Total Pageviews

Showing posts with label SPORTS NOT CRICKET. Show all posts
Showing posts with label SPORTS NOT CRICKET. Show all posts

Saturday, 3 August 2024

Lakshya Sen Breaks the Mould at Paris Olympics

 Historic Achievement

Lakshya Sen has become the first Indian male shuttler to advance to the semifinals at the Paris Olympics. This remarkable feat comes after an arduous journey, marking a significant milestone in Indian badminton.

Overcoming Adversity

Sen's road to Paris 2024 was anything but smooth. After undergoing nose surgery in August of the previous year, he faced an eight-month recovery period. Qualifying for the Olympics itself was a challenge, but Sen's focus and determination saw him through to the men's singles competition, where he reached unprecedented heights.

Semifinal Triumph

At the Porte de la Chapelle arena on Friday, Sen made history by entering the semifinals. His match against Chinese Taipei's Chou Tien-Chen was a grueling 75-minute, three-game encounter. Despite Chou's own physical struggles, having been diagnosed with cancer in 2023 and undergoing surgery to remove part of his colon, both players displayed immense tenacity. Sen ultimately prevailed with scores of 19-21, 21-15, 21-12.

Tactical Mastery

In the first game, Chou tried to exploit Sen's weaknesses by drawing him into net rallies and forcing errors. The game was tightly contested, with scores tied at various points. Chou managed to clinch the first game with two clean smashes. However, Sen adapted his strategy, using smart drop shots and cross-court smashes to take control in the second game. His net play and powerful smashes secured a 21-15 win, shifting the momentum in his favor.

Decisive Victory

In the final game, Chou started to tire, making unforced errors, while Sen maintained his composure. From a 3-3 tie, Sen gradually pulled ahead, demonstrating his resilience and skill. At 11-7, Sen was firmly in control, and Chou's errors continued to mount. Sen closed out the match with a decisive 21-12 win, earning his place in the semifinals.

Mutual Respect

After the match, both players displayed mutual respect, shaking hands and exchanging words. In the mixed zone, Sen appeared tired but focused on the challenges ahead. "I have a lot more work to do now. The real test begins now," he said, acknowledging the significance of his victory while recognizing the need for rest and preparation for the upcoming matches.

Looking Forward

Lakshya Sen's historic achievement at the Paris Olympics is a testament to his resilience and dedication. As he prepares for the semifinals, the entire nation watches with anticipation, hopeful for even greater accomplishments

Thursday, 1 August 2024

Indian shooter Swapnil Kusale, from Maharashtra clinched the first ever Olympic bronze in 50m rifle 3 positions event,

 Indian shooter Swapnil Kusale clinched the first ever Olympic bronze in 50m rifle 3 positions event, taking the country's overall tally to three at the ongoing Paris Games on Thursday.


Kusale shot an aggregate of 451.4 in the eight-shooter final to finish third after being placed sixth at one stage.

The 28-year-old's medal comes following the stunning performance of Manu Bhaker, who clinched the women's 10m air pistol and mixed team 10m air pistol bronze alongside Sarabjot Singh.

All three medals so far for India have come in shooting events.

The last time a 50m rifle shooter made it to the Olympic finals was in 2012 London when Joydeep Karmakar finished fourth in 50m rifle prone event, a discipline which has been discontinued at the Olympics.

Kusale was a ticket collector and draws inspiration

Saturday, 26 May 2018

क्रॉसकंट्रीची नवी स्टार ‘संजीवनी’!- अमित डोंगरे- प्रभात वृत्तसेवा



 -

नाशिकच्या वीस वर्षीय संजीवनी जाधवने चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत इतिहास घडवला. महिलांच्या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकणारी संजीवनी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. याच स्पर्धेत भारताने सांघिक गटातही ब्रॉंझपदक पटकावत आणखी एक योग जुळवून आणला. या कामगिरीच्या जोरावर संजीवनी येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत जर तिने पदक मिळविले, तर तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न देखील साकार होईल.
संजीवनी ही नाशिकच्या भोसला मिलीटरी स्कूल आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती विजेंदरसिंग यांच्याकडे सराव करते. 2013 साली मलेशिया येथे झालेल्या आशियाई शालेय स्पर्धेत संजीवनीने पंधराशे आणि तीन हजार मीटर स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. हीच तिच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी घटना ठरली होती. त्याचवर्षी ब्राझिलमध्ये झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेतही तिने रौप्यपदक पटकावत जाणकारांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवताना तिने 28 मिनिटे 19 सेकंद अशी वेळ दिली. केवळ काही सेकंदांनी तिचे रौप्यपदक हुकले.
2017 हे वर्ष संजीवनीसाठी स्वप्नवत ठरले आहे. दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत तिने वीस वर्षांखालील गटात दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर भुवनेश्‍वर येथील
स्पर्धेत पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझ पदकाची कमाई केली. त्यानंतर तैवानमधील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले, ही स्पर्धा जागतिक स्पर्धा होती म्हणूनच तिच्या पदकाचे महत्त्व जास्त ठरले. या स्पर्धेत तिने स्वतःची सर्वोत्तम वेळ 33 मिनिटे 22 सेकंद अशी नोंदवली होती. आंतरविद्यापीठ स्तरांवर ज्या स्पर्धा होतात, त्यात संजीवनी आता पुण्याचे प्रतिनिधित्व करते.
यात तिने सलग तीन वर्षे पाच आणि दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. यंदाच्या वर्षी गंटूर येथे झालेल्या 57व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेतही तिने दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. एकूण काय तर ललिता बाबरप्रमाणे संजीवनीच्या रूपाने महाराष्ट्राला आणखी एक लॉंग डिस्टन्सरनर गवसली आहे. चीनमधील एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने आज संजीवनी खऱ्या अर्थाने स्टारबनली आहे. या स्पर्धेत चीनच्या ली डॅनने सुवर्णपदक तर जपानच्या ऍबे युकारीने रौप्यपदक पटाकवले. या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत एकूण पंधरा स्पर्धेक सहभागी झाल्या होत्या.
क्रॉसकंट्री स्पर्धेसाठीचा रस्ता यंदा वेगळाच होता. टेकडी, सपाट रस्ता पुन्हा टेकडी अशा रस्त्यांवरून ही स्पर्धा झाली, त्यात अखेरच्या क्षणी संजीवनी मागे राहिली आणि तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेच्या सांघिक गटातही भारताने ब्रॉंझपदक पटकावले, त्यातही संजीवनीचा मोठा वाटा आहे. वैयक्‍तिक शर्यतीतील एकाच देशाच्या सर्वोत्तम तीन खेळाडूंच्या कामगिरीवरून सांघिक पदक ठरले. भारतीय संघात संजीवनीसह मानांकीत खेळाडू ललिता बाबर, स्वाती गाढवे आणि झुम्मा खातुन या देखील होत्या. ललिताने 32 मिनिटे 53 सेकंद, झुम्माने 32 मिनिटे 14 सेकंद, स्वातीने 30 मिनिटे 18 सेकंद अशी वेळ दिली.
संजीवनीने जी वेळ दिली त्याच्या जवळपास जरी या तिघींनी वेळ नोंदवली असती तरी भारताला सांघिक गटातही सुवर्ण अथवा रौप्यपदक पटकावता आले असते. जपानने बारा गुणांसह सुवर्ण, चीनने 14 गुणांसह रौप्य तर भारताने 28 गुणांसह ब्रॉंझपदक मिळवले. गुणांचा हाच फरक चांगली कामगिरी करूनही संजीवनीला निराशा करणारा ठरला.
खरेतर या स्पर्धेत संजीवनीपेक्षा जास्त अपेक्षा ललिता बाबर आणि स्वाती गाढवेवर होत्या. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ललिता स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली होती त्यामुळे तीच चमत्कार घडवेल असे वाटले होते. खूप काळानंतर स्वाती आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत होती त्यामुळे तिच्यावर साहजिकच दडपण होते मात्र हेच दडपण असताना अनपेक्षितपणे संजीवनी जाधवने जाणकारांना आश्‍चर्याचा धक्का देते ः वैयक्तिक ब्रॉंझपदक पटकावले. 1991 मध्ये वैयक्तिक गटात भारताला चार पदके मिळाली होती त्यानंतर इतक्‍या वर्षांनी संजीवनीने देशाला पदक मिळवून दिले. तिच्या आजवरच्या वाटचालीत ओरिसातील आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील अपयश तिला सलत होते त्याची भरपाई तिने आता चीनमध्ये केली. तिची आदर्श पी. टी. उषा असली तरी कारकीर्द मात्र शंभर मीटर शर्यतीपेक्षा लॉंग डीस्टन्स शर्यतीत घडवायचे तिचे ध्येय आहे. दिल्ली मॅरेथॉनमध्ये जेव्हा ती दुसरी आली तेव्हाच तिने आपली सहकारी पूनम राऊत आणि ललिता बाबर यांना आव्हान दिले होते.
सध्या ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असून त्यांचेच विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व करते. केवळ पाच फुट उंची असलेली ही खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महानकरण्याच्या ट्रॅकवर आहे. अंतर विद्यापीठ स्पर्धेपासून तिची कामगिरी खऱ्या अर्थाने नावाजली जावू लागली. या स्तरावर सलग तीन वर्षे तिने विजेतेपद मिळविले व आपले वर्चस्व सिद्ध केले. वयाच्या केवळ 22 व्या वर्षीच तिने वरिष्ठ खेळाडू ललिता बाबर, स्वाती गाढवे आणि कविता राऊत या खेळाडूना आव्हान दिले. लांब पल्ल्याची धावपटू म्हणून नावारूपाला येत असताना तिने जे यश मिळविले आहे त्यातून ती खरेच इंडिया मटेरियल असल्याचे सिद्ध होत आहे. 1996 साली जन्मलेल्या संजीवनीने चीन मधल्या आशियाई क्रॉसकन्ट्री स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवत इतिहास घडविला आता हेच सातत्य तिने इंडोनिशियात ही दाखवले तर तिला देखील ऑलिम्पिक पात्रता मिळण्याची संधी आहे.
स्पोर्टस्‌नेस्ट यांच्या सहकाराने संजीवनी विविध स्पर्धामध्ये सहभागी होत असते. वरीष्ठ खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंदरसिंग हेच संजीवनीला देखील मार्गदर्शन करतात. केवळ 5 फूट 1 इंच इतकीच उंची असलेली संजीवनी लॉग डिस्टन्स रनर म्हणून यशस्वी होईल का असा प्रश्‍न विचारला जात होता मात्र आशियाई पदक मिळविल्यानंतर तिने सर्व टीकाकारांना आपल्या कामगिरीने दमदार उत्तर दिले. तिच्या उंचीचा फटका संजीवनीपेक्षा इतर खेळाडूना जास्त बसला. ललिता बाबरसह अनेक नावाजलेले खेळाडू अपयशी ठरत असताना संजीवनीने मिळविलेले पदक देशासाठी खूपच महत्वाचे ठरते.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाहिलेली सर्व स्वप्ने क्रमाक्रमाने संजीवनी पूर्ण करत आहे. सप्टेंबरमध्ये होणारी आशियाई स्पर्धा तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पाच हजार आणि दहा हजार मीटर शर्यतीत आज तरी संजीवनी वगळता अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. या स्पर्धेत तिने पदक मिळविले व त्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर तिला ऑलिम्पिकला जाण्याची संधी मिळेल. मैदानी स्पर्धेत भारताला आजवर म्हणावे तितके यश लाभलेले नाही अशा स्थितीत संजीवनीसारख्या खेळाडूवरच सर्व आशा केंद्रित होतात तिने जर यश मिळविले तर भारतासाठी ती नव्या युगाची नांदी ठरेल.
मिल्खा सिंग, पी. टी. उषा आणि शायनी विल्यम यांच्यानंतर संजीवनी हीच केवळ भारतासाठी पदकाचे आशास्थान ठरत आहे. गेल्यावर्षी आशियाई ऍथलॅटिक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवत संजीवनीने आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरविला आहे. दिवसेंदिवस ती प्रगती करत आहे आता तिचा समावेश टीओपीमध्ये (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम) झाला पाहिजे. देशाची लोकसंख्या पाहता संजीवनीसारख्या खेळाडूना अधिकाधिक प्रोत्साहन दिले तरच ऑलिंपिक पदकामध्ये देखील वाढ होईल.
मैदानी स्पर्धा या खरे तर मदर ऑफ ऑल स्पोर्टसमजल्या जातात त्यामुळे अन्य खेळाबरोबरच मैदानी स्पर्धेवरच जास्त प्रमाणात लक्ष्य केंद्रित केले गेले पाहिजे. संजीवनीचा आता सामान्य खेळाडू ते असामन्य खेळाडू असा प्रवास सुरू झाला आहे. आशियाई स्पर्धेपाठोपाठ जर ती ऑलिम्पिकमध्येही यशस्वी ठरली तर तो तिच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरेल.


Saturday, 24 June 2017

श्रीकांतचा ऑस्ट्रेलियात विजयाचा झेंडा -गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कदाम्बी श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजमध्ये विजयाचा झेंडा फडकवला आहे. शक्ती आणि युक्तीच्या जोरावर त्यानं चीनच्या चेन लाँगचं आव्हान २२-२०, २१-१६ असं मोडीत काढलंबॅडमिंटन मधील नवा तारा


Maharashtra Times | Updated: Jun 25, 2017, 12:13PM IST मटा ऑनलाइन वृत्त । सिडनी गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कदाम्बी श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजमध्ये विजयाचा झेंडा फडकवला आहे. शक्ती आणि युक्तीच्या जोरावर त्यानं चीनच्या चेन लाँगचं आव्हान २२-२०, २१-१६ असं मोडीत काढलं. भारतात आवडीचा खेळ कोणता असे जर विचारले, तर क्रिकेटचे नाव डोळ्यासमोर येतो. त्यापाठोपाठ हॉकी आणि अन्य मैदानी खेळांचा क्रमांक लागतो. जिम्नॅस्टिक, पोहणे, टेबल टेनिस यासारख्या खेळांत भारताचा दबदबा कधीच नव्हता. कारण, यासाठी असणारे हवामान, मेहनतीची तयारी, सोयीसुविधांचा आपल्याकडे अभाव असल्याने खेळाडूंच्या यशाचे प्रमाण नगण्यच राहिले आहे. असे असले तरी बॅडमिंटनसारख्या खेळात आता भारताच्या खेळाडूंनी जगात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. किदंबी श्रीकांतने इंडोनेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास घडवला आहे. इंग्लंडच्या मैदानावर चॅम्पियन करंडकच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होत असताना, किदंबीने इंडोनेशियात तिरंगा उंचावत देशाची शान राखली. इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी गाठताना श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित खेळाडूला पराभूत केले होते, हे विशेष. दक्षिण कोरियाचा के सोन वान याला एक तास 12 मिनिटांतच श्रीकांतने गारद केले. 21-15, 14-21 आणि 24-22 असे पराभूत केले. अंतिम सामन्यात तर जपानच्या काजूमासा साकाईला दोन सेटमध्ये हरविण्याची किमया श्रीकांतने साधली. केवळ 35 मिनिटे चाललेल्या खेळात 24 वर्षीय श्रीकांतने काजूमासाला नामोहरम केले होते. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा हा दुसरा सुपर सीरिज विजय आहे. याअगोदर त्याने 2014 मध्ये चायना ओपन जिंकली होती. श्रीकांतसाठी हा चौथा सुपर सीरिज अंतिम सामना होता. 2015 मध्ये त्याने इंडियन ओपनवर मोहर उमटवली होती. असे म्हटले जाते की, भारतात क्रिकेटपुढे अन्य खेळांतील यशांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण, याचा प्रत्यय वारंवार आपल्याला येतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे, चॅम्पियन करंडकमधील भारताचा पराभव हा माध्यमांचा मुख्य मथळा ठरला, तर किदंबीने मिळवलेले यश हे मात्र एखाद्या कॉलमचा भाग राहिला. यावरून क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो. किदंबी हा ग्रां.प्री., सुवर्ण चषक, सुपर सीरिज प्रीमिअर आणि सुपर सीरिज अशा तिन्ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. श्रीकांतने आपला मोठा भाऊ नंद गोपाळकडून प्रेरणा घेतली आणि या क्षेत्रात करिअर करण्याचे निश्‍चित केले. श्रीकांतच्या जडणघडणीत गोपाळचा वाटा निश्‍चितच मोठा आहे. श्रीकांतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आशियायी, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियायी कनिष्ठ अजिंक्यपद, राष्ट्रकुल युवा स्पर्धा आदी अनेक स्पर्धांत पदकावर नाव कोरले आहे. त्याने ऑलिम्पिक आणि विश्‍वविजेता लिन दान याच्यासह जागतिक क्रमवारीतील नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्‍का दिला आहे. तसे पाहिले तर जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये चीनने दादागिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धा असो किंवा ऑलिम्पिक असो, चीनचे खेळाडू सहजपणे या स्पर्धा खिशात घालत. चीनच्या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने प्रभाव टिकून ठेवला. मात्र, गेल्या दशकापासून भारतीय खेळाडूदेखील यशाचे दरवाजे ठोठावत आहेत. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी मात्र भारताचे नाव अधिकच उंचावत नेले. आजही भारतात प्रकाश पदुकोनमुळेच बॅडमिंटनचे नाव घराघरांत पोहोचल्याचे सांगितले जाते. साधारणत:, तीन दशकांपूर्वी प्रकाश पदुकोनने चीनच्या विश्‍वविजेत्याला हरवून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर बॅडमिंटनकडे सर्वांचे लक्ष गेले. बॅडमिंटनला भारतात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देण्याचे काम प्रकाश पदुकोन यांनी केले आहे. त्यानंतर पुलेला गोपीचंदने वारसा पुढे नेला. अलीकडच्या काळात सायनाने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवून देशाचा गौरव वाढवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये तर पी. व्ही. सिंधू सोनेरी उंबरठ्यावर उभी होती. परंतु, रौप्यपदक मिळवून उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंना प्रेरित केले. सायना नेहवालपासून प्रेरणा घेत पी. व्ही. सिंधू, अजय जयराम, एच. एस. प्रणोय, आर. एम. व्ही. साईप्रणीत, पारूपल्ली कश्यप आणि आता किदंबी श्रीकांत या खेळाडूंनी जागतिकस्तरावर भारताचा ठसा उमटवला आहे. श्रीकांतने भारताला सांघिक स्पर्धांत बहारदार कामगिरी करत यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाट उचलला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात श्रीकांतचा जन्म झाला. पुढे भावाच्या प्रेरणेने हैदराबाद येथे गोपीचंद अकादमीत प्रवेश घेतला आणि श्रीकांतच्या खेळाला आकार आला. मोठा भाऊ फारसा यशस्वी ठरला नसला, तरी त्याची कसर श्रीकांतने भरून काढली. तासन्तास सराव करत जागतिक खेळाडूंचे बारकावे श्रीकांतने शिकले आणि समजून घेतले. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे विकपॉईंट त्याने शोधले आणि त्यावरच हल्ला केला. आक्रमकतेबरोबरच बचावही तेवढ्याच ताकदीचा असावा, असे श्रीकांत म्हणतो. जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत असताना, ऑलिम्पिकमध्ये कच खात असल्याचा अनुभव आपल्याला येतो. यास श्रीकांतही अपवाद राहिला नाही. अकारण मानसिक दडपणाखाली खेळून ऐनवेळी हाराकिरी करत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. याबाबत त्यानेच कबुली दिली आहे. रिओ येथील स्पर्धेत त्याला अपयश आले. ऑलिम्पिकचे आणि अन्य स्पर्धांचे वातावरण वेगळे असते. चीन, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांचे खेळाडू ऑलिम्पिकच्या स्पर्धा खूपच गांभीर्याने खेळतात. हा अपवाद वगळता श्रीकांतने भारताला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. इंडोनेशियन ओपनचा अंतिम सामना जिंकल्यानंतर श्रीकांतने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्‍त करत म्हटले होते की, अंतिम सामन्यातील दुसरा गेम अवघड होता. परंतु, मी आखलेल्या रणनीतीनुसार खेळ केल्याने त्यावर मात करणे सहजशक्य झाले आणि इंडोनेशियन ओपनचा किताब माझ्या नावावर करता आला. भारतीय बॅडमिंटन संघटनेनेे श्रीकांतला पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यशाची पताका अशीच उंचावत राहो, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली आहे. इंडोनेशियन ओपन जिंकणारा श्रीकांत हा पहिला भारतीय खेळाडू असून, यापूर्वी सायना नेहवालने महिला ऐकरीत दोनदा हा किताब जिंकला आहे. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व सामना जिंकल्यानंतर श्रीकांतने आपले लक्ष्य आताच चषकावर नसून, आखलेल्या रणनीतीवर आहे, असे म्हटले होते. याच रणनीतीने श्रीकांतने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. संयमी वृत्ती ही श्रीकांतची उजवी बाजू मानली जाते. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पाठिंबा देणारा मोठा वर्ग असला, तरी श्रीकांत आपला समतोल थोडाही ढळू न देता कोर्टवर अधिक लक्ष केंद्रित करतो. वेगवान फटके आणि चपळता ही श्रीकांतची जमेची बाजू आहे. या जोरावरच त्याने स्पर्धा जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या पराभवाचा त्याने बारकाईने अभ्यास केला आणि उणिवा दूर करण्यावर भर दिला. यात आत्मपरीक्षण करून त्याने खेळात आणखी सुधारणा केली. याचा फायदा त्याला इंडोनेशियन ओपनमध्ये झाला. आगामी जागतिक स्पर्धेपूवीर्र् श्रीकांतला मिळालेले यश मोलाचे मानले जाते. इंडोनेशिया ओपन जिंकल्यानंतर आता किदंबी श्रीकांतची नजर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेवर राहणार आहे. ही स्पर्धा 25 जूनपर्यंत चालणार आहे. श्रीकांतबरोबर अन्य खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. भारतात आता क्रिकेटपेक्षाही अन्य खेळांनाही पुरेसे महत्त्व दिले जात असल्याने विविध खेळांत भारतीय खेळाडू नाव कमावताना दिसून येत आहेत. बॅडमिंटनमध्ये दर्जेदार खेळाडूंची फळी उभी राहिलेली असून, ती याही पुढच्या काळात अशाच प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करेल अशी आशा करू.

Thursday, 7 July 2011

DRUG SCANDAL IN INDIAN SPORTS

क्रीडाक्षेत्रातील उत्तेजक द्रव्यांचा वापरराजेश कालरा Thursday July 07, 2011 गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आणि त्यानंतर लगेचच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी भारतीय अॅथलीट्सनी बजावली. गेल्या काही वर्षात भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्पर्धात फडकू लागला होतो तो अशाच खेळाडूंमुळे.आता यापैकी बरेच खेळाडू, कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजक द्रव्ये घेण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहेत. अत्यंत गंभीर प्रकरणात हे खेळाडू अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय हौशी अॅथलेटिक्स फेडरेशनने ज्या उत्तेजक द्रव्यांवर बंदी घातली आहे तीच या खेळाडूंनी घेतली होती.गेल्या काही दिवसांत या प्रकरणांबाबत भरपूर लिहिले गेले आहे. या प्रकरणाची गंभीरता जाणवल्यानंतर आता एकमेकावर दोषारोप सुरू झाले आहेत. या मामल्याची चौकशी सुरू झाली असली तरी, या प्रकरणात दोषी कोण आहे हे ठरायलाच हवे. येथे , केवळ भारतातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मंडळी एकमेकाला सांभाळून घेतात हेही आपण समजून घ्यायला हवे.आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात अशी दव्ये घेतली जतातच. मग ते धावपटू असोत किंवा फुटबॉलपटू किंवा सायकलपटू किंवा इतर क्रीडापटू. आता तर पुरस्कार आणि बक्षिसे इतकी भरघोस असतात की, उत्तेजक दव्ये घेण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढते आहे. आणि स्पष्टच बोलायचे तर, हे उद्योग करणारे भारतीय खेळाडू अत्यंत चुकीच्या पद्धतीने, अव्यावसायिक पद्धतीने करतात. याउलट, परदेशी खेळाडू हे अत्यंत सराईतपणे करतात अगदी उत्तेजक दव्ये घेण्याची त्यांनी कला विकसीत केली आहे.हे कसे साधतात हे बघूया!क्रीडावैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उत्तेजक दव्ये विरोधी संघटना, वाडाचे हल्लीपर्यंत सदस्य असलेले डॉ. भारत इंदर सिंह यांनी हे सारे मला समजावून सांगितले. अशी दव्ये, आंतरराष्ट्रीय खेळाडू कशी घेतात आणि भारतीय खेळाडू कशी घेतात. अशी उत्तेजके घेणे यात नवीन काहीच नाही. गेली अनेक दशके हे सुरू आहे. १८९६ साली, आर्थर लिंटन हा सायकलपटू, ट्रायमेथील हे उत्तेजक दव्ये अति प्रमाणात घेतल्यामुळे मरण पावला होता.हे प्रमाण वाढीस लागल्याने, १९२८ साली, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक संघटनेने, यावर अशी दव्ये घेण्यावर बंदी घातली. अर्थात यानंतर हा मामला अधिक गंभीर बनू लागला आहे. २००४ सालच्या ऑलिंपीकमध्ये खेळाडूंना, नाव गुप्त राखण्याच्या अटीवर, किती जण अशी दव्ये घेतात असे वाडातफेर् विचारण्यात आले आणि याचे उत्तर ६५ टक्के इतके होते असे सिंग सांगतात.असे असेल तर, फक्त आफ्रिकी आणि आशियाई खेळाडू का पकडले जातात? याचे सोपे उत्तर आहे की, फेडरेशनच्या उत्तेजक द्रव्ये घेतली आहेत की नाहीत हे तपासण्याच्या वाडाच्या यंत्रणेवर मात करण्याचे तंत्र प्रगत देशांच्या खेळाडूंनी शोधले आहे. अमेरिकेत तर, वाडाच्या तपासणीत अशी दव्ये सापडणार नाहीत अशी उत्तेजक दव्ये प्रयोगशाळेत तयार केली जातात. अर्थात त्यांची किंमतही तशीच मोजावी लागते आणि ती मोजण्याची तयारीही खेळाडूंची असते.याउलट, आपले खेळाडू, हलक्या दर्जाची दव्ये घेतात आणि सहजतेने पकडले जातात. माझ्या मते, आपल्या क्रीडा संघटनांही, महागड्या उत्तेजक दव्यांसाठी निधी देत असणार, परंतु आपले पदाधिकारी स्वस्त दव्ये घेऊन पैशाचा अपहार करत असण्याची शक्यता आहे.मी पुन्हा, अशी दव्ये घेण्याच्या विषयाकडे वळतो. या प्रश्ानवर आपल्या खेळाडूंना पुरेशी माहितीही दिली जात नाही. या क्षेत्रातल्या अद्ययावत घडामोडींची त्यांना माहिती नसते. याबाबतचे नियम, कायदे यांचीही कल्पना नसते, अगदी वैद्यकीय कारणांसाठी त्यांनी काही औषधे घेतली तरीही ते याबाबत अंधारात असतात.फेडरेशनचा याबाबत एक नियम आहे. खेळाडूच्या प्रकृतीसाठी एखादे औषध त्याने घेणे आवश्यक आहे असे जर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनी लिहून दिले असेल तर, स्पर्धा सुरू होण्यापूवीर् खेळाडूने तसे आयोजकांना सांगितले तर त्याला या या चाचणीतून सूट मिळते. आपल्या अनेक खेळाडूंना याची कल्पना नसते हेच आश्चर्य आहे.यात भर पडते ती, आपल्या पदाधिका-यांची. आपल्या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली असलेले हे पदाधिकारी, प्रशिक्षकांवर दबाव आणतात ते आपले खेळाडू, कस सुधारण्यासाठी, प्रतिर्स्पध्यांप्रमाणे पोषक अन्न घेत नाहीत अशा प्रकारची विधाने करून. बिच्चारे खेळाडू, मग काहीतरी मुर्खासारखे करतात आणि नेहमीप्रमाणे खेळाडूंवर खापर फोडले जाते.सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अथेन्स ऑलिपिकच्या वेळी, सहजतेने, प्रिस्क्रीपशनविना केमिस्टकडे उपलब्ध होणाऱ्या, दव्यांची चाचणी त्यांनी घेतली आणि त्यापैकी १८ टक्क्यांमध्ये, बंदी घातलेली उत्तेजक दव्ये सापडली. पण या दव्याच्या पॅकवर याचा उल्लेखही नव्हता. प्रगत देशातील प्रशिक्षक अशा दव्यांपासून आपल्या खेळाडूंना दूर राखतात, गरीब देशांचे खेळाडू आणि प्रशिक्षक याला बळी पडतात आणि मग मिडीयामध्ये त्यांनी उत्तेजक दव्ये घेतल्याच्या बातम्या झळकतात.अर्थात याचा दोष या खेळाडूंवर येतो. आणि संबंधित संघटनांचाही तितकाच दोष असतो.याचा अर्थ मी, उत्तेजक दव्ये घ्यावीत असे कदापी म्हणणार नाही. परंतु, आपल्या खेळाडूंना, याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जगात याबाबत काय चालले आहे, नियम काय आहेत, नियमात बदल काय झाले आहेत त्यांचे हक्क काय आहेत अशा अनेक बाबी त्यांना समजून द्यायला हव्यात.मुळात इतर अनेक देशांतील अनेक अॅथलीट जितके बळकट असतात, तिके भारतीय अॅथलीट नसतात. ते जर उत्तेजक दव्ये घेऊन कामगिरी सुधारत असतील तर आपल्या खेळाडूंची काय अवस्था होत असेल?आपल्या शारिरीक क्षमतेवर मात करूनही आपले अॅथलीट चमक दाखवू शकतील, परंतु त्यासाठी आपल्या पदाधिका-यांनी अॅथलीटना मार्गदर्शन करण्यासाठी अधिक रक्कम खर्च करायला हवी