Total Pageviews

Tuesday 23 August 2011

CRPF JAWAN DIES INA ENCOUNTER IN GADCHIROLI

नक्षलवाद्यांच्या गोळीने स्वप्नांची राखरांगोळी
हम रहे ना रहे .. तेरा वैभव अमर रहें माँ ...' या देशभक्तीच्या भावनेने झपाटलेल्या चंद्रशेखर सुहास कोरे या २५ वर्षीय युवकाने देशाच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले . आपल्या कुटुंबाला चांगले दिवस आणण्यासाठी गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या चंद्रशेखरने लहानपणापासून खडतर परिश्रम केले होते , मात्र गडचिरोली येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तो शहीद झाला आणि त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली . हिंगणघाटच्या तुकडोजी वॉर्डातील घरी त्याचा मृतदेह आणण्यात आल्या , तेव्हा शेजाऱ्यांनी त्याच्या आठणींना उजाळा दिला . हिंगणघाटने आपल्या या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला . झोपडीत राहून मोजमजुरी करणाऱ्या सुहास कोरे यांचा मोठा मुलगा असलेल्या चंद्रशेखरने मोठ्या जिद्दीने बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतले . कॉलेजात शिकत असतानाही घराला आधार देण्यासाठी त्याने लहानमोठी कामे केली . गृहरक्षक दलातही त्याने तीन वर्षे सेवा बजावली . १९९६ साली त्याची सीआरपीएफमध्ये निवड झाली . तेव्हापासून कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्नशील होता . नोकरी लागल्यानंतर घर , बहिणीचे लग्न अशा जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर लहान भावाला स्वत : च्या पायावर उभे करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते . मात्र मकरचुहा गावाजवळ नक्षलवाद्यांना तोंड देताना त्याला वीरमरण आले

No comments:

Post a Comment