला कोणाचे नाव द्यायचे, याचे भवितव्य काय, घरच्या लोकांशी वैर घेतले, प्रेम केले त्या व्यक्तीनेही नकार दिला अशा प्रश्नाने घेरले असता शेजारी दुकानात काम करणाऱ्या मुस्लिम मुलाने तिला सांग्ाितले की माझे नाव मुलाला देऊ. आधी गोड बोलून या मुस्लिम गुंडाने मी तुझ्याकरता माझा धर्म बदलेन, अशा बाता मारल्या. नंतर तीर् पूण ताब्यात येताच तिला तिच्या मुलाला मुस्लिम होण्यासाठी दबाव सुरू झाला. ती काही धर्म बदलायला तयार होईना. अखेर तिच्या पायाला फ्रॅक्चर होऊन ती पडून असताना तिला अंधारात ठेवून तिच्या लहान मुलाची सुंता करून त्याला बाटवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तिचे डोळे खाड्कन उघडले. ती संतप्त झाली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली आहे. बेकायदेशीररित्या जबरदस्तीने सुंता करणाऱ्या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्याची तिने मागणी केली आहे. मात्र वर्तमानपत्रात हे प्रकरण प्रसिध्द होऊनही पोलिसांनी यात विशेष काही केलेले नाही. मुस्लिम गुंडाने सर्वांदेखत पोलीस ठाण्यात या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याने सर्द होण्याची वेळ त्या महिलेवर आणि तिला मदत करणाऱ्यांवर आली. पोलीसही काही करू शकले नाहीत.
जयंती वाघमारे हिची कथा तर आणखी विदारक आहे. आता ती 23 वर्षांची आहे. बी. कॉम. द्वितीय वर्षाला श्ािकत असताना एका मस्लिम मुलाने तिच्याशी ओळख वाढविली. प्रेमाचे नाटक केले. तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. आधी स्वत: तिच्याकरिता धर्म बदलण्याची भाषा केली. शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तिला मुस्लिम झाल्यास लग्न करेन असे सांग्ाितले. तिचे धर्मांतर केले. तिला धार्मिक अभ्यासाकरिता हैदराबादला पाठविण्यात आले. धार्मिक श्ािक्षण झाल्यावर लग्न करेन असे सांग्ाितले. वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिने त्याच्याशी संबंध तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र दरवेळी कधी धमकावून, मारहाण करून, गोड बोलून त्याने तिला सोडलेच नाही. काही काळ तिला कोंडून ठेवले. नंतर शेवटी तिला पुण्यात नेऊन वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केला. मग मात्र तिने कठोरपणे त्याच्या धमक्यांना भीक घालता त्याच्याशी संबंध तोडले आणि एक प्रतिज्ञापत्र नोटरी करून पोलिसांकडे त्याच्या या सर्व कृत्याबाबत तक्रार दिली आहे.
गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचे सेंटर पाहण्यासाठी निघालेल्या मुलीला तीन मुस्लिम गुंडांनी अपहरण करून सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण गाजले होते. फेरोजखान अहमदखान, मोहसीनखान आसिफखान, अझरोद्दीन शेख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली.
गेल्या वर्षी उघड झालेली एक घटना. येथील एका महाविद्यालयात अकरावीत श्ािकत असलेल्या एका तरुणीला एका लव्ह जिहादवाल्या मुलाने प्रेमाच्या जाळयात ओढले. एका हॉटेलमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आपल्या एका मुस्लिम मित्रासोबतही जबरदस्तीने संबंध ठेवायला लावले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर तिचे लग्न झाले तरी या दोन गुंडांनी तिचा पिच्छा सोडला नाही. लग्नानंतर तिच्या घरात घुसून तिचे अपहरण केले आणि एका लॉजवर तिला कोंडून ठेवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पोलिसांनी मोबाईलवरून ठिकाण शोधून या मुलीची सुटका केली.
या सर्व प्रकरणातील मुलींची नावे बदललेली असली तरी त्या मुलींच्या खऱ्या नावाने केलेले पोलिसातील अर्ज, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, सह्यांनिशी नोटरी करून दिलेली प्रतिज्ञापत्रे उपलब्ध आहेत. लव्ह जिहादचे हे स्वरूप असे भयानक आहे. काहीही करून हिंदू मुली, महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढायचे, त्यासाठी वाट्टेल ते करायचे, थापा मारायच्या, खर्च करायचा असे हे लोक करतात. त्यासाठी त्यांना वाट्टेल ती कुमक पुरविली जाते. महिलांना मुलींना एकदा नादी लावले की काहीही करून त्यांना अडकवायचे आणि धमकावून धर्मांतर करायला भाग पाडायचे. एकदा धर्मांतर केले की मग यांचे धर्मकार्य झाले. मग त्या मुलींची अवस्था भांडी घासणाऱ्या बाईसारखी झाली तरी यांचे काही बिघडत नाही. हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्यूहात ओढणाऱ्या या मुस्लिम मुलांचे मुस्लिम मुलींशी आधी किंवा नंतर विवाह झालेलेच असतात. हिंदू मुलींना प्रेमाचे गोड स्वरूप दाखवून, खर्च करून, अडलेल्यांना मदत करत असल्याचे भासवत, खोटी आश्वासने देत हे सर्व मर्यादा ओलांडायला भाग पाडतात. अगदी मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांचे नको त्या अवस्थेत फोटो काढूनही वाट्टेल ते करायला मजबूर केले जाते. यातून होत नसेल तर कन्नडच्या प्रकरणासारखे दमदाटी, मारामारी करण्याचीही तयारी असते. मुलींच्या घरच्या जवळच्या नातेवाईकांचा खून पाडण्याची धमकी देत त्यांचे भावनिक शोषणही केले जाते.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस, प्रशासन यांची भूमिका ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा दबाव असल्याने या मुस्लिम गुंडांना पूरकच असते. राधाच्या मुलाचे तिला अंधारात ठेवून धर्मांतर करण्यात आले तेव्हा ती तक्रार घेऊन पोलिसात गेली तेव्हा पोलिसांनी सर्वांसमक्ष तिलाच धमकावणे सुरू केले. एका प्रकरणात तर, एका मवाल्याने रेल्वे प्रवासात एका महिला कॉन्स्टेबलचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. या महिला पोलिसाने धाडसाने या मवाल्याला पकडले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्या मवाल्याला सोडविण्यासाठी मोठा जमाव जमला. त्यांनी त्या महिला पोलिसाला आणि तिच्या पतीला मारहाण केली. दबाव पोलिसांवर टाकून त्या मवाल्याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसाने डगमगता तक्रार दाखल केली. मात्र मुस्लिम फौजदाराने गुन्हा नोंदवता मवाल्याला पसार होण्यास मदत केली.
नुकतेच संभाजीनगर येथे एका लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदू मुलीने पळून जाऊन मुस्लिम मुलाशी लग्न केले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात बोलावले. मात्र तेथे हिंदूंचा जमाव वाढत चालला तेव्हा रॅपिड ऍक्शन फोर्सने जमावावर निर्दयपणे लाठया चालविल्या. मुलीच्या आईवडिलांनाही मारले. भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री प्रवीण घुगे तेथे सामंजस्याने प्रश्न सोडविण्यासाठी गेले होते. त्यांना प्रचंड मारहाण पोलिसांनी केली. नंतर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली तेव्हा मुलीचे आईवडिल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले. हा प्रशासनाचा पक्षपात या लव्ह जिहादमध्ये सर्व प्रकरणात जाणवला आहे. कन्नड येथेही जयश्रीची तक्रार दोन महिन्यापूर्वीच नोंदवून त्या गुंडांना पोलिसांनी धमकावले असते तर जयश्रीला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
'दार उल हरब'ला 'दार उल इस्लाम' करण्याचा हा सगळा जिहाद आहे. अलीकडे या लव्ह जिहादमध्ये नियोजन, पैसा, ताकद, राजकीय दबाव अशा सर्व आयुधांचा वापर चालला आहे. हिंदूंना सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या मुलींना या सर्व प्रकरणांची नीट कल्पना घरातच दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारे मवाल्यांशी संपर्क येणार नाही आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचीही संधी मिळता कामा नये याची काळजी मुलींनी सतर्कतेने घेतली पाहिजे. ही आता फुटकळ कोठेतरी केव्हातरी होणारी प्रकरणे नाहीत तर हे नियोजनबध्द आक्रमण आहे आणि वारंवार या घटना घडत आहेत. त्यात वाढ होते आहे. प्रशासन, शासन, राजकारणी यात मताचा, ढोंगी जातनिरपेक्षतेचा विचार करत बोटचेपी भूमिका घेताना दिसतात.
नुकतेच संभाजीनगरमध्ये प्रचंड संख्येने लव्ह जिहादविरोधात मोर्चा निघाला होता. त्यानंतर बागेमध्ये हिंदू मुलींसोबत प्रेमाचे चाळे करणाऱ्या मुस्लिम गुंडांना पकडून पोलिसांच्या हवाली करणे, चोप देणे अशा घटना घडल्या आहेत. लव्ह जिहादच्या नियोजनबध्द आक्रमणाला आता नियोजनबध्द संघटित विरोध करण्याचीही गरज आहे. काही शहरात बेटी बचाओ, हिंदू समन्वय समिती, हिंदू जागरण मंच अशा नावाने धाडसाने काही तरुण एकत्र येऊन सक्रीय झाले आहेत. हे प्रयत्न अधिक शक्तिशाली आण्ाि अधिक गतिमान झाले पाहिजेत. प्रेमभावना असणे, त्यात उत्कटता असणे याचा या लव्ह जिहादमध्ये लवलेशही नाही. लव्ह जिहाद हा धोका, बदमाषी, नियोजनबध्द सापळा आहे. चित्रपटातील नायकांमध्ये खान मंडळींची मोठी मालिका, चंगळवाद, कमी वयात काहीही कामे करून पैसे खिशात खुळखुळणारी मुस्लिम मुले हे सगळे वातावरण या लव्ह जिहादला पूरक आहे. मुस्लिम मुले कोणतेही काम करायला तयार असतात, गोड बोलून, सभ्यतेचा आव आणून संमोहनास्त्र टाकण्यात ती पुढे असतात. 'बेटी बचाओ'मध्ये काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते संजीव जैन म्हणतात की, 'हिंदूंनी आपापल्या नोकऱ्या, कामे प्रामाण्ािकपणे आळस करता, नम्रता, सभ्यता हे मूळ गुण वापरून केल्या पाहिजेत.' प्रवीणभाई तोगडिया यांनी लव्ह जिहादमध्ये सक्रीय असणाऱ्या मुस्लिम मवाल्यांवर आर्थिक बहिष्कार टाका, असे आवाहन केले आहे. आपल्या मुलींना या भयानक चक्रव्यूहाची नीट कल्पना देऊन, संघटित प्रयत्नांची दिशा आणि वेग वाढवून, आपापली कामे चोख आणि प्रामाण्ािकपणे करत विकास करून, बहुसंख्याकांच्या जातपातविरहित गठ्ठा मतांचा धाक राजकारण्यांवर निर्माण करून, सतत सतर्क आणि जागरूक राहून हा प्रेमाचा जिहादी चक्रव्यूह भेदावा लागेल. त्यासाठी आता जागे होऊन सक्रीय होण्याची वेळ आली आहे