Total Pageviews

Showing posts with label GOOD INDIANS. Show all posts
Showing posts with label GOOD INDIANS. Show all posts

Friday, 14 March 2025

वाचस्पती कै. स्वर्णलता भिशीकर - चैतन्याची अद्भुत खाण!!--TARUN BHARAT-डॉ. अनघा लवळेकर

 कै. आप्पांच्या, कै. अण्णांच्या मानसकन्या.. ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या , स्वरूपयोग परिवाराच्या ज्येष्ठ साधिका लेखिका, कवयित्री, संवादिका, जीवन-समुपदेशिका ही आणि अशी अनेक रूपे ज्यांच्यात एकवटली अशा लताताई. 

ज्ञानाचा अभिजात वारसा, अध्यात्माचा स्वयंभू पिंड आणि जीवनाप्रति करुणेचा सहजभाव, ही त्रिपुटी असलेल्या दुर्मीळातील दुर्मीळ व्यक्तींपैकी एक म्हणजे वाचस्पती स्वर्णलता भिशीकर. सर्वांच्या आत्मीय ‘लताताई’ दि. 4 मार्च रोजीच्या रात्री हे लौकिक जग सोडून, अलौकिकाच्या प्रवासाला निघून गेल्या. परंतु, त्यांच्या समृद्ध चिंतनाचा, लेखनाचा, अध्यात्म साधनेचा, अर्थगर्भ काव्यलेखनाचा आणि प्रखर राष्ट्रसेवेचा आदर्श त्यांनी, आपल्या सर्वांसमोर उलगडून ठेवला आहे. 

चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर या संघप्रेरित कार्यकर्त्याच्या घरात, 1951 साली त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन काळात ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पा पेंडसे यांच्या परीस-स्पर्शाने, लताताईंच्या मूळ कुशाग्र प्रज्ञेला राष्ट्रअर्चनेचे व्यापक उद्दिष्ट मिळाले. त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी, ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्य करण्यात व्यतीत केले.

 महाविद्यालयीन काळामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या युवती विभागाच्या उभारणीत, त्यांचा मोलाचा सहभाग होताच; परंतु एकीकडे ‘विद्यावाचस्पती पदवी’साठीचे संशोधन करताना, ज्ञानप्रबोधिनीच्या कन्यका प्रशालेच्या पायाभरणीची जबाबदारीही त्यांनी पेलली. त्याचवेळी कै. आप्पांच्या स्वीय साहाय्यकाच्या भूमिकेतून, त्यांच्या संपर्काचा प्रचंड विस्तार लताताईंनी संपूर्ण समर्पित वृत्तीने केला आणि जोपासलाही! वाचन कौशल्य या अत्यंत कळीच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या मूलभूत विषयावर त्यांनी मिळवलेली ‘विद्यावाचस्पती पदवी’ प्रायोगिक अभ्यासमालेतील मैलाचा दगड म्हणावी, इतकी शास्त्रशुद्ध आणि उपयोजित आवाका असलेली आहे. त्या अभ्यासाच्या जोरावर गती वाचनाचे प्रशिक्षण वर्ग ज्ञान प्रबोधिनीमध्ये, शालेय मुलांपासून ते औद्योगिक अधिकार्‍यांपर्यंत विकसित होऊ शकले, ही त्याची महत्त्वाची फलश्रुती आहे.

कै. आप्पांच्या निधनानंतर ज्ञान प्रबोधिनीचे द्वितीय संचालक कै.व.सी.तथा अण्णा ताम्हनकर यांच्याही कामात, त्या बरोबरीने उभ्या राहिल्या. ज्ञान प्रबोधिनीसमोर त्याकाळी असणार्‍या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, आशाताई भोसले यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम योजला गेला, तो लताताईंच्या आणि गो. नी. तथा आप्पा दांडेकर यांच्या अपार स्नेहाच्या माध्यमातून झालेल्या संपर्कामुळेच. असे असंख्य स्नेहबंध त्यांनी जोडले, जोपासले आणि ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात सामावून घेतले. देश-विदेशामध्येही भारतीय संस्कृती आणि अध्यात्म विचार यांची मांडणी, बाल आणि युवा वर्गापासून ते साधना मार्गावर चालणार्‍या अनुभवी साधकांपर्यंत विविध गटांसमोर त्यांनी सातत्याने केली. 

1990 साली ज्ञान प्रबोधिनीने सोलापूर येथे, कै. अवंतिकाबाई व कै. जनुभाऊ केळकर यांनी स्थापन केलेली ‘बालविकास मंदिर’ ही प्रस्थापित शाळा चालविण्याचा व वाढवण्याचा पत्कर घेतला, तेव्हा कै. अण्णा ताम्हनकर यांच्यासोबत लताताई आणि गायत्रीताई सेवक या सोलापुरात नुसत्या गेल्याच नाहीत, तर सोलापूरकरच झाल्या. लताताई तर गेल्या 35 वर्षांत, त्यांच्या विविधांगी कार्यामुळे सोलापूरवासीयांच्या आदराची आणि विश्वासाची जागा बनल्या. सोलापूरमधील शाळेत, बालविकासाच्या दृष्टीने केलेले अभिनव प्रयोग, शासनाच्या साक्षरता चळवळीला लताताईंच्या दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वामुळे मिळालेली विलक्षण गती आणि सुयश, अध्यात्माच्या ओढीने जमणार्‍या हजारोंना मिळालेला त्यांच्या सत्संगाचा पावन स्पर्श, अशा कैक आघाड्यांवर लताताईंनी लोकांच्या बुद्धी आणि हृदयाला अनुकूल दिशेने घडवण्याचे कार्य अथकपणे केले. बालविकास मंदिराच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, शासनासमवेत त्यावेळी करावा लागलेला विधायक भूमिकेतील संघर्ष आणि त्याचवेळी त्याच रचनेतील सुजाण वृत्तींच्या माणसांना जोडून घेणारी त्यांची अत्यंत रुजू आणि स्नेहमयी वृत्ती, या दोन्हीचा लोकविलक्षण मिलाफ समाजाने अनुभवला.

1993 सालचा किल्लारी भूकंप, हा एका मोठ्या सामाजिक शैक्षणिक उलथापालथीचा कारण बनला. त्यावेळी हराळीसारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षणाच्या वर्गांपासून, सुरुवात करून आज शेकडो विद्यार्थ्यांना सामावून घेणारी निवासी शाळा प्रकल्प संकुल उभारण्यामध्ये, अण्णा आणि लताताईंचे अथक परिश्रम शिंपले गेले आहेत. आता तर आसपासच्या परिसरातील तांड्या- वस्त्यांमध्ये ही शिक्षणाची गंगा पोहोचवणारी एक चळवळ म्हणून ‘हराळी केंद्र’ विकसित होत आहे. अशा सर्व उपक्रमांच्या पाठीशी असलेले लताताईंचे सखोल चिंतन आणि अदम्य प्रेरणा, कार्यकर्त्यांना बळ पुरवीत आली आहे. ‘ज्ञान बनो कर्मशील-कर्म ज्ञानवान’ हे वाक्य, लताताईंच्या आयुष्यात पूर्णांशाने प्रतिबिंबित झालेले दिसते. 

लताताईंचे सामाजिक काम केवळ शिक्षणाला पुढावा देणे एवढेच मर्यादित राहिले नाही, तर अक्षरशः ‘जे का रंजले गांजले-त्यांसी म्हणावे आपुले’ या उक्तीनुसार, त्यांनी शेकडो जणांच्या व्यथांवर हळूवार फुंकर घालत, सहज अशा संवादातून त्यांना आयुष्याची उभारी पुन्हा दिली. सर्व स्तरातल्या वयाच्या आणि वृत्तींच्या व्यक्तींनी, त्यांचे भरून आलेले आभाळ मोकळे करण्यासाठी आणि सार्थकतेने जगण्याची उर्मी जागी होण्यासाठी, लताताईंच्या कुशीत काही काळ विसावा घेतलेला आहे. ‘वज्राद्पी कठोराणि-मृदुनि कुसुमादपि’ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पंजाबच्या अशांत काळातील, ज्ञानप्रबोधिनीच्या युवतींनी केलेला अभ्यास दौरा लताताईंच्या निर्भय आणि तरीही स्नेहपूर्ण नेतृत्वामुळे, अनेक कसोटीच्या प्रसंगांमध्येही यशस्वी झाला. देवराळा येथील रूपकुंवर सती प्रकरणावेळच्या अभ्यास दौर्‍यातही, काही बांक्या प्रसंगांमध्ये ज्या लताताईंचे उग्रचंडीचे रूप बघायला मिळाले. त्याच लताताई त्यांच्या सहवासात आलेल्या कठीण, ताठर व्यक्तीलाही त्यांच्या रुजुतेच्या बळावर कसे वितळायला लावत, याचेही अनेक प्रसंग कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाले. 

अत्यंत रसाळ आणि प्रेरक लेखन, ही तर त्यांची एक खास अशी ओळख आहे. त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत आशयसमृद्ध आणि अक्षर वाङ्मय ठरावे अशी आहे. भगिनी निवेदितांच्या सार्ध शताब्दी वर्षांमध्ये, निवेदितांच्या कार्यावरील पुस्तिकासंचातील शिक्षण विचारांवरील लताताईंनी लिहिलेले पुस्तक, शिक्षण क्षेत्रासाठी एक अमूल्य असा ठेवा बनले आहे. स्वामी विवेकानंदांच्या ‘अ ीळीळपस लरश्रश्र ीें कळपर्वी छरींळेप’ या पुस्तकाच्या ‘हिंदूतेजा जाग रे’ या अनुवादापासून ते ‘उजळती वाट’सारख्या, कुमारवयीन मुलांना सोप्या सोप्या उदाहरणातून व्यक्ती विकासाचे नेमके मर्म सांगणार्‍या पुस्तकापर्यंत, त्यांच्या अभिव्यक्तीचा विस्तार आहे. 

कविता हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. ‘देवचाफे’ हा त्यांचा वयाच्या विशीत लिहिलेला कवितासंग्रह. त्याला लाभलेले कुसुमाग्रजांसारख्या ऋषी-कवीचे, आशीर्वादपर प्रास्ताविक आणि राज्य सरकार पुरस्कारही मिळावा, ही त्यांच्या स्वयंभू प्रतिभेला मिळालेली महत्त्वाची पावतीच आहे. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी केलेला भावानुवाद म्हणजे, आत्मचिंतनाची हळूवार झुळूक आहे. सर्वांना प्रिय असलेल्या आणि अत्यंत अचूक आणि भरीव शब्द योजना असलेल्या, त्यांच्या अनेक पद्य, गीतांनी प्रबोधिनीच्या कित्येक पिढ्यांमध्ये प्रेरणेचा झरा वाहता ठेवला आहे. ‘आव्हान हे ज्योती ना किया’, ‘शुभ्र सुगंधित पुष्पे’, ‘गिरी कुहरातील गर्द बनातील’ अशा जोशपूर्ण गीतांपासून, ‘पाखरे भरारली निळी नभे झळाळली’सारख्या सुंदर अशा संचलन गीतापर्यंत आणि ‘राष्ट्ररथाला विजयी होण्यासम बल चक्रे दोन हवी’ या सुंदर शब्दांनी विणलेल्या, स्त्री पुरुष संपूरकतेवरच्या गीतापर्यंत किती किती गीतांना आठवावे? 

या सर्वांच्या पल्याडची त्यांची अजून एक ओळख म्हणजे, त्यांनी आयुष्यभर साधलेली आत्मविलोपी अध्यात्म साधना.

 कै. विमलाजी ठकार आणि स्वामी माधवनाथ, या दोघांचाही अनुग्रह त्यांना लाभला होता. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणार्‍या योग्याचे रूप, त्यांच्यामध्ये आम्हाला नित्य बघायला मिळाले. ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ म्हणजे काय, हे लताताईंच्या सहवासातल्या प्रत्येकाला कोणत्याही औपचारिक शब्दांशिवायच उमगले असणार, यात शंका नाही! परमात्म्याचा अंश प्रत्येकाच्या स्वरूपात आहे, हे सत्य सहवासात येणार्‍या प्रत्येकाशी, त्यांच्या होणार्‍या वर्तनातून सहजपणे प्रतिबिंबित होताना आम्ही पुन्हा पुन्हा अनुभवले आहे. एक शब्दही न बोलता ज्यांना दुसर्‍यांच्या व्यथा समजतात आणि जे त्यावर हळूवार फुंकर घालतात, अशा मोजक्या साधकांपैकी लताताई एक आहेत. (होत्या असे म्हणायला जीभ धजावत नाही. इतक्या त्या मनातून अजूनही आम्हा सर्वांच्या निकट आहेत.) आयुष्यभर स्वतःच्या गरजांचा अत्यंतिक संकोच करून घेत असतानाही, इतरांच्या गरजांचा विशालवृत्तीने विचार स्वीकार करणे, हे त्यांना कसे जमले असेल?

 ‘मृत्यू’ या विषयावरीलही त्यांचे चिंतन दीर्घकाळ चालू असणार असेच वाटते. सुमारे 25 वर्षांपूर्वी काहीशा धाडसाने त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, “माणसाचे अस्तित्व शरीराशिवाय वेगळे असते का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? पुस्तकातील उत्तरे मला माहीत आहेत. पण, तुमचा अनुभव असेल तर तसे सांगा.”

 

आजही त्यांचे खणखणीत शब्द मला स्पष्ट आठवतात. त्या म्हणाल्या होत्या, “होय. मी असा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी हे विश्वासाने सांगू शकते की, शरीर हे माणसाचे खरे अस्तित्व नाही.” त्यानंतर त्याविषयी कोणतीही शंका माझ्या मनात उद्भवली नाही. अशाच काही निमित्ताने, दोन वर्षांमागे त्यांनी मला ओशो यांचे ‘अबाऊट लिविंग अ‍ॅण्ड डाईंग’ हे पुस्तक वाचायला सांगितले. ते वाचत असतानाही, लताताईंचे 25 वर्षांपूर्वीचे शब्द माझी सोबत करत होते. गेली दीड वर्षे ज्या दुर्धर आजाराचा सहवास त्यांना लाभला, त्यालाही त्यांनी स्नेहभावाने कसे आपलेसे केले, हे त्यामुळे आता उमगते. अत्यंत समत्वचित्ताने स्वतःच्या निर्वाणानंतर काय करायचे याचे टिपण स्व:हस्ताक्षरात करून, पूर्ण तयारीनिशी या अनुभवाला त्या सज्ज झाल्या होत्या. हे केवळ कल्पनेपलीकडील वास्तव आहे.

 

अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाला लौकिक जीवनात जे अनेक पुरस्कार मिळाले, त्याच्या कितीतरी पलीकडे आणि उंचावर असे स्थान त्यांना ओळखणार्‍या, किंचित सहवासही लाभलेल्या किंवा त्यांच्याविषयी फक्त ऐकलेल्या हजारो-हजारो लोकांच्या हृदयात मिळालेले आहे. त्यांच्या कर्मयोगाचा आणि आत्मविलोपी वृत्तीचा वारसा जमेल तसा पुढे नेणे, हेच खरे तर त्यांचे पुण्यस्मरण आहे. म्हणूनच असे वाटते,

 

देवाघरचा पारिजात हा फुलला अपुल्या घरी,

विशुद्ध सात्विक शुभ्रसुमांनी दरवळली ओसरी।

स्मरति रूपे किती बिलोरी पूर्णिम् चंद्रापरी,

छाया-माया तुझी निरंतर जपतो हृदयांतरी।

शब्दांना ओलांडून जावे तिथे तुझा गं गाव,

चैतन्याने चैतन्यागृही सहजच केला ठाव।

आदरणीय लताताईंच्या स्मृतीस सस्नेह-सादर अभिवादन!

 

 




https://www.mahamtb.com//Encyc/2025/3/8/Vachaspati-Swarnalata-Bhishikar.html

Thursday, 16 May 2024

Football Great Sunil Chhetri to retire after India's FIFA World Cup qualification match against Kuwait May 16, 2024,

India's football great Sunil Chhetri on Thursday announced his decision to retire from international football after the country's FIFA World Cup qualification match against Kuwait on June 6. The national team captain announced his decision via a video he posted on his social media accounts. The 39-year-old striker made his international debut against Pakistan on 12th June 2005 and scored his first goal for India in the same match. "It's not that I was feeling tired, not that I was feeling this or that," Chhetri said in the video. "When the instinct came that this should be my last game, I thought about it a lot (and) eventually I came to this decision." As of now, Chhetri stands tall with third most international goals (94 in 150 matches) among the currently active players, behind Argentine legend Lionel Messi (106 in 180 matches) at number two and the leader Cristiano Ronaldo (128 in 205 matches), the legend from Portugal. He is also the most capped Indian footballer.

 Chhetri's decorated career saw him winning the AIFF Player of the Year award on six occasions, besides receiving the Arjuna Award in 2011 and the Padma Shri in 2019. 

 Looking back at his 19-year career, Chhetri said: "You know the feeling that I recollect in the last 19 years is a very nice combination between duty, pressure and immense joy. I never thought individually, these are the many games that I've played for the country, this is what I've done, good or bad, but now I did it. "This last one and a half, two months, I did it and it was very strange. I did it because probably I was going towards the decision that this game, this next game is going to be my last. And the moment I told myself first, that yes, this is the game that is going to be my last, is when I started recollecting everything. "It was so strange, I started thinking about this game, that game, this coach, that coach, that team, that member, that ground, that away match, this good game, that bad game, all my individual performances, everything came, all the flashes came. So when I did decide that this is it, this is going to be my last game." On the international stage, Chhetri has been part of the title-winning Indian teams in the AFC Challenge Cup in 2008, the SAFF Championship in 2011 and 2015, the Nehru Cup in 2007, 2009 and 2012, as well as the Intercontinental Cup in 2017 and 2018. Going into Chhetri's last international outing next month, India are currently second in Group A off FIFA World Cup qualifiers with four points, behind leaders Qatar. Kuwait are fourth with 3 points. 

He also shared the emotions of his family the moment he told them about his decision. "I told my mom, my dad and my wife, my family first, my dad was...he was normal, he was relieved, happy, everything, but my mom and my wife started crying...they couldn't express to me as to why they burst into tears."


Sunday, 11 September 2022

इतिहास घडविणारे भाषण-- संजय पाठक-TARUN BHARAT

 इतिहास घडविणारे भाषण-- संजय पाठक-TARUN BHARAT

आज, रविवार, दि. 11 सप्टेंबर. हा दिवस भारतात आणि भारताबाहेरही ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा केला जातो. विश्वबंधुत्व म्हणजे नेमकं काय आणि स्वामी विवेकानंदांची विश्वबंधुत्वाची संकल्पना नेमकी काय होती याचं विवेचन करणारा हा लेख...
दि. 11 सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पण, हा ‘विश्वबंधुत्व दिन’ नेमका 11 सप्टेंबरलाच का? तर 1893च्या दि. 11 सप्टेंबर या दिवशी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. एका भारतीयाला जागतिक व्यासपीठावर आपले विचार भाषणाद्वारे मांडण्यास मिळालेली ती पहिलीच संधी होती! विवेकानंदांसारख्या भारतभूमीच्या एका सुपुत्राला आणि एका देशभक्ताला मिळालेली ती अभूतपूर्व अशी संधी होती. त्या संधीचं स्वामी विवेकानंदांनी अक्षरशः सोनं केलं. 11 सप्टेंबर या दिवसाचं महत्त्व आहे ते यासाठी!
मात्र, दि. 11 सप्टेंबर, 1893 रोजीचं स्वामी विवेकानंदांचं ते भाषण एखाद्या फर्ड्या वक्त्यानं एखाद्या सभेत किंवा एखाद्या व्याख्यानमालेत व्याख्यान द्यावं एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. एखाद्या प्राध्यापकाने किंवा शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या 35-40 मिनिटांच्या व्याख्यानासारखंही ते भाषण नव्हतं! विवेकानंदांचं ते भाषण होतं अमेरिकेत वादळ निर्माण करणारं! ते भाषण होतं धर्ममार्तंडांमध्ये आणि कट्टरपंथीयांमध्ये खळबळ माजवणारं! प्राचीन हिंदू धर्म सार्या जगाकडे कोणत्या नजरेनं पाहतो ते सांगणारं असं ते भाषण होतं. विवेकानंदांच्या त्या भाषणानं खरं सांगायचं झालं तर एक इतिहास घडविला होता!
स्वामी विवेकानंदांचं ते भाषण होतं एका वेगळ्या विषयावर. असा विषय की, जो जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी त्यापूर्वी कोणत्याही भारतीयाला मिळाली नव्हती. तो विषय होता हिंदू धर्माची तत्वे जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा. प्रामुख्याने ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना आपल्या त्या भाषणातून स्वामी विवेकानंदांनी परिषदेला उपस्थित असलेल्या विविध धर्मांच्या प्रतिनिधींपुढे मांडली.
अमेरिकेला प्रयाण
कोलंबस हा दर्यावर्दी 1492 मध्ये अमेरिकेत उतरला. त्या घटनेला 1892 मध्ये 400 वर्षे पूर्ण होणार होती. त्या निमित्ताने अमेरिकेत वेगवेगळ्या महोत्सवांचं आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती जागतिक सर्वधर्म परिषद. या सर्वधर्म परिषदेसाठी आयोजकांनी जगातल्या सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं होतं. त्या सर्वधर्म परिषदेत जगातल्या सर्व धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येणार होते आणि आपापल्या धर्माची तत्वे, आपापल्या धर्माचे विचार मांडणार होते. विविध धर्मातल्या विचारांचं आदान-प्रदान त्या परिषदेच्या निमित्ताने होणार होतं.
वरवर पाहता, सर्वधर्म परिषदेच्या आयोजकांचा हेतू चांगला वाटत होता. पण, त्यामागे दडला होता एक छुपा अजेंडा किंवा एक विशिष्ट हेतू! तो हेतू होता, ख्रिस्ती धर्माचं महत्त्व सांगण्याचा. जगातल्या विविध धर्मांमध्ये फक्त ख्रिस्ती धर्मच कसा श्रेष्ठ आहे, हे त्या परिषदेच्या निमित्ताने अमेरिका सार्या जगाला सांगणार होती. त्या परिषदेतून ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठत्वाचाच डंका पिटला जाणार होता. हिंदू धर्मीयांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद त्या सर्वधर्म परिषदेला गेले. अमेरिकेतल्या शिकागो या शहरात ती आयोजित करण्यात आली होती.
त्या परिषदेला जाण्यापूर्वी विवेकानंदांनी कन्याकुमारीच्या समुद्रातल्या शिलाखंडावर तीन दिवस चिंतन केलं होतं. सर्वधर्म परिषदेला जाण्याचा विवेकानंदांचा विचार पक्का झाला तो त्या तीन दिवसांच्या चिंतनानंतरच. म्हैसूरचे महाराज चामराजेंद्र वाडियार यांनी विवेकानंदांच्या अमेरिका प्रवासासाठी आर्थिक मदत दिली. परिषदेला जाण्याबाबत श्री शारदामाता यांचा आदेश विवेकानंदांना मिळाला. अखेरीस स्वामी विवेकानंद अमेरिकेत शिकागो इथे जाण्यासाठी निघाले. तिथे ते बोटीने जाणार होते. बोट सुटणार होती मुंबईहून. त्यासाठी स्वामी मुंबईला आले. स्वामीजींना निरोप देण्यासाठी तुरीयानंद आणि ब्रह्मानंद हे त्यांचे सहकारी मुंबईला आले होते. सुमारे साडेतीन महिने प्रवास करून स्वामीजी जागतिक सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोमध्ये दाखल झाले.
विश्वबंधुत्वाची मांडणी
शिकागोच्या त्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी विचार मांडले ते हिंदू धर्मासंबंधीचे. हिंदू धर्मातल्या विश्वबंधुत्वाची कल्पना स्वामीजींनी प्रामुख्याने आपल्या भाषणात मांडली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली तीच मुळी, ‘विश्वबंधुत्वदर्शक’ अशा दोन शब्दांनी! हिंदू धर्मातलं विश्वबंधुत्वाचं तत्व सांगणारे ते दोन शब्द होते, ‘भगिनी’ आणि ‘बंधू’. विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली ती, ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो!’ या वाक्याने आणि त्यातल्या ‘भगिनींनो’ आणि ‘बंधुंनो’ या दोन शब्दांनी परिषदेत उपस्थित असलेल्या सार्यांची मनं विवेकानंदांनी जिंकून घेतली!
हिंदू धर्मात शिकवण दिली जाते ती सहिष्णुतेची आणि सर्वांच्या मताला मान देण्याची म्हणजे अर्थातच विश्वबंधुत्वाची. हे विश्वबंधुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर या जगातला प्रत्येकजण, मग तो कोणत्याही देशाचा असो वा कोणत्याही धर्माचा असो, माझा बांधव आहे ही भावना उराशी बाळगून त्याप्रमाणे प्रत्येकाशी केलं जाणारं वर्तन म्हणजे विश्वबंधुत्व!
हिंदू धर्मातली ही विश्वबंधुत्वाची संकल्पना विवेकानंदांनी आपल्या भाषणातून प्रकर्षाने मांडली. प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या रोमारोमात सहिष्णुता भिनलेली आहे.
प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या विचारातून आणि दैनंदिन आचरणातून दर्शन घडतं ते या सहिष्णुतेचंच! ही बाब स्वामीजींनी विविध उदाहरणांद्वारे परिषदेत उपस्थित असलेल्यांच्या निदर्शनास आणून दिली. भारतात जगातल्या विविध धर्मांचे लोक काही ना काही कारणाने आले. त्या सर्वांना उदारपणे इथे आश्रय दिला तो सहिष्णू वृत्तीच्या हिंदूंनीच! सहिष्णूतेची किंवा विश्वबंधुत्वाची संकल्पना ही हिंदू धर्माच्या किंवा प्राचीन वैदिक धर्माच्या उदयापासून या देशात अस्तित्वात आहे. याच संकल्पनेचा पुनरुच्चार संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून केला होता. भगवान बुद्धांनीही ‘विश्वबंधुत्वा’च्या संकल्पनेचा पुरस्कार आपल्या शिकवणुकीतून केला होता.
धर्मांतराची गरज नाही
शिकागोच्या सर्वधर्म परिषदेव्यतिरिक्त एरवीही स्वामी विवेकानंद ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतींनी सांगत. हिंदू धर्मीयांच्या अवतारवादाच्या सिद्धांतातून स्वामीजी हीच गोष्ट कशी सांगतात ते पाहा. स्वामी विवेकानंद सांगत, “ईश्वर पुनःपुन्हा अवतार घेत असतो. राम, कृष्ण, बुद्ध यांच्या रूपाने ईश्वरानं जन्म घेतला होता आणि नंतर तो पुन्हा एका वेगळ्या अवताराच्या रूपात जन्म घेईल. जग दर 500 वर्षांनी अधोगतीला जाते. त्यानंतर एक प्रचंड अशी अध्यात्मिक लाट येत असते. त्या लाटेच्या अग्रभागी पूर्णत्व प्राप्त करून घेतलेली एखादी व्यक्ती असते. अशा पूर्णत्व प्राप्त झालेल्या व्यक्ती प्रत्येक धर्मात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच हिंदू धर्म कोणत्याही अन्य धर्माचा द्वेष करीत नाही.”
निरनिराळे धर्म म्हणजे शेवटी आहेत तरी काय? यासंबंधी विवेकानंद म्हणतात, “जगातील निरनिराळे धर्म म्हणजे नाना रुचींच्या नर-नारींसाठी नाना अवस्थांमधून त्या एकाच ईश्वराकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. प्रत्येक धर्माचा उद्देश देहबोधाला ब्रह्मबोधात परिवर्तित करणे हाच आहे आणि त्या एकाच ईश्वराने समस्त धर्ममार्ग उत्पन्न केले आहेत.
विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कुणीही आपला धर्म बदलून दुसर्या धर्मात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही,” असं विवेकानंद म्हणत. ते म्हणत, “ख्रिस्ती माणसाला हिंदू वा बौद्ध व्हावयास नको आणि हिंदू वा बौद्धालाही ख्रिश्चन बनण्याचं प्रयोजन नाही. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे आचरण केलं तर ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना आपोआप प्रत्यक्षात उतरेल,” हे सांगताना विवेकानंद म्हणत, “प्रत्येकाने स्वत:चे वैशिष्ट्य कायम राखून इतर धर्मातला सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि त्याद्वारे पुष्ट होऊन स्वत:च्या प्रकृतीनुसार वाढत गेले पाहिजे.” आपलाच धर्म जीवंत राहून इतर धर्म नष्ट होतील, अशा स्वरुपाची मनोराज्यं करणार्यांची विवेकानंद कीव करत. ते म्हणतात, “संघर्ष नको, परस्परांना साहाय्य करा. आत्मसात करा, विनाश करू नका. कलह नको तर मैत्री हवी, शांतता हवी.”
सुमारे 700 कोटी लोकसंख्या असलेल्या या जगावर यापूर्वी अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. आजही अशा आपत्ती येत आहेत. कोरोनासारखी भयानक आपत्ती तर आज आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत! यापुढेही या जगावर नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. पर्यावरणाचा असमतोल, दुष्काळ, पाणीटंचाई, प्रदूषण, उपासमार, रोगराई, वादळे, भूकंप अशा विविध आपत्तींना आज सारी मानवजात तोंड देत आहे. त्याचबरोबर हरवत चाललेलं मन:स्वास्थ्य, आपसातली जीवघेणी स्पर्धा, परस्परांविषयीचा मत्सर व द्वेष, भ्रष्टाचार, अनारोग्य, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींना जगातल्या प्रत्येकाला आज सामोरे जावे लागत आहे.
असं म्हणतात की, मानवाची आयुर्मर्यादा आज वाढली आहे. ही गोष्ट नक्कीच सुखावह आहे! पण या वाढलेल्या आयुर्मर्यादेतला कितीतरी भाग आपण विविध समस्यांशी संघर्ष करण्यातच खर्च करत असतो. या आयुर्मर्यादेतून सुखाचे असे फारच थोडे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. सुखाचे हे क्षण अधिकाधिक प्रमाणात आपल्याला प्राप्त व्हावेत असं जर वाटत असेल, तर जगातल्या प्रत्येकानं सहिष्णू वृत्तीनं, म्हणजेच पर्यायानं विश्वबंधुत्वाच्या भावनेनं आपलं दैनंदिन आचरण केलं पाहिजे.
स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, आम्हाला माणूस घडविणारा धर्म हवा आहे. आपल्याला ‘माणसे’ हवी आहेत आणि ती जितकी अधिक मिळतील तितके चांगले!
See translation

Sunday, 15 May 2022

INDIAN HISTORIC WIN IN BADMINTON IS A WORLD CUP WIN

 TRIBUTE TO INDIA’S THOMAS CUP WIN-GEN NITIN GADKARI


It was a historic win. In case you didn’t erupt into a war cry after Srikanth Kadambi’s forehand smash in the left side court of Jonathan Christie. In that case, you are not a true sports lover of Indian sports. My wife thought I had gone mad, watching the match on my iPad with earphones; she had no clue what I was watching and probably had settled that I must be watching another Netflix movie. My shouts of joy after India’s victory surprised her out of her stupor. She thought I had lost my mind. Luckily for her, I controlled my euphoria, and things were back to normal. I am sure this would have been the case with many households in India today. This piece is a tribute to the sport and India’s rising stature in Badminton. India’s maiden victory against Indonesia came with an astonishing margin of 3-0. Indonesia, for the record, has won the title 14 times since its inception in 1948. India won it for the first time.

I can safely say that with the IPL fever at its peak, a minuscule sporting community knew that there was a Thomas cup tournament on. Ask anyone about the venue, and even today, you will draw a blank from most people. We have grown to know badminton players’ names. Lately, the Indian girls have hogged most of the limelight with victories and biopics. Men have had it tough. Lakshya Sen, a bronze medallist at the recently held in Spain World Championship, is a delight to watch but would dwarf in front of the IPL popularity of, say, Yazuvender Singh  Chahal or Umar Malik: a new entrant in cricket. These individuals do not make it to the Indian side in most formats, but in a cricket crazy country, which is to question who are your heroes. That is why this victory is so much sweeter and deserving. I don’t remember reading in any paper the news about the Indian badminton squads leaving for Thomas and Uber Cup. The news filtered only after India qualified for the semi-finals by beating Malaysia in the Thomas Cup quarter-finals.

Why was the Indian Victory so Difficult?

Thomas Cup is the Davis cup for Badminton, otherwise an individual sport. China, Malaysia, Denmark and Indonesia have dominated the game for decades. India’s forays into sports glory have been individual sparks of brilliance like Prakash Padukone and Pulela Gopichand’s Victories in All England Open: The Wimbledon of Badminton 1980 and 2001, respectively. PV Sindhus/ silver and bronze medals in successive Olympics and Sania Nehwal’s All England Open Finals. India’s attempts at winning the Thomas cup have ended three times at the semi-final level. They never entered the finals ever before this year. The win this time was scripted much in advance. A concerted effort started at least six years back when the BAI began working on the selection process and players. India was good at having singles players, with Srikanth Kadambi, Himanshu Prannoy and Lakshya Sen doing well on the singles circuit. It was the doubles pairing which always troubled the Indian team. The pair of Satwiksairaj and Chirag Shetty was matched way back in 2015. Since then, the doubles pair have learnt, practised, played, and won under various coaches. Two coaches deserve mention: Malaysian Tan Kim and Danish Legend Mathias Boe. Boe was with the team in Bangkok. The foresight, planning and hard work have borne fruits. The doubles pair has made the difference between winning the cup and just playing the cup. Today this pair is most feared by all opponents.

The journey to the Thomas cup final was tough and hard-fought. The team camaraderie and the desire to win excelled in the squad, and all of them worked in tandem. There was a noticeable bonhomie, and even the commentators on the final day, especially Aparna Popat, a well-known women’s Badminton player, commented more than once that the team bonding in this squad was the strongest she had ever seen. It was also evident in the body language and the collective response to a player’s victory. Not many, including myself, believed that this was possible. In crucial moments in the Quarter and Semi-finals, when the spectators lost their belief in the team, the players did not. Himanshu Roy’s singles victory in the deciding rubber against Denmark in the semi-final was down a game and hurt his heel; he then went on to win the next two games is legendary stuff which years later badminton fans will recollect.

A lot has now been written, and many will write in the next few days. But success has many fathers, and defeat is a poor orphan. Not many Indians would know that the ladies' version of the Thomas cup: The Uber Cup, was also going on simultaneously in Bangkok. PV Sindhu led the Indian team. It made an ignominious exit in the quarter-finals after losing to Thailand 0-3. While all the attention is on men, the ladies seem to have been blanked out. Such are the inglorious ways of modern sport. But for the Indian male shuttlers, this is the 1983 moment. We hope that the sport gets the same fillip after this victory as cricket got after 1983. Today it’s time to toast and celebrate the men’s success: ‘Sweet Dreams are made of these ’.

Sunday, 30 August 2020

आबा : संघात न आलेला स्वयंसेवक!-27-Aug-2020 - गिरीश प्रभुणे

 


तसा आबांचा माझा फार उशिरा संबंध आला. म्हणजे आबांचाच सकाळी सकाळी दूरभाष आला. पूर्वी सोलापूरला पोलिस अधीक्षक असणारे पद्मनाभन्‌ यांनी मला दूरभाष करून विचारलं की, ‘‘आबा... आर. आर. पाटील, गृहमंत्री आपल्याशी बोलू इच्छितात...’’

क्षणभर मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. ‘‘गुरुजी... खूप दिवसांपासून आपल्याला भेटायची इच्छा होती. मुंबईत याल का? भटके-विमुक्तांच्या, विशेषत: पारधी समाजाच्या प्रश्नावर बोलूयात...’’

मग लगेच दुसर्‍या दिवशीच त्यांनी बोलावलं रामटेकवर. एक अत्यंत विनम्र, ऋजू स्वभावाचं व्यक्तिमत्त्व. ते मला घ्यायला बाहेर आले. जराही कुठं अहंकाराचा, पदाचा बोलण्या-चालण्यात वास नाही. त्याच वेळी त्यांचे एक बंधू- मावस की चुलत, आले. संन्यासी. इस्कॉनचे एका केंद्राचे प्रमुख. त्यांना ते सांगू लागले भरभरून. अशाप्रकारे स्तुती ऐकायची सवय नसलेला मी गोंधळून गेलो. संघात, परिवारात असं व्यक्तीविषयी बोललं जात नाही. कामाविषयी, समस्येविषयी बोललं जातं. मोजक्या शब्दांत आशयघन बोलणं. इथं व्यक्तीविषयी अधिक बोललं जातं. बोलणारे आबाच असल्यामुळे त्यात अकृत्रिम भाव होता. ते मनापासून बोलत होते.

‘‘मला यांचं पारधीपुस्तक प्रमोद महाजनांनी दिलं होतं. मी ते पूर्ण वाचलं. आणि बरं का गुरुजी, त्याच्या पाचशे प्रती मी महाराष्ट्रातल्या प्रमुख पोलिस अधिकार्‍यांना वाचायला लावल्या.’’

याविषयी एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते वसंत वाणी मला म्हणाले होते, ‘‘प्रभुणे, आबांनी तुमचा दोन-चार वेळा उल्लेख केला पक्षाच्या बैठकीत!’’

तर असे आबा. एखाद्या शिक्षकासारखे म्हणजे गुर्जीसारखे. साधे, सरळ. जवळच्या मित्रासारखे. खूप जुना परिचय असल्यासारखे ते माझ्याशी वागत होते. सर्व घर आतून िंहडून दाखवलं. देवघर दाखवलं. ‘‘गावी असलो की आंघोळ झाल्यावर गावातल्या सर्व देवतांचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. इथं देवघरात बसलं की मन आपोआपच शांत, स्वच्छ बनतं...’’

त्या दिवशी त्यांनी दोन तास गप्पा मारल्या. पारधी समाज, त्याच्या जगण्याच्या समस्या, त्यांची कौटुंबिक स्थिती, भांडणं-मारामार्‍या, पोलिस खातं गाफील... आणि पारध्यांमुळे सडला जाणारा समाज... समाजाचा रोष, संताप यांना बळी पडणारा समाज.

‘‘पारधी समाजाच्या विकासाचा एक आराखडा तयार करू या आपण. सर्वांगीण विकासाचा. तुम्ही जे प्रयत्न केलेत त्याच्या आधारे असा आराखडा तयार करता येईल. माझं, सरकारचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य राहील.’’

आबा दर दिवाळीला त्यांच्या परिसरातील पारधी कुटुंबांना नवे कपडे घेऊन देत. ‘‘कितीही दिलं तरी पुरं पडत नाही.’’

त्यांनी आमच्या गप्पा शब्दबद्ध करायला दोन कार्यकर्ते बसवले होते. त्याचं एक टिपण त्यांनी मला बनवून दिलं.

त्यांच्याशी बोलत असतानाच कुर्डुवाडीवरून एक दूरध्वनी आला.

 

पोलिसांच्या हल्ल्याचा. वस्तीला कसं घेरून टाकलंय्‌ आणि मारझोड सुरू आहे. याचं जिवंत चित्रण कृष्णाच ऐकवत होता. माझ्याकडून मोबाईल घेत त्यांनी ते सर्व ऐकलं आणि लगेच तिथल्या जिल्हाधिकार्‍याला फोन लावला आणि लगेचच एक बैठक घेऊन तोडगा काढायला सांगितला.

त्यानंतर आमच्या एक-दोन बैठका झाल्या. एका बैठकीत ते म्हणाले, ‘‘गुरुजी... आता तेवढा वेळ नाही. आपण गेली दोन वर्षे जे बोललो, ठरवलं ते होईल तेव्हा होईल. आता पाच-सहा महिन्यांत निवडणुका येतील. आम्ही असू याची शक्यता कमीच आहे. तुमचेच लोक येतील. पण, माझी एक विनंती आहे. तुम्ही तुमच्या िंचचवडच्या शाळेला गुरुकुलाची मान्यता घ्या. मला माहीत आहे, तुम्हां लोकांना शासनाच्या सहकार्याविना सर्व करायचं असतं. पण, याला शासनाचं सहकार्य घेतलंत तर प्रशासनाचं या कामाकडे लक्ष जाईल आणि सरकारचा पैसा हा अखेरीस लोकांचाच असतो. तो तुमच्यासारख्यांच्या कामास आला पाहिजे. इथं वर्षभर लूट सुरू असते. माझी विनंती आहे. तुम्हाला मी आमच्या सचिवांकडे पाठवितो.

 

त्यांनी लगेच दोघांना दूरभाष केले. एक होता- आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांना. ते त्या वेळी सातारच्या दौर्‍यावर होते. त्यांनी माहिती दिली. पारधी समाजासाठी दोन आश्रमशाळा करायचे ठरवले आहे. त्यातली एक त्यांनी आम्हाला द्यायची ठरवले. लगेचच आदिवासी सचिवांना दूरभाष करून मला त्यांच्याकडे जायला सांगितले. लगेचच. माझ्याबरोबर नेहमीसारखेच कार्यकर्ते होते- अॅड. सतीश गोरडे, पूनम गुजर, सूरज भिसे, अख्तर िंपजारी, सतीश अवचार, पोतदार सर. आबांनी एक अधिकारी आमच्याबरोबर दिला. आम्ही सचिवांच्या केबिनजवळ गेलो, तर प्रधान सचिव आमच्या स्वागताला बाहेर आले! प्रवीणिंसह परदेशी. ते आदिवासी विभागाचे प्रधान सचिव होते.

 

‘‘प्रभुणे, आपल्याला माझ्याकडे यायला मंत्र्यांच्या शिफारशीची गरज नाही. पण, आबांनी फुल्ल सपोर्ट करने को कहा है...’’ परदेशीसाहेबांनी उपसंचालकांना बोलावलं आणि आश्रमशाळेचा एक अर्ज द्यायला सांगितला.

‘‘असा अर्ज नाही देता येणार. जाहिरात देतो आपण आणि शासनाचं धोरण आहे आता नव्या आश्रम शाळांना परवानगी द्यायची नाही...’’

उपसंचालकांनी आपलं पठडीबंद उत्तर दिलं. प्रवीणिंसहांनी त्यांना सौम्य शब्दांत समज दिली. ‘‘गृहमंत्र्यांनी यांना पूर्ण सहकार्य करायला सांगितलंय्‌. त्यांना अर्ज द्या... आणि ही आश्रमशाळा यांना द्यायचीय्‌. तसा अहवाल मला द्यायला सांगितलंय्‌.’’

प्रवीणिंसह िंपपरी-िंचचवडचे आयुक्त असताना क्रांतिवीर चाफेकरबंधूंच्या वाड्याचं स्मारकात रूपांतर करण्यातल्या सर्व अडचणी त्यांनी दूर करून कामाला मंजुरी दिली होती. त्यामुळे परिचय होताच. आणि ते उपसंचालक होते कैलास भंडलकर. त्यांच्या केबिनकडे जाता जाता त्यांनी विचारलं, ‘‘आपलं नाव...?’’ मी नाव सांगताच ते थबकले. म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही आमच्या गस्ती साहेबांचे मित्र! डॉक्टरसाहेब नेहमी नाव काढतात.’’ डॉ. भीमराव गस्तींची ओळख निघताच पुढची कामं सोपी झाली. आम्ही अर्ज घेऊन परत आबांच्या भेटीला आलो. त्यांनी टंकलिखित पत्र तयार ठेवलंच होतं.

या त्यांच्या पत्राचा पुढे खूपच उपयोग झाला. घोडेगाव पुणे जिल्हा अंतर्गत असल्यामुळे सर्वत्र पैसे द्यावे लागतात, असा अनुभव सांगितला जायचा. पण, आबांच्या पत्राने ही फाईल विनासायास मंत्रालयात गेली. आबांचा परत फोन आला. ‘‘गुरुजी, थोडेच दिवस राहिलेत. येऊन जा.’’

आम्ही लगेच गेलो. त्यांनी अधिकार्‍यांना तर बोलावलेच, पण काही सहकारी मंत्र्यांना बोलावून माझा सर्वांशी परिचय करून दिला. ‘‘आपण सत्तेत राहून जे करू शकलो नाही, ते यांनी सत्तेपासून दूर राहून केलंय्‌. यांच्याप्रमाणे कार्यकर्ते घडवायला हवेत.’’ आबांच्या बोलण्यातून संघावरचा विश्वास डोकावत होता. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन यायला सांगितलं होतं. गुरुकुलम्‌मधील काही आणि कुर्डुवाडी-सोलापूर भागातील कार्यकर्ते. यांना त्यांनी कळकळीने मार्गदर्शन केलं. मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती केली. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. आम्ही मंत्रालयात असतानाच आचारसंहिता सुरू झाली. त्यांनी अधिकार्‍यांना आम्हाला सहकार्य करायच्या सूचना केल्या.

 

आबांनी गुरुकुलम्‌ मान्यतेचा आग्रह धरला. माझ्याकडून त्याची फाईल बनवून घेतली. खालून मंत्रालयात फाईल येणं ही क्रिया करवून घेतली. दोन-तीन वर्षे अत्यंत तळमळीने परिश्रमपूर्वक सर्व सहकार्य केलं. यात त्यांचा हेतू काय होता? ना आम्ही त्यांच्या पक्षाचे-विचाराचे, ना नात्यातले. तरी समाजाच्या प्रेमाखातर एका सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून त्यांनी सहकार्य केलं. त्यांना खंत होती, आचारसंहिता लागायच्या आधी हातात मान्यतेचं पत्र द्यायचं राहून गेलं. त्यांचं अपूर्ण काम पुढे मित्रवर्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पूर्ण केलं.

 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण, त्यासाठीची लागणारी तरतूद आबांच्या काळातच करण्यात आली होती. दैवगतीच विचित्र होती. मान्यता मिळण्यासाठी घाई करणारे आबा अचानक इहलोक सोडून गेले. एक, संघात कधीही न आलेला, शाखेत न आलेला संघ स्वयंसेवक म्हणजे आबा!

 

आबांनी शेवटच्या भेटीत सहकारी मंत्र्यांना ओळख करून देतानाचे शब्द मनात रुंजी घालताहेत-

‘‘हे संघाचे कार्यकर्ते कसं काम करतात याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. मागची लोकसभेची निवडणूक. साहेब माढा मतदारसंघातून उभे होते. त्याच्या आधी दोन-तीन वर्षे सर्व सोलापूर जिल्हा िंपजून काढला होता. पारधी मेळावे घेतले आपण. सर्व केलं. माढ्याला एक सभा होती. सर्वांची भाषणे झाली. खास पारधी समाजाची सभा होती ती. सर्वांची बोलणी झाल्यावर मी विचारलं, ‘‘मग आता मतदानाच्या वेळी काय लक्षात ठेवणार? कशाचं बटन दाबणार?’’ ‘‘कमळाचं...!’’ सर्वांनी एकच उत्तर दिलं. आम्ही चक्रावून गेलो. गेली चार-पाच वर्षे इतकं करूनही हे पारधी म्हणताहेत कमळाचं बटन दाबणार! आम्ही सारेच नाराज झालो.

 

‘‘का रे... घड्याळावर मतदान का करणार नाही?’’

‘‘तुम्ही आज आलात. उद्या जाल. नंतर कोण?’’

आबा म्हणाले, ‘‘मी चौकशी केली. आणि संघाचं काम किती खोलवर रुजलंय्‌ हे लक्षात आलं. यांनी ते कार्यकर्ते उभे केले. घरचं खाऊन आज समाजाचं काम कोण करतंय्‌... हे संघाचे लोक...’’

अत्यंत निगर्वी. सरळ मनाचे. राजकारणात, तेही कॉंग्रेसच्या संस्कृतीत न शोभणारे आबा आश्वासन देऊन गेले होते.

‘‘प्रभुणे, मी नक्की येणार. घरच्यांना घेऊन येतो तुमचा प्रकल्प पाहायला...’’ हे आश्वासन मात्र आबांना पाळता आलं नाही. आबांनी आपणहून बोलावून घेऊन हे काम माझ्याकडून करवून घेतलं. गुरुकुल शिक्षण, त्याला मान्यतेसाठी ते खूपच आग्रही होते. पहिल्यापासूनच ते म्हणत- थोडेच दिवस राहिलेत...

खरंच आबांनी आग्रह धरला नसता तर...? हे काम झालं असतं...? मन अस्वस्थ करणारा प्रश्न. 

9766325082(लेखक सामाजिक कार्यकर्ते वयमगरवाडी प्रकल्पाचे जनक आहेत)

Sunday, 25 August 2019

P.V. Sindhu on Sunday became the first Indian to win a Badminton World Championships gold

P.V. Sindhu on Sunday became the first Indian to win a Badminton World Championships gold by beating familiar rival Nozomi Okuhara of Japan in a lop-sided final here on Sunday.
The Indian won 21-7 21-7 in the summit clash that lasted just 38 minutes.
Two years after being robbed off the gold by Okuhara in an epic 110-minute final at Glasgow that went down as one of the greatest battles in badminton history, Sindhu finally exorcised the ghost of that heart-wrenching loss with a completely dominating win over the same opponent.

Thursday, 22 August 2019

निराधारांची माय -कल्याणी पाटील- दिनांक 22-Aug-2019 22:28:31 BY-- कविता भोसले-TARUN BHARAT

 आपल्या पुण्याच्या वृद्धाश्रमात निराधार वृद्धांचा आधार बनलेल्या कल्याणी पाटीलचा प्रवास सेवाभाव आणि समर्पणवृत्तीचा एक आदर्शच म्हणावा लागेलतिच्या या प्रवासाविषयी थोडक्यात...


पिकलेल्या पानांची
कुणाला असते गरज,
आज आहे तर उद्या नाही
असे त्यांचे जीवन
 
या ओळी सर्व पिकलेल्या पानांसाठी अर्थात आपल्या उतारवयात आयुष्याच्या काही अखेरच्या घटका मोजणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी... रस्त्यावर, बस-रेल्वेस्थानकात हमखास आपल्याला असे काही निराधार आजी-आजोबा दिसतात. तेव्हा आपल्या मनात एक क्षणभर तरी नक्कीच विचार येतो की, कुणीच कसं नसेल यांना, कोणीतरी असेलच ना... आणि त्यांची ही निराधारता आपल्याला निःशब्द करुन जाते. अशाच या निराधार आजी-आजोबांना घराचा, मायेचा हात देण्याचे काम करत आहेत कल्याणी पाटील. बसस्थानकात रोज दिसणाऱ्या एका आजीला बघून कल्याणी खूप अस्वस्थ होत असेतिने त्या आजीला आपल्या घरी आणण्याविषयी वडिलांना विचारले असता त्यांनी तिला यावर नीट विचार करण्यास सांगितला. तिला मुंबई-पुण्यातले जवळजवळ २०० वृद्धाश्रम दाखविले.कल्याणीने वयाच्या १८व्या वर्षी बसस्थानकातील आजीला घरी आणलेत्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. अनेक वृद्ध लोक तिच्याकडे येत होते. २०१० मध्ये तिने 'द्वारका सेवासदन' वृद्धाश्रम पुण्यातील राजगुरुनगरच्या आपल्या घराजवळच सुरू केला. एका आजीपासून सुरू झालेल्या या आश्रमात आज शंभरपेक्षा जास्त वृद्ध आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. या आश्रमाच्या वाटचालीत कल्याणीला तिचे वडील दिनकर पाटील आणि आई कांता पाटील यांची खंबीर साथ लाभली.
 
कल्याणीचे दहावीपर्यंतचे शिक्षण नेरळमध्ये झालेत्यानंतरचे शिक्षण पुण्यातल्या राजगुरूनगरमधील पूर-कान्हेसर या गावात झाले. वृद्धाश्रमासाठी काम करतानाही तिला खूप अडचणी आल्या. अनेक स्थानिक लोकांनी 'कशाला नसत्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?' असे बोलून तिची हेटाळणी केली. मात्र, कल्याणी थांबली नाही. या वृद्घाश्रमासाठी मदत मागताना अनेक संस्थांनी, “आम्ही वृद्धांना मदत करत नाही, फक्त निराधार मुलांना मदत करतो, कारण, त्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे. वृद्ध लोकांवर पैसे कशाला खर्च करायचे?” अशीही उत्तर दिली. घराच्या मागील बाजूलाच कल्याणीने आश्रम बांधला आहे. जेवण मात्र घरातले आणि सगळे आजीआजोबा एकत्रच करतात. कल्याणीची आई सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. काही आज्या त्यांना मदत करतात. सगळ्यांना एकच प्रकारचे अन्न. कुठलाही भेदभाव नाही. कल्याणी या ज्येष्ठांच्या मानसिक अवस्थेबद्दल अनेक गोष्टी सांगतेकोणी आपल्या मुलांची आठवण काढून रडतं, तर कोणी निपचित बसून राहतात.आपल्या आयुष्याची फरफट त्यांच्या डोळ्यातून दिसतेत्यांना बळ आणि आपला कुणी आहे, असा विश्वास देण्यासाठी कल्याणी सदैव तत्पर असतात. आजपर्यंत या वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतलेल्या सर्व ज्येष्ठांचे अंत्यसंस्कार कल्याणीनेच केले आहेत.
 
अनेक ज्येष्ठांचे अनुभव अंगावर काटा आणणारे असून फक्त मुलांना जड झाल्याने रस्त्यावर सोडलेल्या वृद्धांविषयी सांगताना प्रचंड धक्का बसल्याचे कल्याणी सांगते. एका आजोबांना त्यांच्याच मुलांनी रात्री दोन वाजता घरातून बाहेर काढले. त्यांना राजगुरूनगर पोलिसांनी कल्याणीच्या आश्रमात भरती केले. तब्बल चार वर्षांनी ते आजोबा जेव्हा वारले, तेव्हा त्यांचा मुलगा अचानक प्रकट होऊन त्याने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कारही न करता फक्त वडिलांच्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून कागदपत्रे नेलीत्याने आपल्या वडिलांचे तोंडही बघितले नाहीआईवडिलांना ओझं समजून झुरळासारखी झटकून टाकणारी निर्दयी आणि पाषाणहृदयी पिढी आपण इतक्या कमी वयातच बघितल्याचे कल्याणी सांगते. कल्याणीला २०१८ मध्ये 'महाराष्ट्र ग्राम विकास प्रतिष्ठान'चा सामाजिक कार्यातील पुरस्कार मिळाला आहेशहरापेक्षा ग्रामीण भागात मदतीची खूप गरज असून आर्थिक स्वरूपात या आश्रमात कोणतीही मदत स्वीकारली जात नाही. धान्य, कपडे अशी साहित्यरुपी मदत येथे स्वीकारली जाते. या आश्रमात सर्व आजी-आजोबांचे एकत्र वाढदिवस साजरे केले जातात. सर्व सण-सोहळे आनंदात संपन्न होतात. सकाळी ९ वाजता चहा, मग नाश्ता, थोडे बागकाम किंवा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, झोप, मग सायंकाळचा चहा, परत थोडे फिरणे, मग रात्रीचे जेवण असा या वृद्धाश्रमातील दिनक्रम. आज्या स्वयंपाक किंवा भजन करीत असतात तर आजोबा बागकाम, फिरणे, वाचनात आपला वेळ व्यतीत करतात. या आश्रमात बहुतांश सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना अनेक शारीरिक-मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते. इथे दर दोन दिवसांनी डॉक्टरांकडून सगळ्यांची तपासणीही केली जाते. खरं म्हणजे, कल्याणीचा हा वृद्धाश्रम म्हणजे निराधारांसाठी शेवटच्या दिवसातील सोनेरी दिवसचआयुष्यभर मुलांसाठी जगलेल्या या पिकलेल्या पानांना कल्याणीने जे सुखाचे दिवस दिलेत्याचे मोल नाही. तिला हा आश्रम चालविताना अनेक अडचणी येतात, मात्र त्या सगळ्यांकडे तिने दुर्लक्षच केले. कल्याणीच्या या कामाला आणि निःस्वार्थ सेवेला अनेक प्रणाम...!

Saturday, 6 July 2019

डॉक्टर फॉर बेगर्स' महा एमटीबी 19-Jun-2019- कविता भोसले




रुग्णसेवेसोबत अनेक डॉक्टरांनी समाजसेवेचेही व्रत हाती घेतलेले दिसतेपणफक्त रस्त्यावरील गरीब-भिकाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठीच तत्पर असे डॉक्टर दिसत नाहीतपणयाला अपवाद ठरले ते डॉअभिजित सोनावणे.

'भिकाऱ्यांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉअभिजित सोनावणे यांची कहाणी खरं तर सगळ्यांनाच विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. डॉ. अभिजित सोनवणे हे सर्व सुखसुविधांवर पाणी सोडून, लाखोंच्या पगाराला चक्क नाकारून रस्तोरस्ती फिरत भिकाऱ्यांची सेवा करीत आहेत. डॉ. सोनावणे यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्याच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये झाले असून महाविद्यालयीन शिक्षणही साताऱ्याच्या 'सायन्स कॉलेज'मध्ये झाले. त्यानंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून अभिजित यांनी १९९९ साली आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आयुर्वेदातील शिक्षण घेऊन 'डॉक्टर' झालेल्या अभिजित यांनी एका छोट्या गावात वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. परंतु, तिथे त्यांचा जम बसत नव्हता. त्यानंतर डॉ. अभिजित यांनी रोज एका गावकऱ्याकडे जाऊन अल्प दरात तपासणी करण्यास सुरुवात केली. मात्र, लोक त्यांच्याकडून तपासून घेण्यासही तयार होत नव्हते. याचे कारण म्हणजे अभिजित यांचा गबाळ्यासारखा अवतार. त्यामुळे ते डॉक्टर आहेत का कोणी भोंदूबाबा, असा प्रश्न गावकऱ्यांना पडे. आता पुढे काय करावे, हा प्रश्न डॉ. अभिजित यांच्या समोर 'आ' वासून उभा होता. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षे खर्ची घातली. पण, तरी आपल्याला पोटापुरतंही मिळू नये, या विचाराने ते नैराश्याच्या गर्तेत गेले.
 
मंदिरात अभिजित आपल्या भविष्याच्या काळजीत तासन्तास बसून राहत. तेव्हा त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असत. हळूहळू अभिजित आणि त्यांची मैत्री झाली. त्या आजी-आजोबांनी अभिजित यांना अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसे सामोरे जायचे, याचे जणू धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी अभिजित यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. त्यांना भिक्षेतून मिळणाऱ्या अन्नावर अभिजितची गुजराण चाले. लोकांनी दिलेले पैसेही ते नकळत अभिजित यांच्या पिशवीत टाकत. त्या पैशांवर अभिजित दिवस कसेबसे ढकलत होते. अशाच हलाखीच्या दिवसात अभिजित यांना अखेरीस एका चांगल्या रुग्णालयामध्ये नोकरी मिळाली. पगारही समाधानकारक होता. हळूहळू डॉ. अभिजित यांचे राहणीमानही सुधारले. गरिबी आणि श्रीमंती या दोन टोकांच्या आयुष्यातील तफावत त्यांनी जवळून अनुभवली होती. म्हणूनच आता हे सुखही त्यांना कुठे तरी बोचत होतं. सुखवस्तू जीवन जगणाऱ्या डॉ. अभिजित यांना मात्र त्या वृद्ध आजी-आजोबांच्या वेदना स्मृतीपटलावरुन पुसल्या जात नव्हत्या. त्यांच्या प्रेमाची परतफेड करायची, या एकाच निर्धाराने झपाटलेल्या अभिजित यांनी १५ ऑगस्ट२०१५ रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. देशाच्या स्वातंत्र्य दिनीच स्वत:ला त्यांनी या जोखडातून मुक्त केले. पुढे काय करायचं हेही त्यांना ठाऊक नव्हतं. पण, मनात एक मात्र नक्की होतं की, ज्या आजी-आजोबांनी आपल्याला मदत केली, त्यांचे ऋण फेडायचे. डॉ. अभिजित यांनी आपल्या या सामाजिक कामाला पुण्यातून सुरुवात केली. मंदिर, मशीद, चर्च किंवा गुरुद्वारा अशा धार्मिक स्थळांवर दररोज भिकाऱ्यांना भेटून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारण, डॉ. अभिजित यांना भिकाऱ्यांवर दया करून 'देवता' बनायचे नव्हते, तर त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करायचे होते.एखादा दिवस प्रवासानिमित्त किंवा कुठल्या कामानिमित्त अभिजित ठराविक मंदिराजवळ, मशिदीजवळ, चर्चजवळ वा गुरुद्वाराजवळ गेले नाहीत, तर तेथील भिक्षेकरी चिंतीत होत. ते अभिजित यांची आतुरतेने वाट पाहायचे. त्यांना कोणत्या वाराला अभिजित कुठे असतील, हेही चांगलेच माहीत झाले होतेत्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते नेमक्या ठिकाणी हजेरी लावायचे. विशेष म्हणजे, आजवर अशाच ३३ भिक्षेकऱ्यांना त्यांनी हाताला काम मिळवून दिले.
 
या कार्याविषयी डॉ. अभिजित म्हणतात, “माझा परमेश्वर या पीडित माणसांमध्ये आहे. त्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमाने वागा. त्यांना सन्मानाने वागवा. मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.” ज्या व्यक्तींना समाजाने टाकून दिलं, त्यांना आपलंस करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच डॉ. अभिजित यांचे ध्येय आहे. 'डॉक्टर फॉर बेगर्स'अशी डॉ. अभिजित सोनवणे यांची ओळख आहे. त्यांनी या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या तीन वर्षांत ४० आजी-आजोबा आणि दहा युवकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. या आजी-आजोबांनी आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा हा मार्ग डॉअभिजित यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ते म्हणतात, “डॉक्टर होण्यास चांगली 'डिग्री' लागते, पण चांगला माणूस होण्यास कुठल्याही 'डिग्री'ची गरज लागत नाही.” अभिजित यांनी 'सोहम ट्रस्ट'नावाची संस्थाही स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते. या कामात त्यांच्या पत्नी डॉ. मनीषाही त्यांना मदत करतात. भिक्षेकऱ्यांचा हा नि:स्वार्थी डॉक्टर पुण्यात सोमवार ते शनिवार मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा गुरुद्वाराबाहेर तुम्हालाही कधी दिसतो का ते बघा...