Total Pageviews

Showing posts with label #ISIS. Show all posts
Showing posts with label #ISIS. Show all posts

Tuesday, 1 August 2023

आयएस’च्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता उपाय योजना PART 3

 

ड्रोनच्या साह्याने घातपात?

महंमद साकी आणि महंमद खान यांच्या कोंढव्यातील घरी ड्रोनचे साहित्य सापडल्याने हे दहशतवादी ड्रोनच्या साह्याने काही घातपात करणार होते का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

पुण्यासारख्या शांत शहरात वर्ष २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी स्फोटाने १७ जणांचा बळी घेतला होता आणि ५७ जण घायाळ झाले होते. हा खरे तर एक धक्काच होता; त्यातील आरोपींनाही आता १३ वर्षांनंतर इतक्या विलंबाने शिक्षा होत आहे. या घटनेनंतर बराच काळ लोटल्यामुळे असेल कदाचित्; पण आतंकवादविरोधी पथक आणि पुणे पोलीस यांना गुंगारा देऊन २ आतंकवादी कोथरूडसारख्या परिसरात पकडले जाणे, हे पुणे वाटते तितके सुरक्षित नाही’, हेच सिद्ध करते. नुकताच, ४ मे या दिवशीही सहकारनगर परिसरात इलेक्ट्रिक्सच्या दुकानात प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये झालेली मोठी हानी पहाता आतंकवादविरोधी पथकाने याचे अन्वेषण चालू केले. या पार्श्वभूमीवर पुण्यात गाड्यांमध्ये स्फोट करण्याच्या हेतूने आलेल्या २ आतंकवाद्यांना अटक होणे, हे गंभीर आहे. पुण्यात यापूर्वी सीमीचे जाळेही आढळले होते आणि तिच्या आतंकवाद्यांनाही अटक झाली होती. अर्थात्च काही स्थानिकांच्या (स्लिपर सेलच्या) साहाय्याविना अशा कारवाया शक्य नसतात, हे स्पष्टच आहे. काही वर्षांपूर्वी येथूनच इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्या एका धर्मांध विद्यार्थिनीवर कारवाई न करता तिचे समुपदेशन केले होते. पुण्यात ५ हजारहून अधिक बांगलादेशी आहे.बांगलादेशी पण अत्यंत कमी किमतीत दहशतवादाची कृती करतात.

काय करावे

पुण्यासारख्या बुद्धीवंतांच्या शहरातील नागरिकांनीही सतर्क रहाण्याच्या दृष्टीने आणि आतंकवाद्यांच्या विरोधात संघटित होण्याच्या दृष्टीने कृतीशील रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ?’, ‘धर्मांधांच्या वस्त्यांमध्ये काय घडत आहे ?’, यांविषयी सर्वांनीच जागरूकता बाळगायला हवी. पुण्यात घरमालक बरेच आहेत. त्यांनी आपण कोण भाडेकरू ठेवत आहोत ?’ याविषयी पोलिसांना माहिती देणे अत्यावश्यक आहे. आतंकवाद्यांनी आता त्यांचे रंग-रूपही पालटल्याने ते हिंदूच वाटतात. त्यादृष्टीनेही सर्वांची सतर्कता हवी. पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. आता पकडलेल्या २ साथीदारांचा म्होरक्या पसार झाला आहे,त्याला पकडावे. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि स्लिपर सेलयांच्याविषयीची निष्क्रीयता आणि  नागरिकांची उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हानाकडे गांभीर्याने पहावे लागेल.

 

 

आयएस’च्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता उपाय योजना PART 2

 मागच्या दशकात शहरात कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना येथे बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या होत्या. अत्यंत वर्दळीच्या दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोटाचा प्रयत्न झाला होता. या घटनानंतर काही वर्षे घातपातापासून सुरक्षित राहिलेल्या पुण्यात दहशतवाद्यांचा वावर काळजी वाढविणारा आहे. पुण्यात पूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनचा सहभाग होता. ही संघटना वेगवेगळ्या नावाने पुन्हा सक्रिय झाल्याने धोका वाढला आहे.

कोंढवा केंद्रस्थानी

वारंवार दहशतवादी सापडल्यामुळे कोंढवा परिसर पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. वर्षभरात पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी बहुसंख्य आरोपी कोंढव्यात वास्तव्यास होते. कोंढव्यासह दापोडी, बोपोडी या भागात दहशतवाद्यांचे स्लिपर सेल सक्रिय झाले आहे. दाट वस्तीत या आरोपींचा शोध घेणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक असते.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून जुनैद महंमद अता महंमद (वय २८, रा. दापोडी) याला तसेच त्याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू काश्मीर) याला किश्तवाड येथून अटक केली होती. एटीएसने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कोंढव्यातील कार्यालयावर छापा टाकून अब्दुल कयूम शेख (रा. साहिल सर्वदा, कोंढवा) आणि रझी अहमद खान (रा. अशोका म्यूज, कोंढवा) यांना अटक केली होती. अशोका म्यूज येथे पूर्वी आरोपी पकडण्यात आल्याने ही सोसायटी चर्चेत आहे. महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. तसेच त्यांना राहण्यासाठी खोली देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) याला ‘एटीएस’ने अटक केली.

पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनानली सरकार (वय ४३) याला कोंढवा परिसरातून गुरुवारी अटक केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.

हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार हा 'इस्लामिक स्टेट'च्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 'आयएस'शी संबंधित देशभरात आतापर्यंत अटक केलेल्यांचा सरकार याच्याशी संबंध कसा आला, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला आहे. तरुणांची माथी भडकवून त्यांना 'आयएस'मध्ये भरती करण्याचे काम महाराष्ट्र मॉड्यूलद्वारे करण्यात येत होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने डॉ. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीमकार्ड, तसेच आयएसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून त्यांना 'आयएस'मध्ये भरती करीत असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली . डॉ. अदनान अली पंधरा वर्षांपासून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्याने पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

पुण्यात ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावर

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोघा दहशतवाद्यांचा म्होरक्या फरारी महंमद शहनवाज आलम (वय ३१) हाच असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. तिघे दहशतवादी पुण्यात काही घातपात घडविणार होते . आलमचा शोध घेण्यात येत असून 'एनआयए' आणि 'एटीएस' या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.

'एनआयए' शोध घेत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली. कोथरूड पोलिस ठाण्यातील शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री गस्त घालत असताना, तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत दिसले. संशयावरून खान आणि साकी यांना ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी आलम फरारी झाला.

स्फोटके बाळगल्याप्रकरणी 'एनआयए'ने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. आलम याच्या इशाऱ्यावर साकी आणि खान काम करीत असल्याचा संशय आहे.आलम याचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे.

साकी आणि खान ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. या कामाच्या बहाण्याने ते विविध ठिकाणी वावरत होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या वर्षी कोंढव्यात छापा टाकून बंदी असलेल्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या (पीएफआय) दोघांना अटक केली होती; तसेच दापोडीतून जुनैद महंमद अता महंमद याला अटक केली होती. 


आयएस’च्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता उपाय योजना PART 1

 


​ ‘आयएसची जागतिक विस्ताराची संकल्पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारताला याचा मोठा धोका आहे. त्या दृष्टीने ऊग्र वाद आणि दहशतवाद संपवण्याकरता नियमितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

घातपाती कारवायांमध्ये गुंतलेल्या दहशतवाद्यांना पुण्यासह राज्याच्या विविध भागांमधून झालेली अटक, हे इस्लामिक स्टेट (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा विळखा असल्याचे निदर्शक आहे. महाराष्ट्र आयसिस मोड्यूलया नावाने चर्चेत असलेल्या या गटातील पाच जणांना आतापर्यंत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई, पुणे आणि ठाण्यातून अटक केली आहे. यांपैकी काहींचा जयपूर स्फोटात हात होता.

राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्येही या संघटनेचे सदस्य असून, यामध्ये प्रत्यक्ष घातपाती कारवाया करणारे दहशतवादी, त्यांचे आश्रयदाते आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्यांचे (टेरर फंडिंग) एक संघटित नेटवर्कआहे. पुण्यात अटक केलेला डॉक्टर हा आयएससाठी तरुणांची भरती करीत होता. पुण्यातील कोथरूडमध्ये मध्य प्रदेशातील दोघांना संशयावरून अटक झाल्यानंतर सुरू झालेल्या अटकसत्रात या बाबी समोर आल्या. त्यांच्याकडे काडतुसे, ड्रोन यांसह तरुणांची माथी भडकावणारे साहित्यही आढळून आले. काहींनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात स्फोटांची चाचणीही केली. वेगवेगळ्या पाच-सहा संघटनांच्या नावाखाली हे सर्व दहशतवादी कारवाया करीत असले, तरी या संघटना मूळ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (आयसिस) या जगातील सर्वांत संघटित आणि क्रूर दहशतवाद्यांचा भाग आहेत. काही काळापूर्वी देशात दहशतवादी कारवाया करणारी सिमीआणि नंतर इंडियन मुजाहिदिनसंपवल्यानंतर आता या संघटना नवीन नावे घेऊन पुन्हा पुनर्जन्म घेत आहेत.

महाराष्ट्र व पुण्यातील दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची आश्रयस्थाने उभी राहण्यापूर्वीच नष्ट करायला हवीत. काही काळापूर्वी दोन समाजगटांत तेढ उत्पन्न करून महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न झाला. अशा घटनांमधून माथी भडकलेल्या तरुणांवर नजर ठेवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न अशा संघटना करीत असतात. समाजविघातक घटकांना बळ मिळणार नाही, याचीही खबरदारी समाजातील जाणत्यांनी घेतली पाहिजे. तरच महाराष्ट्र सुरक्षित राहील.

पुणे दहशतवादी अन् स्लीपर सेलच्या हिटलिस्टवर? वर्षभरात १० दहशतवाद्यांना अटक,

नुकत्याच पकडलेल्या दोन दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आले असले तरी घातपाताचा मोठा कट रचला जात आहे .

दहशतवादी कारवायांना खीळ बसल्याने गेल्या काही वर्षांत घातपातापासून सुरक्षित राहिलेल्या महाराष्ट्र व पुण्यात दहशतवादी आणि स्लीपर सेलपुन्हा सक्रिय झाल्याने शहराला दहशतवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात दहा दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी पुण्यातून अटक केली आहे.

दहशतवाद्यांची पाळेमुळे शहरातील विविध भागात खोलवर रुजल्याचे स्पष्ट आहे. दीड-दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्य असलेल्या दहशतवाद्यांबद्दल कोणत्याच यंत्रणेला कशी कल्पना नाही? दहा दिवसात चार दहशतवाद्यांना पुण्यातून अटक करण्यात आल्याने दहशतवाद्यांचा धोका अधोरेखित झाला आहे. अफाट शहरीकरण झालेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झालेला असताना दुसरीकडे थेट दहशतवादी कारवायाही उघड होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.