Total Pageviews

Showing posts with label ANNA HAZARE. Show all posts
Showing posts with label ANNA HAZARE. Show all posts

Tuesday, 18 October 2011

ANNA HAZARE & KASHMIR

राळेगणसिद्धी,
१८ ऑक्टोबर २०११.
माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
काश्मीर संबंधाने काहीं लोक उलट सुलट चर्चा करतात. मात्र त्यांना माहित नाही की मी सैन्यामध्ये असताना भारत-पाकिस्तानच्या युद्धामध्ये भाग घेतला होता. सीमेवर पाकिस्तानच्या हमल्यामध्ये माझे सर्व-सर्व सहकारी शहीद झाले. मात्र मी वाचलो.
त्याच वेळी मी निर्णय घेतला होता की आता उर्वरित आयुष्य देशाच्या आणि देशातील जनतेच्या सेवेसाठीच अर्पण करायचे.
आजहीं मी पाकिस्तानच्या गोळीचे निशाण माझ्या कपाळावर वागवतो आहे. म्हणूनच माझी धारणा आहे की काश्मीर हे भारताचे अंग आहे आणि अंगच राहणार. त्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानशी लढावं लागलं तरी मी तयारी ठेवीन. मात्र काहीं लोकांना फक्त बोलता येते, जमिनीवर (प्रत्यक्षात) करता येत नाही हीं दुर्दैवी बाब आहे.
कि. बा. हजारे (अण्णा

Tuesday, 4 October 2011

ANNA HAZARE JAN LOKPAL BILL & GOVT

अण्णा हजारे यांनी देशात परिवर्तन घडविण्याची भूमिका घेतली असेल तर योग्यच आहे, पण ही भूमिका जनलोकपाल विधेयकापुरती असू नये.
अण्णांचा कॉंग्रेसविरोध!
कॉंग्रेसच्या विरोधात अण्णा हजारे यांनी युद्ध पुकारले आहे. जनलोकपाल विधेयक अण्णा मंडळास हवे तसे मंजूर झाले नाही तर कॉंग्रेसला मतदान करू नका अशा प्रकारची भूमिका अण्णा हजारे व त्यांच्या मंडळींनी मांडली आहे. कॉंग्रेसच्या विरोधात अण्णा हजारे यांनी रण माजवायचे ठरवलेच असेल व ते त्यांच्या निर्णयाशी ठाम राहणार असतील तर त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला काहीच हरकत नाही. अण्णा यांनी सांगितले की, ते स्वत: राजकारणात उतरणार नाहीत, पण निवडणुकीत चांगल्या उमेदवारांचा प्रचार करणार. अण्णांनी असेही सांगितले की, ते राजकीय पक्षाची स्थापना करणार नाहीत. हे सर्व चांगले आहे व स्वागतार्ह आहे, पण कॉंग्रेसविरोध हा फक्त जनलोकपाल विधेयकापुरताच असू नये. कॉंग्रेस पक्षाने उद्या अण्णा मंडळापुढे लोटांगण घातले व ‘जनपाल विधेयक’ तुम्हाला हवे तसे मंजूर करून घेतो असा प्रस्ताव ठेवला तर अण्णांचा कॉंग्रेसविरोध मावळेल. म्हणजे जनलोकपाल आणा नाहीतर कॉंग्रेसला विरोध ही त्यांची भूमिका आहे. एक सक्षम लोकपाल आणायला हरकत नाही, पण त्या लोकपालाचा भस्मासुर होता कामा नये ही आमची भूमिका आहे व उद्या लोकपालानेच देशाचा कारभार चालवू नये. जनलोकपालाचे काय व्हायचे ते होईल, पण तो लोकपालाचा खुळखुळा वाजू लागला म्हणून खूश होऊन कॉंग्रेसच्या इतर पापांवर पांघरुण घालावे काय? कॉंग्रेस म्हणजे पाप असून या पापाचा समूळ अंत होणे गरजेचे आहे. सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार अफाट आहे व देशाच्या तिजोरीची अखंड लूट सुरू आहे. दहशतवादाच्या भस्मासुराने निरपराध्यांचे बळी घेण्याचे थांबवलेले नाही. गरिबीने कहर केला आहे व फक्त ३२ रुपये खिशात असले की तुम्ही ‘श्रीमंत’ ही नवी भूमिका जाहीर झाल्यापासून देशातील दारिद्य्ररेषेखाली जगणार्‍या लोकांना श्रीमंत झाल्याचा भास होत आहे. खिशात खुळखुळणारे ३२ रुपये स्वीस बँकेत ठेवून श्रीमंतांच्या यादीत नाव घालता येईल काय? असा विचारही हे गरीब लोक करू लागले असतील. थोडक्यात काय, तर गरिबी हटवता येत नसल्याने गरिबीची व्याख्या बदलण्याचा जोडधंदा कॉंग्रेसने सुरू केला आहे. बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, बांगलादेशी-पाकड्यांनी निर्माण केलेले प्रश्‍न व त्याबाबत कॉंग्रेसने घेतलेली बोटचेपी भूमिका देशाला विनाशाकडे नेत आहे व त्याच गुन्ह्याबद्दल कॉंग्रेसचा संपूर्ण पाडाव करणे गरजेचे आहे. जनलोकपाल येवो अगर न येवो, लोकांनीच आता लोकपाल बनून कॉंग्रेसच्या टाळक्यात सोटा हाणण्याचा निश्‍चय केला आहे. कॉंग्रेस पक्षाला मत देऊ नये ही भावना लोकांच्या मनात उचंबळून आलीच आहे. कॉंग्रेसच्या रावण लीलांचा अंत करून देशात रामराज्य आणावे हेच देशवासीयांचे स्वप्न आहे. रामराज्याची भूमिका महात्मा गांधी यांनी मांडली होती व कॉंग्रेसची बरखास्ती हेच गांधीजींचे स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सगळ्यांनीच यापुढे शर्थ केली पाहिजे. गांधीजींच्या स्वप्नातला हिंदुस्थान घडविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अण्णांनी देशातल्या तरुणांना केले. अण्णा हजारे यांनी देशात परिवर्तन घडविण्याची भूमिका घेतली असेल तर ती योग्यच आहे, पण ही परिवर्तनाची भूमिका जनलोकपाल विधेयकापुरती असू नये. देशात स्पेक्ट्रम घोटाळा झालाच आहे व सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या संमतीशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार कसा होईल? पण सोनिया गांधी, मनमोहन हे बरे लोक आहेत असे अण्णांना वाटू लागले तर परिवर्तनाचे चाक आताच चिखलात रुतेल. सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचे नाव स्पेक्ट्रम घोटाळ्यात आले. सोनियांच्या बहिणींपर्यंत घोटाळ्याची बिदागी पोहोचविली गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल, नाहीतर परिवर्तनातच घोटाळा होईल!


नियोजन आयोगाला उपरती
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया यांना अखेर उपरती झाली आहे. ‘३२ रुपयांपेक्षा अधिक खर्च करणारा श्रीमंत’ अशी गरिबीची भयंकर व्याख्या नियोजन आयोगाने केली होती. तसे प्रतिज्ञापत्रच सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. आयोगाच्या या जावईशोधावर सर्व बाजूंनी अपेक्षेप्रमाणे टीकेची झोड उठली. तरीही नियोजन आयोगाच्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता. मात्र कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेनेही त्यावर कडक टीका केली. पंतप्रधान मनमोहन सिंग व राहुल गांधी यांचीही त्याबाबत चर्चा झाली आणि चक्रे फिरली. मॉण्टेकमहाशयांना परिस्थितीची ‘जाणीव’ झाली आणि सोमवारी ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘३२ रुपयांच्या श्रीमंती’बाबत घूमजाव केले. प्रतिज्ञापत्रात व्यक्त झालेले मत नियोजन आयोगाचे नसून सुरेश तेंडुलकर समितीचे आहे अशी सारवासारव केली. शिवाय दारिद्य्ररेषेखालील वंचित समाजघटकांना सबसिडी देताना त्या आकडेवारीचा आधार घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. थोडक्यात ३२ रुपयांचे गणित मोडीत काढले असे तूर्त तरी समजायला हरकत नाही. मुळात हा नसता उद्योग करण्याची काहीच गरज नव्हती. एक तर तो मुळातच चुकीचा होता आणि राजकीयदृष्ट्यादेखील सत्ताधारी पक्षाला परवडणारा नव्हता. त्यात पाच राज्यांच्या निवडणुका फार लांब नाहीत. त्यामुळे आधीच गोत्यात असलेला कॉंग्रेस पक्ष आणखी गाळात गेला असता. त्यामुळेच मॉण्टेक आणि जयराम रमेश या जोडगोळीला हे घूमजाव करण्यास भाग पाडले गेले. अर्थात मॉण्टेक यांनी आता जी मखलाशी केली आहे तीदेखील तशी अर्धसत्यच आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेले मत तेंडुलकर समितीचे असू शकते, पण ते प्रतिज्ञापत्र तर नियोजन आयोगानेच सादर केले होते ना! म्हणजे ते मत नियोजन आयोगाचेच म्हणावे लागेल. मॉण्टेकसिंग आता चूक दुरुस्त करायला निघाले आहेत, मात्र ही दुरुस्ती करताना चुकीचे खापर समितीवर फोडण्याची गरज नव्हती. स्वत:ची चूक मान्य करावयास हवी होती. ठीक आहे, देशातील गरिबीची नवीन व्याख्या करण्याची तयारी नियोजन आयोग करीत आहे हेही नसे थोडके. अर्थात, उद्या गरिबीची रेषा तोंडदेखली वाढवून गरीबांच्या तोंडाला ही मंडळी पाने पुसणारच नाहीत याची तरी खात्री कुठे आहे!

Monday, 3 October 2011

SHEE ANNA HAZARE & VISIT TO PAKISTAN

अण्णा, जरा याचाही विचार करा!अण्णा, आपल्यासारखेच एक देशभक्त आणि कॉंग्रेसला समर्पित महाराष्ट्राचे नेते नरहरी विष्णू गाडगीळ यांना स्वातंत्र्यानंतर सिंचनमंत्री असताना पं. नेहरूंनी नेहरी पाणी करारासाठी पाकिस्तानात पाठवले होते. अण्णा, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही गाडगीळांचे आत्मचरित्र वाचा, म्हणजे पाकिस्तानी नेत्यांनी त्यांना कशी वागणूक दिली ते तुम्हाला माहिती होईल...
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातील एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धीला पोहोचले. अण्णांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळातील सदस्यांनी अण्णांना पाकिस्तानात येण्याचा आग्रह केला. अण्णांचे दिल्लीतील उपोषण यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य हिंदुस्थान दौर्‍यावर आले. त्यांनी अण्णांना विनंती केली की, आपण पाकिस्तानात येऊन तेथील भ्रष्टाचार निवारणासाठी जनतेचे नेतृत्व करावे. अण्णांनी निमंत्रण स्वीकारले आणि त्यांना पाकिस्तानात येण्याचे आश्‍वासन दिले.
अण्णा एका खेडेगावात राहात असले तरी त्यांना एवढे नक्कीच माहीत आहे की, पाकिस्तानी सरकार आपल्याला व्हिसा देणार नाही. त्यामुळे आपण पाकिस्तानात जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. हिंदुस्थानी जनतेच्या अण्णांना शुभेच्छा आहेत. अण्णांनी अवश्य पाकिस्तानात जावे आणि तेथील जनतेच्या दु:खात सहभागी व्हावे. पण अण्णा, तुम्ही पाकिस्तानात प्रवेश करताच तुमच्या सवयीनुसार ‘भारतमाता की जय’ म्हणून वंदे मातरम्चा नारा देणार का? असे करण्यापासून जर रोखले गेले तर आपणास अडचणी येतील. त्यामुळे तुम्ही तेथे जाण्याऐवजी पाकिस्तानलाच येथे बोलवा!
अण्णा, तुम्ही 1965च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध सहभाग घेतला होता. ट्रक ड्रायव्हर म्हणून या युद्धात शहीद झालेल्या हिंदुस्थानी सैनिकांचे मृतदेह तुम्ही वाहिले होते. तुमच्या कपाळावर गोळी लागली होती. तुम्ही त्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला ‘पाकिस्तान्यांनी त्यावेळी आमच्यावर चढाई का केली होती?’ असे का विचारले नाही? इतक्या प्रदीर्घ काळानंतरही अण्णा, ज्या पाकिस्तान्यांचे हृदयपरिवर्तन झाले नाही, आता त्यांचे विचार बदलतील का? आमच्या देशावर ज्यांनी अन्याय केला, त्यांचे मन बदललेय का? आपल्याला निमंत्रण देणार्‍यांना याचा पश्‍चात्ताप झाल्याचे दिसले का? त्याच अत्याचारी देशात तुम्ही जाल तेव्हा तुमच्यासोबत राहिलेल्या त्या शहीद जवानांचे आत्मे काय म्हणतील? त्या शहीद जवानांना तुम्ही पाकिस्तानात श्रद्धांजली कशी अर्पण करणार?
भ्रष्टाचाराशी लढण्यापूर्वी आपणास पाकिस्तानात भ्रष्टाचारामुळे दहशतवाद आला की, दहशतवादामुळे भ्रष्टाचार आला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. सार्‍या जगाला माहीत आहे की, पाकिस्तान मृत्युशय्येवर पडलेला देश आहे. खुद्द पाकिस्तानी नेतेही हे मान्य करतात. आगामी दहा वर्षांमध्ये पाकिस्तानचे अस्तित्व राहील किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अण्णा, त्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला मी पाकिस्तानात येण्यापेक्षा तुमच्याकडे जे थोडेफार शिल्लक राहिले आहे ते हिंदुस्थानात घेऊन या, असा आग्रह धरा. पाकिस्तानचा जन्मच मुळात भ्रष्टाचारापासून झाला आहे. जगाला माहीत आहे की, लाहोरमध्ये 60 टक्के हिंदू होते. त्यामुळे फाळणीच्या वेळी लाहोरच्या आर्यसमाजी नेत्यांनी हिंदू लोकसंख्येच्या आधारावर लाहोर हिंदुस्थानला मिळावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र विभाजन रेषा तयार करणार्‍या रेडक्लीफने 20 लाख रुपये द्यावेत आणि लाहोर घ्यावे, अशी मागणी केली. आर्यसमाजी नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना खूप समजावले, पण काहीच फरक पडला नाही आणि आपल्या हातून लाहोर गेले.
13 ऑगस्ट 2011 च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पान क्र. 17 वर 1947 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात कोणत्या घडामोडी सुरू होत्या या संबंधी एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. त्यात ढाक्याचे 94 वर्षीय रवींद्रनाथ गुप्ता आणि कोमिलाचे 90 वर्षीय इंद्रकुमारसिंह या दोन हिंदूंची मुलाखत प्रकाशित केली आहे. विभाजनाच्या वेळी दोन्ही शहरे हिंदुबहुल होती. खुलनामध्ये तर 92 टक्के हिंदू होते. ढाका व चितगॉंगमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू होते. त्यावेळी असे निश्‍चित झाले होते की, ही दोन्ही शहरे दिल्लीच्या केंद्रीय सरकारच्या अधीन राहतील. परंतु नंतर परिस्थिती बदलली. हा निर्णय का बदलण्यात आला ही या दोघांची वेदना आहे. कदाचित विभाजन निश्‍चित करणार्‍यांचे खिसे गरम केले गेले. त्यामुळे हिंदुबहुल भाग पाकिस्तानच्या ताब्यात दिला गेला. लॉर्ड माऊंटबॅटन, मोहंमद अली जीना आणि पं. जवाहरलाल नेहरू यांनी आधी आपण फाळणीसाठी सहमत आहोत म्हणून या दस्तऐवजावर स्वाक्षर्‍या केल्या. फाळणी कशाप्रकारे होईल आणि कोणता भाग कुणाला मिळेल हे नंतर निश्‍चित केले गेले. त्यामुळे खरी गोष्ट ही आहे की, ही फाळणी अगदीच चुकीची झाली. भ्रष्ट ब्रिटिश विकले गेले आणि मुस्लिम लीगवाल्यांची चांदी झाली. त्यामुळे अण्णा, ज्या देशाचा पिंडच भ्रष्टाचारी आहे, तो आधी दुरुस्त करावा लागेल. त्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार निवारणाच्या गोळ्या त्या पाकिस्तान्यांना सेवन करण्यासाठी द्या. विभाजनावेळी इंग्रजांना भ्रष्ट करून त्यांनी राजे-महाराजे, नवाब आणि धर्मगुरूंच्या पैशातून वाट्टेल ते खरेदी केले आणि त्याला ‘पाकिस्तान’ हे नाव दिले. जो खरेदी करू शकतो तो विकूही शकतो. त्यामुळे चीनला काय-काय दिले हे कुणापासून लपून राहिलेले नाही. सद्य:परिस्थितीत चीन हिंदुस्थानी सीमांमध्ये घुसखोरी करतो आहे. पाकिस्तानला सुविधाही देत आहे आणि वाट्टेल तेवढा पैसा, हत्यारे पुरवीत आहे. अण्णा, आंदोलन तर त्या देशासाठी चालवले जाते, जो देश आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतो. पाकिस्तानची तर मातृभूमीला विकण्याची आणि हिंदुस्थानशी शत्रुत्वामुळे ती दानामध्ये देण्याची परंपरा आहे. त्या देशासाठी चारित्र्याच्या आधारावर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? पाकिस्तानच्या दृष्टीने मातृभूमी म्हणजे जमिनीचा तुकडा आहे. म्हणून ते वंदे मातरमलाही विरोध करतात.
कोणताही हिंदुस्थानी नेता चर्चेसाठी पाकिस्तानात गेला तर त्याच्यासमोर जीना केवळ आपल्या मुंबईतील मलबार हिल येथील बंगल्याची आठवण काढत असत. आपल्या बंगल्याला कस्टोडियन प्रॉपर्टी घोषित करून हिंदुस्थानी सरकारने कब्जा करू नये, असा जीनांचा प्रयत्न असायचा. पाकिस्तानातील हिंदुस्थानचे पहिले राजदूत श्रीप्रकाश यांचे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की, आपल्या खासगी संपत्तीची चिंंता करणारे देशाची चिंता करीत नाहीत. हिंदुस्थानात भ्रष्टाचार जास्तीत जास्त धन आणि संपत्ती जमविण्याचा आहे. परंतु पाकिस्तानात भ्रष्टाचार आपल्या देशालाच विकण्याचा आहे. अखंड हिंदुस्थानवर विश्‍वास ठेवणारे आपल्या पासपोर्टवर पाकिस्तानी व्हिसाची मोहोर लावून घेत नाहीत!
- मुजफ्फर हुसेन

Thursday, 22 September 2011

anna visit to pakistan focus on corruption in india

अण्णा पाकिस्तानात जातील किंवा न जातील, पण पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी अण्णांनी देशभावनेचा विचार केला असता तर बरे झाले असते.

अण्णा हो अकबर!
अण्णा हजारे यांच्याविषयी आता या देशातील पामरांनी काय बोलावे आणि काय लिहावे! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही युनोच्या महासभेत अण्णा आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे अण्णांचे मंत्रिमंडळ जोरात असायला हरकत नाही. भ्रष्टाचार हाच आमच्या देशातला खतरनाक शत्रू असून तो दहशतवादापेक्षा भयंकर आहे. या शत्रूशी फक्त लढून चालणार नाही, तर त्याला कायमचे गाडल्याशिवाय हा देश ताठ मानेने, मजबूत पायावर उभा राहू शकणार नाही. एका बाजूला बराक ओबामा यांनी अण्णांच्या आंदोलनाचे कौतुक केले तर त्याच वेळेला पाकड्यांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांना भेटले. या पाक शिष्टमंडळाचे म्हणणे असे की, अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने ते प्रभावित झाले असून पाकिस्तानमधील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी अण्णांनी पाकिस्तानात यावे. तसे निमंत्रणच या मंडळींनी अण्णांना दिले आहे व अण्णांनीही फारसे आढेवेढे न घेता पाक शिष्टमंडळाचे हे आमंत्रण स्वीकारून ‘‘प्रकृतीस आराम पडला की पाकिस्तानात नक्की येतो,’’ असे जाहीर केले आहे. अण्णा पाकिस्तानात जातील किंवा न जातील हा पुढचा प्रश्‍न, पण पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारण्यापूर्वी अण्णांनी देशभावनेचा विचार केला असता तर बरे झाले असते. मुळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचे अस्तित्व तरी उरले आहे काय? धर्मांधता, अराजकता आणि दहशतवादाने या देशांच्या चिरफळ्याच उडवल्या आहेत. जगाच्या नकाशावर दिसतात म्हणून यांना राष्ट्र म्हणायचे काय एवढाच प्रश्‍न आहे. धर्मांधता व हिंसाचाराच्या वणव्यात ही राष्ट्रे नष्ट झाली व हिंदुस्थानलाही नष्ट करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. हे मनसुबे तडीस नेण्याची एकही संधी पाकडे सोडत नाहीत. अशा स्थितीत पाकिस्तानशी निदान आपल्याकडील
कुणीही फालतू ‘गुलूगुलू’
करू नये. कश्मीरच्या खोर्‍यात काय चालले आहे? पाकड्यांच्या पाठिंब्यावरच तेथे अतिरेकी घुसतात व हिंदूंच्या कत्तली करून रक्ताचे सडे पाडतात. खोर्‍यात एकही हिंदू जिवंत राहता कामा नये असा पणच तोयबा, अल कायदा वगैरे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला आहे. मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी सतत जे बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ले सुरू आहेत त्यात या देशातील निरपराध लोकांचेच रक्त सांडत आहे. या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे पाकड्यांचाच हात आहे व जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत हिंदुस्थानला सुख, शांती लाभणार नाही. पाकिस्तानचे नाव घेतले की या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा पारा संतापाने चढतो व पाकड्यांशी लढण्यासाठी त्यांच्या मुठी वळतात, मनगटे आपोआप चेततात. हिंदुस्थानच्या सध्याच्या हतबल परिस्थितीस फक्त पाकिस्तान आणि पाकिस्तानच जबाबदार असताना या देशातील कर्मदरिद्री राज्यकर्ते, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते मात्र पाकड्यांशी प्रेमाचे, सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा का करीत आहेत तेच कळत नाही! हिंदुस्थानच्या भूमीवर पाकपुरस्कृत अतिरेकी ‘बॉम्ब’ फोडत नाहीत, तर फुले उधळतात असेच या लोकांना वाटते. त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवर रक्तामांसाचे सडे पाडायचे आणि आपण त्यांच्यासाठी पायघड्या घालायच्या, हा निर्लज्जपणाच आहे. दोन देशांत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये असे आम्ही म्हणतो त्यामागची आमची तळमळ जरा समजून घ्या. क्रिकेटचे सामने खेळवल्याने, पाकड्या कलाकारांचे गजल, मुशायर्‍याचे कार्यक्रम मुंबई-दिल्लीत केल्याने पाकिस्तानच्या डोक्यातला हिंदुस्थानद्वेष कमी झाला असता तर आतापर्यंत लाखो निरपराधांच्या नाहक हत्या झाल्या नसत्या. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आता कुणी विचारीत नाही. तेथे
लष्कराची आणि आयएसआयचीच हुकमत
चालली आहे. खुद्द त्या इम्रान खाननेच सांगितले आहे की, पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष झरदारी हे अमेरिकेच्या हातचे ‘नपुंसक कठपुतली’ बनले आहेत. मग अशा नपुंसकाशी चर्चा वगैरे करून काय हशील? या नपुंसकांनी हिंदुस्थानातील इस्लामी दहशतवादास बळ देण्याचेच काम केले व हिंदुस्थानातही अराजक माजावे, पुन: पुन्हा फाळणी व्हावी यासाठी ते अल्लास पाण्यात घालून बसले आहेत. म्हणूनच पाकिस्तानचे काय वाटोळे व्हायचे ते होऊ द्या. आमचे रक्त सांडणार्‍यांविषयी कोणतीही सहानुभूती बाळगण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेची ‘सेना’ भ्रष्ट आहे व त्याच भ्रष्टाचारातला पैसा ते हिंदुस्थानातील अतिरेक्यांना पुरवीत आहेत. खुद्द राष्ट्राध्यक्ष झरदारी यांना ‘मि. टेन परसेंट’ असे उपहासाने म्हटले जाते. आजही मुंबई बॉम्बस्फोटांतील सर्व ‘वॉण्टेड’ दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचे पाहुणे आहेत. दाऊद, मेमन, छोटा शकील यांना पाकिस्तान भ्रष्टाचाराच्या पैशातून पोसत आहे ते काय हिंदुस्थानातील गरिबीचा भार हलका व्हावा म्हणून? पाकिस्तानला हिंदुस्थानचे बरे झालेले कधीच बघवणार नाही. उलट हिंदुस्थानचा ‘नाश’ आणि विध्वंस व्हावा यासाठीच त्यांची ‘पावले’ पडत आहेत. पाकिस्तानातील गोरगरीब जनतेस या सगळ्यांची झळ बसत असेलही, पण काय करणार? हिंदुस्थानातही निरपराध्यांच्या रक्ताचे सडे पाडणारे पाकडेच आहेत. म्हणून अण्णा हजारे असतील किंवा आणखी कुणी, पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मुंबई-दिल्ली बॉम्बस्फोटांत जे नाहक मेले त्यांच्या शोकमग्न, संतप्त नातेवाईकांशी आधी चर्चा करावी व मगच स्वत:स ‘निशाने पाकिस्तान’ म्हणून घोषित करावे. ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा इकडे किंवा तिकडे नेहमीच घुमत असतात. आता शांतता व सद्भावनेच्या नावाखाली ‘अण्णा हो अकबर’ची बांग कानावर पडू नये एवढीच आमची तळमळीची इच्छा आहे

Tuesday, 6 September 2011

excellent editorial on mining scans

खाणसम्राट ‘रेड्डी बंधू’ यांना सीबीआयने अटक केली आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, या कारवाईमागे सीबीआयची नियत साफ आहे काय?

सम्राटांचे दिवस भरले!आमच्या देशात कसले नसले तरी ‘सम्राटांचे पीक’ बरेच आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सम्राट निर्माण झाले आहेत. शिक्षणसम्राट, दारूसम्राट, खेळसम्राट, उपोषणसम्राट, राजकारणातले कार्यसम्राट, खुर्चीसम्राट, वृत्तपत्रसम्राट, त्याचप्रमाणे आता ‘खाणसम्राट!’ कर्नाटकातील असेच एक खाणसम्राट ‘रेड्डी बंधू’ यांना सीबीआयने अटक केली आहे. रेड्डी बंधूंचा खाणींचा म्हणजे शेवटी मातीचाच धंदा आहे, पण अति तेथे माती झाली. त्यामुळे इतर सर्व सम्राटांप्रमाणे रेड्डी बंधूंनाही तुरुंगाची हवा खावी लागली. प्रश्‍न इतकाच आहे की, या कारवाईमागे सीबीआयची नियत साफ आहे काय? रेड्डी बंधू हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. बेल्लारी व आसपासच्या परिसरात रेड्डी बंधूंचे साम्राज्य आहे. पैसा व सत्ता यामुळे त्यांनी संपूर्ण भाग आपल्या मुठीत ठेवल्याने किमान २०-२५ आमदार व पाच खासदार ते निवडून आणू शकतात व कर्नाटकातील कोणत्याही सरकारचे रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवतात. कर्नाटकातले म्हणजे दक्षिणेतले भाजपचे पहिले सरकार आले त्यात रेड्डी बंधूंची मोठी मेहनत होती. त्यामुळे रेड्डी बंधूंवर भाजप नेतृत्वाची मेहेरबानी असायला हरकत नाही. रेड्डी यांनी कर्नाटकात आमदारांचा एक गट पोसला व त्या बळावर ते मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करीत राहिले. बेल्लारी परिसरातील सर्व प्रशासकीय व पोलीस अधिकारी आपल्याच मर्जीने नेमावेत ही रेड्डी बंधूंची मागणी असे, पण येडियुरप्पा यांनी त्यास विरोध करताच रेड्डींनी आमदारांचा मोठा गट भाजपमधून बाहेर काढून बंडाचा झेंडा फडकवला. शेवटी सरकार वाचविण्यासाठी भाजपला रेड्डींना शरण जावे लागले. रेड्डी यांनी खाणीच्या धंद्यातून जे साम्राज्य उभे केले ते डोळे दिपवणारे आहे व कायद्यापेक्षा बेकायदा खाण व्यापारानेच त्यांच्यावर पैशांचा पाऊस पाडला. विसेक वर्षांपूर्वी रेड्डी बंधूंची स्वत:च्या मालकीची सायकल घ्यायची हैसियत नव्हती. आज तेच रेड्डी बंधू सोन्याच्या सिंहासनावर बसून राजकारण करतात. तिरुपती बालाजीस ५० कोटींचा हिरेजडित मुकुट चढवतात. स्वत:चे विमान आणि हेलिकॉप्टर राखतात. निवडणुकीत शेकडो कोटींचा धुरळा उडवतात. आमदार, खासदार विकत घेण्यासाठी थैल्या मोकळ्या सोडतात. हे सर्व प्रयोग कायदेशीर पैशांतून होत नसतात. बेहिशेबी काळे धन ज्यांच्यापाशी सडत पडले आहे त्यांनाच हे सर्व करणे शक्य होते. रेड्डी बंधू हे फक्त कर्नाटकातलेच नव्हे तर आंध्रातलेही बडे प्रस्थ आहे. कॉंग्रेसचे वाय.एस.आर. रेड्डी आंध्रचे मुख्यमंत्री होते तेव्हा कर्नाटकच्या रेड्डींशी त्यांची व्यावसायिक हातमिळवणी होती. मुख्यमंत्री वाय. एस. आर. यांचे अपघाती निधन झाल्याने रेड्डी बंधूंचा आधारवड कोसळला, पण वाय.एस.आर.पुत्र जगनमोहनशी संबंध सलोख्याचे राहिले. जगनमोहनने आंध्रात कॉंगे्रसविरोधात बंड केले व कॉंग्रेसला धुळीस मिळविण्याची कसम खाल्ली. जगनमोहनला इशारा देण्यासाठी कॉंग्रेसने सीबीआयचे हत्यार वापरून कर्नाटकातील रेड्डी बंधूंना तुरुंगात टाकले काय? ‘कॉंग्रेसशी पंगा घ्याल तर जगनमोहन, तुलाही तुरुंगात टाकू’ अशी धमकीच रेड्डी बंधूंवरील कारवाईतून देण्यात आली आहे. रेड्डी बंधू यांनी आंध्र व कर्नाटकात बेकायदेशीर खाणी खोदून गडगंज पैसा कमावला, पण त्यांच्यावर कारवाई करायला इतका उशीर का लावला? सीबीआय कोणाच्या आदेशाची वाट पाहत होती? चला, राजकारणातला आणखी एक सम्राट अशा प्रकारे तुरुंगात गेला. सम्राटांचे दिवस भरले आहेत

Friday, 2 September 2011

SCAMS WHAT IT MEANS

, On Friday 2 September 2011, 12:38 PM

As India immerses itself into removing corruption, it's important to understand what the past scams cost us. But talking in mere amounts isn't fruitful. After all, does 55,000 crore rupees sound bad? How much worse is it than a mere 50,000 crores? (Answer: 1,000 kilometers of highway worse, or the stretch from Bangalore to Mumbai)
The biggest scam that unfortunately doesn't get classified as one is that food enough to feed 100 million people rots in government warehouses.  For the rest, we have for you an infographic that puts the amounts in context, how much we could have done. For past scams we have adjusted the amount for inflation to reflect an equivalent in 2011 — the Rs. 5,000 crore Harshad Mehta Scam for instance is worth Rs. 15,000 cr. today.
Here's all that we could have done with the money lost to some of the biggest scams in India.


YOUTH LEADER RAHUL GANDHI OR ANNA HAZARE

http://damodarsut.globalmarathi.com/

पण

राहुलजी, तुम्ही तर म्हणाला होतात कि 'मला भारतीय असण्याची लाज वाटते' म्हणून! मग अशा लोकांचा सर्वोच्च प्रतिनिधी होण्याची तुम्हाला नाही लाज वाटत ? हे कसे काय ? पंतप्रधान झालात तर तुम्हाला मेल्याहून मेल्यासारखे व्हायला हवे. तुमच्या आडनावाची देखील खरतर तुम्हाला फारच लाज वाटायला हवी.
बर, तुमचे समर्थक तुम्हाला तरुणांचे नेते म्हणतात. पण तरुण तर अण्णा हजारे या ७३ वर्षाच्या वृद्धाभोवती जमा झालेले दिसतात. त्यांनी हाती घेतलेल्या कार्यात झोकून देतात. त्यांना कोणी ट्रकात घालून आणलेले नाही. बर , अण्णा त्यांना सत्तापदे देतील या आशेने ते आले असावेत असे म्हणावे तर अण्णांकडे नैतिक सत्तेशिवाय काहीच नाही. कमाई तर सोडाच अन्णातर त्यांना मुकाट्याने पोलिसांच्या लाठ्या खा असे सांगतात तरी ते त्यांच्याबरोबरच! आपण या तरुणांमध्ये तर सोडाच , पण इतरही कोठे दिसला नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत तरुण गुंतलेले असताना , तुम्ही तुमच्या 'चमचा तुकडीत' तरी भ्रष्टाचाराविरुद्ध तोंडदेखला आवाज कराल असे वाटले होते. त्या चमचा तरुणांनीही तुमची साथ सोडली कि काय?
तरी देखील तुम्ही तरुणांचे नेते? अण्णांचे आंदोलन हिंसक व्हावे म्हणून चीड आणणारी वक्तव्ये करायला तुमच्या मनीष तिवारी सारख्या चमच्यांना सांगू नका. आंदोलन हिंसक व्हावे आणि ते तसे झाले कि आणीबाणी लावायचा तुमचा विचार आहे कि काय अशी शंका येते. तुम्हाला तरुणांचे नेते व्हायचे असेल तर प्रथम अण्णांचे शागीर्द व्हा! कारण वयोवृद्ध अण्णा मध्येच तरुणांना अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभा राहिलेला तरुण दिसतो आहे. राहुलजी तुम्ही अण्णाना शरण जा

CORRUPTION INDIA LETTER EDITOR TIMES OF INDIA

LETTER OF THE EDITOR OF "THE TIMES OF INDIA " TO THE PRIME MINISTER OF INDIA

I am born and brought up in Mumbai for last fifty eight years. Believe me, corruption in Maharashtra is worse than that in Bihar . Look at all the politicians, Sharad Pawar, Chagan Bhujbal, Narayan Rane, Bal Thackray , Gopinath Munde, Raj Thackray, Vilasrao Deshmukh all are rolling in money. Vilasrao Deshmukh is one of the worst Chief ministers I have seen. His only business is to increase the FSI every other day, make money and send it to Delhi , so Congress can fight next election. Now the clown has found new way and will increase FSI for fishermen, so they can build concrete houses right on sea shore. Next time terrorists can comfortably live in those houses, enjoy the beauty of the sea and then attack our Mumbai at their will.

Recently, I had to purchase a house in Mumbai. I met about two dozen builders. Everybody wanted about 30% in black. A common person like me knows this and with all your intelligence agency & CBI, you and your finance ministers are not aware of it. Where all the black money goes? To the underworld, isn't it? Our politicians take help of these goondas to vacate people by force. I myself was victim of it. If you have time please come to me, I will tell you everything.

If this has been a land of fools, idiots, then I would not have ever cared to write to you this letter. Just see the tragedy. On one side we are reaching moon, people are so intelligent; and on the other side, you politicians have converted nectar into deadly poison.I am everything - Hindu, Muslim, Christian, Scheduled Caste, OBC, Muslim OBC, Christian Scheduled Caste, and Creamy Scheduled Caste; only what I am not is INDIAN. You politicians have raped every part of Mother India by your policy of divide and rule.

Take example of our Former President Abdul Kalam. Such an intelligent person; such a fine human being. But you politician didn't even spare him and instead choose a worthless lady who had corruption charges and insignificant local polititian of Jalgaon WHO'S NAME ENTIRE COUNTRY HAD NOT HEARD BEFORE. Its simple logic your party just wanted a rubber stamp in the name of president. Imagine SHE IS SUPREME COMMANDER OF INDIA 'S THREE DEFENCE FORCES. What morale you will expect from our defence forces? Your party along with opposition joined hands, because politicians feel they are supreme and there is no place for a good person.

Dear Mr Prime minister, you are one of the most intelligent person, a most learned person. Just wake up, be a real SARDAR. First and foremost, expose all selfish politicians. Ask Swiss banks to give names of all Indian account holders. Give reins of CBI to independent agency. Let them find wolves among us. There will be political upheaval, but that will be better than dance of death which we are witnessing every day. Just give us ambience where we can work honestly and without fear. Let there be rule of law. Everything else will be taken care of.

Choice is yours Mr. Prime Minister. Do you want to be lead by one person, or you want to lead the nation of 100 Crore people?

Prakash B. Bajaj
Editor Mumbai-Times of India

EXCELLENT ARTICLE ON ANNA HAZARE BY PARAG PATIL

COMMON MAN VS PSEUDO SECULARS & LEFT LEANING INTELECTUALS
पराग पाटील
parag.patil@expressindia.com
भारतीय जनता तेव्हा त्या वेलीच्या फुलांच्या सडय़ात न्हाऊन निघत होती. नैतिक आंदोलनाचा हा परिमळ लोकांना नवं बळ देऊन गेला. भ्रष्टाचाराच्या जिव्हा किती जहरी असतात हे अनुभवलेल्या सामान्यांना या भ्रष्टाचारी भूकेवरचा हा उपासाचा उतारा प्रचंड आवडून गेला आहे.मनोहरचं मुलुंडमधे औषधांचं दुकान आहे. कित्येक वर्षांत तो दुकान सोडून बाहेर गेलेला नाही. अनेक वर्षे दुकानात उभं राहून वरखाली करून त्याच्या गुडघ्यांची वाट लागलीय; पण दुकानातला डेरा त्याने कुठल्याही परिस्थितीत हलवला नाही. अगदी नातेसंबंधातल्या लग्नातही तो हजर राहत नाही.पण परवा तो आझाद मैदानावर आवर्जून जाऊन आला.अण्णांना सपोर्ट म्हणून.. दिवसभर!हा आश्चर्याचा एक प्रचंड मोठा धक्का होता. मनोहरला ओळखणाऱ्यांसाठी तर तो नक्कीच होता. कारण तो असा आंदोलन करणाऱ्यांमधला नाही. नारेबाजी करणाऱ्यांमधला तर नक्कीच नाही.मनोहरला दुकानातून बाहेर काढलं म्हणून अण्णांना मनातल्या मनात कडक सलाम ठोकला. या सगळ्या आंदोलनाबद्दल जे काही उरलेसुरले किंतू होते ते एकदम गळून पडले.मनोहरला जाण्याचं नेमकं कारण विचारलं. तो म्हणाला, ‘‘आमच्या धंद्यातल्या करप्शनचं प्रमाण म्हणजे डोक्यावरून पाणी गेलंय. खूप कठीण झालंय. अण्णांना सपोर्ट करणं ही माझीच खूप आतली गरज होती.’’असे अनेक मनोहर या आंदोलनादरम्यान आपल्या कोशातून बाहेर पडलेले आढळले. त्यांचा राग, त्यांच्या मनातली खदखद यानिमित्ताने बाहेर पडली असेल. कदाचित ते भाबडेही असतील, पण या आंदोलनातून व्यक्त झालेला आशावाद सगळ्यांचाच हुरूप वाढवणारा होता.मात्र या सर्व आंदोलनातून फक्त आशावादच व्यक्त झाला असं नाही. एक वैचारिक घुसळण होत असल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने टीव्ही चॅनेल्सवरची इतकी पॅनेल डिस्कशन झाली की त्याने डोकं बधिर होऊन गेलं. हे कमी म्हणून की काय दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये तेच वाचावं लागायचं. मीडियामध्ये हा डिस्कशनचा ओव्हरडोस झाला तरी सर्वसामान्य लोकांना त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. ते त्यांच्या अण्णांवर खूश होते.कधी नव्हे ते सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि बुद्धिवादी दुसऱ्या बाजूला असं एक चित्र इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकताना दिसलं. खरं तर बुद्धिवाद्यांचा या आंदोलनाला पाठिंबाच असल्याचं दिसलं, पण काहीतरी विचित्र आकस मात्र जाणवत होता. त्यामुळे बरेच बुद्धिवादी खुलेपणाने या आंदोलनाला अनुमोदन देताना दिसले नाहीत. पार्लमेण्टरी डेमोक्रसी आणि पीपल्स पॉवर या चर्चेत सगळे इतके अडकले होते की लोकभावनेवर आरूढ अण्णांना अप्रत्यक्षरीत्या ते पाण्यात पाहू लागले. अभावितपणे राजकारण्यांची बाजू घेऊ लागले. लोकांना हे आवडलं नाही. बुद्धिवाद्यांची ही कुंपणावरची भूमिका या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र या वेळी लोकांना अशा बुद्धिवाद्यांचा राग येऊ लागल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. ‘बघता काय, सामील व्हा’ हा नारा अगदी गल्ली-बोळ, सोसायटय़ा, चाळींमधून घुमू लागला.राजकारणी तेच आहेत, नोकरशहाही फार काही बदलणार नाहीत. भ्रष्टाचारी, गुंड त्यांचे रंग बदलणार आहेतच. बदलायचं आहे ते लोकांना. आणि त्याची सुरुवात अण्णांनी धडाक्यात करून दिली आहे. तरीही लोकांनी संयम सोडला नाही. हा चमत्कारच म्हणावा लागेल. तुमचा अण्णा उपोषण करून काय जग बदलणार, अशा कुत्सित प्रश्नावरही लोक शांतपणे उत्तर देत होते. स्वयंस्फूर्त आंदोलनातले हिंसा टाळणारे किंवा प्रखर विधानं गिळणारे तरुण बघितले आणि बऱ्यापैकी दिलासा वाटला. खोचक प्रश्न विचारणारे बुद्धिवादी वा राजकीय झोकेखोर नंतर संख्याबळ पाहून सोयीस्करपणे अण्णांची बाजू घेऊ लागले.अण्णांच्या आंदोलनातून अनेकांनी आपली सोय पाहिली हे खरं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला अण्णांच्या रूपाने १२ दिवसांचा तुफानी टीआरपी मिळाला. अनेक चॅनेल्सनी या काळात आपला जाहिरातींचा दोन-अडीच मिनिटांचा स्लॉट वाढवून चार मिनिटांचा केला. अण्णांसंबंधी अपडेट घ्यायला न्यूज चॅनेल लावलं तर फक्त जाहिरातीच दिसायच्या. एका चॅनेलने तर अण्णांच्या हेल्थ बुलेटिनसाठी स्पॉन्सरशिपच मिळवली होती.चॅनेलवरच्या पॅनेल डिस्कशनमधले लोकच अण्णांच्या आंदोलनाला मीडिया सर्कस म्हणून हिणवत होते आणि तेच चॅनेल या सर्कशीचा खेळ लावून पैसाही वसूल करत होतं.मराठी मीडिया द्विधा मन:स्थितीत होता. अण्णा आंतरराष्ट्रीय फिगर बनलेत हे पचवायला अवघड जात होतं. अण्णा आणि राज ठाकरे यांच्या टीआरपी व्हॅल्यूसंबंधीही चर्चा होत होती आणि अण्णांनी राज ठाकरेंना मागे टाकल्याच्याही चर्चा होत होत्या. तरीही पत्रकार आणि बुद्धिवाद्यांमध्ये राज ठाकरेंविषयी जसे फॅनफॉलोअर्स निर्माण झाले तसे अण्णांविषयी झाले नाहीत.पण अण्णा आणि त्यांच्या टीमला त्याची फिकीर नव्हती. अण्णांचं वर्णन ‘सीरियल किलर’ म्हणून होऊ लागलं. टीव्ही मालिकांच्या लोकप्रियतेलाही अण्णांमुळे ग्रहण लागलं होतं आणि सर्वसामान्य तर ‘मी अण्णा हजारे’ म्हणवूनही घ्यायला लागला होता.अण्णांच्या या बारा दिवसांच्या आंदोलनाला इलेक्ट्रॉनिक मीडियाने हवा दिली की आणखी काय याच्या चर्चा खूप झाल्या आणि होतायत. मीडियाची मोठी गंमत या वेळी लक्षात आली. मीडियाला सतत अ‍ॅक्शन हवी असते. अण्णांच्या अटकनाटय़ामुळे ती या आंदोलनाच्या सुरुवातीला मिळालीही. नंतर मात्र रामलीला मैदानात आंदोलन स्थिरावल्यावर जो एक संथपणा आला तो मीडियाला मानवणारा नव्हता. सरकारने वेट अ‍ॅण्ड वॉच अशी भूमिका घेतली ती तर मीडियाला परवडणारी नव्हती. झेंडे घेऊन घोषणा देणारे लोक आणि मेणबत्त्यांचा मार्च किती काळ दाखवणार? अ‍ॅक्शन नसल्यामुळे मीडिया अस्वस्थ होऊ लागला. अण्णांसंबंधीच्या सकारात्मक-नकारात्मक अशा कोणत्याही बातमीचा शोध घेऊ लागला. मनीष तिवारींची माफी, अण्णांना भेटायला येणारे सेलिब्रिटीज ते मांडवलीसाठी येणारे राजकारणी या सगळ्यांच्याच ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या.सोशल नेटवर्किंग साइटचा फारसा परिणाम या वेळी मात्र जाणवला नाही. एक एसेमेस फिरत होता तो मात्र अण्णाच्या लोकप्रियतेविषयी मार्मिक भाष्य करणारा होता..
I miss those days when I used to type Anna and google suggested Kournikova...
अण्णा आता यूथ आयकॉन झालेत अशीही ललकारी यानिमित्ताने दिली गेली. अण्णांनीही त्यांच्या मागे असलेल्या युवाशक्तीबद्दल सतत गौरवोद्गार काढले. मात्र अण्णांच्या आंदोलनात सहभागी या युवा पिढीबद्दल विविध आशंका व्यक्त झाल्या.ते मुळात स्वत:च कायदा पाळणारे आहेत का, अण्णांच्या पाठिंब्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांमध्ये करचुकवे होते, स्वत: लाच घेणारे नसले तरी लाच देणारे होते वगैरे.अण्णा टोपी घालून मोटारसायकलवरून मोर्चात सहभागी झालेल्या युवक-युवतीला एका ठिकाणी हटकून विचारलं, तुम्ही हेल्मेट न घालता बाइकवर बसला आहात, मग हा भ्रष्टाचार नाही का? ती बिचारी पोरं एकदम कानकोंडी झाली. मग स्वत:चीच लाज वाटली.. आपलाही मनीष तिवारी होतोय की काय, भीती वाटली.. या छोटय़ा त्रुटींना गंभीर स्वरूप देऊन आपण या आंदोलनाविषयी नकारात्मकता विकसित करतोय की काय?१५ ऑगस्टला ही पोरं झेंडा घेऊन उतरली नव्हती, पण अण्णांच्या सपोर्टसाठी आली. उद्दिष्ट तर चांगलं आहे. आपल्या प्रश्नांना तर उद्दिष्टही नाही. एक गोष्ट तर मान्य करायला पाहिजे की अण्णांचं हे नैतिक आंदोलन आहे आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालं आहे.राजकारणी तेच आहेत, नोकरशहाही फार काही बदलणार नाहीत. भ्रष्टाचारी, गुंड त्यांचे रंग बदलणार आहेतच. बदलायचं आहे ते लोकांना आणि त्याची सुरुवात अण्णांनी धडाक्यात करून दिली आहे.लोकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी चीड निर्माण झाली आहे, पण मधल्या काळात अमेरिकन नागरिकांची मानसिकता भारतीय मध्यमवर्गाने स्वीकारायला सुरुवात केली होती.आपला नेता स्वच्छ पाहिजे, मग भले आपण कसंही वागलं तरी चालेल. थोडक्यात, भगत सिंग शेजारच्या घरात जन्माला यावा, ही भावना.मात्र अण्णांनी तुम्हीच अण्णा व्हा, असा संदेश दिला आणि तो लोकांना आवडला. प्रत्येकजण ‘मी अण्णा हजारे’ म्हणवून घेऊ लागला. नैतिक आंदोलनाचं यश अण्णांना तिथेच मिळालं. लोकांना अण्णांजवळ चारित्र्यसंपन्नता आणि विश्वासार्हता मिळाली. त्यामुळे या ७४ वर्षीय तोडकंमोडकं हिंदी बोलणाऱ्या माणसावर आख्ख्या देशाने जीव टाकला.राहता राहिलं जनलोकपाल विधेयक आणि इतर सुधारणांविषयी अण्णा टीमचा आग्रह. आता त्यांनी भ्रष्टाचारविरोधी एक वातावरण आणि सुंदर प्लॅटफॉर्म लोकांच्या मनातच केला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही.करप्शनविषयी उद्विग्नतेने बोलणारी माणसं आता अचानक भ्रष्टाचार संपवण्याची भाषा बोलू लागली आहेत. हा पॉझिटिव्ह माइण्डसेट निर्माण झालाय हेही नसे थोडके.या आंदोलनातून नव्या नेतृत्वाला धुमारे फुटतील यात शंका नाही. आंदोलनात कुठल्याही एका विचारधारेचा पॅटर्न नव्हता, पक्षीय संघटन नव्हतं. पण नैतिक बळ होतं आणि हे सगळं बदलू शकतं हा प्रखर विश्वास होता. नव्या युगाचं नवं नेतृत्व निर्माण होण्याची प्रक्रिया या संक्रमणावरच्या श्रद्धेतूनच तयार होते.युवा नेता कैसा हो, या संदर्भातला एक मेल फिरतोय. त्यात साधेपणाने या आंदोलनाला दिशा देणारा अरविंद केजरीवालचा फोटो आहे, आणि दुसरीकडे मैत्रिणीबरोबर रममाण झालेले राहुल गांधी आहे.आणि हा मेल लोकांना आवडतो आहे

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 60 BY RASHMI GHATWAI

रश्मी घटवाईrashmighatwai12@gmail.com अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ही एक नव्या युगाची नांदीच म्हणावी लागेल. हे केवळ अण्णा हजारे नावाच्या एकटय़ा बाशिंद्याचे आंदोलन नव्हते. या आंदोलनाने सर्वसामान्यांना आपल्यातल्या असामान्यत्वाची जाणीव करून दिली. अहिंसक आणि सन्माननीय मार्गाने आपला आवाज बुलंद करून भ्रष्ट यंत्रणेच्या छातीत धडकी भरवण्याचा मार्ग दाखवला. अण्णांना समर्थन देता देता हा समुदाय स्वत:च अण्णा बनला.. त्याची ही गोष्ट. झपाटल्यागत जो तो रामलीला मदानाकडे निघालेला होता. रामलीला मदानाला गर्दी मुळीच नवीन नाही. गेली कित्येक वष्रे दिल्लीत ह्य़ा रामलीला मदानात नवरात्रात रामलीलेचं आयोजन केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी श्रीराम रावणाचा वध करतात. रावण दहन होतं. दुष्टावर सुष्टाचा विजय होतो. मात्र आताची रामलीला मदानातली गर्दी वेगळी होती. दुष्टावर सुष्टाचा विजय व्हावा म्हणून तिथे प्रत्येक जण जात होता, ह्य़ा देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा म्हणून प्राण पणाला लावून अहिंसेच्या मार्गानं लढणाऱ्या अण्णांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी पाण्यापावसात धडपडत तिथे पोहोचत होता. लहान मुलं म्हणू नका, वयोवृद्ध म्हणू नका, अन तिथली गर्दी तर प्रामुख्यानं तरुणांचीच होती- प्रत्येक जण भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांच्या हाताला हात लावून ‘मम’ म्हणत भ्रष्टाचारमुक्त भारतनिर्मितीच्या कामी आपापला खारीचा उचलतोय. दिल्लीतल्या रामलीला मदानात जणू वणवा पेटलाय आणि त्यात भारतवर्षांतलं जे जे मलीन, अमंगल, ते ते सारं जळून जाणार आहे. एका नव्या युगाची ही नांदी आहे.एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने;अशी तुतारी द्या मजलागुनि.अवकाशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारितां जीला जबरी-कविवर्य केशवसुतांची अजरामर तुतारी दिल्लीत अण्णांच्या रूपानं निनादली. या युगातल्या महात्म्यानं दिलेल्या हाकेला ओ देत लहान म्हणू नका, तरुण म्हणू नका, वयानं ज्येष्ठ म्हणू नका- सारे एका अनावर ओढीनं, उत्स्फूर्तपणे अण्णांना साथ देण्यासाठी रामलीला मदानाकडे निघाले. ‘अण्णा नहीं आँधी है, देश का दुसरा गांधी है’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमला. त्यांच्यावर कुणी जंतरमंतर केलं नव्हतं की तिथे झुंडीच्या झुंडींनी जायला कुणी त्यांना सक्ती केली नव्हती. पण ती तरुणाई कुठल्याशा अंत:प्रेरणेनं अण्णांकडे धाव घेत होती. ती ‘मास फ्रेन्झी’ कुठल्या वेडातून आलेली नव्हती. शनिवार- रविवार- सोमवार या सलग आलेल्या सुट्टय़ांच्या दिवशी तर तिथे जनतेचा महासागर लोटला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जंतरमंतरवर उसळलेल्या गर्दीकडे त्यावेळी सरकारनं दुर्लक्ष केलं असतं आणि सरकारनं जनतेच्या भावनांना कमी लेखलं असतं, कदाचित अण्णांना काही त्रास झाला असता वा त्यांची प्रकृती बिघडली बिघडली असती, तर तिथे काहीही होऊ शकलं असतं. बहुधा तेव्हा त्याच भावनेतून सरकारनं पावलं उचलली नी अण्णांच्या साऱ्या मागण्या मान्य केल्या होत्या, तसं सूचनापत्र जारी केलं होतं. अण्णांनी तेव्हा आपलं उपोषण ९७ तासांच्या उपवासानंतर सोडलं, देशभरात आनंदाला उधाण आलं. मात्र हा काही या लढाईचा अंत नाही. ही तर सुरुवात आहे, हे लवकरच सर्वाना उमगलं. बिल बनेल, पास होईल, त्याचा कायदा होईल, पण तोवर कमालीच्या जागृत झालेल्या तरुणाईनं या देशातून भ्रष्टाचार समूळ उपटून फेकायचं केवढं मनावर घेतलंय, हे समस्त फेसबुक, ट्विटर, ऑर्कुटवासीयांना वेगळं सांगायची गरज नाही.फेसबुकच्या माध्यमातून, तरुणाईच्या चष्म्यातून आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन खरं तर हे आंदोलन जवळून अनुभवता आलं. भारतात प्रत्येक व्यक्ती एकेकटी उत्कृष्ट काम करते असं म्हटलं जातं. पण तेच त्यांना एकत्रितपणे काम करायची वेळ आली, की पार वाट लागते, अशी बाहेरच्या लोकांची एक धारणा आहे. मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात लोक एकजूट झालेले आहेत. दिल्लीतच नव्हेत; संपूर्ण भारतभर लोक-विशेषत: तरुण अण्णांच्या हाकेला ओ देऊन, जमेल त्या मार्गानं भ्रष्टाचाराच्या विरोधातला आपला आक्रोश व्यक्त करताहेत. पूर्वी भारताचं स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन चिरडायचा गोऱ्या इंग्रजांनी निकरानं प्रयत्न केला होता, तसंच भ्रष्टाचारमुक्तीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आपलं सरकार - हे काळे इंग्रज करीत असल्याचं डिव्हाइड अ‍ॅण्ड रुल हे इंग्रजांचं तंत्र हेही आचरणात आणीत असल्याचं अगदी प्रत्येकाला वाटतंय. त्या काळात संपर्काची साधने नव्हती, प्रत्यक्ष व्यक्तीच्या हाती निरोप धाडावा लागायचा. एवढंच काय, पोळ्यांच्या (चपात्या) माध्यमातून संदेशांची गुपचूप देवाण-घेवाण व्हायची! आता ज्या क्षणी विचार मनात येतो, अथवा घटना घडते, त्या क्षणी अन्य लोकांना ट्विटर, फेसबुक अथवा एसएमएसच्या माध्यमातून कुठलाही हो-हल्ला न करता ते सारं कळवता येतं. प्रत्येक पिढीची जीवनशैली, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, म्हणून तर समाजात सतत बदल घडून येत असतात. अन्यथा हा समाज एकसाची झाला असता. आजची युवापिढी टेक्नोसॅव्ही आहे. जन्मत:च शिकून आल्याप्रमाणे मोबाइल आणि कॉम्प्युटर ही प्रगत तंत्रज्ञानाची साधनं मोठय़ांपेक्षाही प्रभावीपणे त्यांना हाताळता येतात. अद्याप बालवाडीतही न जाणारी मुलं सराईतपणे मोबाइल नंबर मिळवतात, एबीसीडी येत नसतानाही कम्प्युटरचा पासवर्ड अचूक टाइप करतात.. हे बघता ह्य़ा पुढच्या पिढीची संपर्काची माध्यमं आता आहेत, त्यापेक्षाही प्रगत राहणार, नी त्यांच्या अभिव्यक्तीची पद्धतही वेगळीच असणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात या तमाम युवावर्गानं एकमेकांशी फेसबुक, ट्विटर या माध्यमातून संपर्क साधत मेणबत्ती मोर्चा काढला नी आपला पाठिंबा अण्णांना दिला, तर बिघडलं कुठे? मेणबत्ती संप्रदाय अशी त्याची खिल्ली उडवत काही लोकांनी त्यांना कमी लेखलं, हे म्हणजे ज्यांना काळाबरोबर चालता येत नाही, त्यांनी आमच्या वेळी हे असं नव्हतं.. असा सूर लावत प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधण्यासारखं झालं. मेणबत्ती संप्रदायातले तर मेणबत्ती संप्रदायातले! मात्र ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या एखाद्या मेणबत्ती मोर्चात भाग घेतला असेल, त्यांनाच कळू शकेल, की एवढा हजारोंचा जमाव एका हजारेसाठी का एवढा असोशीनं चालला आहे ते. एक शब्द न बोलताही सगळे काही ये हृदयीचे ते हृदयी पोहोचते. तानपुऱ्याची जव्हार उत्तम जुळल्यावर तो सुरेल लागलेला तानपुरा ऐकताना जसा एक अवर्णनीय आनंद होतो, अगदी तोच आनंद मी मेणबत्ती मोर्चात हजारो आबालवृद्धांबरोबर चालताना अनुभवलाय. ही युवा पिढी कुणाचे ऐकत नाही. आपले शिक्षक, प्रोफेसर्स, आईवडील, इतर वडीलधारी मंडळी वगरेंबद्दल त्यांना मुळीच आदर नसतो अशी सर्वत्र ओरड होत असताना एक ७४ वष्रे वय असलेला माणूस त्यांच्यावर गारुड कसं काय करू शकतो?पूर्वी भारताचं स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन चिरडायचा इंग्रजांनी निकरानं प्रयत्न केला होता, तसंच भ्रष्टाचारमुक्तीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आपलं सरकार - करीत असल्याचं प्रत्येकाला वाटतंय. मेरे प्यारे देशवासियों, हमारी लडमई किसी दल या नेता के खिलाफ नहीं है. हम सत्ता नहीं, व्यवस्था बदलना चाहते है. एक भ्रष्टाचारमुक्त भारत चाहते है. देश के लोगों की मांग है की भ्रष्टाचार के खिलाफ एक ऐसा मजबूत जन लोकपाल कानून लाया जाये जिस के तहत जांच जल्दी पूरी हो, भ्रष्टाचारी जेल जाये, उनकी संपत्ती जब्त हो और उन्हें नौकरी से निकाला जाये. क्या हम कुछ गलत मांग रहे हैं?’’ अण्णा विचारतात. ‘‘दोन महिने चर्चा चालली. मात्र सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध पाऊल उचलायला सुद्धा कांकूं करते आहे. सरकार की नीयत ठीक नही है. अगर सरकार एक सख्त और स्वतंत्र लोकपाल कानून नहीं लाती, तो हम १६ अगस्त से फिर आमरण अनशन पर बठेंगे. इस पर हमें धम की दी जा रही है की हमे भी वैसेही कुचल दिया जायेगा, जैसे रामदेव बाबा के शांतीपूर्ण आंदोलन को बर्बरता से कुचला गया था. अगर १६ अगस्त को अनशन करोगे तो कुचल दिये जाओगे ऐसा उनका कहना हैं. जंतर मंतर पर धारा १४४ लगा देंगे ऐसा उन का सोचना है. पर मेरा कहना है- हर भारतवासी सडम्क पर उतर आए, घर के सामने, अपने मोहल्ले में, चौराहे पर, पूरा देश यदी हाथों में तिरंगा झंडा उठाकर ‘भारत माता की जय’ का नारा लगाते हुए सडम्कों पर उतर आए, तो उनकी पुलिस और लाठियां भी कम पडेंगी.’’ अण्णा त्यावर उतारा सांगतात.रामदेव बाबांचं आंदोलन चिरडलं तसं अण्णांचं आंदोलनही हा हा म्हणता चिरडून टाकू असा सरकारचा पवित्रा होताच. एक फरक मात्र खरोखरी ह्य़ा दोन्ही आंदोलनकर्त्यांमध्ये होता. अण्णांच्या आंदोलनात सहभाग हा प्रामुख्यानं पोटतिडकीनं आलेल्या शिक्षित, सुसंस्कारित आणि टेक्नोसॅव्ही अशा युवावर्गाचा आहे. ग्रामीण ते शहरी असा सर्व चेहऱ्याचा हा युवावर्ग आहे. रामदेव बाबांचा आंदोलनकर्ता वर्ग हा मुख्यत्वे अगदी ग्रामीण होता आणि वयानं मोठे असलेल्यांचा होता, सगळेच काही शिक्षित नव्हते. शिवाय साध्य भलेही एक असेल, साधन आणि साधना या दोन्ही आंदोलनात भिन्न असल्याचं जाणवत होतंच. अण्णांचं सच्चेपण थेट हृदयापर्यंत पोहोचणारं.. रामदेवबाबांच्या त्या आंदोलनात याचाच तर अभाव होता.रामदेव बाबांचं आंदोलन चिरडलं तसं अण्णांचं आंदोलनही हा हा म्हणता चिरडून टाकू असा सरकारचा पवित्रा होताच. एक फरक मात्र खरोखरी ह्य़ा दोन्ही आंदोलनकर्त्यांत होता. आणि मग काँग्रेसच्या नेत्यांची बेताल वक्तव्ये सुरू झाली. अण्णांच्या आंदोलनासाठी एवढा अमाप पसा येतो कुठून असा सवाल उपस्थित करून अण्णा घटनाबाह्य़ मागणीसाठी आंदोलन करीत आहेत, देशाला अस्थिर करण्यासाठी काही शक्ती एकत्र आल्या आहेत, लोकपालाच्या नावाखाली अण्णांना टीव्हीच्या कॅमेऱ्यापुढे दिसण्यासाठी यायचे आहे, असे आरोप केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी लावले. आम्हाला हवे तेच विधेयक संसदेने पारित करावे, आम्हाला घटना मंजूर नाही असेच अण्णांना म्हणायचे आहे, यापेक्षा घटनाबाह्य़ वर्तन दुसरे कुठले असू शकत नाही, वगरे बरंच काही सिब्बल म्हणाले. गम्मतच आहे.. आंदोलनासाठी एवढा पसा येतो कुठून हे अण्णांना विचारायच्या आधी निवडणुकांसाठी एवढा पसा येतो कुठून असं जर त्यांनी आमदार-खासदारांना दरडावून विचारलं असतं नी हिशेब मागितले असते, तर अण्णांना विचारायची वेळच नसती आली. ‘‘अण्णा हजारे राज्यघटनेला आणि संसदेलाच आव्हान देत आहेत, विधेयके कुणाच्या मर्जीने पारित होत नाहीत, आपल्या इच्छेनुसार कायदा करण्यासाठी कोणीही आग्रह करू शकत नाही. कायदा करण्याचे काम संसदेचे आहे, अण्णा संसदेच्या घटनेलाच आव्हान देत आहेत, ते अजिबात स्वीकारार्ह नाही,’’ असे लोकसभेचे नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले. अण्णाच नखशिखांत भ्रष्ट असल्याचा आरोप करून देशात अण्णांना अस्थर्य माजवायचे आहे वगरे वगरे बरेच काही काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले- त्यांना नंतर अण्णांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी आपल्या बेताल वक्तव्यांबद्दल जाहीर माफीही मागावी लागली. अण्णांनी मात्र ते सारे आरोप फेटाळून लावले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून सरकारने बदनाम करायचा प्रयत्न केला. आतापर्यंत मीच तेवढा वाचलो होतो, आता माझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप सरकारनं केले. मागच्या आंदोलनानंतर सरकारने माझ्या गावी सीए पाठवले, कागदपत्रे गोळा करून नेली, तरीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सरकारमध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरुद्ध घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करावा, असं परखड आव्हान त्यांनी दिलं. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, ‘‘भारताच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करण्यासाठी काही लोक गडबड करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण आम्ही तसे घडू देणार नाही.’’ नंतरचा घटनाक्रम सर्वविदित आहे. खूप नियम-अटी घालून दिल्यावर जयप्रकाश नारायण पार्कमध्ये आमरण उपोषणाला बसण्याची परवानगी दिल्ली पोलिसांनी अण्णांना नाकारली, ते राजघाटावर गेले नी त्यांनी अडीच तास ध्यानधारणा केली, नंतर उपोषणासाठी बाहेर पडत असताना लिफ्टमध्येच अण्णांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नी त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं तिहार जेलमध्ये कॉमन-वेल्थ हडपणाऱ्या सुरेश कलमाडी आणि भ्रष्टाचाराचा टू वाईड स्पेक्ट्रम असलेल्या ए. राजा अशा घोटाळेबाज भ्रष्टाचारी लोकांच्या शेजारी ठेवून आपल्या अपरिपक्व बुद्धिमत्तेचं जाहीर प्रदर्शनसुद्धा केलं.भारताच्या इतिहासातल्या ह्य़ा दुसऱ्या ऑगस्ट क्रांतीला बळ देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. मात्र तोवर अण्णांच्या देशभर पसरलेल्या समर्थकांना हे कळताच ते सारे तिहार जेलच्या समोर आणि अन्यत्र एकवटले, आपली तीव्र नाराजी अतिशय शांततापूर्ण मार्गानं व्यक्त करू लागले. थोडक्यात, भारताच्या इतिहासातल्या ह्य़ा दुसऱ्या ऑगस्ट क्रांतीला बळ देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले; तर पोलिस त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी! तो जनक्षोभ पाहून सरकारनं रात्री त्यांची तिहारमधून सुटका केली, पण त्यांनी आपल्या अटींवर ठाम राहात तुरुंगातून बाहेर पडण्यास नकार दिला आणि तिहार जेलच्या परिसरात त्यांना दिलेल्या कक्षात आपले उपोषण आणि आंदोलन जारी ठेवले. तिहारच्या बाहेर जनप्रवाहो लोटला. अण्णांना क्रांतिवीर म्हणणे अतिशयोक्ती होईल कदाचित, पण इंग्रजांना या देशातून हाकलून लावणे जितके कठीण होते त्याहीपेक्षा या देशात रुजलेल्या भ्रष्टाचाराला मुळासकट उपटून त्याचा नायनाट करणे म्हणजे त्याहीपेक्षा महाकठीण कर्म आहे. इतका तो लोकांच्या हाडामांसात, रक्तात भिनलाय. संसदेत विरोधी पक्षसुद्धा आधी गुळमुळीत भूमिका घेऊन बसले होते, अळीमिळी गुपचिळी करून बसले होते. त्याअर्थी इतर बाबतीत ते कितीही जानी दुश्मन असले तरी ‘ह्य़ा एका’ बाबतीत ते चांगले जिगरी दोस्त असतात.
‘‘
तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्षनेते दूध के धुले हुए है? सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ते सातरंगी असतील तर हे एकरंगी आहेत, एवढाच फरक.’’ अण्णांच्या आंदोलनातला एक समर्थक मला म्हणू लागला, ‘‘सब का परसेण्टेज सेट रहता है. तशीच प्रत्येक गोष्टीला किंमत असते.. चिल्लाने का दाम अलग, ना चिल्लाने का अलग.. राजकारणातले सगळेच भ्रष्ट असताना पुढे येऊन कोण सांगायला धजणार आहे की, हो हो सगळ्यांना लोकपालच्या अमलाखाली आणा म्हणून. आज ही मंडळी जात्यात आहेत, नी ती सुपात, पण उद्या आपणही भरडले जाऊ हे त्यांनाही चांगले ठाऊक आहे.’’गांधीजी म्हणायचे, स्वातंत्र्य मिळालं, पण जोवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हातात सत्ता येत नाही, तोवर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार नाही. मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण कुठे झालंय, नी सत्ता तळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कुठे पोहोचलीय?अखेर सरकारनं अण्णांना रामलीला मदानावर २ सप्टेंबपर्यंत उपोषण करायची परवानगी दिल्यानंतर ६७ तासांनंतर अण्णा तिहारमधून बाहेर पडले आणि उपोषण सुरू झाल्यावरच्या चौथ्या दिवशीपासून रामलीला मदानावर ‘जन लोकपाल लाओ या जाओ’ असा नारा देत त्यांचा हा सत्याग्रहाचा लढा आणखी तीव्रतेनं सुरू झाला. रविवारी २१ ऑगस्टला अक्षरश: लाखो लोकांनी रामलीला मदानाकडे धाव घेतली, तो नजारा टिपायला टीव्ही चॅनेल्सचे कॅमेरेसुद्धा तोकडे पडले. लोकांनी लगे रहो मुन्नाभाईच्या धर्तीवर खासदारांच्या दरवाजावर ‘गेट वेल सून’ संदेशादाखल फुले पाठवली. गावात, शहरात शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातले फलक घेऊन निषेध मोच्रे काढले. चिमुरडी पोरेसोरेही ‘अण्णा तुम आगे बढमे, हम तुम्हारे साथ है’ म्हणत पुढे सरसावली. युवकांनी बाइक रॅलीज काढल्या, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मूठभर लोक वगळता यच्चयावत जनता नी सबंध देश अण्णांच्या ह्य़ा अिहसक आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली.आंदोलन आणि उपोषण नवव्या दिवशीही सुरूच असताना अण्णांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच काळजीही होती. थोडेसे मलूल दिसत असले तरीही अण्णांनी २४ ऑगस्टला मंचावरून खूप जोशपूर्ण भाषण केलं. ‘‘देशासाठी १८५७ ते १९४७ ह्य़ा काळात लोकांनी किती बलिदान दिलंय. गांधीजी म्हणायचे, स्वातंत्र्य मिळालं, पण जोवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हातात सत्ता येत नाही, तोवर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार नाही. मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण कुठे झालंय, नी सत्ता तळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कुठे पोहोचलीय? सत्ता तर मंत्रालयातच केंद्रित ठेवलीये.. ही लोकशाही नाहीय. ही तर पुढारीशाही, हुकुमशाही आहे. जनतेला निर्णय घेण्याचा अधिकार कुठे आहे? अधिकारी आणि जनप्रतिनिधी हेच निर्णय घेतात, जनतेचा पसा खर्च करायचा निर्णय हेच लोक घेतात. महागाई वाढतेय, सर्वसामान्य माणसाला छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी विनाकारण खेटे घालायला लावलं जातंय.. अरे, एअरकंडिशण्ड घर- गाडी- ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना काय कळणार गरिबांच्या व्यथा? प्रसूतीवेदना गर्भवतीलाच कळणार.. पाकिस्तान की गोली का निशान है मेरे सर पर. एक वह लडमई मने लडम्ी थी, अब ये दूसरी लडमई मं लडम् रहा हूँ, घर में छिपे दुश्मनों से, गद्दारों से. पार आखिर शरीर है. देश की भलाई के लिए, जनता की भलाई के लिए मुझे मृत्यु भी आई, तो वह मेरा सौभाग्य है.’’अण्णांच्या आंदोलनाला गेलेला एक पोरसवदा मुलगा उद्वेगानं म्हणत होता, "It takes years to hang Kasab, months to arrest Kalmadi, but minutes to arrest Anna! This is our democratic India!" दुसऱ्यानं ‘कलयुग की गाथा’ ऐकवत म्हटलं, ‘‘श्री रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आयेगा कसाब खायेगा बिर्यानी, और अन्ना भूखा रह जायेगा.’’ तिसऱ्यानं मुक्तछंदातली एक कविता लिहिलेला फलक हाती घेतला होता-
‘‘
कितना अजीब है न ये आदमी!कोई बस नहीं जलायी ..रेल की पटरी नहीं उखाडी..जबरदस्ती दुकानें बंद नहीं करवायी..मजदूरों के चूल्हे भी नहीं बुझने दिये..चक्का जाम में फंसी किसी महिला के
सडम्क पर बच्चे को जन्म देने की
कोई खबर भी नहीं आयी..पर वाह! क्या जबरदस्त आग लगायी!दिलों में जगी उम्मीदें और आग को अब हम नहीं बुझने देंगे!’’अगदी हेच आव्हान अण्णांनी समस्त तरुणाईला आणि समोरच्या सगळ्यांना उपोषणाच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी केलं- ‘‘क्रांती की मशाल आपने जो जलायी है, उसे जलने देना, बुझने नहीं देना. अन्ना रहे या न रहे!’’ आज गरिबांना जगणं कठीण झालंय. ‘माल खाये मदारी, नाच करे बंदर’ अशी शेतकऱ्यांची गत झालीय या आपल्या कृषिप्रधान देशात. राबायचं त्यांनी, मलिदा आणखी कुणाला खायला मिळणार. आपल्याला हे बदलायचं आहे. काही लोक जगण्यासाठी खातात, तर काही जण खाण्यासाठी जगतात. काही लोकांना काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि काही लोकांना काय काय खाऊ हा प्रश्न पडतो.. आपल्याला हे सारं बदलायचंय..दरम्यान अण्णांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करीत सरकारनं एका आदर्श मंत्र्याला वाटाघाटीसाठी, मध्यस्थी करण्यासाठी अण्णांकडे पाठवलं होतं. त्यांच्या हाती अण्णांनी सरकारला संदेश पाठवला होता नी तीन मुद्दे संसदेत चच्रेसाठी आणण्याचं सुचवलं होतं. त्या अनुषंगानं ते पुढे सांगतात- ‘‘माझ्या नजरेसमोर गरीब माणूस आहे. ते तीनही मुद्दे- ते तीनही प्रश्न गरिबांचे प्रश्न आहेत. पहिला मुद्दा आहे, गावातल्यापासून ते मंत्रालयापर्यंत सगळे अधिकारी लोकपालच्या कक्षेत आणा. आज सामान्य माणसाला एखाद्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. एखादा माणूस माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती घेण्यासाठी एखाद्या कार्यालयात जातो. तो ग्रामसेवकाकडे जातो, बीडीओकडे जातो, कुणीच त्याचं ऐकत नाहीत.. करीत करीत मग तो कमिशनरकडे जातो, तिथेही त्याचं म्हणणं कुणी ऐकत नाही. मग तो मंत्रालयात जातो. तिथे तर काय, सगळेच मुके-बहिरे होऊन बसलेले लोक आहेत. हे सगळे अधिकारी लोकपालच्या कक्षेत आल्यावर कुणी भ्रष्टाचार केला, तर लोकपाल त्याची चौकशी करेल. भ्रष्टाचार केला असेल, तर त्याची नी त्याच्या पत्नीची, मुलांची प्रॉपर्टी जप्त करून त्यानं जनतेचा खाल्लेला पसा त्याच्याकडून वसूल करून जनतेला परत केला जाईल. लोकांची कामं कम्प्युटरमध्ये फीड केली जातील. लोकांना कार्यालयात नाहक खेटे मारावे लागणार नाहीत. दुसरा मुद्दा आहे प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणण्याचा. लोकपाल केंद्रात असेल, आणि लोकायुक्त राज्यांत. जितके अधिकार केंद्रातल्या लोकपालाला असतील, तेवढेच राज्यांतल्या लोकायुक्तांना असतील. ते स्वायत्त असतील, सरकारच्या अंतर्गत असणार नाहीत. कुणाचीही चौकशी करण्याचा त्यांना अधिकार असेल. प्रत्येक कार्यालयात बोर्डवर लिहावं लागेल की इथे इतके लोक काम करतात, अमुक काम इतके दिवसांत होईल. न झाल्यास त्या संबंधित अधिकाऱ्याकडून दंड वसूल केला जाईल. आज काय होतंय, जनतेचा ७५ टक्के पसा यांच्या कार्यालयांवर, घरांवर खर्च होतो. उरलेल्या २५ टक्के पशापकी १५ टक्के भ्रष्टाचार होतो. मग विकासासाठी पसा किती उरला? आज कर्ज घेऊन विकास केला जातोय.’’ अण्णा सांगतात. त्यांचा तिसरा मुद्दा सिटिझन चार्टरचा.अण्णांनी समस्त तरुणाईला उपोषणाच्या दहाव्या दिवशी आवाहन केलं- ‘‘क्रांती की मशाल आपने जो जलायी है, उसे जलने देना, बुझने नहीं देना. अन्ना रहे या न रहे! अण्णांच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. भ्रष्टाचाराची कीड समूळ उपटून टाकण्याचे निकराचे प्रयत्न करण्याऐवजी ते करीत असल्याचा आभास निर्माण करीत सरकार आणि राजकीय पक्ष आता राजकीय गुंता निर्माण करतात आणि तो सोडवत बसण्याचं आणि जनतेला त्या गुंत्यात वेढून टाकणार असं चित्र त्यातून उभं करतात.देशाला बरबाद करणाऱ्या सगळ्या भ्रष्ट नेत्यांवर, मंत्र्यांवर आणि स्विस बँकेत काळा पसा ठेवलेल्यांवर अगदी जराही मुलाहिजा न ठेवता नावासकट एकेकाला दूषणे देत ह्य़ा सरकारवर आणि जे सत्तेत आहेत, त्यांच्याविषयी पूर्ण अविश्वास यावेळी लोकांनी दाखवला. निवडणुकीत काँग्रेसला मतदार चांगलाच हात दाखवणार आहेत, असं मत आता पहिल्यांदा मतदान करण्यासाठी पात्र ठरणार असलेल्या आणि त्यामुळे मतदानासाठी उत्सुक असलेल्या नवयुवकांनी मांडलं. मात्र त्यांना विकल्प म्हणून उभे राहण्यासाठी स्वच्छ शुद्ध आचरण असलेले नेते आहेतच कुठे असंही काहींनी म्हटलं.नंदन निलेकणी यांनी आपल्या kImagining Indial ह्य़ा पुस्तकात लोकसंख्या, शिक्षण, तंत्रज्ञान इंग्रजीवर असलेलं आपलं भारतीय लोकांचं प्रभुत्व, आरोग्य, आपली इकॉनॉमी, या सर्वावर अतिशय विस्तृत नी सांगोपांग चर्चा केली आहे. भारत जगातली महासत्ता होण्याच्या दिशेनं झेप घेत आहे, असं अतिशय सकारात्मक चित्र त्यात आहे. एखादी बुद्धिजीवी व्यक्ती अगदी मुद्देसूद विश्लेषणासह हे सांगतेय, त्याअर्थी त्यात तथ्य आहे. असे असताना भ्रष्टाचाराच्या गुंत्यात अडकवून भारताला आपणच पुढे जाऊ द्यायचे नाही, असे ठरवायचे की गगनभरारी घेऊ द्यायची, हे आपणच ठरवायचं आहे

‘‘