भ्रूण हत्याविरोधी किती विविध पातळ्यांवर कार्य करावे लागणार आहे व लढावे लागणार आहे याची चुणूक दाखविणार्या दोन लक्षणीय घटना महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात घडल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आयोजिलेली व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ या उपक्रमांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई ङ्गुले यांचे जन्मगाव असलेले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव ते ङ्गुलेवाडी, पुणे पदयात्रा ही पहिली घटना होय. तर, राज्यात दर हजारी मुलांमागे मुलींचे घटत असलेले प्रमाण ही गंभीर वस्तुस्थिती असून न्यायालय याकडे डोळेझाक करू शकत नाही असे स्पष्ट करीत, स्त्री भू्रणहत्या रोखण्याचे ठोस पाऊल म्हणून सोनोग्राङ्गी मशिन्समध्ये ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ बसविण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी कायदेशीर मोहोर उठविली, ही दुसरी घटना होय. पण या वैद्यकीय व्यवसायातील रेडिऑलॉजिस्ट डॉक्टरांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. गेल्या गुरुवारपासून रविवारपर्यंत नायगाव ते पुणे अशी चार दिवस ६० कि.मी.ची ही पदयात्रा अनेक वैशिष्ट्यांसह अभूतपूर्व अशी होती. राज्यांच्या ३५ जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ८०० मुलींनी स्त्री भ्रूणहत्येविरोधी आवाज बुलंद केला. त्यापैकी खान्देशातील २२५ युवती होत्या. १८ ते २४ वयोगटातील या मुली ६० कि. मी.च्या पदयात्रेत चालतील की नाही अशी शंका सुरुवातीला वाटत होती. पण ऊन-पावसात ६० कि.मी. चालून या मुलींनी आपली जिद्द दाखविली. नाच, ङ्गुगडी व गाणी यांनी युक्त अशी ही युवा चैतन्याची आनंदी पदयात्रा होती. रंगीबेरंगी सहावारी, नऊवारी साड्या नेसलेल्या मुली ङ्गुगड्या खेळल्या. तसेच भजने, गाणी म्हणत व गावोगावी पथनाट्य सादर करीत त्यांनी स्त्री जीवनाच्या व्यथाही प्रभावीपणे मांडल्या. काही मुली प्रथमच आपल्या गावाबाहेर पडल्या होत्या. तसेच बर्याच मुली प्रथमच ६० कि.मी. चालल्या. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या काही शेतकर्यांच्या मुलीही या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. गावोगावच्या नागरिकांनी ढोल ताशे यांच्या गजरात, पुष्पगुच्छ देत या नारी पदयात्रींचे स्वागत केले. या पदयात्रेतील घोषणा खूपच बोलक्या होत्या. त्या अशा ‘चांगल्या घराची खूण सांग... मुलगा मुलगी समान’, ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, आजची मुलगी ङ्गार हुशार’, ‘कौन लायेगा इस देशमे क्रांती, नारी शक्ती - नारी शक्ती’, ‘ङ्गुल है चिनगारी है, हम भारत की नारी है’, ‘लेक वाचवा, देश वाचवा’, ‘मुलगी ही वंशाची पणती’ या घोषणांबरोबर ‘सुप्रिया साखर पेरत ऊनी ओ माय, आंडेर वाचाडाले ऊनी ओ माय’ ही अहिराणी घोषणा व गीते यांनी पदयात्रेला आणखीच बहर आला. या पदयात्रेत सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ज्योती जाधव, नायगावचे सरपंच राजेंद्र नेवसे, ऍड. वर्षा देशपांडे, पद्मिनी सोमाणी, डॉ. समीर दलुबाई आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ङ्गयाखेरीज, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांच्या ‘गृह’मंत्री उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व उद्योजिका सुनेत्रा पवार, बबनराव पाचपुते ह्यांच्या पत्नी प्रतिभाताई, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुपा आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. तसेच ङ्गगृहमंत्री आर. आर. पाटील यांची लेक सुप्रिया, आमदार विद्या चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता लगडे यांचाही सहभाग होता. ‘यशस्विनी अभियाना’च्या राज्य समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक तिलोत्तमा पाटील, समन्वयक कल्पना पाटील, चोपडा तालुका समन्वयक नीता पाटील या राज्य व खान्देश पातळीवरील महिला नेत्यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. तसेच पदयात्रेस खान्देशातून विक्रमी सहभाग दिल्याबद्दल त्यांना खास धन्यवाद द्यायला हवेत. या पदयात्रेच्या प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सर्वश्री छगन भुजबळ, जयंत पाटील, आर. आर. पाटील, या माजी माजी उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती हेाती. पण विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती खटकली. पदयात्रेच्या प्रारंभी जरी नाही तरी समारोपास तरी काकांसोबत सुप्रिया ताईंच्या या ‘दादां’नी उपस्थित रहायला हवे होते. आधीच दादा-ताईमध्ये धुसङ्गुस व रुसवे ङ्गुगवे आणि त्यात या पदयात्रेच्या रुपाने केलेली कुरघोडी यामुळे अस्वस्थ, चिडखोर, ‘टग्या’ दादा आणखी हैराण होत ताईवर चीड चीड चीडले की काय? ते काहीही असो, राज्यातील शैक्षणिक व आर्थिक विकास झालेल्या विकसित, पुढारलेल्या भागात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी होत आहे. शिक्षण व समृध्दी याबाबत आघाडीवर असलेल्या भागात स्त्री भू्रणहत्येचे प्रमाण वाढले आहे. तर, आदिवासी, गरीब व मागासलेल्या भागात स्त्री भू्रणहत्येचे प्रमाण ङ्गार कमी आहे. यातून काय निष्कर्ष निघतो? शैक्षणिक व आर्थिक विकासात प्रगत असलेले समृध्द लोक हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले, कंगाल, गर्भापासूनच कन्येच्या मुळावर उठलेले स्त्रीद्वेष्टे, समताविरोधी व देवकीच्या मुली आपटून ठार करणार्या कंसचा वारसा चालविणारे आहेत. तर, आदिवासी, गरीब व मागासलेले हे सामाजिकदृष्ट्या खरे प्रगत, समतावादी व समाजसुधारकांच खरे वारसदार आहेत. स्त्री भ्रूण हत्त्येची समस्या इतिहासजमा करायची असेल तर आधी स्त्रियांची, नंतर किंवा सोबत समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी सामाजिक प्रबोधन करणे नितांत आवश्यक आहे. ज्यांना ङ्गक्त मुली आहेत त्यांचा सत्कार हे स्वागतार्ह, पण प्रतिकात्मक व छोटे पाऊल आहे.’ खासदार सुप्रिया सुळे यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाच वर्षाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे सांगतानाच, महाविद्यालये, महिला बचत गटांच्या माध्यमातून जन जागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. तसेच सुरक्षित वातावरण व शिक्षण हेही तेवढेच ङ्गमहत्त्वाचे असल्याने गृह, ग्रामविकास व शिक्षण या खात्यांकडून खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी संबंधित मंत्र्याच्या उपस्थितीत सांगितले. पण सुप्रियाताई,एवढ सारेही पुरेसे नाही. कारण स्त्रीभूष हत्त्या ही मुळात सामाजिक समस्या आहे. तुम्ही पुढाकार घेतला चांगले झाले. पण हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यक्रम असे त्याला मर्यादित स्वरुप येऊ देऊ नका. आपल्या देशातील सामाजिक अस्पृश्यता, वरकरणी तरी, कमी झाली असली तरी राजकीय अस्पृश्यता वाढली आहे. (मात्र सत्ता व स्वार्थ हे यास अपवाद आहेत) तेव्हा विनंती की, स्त्री भूण हत्त्याविरोधी सामाजिक प्रबोधन हे पक्षातीत व्हावे. तरच समस्येची व्याप्ती व लौकर सुटण्याची निकड यादृष्टीने ठोस प्रगती होवू शकेल, असा विचार होईल काय? ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘एकही स्त्रीभूण हत्त्या करायची नाही, असा निर्धार डॉक्टरांनी करावा’, असे त्यांना आवाहन केले आहे. पण दुर्दैवाने डॉक्टर मंडळी व त्यांची ‘इंडियन रेडिऑलॉजिकल ऍन्ड इमेजिंग असोसिएशनने यांनी सामाजिक भान व जबाबदारीची जाणीव ठेवण्याऐवजी केवळ धंदेवाईक विचार करुन ‘सायलंट आब्झर्व्हर’ बसविण्याच्या शासनाच्या निर्णयास आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने दणका देवूनही त्यांची ही खुमखुमी अद्याप कायम आहे. गर्भजल निदान चाचणीचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे रोखण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षांपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार, सोनोग्राङ्गी मशिनमध्ये ‘सायलेट ऑब्झर्व्हर’ बसविले जाणार आहेत. त्याद्वारे स्त्रीभ्रूण तपासले गेले आहे की नाही यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. पण हा निर्णय म्हणजे ‘रुग्णाचे खासगी जीवन व डॉक्टरांच्या व्यावसायिक बाबीत हस्तक्षेप’ करण्यासारखे आहे हा आरोप (की कांगावा?) मुंबई उच्च न्यायालयाने साङ्ग ङ्गेटाळून लावला आहे. एवढेच नव्हे तर, असोसिएशनचे आव्हान कायदेशीर बाबीवर कुठेच टिकू शकत नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच सोनोग्रॉङ्गी करण्यासाठी येणार्या गर्भवती महिलांच्या प्रगतीचा ‘एङ्ग’ अर्जही यापुढे महिन्याऐवजी आता आठवड्यात ऑनलाईनद्वारे पाठविण्याची सूचना केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २००१ मध्ये एक हजार मुलांमागे ङ्गक्त ८३९ मुली एवढे कमी प्रमाण होते. म्हणून गेल्या वर्षी या जिल्ह्यात ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ चा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबविण्यात आला जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘सायलेंट ऑब्झर्व्हर’ ची काटेकोर अंमलबजावणी होईल यात जातीने लक्ष घातले. पुण्याच्या ङ्ग‘मॅग्नम ओपस’ या कंपनीने विकसित केलेले ‘सायलेंट आब्झर्व्हर’ हे सॉफ्टवेअर जिल्ह्यातील २००हून अधिक सोनोग्राङ्गी सेंटर्समध्ये बसवण्यात आले. ते केबल्सद्वारे ध्वनी यंत्रास जोडण्यात आले. त्यामुळे मिळणारी चित्रे व माहिती यांच्यावर सतत देखरेख ठेवण्यात आली. परिणामी, एप्रिल-मे २०११ मध्ये १९५ मुले जन्माला आली तर १९९ मुली ङ्गजन्मास आल्या असे प्रथमच घडले, असे राज्यात सर्वत्र घडू शकेल. त्यासाठी भावी सामाजिक स्वास्थाच्या थोडाही विचार न करणार्या कोत्या स्वार्थी विचाराच्या डॉक्टरांचा विरोध मोडून काढावा लागेल. या सामाजिक जाणीवेचे भान वृत्तपत्रांना आहे का? किती मराठी वृत्तपत्रांनी जागर पदयात्रा व उच्च न्यायालयाचा दणका या बातम्यांना प्रसिध्दी दिली? आपल्या सामाजिक जाणीवा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. (प्रस्तुत स्तंभलेखक हे ‘दै. देशदूत’ च्या खान्देश आवृत्तीचे माजी संपादक आहेत
No comments:
Post a Comment