Total Pageviews

Showing posts with label बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका:. Show all posts
Showing posts with label बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका:. Show all posts

Wednesday, 8 April 2020

अन्यथा 'बॅनर्जी' नव्हे, 'बुखारी सीएम'-विजय कुलकर्णी-TARUN BHARAT-काहीशे 'तबलिगीं'साठी बंगाली जनतेचे आरोग्य अशाप्रकारे धोक्यात घालून काय साध्य होणार


केवळ एक-दोन नव्हे, तर कित्येक घटनांवरून प्रश्न पडावा की, खरेच पश्चिम बंगाल भारताचाच अविभाज्य भाग आहे ना? आणि याला सर्वस्वी (बे)जबाबदार आहेत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा धर्मांधपणा. गेल्याच आठवड्यात दीदींनी बंगालमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी लपविल्याबद्दल त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती. इतकेच नाही, तर केंद्र सरकारकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले 'पीपीई' किट्सदेखील ममतादीदी चक्क तृणमूलच्या नेतेमंडळींना, पोलिसांना वाटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. पण, सर्वच स्तरातून दीदींच्या या भेदभावपूर्ण वागणुकीवर कठोर शब्दांत टीका झाल्यानंतरही दीदी त्यांच्या आडमुठ्या स्वभावानुसार सुधारलेल्या नाहीतच. दीदींचा हा धर्मांधपणा तेव्हा समोर आला, जेव्हा एका पत्रकार परिषदेत त्यांना राज्यातील 'तबलिगीं'चा आकडा विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताच दीदींचा पारा एकाएकी चढला आणि त्यांनी “मला असे 'जातीय प्रश्न' विचारू नका,” म्हणून उलट पत्रकारांनाच सुनावले. एवढेच नाही तर फेसबुकवर या पत्रकार परिषदेची व्हिडिओ लिंक शेअर करतानाही त्यातून हा प्रश्न आणि त्याला दीदींना दिलेले उत्तर मात्र सपशेल हटविण्यात आले. दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेले 'तबलिगी जमात'चे हजारो धर्मप्रसारक आपापल्या राज्यात परतले. केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारांना त्या सर्व 'तबलिगीं'ची माहिती देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांची चाचणी करण्याचा, त्यांना 'क्वारंटाईन' करण्याच्या सक्त सूचनाही आहेत. १ मार्च ते १५ मार्च दरम्यान दिल्लीतून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केलेल्या 'तबलिगीं'ची संख्या दहा हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तेव्हा, त्यापैकी काही 'तबलिगी' हे प. बंगालमधील असतीलच. पण, ममतादीदी मात्र ही माहिती सांगायला का तयार नाहीत? त्या का आणि कोणाला पाठीशी घालत आहेत? काहीशे 'तबलिगीं'साठी बंगाली जनतेचे आरोग्य अशाप्रकारे धोक्यात घालून काय साध्य होणार? तेव्हा, मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा हा दिवसेंदिवस खालची पातळी गाठणारा खेळ आता दीदींना थांबवावा. व्होटबँकेसाठी लोकांच्या जीवांशी खेळण्याचे असे अघोरी पाप दीदींनी करू नये, अन्यथा ती वेळ दूर नाही, जेव्हा बंगालही 'मिनी बांगलादेशा'चे हिरवे रुपडे धारण करेल आणि मुख्यमंत्री कोणी 'बॅनर्जी' नाही, तर 'बुखारी' असेल.

अधिक माहिती साठी बघा
https://www.mahamtb.com//Encyc/2020/4/8/Article-on-Mamata-calls-questions-on-Tablighi-event-communal-avoids-giving-any-answers.html

Thursday, 5 March 2020

मतांच्या भिकेसाठी- TARUN BHARAT EDITORIAL



काँग्रेसमध्ये असताना बांगलादेशी घुसखोरांविरोधात ठोस भूमिका घेत नाही, म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना करणार्‍या ममता बॅनर्जीच होत्या. त्याच आता मतांच्या भिकेसाठी बांगलादेशी घुसखोरांचे लाड पुरवत आहेत. म्हणूनच अशा दुटप्पी राजकारण्याला मतदारांनीच सत्तेबाहेर फेकले पाहिजे; अन्यथा त्याचे दुष्परिणाम बंगालसह संपूर्ण देशाला भोगावे लागतील.



“तुम्ही जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान करत आलात. तुम्हाला आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेच या देशाचे मूळ रहिवासी आहात. बांगलादेशातून आलेले सर्वच घुसखोर इथलेच नागरिक असून त्यांना नागरिकत्व मिळालेले आहे. कोणीही घुसखोरांचे नागरिकत्व हिरावून घेऊ शकत नाही,” असे वक्तव्य नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. आपल्या राज्यातील बांगलादेशी घुसखोरांच्या ११९ वसाहतींना नियमित केल्यानंतर त्या बोलत होत्या. तसेच केंद्र सरकारने १९५५ सालच्या नागरिकत्व कायद्यात केलेल्या सुधारणांची आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवहीची (एनआरसी) पार्श्वभूमी ममतांच्या विधानांना होती. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्त हिंदू व इतर अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा (सीएए) नरेंद्र मोदींच्या सरकारने गेल्यावर्षी केला. तद्नंतर ममता बॅनर्जींसह देशातल्या राष्ट्रघातकी आणि हिंदूविरोधी ताकदींनी विखारी प्रचार करत वेगवेगळ्या प्रकारे ‘सीएए’वरून धुमाकूळ घातला. ‘सीएए’मध्ये मुस्लिमांचा समावेश का नाही, हा एकमेव मुद्दा घेऊन हिंदूद्वेषी व्यक्ती, गट, पक्ष-संघटना रस्त्यावर उतरल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ-दगडफेक केली, तसेच दिल्लीत तर शांतता व संविधानाचे नाव घेऊन त्यांनी पन्नासहून अधिक जणांचा बळीही घेतला. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आसाममध्ये ‘एनआरसी’ची अंमलबजावणी करण्यात आली. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना शोधण्यासाठी, त्यांची ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, ममता बॅनर्जी यांनी त्यावरही आक्षेप घेतला आणि पुढे पश्चिम बंगालमध्ये ‘एनआरसी’ लागू होऊ देणार नाही, असेही म्हटले. म्हणजेच ‘एनआरसी’ या सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार आसामात होणार्‍या प्रक्रियेला आणि ‘सीएए’ या संसदेने मंजुरी दिलेल्या कायद्याला ममता बॅनर्जींनी विरोध केला. ममता बॅनर्जींनी घेतलेली ही भूमिका केवळ राजकीय नसून संविधानविरोधी तसेच सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय सत्तेला न जुमानणारी आहे. इथेच ममता बॅनर्जींचा अराजकवादी व लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा विघातक चेहरा दिसून येतो. तथापि, ममता बॅनर्जी आजच अशाप्रकारे वागलेल्या नाहीत, तर प्रत्येकवेळी त्यांचा पवित्रा कोणत्या ना कोणत्या संविधानिक व्यवस्थेला नाकारण्याचा आणि स्वतःची मनमानी करण्याचाच असतो. असे का?


मुस्लिमांच्या गठ्ठा मतदानासाठी ममता बॅनर्जींचा हा सगळा आटापिटा चालू असतो. मुस्लीम तुष्टीकरणासाठी आणि त्यातून मिळणार्‍या मतांच्या भिकेसाठी ममता बॅनर्जी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि हे वेळोवेळी सिद्धही झालेले आहे. मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी असो वा शाळांमधील सरस्वती वंदनेवर आणलेले निर्बंध वा हनुमान चालिसासारख्या पुस्तिकेच्या वितरणावरील बंधने, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच हिंदूंचा आवाज दाबण्याचे काम केले. मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायच्या आणि हिंदूंना वार्‍यावर सोडायचे धोरण ममता बॅनर्जींनी राबवले व ‘जय श्रीराम’ या घोषणेलाही विरोध केला. म्हणजेच हिंदूंच्या नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी आणि मुस्लिमांना सारे राज्य आंदण देण्यासाठी ममता बॅनर्जी राबल्या आणि अजूनही राबत आहेत. बांगलादेशी घुसखोरांच्या वसाहती कायम करण्याचा आणि त्यांना इथलेच मूळ नागरिक ठरविण्याचा ममतांचा कारनामा मुस्लीम लांगूलचालनाच्या मालिकेतलाच एक भाग. बांगलादेशातील मुस्लिमांना राज्याच्या निरनिराळ्या ठिकाणी आणायचे, वसवायचे, त्यांना मतदान ओळखपत्रे, रेशनकार्ड आदी सुविधा द्यायच्या आणि त्यांच्याच जीवावर निवडून यायचे, हा खेळ ममतांनी केल्याचे त्यांच्या आताच्या विधानांवरूनही स्पष्ट होते. कारण, जिल्हा परिषद वा विधानसभा वा लोकसभेत तुम्ही मतदान केल्याने देशाचे नागरिक ठरता, तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र आहे, असेच बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पण ती कागदपत्रे दिली कोणी? तर ममतांच्या हाताखालच्या प्रशासकीय यंत्रणेने आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी! मात्र, बांगलादेशी घुसखोरांच्या सध्या केवळ ११९ वसाहती कायम केल्याचे समोर आले, पण असे कितीतरी अड्डे पश्चिम बंगालमध्ये अजूनही आहेत. ममतांच्या आशीर्वादाने पोसलेल्या या अड्ड्यांमध्ये लाखो बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास आहेत, जे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकते. परंतु, ममता बॅनर्जींना राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा स्वतःच्या पक्ष आणि पदाची चिंता अधिक सतावते. देशाचे संरक्षण होवो न होवो, घुसखोरांनी देशविरोधी कारवाया केल्या तरी त्यांना नागरिकत्व मात्र मिळाले पाहिजे आणि त्यांना देशातून पिटाळायला नको, असेच ममतांचे वागणे असल्याचे यावरून दिसते. उल्लेखनीय म्हणजे काँग्रेसमध्ये असताना बांगलादेशी घुसखोरांविरोधात ठोस भूमिका घेत नाही, म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना करणार्‍या ममता बॅनर्जीच होत्या. त्याच आता मतपेटीसाठी, सत्तेसाठी बांगलादेशी घुसखोरांना आवतण देत आहेत, त्यांचे लाड पुरवत आहेत. म्हणूनच अशा दुटप्पी राजकारण्याला तिथल्या मतदारांनीच सत्तेबाहेर फेकले पाहिजे; अन्यथा त्याचे दुष्परिणाम पश्चिम बंगालसह संपूर्ण देशाला भोगावे लागतील.


दरम्यान, भारतीय राज्यघटनेने नागरिकत्वासंबंधीचे अधिकार केवळ संसदेला दिलेले असून राज्य सरकारांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध घातलेला आहे. तरीही ममता बॅनर्जी स्वतःला संविधानापेक्षाही सर्वोच्च समजत ‘सीएए’ला विरोध करत आहेत व बांगलादेशी घुसखोरांपुढे पायघड्या अंथरत आहेत. ‘सीएए’ व ‘एनआरसी’साठी संयुक्त राष्ट्रांच्या निगराणीखाली जनमत चाचणी घेतली जावी, अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. तसेच ‘सीएए’ व ‘एनआरसी’ लागू करण्यासाठी माझे प्रेत ओलांडावे लागेल, इतकी टोकाची भाषाही त्यांनी वापरलेली आहे. जनमत चाचणी आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची भाषा पाकिस्तानही करत असतो. म्हणूनच ममतांचे सूर पाकिस्तानच्या सुरांशी जसेच्या तसे जुळत असल्याचेही स्पष्ट होते. तसेच ममता बॅनर्जींचा हिंदूद्वेषी अवतारही सरळसरळ दिसतो. कारण ‘सीएए’मुळे हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांना आसरा मिळणार तर ते ममतांना नको. मात्र, बांगलादेशातील घुसखोर मुस्लिमांना देशाचे नागरिक ठरवण्यासाठी त्या तत्काळ तयार असतात, त्यांच्या वसाहतींना नियमित करत असतात. मात्र, मतांच्या लालसेपायी राष्ट्रहित व हिंदूहिताचा बळी देऊन ममतांनी उघडपणे केलेले बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणखी मोठे संकट निर्माण करण्याचीच अधिक शक्यता आहे. कारण, दिल्लीतील दंगली आणि अनेक बेकायदेशीर, विघातक कारवायांत बांगलादेशीयांचा हात असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. अशावेळी पश्चिम बंगालच्या जनतेनेच ममता बॅनर्जीरूपी धोकादायक अराजकाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कंबर कसली पाहिजे


Friday, 24 January 2020

ब्रेक्झिट आणि सीएए Source:तरुण भारत10 Jan 2020 -रमेश पतंगे

|

जागतिक स्तरावर ब्रेक्झिट हा विषय अतिशय गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच वेळी भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यावर रणकंदन माजलेले आहे. ब्रेक्झिट म्हणजे काय आणि त्याचा संबंध नागरिकत्व सुधारणा कायद्याशी कसा येतो, हे आपण बघू या!
ब्रेक्झिट हा शब्द ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे. एक्झिटचा अर्थ होतो बाहेर पडणे. ब्रिटन कशातून बाहेर पडणार आहे? ब्रिटन युरोपियन संघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडणार आहे. हा युरोपियन संघ काय भानगड आहे, हे समजल्याशिवाय ब्रिटन त्यातून का बाहेर पडणार, हे समजणार नाही.
युरोपातील छोट्या-छोट्या राज्यांचा दहाव्या-बाराव्या शतकापासूनचा इतिहास आपापसात सतत लढत राहण्याचा आहे. आपल्याला पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध माहीत असते. या दोन्ही महायुद्धांची रणभूमी युरोप होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या देशांची आपापसात लढण्याची हौस पूर्ण भागली होती. मग त्यांनी ठरविले की, आपापसात लढत राहण्यापेक्षा आपण आपला एक संघ तयार करू या. देशाच्या सीमा पुसून टाकू या. एक समान चलन निर्माण करू या. न्यायदान करण्यासाठी एक समान न्यायपीठ उभे करू या. प्रथम युरोपियन कॉमन मार्केटची स्थापना झाली आणि नंतर तिचेच युरोपियन युनियनमध्ये रूपांतर झाले.
हे एक आश्‍चर्यच होते. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ग्रीक असे सर्व देश इतिहासकाळात एकमेकांविरुद्ध भीषण लढाया लढत होते. त्यांनी या लढाया थांबविल्या आणि समान कार्यक्रमांवर, विकासाच्या मुद्यांवर, नागरिकांच्या सुखांसाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. (म्हणजे महाविकास आघाडी तयार केली.) १९७३ साली ब्रिटन या युरोपियन मार्केटमध्ये सामील झाली. १९७५ साली ब्रिटनमध्ये या प्रश्‍नावर सार्वमत घेण्यात आले. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये सामील व्हायचे की नाही, या प्रश्‍नावर मतदारांनी मतदान केले. ६७ टक्के मतदारांनी अनुकूल मतदान केले.
हा युरोपियन संघ एक सामायिक बाजारपेठ म्हणून उदयाला आला. त्यामुळे त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती वाढली. व्यापाराचीदेखील शक्ती वाढली. त्याचे लाभ युरोपातील समृद्ध देशांना झाले, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या देशांनाही झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपच्या भूमीत कोणतीही लढाई झाली नाही, हेदेखील एक आश्‍चर्यच आहे.
ज्यांना ब्रिटनचा इतिहास माहीत आहे, लोकांची मानसिकता माहीत आहे, त्यांचा अंदाज असा होता की, ब्रिटन या संघात फार काळ राहणार नाही. २०१६ साली ब्रिटनमध्ये पुन्हा सार्वमत घेण्यात आले. या सार्वमताचा विषय होता, युरोपियन युनियनमध्ये राहायचे की बाहेर पडायचे. ५२ टक्के लोकांनी बाहेर पडण्याचा निर्णय दिला. २०१६ पासून ब्रेक्झिट हा शब्दप्रयोग सुरू झाला. २०१६ साली ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडले पाहिजे, असे का वाटले?
त्याचे पहिले कारण असे की, ब्रिटिश लोकांना असे वाटू लागले की, युरोपियन संघात राहून आपण आपली अस्मिता आणि स्वतंत्र ओळख नजीकच्या भविष्यकाळात पुसून टाकू. ब्रिटनचा माणूस हा आपल्यासारखाच परंपरावादी आहे. त्याच्या परंपरा तो प्राणापलीकडे जपतो. या त्याच्या स्वतंत्र ओळखीवर युरोपातून येणार्या लोकांचे आक्रमण सुरू झाले. मुक्त श्रमिक बाजारपेठ तयार झाल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी युरोपाच्या देशातून लाखांनी लोक ब्रिटनमध्ये आले. ब्रिटनमधूनही दुसर्या देशात गेले. ब्रिटनमध्ये आलेल्या लोकांसंबंधी स्थानिक लोकांची अशी भावना झाली, ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैें?’
या लोकांमुळे आपल्या रोजगारावर आक्रमण होते. येणारे लोक आपल्या संस्कृती, परंपरेशी जुळवून घेत नाहीत. त्यांचे वेगळेच चालू असते. त्यात सीरियातून येणार्या प्रचंड निर्वासितांची भर पडत चालली. आपला देश धर्मशाळा करायचा की त्याची ओळख स्वतंत्र ठेवायची? हा प्रश्‍न इंग्लंडपुढे निर्माण झाला. आणि त्यांनी स्वतंत्र ओळख ठेवण्याकडे आपला कल दिला. आपल्या देशात जसे बौद्धिक गोंधळ घालणारे लोक आहेत, तसे तेथेदेखील आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, तेथील जनता दूध का दूध आणि पानी का पानी करण्यात तज्ज्ञ आहे. ती अशा लोकांचे बोलणे ऐकून घेते, पण त्यांना शक्ती देत नाही.
या प्रश्‍नावरून २०१६ पासून ब्रिटनमध्ये घमासान युद्ध चालू आहे. पंतप्रधान थेेरेसा मे यांना युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कार्यक्रम ठरविता न आल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. डिसेंबर २०१९ ला तेथे निवडणुका झाल्या आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे बोरीस जॉन्सन प्रचंड बहुमताने निवडून आले. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या पार्लमेंटने प्रचंड बहुमताने संमत केला. आता ३१ जानेवारी २०२० ही तारीख युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची ठरविण्यात आली. बाहेर पडण्याची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.
बे्रक्झिटमधला सर्वात महत्त्वाचा विषय, ब्रिटनच्या अस्मितेचा आहे. आर्थिक विषय त्याच्यामागे आहेत. ब्रिटिश माणूस हा व्यापारी माणूस आहे. व्यापारी माणूस घाट्याचा व्यापार करीत नाही. हा घाट्याचा व्यापार त्याला बंद करायचा आहे. आपली अस्मिता शाबूत ठेवायची आहे. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा केला नाही. पण, आपले नागरिकत्व, म्हणजे आपली ओळख जर आपल्या भूमीवर येणारे युरोपियन लोक आणि विदेशी लोक पुसून टाकणार असतील तर ते आम्ही सहन करणार नाही, हे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
ब्रिटिश माणसाची ओळख कशात आहे? तो प्रथम राजनिष्ठ असतो. राजा किंवा राणीवर त्याची निष्ठा असते. दुसरी गोष्ट त्याला त्याची संसद सदैव सार्वभौम असली पाहिजे, असे वाटते. युरोपच्या कोर्टाचा हस्तक्षेप आपल्याकडे नको, ही त्याची भावना आहे. तिसरी गोष्ट तो प्रोटेंस्टन्ट मूल्यांची जपवणूक करतो. चौथी गोष्ट आपल्या परंपरांचा त्याला खोलवरचा अभिमान आहे. या परंपरा ज्यातून व्यक्त होतात, त्याला ‘कॉमन लॉ’ असे म्हणतात. त्याविषयी तो बांधील असतो.
आपला देश नेहरू-गांधी काँग्रेसने धर्मशाळा करून टाकला. धर्मशाळा तत्त्वज्ञान उभे केले. ब्रह्मदेशातून रोहिंग्या आला, द्या त्याला स्थान. बांगलादेशातून मुस्लिम घुसखोर आले, बसवा त्यांना भारतात. पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येथील राजवटीला कंटाळून जे भारतात येतील त्या मुसलमानांना बसवा.
हे घुसखोर आपल्या साधन-संपत्तीवर डल्ला मारतात. आपल्या नोकर्या खातात, त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची, निवासाची व्यवस्था आपल्याला करावी लागते. ही फुकटची फौजदारी करण्याचे कारण नाही. त्यांचे त्यांचे स्वतंत्र देश आहेत. ते त्या त्या देशाचे नागरिक आहेत. नागरिकांच्या आरोग्याची, जीवनाची, संपत्तीची काळजी करणे, हेच त्या त्या देशाचे काम आहे. ही फुकटची पीडा आपल्या गळ्यात कशासाठी बांधून घ्यायची? मूर्ख लोक सांगतील की, मानवतावादासाठी. मानवतावादासाठी आपण त्या त्या देशांना मदत करू शकतो. त्या त्या देशात दळवळणाची साधने उभी राहावीत, शाळा उभ्या राहाव्यात, उद्योग उभे राहावेत, यासाठी मदत करू शकतो. परंतु, त्या देशातील लोकांना आपल्या देशात वसविणे, हे कधीही करता कामा नये.
ब्रिटनच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली, तेव्हा त्यांनी तो प्रश्‍न जनतेच्या दरबारात नेला. जनतेलाच सांगितले की, तुम्ही याचा निर्णय करा. आपण जर युरोपियन युनियनमध्ये राहिलो, तर दरवर्षी युरोपियन देशांतील लाखभर लोक आपल्या देशात येत राहतील. त्यांची काळजी करायची कोणी? जनतेने निर्णय दिला, मानवतावाद गेला चुलीत, आपण आपले हित बघितले पाहिजे. आपली ओळख कायम ठेवली पाहिजे. जगाशी व्यापार आपल्या हिमतीवर करू शकतो. नाहीतरी एकेकाळी सर्व जगावर राज्य करणारे आपण आहोत. आपल्याला काहीही अशक्य नाही, हे न बोलता, न लिहिता, ब्रिटिश जनतेने मतपेटीच्या माध्यमातून प्रकट केले आहे.
आपल्यालाही आपल्या अस्मितेचा विचार केला पाहिजे. आपली अस्मिता सनातन भारताची आहे. या अस्मितेवर सीमेपलीकडून इसवी सनाच्या सातव्या शतकापासून आक्रमणे झालेली आहेत. शेवटचे आक्रमण अहमद शहा अब्दालीचे होते. पानिपतची तिसरी लढाई हे त्याचे स्मारक आहे. आता त्या इतिहासाची पुन्हा उजळणी नको. आपल्याला आपल्या अस्मितेसहित अतिशय शक्तिशाली बनून उभे राहिले पाहिजे. भारताला जे आपली माता मानतात, इथल्या संस्कृतीचा आदर करतात आणि वेळप्रसंगी तिच्यासाठी बलिदानासही तयार राहतात, ते सर्व आपले. दुबईत किंवा कराचीत बसून मुंबई किंवा अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करणारे आपले शत्रू आहेत. त्यांच्या साथीदारांना या देशात स्थान नाही. इंग्लंडने ब्रेक्झिटच्या माध्यमातून नको असलेल्या लोकांचा येण्याचा मार्ग बंद करण्याचे ठरविले आहे. आपण सीएएच्या माध्यमातून हेच काम करण्याचे ठरविले आहे.

Tuesday, 30 April 2019

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच हवी!


 
सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत, यंदा सगळ्यात जास्त हिंसाचार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. ममता बॅनर्जी यांची गेल्या दोन-तीन वर्षांतील वागणूक ही काहीशी हुकूमशाहीकडे झुकणारी असल्याचे स्पष्टपणे जाणवले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कायकर्त्यांवर अनेकदा हिंसक हल्ले केले आहेत आणि त्यात भाजपाचे अनेक कार्यकर्ते गंभीर जखमीही झाले आहेत. पराभव समोर दिसायला लागला की ममता बॅनर्जी चवताळून उठतात, काहीबाही बडबड करतात, भाजपावर बिनबुडाचे आरोप करतात. हे आता नित्याचेच झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते अक्षरश: गुंडागर्दी करीत आहेत. काल चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. बंगालमधील 42 पैकी आठ मतदारसंघांत मतदान होते. आसनसोल येथून भाजपाचे बाबूल सुप्रियो हे उमेदवार आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांना बूथवरसुद्धा जाऊ दिले नाही, यावरून त्यांच्या गुंडागर्दीची कल्पना यावी. कम्युनिस्ट पक्षाचे जे कॅडर होते, ते तृणमूलकडे वळल्याने तृणमूल हा पक्ष आणखी हिंसक झाल्याचे जे बोलले जात आहे, त्याचा प्रत्यय सोमवारी मतदानाच्या वेळी आलाच!
 
 
 
सोमवारी मतदान सुरू असताना सकाळपासूनच तृणमूलच्या गुंडांनी हिंसाचार सुरू केला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यापासून सुरू झालेला हिंसाचार माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत जाऊन पोहोचला होता. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना तृणमूलच्या गुंडांनी अक्षरश: चोप दिला. माध्यमांकडून सत्य दडविले जावे, अशी अपेक्षा करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने बंगालमध्ये उभा धिंगाणा घातला आहे. इतरांच्या नावाने खडे फोडणार्‍या तृणमूल कॉंग्रेसला याची लाज कशी वाटत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अक्षरश: घाणेरड्या भाषेत टीका करणार्‍या ममता बॅनर्जी या किती आक्रस्ताळ्या स्वभावाच्या आणि बेलगाम झाल्या आहेत, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आचारसंहितेचे सर्वाधिक उल्लंघन केले आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेचा संपूर्ण दुरुपयोग त्यांनी केला आहे. असे असतानाही त्या मोदींना हुकूमशहा म्हणतात, हे केवळ हास्यास्पद आहे. ममता बॅनर्जी यांनी कुणावरही टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याने त्यांनी आता काहीही न बोललेलेच बरे!
 
हिंसाचार करताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालचा स्तर गाठला आहे. भाजपाचे उमेदवार बाबूल सुप्रियो यांची कारसुद्धा मतदान केंद्रापर्यंत जाऊ न देण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली होती. एवढेच काय, मतदान केंद्रावर भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाऊ दिले जात नसल्याची बातमी कळल्यावरून, सुप्रियो यांच्याशी बोलायला गेलेल्या माध्यमप्रतिनिधींना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली. सत्तेचे पाठबळ लाभल्यानेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी उभा िंधगाणा घातल्याचे स्पष्ट दिसते आहे. ममता बॅनर्जी सत्तेत असल्या तरी दादागिरी करतात आणि विरोधात असल्या तरी दादागिरी करतात, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी खरेतर त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने निवडणूक आयोगाला मदत करायला हवी होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारची आहे. असे असतानाही त्याउलट कृती त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते हिंसाचार घडवून आणत निवडणूकप्रक्रिया उधळून लावत असतील, राज्यात अराजकाची परिस्थिती निर्माण करीत असतील, तर तिथे राष्ट्रपती राजवटच लावली पाहिजे! लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षच जर हिंसाचार घडवून आणत असेल, निवडणूकप्रक्रिया उधळून लावणार असेल, तर त्या राज्यात लोकशाही अस्तित्वात आहे, यावर कसा विश्वास ठेवता येईल?
 
सतराव्या लोकसभेसाठी अर्ध्यापेक्षा जास्त जागांवर मतदान आटोपले आहे. सातपैकी चार टप्पे पार पडले आहेत. अशा परिस्थितीत बंगालमध्ये हिंसाचार होत आहे आणि दुसरीकडे अनेक नेते इलेक्ट्रॅनिक मतदान यंत्रावर अविश्वास व्यक्त करत आहेत. एकप्रकारे निवडणूकप्रक्रिया बदनाम करण्याचा डाव त्यांनी रचला आहे, असे म्हणण्यास वाव आहे. ममता बॅनर्जी यांना पराभव समोर दिसायला लागला की, त्या अक्षरश: किंचाळत सुटतात. त्यांच्या किंचाळण्याला काही अर्थ नसतो. बंगालसारखे राज्य त्यांनी मातीत घातले आहे. बंगालच्या प्रगतीसाठी झटण्याऐवजी त्यांनी त्या राज्याची अधोगती केली आहे. बंगाल हा प्रदेश अतिशय मागास ठेवण्यात आधी कम्युनिस्टांची राजवट कारणीभूत होती आणि त्याला अतिमागास ठेवण्याचे पाप आता ममता बॅनर्जी यांनी केले आहे. बंगाली माणसाला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी ममता बॅनर्जी यांनी त्याला हिंसाचाराच्या मार्गाने नेले आहे. एवढेच काय, ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांची तळी उचलण्याचे पापही केले आहे. आज बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोर मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि सातत्याने वाढतेच आहे. त्यामुळे देशाच्या एकतेला आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळीच पावलं उचलली गेली नाहीत, तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!
 
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बंगालमध्ये अजय नायक यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी बिहारमध्ये जशी परिस्थिती होती, तशी आज बंगालमध्ये दिसत असल्याचे मत नायक यांनी नोंदविताच, ममता बॅनर्जी यांनी थयथयाट केला आणि नायक यांना बंगालमधून हटवा, अशी मागणी करून टाकली. काय चूक बोलले होते हो अजय नायक? दहा-पंधरा वर्षांपूर्वी बिहारमध्ये मतदारांना धमकावले जात होते, घाबरवले जात होते. बोगस मतदान केले जात होते. तीच बाब यावेळी नायक यांना बंगालमध्ये दिसून आली असेल अन्‌ त्यांनी आयोगाचा निरीक्षक या नात्याने आपले मत नोंदविले असेल तर त्यात चूक काय? चूक एवढीच की, त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची, त्यांच्या राजवटीची पोलखोल केली. देशात आज पश्चिम बंगाल हे असे एकमेव राज्य आहे, जिथे मतदारच घाबरलेले आहेत असे नव्हे, तर निवडणूककर्तव्यावर असलेले कर्मचारीही भयभीत आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एवढी प्रचंड दहशत निर्माण केली आहे की, निवडणुकीच्या कर्तव्यावरून आपण सुखरूप घरी परत जाऊ की नाही, याचीही खात्री त्या कर्मचार्‍यांना राहिलेली नाही. या निवडणूक कर्मचार्‍यांचा राज्याच्या पोलिसांवरही विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत केंद्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही, अशी भूमिका निवडणूक कर्मचारी घेतात, त्या बंगालसाठी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. अशी दहशत ज्या राज्यात आहे, त्या राज्यात लोकशाही उरलेली नाही आणि इतरांकडे बोट दाखवत सातत्याने टीकेचे प्रहार करणार्‍या ममता बॅनर्जी यांना आता लोकशाहीविषयी बोलण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही!

Saturday, 6 April 2019

वंगभूमीत मोदी अस्त्र? Parashuram Patil- TARUN BHARAT BELGAUM



आज अनेक वृत्तवाहिन्या आपापले सर्वे दाखवित असले तरी देखील प्रत्येक सर्वेक्षण हे देशात आगामी सरकार मोदींचेच येईल अशी परिस्थिती व्यक्त करीत आहे. या सर्वेक्षणांवरून प्रत्येक राज्यातील स्थानिक राजकारणदेखील त्या दिशेने वळण घेत आहे आणि त्यातील सर्वात लक्षात घ्यावे असे राज्य म्हणजेच पश्चिम बंगाल. या राज्यावर 34 वर्षे हेकेखोर लाल बावटय़ाची अमर्याद सत्ता होती. डाव्यांच्या या भरभक्कम आघाडीला आणि मूळ पायाच उखडून काढणाऱया ममता बॅनर्जी या गेली 9 वर्षे या ठिकाणी राज्य चालवित आहेत. या गडबडीत बंगालमधून काँगेस, डावे गायब आणि त्या जागी हट्टी दीदीनी आपले बस्तान घट्टपणे बसविलेले आहे. काँग्रेसची पाळेमुळे उखडून टाकून लाल बावटय़ाने या ठिकाणी 34 वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. देशभरात प्रत्येक राज्यात भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली तथापि, केरळ आणि प. बंगाल ही दोन अशी राज्ये आहेत ज्या ठिकाणी तेथील जनतेने भाजपला फिरकूही दिले नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ममता बॅनर्जी यांनी अटलजींना साथ दिली व त्यावेळी प्रथमच बंगालमध्ये आघाडी केल्याने भाजपला तिथे खाते उघडायला संधी मिळाली. परंतु फार काळ भाजप या राज्यात तग धरू शकला नाही. सध्या भाजपचे या राज्यात केवळ 2 खासदार आहेत. या मोठय़ा राज्यातून 42 खासदार संसदेत पाठविले जातात. डाव्या आघाडीचे राज्य संपुष्टात आल्यानंतर ममतेचे राज्य चालू आहे. आक्रस्ताळेपणा हा स्थायिभाव असलेल्या ममता बॅनर्जी यांनी गेले दीड वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांचा बंगालमध्ये अतोनात छळ आरंभिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर ते घेत असलेल्या सभा ठिकाणी पोलिसांचा लाठीहल्ला, त्यांचे मंडप तोडून टाकणे, मिळेल त्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर अनेक गुन्हे तयार करून पोलिसी बडगा दाखविणे, कित्येक कार्यकर्त्यांचे तर बंगालमध्ये खून झालेले आहेत. यात अडकलेली जास्तीत जास्त संशयित हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते वा पदाधिकारीच आहेत. एकवेळ लाल बावटा परवडला पण तृणमूल नको अशी भयानक अवस्था बंगालमध्ये करून टाकली आहे. त्यातल्या त्यात ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समाजासाठी वेळोवेळी व वारंवार ममता दाखविली किंवा त्यांना खूष करण्यासाठी विविध योजना मांडल्या. प. बंगालमधील सर्वात मोठा उत्सव हा दुर्गापूजेचा. या उत्सवाच्या समाप्तीला दुर्गामातेच्या विसर्जनावर याच ममता बॅनर्जी यांनी टाच लावून दुर्गापूजा विसर्जन त्या तिथी दिवशी न करता दुसऱया दिवशी करा असा आदेशही जारी केला. कारण त्याच दिवशी मुस्लीम समाजाचा उत्सव होता. केवळ मतांसाठी अल्पसंख्यकांना खूष ठेवता ठेवता बहुजनांवर अन्याय व अत्याचार होत असल्याने साहजिकच या परिस्थितीचा लाभ नरेंद्र मोदी यांचा भाजप उठविणार नसेल तर नवल! भाजप कार्यकर्त्यांवर अमानुषपणे होत असलेल्या अत्याचाराने बंगालमधील हिंदू नागरिकही संतप्त बनले आणि भाजपसाठी बंगालमध्ये जनतेत सहानुभूती वाढत गेली. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कोलकत्ता येथील ब्रिगेड मैदानावर झालेल्या सभेने अनेक जणांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. ज्या भाजपला आजवर वंगभूमीने बाजूला ठेवले त्या पक्षाला आज बंगालने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहे. हा चमत्कार केवळ नरेंद्र मोदी यांनीच घडविलेला आहे. अलीकडे अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी दीदींच्या राज्यात पोहोचले, त्यामुळे दीदांचा अक्षरशः तीळपापड झालेला आहे. बंगालमध्ये ज्या पक्षाला हजारभर माणसेदेखील जमत नसतात त्या राज्याच्या राजधानीत मोदींच्या सभेला हजारोंच्या संख्येने चेंगराचेंगरी होईपर्यंत नागरिक जमतात याचाच अर्थ बंगालच्या आधुनिक राजकारणाच्या इतिहासात आता नवा अध्याय सुरू झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. गेली तीन वर्षे ममता बॅनर्जी या मोदींवर वाट्टेल त्या पातळीवर जाऊन आक्रस्ताळेपणाने करत असलेले बेछूट आरोप, केंद्राशी घेतलेला पंगा या साऱया प्रकारामुळे बंगालच्या विकासावर परिणाम होत आहे. जनतेचा आक्रोश हा केंद्रापर्यंत पोहोचला आहे. मात्र ममता बॅनर्जी केवळ आपल्याच दुनियेत वावरत आहेत. मोदींच्या परवाच्या सभेला जमलेला प्रचंड जनसमुदाय बंगालमध्ये बदलत्या राजकारणाची नांदी ठरणार आहे, यात आता शंकाच नाही. जलनेवाले को जलने दो’! असे म्हणतात त्यानुसार केंद्रातील भरभक्कम सत्ता हाती असल्याने ममतादीदांचा योग्य बंदोबस्त करण्यात मोदींना भारी यश आलेले आहे. सीबीआयच्या कार्यात अडथळा आणून दीदीनी जे उपोषणाचे अस्त्र उगारले त्यातून सर्वोच्च न्यायालयानेही एकापेक्षा एक झटके बॅनर्जी यांना दिले. मोदींना राजकारणातून संपविण्यासाठी जंग जंग पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना आता स्वकियांचीच जास्त भीती वाटू लागली आहे. त्यांच्याच तृणमूल काँग्रेसमधील काही शिलेदारांनी भाजपमध्ये पटापट उडय़ा मारण्यास सुरुवात केल्याने ममतांना या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या धोरणाबाबत फेरविचार करावाच लागेल अशी चिन्हे आज दिसू लागली आहेत. बंगाल पाठोपाठ केरळमध्येही झेंडा फडकविण्यास भाजप सज्ज झाला आहे. या दोन राज्यांमध्ये भाजप विरोधात जे पूर्वापार वातावरण होते त्यातील गडदपणा जाऊन फिकेपणा आला आणि आता प्रत्यक्षात दोन्ही राज्यात भाजपने सध्या जे काही वातावरण तयार केले आणि मोदींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काळात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता आणली तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. कम्युनिस्टांचे गड व किल्ले असलेली दोन्ही राज्ये. बंगाल त्यांच्या हातून जाऊन दीदींच्या हाती पोहोचले खरे परंतु त्यांच्या विक्षिप्त वागण्याने बंगाली जनता वेगळा विचार करू लागली आहे असा संदेश 3 एप्रिलच्या मोदींच्या सभेने दिलेला आहे. या राज्यात जर भाजपने स्वबळावर काही प्रमाणात मते मिळविली तर ममताला आपल्या ध्येय धोरणात बदल करावा लागेल. वंगभूमीत राजकीय परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक उत्तम उतारा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही

Wednesday, 9 January 2019

शेख हसीनांचा विजय, भारतासाठी ‘अच्छे दिन’ महा एमटीबी 08-Jan-2019 अनय जोगळेकर

शेख हसीनांच्या सरकारने दहशतवादाशी लढताना कठोर भूमिका घेतली आहे. पूर्वांचलात रस्ते, रेल्वे, पूल, वीज प्रकल्प असे मोठे प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. भारत-बांगलादेश संबंधांच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून बघितल्यास शेख हसीनांचा विजय ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
 
दि. ७ जानेवारी, २०१९ रोजी शेख हसीना यांनी चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलीअध्यक्ष अब्दुल हमीद यांनी त्यांना आणि ४६ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलीहसीना यांनी आपल्या गेल्या सरकारमधील तब्बल ३४ मंत्र्यांना नारळ दिला असून त्यात अनेक वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात तब्बल २७ चेहरे नवे असून, चार जणांनी शेख हसीनांच्या आधीच्या सरकारमध्ये काम केले आहे. ३० डिसेंबर, २०१८ रोजी बांगलादेशच्या संसदेसाठी झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीगचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांना केवळ ७ जागा मिळाल्या. यामध्ये अवामी लीगला २५७जातीय पार्टीला २२ आणि अन्य छोट्या पक्षांना ९ जागा मिळाल्या.
 
बांगलादेशच्या संसदेत ३५० जागा असतातत्यातील ५० महिलांसाठी राखीव असतात आणि विजयी झालेल्या पक्षांना जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या वाटून दिल्या जातात. उरलेल्या ३०० जागांसाठी निवडणुका होतात. २०१४ साली झालेल्या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनल पार्टीसह प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. विरोधी पक्षांचे अनेक नेते स्वतंत्रपणे निवडणुका लढले होते, पण केवळ ३० ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. या खेपेस विरोधी पक्ष मैदानात असून अवामी लीगच्या १२ जागा वाढल्या. शंभर ठिकाणी विरोधी पक्षांची अनामत रक्कम जप्त झाली. या निवडणुकांत राजकीय हत्या, अपहरण, बूथ ताब्यात घेणं इ. प्रकारच्या हिंसक घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एका पत्रकाराला अटकदेखील झाली. विरोधी पक्षांनी आपला पराभव अमान्य केला असला तरी त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यास दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड राजकीय हिंसाचार होऊ शकतोसंयुक्त राष्ट्रांनी या हिंसाचाराचा निषेध करून निवडणुकांच्या पश्चात राजकीय सौहार्द कायम राहील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघाने परिपत्रक काढून या हिंसाचाराचा निषेध केला.
 
महाराष्ट्रातील युती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये घडणाऱ्या गमतीजमती बांगलादेशच्या राजकारणातही घडताना दिसतातअवामी लीगसोबत निवडणूक लढणाऱ्या जातीय पार्टीचे २२ संसद सदस्य नवीन सरकारमध्ये सहभागी व्हायला आतुर असताना पक्षाचे अध्यक्ष इर्शाद यांनी अचानक आपला निर्णय फिरवून आपला पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे जाहीर केले. आपण विरोधी पक्षनेते होणार असून आपले धाकटे बंधू जी. एम. कादीर उपनेते होतील, असे सांगताच जातीय पार्टीत खळबळ माजली३०० सदस्यांच्या संसदेत आपले २२ विरोधात बसले तर काय मोठा फरक पडणार आहेअसा काहींनी सूर लावला तर काहींनी हा जनतेचा विश्वासघात ठरेल, असे वाटले. लोक आपल्याला विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणार नाहीत, अशी भीती व्यक्त केलीकदाचित इर्शाद यांचा भविष्यात बांगलादेश नॅशनल पार्टीला मागे टाकून विरोधी पक्षाचे स्थान घ्यायचा हेतू असू शकतो. पण, त्यातही त्यांनी पक्षापेक्षा स्वतःचा विचार केला. कदाचित त्यांच्या निर्णयामुळे जातीय पार्टीत बंड होऊ शकते. ‘सत्तातुराणां ना भयं ना लज्जा’ हे वाक्य जगभर सर्वत्र लागू पडते.
 
बांगलादेशचे राजकारण शेख मुजीबूर रेहमान यांची अवामी लीग आणि माजी अध्यक्ष-लष्कर प्रमुख झियाउर रेहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या दोन पक्षांभोवती फिरते. विशेष म्हणजे, आज या दोन्ही पक्षांचे नेतृत्त्व पंतप्रधान शेख हसीना आणि बेगम खलिदा झिया या महिलांकडे आहेशेख हसीना २००९ सालपासून पंतप्रधान असून त्यापूर्वी १९९६ ते २००१ या कालावधीतही त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं होतं. निवडणुकीतील हिंसाचारासाठी दोन्ही पक्ष कुप्रसिद्ध आहेत. अवामी लीग सेक्युलॅरिझमकडे झुकली आहे, तर बीएनपी सत्तेवर असताना बांगलादेशात इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या कारवायांत वाढ झाली होती२००९ साली सत्तेवर आल्यानंतर शेख हसीनांनी पद्धतशीरपणे विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यास प्रारंभ केलाबांगलादेश निर्मिती युद्धात झालेल्या मानवाधिकार हननाच्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानला मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात आल्याभ्रष्टाचारविरोधी कारवाईचा भाग म्हणून अनेकांना अटक करण्यात आलीबीएनपीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया फेब्रुवारी २०१८ पासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असून ऑक्टोबरमध्ये झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील अपहाराबद्दल त्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
राजकीय हिंसाचार आणि विरोधी विचारांचे दमन या गोष्टी वगळता शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशला स्थैर्य प्राप्त झाले असून आर्थिक विकासाचा वेग वाढला आहेदरडोई उत्पन्नात दीडपट वाढ झाली असून गरिबी रेषेखालील लोकसंख्येत घट होऊन ती १९ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आली आहेया कालावधीत बांगलादेश जगातील सगळ्यात गरीब देशांच्या गटातून विकसनशील देशांच्या गटात पोहोचला असून मानवी विकासाच्या अनेक निर्देशांकांत तो पाकिस्तान आणि भारतापेक्षा चांगली कामगिरी करत आहेबांगलादेशच्या जलदगती विकासामुळे भारतात अवैधरित्या राहणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न आपोआप निवळण्यास मदत होणार आहे.
 
आपल्या ‘बेल्ट रोड’ प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांची स्वप्नं दाखवून चीन एकापाठोपाठ एक भारताच्या शेजारी देशांना गळाला लावत असताना बांगलादेश आणि भूतान हे दोनच देश खंबीरपणे भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.नरेंद्र मोदींच्या बांगलादेश भेटीत झालेल्या करारानुसार भारताला बांगलादेशच्या मोंगला आणि चितगाव बंदरांचा वापर करता येऊ लागल्यामुळे पूर्वांचलातील राज्यांना देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांशी तसेच आसियान देशांशी सागरी व्यापार करणे सुलभ झाले आहे. याशिवाय भारत-बांगलादेश दरम्यान नदीमार्ग वाहतुकीसंबंधीही एक करार झाला आहेपूर्वी कोलकात्याहून पूर्वांचलात जायला दोन दिवस लागत असत. कोलकाता-ढाका-आगरतळा तसेच ढाका-शिलाँग-गौहत्ती बससेवांमुळे हे अंतर काही तासांवर येऊन ठेपले आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न मार्गी लागला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून; खरंतर भारताच्या फाळणीपासून प्रलंबित भू-सीमा करार केल्यामुळे जमिनींची अदलाबदल करून सीमानिश्चिती करण्यात आली. या करारामुळे भारताच्या ताब्यातील सुमारे १० हजार हेक्टर जमीन बांगलादेशला देण्यात आलीतर बांगलादेशच्या ताब्यातील सुमारे ५०० हेक्टर जमीन भारताला मिळालीयामुळे सीमा बंदिस्त करता येऊन बेकायदेशीर बांग्लादेशी घुसखोरांना आळा घालता येणे शक्य झाले आहेगेल्या आठवड्यात सौदी अरेबियाने आपल्याकडे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवायला सुरुवात केली आहे.भविष्यात भारतही रोहिंग्यांना परत पाठवू शकेल.
 
भारत-बांगलादेश दरम्यान गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम सुरक्षा सहकार्य सुरू आहेगेल्या काही वर्षांत बांगलादेशने भारताला हव्या असलेल्या विविध अतिरेकी संघटनांच्या अनेक नेत्यांना अटक करून तर आठ जणांना शरण यायला भाग पाडून भारताच्या हवाली केले.बांगलादेश सरकारने १९७१ सालच्या युद्ध गुन्हेगारांवर कडक कारवाई केल्यामुळे त्याला विरोध म्हणून इस्लामिक कट्टरतावाद तिथे फणा काढायचा प्रयत्न करत आहे. पण, शेख हसीनांच्या सरकारने दहशतवादाशी लढताना कठोर भूमिका घेतली आहे. पूर्वांचलात रस्ते, रेल्वे, पूल,वीज प्रकल्प असे मोठे प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. भारत-बांगलादेश संबंधांच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून बघितल्यास शेख हसीनांचा विजय ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.
 
 

Saturday, 27 October 2018

हे सर्व आपल्याला कोठे नेणार?तरुण भारत-प्रशांत आर्वे |




जो देश म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्याना अतिशय संवेदनशील अशा जम्मूमध्ये जागा देतो, त्याबद्दल काय बोलावे? भारताच्या लोकसंख्या अनुपातात असमान बदल करून देशापुढे राष्ट्रीय संकट निर्माण करण्याच्या कामी कोण आहेत, हे वेगळे सांगायला नको. दुर्दैवाने या षडयंत्राला आपण बळी पडतो. इतिहास असल्या चुका कधीच माफ करीत नसतो. अशा चुकांची किंमत देशाला आणि येणार्‍या पिढ्यांना चुकवावी लागेल.
आजही आमच्या देशात काही मूलभूत आणि भविष्यात देशाला ग्रासणार्‍या प्रश्‍नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सबंधित व्यक्तीच्या वैचारिक बैठकीनुसार आणि त्याच्या राजकीय बांधिलकीनुसार बदलत जातो. हे देशाकरिता अत्यंत घातक आहे. देशासमोरील प्रश्‍नाकडे बघताना तरी आम्ही आमच्या डोळ्यावरील विविध रंगांच्या पट्ट्या बाजूला सारून बघितले पाहिजे; पण असे होताना दिसत नाही. ऐंशीच्या दशकापासून सीमावर्ती राज्यातील लोकसंख्येच्या अनुपातात जाणीवपूर्वक बदल करण्याचे षडयंत्र राजरोसपणे सुरू आहे. मात्र या देशातील राज्यकर्त्यांनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. किंबहुना,अनेक बुद्धिजिवी आणि पुरोगामी म्हणविणार्‍या मंडळीना हे उजव्यांचे स्वप्नरंजन वाटते. काहींना भाजपा वा संघ परिवाराचे देशातील उर्वरित हिंदू समाजाला मुस्लीम द्वेषाच्या आधारे एकत्रित करण्याचे षडयंत्र वाटू शकते. किंवा अगदीच सरळ सांगायचे म्हणजे तो मनुवादी डाव देखील असू शकतो. या मुद्याचा राजकीय फायदा भाजपाने उठवला हे खरे; मात्र राज्यकर्ते म्हणून त्यांचा देखील या प्रश्‍नाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार आश्‍वासक राहिलेला नाही. त्यामागे राजकीय गाणिते असण्याची शक्यता अधिक आहे.
आता देशातील धर्मनिहाय लोकसंख्येच्या अनुपाताविषयी बोलण्याची वेळ आलेली आहे. शक्य आहे; ज्यामुळे तुमच्यावर बुरसटलेला, संघी, प्रतिगामी, जातीयवादी, फ्यासिस्ट असा शिक्का मारून लोक मोकळे होऊ शकतात. या प्रश्‍नाकडे संघ वा तत्सम हिंदुवादी संघटनांचा अजेंडा म्हणून न पाहता एक निरपेक्ष भारतीय म्हणून बघितले पाहिजे. कारण तुम्ही, आम्ही वास्तव कितीही नाकारले तरी ते लपविता येणारे नाही.
आसाम सरकारने नुकतेच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरची आकडेवारी आणि यादी प्रसिद्ध केली आणि देशात एकाच गदारोळ माजला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान संपुष्टात येऊन बांगलादेशची निर्मिती श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वामुळे होऊ शकली. त्याच वेळी भारत आणि बांगलादेश यांच्यात बंधुभाव, शांतता आणि सहकार्याचा एक करार करण्यात आला होता. परंतु, बांगलादेशातून मुस्लिमांचे लोंढे आसामच्या दिशेने सुरू झाले. १९८० च्या दशकात आल आसाम स्टुडंट युनियन (एएएसयू)ने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी याना निवेदन देऊन या प्रश्‍नाकाडे तातडीने लक्ष देण्याची त्यांनी विनंती केली. १९८३ मध्ये सरकार हरकत मध्ये आले आणि बेकायदा निर्वासित विरोधी कायदा अस्तित्वात आला खरा पण सरकारने तो केवळ आसाम पुरता मार्यादित केला. हा कायदा अत्यंत ढिसाळ आणि कमजोर होता. या कायद्याची गरज बंगालला देखील होतीच. राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरची निर्मिती १९५१ मधेच झाली होती. आसामच्या बाबतीत १९६६ नंतर आणि १९७१ पूर्वी जे आसाममध्ये आले, त्यांनाच या रजिस्टरमध्ये स्थान देण्यात आले आहे. अर्थात एकाहत्तर नंतरच्या लोकांना यात स्थान मिळू शकते पण त्यांनी ७१ पूर्वी त्यांचे पूर्वज भारताच्या अन्य भगात राहत होते, हे सिद्ध करावे लागेल. यात विशेष असे काहीच नाही पण मुस्लिमांना भाजपा सरकार आसाममधून घालवू इच्छित आहे म्हणून छात्या बडविण्यात आल्या.
१९८० ते १९८३ च्या काळात इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख राहिलेले टी. व्ही. राजेश्‍वर हे बंगाल, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल देखील होते. या माणसाने संपूर्ण हयात देशाच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर घालविलेली असल्याने; १९८९ मध्ये बंगाल चे राज्यपाल झाल्यावर त्यांनी बांगलादेशातून होणार्‍या लोकसंखेच्या आक्रमणाचा गंभीरपणे अभ्यास केला. त्यांना या समस्येची भीषणता लक्षात येत होती. त्यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्र्यांना वारंवार पत्रे लिहून बदलत जाणार्‍या लोकसंख्या अनुपाताविषयी लक्ष वेधले पण आश्‍चर्य म्हणजे त्यावर त्यांना साधी पोच पावती देखील कधी आली नाही. केंद्रात विश्‍वनाथ प्रताप सिंग सरकार सत्तेत आल्यावर तत्कालीन परराष्ट्र मंत्री इंद्रकुमार गुजराल यांना राजेश्‍वर यांनी वारंवार पत्रे लिहिली; पण परिणाम शून्य. त्यांनी सुचविले की, परराष्ट्र, गृहमंत्रालय आणि पश्‍चिम बंगाल, आसाम, बिहार येथील पोलिस प्रशासन एकत्र येऊन या प्रश्‍नाचा सविस्तर अभ्यास करावा. उघड आहे राजेश्‍वर यांच्या या पत्रांकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्या गेले. ते केवळ राज्यपाल नव्हते तर ते इटेलिजंस ब्युरोचे माजी संचालक होते. असाच आणखी एक भला माणूस म्हणजे जनरल एस. के. सिन्हा. ते भारतीय भू- दलाचे उपप्रमुख राहिले होते. त्यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. १९९८ मध्ये त्यांनी बांगलादेशातून आसाममध्ये होणार्‍या मुस्लिमांच्या घुसखोरीविषयी विस्तृत अहवाल पाठविला. हा अहवाल हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येत होणार्‍या असमान वाढीकडे लक्ष वेधत होता. १९७१ ते १९९१ या वीस वर्षांच्या काळात हिंदूंच्या संख्येत ३३.२ टक्के वाढ झाली तर मुस्लिमांची लोकसंख्या ७७.४ टक्यांनी वाढली. राज्याच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण १९५१ मध्ये २२.६८ टक्के होते तर आज हेच प्रमाण ३६% वर पोचले आहे. ३३ जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे असे आहेत जे मुस्लीम बहुल झाले आहेत. बारपेटा, धुब्री, करीमगंज, गोलपारा, हेलकांडी, नागाव, दारांग, बोन्गाईगाव, मोरिगाव हे ते जिल्हे. बांगलादेशी घुसखोरांमुळे राज्याची डेमोग्राफी बदलण्याचे एक षडयंत्र आमच्याच नाकाखाली गेले अनेक दशके सुरू आहे. बारपेटा आणि धुब्री जिल्ह्यात घुसखोरांची संख्या चक्क ८० टक्क्यांच्या घरात पोचली आहे. आता प्रश्‍न आसा आहे की या भागात अल्पसंख्यक कुणाला म्हणायचे ?
जनरल सिन्हा आपल्या अहवालात म्हणतात, ‘‘मुस्लीम लोकसंख्येचे आकडे देण्याचे कारण बांगलादेशातून आसाममध्ये बेकायदा स्थलांतराच्या प्रमाणावर प्रकाश टाकणे, हा आहे. भारतात १९७१ नंतर बेकायदा आलेले जवळजवळ सर्व लोक मुस्लीम आहेत. बांगलादेशातून अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात होणार्‍या बेकायदा स्थलांतरामुळे त्या राज्यातील लोकसंखेच्या मिश्रणाचे प्रमाण बदलत आहे. त्यापासून आसामी लोकांची ओळख व देशाची सुरक्षा या दोहोंना गंभीर धोका आहे.’’ स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणार्‍या काँग्रेस सरकारने सिन्हा यांची निवड केली होती हे विशेष! परिणामी सिन्हा याना जातीयवादी ठरवून त्यांना राज्यपाल पदावरून हाकलण्याच्या मागणीने जोर धरला. अर्थात त्यामागे दिल्ली स्थित सारे ल्युटन्स कारणीभूत होते, हे वेगळे सांगायला नको.
उत्तर २४ परगणा, दक्षिण परगणा, मुर्शिदाबाद, बीरभूम, नादिया, मिदनापूर, बरद्वान हावरा या बंगालमधील जिल्ह्यांत वाढणारी मुस्लिमांची संख्या ही कोणाही विचारी माणसाला चिंतेत टाकणारी आहे. भारत आणि आसाम एकमेकांशी अतिशय चिंचोळ्या अशा भूभागाशी जोडले गेले आहे. आसामच्या डेमोग्राफीत बदल केल्याने आसाम आणि ईशान्य भारत भारतापासून तोडणे सोपे होणार आहे. यावर अनेकांनी वारंवार इशारे दिले आहे
ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी तर यावर गंभीर स्वरूपाचे लिखाण केले आहे. त्यांनी स्पष्ट नमूद केले की, ज्या दिवशी भारताची राजकीय आणि लष्करी ताकत कमकुवत होईल त्या दिवशी पूर्व भागात पुन्हा बंगाली भाषा बोलणार्‍या मुस्लिमांचा एक देश अस्तित्वात आलेला असेल. दुर्दैवाने ८० च्या दशकापासून आजतागायत त्यात म्हणावी तशी दखल सरकारने घेतलेली नाही. बांग्लादेशा लगतचे धुब्री, करीमगंज, काचार हे जिल्हे वेगाने मुस्लीम बहुल होणे कशाचे निदर्शक आहे? हे आपोआप घडत नसून एका मोठ्या योजनेचा भाग आहे. मात्र अजूनही देशातील आघाडीची प्रसारमाध्यमे या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. कारण जातीयवादाचा शिक्का लागण्याची भीती! या मनोभूमिकेमुळे आम्ही देशातील एका ज्वलंत प्रश्‍नाकडे साफ दुर्लक्ष करीत आलो आहोत. हा केवळ शासनस्तराचा प्रश्‍न नसून सर्व सामान्य भारतीय माणसाला देखील या प्रश्‍नाचे गांभीर्य कळायला हवे.
बंगाल आणि आसामच्या घुसखोरांच्या बाबतीत असलेली कायद्याची गुंतागुंत देखील त्यांच्याच पथ्यावर पडली आणि सरकारकडूनच त्यांना ते बेकायदा घुसखोर नाहीत, असा कागदच हाती पडू लागला. वर उल्लेखिल्याप्रमाणे १९८३ मध्ये अस्तित्वात आलेला खश्रश्रशसरश्र ाळसीरींळेप वशींशीाळपरींळेप लू ीींळर्लीपरश्र १९८३ हा कायदा अतिशय ढिसाळ आणि तकलादू निघाला. या कायद्याच्या विरोधात आसामची जनता सुप्रीम कोर्टात गेली. कोर्टाच्या हे लक्षात आले की १९६४ च्या फोरेनार्स कायद्यापेक्षा आयएमडीटी हा तकलादू कायदा आहे. या कायद्यात नियम असेच बनविले गेले, ज्यामुळे बेकायदेशीर देशात राहणार्‍या व्यक्तीना फायदा पोहोचेल. पोलिस यंत्रणा जर बेकायदेशीर घुसखोर सिद्ध करू शकली नाही तर पुन्हा अपिलाची त्यात सोय नाही, हा कायदा घुसखोरांना मदत करतो. ३,१०,७५९ लोकांची चौकशी या कायद्यांतर्गत झाली आणि प्रत्यक्षात केवळ १०,०१५ व्यक्ती घुसखोर ठरविण्यात आल्या. त्यातील फक्त १,४८१ लोकांना देशाबाहेर पाठविण्यात आले. वास्तविक १९६४ च्या कायद्यानुसार राज्यात ट्रीबुनल मजबूत करून बेकायदा घुसखोरांची ओळख पटवून त्यांचा रेकोर्ड ठेवणे आवशक होते. गोगाई सरकारच्या काळात असले काहीही घडून आले नाही. याउलट घुसखोरांची संख्या वाढती राहिली. तत्कालीन युपीए सरकारने काय केले ? तर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखविली.
१९५० मध्ये चीनमधील मांचू राजवटीविरुद्ध माओने क्रांतीचे रणशिंग फुंकले. याच माओचा सहकारी असलेला एक लष्करी अधिकारी लीन बियाओ याचे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे.
आधी खेडी काबीज करा मग शहरांना नमवा वर्तमानात बंगाल, बिहार आणि आसामची स्थिती पाहता लीन बियाओच्या वाक्यावर पद्धतशीरपणे काम सुरू असल्याचे दिसून येते. बंगाल आणि आसाम मधील असंख्य गावातून हिंदूंनी पलायन केले आहे. ६० टक्क्यावर देशी व बांगलादेशी मुस्लिमांची संख्या वाढली की, तिथे हिंदूंना राहणे कठीण जाते. हीच ती आपली धर्मनिरपेक्षता. बांगलादेशी घुसखोरांनी सीमावर्ती भागातील खेडी काबीज केली आहेत आणि आता शहरांची पाळी आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र रोहिंग्या मुस्लिमांना राज्यात जागा देण्याची भाषा करतात. याला काय म्हणावे ? केवळ मतांच्या राजकारणापायी आपल्याच देशाच्या सुरक्षेवर घाला घालणारे जगात आपण एकमेवच! जो देश म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्याना अतिशय संवेदनशील अशा जम्मूमध्ये जागा देतो, त्याबद्दल काय बोलावे?
भारताच्या लोकसंख्या अनुपातात असमान बदल करून देशापुढे राष्ट्रीय संकट निर्माण करण्याच्या कामी कोण आहेत हे वेगळे सांगायला नको. दुर्दैवाने या षडयंत्राला आपण बळी पडतो. इतिहास असल्या चुका कधीच माफ करीत नसतो. अशा चुकांची किंमत देशाला आणि येणार्‍या पिढ्यांना चुकवावी लागेल. चीनच्या सिकीयांग प्रांतात मुस्लिमांकडून लोकसंख्या अनुपात बदलाविल्या जातोय् हे कळताच चीनने तेथील मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजावर जबर बंधने घातली. नियोजनपूर्वक मुस्लीम नसलेल्या चिनी माणसांना नेऊन तिथे वसवल्या जात आहे. एखाद्या प्रश्‍नाचा निपटारा करायचा म्हणजे सरकारची इच्छाशक्ती लागत असते. नाहीतर हे सर्व आपल्याला कोठे नेणार? असला हताश प्रश विचारण्यापलीकडे आपल्या हातात काही नसेल.

Tuesday, 16 October 2018

सरकारने घुसखोरांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली तर आतापर्यंत घुसखोरांच्या जीवावर सत्तेची गणिते जुळवणार्‍यांना मानवाधिकाराचा मुद्दा आठवला -TARUN BHARAT

अन् अशा लोकांना पूरक भूमिका घेणार्‍या प्रशांत भूषण यांनी तो सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात नेलायातून ज्यांना इथल्या नागरिकांची काळजी नाहीत्यांना परदेशातून आलेल्या घुसखोरांबद्दल मात्र जिव्हाळा दाटून आल्याचेच दिसते.
 
 
 
बेकायदेशीररित्या घुसखोरी करून देशात ठाण मांडून बसलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने मानवाधिकाराच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍यांना चांगलीच अद्दल घडवली. २0१२ साली अटक केलेल्या सात रोहिंग्यांची म्यानमार या त्यांच्या मूळ देशात रवानगी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतलाकेंद्राच्या या निर्णयाला विरोध करत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि राज्यविहीन रोहिंग्यांना मानवाधिकाराच्या दृष्टीने विचार करत देशातून हुसकावून लावू नये, अशी भूमिका मांडली. सोबतच न्यायालयाने रोहिंग्या निर्वासितांचे संरक्षण करावे, असा सल्लाही दिला.सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील पीठाने मात्र प्रशांत भूषण यांना चपराक लगावत, “तुम्ही आम्हाला आमची जबाबदारी काय, हे सांगू नका,” अशा शब्दांत फटकारले. मागच्या १५-२0 वर्षांत मानवाधिकाराच्या नावाने घसा फाडत सरकारी निर्णयांत हस्तक्षेप करणार्‍यांचे मोहोळच उठलेत्या त्या सरकारांनीही विशिष्ट समाजाचीसमुदायाचीच कड घेणार्‍या मानवाधिकारवाल्यांचे चोचले पुरवत माना डोलावण्याचे काम केलेन्यायालयीन प्रक्रियेवरही या लोकांनी प्रभाव पाडत आपल्याला हवे तसे निकाल लावण्यासाठी मध्ये मध्ये लुडबुडण्याचे धोरण स्वीकारलेमुंबई बॉम्बस्फोटातील एक सूत्रधार कुख्यात दहशतवादी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करत मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडायला लावणारी हीच ती सोकावलेली जमात.
 
 
गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आणि माध्यमांत मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करुन आपली प्रसिद्धीची हौस भागवणार्‍यांची केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मात्र चांगलीच पंचाईत झालीस्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने मानवाधिकाराचे नाव घेत समाज-देशविघातक कारवायांना पाठिंबा देण्यासाठी कंबर कसलेल्या या लोकांचे खरे रुप उघड होऊ लागले. कारण, जो प्रकार देशाच्या सुरक्षेला, एकतेला आणि अखंडतेला धोका पोहोचविणारा होता, त्याला पाठीशी घालण्याची नव्हे तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत गजाआड करण्याची नीती सरकारने अंगिकारलीशिवाय या लोकांना परदेशी निधी व देणग्यांचा हिशोब द्यायलाही मोदी सरकारने भाग पाडले.त्याविरोधात काहूर माजवत याच लोकांनी ही हुकूमशाही-आणीबाणी असल्याची ओरड केली. पुरस्कारवापसी, असहिष्णुतेपासून ते मध्यंतरी न्या. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण, त्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीअमित शाह यांच्या हस्तक्षेपाबाबतचा आरोप आणि सरन्यायाधीशांवरील महाभियोगाचे नाट्यही देशात रंगले. अर्थात, कितीही काही केले तरी सर्वसामान्य जनतेचा या लोकांवरील विश्वासच उडालेला असल्याने त्यांना कोणी पाठिंबा मात्र दिला नाहीआपल्याच निरनिराळ्या उचापतींमुळे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेणार्‍या या मानवाधिकारवादी मंडळींना आज थेट सर्वोच्च न्यायालयानेच दणका देत त्यांची जागा दाखवून दिली, हे बरेच झाले. विशेष म्हणजे, हा निकाल नवनियुक्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पीठानेच दिला. आता रंजन गोगोई यांच्याविरोधातही ही मंडळी तोंड उघडतात का, हे पाहायचे. भारतात बेकायदेशीर घुसखोरांची समस्या कित्येक वर्षांपासूनची आहे. बांगलादेशी घुसखोरांनी तर पश्चिम बंगाल, आसामसह अगदी महाराष्ट्र-मुंबई, ठाण्यातही बस्तान बसवल्याचे अनेकदा उघड झाले. जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या आसामच्या राष्ट्रीय नागरिकता नोंदीनुसार तर तिथे ४0 लाख रोहिंग्या घुसखोर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही एका राज्यातली आकडेवारी, त्यामुळेच देशातल्या अन्य राज्यात किती लाख घुसखोर राहत असतील त्याची कल्पनाच केलेली बरी. वर्षानुवर्षे सत्ता बळकावून बसलेल्या राजकारण्यांनी या घुसखोरांना कधीही देशाबाहेर पिटाळून लावण्याची भाषा केली नाही. उलट या लोकांना रेशनकार्डापासून सर्वच प्रकारची ओळखपत्रे, सोयी-सुविधा कशा मिळतील हेच पाहिले. घुसखोरांच्या मतांसाठी लाचार झाल्यानेच सत्ताधार्‍यांनी अशा प्रकारे देशाच्या सुरक्षेला आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला चूड लावण्याचे पातक केले, पण स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी हपापलेल्यांना देशाची काळजी ती काय असणार? आता केंद्रातील भाजप सरकारने मात्र देशाचा आणि इथल्या नागरिकांचाच विचार करत, या घुसखोरांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली तर आतापर्यंत घुसखोरांच्या जीवावर सत्तेची गणिते जुळवणार्‍यांना मानवाधिकाराचा मुद्दा आठवला अन् अशा लोकांना पूरक भूमिका घेणार्‍या प्रशांत भूषण यांनी तोसर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात नेला. यातून ज्यांना इथल्या नागरिकांची काळजी नाही, त्यांना परदेशातून आलेल्या घुसखोरांबद्दल मात्र जिव्हाळा दाटून आल्याचेच दिसते. पण, यामुळे दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागतात ते सर्वसामान्य नागरिकांना, राजकारण्यांना नाही, हे लक्षात घेतलेले बरे.
 
 
बाह्य देशातून होणारे कोणत्याही प्रकारचे आक्रमण वा स्थलांतर हे ज्या प्रदेशात होतेते तिथल्या स्थानिक जनतेच्या संसाधनांची लूट करणारेच असते. दुसरी गोष्ट म्हणजे, रोहिंग्या घुसखोरांची संस्कृती, मूल्ये, परंपरा, खाद्यान्न सवयी या इथल्या वातावरणापासून पूर्णतः भिन्न आहेत. परिणामी, ‘स्थानिक विरुद्ध परकीय’ असा संघर्षाचा अध्याय सुरू होऊन रोहिग्यांनी मूळ रहिवाशांपुढेच आव्हान निर्माण केल्याचे दिसते. विशेष म्हणजे, ही काही फक्त भारतापुढची समस्या नाही तर संपूर्ण जगभरात घुसखोरांनी असेच वर्तन केलेले पाहायला मिळते. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, इटली या सर्वच युरोपीय देशांत आखाती देशांतून आलेल्या घुसखोरांनी स्थानिकांवरच शिरजोर होण्याचा प्रकार केलाघुसखोरांच्या मुजोरीमुळेच नजीकच्या काळात त्या त्या देशांत राष्ट्रवादाचे वारे वाहू लागल्याचे सर्वांनी पाहिलेआपल्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावरच उलटत या घुसखोरांनी हिंसाचाराचे, बलात्काराचे, अत्याचारांचे सत्र आरंभले.आपल्याच नाकातोंडात पाणी जात असल्याचे पाहत मग या देशांत घुसखोरांविरोधातील असंतोषाचा भडका उडाला आणि त्यातून नवे नेतृत्वही उदयास आलेघुसखोरांविरोधात निर्णायक पवित्रा घेतला तो हंगेरीनेहंगेरीचे विद्यमान पंतप्रधान प्रखर राष्ट्रवादी व्हिक्टर ओर्बन यांनी तर घुसखोरांना हंगेरीत प्रवेश नाही, या मुद्द्यावरच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. यावरूनच हंगेरियन जनतेच्या मनातली देशभक्तीचीराष्ट्रवादाची भावना किती प्रबळ असेल, हे समजते. पण, आपल्याकडे तर मानवाधिकाराच्या ढोंगापायी इथल्या जनतेच्या मानवाधिकाराच्या दमनालाच आवताण दिल्याचे पाहायला मिळतेसर्वोच्च न्यायालयाने रोहिंग्यांच्या पाठवणीबद्दल दिलेला निकाल त्यामुळेच महत्त्वपूर्ण ठरतो. दुसरीकडे आपल्या देशात दुटप्पी बडबड करणार्‍या धेंडांची अजिबात कमतरता नाही. कारण रोहिंग्यांना देशात राहू द्यावे, अशी विनंती करणारी मंडळीच भारतात अल्पसंख्याकांच्या हक्कांची मुस्कटदाबी होते, त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून गळे काढतात आणि त्याचवेळी नेमकी उलट भूमिका घेत रोहिंग्या मुस्लिमांना भारतात आश्रय देण्यासाठीही आकांडतांडव करतात. जर देशात अल्पसंख्य सुरक्षित नाहीतच, असे या लोकांचे म्हणणे असेल तर त्यांनी या रोहिंग्यांना अन्यत्र कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याची मागणी केली पाहिजे, पण ते तसे करताना दिसत नाहीत. यावरूनच मानवाधिकाराच्या नावाने छाती पिटणार्‍या सोंगांचा दुतोंडीपणा सिद्ध होतो.
सरकारने घुसखोरांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली तर आतापर्यंत घुसखोरांच्या जीवावर सत्तेची गणिते जुळवणार्‍यांना मानवाधिकाराचा मुद्दा आठवला