Total Pageviews

Wednesday 30 January 2019

J&K politics : Total silence on award of Ashoka Chakra for L/Nk Nazir Ahmad Wani.



Kashmir produced 2 terrorists, both Wanis - One Burhan Wani, who died a dog’s death, there was news in the Army circle that when he was surrounded he wet his pants before he got the burst of bullets in him.

Another Wani became a terrorist, went to Pakistan, understood the game plan of our enemy, surrendered, joined the Indian Army, fought the same terrorists, won 2 Sena Medals and still did not rest, got martyred fighting for his Nation and earned the highest gallantry peacetime award, Ashoka Chakra; but, strangely, Kashmiris are not celebrating this highest award for their son.

Is the loyalty of Kashmiri politicians, general public suspect? Or they are too scared to speak due to fear of terrorists.

Why Mehbooba, Abdullahs and host of others not speaking ? 

L/Naik Nazir Ahmad Wani has found his pride place in the History of the Nation as the true son of India.

Kashmiri politicians shed tears for Burhan Wani but lack the spunk to celebrate the highest gallantry decoration of L/NK Wani.

I salute this great son of India, I am hopeful lots of youngsters in Kasmhir will follow his footsteps.

जॉर्ज गेले. आणीबाणी विरोधी आंदोलनाचे एक धगधगते पर्व अस्तंगत झाले.

जॉर्ज, बडोदा डायनामाईट, सुरेश वैद्य आणि दै. देशदूत...
जॉर्ज गेले. आणीबाणी विरोधी आंदोलनाचे एक धगधगते पर्व अस्तंगत झाले. आणीबाणीविरोधात भूमीगत राहून प्रदीर्घकाळ त्यांनी आपल्या साथींसह लढा सुरु ठेवला होता. 'राइट टू रिबेल' संकल्पनेनुसार बडोदा डायनामाईट योजनेची आखणी करीत आणीबाणीला विरोध म्हणून प्रतीकात्मक स्फोट घडविण्याची त्यांची योजना आणि त्यावेळचा हातातील साखळदंड क्रांतीआभूषणासमान मानणारा त्यांचा फोटो अजरामर झाला आहे. या स्फोट कटात जे साथीदार पकडले गेले व ज्यांनी तिहार तुरुंगात त्यांचे समवेत कारावास भोगला त्या यादीवर आपण बारकाईने नजर टाका. नाशिकचे श्री.सुरेश वैद्य हे नाव त्या यादीत दिसेल. 
नाशिकच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना विभागात वरिष्ठ लिपिक पदावर ते कार्यरत होते. मधली होळी, नाशिक परिसरात भाडयाच्या घरात संसार. समाजवादी कार्यकर्ते असल्याने जॉर्ज फर्नांडिस यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. बडोदा डायनामाइट प्रकरणात जॉर्ज यांचेबरोबर तेही ओढले गेले. अटक, कारावास, सेवेतून बडतर्फी, आर्थिक ओढाताण नंतर दै. देशदूत मध्ये उपसंपादकाची नोकरी असा श्री. सुरेश वैद्य यांचा जीवनप्रवास. दै. देशदूतमध्ये मी त्यांचेबरोबर रात्रपाळीत ३ वर्षे काम केले. रात्री पान १ चे काम आटोपल्यावर ते, सुरेश भटेवरा (महाराष्ट्र टाईम्स), गुरुमित बग्गा, मधुसूदन धुमाळ, आदमभाई, बर्डे, बद्रुद्दिन शेख अशा साऱ्यांचा गप्पांचा फड रंगायचा. जॉर्ज यांचा विषय निघाल्यावर सुरेश वैद्य तिहार तुरुंगातील त्यांचे 
समवेतच्‍या आठवणींचा उजाळा द्यायचे. जॉर्ज यांनी तुरुंगात एक मांजर पाळले होते. सकाळी सर्व राजबंद्यांना दूध वाटप व्हायचे त्यावेळी हे गुबगुबीत मांजर बरोबर जॉर्ज यांच्या मांडीवर येऊन बसायचे. अगोदर जॉर्ज यांचेकडून थोपटून लाड करुन घेतल्यानंतरच ते जॉर्ज यांनी दिलेले दूध प्यायचे. दिवसभर भटकंती करुन बरोबर संध्याकाळच्या जेवणाप्रसंगी हे मांजर जॉर्ज यांच्यासोबत भोजनबैठकीला ही हजर असायचे !  आणीबाणी विरोधातील हा क्रांतीयोध्दा आणि मुंबई बंदचा अनभिषिक्त सम्राट एखादा दिवस मांजर चुकून आलं नाही तर मात्र अस्वस्थ व्हायचा... आणीबाणी उठल्यावर जॉर्जसह कटातील सर्वआरोपी यांचेवरील खटला मागे घेण्यात आला. सर्वांना मुक्त करण्यात आले. त्यावेळी नाशिकच्या वेशीवर श्री. सुरेश वैद्य यांचे जोरदार स्वागत करण्यात आले... कटातील सर्व आरोपींचं वकिलपत्र घेऊन तो खटला कोणतीही फी न घेता लढविणाऱ्या श्रीमती सुषमा स्वराज आणि त्यांच्या वकील पतीराजांबद्दलही श्री.सुरेश वैद्य आदराने भरभरुन बोलायचे...
आणीबाणीनंतरच्या काँग्रेसपराभवानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. गृहमंत्रीपदी चौधरी चरणसिंग. न्यायालयाने मुक्त करुनही केंद्रीय गृह विभागाने आवश्यक ती कार्यवाही न केल्याने श्री. सुरेश वैद्य पोलीससेवेत पुन्हा परतू शकले नाहीत... ज्या विचारांचं सरकार सत्तेवर यावं यासाठी हाडाचीकाडं  करणाऱ्यांना त्या विचारांचं सरकार सत्तेवर आल्यावर न्याय मिळतोच असं नाही !

टुटेंगे भाई टुटेंगे
जेल के ताले टुटेंगे...
छुटेंगे भाई छुटेंगे
राजबंदी छुटेंगे...
ही त्यावेळची, मी वयवर्ष ५ असतांनाची घोषणा माझ्या आजही स्मरणात आहे कारण आईचा त्यावेळच्या सभा, मोर्चांमधील सहभाग.  श्री. कुमार केतकर, म.टा. चे संपादक असतांना त्यांनी 'आणीबाणीची पंचविशी-ढोल, ताशे, नगारे' असा लेख लिहून आणीबाणी अपरिहार्य होती असा आपला आवडता सिध्दांत मांडला होता. त्याचे खंडन करणारे पत्र दै. देशदूत मधून मी जरा त्वेषानेच लिहित म.टा.ला पाठविले. त्यांनी ते जसेच्या तसे छापले.  हा बहुधा या वातावरणाचाच प्रभाव.
नाशिक आणि जॉर्ज यांचं नातं फार जवळचं होत. आणीबाणीनंतर १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत श्री. बापू उपाध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. बापूंनाच तिकिट दिले जावे यासाठी जॉर्ज यांनी आपले पूर्ण वजन वापरले होते असे तेव्हा पत्रकारिकेत सक्रिय असलेले श्री. मधुसूदन धुमाळ यांनी मला जॉर्ज यांच्या आठवणी जागवतांना सांगितले. ज्येष्‍ठ पत्रकार श्री. माधवराव लिमये, कुसुमताई पटवर्धन, बापू व कुसुमताई उपाध्ये, मधुकर तोष्णीवाल, शांताराम चव्हाण (हिंद मजदूर किसान पंचायत), ॲड. दत्ताजी कृष्णाजी कातकाडे, बा.य.परीट गुरुजी अशा नाशिकमधील अनेकांशी जॉर्ज यांचा थेट संपर्क होता. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांना नाशिक जिल्ह्याने खरी ताकद दिली. पिंपळगाव बसवंत जवळ रेल्वेरुळावर ठिय्या मांडण्यात आला होता. ऊस आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन शेतकरी संघटनेने सुरु केले होते. अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री होते. रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. जे.एफ.रिबेरो रेल्वेचे पोलीस महानिरीक्षक होते. आंदोलन फार उग्र होते. रुळावरुन आंदोलक हटत नव्हते. मी तीन वेळा रेल्वे रुळ मोकळा करण्याचे आवाहन करणारी घोषणा करतो... जर ती ऐकूनही आपण रेल्वेरुळ मोकळा केला नाही तर मात्र मला गोळीबार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी हलले नाहीत. अखेर गोळीबार झाला. जॉर्ज तेव्हा अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते. ही घटना कळताच ते विमानाने  मुंबईत येत दुसऱ्यादिवशी घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी अटकाव करताच निफाड जवळ एका पारावर त्यांनी जाहीर सभा घेतलीच ! आंदोलनाला समर्थन देत शेतकऱ्यांवर गोळया चालविणारे हे सरकार म्हणजे ब्रिटिशांचा नवा अवतार आहे का?  असा सवाल उपस्थित केल्याचे श्री. मधुसूदन धुमाळ सांगतात. 
दोन वर्षापूर्वी सुरेश वैद्य यांचे निधन झाल्याचे वृत्त कानी आले. आज जॉर्ज गेले. आपण गेलात तरी "राइट टू रिबेल" ची आपली प्रेरणागाथा येणाऱ्या पिढयांना दुसऱ्या स्वातंत्र्यलढयाची म्हणजेच आणीबाणी विरोधी आंदोलनाची आठवण देत राहिल.
RIP जॉर्ज... जॉर्ज फर्नांडिस यांना विनम्र श्रध्दांजली...

निलेश मदाने
दिनांक २९ जानेवारी, २०१९

मराठा लाइट इन्फंट्री : जंगी पलटन -कर्नल सारंग थत्ते (नि) 250 व्या वर्षाचा उत्सव साजरा करीत आहे



वादळापरी आम्ही पुढेच चालतो,
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो 
मुगल आणि इंग्रजांच्या विरुद्ध ऐतिहासिक मोहिमेत मराठा सैन्यपथकांनी उत्कृष्टपणे आपली कामगिरी रणांगणात दाखविली होती. मराठ्यांच्या सैन्यासह मराठा नौदल शक्‍ती, पायदळ  असलेल्या मराठ्यांच्या सैन्याने तीन शतकांपासून भारतातील सैन्य दृश्यावर प्रभुत्व ठेवले होते. भारतीय सैन्याच्या प्रसिद्ध रेजिमेंटपैकी मराठा लाइट इन्फंट्री सर्वात जुनी आहे. 1768 मध्ये दुसरी बटालियन बॉम्बे शिपायाच्या रूपात उभारण्यात आलेली मराठा लाइट इन्फंट्रीची ही पहिली बटालियन आहे - 103 मराठा लाइट इन्फंट्री. पहिली बटालियन मराठा लाइट इन्फंट्री, ज्याला नंतर जंगी पलटनअसे म्हटले गेले. 4 फेब्रुवारी हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा स्थापना दिवस आहे. या ऐतिहासिक  दिवशी 1670 मध्ये छत्रपती शिवरायांनी प्रसिद्ध कोंडाणा किल्ला जिंकला, ज्याला आपण सिंहगड नावाने ओळखतो. प्रथम अफगाण युद्धात ब्रिटिशांनी भारतातील वेगवान पाऊल घेऊन युद्धात चालणारे - मराठा रेजिमेंटच्या नावात लाइट इन्फंट्री असे नावही जोडले व घोषित केले. ही रेजिमेंट रात्रीच्या लढाईतही चांगली कर्तबगारी करण्यात प्रसिद्ध होती. 
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटला शौर्य, उत्कंठा आणि बलिदान यांचा दीर्घ इतिहास आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान रेजिमेंटला 15 युद्ध सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. दुसर्‍या महायुद्धात रेजिमेंटमध्ये वाढ झाली. 6 बटालियन 13 बटालियनपर्यंत वाढले. नायक यशवंत घाडगे आणि शिपाई नामदेव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस जिंकण्याचा सर्वोच्च सन्मान आहे. सध्या रेजिमेंटमध्ये 21 नियमित बटालियन, चार राष्ट्रीय रायफल बटालियन आणि दोन प्रादेशिक सेनेची बटालियन आहेत. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटही एकमात्र सेना आहे, ज्यांच्या दोन बटालियनांना 2 आणि 21 पॅरा स्पेशल फोर्स (एसएफ) मध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. विजयी जंगी पलटनने 1768 पासून मराठा लाईट इन्फंट्रीचा मान राखून युनिटने बलिदान आणि शौर्याचा इतिहास लिहिला आहे. युरोप आणि आशियातील दोन्ही विश्‍वयुद्धात आणि आपल्या देशात सियाचीनसारख्या जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्रातदेखील देशाचे संरक्षण केले. नेहमीच्या ब्रॅव्हो कंपनीऐवजी यँकी कंपनी असण्याची पलटनची परंपरा आहे. 1944 मध्ये ब्रॅव्हो कंपनीला सातत्याने वाईट नशीब म्हणून तत्कालीन कमांडिंग ऑफिसरने हे नाव यँकी कंपनीत बदलले. एक वर्षानंतर शिपाई नामदेव जाधव यांनी व्हिक्टोरिया क्रॉस कमावला. दुसर्‍या विश्‍वयुद्धाच्या वेळी इटलीत पहिली बटालियन मराठा लाइट इन्फंट्री (जंगी पलटन)ने कमालीच्या शौर्याने लढा दिला. 1971 च्या बांगलादेशाच्या युद्धात हे युनिट लेफ्टनंट जनरल एस. एस. ब्रार, वीरचक्र विजेते यांच्या नेतृत्वाखाली ढाकामध्ये प्रवेश करणार्‍या सैन्याच्या पहिल्या बॅचचा भाग होता.
29 जानेवारी ते 31 जानेवारी या काळात औंध मिलिटरी स्टेशन, पुणे वरील शिवनेरी ब्रिगेड येथे पहिली बटालियन मराठा लाइट इन्फंट्री 250 व्या वर्षाचा उत्सव साजरा करीत आहे. 3 हजारहून अधिक सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांचे कुटुंब या कार्यक्रमात सहभागी होतील. मराठा लाइट इन्फंट्रीने 6 लेफ्टनंट जनरल दिले आहेत. रेजिमेंटची 10 मशिनीकृत इन्फंट्री रेजिमेंटस्, दोन तोफखाना रेजिमेंट आणि आर्मीमधील वायुरक्षा रेजिमेंटशी संलग्‍न आहे. या व्यतिरिक्‍त रेजिमेंटने भारतीय नौदल जहाज (आयएनएस) मुंबई, 20 व्या स्क्‍वाड्रन वायुसेना (सुखोई) आणि दमण आणि दीव येथे भारतीय कोस्ट गार्ड एअर स्टेशनसह आंतरसेवा जोडणी केली आहे. या रेजिमेंटची युद्धातील आरोळी आहे, ‘बोल, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!


Meet Captain Pradeep Shoury Arya, India’s first Indian Revenue Service (IRS) officer and Additional Commissioner of Income-Tax, Mumbai (Investigation Wing) who has been awarded the Shaurya Chakra for his efforts in fighting the enemy at the Line of Control (LoC).

On January 26, 2018, India’s third highest peacetime gallantry award — the Shaurya Chakra — was awarded to nine people for their immense valour in combating terrorists. What few Indians know is that among the nine winners of this prestigious honour was gutsy IRS officer who thwarted an infiltration bid in Kashmir.

Meet Captain Pradeep Shoury Arya, India’s first Indian Revenue Service (IRS) officer and Additional Commissioner of Income-Tax, Mumbai (Investigation Wing) who has been awarded the Shaurya Chakra for his efforts in fighting the enemy at the Line of Control (LoC).
A 2004 batch IRS officer, Pradeep’s journey from his desk in Mumbai to defending the Indian border in Kashmir has been singularly noteworthy.

Compelled by long-abiding love for the uniform, he decided to join the Territorial Army, India’s second line of defence after its regular Army,

The Territorial Army (TA) is basically an organisation of volunteers who receive military training in order to be mobilised for the country’s defence in case of an emergency. Members of the TA — all able-bodied and gainfully employed Indian citizens — can join are required to serve the Indian Army for two months each year.

In 2008, Pradeep secured a No-Objection Certificate (NoC) from the IT department and gave a written exam conducted by the the Service Selection Board for joining the Territorial Army. Passing with flying colours, he then cleared the medical and completed a pre-commission training at the Maharashtra’s Deolali cantonment before joining the Indian Military Academy..

After the mandatory three months training, Pradeep was commissioned into the 106 Infantry Battalion Territorial Army (PARA) — also known as the Bengaluru Terriers— that is attached with the 4th Battalion of the Parachute Regiment (Special Forces).

In May 2017, Pradeep’s unit was deployed along the Line of Control (LoC). Appointed the mission leader, he and his team were given the task of creating an effective intelligence and defence mechanism that could be used against cross-border infiltration in Baramula district of Jammu and Kashmir.

On the night of May 28, Pradeep was informed about a probable infiltration bid by the Lashkar-e-Taiba (LeT) terrorists around Chabuk region of the 19 Infantry Division area.

Knowing the importance of preventing this from happening, the IRS officer immediately organised an ambush party and stealthily moved ahead to intercept the infiltrators.

According to an official stattment issued by the Indian Army,

At approximately 2230 hours on 28 May 2017, Captain Arya detected movement of four to six terrorists moving 200 meters ahead in the nallah. Fearing the terrorists might slip away using the moonless night and dense jungle foliage, the officer showing pre-eminent valour moved ahead with his buddy in the mined area to intercept them and immediately initiated a firefight.

Displaying intrepidity at the risk of his life and cold nerves, he closed in and sat over a fallen tree overlooking the terrorists. Captain Arya showed heroic initiative and inspirational combat leadership and ran ahead from his concealed position, unmindful of his own safety and came directly in contact with the terrorists and eliminated them.”

For his dogged determination and courage in the face of the enemy, Pradeep was awarded the Shaurya Chakra, India’s third-highest peacetime gallantry award.
Back in Mumbai in his bureaucratic avatar, Pradeep is happy about getting the opportunity to pursue both civilian and military life. The father of two daughters, the consummate multitasker holds a Masters degree in Sociology, a Masters in Business Administration, a Masters in Law, a Masters in Taxation, and a Phd (Doctorate ) in Sociology and a Commercial Pilot Licence (CPL)!

Asked about the biggest challenge he faces while straddling both these worlds, Pradeep tells India Today,

“Every time I go there, I have to tell myself that I am not an IRS officer. If you go there with your status and ego, than the men will never respect you. They respect a man in command who’ll lead them…They respect a man who can give his life for them and in return they would give their lives for him.”

image.png
A proactive IT officer, Pradeep also tries to utilize his experiences in both the fields for the benefit of the country. For instance, he has used his tax investigation knowledge to prepare a special report on terror funding and money laundering activities of extremists operating in Kashmir valley, an effort that has earned himself commendation from the Chief of the Army Staff (COAS)..

Interestingly, awards and recognition are not new to Pradeep who was adjudged the best trainee officer during his time at the Indian Military Academy. He has also has won the prestigious President’s Award for “Best Electoral Practices” for effectively controlling large quantities of cash during polls in Nagaland and Karnataka
 Mail on Android

Monday 28 January 2019

*If I do not share this👇🏻 post, I will be ashamed to call myself an Indian 🇮🇳* *A SOLDIER’S FATHER**By : WING COMDR VENKI IYER*-





~~ The helicopter appeared over the late morning horizon. We were to receive Mr Lachhman Singh Rathore who was visiting our Flight Unit to perform the last rites of his son, Flying Officer Vikram Singh.

~~ Only the day before, I had sent the telegram, “Deeply regret to inform that your son Flying Officer Vikram Singh lost his life in a flying accident early this morning. Death was instantaneous.” It was the first time for me- to meet and manage the bereaved next of kin, in this case the Father of the brave officer.

~~ While most of the desolate family members insist on seeing the body, many a time there isn’t a body to show !! Flying Officer Vikram Singh’s remains were only a few kilos –scrapped from what was left in the cockpit. We had to weigh the wooden coffin with wood and earth.

~~The pilot brought the helicopter to a perfect touchdown. Soon Mr Lachhman Singh Rathor was helped down the ladder.A small and frail man he was, maybe of 80 years, clad in an immaculate dhoti.

~~As I approached him, he asked in a quiet and dignified whisper, “Are you Venki, the Flight Commander?” “Yes Sir.” “Vikram had spoken to me about you. I’d like to speak to you alone for a minute.”

~~ We walked to the edge of the concrete apron. ‘I have lost a son, and you have lost a friend. I’m sure that you have taken great care in arranging the funeral. Please tell me when and where you want my presence and what you want me to do. I’ll be there for everything. Later, I would like to meet Vikram’s friends, see his room and, if it is permitted, visit his work place. I then would like to return home tomorrow morning.”

~~A commander couldn’t have given me clearer instructions.

~~The funeral, with full military honours, was concluded by late afternoon. After the final echoes of the ‘Last Post’ faded away, Lachhman Singh spent the evening talking to the Squadron Pilots. Vikram’s roommate took him to see Vikram’s room. Lachhman Singh desired to spend the night in his son’s room instead of the guest house we had reserved for him. Early next morning after a tour of the squadron area, my boss took him to his office.

~~A while later, the staff car took Lachhman Singh to the civil airfield two hours away.

~~As the car disappeared round the corner, I remarked to my Boss, “A brave man he is. Spoke to me like a General when he told me exactly what he expected from us during his stay here. I have never seen a more composed man on such an occasion. I admire him.”

~~ “Yes, Mr Lachhman Singh Rathore is a warrior in his own way. He sired three sons and has laid to rest all three of them.

~~ His first son Captain Ghanshyam Singh of the Gurkha Rifles was killed in Ladakh in 1962 War. His second son, Major Bir Singh, died along the Ichogil Canal in 1965 in an ambush. His youngest, Vikram Singh, who had the courage to join the Air Force, is also gone now.

more to our country’s defence than All of us combined.”

~~Yes, he is indeed a brave Indian ; in fact HE is MORE INDIAN than anyone else - His sacrifice can never ever be repaid by the Country !! He is almost a Martyr himself !!

~~ But our Great Nation does Not know this simple Giant -- India only knows that Super Rich Cricketers need to be conferred BHARAT RATNA while a bunch of actors and actresses need to be conferred PADMA VIBHUSHANs and PADMASHREEs !!

*~~ But what about the ' Losers ' ?? Those who have SIMPLY LOST their EVERYTHING to the Nation. Like this Father of Three Brave Soldiers. ~~*

----------------

( PLEASE DO PASS THIS ON TO EVERY SINGLE POLITICIAN, BUREAUCRAT AND EVERY SINGLE INDIAN CITIZEN WHO DOES NOT HAVE A FAMILY MEMBER IN THE ARMED FORCES -- THAT's THE LEAST WE CAN DO AS OUR ONLY TRIBUTE TO THIS FATHER)

A story to be included in the school syllabus. A brave father of brave sons. How the country could repay its debt to him. We do not know.but We only pray.  Those who  support stone pelters should read this. Print and circulate to all our MPs and JNU scholaR

Sunday 27 January 2019

ड्रॅगनच्या आर्थिक चमत्काराला घरघर.. गेल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी एक बातमी धडकली. लोकसत्ता टीम | January 28


ल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी एक बातमी धडकली. तिने जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा दिला. जागतिक शेअर बाजारही कंप पावला. बातमी होती चीनची. त्या देशाचा आर्थिक विकासदर गेल्या तीन दशकांत नीचांकी पातळीवर गेल्याची. चीनचा विकासदर ६.६ इतका घसरल्याचे तेथील नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (एनबीएस) या सरकारी संस्थेने जाहीर केले असले तरी गेले वर्षभर तेथील औद्योगिक अवकाशात मंदीचे ढग तळ ठोकून आहेत.
एनबीएसचे आयुक्त निंग जिझे यांनी चीनचा विकासदर घसरल्याचे जाहीर करण्यापूर्वी म्हणजे वीसेक दिवस आधीच घसरणीची ही गोष्ट अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने सांगितली होती. त्यासाठी एक व्यक्तिरेखा वापरली होती. तिचं नाव लू विंग. कपडय़ांच्या कारखान्यांचा व्यवस्थापक. मुक्काम यांगचेंग हे औद्योगिक शहर.  वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, गेलेले वर्ष भयानक होते. कपडय़ांची विक्री ३० टक्क्यांनी घसरली. यंदाचेही काही खरे नाही. मी खर्च कमी केला आहे. कारण रोजच्या गरजांसाठी आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.
गेले वर्षभर चिनी माणसाची आर्थिक घडी  विस्कटलेली आहे. नोकऱ्यांची निर्मितीही रोडावली आहे. वेतनवाढीही थंडावल्यात. नोकऱ्यांवरही गदा आली आहे. चीनच्या या ढासळत्या आर्थिक प्रकृतीचे वास्तव चित्र जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील म्हणजे जपानमधील वर्तमानपत्रांनी रेखाटले आहे.
जपानची चीनला होणारी निर्यात ३.८ टक्क्यांनी घसरल्याचे सांगताना.. असाही शिम्बुन या वर्तमानपत्राने चिनी ग्राहकांचा क्रयशक्तिपात सुरू असल्याकडे लक्ष वेधले आहे. गुंतवणूक आणि किरकोळ विक्रीदराची घसरगुंडी सुरू आहे. बेरोजगारीचा दरही वाढत आहे. गुआंगडोंग या निर्यात केंद्रातील काही कारखान्यांनी व्यवसाय नसल्याने चिनी नववर्षांच्या सुट्टीआधीच कामगार कर्मचाऱ्यांना रजा देऊन उत्पादन थांबविले आहे, असे निरीक्षणही या वृत्तपत्राच्या बातमीत नोंदवले आहे. सरकारी आकडय़ांपेक्षाही चीनच्या आर्थिक विकासाची पडझड अधिक असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्याबरोबरच ही परिस्थिती गंभीर होऊन यंदा विकासदर ६.३ टक्क्यांवर घसरण्याची भीतीही या विश्लेषणात व्यक्त केली आहे.
जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बलाढय़ अर्थव्यवस्थेच्या गती- घसरणीची बातमी सांगताना, अमरिकेविरुद्धच्या व्यापारयुद्धामुळे चीनची अशी गत झाल्याची टिप्पणी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलने केली आहे. त्याचबरोबर.. चायना रिस्क्स रियल हार्ड लँडिंग धिस टाइम.. अशा मथळ्याच्या लेखात, चीनची घसरण नोकऱ्यांवर गदा आणू शकते, चलन बाजार आणि जागतिक कर्जावरही परिणाम करू शकते, असा इशारा दिला आहे.
आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी अमेरिकेपेक्षा चीनवर भिस्त ठेवू लागलेल्या पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रानेही जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ लुईस कुईझ यांच्या हवाल्याने चीनमधील मंदी आणखी काही काळ सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे. शिवाय, चीनच्या धोरणकर्त्यांनी विकासदर वाढीच्या योजना आखण्यापेक्षा विकासघसरण थांबवण्याचे लक्ष्य ठेवावे, असा सल्लाही कुईज यांनी दिला आहे. डॉनने ऑनलाइन आवृत्तीत चीन सरकारची ही अधिकृत आकडेवारी एक गुलाबी चित्र रंगवू शकते, असे भाष्य करून आकडय़ांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. त्याच्या पुष्टय़र्थ एएनझेड बँकेचे अर्थतज्ज्ञ रेमंड युंग यांचे, चीनचे देशांतर्गत स्थूल उत्पन्नाचे आकडे त्यांची आर्थिक वाढ मोजण्याचे अचूक परिमाण नाही, हे अवतरण उद्धृत केले आहे.
इज चायनाज फॉर्टी इअर बुम कमिंग टू अ‍ॅन एण्ड? असा प्रश्न इन्व्हेस्टर्स डेलीने  संपादकीयामध्ये उपस्थित केला आहे. चीनच्या आर्थिक चमत्काराची अखेर समीप आली आहे का? असा आकर्षक प्रश्न विचारून नक्कीच तसे दिसते आहे, असे उत्तरही लगेच दिले आहे. चीनच्या निर्यातीत झालेली घट, स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) घसरण यामुळे चीनची अशी अवस्था झाल्याचे निरीक्षणही नोंदवले आहे. शिवाय, चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, हे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे भाकीत केवळ भाकीतच राहील, अशा यापूर्वीच्या टिप्पणीचा दाखलाही त्यात देण्यात आला आहे.
निर्यात हे चीनच्या विकासाच्या गाडीचे इंजिन आहे, असे म्हटले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवरील आयात शुक्ल वाढवून इंजिनाच्या वेगाला वेसण घातली. त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणे निधीने दावोस येथील जागतिक आर्थिक विकास परिषदेत व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर महिनाअखेरीस अमेरिका आणि चीनमध्ये त्या दृष्टीने चर्चा होईल आणि काही मार्ग निघेल, असा अर्थतज्ज्ञांचा कयास आहे.
https://www.youtube.com/watch?v=FVJIgUeqkt0&t=161s
https://www.youtube.com/watch?v=FVJIgUeqkt0&t=161s

चीनमध्ये तिबेटियन खतरेमें#humanrights violation in china #tibedtiyan PAR...

Saturday 26 January 2019

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा


पूर्वी असा समज होता की, निरक्षर, समाजाचे भान नसलेल्या लोकांना दुष्ट लोक धर्माच्या नावावर चिथवतात. ते काय बिचारे भोळेभाबडे लोक. त्यांना काय माहिती दुनियादारी? मग अशा लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. इसिसया दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता, असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो, असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा इसिससारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे बंदेअसण्यासाठी ते पात्र आहेत का? हे स्पष्ट व्हायला हवे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरियाअर्थात इसिसला इराकपासून संपूर्ण मध्य पूर्वेसह थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामची राजवट स्थापन करून तथाकथित खलिफाची राजवट आणायची आहे. दुर्दैवाने, भारतीय मुस्लीम तरुण इसिसच्या या इस्लामिक राज्याच्या दाव्याला बळी पडलेले दिसतात. तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये विशिष्ट समाज एकवटला आहे, तर त्या एकवटलेल्या समाजातील काहींना कट्टरतेकडे आणि पर्यायाने देशद्रोहाकडे, मानवद्रोहाकडे नेणाऱ्या प्रवृत्ती तिथे सक्रिय झाल्याचे दिसते. गरीब वस्तीत जायचे किंवा धार्मिक कार्यक्रमात जायचे; गरीब असतील तर त्यांना सोनेरी स्वप्नांचे भविष्य दाखवायचे आणि धार्मिक असतील तर त्यांना जन्नत-दोजख वगैरे सांगायचे. असले धंदे करून तरुणांना आपल्या अतिरेकी पाशात ओढण्याचे काम अतिरेकी संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. यासाठी वस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करण्याचे ढोंग ते उत्तमपणे वठवतात. अशा ढोंगांना बळी पडणारेच पुढे रक्तपिपासू पशू बनतात, याचे दुःख आहे.




मुंब्रासंभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेतही संघटना  इसिससाठी ‘स्लीपर सेलचे काम करतेया माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहेठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहेया अटका वेळीच झाल्याप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहेइसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशात हमखास संशयित दहशतवाद्यांना अटक होते. छापे मारले जातात. एखादा मोठा कट उधळला जातो. आताही प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असताना दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा, संभाजीनगर येथे काही ठिकाणी छापे मारले आणि नऊ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या सर्वांचा इसिसया दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मुंब्रा येथील कौसा भागात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. संभाजीनगर येथेही काही अटका झाल्या. हे सर्वच संशयित दहशतवादी सुशिक्षित आहेत आणि संगणक, माहिती-तंत्रज्ञान यात ते तज्ञ आहेत असे सांगण्यात येत आहे. अलीकडील काळात आपल्या देशात सुशिक्षित संशयित दहशतवादी पकडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः संगणकीय तंत्रज्ञानात पारंगत असणाऱयांचा वावर दहशतवादी कारवायांत वाढताना दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या काही दिवसांत ज्यांना ताब्यात घेतले त्यात सुशिक्षित तरुणांचा भरणा जास्त आहे. उच्चशिक्षित मुस्लिम तरुण-तरुणींना धर्माच्या, जिहादच्या नावाने भडकवायचे, त्यांचे ब्रेन वॉशिंग करून जिहादीबनवायचे आणि दहशतवादी कारवायांत ओढायचे ही इसिसया दहशतवादी संघटनेची जुनीच मोडस् ऑपरेंडी आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील
एका अल्पवयीन मुलीचा
असाच किस्सा बाहेर आला होता. मानसोपचारतज्ञांकडून तिचे नंतर कौन्सिलिंग करण्यात आले. कल्याणमधील चार तरुणदेखील इसिसमध्ये सहभागी झाले होते. तीन वर्षांपूर्वी या प्रकरणाने देशभरातच खळबळ माजवली होती. ठाणे जिल्हय़ाशिवाय मराठवाडय़ातही इसिसने हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी येथे सिमीचे जाळे होते. आता इसिसतोच प्रयत्न करीत आहे. मराठवाडय़ातील परभणी येथून तीन वर्षांपूर्वी नासीर याला एटीएसने अटक केली होती. त्याशिवाय शाहीद खान हा तरुणही एक किलो स्फोटकासह एटीएसच्या जाळय़ात सापडला होता. या दोघांवरही इसिसशी संबंध असल्याचा संशय होता. रिझवान खान याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले होते. तो ठाणे जिल्हय़ात इसिसचे भरती केंद्रचालवीत असल्याचा संशय होता. ठाणे जिल्हा आणि इसिस हे कनेक्शन नवीन नाही, जुनेच आहे. किंबहुना, मंगळवारी ज्या अटका मुंब्रा, कौसा येथून झाल्या त्याचे मूळ या जुन्या कनेक्शनमध्येच आहे. इसिसला देशात फार समर्थन मिळणार नाही, येथील मुस्लिम तरुण या दहशतवादी संघटनेकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित होणार नाहीत असे सरकारपासून सर्वच सांगत होते. मात्र तो अंदाज पूर्ण खरा ठरलेला नाही असेच
एकंदर चित्र
दिसत आहे. महाराष्ट्रातून इसिसमध्ये मोठय़ा प्रमाणावर मुस्लिम तरुण गेले नसले तरी हे कनेक्शन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाही. महाराष्ट्र एटीएसच्याच म्हणण्यानुसार त्यांनी किमान 86 तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून परावृत्त केले आहे. ही संख्याही तशी लक्षणीयच आहे. ही मुले तिकडे गेली नाहीत हे आपल्या यंत्रणांचे यशच आहे, पण हिंदुस्थानी मुस्लिम तरुणांमधील इसिसचे आकर्षण संपलेले नाही हेच मुंब्रा, कौसा, संभाजीनगर येथील एटीएसच्या अटकसत्रांमुळे दिसून आले आहे. मध्यंतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही उत्तर प्रदेश, दिल्ली येथे छापे टाकून इसिसशी संबंधित संशयितांना अटक केली होती. मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाया संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे इसिसचेच अपत्य आहे. ती इसिससाठी स्लीपर सेलचे काम करते आणि या माध्यमातून तरुणांना दहशतवादाचे शिक्षण देते असा तपास यंत्रणांचा दावा आहे. ठाणे जिल्हय़ात बिळे खणण्याचा इसिसचा प्रयत्न थांबलेला नाही असा मुंब्रा येथील अटकसत्राचा दुसरा अर्थ आहे. या अटका वेळीच झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे चांगलेच आहे. इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा आहे हे लक्षात घ्यायला हवे