नक्षली हल्ल्यात ११ पोलिस शहीद
देशात सध्या अहिंसक आंदोलनाचे वारे सुरू असतानाच छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी भयंकर रक्तपात घडवला. पोलिसांच्या गस्ती पथकावर नक्षलवाद्यांनी संध्याकाळी अचानक केलेल्या हल्ल्यात ११ पोलिस शहीद झाले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादीही ठार झाले. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातही चकमक झडून पोलिसांना चार नक्षलवाद्यांना टिपले होते.
छत्तीसगढ पोलिसांची एक तुकडी मेलापेरू गावाजवळील जंगलात गस्त घालत असताना हा हल्ला झाला. हल्ल्यात ११ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादीही ठार झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक रामनिवास यांनी दिली.
भद्रकाली आणि भोपालपट्टणम या दोन पोलिस ठाण्यांदरम्यान असलेल्या परिसरात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या दोन तुकड्या शुक्रवारी गस्त घालत होत्या. त्यादरम्यान ही चकमक झडली. घटनेनंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दले पाठवण्यात आल्याचे रामनिवास यांनी सांगितले

No comments:
Post a Comment