Total Pageviews

Friday, 28 June 2013

Army JAWANS our real HEROES


I would also like to add the IAF, ITBP and  NDRF pers to the lists of heroes. Zeroes we all know.......................the slimy babus and the political monsters

UTTARAKHAND & INDIAN ARMY

हजारोंचे रक्षणकर्ते भारतीय लष्कर
उत्तराखंडामध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपानंतर सर्वत्र हाहाकार उडाला असताना बचाव कार्याचे श्रेय लाटण्यावरून राजकीय नेत्यांची स्पर्धा सुरु झाली आहे. महाप्रलयानंतर काँग्रेस सरकारने वृत्तपत्रांतून जाहिरातींची मालिका सुरू केली असताना आज (गुरुवारी) काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनी तर मर्यादाच ओलांडली.डेहराडून विमानतळावर तेलगू देसमचे खासदार रमेश राठोड काँग्रेसचे खासदार व्ही हणुमंत राव समोरासमोर भिडले आणि आपणच या यात्रेकरूंना आंध्रप्रदेशमध्ये पोचवणार असा पवित्रा त्यांनी घेतला. वाद आणखीच चिघळल्यानंतर तर दोन्ही खासदारांमध्ये अक्षरश: 'सिनेस्टाईल झटापटही झाली.
उत्तराखंडातील जलप्रलयात सापडलेल्या आणि त्यातून बचावलेल्या पर्यटक आणि भाविकांनी सांगितलेले अनुभव ऐकल्यानंतर एक गोष्ट चांगलीच लक्षात येते की, तिथल्या राज्य सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणेतील कर्मचारी बचाव आणि मदतकार्यात सहभागी होत नव्हते.अर्थात ते साहजिक आहे कारण ते शेवटी सरकारी नोकर असतात. आलेली आपत्ती अभूतपूर्व आहे. या पार्श्वभूमीवर लष्कराचे जवान फार हिरीरीने बचावकार्यात सहभागी झाले आहेत. त्यानंतर गती आली. परंतु त्यांना दोनच दिवस काम करता आले. दोन दिवसांनी पुन्हा मुसळधार पावसाने मदतकार्यात व्यत्यय आणले. पुन्हा नव्याने पाऊस सुरू झाला. आभाळ सतत भरून आले. ढगांमुळे आसपासचा प्रदेश दिसेनासा झाला. पावसामुळे पुन्हा नद्या भरून वाहायला लागल्या आणि मदतकार्य पुन्हा थांबले. उत्तराखंडचा प्रदेश हा डोंगर आणि -यांनी व्यापलेला असल्यामुळे तिथे बचाव आणि मदतकार्यासाठी फक्त आपत्ती काळात मदत करण्याचा अनुभव असलेल्या लष्कराला पाचारण करण्यात आले होते. त्यातच भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि आयटीबीपी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जोखमीचे काम पार पाडत आहेत.
हवाई दलाचे मदतकार्यगौरीकुंड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना वाचविण्यासाठी जाताना हेलिकॉप्टर कोसळले आणि जवानांनाच जीव गमवावा लागला. त्याच्या आदल्याच दिवशी हवामान खराब असूनही हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनी 330 उड्डाणे करून साडेचार हजार यात्रेकरूंचे जीव वाचविले. जगातील सर्वांत मोठी बचाव मोहीम ठरलेल्या या प्रयत्नांत आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना वाचविण्यात यश आले आहे. हवाई दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरांच्या साहाय्याने लोकांना दुर्गम भागातून सुरक्षित ठिकाणी आणण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना त्यांच्या स्वत:च्या जीवाला धोका आहे.हेलिकॉप्टरला गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावर मंगळवारी अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २० जवान होते. त्यात हवाई दलाचे पाच, सहा आयटीबीपी आणि उर्वरित नऊ जण राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे जवान होते. बुधवारी हवाई दलप्रमुख ब्राऊन यांनी उत्तराखंडला भेट दिली आणि तेथील जवानांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले. जोपर्यंत मदतकार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत हवाई दल मागे हटणार नाही, मदतकार्य थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हेलिकॉप्टरच्या अपघातात महाराष्ट्रातील दोघे जवान शहीद झाले. त्यापैकी एक जळगावचा तर दुसरा धुळय़ाचा जवान आहे. .
लष्कराचे मदतकार्यउत्तराखंडमधील निसर्गाच्या प्रकोपाने उद्‌ध्वस्त झालेले जनजीवन पुन्हा सावरण्यासाठी दीर्घकाळ झुंजावे लागणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे; परंतु पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्याच्या मोहिमेत लष्कराने जी शर्थ केली, जे अपार परिश्रम घेतले त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद घ्यावी लागेल. मुळात कुठल्याही युद्धात सैन्याच्या सर्वच क्षमतांचा कस लागत असतो; पण परकी शत्रूशी युद्ध असेल, तर लक्ष्य तरी सुस्पष्ट असते. इथे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर, अनेक प्रकारांनी लढावे लागत आहे. खराब हवामानाशी, प्रतिकूल परिस्थितीशी, नकारात्मक आणि पराभूत मनोवृत्तीशी आणि वेळेशीदेखील ही लढाई आहे. जवानांनी या सगळ्या परिस्थितीशी टक्कर देत हजारो यात्रेकरूंना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढले. हे काम किती कठीण आहे, याची जाणीव बचावकार्यात गुंतलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेने करून दिली आहे.
लष्कराच्या एका अधिका-याने एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना असे म्हटले की, कोणतेही मदतकार्य युद्धापेक्षा कठीण असते. युद्धात शत्रूला टिपणे त्याचा भूप्रदेश ताब्यात घेणे अशी उद्दिष्टे असतात, पण मदतकार्यादरम्यान प्रत्येक जवानाला आपद्ग्रस्तांमध्ये प्रथम आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. या प्रत्येकाचा जीव वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आपल्या लष्कराने केदारनाथमध्ये प्रलय आल्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण तयारी करून थेट घटनास्थळी सर्वशक्तीनिशी स्वत:ला झोकून दिले. या जवानांनी अक्षरश: तासा-दोन तासांत आपत्कालीन पूल बांधले.दोरीच्या साहाय्याने शेकडोंचे प्राण वाचवले. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून कोसळलेल्या दरडींची हजारो टन माती हातावेगळी केली. खराब हवामान असतानाही हजारो पर्यटकांना डेहराडूनमध्ये आणण्यासाठी विमानांच्या फे-या मारल्या. दरडीमध्ये, मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करून त्यांना पाठीवरून सुरक्षित स्थळी नेले. लष्कराच्या दृष्टीने या आपत्तीत सापडलेला प्रत्येक जण प्रथम भारतीय होता. लष्कराच्या साहसाचे, त्यांच्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक केले पाहिजे. आपल्या लष्कराने केदारनाथमध्ये प्रलय आल्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण तयारी करून थेट घटनास्थळी सर्वशक्तीनिशी स्वत:ला झोकून दिले. या जवानांनी अक्षरश: तासा-दोन तासांत आपत्कालीन पूल बांधले.दरडीमध्ये, मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्यांची सुटका करून त्यांना पाठीवरून सुरक्षित स्थळी नेले.लष्कराच्या एका तुकडीला बदासूमध्ये हेलिकॉप्टरने उतरवण्यात आले. हरसिलमध्ये पूल उभारून जवानांनी 600 नागरिकांना बाहेर काढले.हरसिल गंगोत्रीत एक स्वतंत्र रस्ता तयार करून 100 नागरिकांना वाचवले गेले.
भाविकांना सुखरूप बाहेर काढण्याची मोहीम ज्या दिवशी प्रारंभ झाली, त्याच दिवशी लेफ्टनंट जनरल अनिल चैत म्हणाले होते, ‘हम भगवान नही है| देशके सेवक है, जनताके सेवक है | हमारे जवान हमारा कर्तव्य पूरी ताकद और निष्ठा के साथ निभा रहे है | अनिल चैत यांचे म्हणणे खरेच आहे. ते भगवान नाहीत, पण देवदूत जरूर होते. अगदी देवासारखे ते धावून आले होते. अगदी अंगावर काटा यावा, अशी ती शोध आणि बचाव मोहीम होती. संपूर्ण जग हे दृश्य बघत होते. आज बचावलेला प्रत्येक भाविक केवळ लष्कर आणि वायुदलाला मनापासून धन्यवाद देत आहे. त्याच वेळी राज्य शासनाने कवडीची मदत केली नाही, अशा शब्दात आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आहे. हम फौजके उपकार जिंदगीभर नही भूल सकते | केवल उनकी वजहसेही हमे पुनर्जन्म मिला है, हे भाविकांचे उद्गार आमच्या गौरवशाली लष्कराला हिमालयाच्या उंचीवर नेण्यासाठी पुरेसे आहेत. उत्तराखंडमध्ये मदत कार्य सुरू असतानाच, काश्मिरमध्येही पाक अतिरेक्यांच्या हल्ल्यात आमचे आठ जवान शहीद झाले. देशासाठी प्राणपणाने लढता लढता प्राणाचे बलिदान देण्याची महान परंपरा भारतीय सैन्याने जोपासली आहे. अगदी १९४८ पासून तर कारगिल युद्धापर्यंतच्या कामगिरीचा अभ्यास केला तर त्याची प्रचिती येईल. त्याचेच दर्शन उत्तराखंडमध्ये आमच्या जवानांनी घडविले आहे.
अजूनही अनेक पर्यटकांपर्यंत ही मदत पोहोचू शकलेली नाही. आपली वाटशोधत त्यांचे मार्गक्रमण सुरू असणार. त्यांना शोधण्यासाठी लष्कर आता या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करणार आहे. उत्तराखंडमधून आपल्या गावी सुरक्षितपणे परतणारा प्रत्येक पर्यटक जवानांच्या धैर्याला, मदतीला सलाम करतो आहे ते यामुळेच.आताही अत्यंत खराब हवामानात अत्यंत चपळ हालचाली करून जवान मदतकार्याला वेग आणत आहेत. त्यांच्याच जोरावर आतापर्यंत हजारो जणांचे प्राण वाचले आहेत. युद्ध असो की, नैसर्गिक आपत्ती यातून मार्ग काढण्यासाठी लष्करच पुढाकार घेते. उत्तराखंडातील स्थानिकही पर्यटक आणि भाविकांना आपल्या परीने मदत करत आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आज राष्ट्रीय आपत्तीतही हिरीरीने मदत करत आहेत. या कार्याबद्दल प्रत्येकालाच त्यांचा अभिमान आहे.आपल्या जवानांचे कौतुक यासाठी करायला हवे की, अत्यंत दुर्गम भागात वेळेवर पोहोचून या जवानांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले तसेच येथील परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणली.आपल्या जवानांनी हा हिंदू, हा मुस्लिम, हा मराठी, हा पंजाबी असा भेदभाव केला नाही. हजारो वृद्ध पुरुष-स्त्रिया, लहान मुले, अपंग, गरीब, श्रीमंत यांचे प्राण वाचवताना या जवानांनी स्वत:च्या जिवाची पर्वा केली नाही. या जवानांच्या जिगरबाज दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे वाचले आहेत.
गोरखा रायफल्सचे मेजर महेश कर्की लष्करी गणवेश अंगावर असलेला अधिकारी प्राणाची बाजी लावून नागरिकांची मदत करतोच; परंतु देशसेवा अंगी भिनलेल्या लष्करातील अधिकाऱ्याची केवळ गणवेश हीच ओळख नसते, हे उत्तराखंडमध्ये कुटूंबीयांसमवेत सुट्टीवर आलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सिद्ध केले. गोरखा रायफल्सचे मेजर महेश कर्की हे या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी डेहराडून येथून बद्रीनाथ येथे आपली दोन मुले, पत्नी सासुबाईंसमवेत जात होते. जोशीमठ येथे आल्यानंतर तेथील रस्ता उद्‌ध्वस्त झाल्याचे त्यांना आढळले. अडकलेल्या कर्की कुटूंबीयांना तेथून परत फिरण्यासाठी सांगण्यात आले. अशा वेळी आपल्या कुटूंबीयांसह सुरक्षित ठिकाणी परतणे वा उद्‌ध्वस्त झालेल्या रस्त्याच्या पलीकडे अडकलेल्या लोकांची सुटका करणे, असे दोन पर्याय कर्की यांच्यापुढे होते.
अशा वेळी देशसेवेचे कंकण बांधलेले कर्की आपल्या पत्नीस कुटूंबासह थांबण्यास सांगून रस्त्याच्या पलीकडे अडकलेल्या लोकांच्या मदतीस धावले. मुसळधार पावसात रस्ता पूर्णत: उद्‌ध्वस्त झाला असताना कर्की यांनी आपली गाडी त्याच्यावरून चालवत पलीकडे अडकलेल्या 25 लोकांची सुटका केली. एकावेळी चार लोकांना गाडीमध्ये बसवून जवळजवळ नसलेल्या रस्त्यावरून गाडी चालवित येथे अडकलेल्या सर्व लोकांना कर्की यांनी वाचविले. या सर्व लोकांना कर्की यांनी गोविंदमठ येथील सुरक्षित जागी सोडले. "या लोकांना मदत करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही,‘‘ असे कर्की यांनी सांगितले
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही लष्कराचा निर्धार जराही मंदावलेला नाही. जवानांच्या कर्तृत्वाचे, धैर्याचे असे अनेक प्रसंग आता समोर येत आहेत. तवाघाट भागात एक गर्भवती महिला अडलेली आहे, हे कळताच पंधरा किलोमीटर पायी चालत जाऊन कॅप्टन फेबा सूजैन या डॉक्‍टर महिलेने तिची सुखरूप प्रसूती केली. बाळ-बाळंतिणीला सुखरूप आपल्या गावाकडेही पोचविले. या शौर्याला अन्‌ धैर्याला तोड नाही. लष्कराच्या शौर्यकथा प्रेरक आहेतच; पण त्यांतून प्रकटलेली शिस्त आणि इतर गुण समाजात झिरपणे हे जास्त महत्त्वाचे.
उत्तराखंड मदतकार्य- भारतीय लष्कराने सुरु केली वेबसाईटउत्तराखंडमध्ये युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे.

नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना वाचवणा-या आणि अद्यापही युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे. http://suryahopes.in/ या वेबसाईटवर भारतीय लष्कराच्या मार्फत सुरु असलेल्या मदत कार्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वेळोवेळी अपडेट केली जात आहे. त्याच बरोबर भारतीय लष्कराकडून ज्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आहे त्यांची नावे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या वेबसाईटवरील find your loved one या विभागात उत्तराखंडमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल. महत्त्वाचे फोन नंबर, विभागवार सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे, जखमी व्यक्तींची नावे आदी तपशील या वेबसाईटवर देण्यात आला आहे.उत्तराखंडात आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र मंत्रालय

उत्तराखंड राज्यातील केदारनाथ परिसराला नैसर्गिक आपत्तीचा इतका भीषण तडाखा बसला आहे की येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनेक दिवस नाहीत तर अनेक महिने लागू शकतात.उत्तराखंडात आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे; त्या खात्याने नेमकी कोणती काळजी घेतली, हा प्रश्‍न विचारला पाहिजे. आता सगळ्या जगाचे आपत्तीकडे लक्ष वेधले गेले आहे म्हटल्यावर राजकीय नेत्यांचे "पर्यटन सुरू झाले आहे. असल्या कोत्या मनोवृत्तीतून बाहेर पडल्याशिवाय मोठ्या संकटांना तोंड देण्याची तयारी समाज आणि देश म्हणून करता येणार नाही. अशा स्वरूपाची ही मोहीम आणखी काही काळ अशीच सुरू राहील; पण प्रश्‍न आहे तो या दुर्घटनेने जे धडे दिले त्यांच्यापासून शिकण्याचा. मुळात दुर्घटना घडूच नयेत, घडल्या तर त्यातील हानीची तीव्रता कमी व्हावी, यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात.विज्ञान-तंत्रज्ञानाने नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळण्याची शक्‍यता पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे; पण प्रत्येक ठिकाणचे "आपत्ती निवारण विभाग आपले काम आपत्तीशी संबंधित आहे, असे समजून एरवी बहुधा स्वस्थ बसतात. जवानांच्या शौर्याचे, शिस्तीचे उत्तराखंडात सध्या जे दर्शन होत आहे त्याचा काही अंश तरी समाजाच्या नेहमीच्या व्यवहारात आपण का नाही आणू शकत? आपत्ती निवारणासाठी आपली भिस्त मोठ्या प्रमाणावर लष्करावर दिसते. खरे म्हणजे पोलिस, प्रशासन, नागरी सुरक्षा दले, विविध स्वयंसेवी संस्था यांच्यातही आपत्तींना तोंड देण्याच्या दृष्टीने अद्ययावत प्रशिक्षण देणे अत्यावश्‍यक आहे.