Total Pageviews

Showing posts with label CBRN MEASURES. Show all posts
Showing posts with label CBRN MEASURES. Show all posts

Friday, 3 April 2020

*जैविक युद्ध*तिसऱ्या महायुद्धाचा ऐक भाग*-FORWARD WHATS APP


"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

               चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.

               जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.

               *आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं*....???
               *आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. *मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. *युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे

Monday, 30 March 2020

एकच प्याला द्या मज पाजुनी!-tarun bharat- 30-Mar-2020 विजय कुलकर्णी


‘लॉकडाऊन’च्या या परिस्थितीत अशा तळीरामांना व्यसनमुक्त करण्याऐवजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी मात्र भलतीच भानगड केली. त्यामुळे देशातील सर्वात सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याने कसे वागू नये, याचा तंतोतंत आदर्शच या महाशयांनी घालून दिला.




‘लॉकडाऊन’ला अवघे सहा दिवस होत नाही, तोवर तळीरामांची चलबिचल सुरू झाली. कारण, राज्यातीलच नव्हे, तर देशातील दारूच्या दुकानांवरही गंडांतर आले. मागच्या दाराने दारूच्या बाटल्या रिचवणार्‍यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यामुळे काही तळीरामांचा जीव कासावीस झाला. एक प्याल्याशिवाय जगणेच जणू अशक्य म्हणून त्यापैकी काही अगदी भान हरपून बसले. त्यांचे होश, चैनबैन सगळे काही सहा दिवसांत भंग पावले. देवदास उदास झाले. देशभरात कमीअधिक प्रमाणात अशा तळीरामांचा एक प्याला सोडा, एक मद्याचा थेंबही घशाखाली न गेल्यामुळे मन पुरते बिथरले. पण, या सगळ्यात कहर केला तो केरळने. होय, देशातील सर्वात सुशिक्षित राज्यात या ‘लॉकडाऊन’ दरम्यान हाती एकही प्याला न आल्याने तब्बल नऊ जणांना आपले जीव गमवावे लागले. यापैकी सात जणांनी चक्क आत्महत्या केली, एकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि एका महाशयांना तर दारूची इतकी तलफ लागली की शेव्हिंग लोशनची बाटलीच थेट ‘देशी’ समजून गटागट गिळली.

म्हणजे कोरोनामुळे जितके मृत्यू केरळमध्ये ओढवले नाही, त्याहीपेक्षा अधिक तळीरामांनी एकही प्याला न मिळाल्याने स्वतःच मृत्यूच्या बाटलीत उडी मारली. बर्‍याच जणांनी सरकारकडे दारूची दुकानेही पुन्हा उघडण्याची मागणी केली. पण, अखेरीस ती मागणी पूर्ण न झाल्याने तळीरामांनी आपल्या जीवाला राम राम ठोकला.
खरं तर केरळची २०१८ सालची आकडेवारी लक्षात घेता, २ लाख नागरिकांना दारूच्या समस्येने ग्रासले असल्याचे समजते. त्यापैकी काही हजार तळीरामांना दारू मिळाली नाही तर डिप्रेशन, फिट्स असा त्रास संभवतो, असेही या सर्वेक्षणात सांगण्यात आले. यावरून केरळमधील परिस्थितीची भीषणता ध्यानात यावी. महसुलाच्या बाबतीतही २०१८-१९ या आर्थिक वर्षात दारूतून राज्य सरकारला मिळालेले उत्पन्न होते २५२७ कोटी आणि विक्री होती १४ हजार, ५०८ कोटी.

‘लॉकडाऊन’च्या या परिस्थितीत अशा तळीरामांना व्यसनमुक्त करण्याऐवजी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी मात्र भलतीच भानगड केली. त्यामुळे देशातील सर्वात सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्याने कसे वागू नये, याचा तंतोतंत आदर्शच या महाशयांनी घालून दिला. तेव्हा, अशा या मुख्यमंत्र्यांचा सल्ला आणि त्यावरील इलाज वाचून डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही.

रोगापेक्षा मुख्यमंत्रीच भयंकर !


देशाचा पंतप्रधान, तसा राज्याचा मुख्यमंत्री. आपल्या राज्याच्या जनतेच्या बर्‍यावाईटाचा, सुखदु:खाचा तोही भागीदार, खासकरून अशा आरोग्य आणीबाणीच्या काळात. परंतु, केरळच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी तळीरामांच्या समस्येवर सूचवलेल्या उपायाने रोगापेक्षा इलाज नाही, तर ‘रोगापेक्षा मुख्यमंत्रीच भयंकर’ अशी परिस्थिती केरळमध्ये निर्माण झाल्याचे दिसते.


दारू मिळाली नाही म्हणून केरळमध्ये नऊ लोक दगावले. यावर देशातील सर्वाधिक सुशिक्षित राज्य म्हणून एरवी मिरवणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तसाच उपाय शोधायला पाहिजे होता. पण नाही, या मुख्यमंत्री महाशयांनी अक्कल गहाण ठेवूनच चक्क एक अजब सूचना केली. केरळचे मुख्यमंत्री म्हणतात, “डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर संबंधिताला दारू हवी असल्याचे लिहून द्यावे, त्यानंतर त्या तळीरामाला दारू उपलब्ध करून दिली जाईल.” दारू विकत घेण्यासाठी कुठला डॉक्टर बरं प्रिस्क्रिप्शन देतो? अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा तळीरामांचे चोचले पुरवण्यासाठी त्यांना कागदावर दारू विकत घेण्याचे परवाने देत बसायचे काय? मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीच्या अशा बेजबाबदार विधानानंतर जर डॉक्टरांच्या क्लिनिकसमोर तळीरामांची प्रिस्क्रिप्शनसाठी झुंबड उडाली तर त्या अनियंत्रित गर्दीला जबाबदार कोण? याचा मुख्यमंत्र्यांनी क्षणभर तरी विचार केलेला दिसत नाही. ते तळीराम केवळ आपल्या पक्षाचे मतदार आहेत, म्हणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एका राज्याचा मुख्यमंत्री अशा कुठल्याही पातळीवर खाली उतरू शकतो, याचेच हे विदारक उदाहरण. एवढ्यावर हे मुख्यमंत्री थांबले नाहीत, तर ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्यायही म्हणे त्यांनी चाचपडून पाहिला. त्यामुळे एकीकडे देशभरात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी नागरिक झटत असताना केरळमधील या प्रकाराने सुशिक्षितांमागची अशिक्षित विचारसरणी समोर आली आहे. केरळच्या डॉक्टरांनी तसेच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नेही मुख्यमंत्र्यांच्या या अजब उपचारांना विरोध दर्शवित त्यांचाही समाचार घेतला आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेळीच स्वत:ला आवरावे आणि राज्यालाही सावरावे

Sunday, 29 March 2020

करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?'


जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीस आयुर्वेदाचा आधार देत खालील गोष्टी आपण करू शकता;

१. कामासाठी बाहेर निघताना दोन्ही नाकपुड्यांत कोमट केलेल्या देशी गायीच्या साजूक तुपाचे २-२ थेंब टाकणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

२. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.

३. कामावरून घरी आल्यावर कडकडीत पाण्याने अंघोळ करणे.

४. घरामध्ये कडुनिंब, धूप, देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर असा धूप घालणे. (खोकला येत असणाऱ्या व्यक्तींपासून दूर ठेवावे.)

५. आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास रुमालाचा वापर करणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींशी बोलताना जास्त जवळ न जाणे.

६. सकाळच्या वेळी कपभर देशी गायीच्या गरम दुधात हळद आणि सुंठ घालून पिणे. (सर्दी असल्यास टाळावे.)

७. 'मला एक बाईट/सिप दे ना' म्हणत म्हणत इतरांचे उष्टे खाणे, चहा इत्यादि पिणे सक्तीने टाळावे.

८. भाज्या आणि फळे व्यवस्थित धुवून मगच वापरावी. बाहेर मिळणारे सॅलड्स, सँडविच, फ्रुट डिश इत्यादि पदार्थ टाळावे.

९. नाक, तोंड आणि डोळे यांना शक्यतो हाताने स्पर्श करू नये. करायचा झाल्यास हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करावी.

१०. सध्या काहीकाळ तरी सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्या वैद्यांना त्वरित भेटणे.

आयुर्वेद सांगतो; जनपदोध्वंसापूर्वीच औषधींचा संग्रह वैद्यांनी करून ठेवावा. निसर्गाशी जवळीक साधली की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. देशी गायींबाबत काम करत असल्याने अशा संकटाची थोडीशी चाहूल लागली होती. वर दिलेल्या दहा टिप्स मी सोशल मीडियावर २५ जानेवारी रोजी शेयर केल्या होत्या. त्यावेळेस त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत; कारण भारतात करोनाचा प्रवेश होईल असं कोणालाही वाटत नसावं!

जनपदोध्वंसावर काही उपाय आहे का? चरक सांगतात; अर्हता पाहून पंचकर्म देणे आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेत राहणे हा उत्तम उपाय आहे. 'च्यवनप्राश दीर्घकाळ सेवन करण्याची गोष्ट आहे; महिनाभरापुरती बाब नाही.' अशीही पोस्ट च्यवनप्राश बनवला होता तेव्हा केली होती. आज त्यांचंही महत्व आपल्याला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधर्माचरण सोडायला हवं. फार खोलात जाऊ नका; किमान आपल्या वैद्यांना भेटून आयुर्वेदाला अपेक्षित दिनचर्या-ऋतुचर्या जाणून घ्या आणि आचरणात आणायला सुरुवात करा. जगभरात संशोधन करून आज हे सांगितलं जात आहे की प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाची मारकता घटेल. आयुर्वेद हे कित्येक शतकं सांगतोय. आज हळदीची मागणी वाढते आहे. यावर्षीची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. जग आयुर्वेदाकडे आशेने बघतंय. आपण करंटेपणा कधी सोडणार? आयुर्वेद ही आपली जीवनशैली आणि पहिली चिकित्सापद्धती बनवा. वैद्य बांधवांनीदेखील 'करोना काय करणार?' हा निष्काळजी पवित्रा ते 'करोना आणि आयुर्वेद यांचा काय संबंध?' हा नकारात्मक पवित्रा सोडायला हवा. हीच वेळ आहे घराघरांत आयुर्वेद नेण्याची. चला; या जनपदोध्वंसावरून तरी काही बोध घेऊया!

Saturday, 28 March 2020

आपणच बना आपले रक्षक! -ARVIND SURVE -TARUN BHARAT

कोरोना व्हायरसने सध्या धुमाकूळ घातला आहे. ही वैश्विक महामारी झाली आहे आणि जगभरात त्यात हजारो बळी गेले आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या परीने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती करत आहे. पोलिसांच्या गाड्या रस्तोरस्ती आवाहन करत फिरत आहेत. मात्र, लोकांना त्याचे गांभीर्य कळले असल्याचे अद्याप दिसत नाही. अजूनही लोक ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा पद्धतीने निर्धास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. १०-१५ मिनिटांत ३-३ वेळा इमारतीतून खाली येऊन काही कामानिमित्त रस्त्यावर येत आहेत. काही जण एखाद्या वसाहतीच्या गेटवर गप्पा छाटत बसलेले दृष्टीस पडते.


याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे, काही महिला कोरोनाचे संकट ही संधी समजून संचारबंदीच्या काळातही एक-दोघीच्या गटात नाचगाणी करत टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असल्याचे दृष्टीस पडत आहे. मुलांना रस्त्यावर खेळण्यासाठी सोडले जात आहे. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी पोलिसांना ‘१००’ नंबरवर कोणी फोन केल्यास तो नंबरही लागत नाही. पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेता आणि त्यांच्याकडे येणारा कॉल लक्षात घेता प्रत्येकाच्या कॉलला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बाळगणेही गैर आहे.


या आजारात कोरोना गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेद करीत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आपले रक्षक आपणच बनायचे आहे. शासनाचे प्रथम गर्दी न करण्याचे आवाहन केले, जमावबंदी केली, संचारबंदी केली. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे बंद करून शेवटी ‘लॉकडाऊन’ केले. पण, लोकांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही.


पोलिसांच्या गाड्या खबरदारीच्या सूचना देण्यासाठी दररोज रस्तोरस्ती फिरत आहेत. तरीही लोक रस्त्यावर येत आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्व. दादा कोंडके यांनी त्यांच्या एका चित्रपटातील गीतात ‘माणसापरिस मेंढरं बरी’ असे म्हटले आहे. मेंढपाळाने मेंढरांना एका जागेवर बसवले तर ते त्याच परिघात फिरत बसतात. मेंढपाळाच्या बरहुकूम रस्त्याने जातात. मग आपण तर सर्व प्राण्यांत सुबुद्ध आहोत. शासनाचे हुकूम आपण नको का मानायला?


संवाद असू द्यावा!

कोरोना ही वैश्विक महामारी आहे. तो रोखण्यासाठी एकमेकांपासून लांब राहणे हाच एक पर्याय आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला. ही एक प्रकारची रंगीत तालीम होती. लोकांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वतःला बंदिस्त करून घेतले असले तरी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) मध्यरात्रीपासून देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत हा ‘लॉकडाऊन’ राहणार आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचे नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे बजावले आहे. या वैश्विक महामारीपासून स्वतःला वाचविण्यासाठी, कुटुंबाला वाचविण्यासाठी आणि देशवासीयांना वाचविण्यासाठी घराबाहेर पडणार नाही यासाठी प्रत्येकाने दरवाजाबाहेर लक्ष्मणरेषा आखून घ्यायची आहे, स्वतःच संकल्प करायचा आहे. जे देश आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षाही अधिक आधुनिक अशा आरोग्यसुविधा आहेत, अशा बलाढ्य देशांनाही या भयंकर आजाराच्या संकटाने सोडलेले नाही. एकमेकांच्या संपर्कात न येणे हाच यावर एक पर्याय आहे. जेथे या आजाराची गंभीर समस्या आहे, त्या प्रत्येक राज्याने ‘लॉकडाऊन’ केले आहेच. त्यामुळे देशवासीयांच्या हितासाठी पंतप्रधानांनी देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. कोरोनाची लागण होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणीच जाहीर केली. तरीही तेथे बळींची संख्या १,२८८ झाली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १३४ कोटींच्या आसपास आहे. त्यामानाने आपल्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशात हजारो बळी गेले आहेत. आजच्या घडीला जगभरात पाच लाख, २६ हजार कोरोनाबाधित आहेत. २३ हजार, ९५४ मृत्यू आहेत, तर एक लाख, २१ हजार, ९७८ रिकव्हर झाले आहेत. त्यापैकी भारतात ६९४ कोरोनाबाधित आहेत. १६ जण मृत पावले आहेत आणि ४५ जण रिकव्हर झाले आहेत. यापुढची पायरी आपण ओलांडायची नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारने सुसंवाद साधणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी सांगायचे, “लक्ष्मणरेषा आखा”, मुख्यमंत्र्यांनी म्हणायचे,“घाबरू नका”, त्यामुळे आजाराच्या गांभीर्याविषयी लोकांत संभ्रम निर्माण होतो आणि मंत्र्यांनाच लष्कर बोलावण्याचा इशारा द्यावा लागतो.



Friday, 27 March 2020

बंधूनो, हा संदेश संपूर्ण देशात आणि जगात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना पाठवा.* खूप महत्वाचे* *इटलीचा जगाला संदेश*उशीर होण्यापूर्वी पावलं उचलण्यास सांगितले:

*

इटलीचे एक पत्र,सर्वांसाठी शांती,आम्ही इटलीमध्ये राहतो - मिलान,
  या कठीण दिवसांमध्ये मी तुमच्या बरोबर आमच्या चुका सामायिक करीत आहे आणि समजावून सांगणार आहे की, “येथे जीवन मिलनमध्ये कसे आहे” आणि मला वाटते की आम्ही येथे ज्या चुका केल्या आणि त्यांचे झालेले दुष्परिणाम जगणे जाणून घ्यावेत.
  आम्ही सध्या अलग ठेवण्यात आलेलो आहोत. आम्ही घरातून बाहेर पडत नाहीत,
पोलिस सतत कार्यरत आहेत आणि घराबाहेर कुणी आल्यास त्याला अटक करत आहेत.
  सर्व काही बंद आहे! व्यवसाय, मॉल्स, स्टोअर्स, शाळा रस्ते सर्व निर्जन आहे.
  आमचे नष्ट होत असल्याची जाणीव होत आहे !!
  इटली, जगण्यात रंगत असलेला देश, एका क्षणापासून दुसर्‍या क्षणामध्ये परिवर्तित झाला आहे जणू तो युद्धाचा देश आहे.
  जन्मभरात आम्ही कधी असला विचारचं केला नव्हता
  लोक गोंधळलेले आहेत, दु: खी आहेत, चिंताग्रस्त आणि असहाय आहेत, त्यांच्यावर ही वेळ कशी आली आणि हे संपूर्ण भयानक स्वप्न कधी संपेल हे बर्‍याचदा समजत नाही.
     आमची सर्वात मोठी चूक अशी होती की पहिल्या हिटच्या वेळी आम्ही नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगत होतो, काम, मनोरंजन आणि साथरोगामुळे दिलेल्यासुट्टीच्या कालावधी आम्ही रस्त्यावर उतरुन मित्र आणि मेजवानीत एकत्र घालवला
  आमच्यातील प्रत्येकजण चुकीचा होता आणि म्हणूनच आम्हांवर ही वाईट वेळ आलेली आहे!
  आम्ही जगाला विनंती करतो की, सावधगिरी बाळगा, हा हास्य किंवा विनोदाचा विषय नाही.
  आपले प्रियजन, आपले आईवडील आणि आजी आजोबा यांचे रक्षण करा! हा रोग त्यांच्यासाठी धोकादायक आहे.
  येथे दररोज सुमारे 200 लोक पटापट मरत आहेत, कारण मिलानमधील एवढी औषधीही उपलब्ध नाही (मिलन येथे जगातीसर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या),परंतु प्रत्येकासाठीव आता वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे!
  कोण मरतील हे डॉक्टरचं ठरवतात!
हे केवळ सुरुवातीस आमच्या उदासपणामुळेच झालेलं आहे, आम्ही परिस्थितीची पर्वा न करता नेहमीप्रमाणे आपले आयुष्य चालू ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता!
  कृपया, आमच्या चुकांमधून तुम्ही शिका, आमचा एक छोटासा देश आहे जो एका महान शोकांतिकेच्या काठावर उभा आहे, ह्या चुका तुम्ही करू नका

आता चांगले ऐका ,,, 🙏 1.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
2.सार्वजनिक ठिकाणी काही खाऊ नका
3.यावेळी घरीच रहा!
4.आरोग्य मंत्रालयाची/प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे ऐका (ते विनोद करीत नाहीत!).
5.प्रत्येक व्यक्तीपासून एक मीटर अंतर ठेवा,
6.जवळ येऊ नका,
7.गोंधळ हकिंवा आणि गर्दी होऊ देऊ नका.
8.पूरक आणि प्रतिबंधात्मक उपचार मिळवा आणि इतरांच्या चुका जाणून घ्या.
9.आम्ही शिफारस करतो की आपण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या.
10. शासन आणि प्रशासन यांना साथीचा प्रसार रोखण्यात मदत करा ...

   आमचा संपूर्ण देश इटली एकांतवासात आहे, म्हणजे 60 दशलक्ष लोकांना अलग ठेवण्यात आलेले आहे!!
  जर आम्ही सुरुवातीपासूनच सूचना ऐकल्या असत्या तर हे टाळता आले असते.
  स्वतःची आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवनाची काळजी घ्या ❤❤

*जैविक युद्ध*तिसऱ्या महायुद्धाचा ऐक भाग*© सुमित शिर्के-RECEIVED ON WHATS APP


"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

               चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.

               जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.

               *आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं*....???
               *आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. *मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. *युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे*.



केंद्र सरकारचा ‘अर्थ’दिलासा-tarun bharat-editorial


    दिनांक  27-Mar-2020 19:42:45
कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार गरीब, महिला, मजुरांची काळजी घेतानाच मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभे असल्याचेही या सगळ्यांतून दिसते. तसेच आम्ही उद्योजकांच्या, कंपन्यांच्या बरोबर असल्याचेही सरकारने दाखवून दिले.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशात सध्या २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. अमेरिकेसारख्या भांडवलवादी देशाने मात्र अर्थव्यवस्थेची चिंता करत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ किंवा ‘शटडाऊन’चा निर्णय घेतला नाही. परिणामी, तो देश सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या रूपात त्याची किंमत मोजतानाही दिसतो. मोदी सरकारने मात्र ‘जान है तो जहान है’चा मंत्र जपत कोरोनासारख्या सांसर्गिक आजारापासून प्रत्येक भारतीयाचा जीव कसा वाचेल, यासाठी पुढाकार घेतला. तथापि, ‘लॉकडाऊन’मुळे बाजारातील पैशाचा प्रवाह एकाएकी थांबला. छोटी दुकाने, लघुउद्योग, कुटिरोद्योग, कापड उद्योग, शेती, मांस-मासे उद्योग, लहान-मोठ्या कंपन्या, पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, बांधकाम उद्योग, बचतगट, महिला स्वयंसहाय्यता गट आदी सर्वच व्यवसाय-व्यापार बंद झाल्याने इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचीच आर्थिक स्थिती बिकट झाली. विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही टाळे लागल्याने तिथे काम करणाऱ्यांच्या डोक्यावरही आर्थिक दुष्टचक्राची तलवार टांगली गेली. दैनंदिन घडामोडीत कार्यरत जनतेबरोबरच बेघर, बेवारस, अनाथ, दिव्यांग, वृद्ध, विधवा, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अशा समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले. नरेंद्र मोदी सरकारने मात्र अर्थव्यवस्था ठप्प पडलेली असतानाही अशा सर्वच गरजवंतांच्या दोन वेळच्या अन्नाची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’ची घोषणा करत तब्बल १.७० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. सदर पॅकेजनुसार देशातील ८० कोटी गरिबांना प्रत्येकी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू आणि एक किलो डाळ असे सहा किलो धान्य पुढील तीन महिन्यांसाठी मोफत मिळेल. हे धान्य दोन हप्त्यांमध्ये घेता येईल. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा दोन आणि तीन रुपये दराने प्रत्येकी पाच किलो धान्य मिळते. आपत्ती काळातील मोफत धान्य हे नियमित मिळणाऱ्या पाच किलो धान्याच्या व्यतिरिक्त असेल. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांवर गरिबांना तीन महिन्यांसाठी ११ किलो धान्य मिळणार आहे. उज्ज्वला योजनेतील ८ कोटी महिलांना पुढचे तीन महिने मोफत स्वयंपाकाचा गॅस मिळेल. २० कोटी जन-धन खातेधारक महिलांना आगामी तीन महिने दरमहा ५०० रु. देण्यात येतील, तर दीनदयाळ योजनेंतर्गत महिला बचतगटांना १० लाखांऐवजी २० लाखांचे कर्ज देण्याचेही या पॅकेजमध्ये अंतर्भूत आहे. ८ कोटी, ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत थेट २ हजार रुपये जमा करण्याचेही या पॅकेजमध्ये म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना सानुग्रह अनुदान म्हणून १ हजार रु. दिले जातील. मनरेगा योजनेतील मजुरीही १८२ रुपयांवरून २०२ रु. करण्यात आली असून त्याचा लाभ ५ कोटी मजुरांना होईल. बांधकाम क्षेत्रातील ३.५ कोटी नोंदणीकृत कामगारांना दिलासा देत ३१ हजार कोटींच्या निधीची तरतूदही या पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, तर संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी आगामी तीन महिने केंद्र सरकार भरणार असून कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या पीएफपैकी ७५ टक्के निधी काढण्याची मुभादेखील असेल. सुमारे ४.८ कोटी पीएफधारकांना याचा फायदा होईल. एकूणच लॉकडाऊनमुळे देशातील ज्या ज्या घटकांवर विपरित परिणाम होईल, त्या सर्वांच्या मदतीसाठी मोदी सरकार धावून आल्याचे यावरून दिसते.

‘लॉकडाऊन’दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गतच अर्थमंत्र्यांनी भलेमोठे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेदेखील आपली जबाबदारी ओळखून विविध निर्णय घेतले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये कपात करत गृहकर्जांसह विविध कर्जांचा मासिक हप्ता घटवण्याचा रस्ता मोकळा केला. आरबीआयने रेपोरेटमध्ये ०.७५ टक्क्यांची कपात केल्याने तो आता ५.१५ वरून ४.४० टक्क्यांवर आला. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर रेपोरेटमधील कपातीच्या घोषणेमुळे कर्जाच्या मासिक हप्त्यांची रक्कम कमी होईल. सर्वसामान्य कर्जधारकांसाठी ही फार मोठी सवलत ठरणार आहे. इतकेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेने आगामी तीन महिन्यांपर्यंत गृहकर्ज, कारकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जाचे मासिक हप्ते स्थगित करण्याचा सल्लाही सर्वच बँकांना दिला. त्यानुसार तीन महिन्यांत कर्जधारकांना कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही तर ते तीन महिने एकूण कर्जफेडीच्या कालावधीत वाढतील. म्हणजे एखाद्या कर्जधारकाचे कर्ज डिसेंबर २०२५ ला संपत असेल तर ते तीन महिन्यांनी पुढे मार्च २०२६ पर्यंत जाईल. दिलासादायक बाब म्हणजे यामुळे कर्जधारकांच्या ‘क्रेडिट स्कोअर’वर कोणताही फरक पडणार नाही, त्यांना ‘डिफॉल्टर’ मानले जाणार नाही. तथापि, आरबीआयने तीन महिने मासिक हप्ता स्थगित करण्याचा केवळ सल्ला दिला आहे आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा, हे बँकांवर सोपवले आहे. पण, स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना आरबीआयच्या सल्ल्यावर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. एसबीआयने असे केल्यास इतरही बँका तशी पावले उचलतील, असे वाटते. दरम्यान, रेपोरेटमध्ये कपात केल्याने बाजारातही उत्साह संचारण्याची चिन्हे आहेत व हाती आलेला पैसा इतर कामांत खर्च करता येईल. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्येही १ टक्क्यांची कपात करत तो ३ टक्क्यांवर आणला. त्यामुळे बँकांकडे १.३७ लाख कोटी ते ३.७० लाख कोटी इतकी अतिरिक्त रक्कम उपलब्ध होईल व हा पैसा बाजारात लावता येईल.

गरीब, मध्यमवर्गीयांच्या आताच्या आणीबाणीच्या काळातील समस्या सोडवतानाच निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना, व्यापार्यांयना, करदात्यांनाही खुशखबर दिली. मार्च महिना म्हणजेच आर्थिक वर्षाची अखेर आणि याच काळात वर उल्लेख केलेल्या सर्वांची प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु, याच कालावधीत ‘लॉकडाऊन’ असल्याने अशा सर्वांसमोर प्राप्तीकर परतावा कसा भरायचा, हा प्रश्न उभा ठाकला होता. अर्थमंत्र्यांनी त्याचीच दखल घेत २०१८-१९ या वर्षाचा प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३० जून २०२० केली. सोबतच विलंबित प्राप्तीकरावरील व्याजदर १२ टक्क्यांवरून ९ टक्के इतके केले. टीडीएस जमा करण्याचा कालावधी वाढवला नसला तरी व्याजदर १८ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आणला. पॅनकार्ड-आधारकार्ड संलग्नतेचा कालावधीही पुढे ढकलला. सोबतच कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनवर विनाशुल्क वापरण्याची परवानगी दिली व तीन महिन्यांपर्यंत खात्यांवर किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल केली. सोबतच ५ कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या उद्योजकांना जीएसटी परतावा भरण्यासाठीचा कालावधी वाढवून दिला. तसेच कंपनी विवाद, कंपनी बोर्ड बैठक, कंपन्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ यांसारखे निर्णयही सरकारने घेतले. आर्थिक क्षेत्राबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लॉकडाऊन’चा निर्णय जाहीर करतेवेळी आरोग्यविषयक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी विशेष निधीची घोषणा केली होती. कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचार, कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही याची तपासणी सुविधा, वैयक्तिक सुरक्षा साहित्य, आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि आरोग्यविषयक अन्य साधनसामुग्रीसाठी १५ हजार कोटी रुपये देत असल्याचे मोदी म्हणाले. सोबतच मेडिकल आणि पॅरामेडिकल मनुष्यबळाच्या प्रशिक्षणावरही काम करण्यात येईल, असे ते म्हणाले होते.

कोरोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकार गरीब, महिला, मजुरांची काळजी घेतानाच मध्यमवर्गीयांच्या पाठीशी उभे असल्याचेही या सगळ्यांतून दिसते. तसेच आम्ही उद्योजकांच्या, कंपन्यांच्या बरोबर असल्याचेही सरकारने दाखवून दिले. पंतप्रधानांनी शुक्रवारी ‘जी-२०’ देशांच्या परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संबोधित केले. वैश्विक समृद्धी, सहकार्यासाठी आपल्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आर्थिक हिताऐवजी मानवतेला ठेवले पाहिजे, हा संदेश यावेळी मोदींनी दिला. उल्लेखनीय म्हणजे, मोदी असे केवळ बोलले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रप्रमुखाच्या नात्याने तशी कृतीही आधी केली. म्हणूनच देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकदेखील एकत्रित काम करत असताना कोरोनाविरोधातील लढा भारत नक्कीच जिंकेल, असे वाटते


Thursday, 26 March 2020

सकारात्मक पाऊल- MAHARASHTRA TIMES



संपूर्ण देश 'करोना'शी छेडलेल्या युद्धामुळे एकान्तवासात गेला असताना, अर्थव्यवस्थेचे आणि त्याहीपेक्षा ती चालवणाऱ्या कोट्यवधी कष्टकरी-कर्मचाऱ्यांचे; तसेच शेतकऱ्यांचे काय होणार, हा गहन प्रश्न उभा राहिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा देशासमोर आल्या. गुरुवारी त्यांनी एक लाख ७० हजार कोटींचे जे पॅकेज जाहीर केले, त्याच्या आकड्यांपेक्षाही हेतू आणि व्यापकता महत्त्वाची आहे. विविध राज्ये तसेच अनुभवी तज्ज्ञांशी बोलून या योजनेत भर टाकण्याची सरकारने दाखवलेली तयारीही स्वागतार्ह आहे. आज देशाचे आरोग्य राखण्यासाठी झटणाऱ्या लाखो आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, सफाई कामगार या साऱ्यांचे मनोधैर्य दीर्घकाळ टिकणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी प्रतिव्यक्ती पन्नास लाख रुपयांचा विमा अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, हे फार चांगले झाले; तसेच 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने'नुसार दरमहा दरडोई पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. देशात आधीपासूनच 'अन्न सुरक्षा कायदा' आहे. या कायद्याच्या छत्राखाली जवळपास ऐंशी कोटी लोकसंख्या येते. या साऱ्यांना पुढचे तीन महिने जादा धान्य मिळायचे असेल, तर राज्यांच्या वितरण यंत्रणांना प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करावे लागेल. सध्या प्रचंड अडचणी असूनही माध्यमांना या कामावर लक्ष ठेवावे लागेल. जनधन खाते असणाऱ्या वीस कोटी महिलांच्या खात्यांमध्ये दरमहा थेट पाचशे रुपये टाकण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी ही रक्कम अपुरी आहे. रोजगार गेला असेल, तर या रकमेतून एका कुटुंबाचे एका महिन्याचे पीठमीठही येणार नाही. ही रक्कम आज ना उद्या वाढवावी लागेल. विधवा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना पुढच्या तीन महिन्यांत दोन हजार रुपये मिळणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेतही दोन हजार रुपये तातडीने दिले जातील. अर्थमंत्र्यांनी दिलेला शेतकऱ्यांचा हा आकडा आठ कोटी ६९ लाख आहे. 'मनरेगा' कामगारांच्या दैनंदिन मजुरीचा आकडाही १८२वरून दोनशे रुपयांवर नेला जाणार आहे. मात्र, 'मनरेगा'ची पुरेशी कामे सुरू ठेवणे आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत ती चालू ठेवणे, हेही पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम आहे. ते त्यांना नेटाने करावे लागेल. 'करोना'चा फटका बसण्याआधीच अर्थसंकल्प सादर झाला. तो आता कोलमडून पडणार, हे दिसतेच आहे. या नव्याने येणाऱ्या योजनांसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न अर्थमंत्र्यांना करण्यात आला. तो योग्य असला, तरी सुदैवाने भारताची आर्थिक स्थिती आज हे संकट पेलण्याइतकी मजबूत आहे. गंगाजळीत मुबलक पैसा आहे. इराण, जर्मनी, ब्रिटन आदी 'करोना'ग्रस्त देशांनी याआधीच अर्थव्यवस्थेत प्रचंड पैसा ओतायचे ठरविले आहे. त्यासाठी, जागतिक वित्तसंस्थांकडे कर्जेही मागितली आहेत; मात्र भारतापुढचे आव्हान कितीतरी पटींनी मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे आहे. कोट्यवधी नागरिकांची भूक भागवणे, आरोग्य यंत्रणा कार्यक्षम ठेवणे, हातावर पोट असणाऱ्यांचे बुडणारे उत्पन्न भरून देणे आणि हे सगळे महसूल व करसंकलनाला जबरदस्त ओहोटी लागलेली असताना तारून नेणे, हे आव्हान मुळीच सोपे नाही. अर्थमंत्री या घोषणा करीत असतानाच केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविले. त्यात औद्योगिक कर्जाचे हप्ते तसेच घरखरेदी कर्जांचे हप्ते वसूल करण्याला स्थगिती द्यावी, अशी सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक लवकरच ही घोषणा करू शकते. तो एक दिलासा असेल. देशभरातील वाहतूक ओसरत असली, तरी जीवनावश्यक वस्तूंची तसेच शेतमालाची ने-आण चालू राहणार. हजारो कर्मचारी-कामगारांनाही प्रवास करावा लागणार. त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली टोलमाफीची घोषणाही आवश्यक होती. आजवर केंद्र आणि राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांसाठी अनेकदा कर्जमाफी केली आहे. आता छोटे उद्योग, स्वयंरोजगार उभा करणारे छोटे व्यापारी किंवा उद्योजक यांनाही कर्जमाफी द्यावी का, याचा गंभीर विचार केंद्र सरकारला करावा लागेल. याशिवाय, गेले काही वर्षे संकटात असणारा व कोट्यवधी कामगारांना रोजगार देणारा बांधकाम उद्योग आता काही महिने बंद राहू शकतो. या उद्योगासाठी स्वतंत्रपणे ठोस काही करता येईल का, याचाही विचार केंद्रीय अर्थखात्याने करायला हवा. या सगळ्या विपरीत परिस्थितीत क्रूड तेलाचे घसरते भाव, ही एकच गोष्ट भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. तिचा फायदा घेऊन या संकटात उभे राहावे लागेल. त्यासाठीचे पहिले पाऊल तरी सकारात्मक पडले आहे.

Wednesday, 25 March 2020

चीन संकटात, भारताला संधी-शैलेंद्र देवळणकर-navprabha

कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण पुरवठासाखळी विस्कळित झाली आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याची सुवर्णसंधी भारताला चालून आली आहे. अमेरिकेसह अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे पहात आहेत. भारतात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक आहे. पण आजवर आपण मागणीच्या शोधात होतो.
चीनच्या वुहान प्रांतातून उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील १४५ हून अधिक देशांमध्ये झाला आहे. कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. या सर्व परिस्थितीचे अत्यंत दूरगामी सामाजिक परिणाम दिसून येत आहेतच; परंतु त्याबरोबरीने याचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणामही येत्या काही काळात समोर येणार आहेत. विशेषतः चीनमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जागतिक महासत्ता बनू पाहणार्‍या या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मागील काळात सार्स नावाच्या विषाणूचा असाच प्रसार झाला होता. त्यावेळी जगाच्या जीडीपीत चीनचा वाटा होता ८ टक्के. परंतू आज कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना चीनचा जागतिक जीडीपीतील वाटा २० टक्के आहे. चीन हा जगातील पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चीनची निर्यात अब्जावधी डॉलर्सची आहे. एकट्या अमेरिकेबरोबर चीनचा ७०० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जपानबरोबरचा चीनचा व्यापार ४५० डॉलर्सचा आहे. संपूर्ण जगाला कच्चा माल पुरवणारा कारखाना म्हणून चीनकडे पाहिले जाते. बहुतांश अमेरिका आणि युरोपियन देश हे चीनकडूनच कच्चा माल घेतात. परंतु आज चीनमधील ५० टक्क्यांहून जास्त उद्योगधंदे बंद पडले आहेत. चीनकडून होणारी निर्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. चीन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे घोषित केले असले तरी तेथील बंद झालेले उद्योग, कारखाने सुरू होण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.
आजघडीला चीनमधील केवळ २५ टक्के उद्योग उघडण्याच्या मार्गावर आहेत. यत लोक पुन्हा कामावर जाण्याच्या विचारात आहेत. चीनमधील कोळश्याची विक्री ७५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कोळशाचे उद्योग ठप्प झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अलीकडेच अंतराळातील काही छायाचित्रे घेतली आहेत. त्यामध्ये चीनमधील प्रदुषण झपाट्याने कमी झाल्याचे दिसून आले. यामागचे कारण म्हणजे चीनमध्ये सुमारे ५० लाख उद्योगधंदे बंद पडले आहेत. परिणामी त्यातून होणारे कार्बन उत्सर्जनही बंद झाले आहे.
आज जगभरातील विविध देशांमध्ये असंख्य प्रकारच्या पक्क्या वस्तू निर्माण कऱण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल चीनकडून निर्यात केला जातो. यामध्ये वाहनाचे सुटे भाग, रसायने, सिरॅमिक्स, रबर, कपडे तसेच कार्बन यांचा समावेश होतो. पण गेल्या महिन्याभरापासून हा पुरवठा बंद झाला आहे. तत्पूर्वी जवळपास दोन वर्षे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू होते. त्याकाळात अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला पर्याय शोधायला सुरूवात केली होती. एवढेच नव्हे चीनला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग गुंडाळायला सुरूवात केली. उदाहरणच घ्यायचे तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स जगतातील दिग्गज कंपनी असणार्‍या सॅमसंग या कंपनीचे ५० टक्के मोबाईल चीनमध्ये उत्पादित होत असत. पण त्यांनी ते युनिट बंद केले असून उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हे युनिट उभारण्याचा निर्णय झाला आहे. अशाच प्रकारे आता अन्य अनेक कंपन्याही कच्च्या मालासाठी पर्यायांचा शोध घेत आहेत.
या शोधप्रक्रियेदरम्यान त्यांचे प्रामुख्याने लक्ष भारताकडे आहे. गेल्या एक महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे हे सिद्धही होते. सिरॅमिक्स, रबर, रसायने, गाड्या, कपडे आणि दागिने यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये युरोपियन देश, अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भारताकडे पुरवठ्याविषयी चौकशी केली जात आहे. १०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कराराविषयी चौकशी सुरू आहे. मलेशियासारख्या देशाने भारताला कोरोना विषाणूविरोधात ५० लाख मास्क निर्मितीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. परंतु सीएए आणि एनआरसी विरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पाकिस्तानची तळी उचलल्यामुळे भारताने मलेशियाला आपण निर्यात थांबवली आहे. तरीही मलेशियाने मागणी कायम ठेवली आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, आज संपूर्ण जग चीनचा पर्याय म्हणून भारताकडे पाहात आहे. अमेरिकेनेही चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आणले आहे.
भारताने या संधीचा ङ्गायदा नेमका कसा घ्यायचा याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने काही पावले आपण उचलायला सुरूवात केली आहे. भारतात सुमारे ५७ अब्ज डॉलरच्या चीनी वस्तू बाजारात विकायला येतात. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा पुरवठा होतो तो भारतात तयार होणार्‍या औषधांसाठीच्या कच्चा मालाचा. भारतात जी प्रतिजैविके बनवली जातात त्याचा कच्चा माल चीनकडून येत असतो. भारत त्याबाबत चीनवर अवलंबून होता. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २ अब्ज डॉलरची योजना तयार केली आहे. आजवर चीनबरोबर आपण स्पर्धा करू शकत नव्हतो; कारण चीन उत्पादनात महाअग्रेसर आहे. चीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि प्रचंड सवलती यांमुळे भारतातील स्थानिक उद्योगांना चीनी मालाशी स्पर्धा न करता आली नाही. परंतु कोरोनाच्या साथीने त्रस्त चीनमधून या वस्तू येणे बंद होईल तेव्हा स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. ह्याचा ङ्गायदा घेणे आवश्यक आहे. भारताला याबाबत सजग होऊन प्रत्यक्ष कार्यरत राहाणे गरजेचे आहे. यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्या लागतील. उत्पादन साखळीतील एक भाग होण्याची ही सुसंधी दवडता कामा नये. भारत पुढाकार घेऊ शकला नाही तर याचा ङ्गायदा दक्षिणपूर्व आशियाई देश घेऊ शकतात. विशेषतः कंबोडिया, व्हिएतनाम तसेच मलेशिया हे देश रबर, रसायने यांच्या उत्पादनात भारताला मागे टाकू शकतात आणि तेच अमेरिका आणि युरोप या देशांना पुरवठा सुरू करतील. म्हणजेच चीनमुळे कच्च्या मालाची विस्कळीत झालेली साखळी पूर्ववत करण्याचे काम कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया यांसारखे देश भरून काढू शकतात. त्यामुळे भारताने गाङ्गिल राहून चालणार नाही.
जागतिक निर्यातीत भारताचा वाटा २ टक्के असला पाहिजे असे उद्दीष्ट ठेवले आहे. सद्यस्थितीत भारताची निर्यात १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ती वाढवण्याची उत्तम संधी आता उपलब्ध झाली आहे. त्यासाठी आपल्या देशातील निर्यातदारांना योग्य आणि कमी व्याजदरांमध्ये कर्जपुरवठा कसा करता येईल, या दृष्टीकोनातून भारताने त्वरीत पावले उचलली पाहिजेत. याखेरीज निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसंगी निर्यातानुदान देण्याची गरज आहे. भारतात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. याचा ङ्गायदा घेत देशात गारमेंट इंडस्ट्रीची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आज आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरही आयात करत असतो. या सर्वांचे उत्पादन आता भारतात सुरु करण्याची वेळ आली आहे. सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात भारताची एकेकाळी दादागिरी होती. पण आज आपण ते चीनकडून आयात करतो आणि वापरतो. तसे न करता या क्षेत्राला पुन्हा चालना दिली गेली पाहिजे. या प्रयत्नांमुळे मेक इन इंडिया, स्किल इंडिया या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांना नवी भरारी मिळू शकेल.

Tuesday, 24 March 2020

माकडाच्या हाती शॅम्पेन- लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री #JayeshMestry


माकडाच्या हाती शॅम्पेन

कोरोना व्हायरसने जगभरात उद्रेक माजवला आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असतानाही देश नरेंद्र मोदींसारख्या नेत्याच्या हातात असल्यामुळे कोरोनाने भारतात अजून हाहाकार माजवलेला नाही. इटली हा आपल्यापेक्षा प्रगत देश असूनही आणि त्यांची वैद्यकीय सुविधा आद्ययावत असूनही तिथे कोरोनाग्रस्त आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या भयंकर आहे. आपण जर खबरदारी घेतली नाही तर येणारा काळ भयंकर असणार आहे. 

भारतात महाराष्ट्र राज्यात कोरोनाची जास्त भीती आहे. तरी राज्यात उद्धवजी आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्या नेतृत्वाखाली सगळेच उत्तम काम करत आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर शक्यतो घरात राहणे गरजेचे आहे... म्हणून नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. पण नरेंद्र मोदींचे विरोधक इतक्या खालच्या थराला गेले आहेत की राजकीय मुद्दे कधी उपस्थित करायचे याचे भान त्यांना राहिलेले नाही. 

2002 ते 2020 असा या लबाड लोकांचा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ 18 वर्षे हे नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करतायत. मोदी गुजरातचे सीएम होते, आता देशाचे पीएम झालेत. या टीकाकारांची खरी वेदना ही आहे की आम्ही मोदींना राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला, खुनी, हत्यारा सगळं सगळं म्हटल आम्ही, तरी लोक ह्यांना निवडून कसे देतात? 2014 ला गुजरात दंगलीच्या आरोपीला निवडून देऊ नका असा प्रचार केला असतानाही लोक निवडून देतातच कसे? ही त्यांची खरी समस्या आहे. मग नोटबंदी ही देशासाठी किती घातक होती, सीएए, एनआरसी, ट्रिपल तलाक,  असे एकामागोमाग एक निर्णय मोदींनी घेतले, या लोकांनी हे निर्णय घातक होते अस सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक मोदींच्याच मागे का जातात? 

पण आपल्याला मोदी कळला नाही, आपल्याला भारत कळला नाही आणि आपल्याला भारतीय जनता सुद्धा कळलेली नाही व इथली समस्या सुदधा कळलेली नाही, हे मान्य ते करायला तयार नाहीत. हा हुच्च शिक्षितांचा अडाणीपणा यांना लपवायचा होता म्हणून यांनी एक नवीन शब्द शोधून काढला, भक्त... 

या महामुर्ख लोकांनी मोदींच्या मतदाराला भक्त म्हणायला सुरुवात केली आणि एकदा फॉर अ चेंज म्हणून वोट केलेला मतदार हा मोदींचा कायमस्वरूपी मतदार झाला. मोदींनी जनता कर्फ्यु घोषित केल्यावर त्यांना खुल्या दिलाने साथ द्यायची किंवा प्रसंगावधान ओळखून गप्प बसावं. पण नाही... यांनी इथेही माती खाल्ली. मोदी कोरोनाचा इव्हेंट करतायत असा आरोप केला गेला. पण झालं काय? अपवाद सोडला तर सर्व भारतीयांनी या जनता कर्फ्युला भरभरून पाठींबा दिला, 5 वाजता शंखनाद, थाळ्या आणि टाळ्या वाजवून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. 

एक माणूस कोणतीही जबरदस्ती न करता, केवळ हात जोडून आवाहन करतो आणि देशातील बहुसंख्य लोक ते ऐकतात हे या नतद्रष्ट्याना कसं सहन होईल? म्हणून यांनी नकारात्मक व्हिडीओ पसरावयला सुरुवात केली. काही अति उत्साही लोक अभिवादन करण्याच्या नादात गरबा खेळले, सामूहिक आरती केली... या त्यांच्या गोष्टी चुकीच्याच होत्या, भारतीय लोकांना प्रबोधनाची खूप गरज आहे. अहो, आपण रांगेत उभे राहू शकत नाही आणि सिग्नल पाळत नाही तर असला मुर्खपणा करणे स्वाभाविकच आहे. पण ही संधी मोदी द्वेष्ट्याना मिळाली आणि सोशल मीडियावर पोस्टी सुरू झाल्या की बघा लोकांनी इव्हेंट केला. पण यात मोदींचा काय दोष? तरी मोदींवर टीका करण्याची आपली तृष्णा ह्यांना शांत करायचीच होती.  

माझ्या एका फेसबुकीय मित्राने आपला उद्दामपणा दाखवण्यासाठी हद्दच केली. त्याने खेळण्यातला माकड टाळ वाजवतो असा व्हिडीओ पोस्ट केला म्हणजे मोदींच्या सांगण्यावरून टाळ बडवणारे माकडं आहेत. 
मला या गोष्टीच फार दुःख वाटलं... एक कलाकार इतक्या उलट्या काळजाचा कसा असू शकतो? पण नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या भक्तांवर टीका करण्याची एकही संधी आम्हाला सोडायची नसते. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरला जाऊ... बरं वर आमचा नालायकपणा लपवण्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांसरख्या महामानवाचे दाखले देऊ, वर समोरच्याला अंडभक्त म्हणून हिणवू... आणि हे संविधनवादी... वाह...

मुळात बहुसंख्य लोकांच्या भावनांचा आदर ज्याला करता येत नाही तो सांविधानवादी काय तर माणूस म्हणवण्याच्याही लायकीचा नसतो.

मी स्वतः भावनिक नाही, मला भावना नाही असं नव्हे पण माझा स्वभाव भावनिक नाही. त्यात घडायच्या काळात तात्यारावांचा प्रभाव पडला. तरी मानवी भावना खूप महत्वाच्या असतात अस मला वाटतं. जग आणि देश कोरोनाच्या उद्रेकात चोपून निघत असताना नरेंद्र मोदींनी केलेलं भावनिक आवाहन अत्यंत म्हत्वाचंच होतं. एक दिवस पूर्णपणे घरात राहून आपण कोरोना ज्या झपाट्याने पसरतोय त्याला आळा घातला. यापुढचे दिवसही आपल्याला शक्यतो घरातच राहायचं आहे. थाळ्या, टाळ्या वाजवून आपण सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मोदींनी कृतज्ञतेचा इव्हेंट केला. इव्हेंट केला यात चूक काय? आजच्या युगातल्या लोकांना जी भाषा कळते त्या भाषेत मोदी सवांद साधतात. लोकांना ते पटतं आणि लोक त्यांचं ऐकतात. 

इव्हेंट करायची मूळ प्रेरणा लोकमान्य टिळकांची आहे. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा इव्हेंट केला. लोकांना हीच भाषा कळते. त्यातून क्रांतिकार्य उभं राहिलं... 

पण या जळणाऱ्या लोकांच्या मात्र अशा घटनेने पोटात दुखायला लागत आणि स्वतःला मानवतेचे कैवारी स्वतःच म्हणवून घेणारे हे अभद्र लोक राक्षसी वृत्ती दाखवतात आणि ही राक्षसी वृत्ती लपवण्यासाठी हे लोक आंबेडकर, शाहू, फुले अशी नावे घ्यायला लागतात. या महापुरुषांच्या आड लपून हे नीच कृत्ये करीत सुटतात. पण जनतेला यांचा हलकटपणा आता कळून चुकलेला आहे. लोकांनी दुसऱ्यांदा मोदींना बहुसंख्येने निवडून दिलेलं आहे. आता कोरोनाच्या उद्रेकात सगळा  भारत मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना हे लोक टीका करून मोदींच्या मतदारांची  (ह्या दळभद्री लोकांच्या भाषेत भक्त वा अंडभक्त) संख्या वाढवत आहेत. या लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवणारे लोक माकडं वाटतात. पण मुळातच माकडं हेच लोक आहेत... 

सावरकरांनी काशीच्या ब्राह्मणांना उल्लेखून माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन असा लेख लिहिला होता, त्या लेखाची आठवण मला झाली... माकडाचा माणूस झाला अस आपण ढोबळ मनाने म्हणतो. पण काही लोकांची बुद्धी अजूनही माकडासारखीच आहे. देश एकजूट होत असताना ह्यांना माकडचाळे सुचतात आणि ही माकडे देशाच्या बाजूने उभे राहणाऱ्यानाच माकडे म्हणतात... माकडाच्या हातात कोलीत मिळालं की ते सगळीकडे आग लावत फिरतय... आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर माकडाच्या हातात शॅम्पेन दिलं की ते फवारेच मारत राहतय... शेवटी माकडच ती...

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#JayeshMestry

बेजबाबदारपणाचे वर्तन!-tarun bharat-24 MAR-काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला


   कोरोनाचा वाढता उद्रेक ही फक्त भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. साधी समस्या नाही, तर अतिशय चिंताजनक आणि प्राणघातक अशी समस्या झाली आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटली आणि इराणमध्ये तर कोरोनामुळे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतही त्यातून सुटणे शक्य नव्हते. भारतातही कोरोना या प्राणघातक विषाणूचा शिरकाव झाला आहे. भारतात चारशेवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत जवळपास दहा जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संशयित अशा काही हजार लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे युद्धपातळीवर कामाला लागली आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत.

देशात आरोग्यविषयक आणिबाणी लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील 75 मोठ्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे आपल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी झटत असताना, काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची वागणूक परिस्थितीचे गांभीर्य घालवणारी आहे. काही उत्साही नागरिकांचाही याला अपवाद नाही.

कोरोनाचा प्रसार हा सामान्यपणे तीन टप्प्यांतून होत आहे. पहिला म्हणजे परदेशातून याची लागण होऊन आलेले पर्यटक, प्रवासी आणि अनिवासी भारतीय. दुसरे म्हणजे या लोकांच्या संपर्कात आलेले लोक. जोपर्यंत कोरोनाची लागण एवढ्या लोकांपर्यंत मर्यादित होती, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, याचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. कोरोनाचा तिसरा टप्पा आहे समाज संसर्गाचा. यातून कोरोनाचा संपर्क कित्येक पटीने वाढण्याची भीती आहे.


तिसर्‍या टप्प्यातून होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामागचा उद्देश अतिशय स्तुत्य आणि देशवासीयांच्या हिताचा होता. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळात लोकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन मोदी यांनी केले. कारण, माणसे सार्वजनिक ठिकाणी जेवढी गर्दी करतील, एकदुसर्‍याच्या जितक्या जास्त संपर्कात येतील, तेवढा कोरोनाचा संसर्ग होण्याची सध्या भीती आहे. त्यामुळेच मोदी यांनी हा सारा प्रकार टाळण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.


यासोबतच अशा आणिबाणीच्या परिस्थितीतही आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस, यासोबतच स्वच्छता कर्मचारी, पायलट आणि विमानतळावरील अन्य कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, वीज आणि जल विभागाचे कर्मचारी आणि प्रसिद्धिमाध्यमांचे लोक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना धन्यवाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दारात, खिडकी तसेच बाल्कनी आणि घराच्या गच्चीवर एकत्र येत टाळ्‌या वाजवण्याचे, घंटी, ताटली-चमचा वाजवण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी दिवसभर जनता कर्फ्यूला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. पण, सायंकाळी 5 वाजता जे घडले त्यामुळे दिवसभराच्या मेहनतीवर आणि गांभीर्यावर पाणी फेरले गेले.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना काही मर्यादांचे पालन करणे आवश्यक होते. पण, काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला, तो अतिशय धक्कादायक होता. या अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर लाऊडस्पीकर लावूून मिरवणुका काय काढल्या, घोषणा काय दिल्या, नाच काय केला, हे सर्वच चीड आणणारे होते. यात हातात भाजपाचे झेंडे घेतलेले नेते आणि कार्यकर्तेही होते. हे करताना रस्त्यावर गर्दी करू नये, एकदुसर्‍याच्या जवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर ठेवावे, या मूलभूत सिद्धांतालाच हरताळ फासण्यात आला.


रस्त्यावर उतरलेल्या या सर्वांचा उत्साह जणू भारताने विश्वचषक जिंकल्यासारखा होता. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्याचा आवेग प्रत्येकाच्या वागण्यातून दिसत होता. मुळात पंतप्रधान मोदींनी कोणत्या उद्देशाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि झाले काय? मोदींनी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अशा वागणुकीची अपेक्षा केली नसावी. हे चित्र पाहून मोदी अतिशय संतप्त झाले होते. आपल्या कपाळाला हात लावत ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असे म्हणण्याची वेळ मोदींवर, त्यांचे समर्थक म्हणवणार्‍यांनी आणली, हे दुर्दैवी आहे. एक दिवस जनता कर्फ्यू पाळून आम्ही कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकत नाही, तर आम्हाला एक आठवडा, दोन आठवडे, वेळ पडली तर महिनाभर जनता कर्फ्यू पाळावा लागणार आहे.


जनता कर्फ्यूच्या आवाहनातून, मुळात आजपासून आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई सुरू करायची आहे, असे मोदी यांना म्हणायचे होते; तर याला काही मूठभर देशवासी तसेच उत्साही नेते आणि कार्यकर्ते यांची वागणूक, कोरोनाविरोधातील निर्णायक लढाई आपण जिंकल्याचे प्रदर्शन करणारी होती. आपल्या अशा वागणुकीतून आपण आपल्या नेत्याची बदनामी करतो, प्रतिमा मलिन करतो, याचे भानही या उत्साही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठेवता आले नाही, याचे वाईट वाटते. अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सारा प्रकार करण्यात आला, त्यांनाही हे सारे अपेक्षित नसावे. समाज आणि देशाप्रती आम्ही आपले कर्तव्य बजावतो, मात्र तुम्ही काहीच करू नका, असे या लोकांनी व्यथित अंत:करणाने म्हटले असेल. मुळात भारतीय लोक हे उत्सवप्रिय आहेत. पण, आपण कशाचा उत्सव साजरा करतो, याचे भान ठेवण्याची गरज आहे.


कोरोनामुळे इटली आणि इराणमधील परिस्थिती पाहून अतिशय वेदना होतात. तशीच परिस्थिती आपल्या देशातील लोकांवर येऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. पण, काही लोक त्या सार्‍या मेहनतीवर पाणी फिरवतात, हे योग्य नाही. कोरोनाविरुद्धची लढाई लढताना संयमासोबत संकल्पाचे आवाहन मोदी यांनी केले आहे. ही लढाई आम्हाला दीर्घकाळ लढायची आहे. दृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे असते, पण अदृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे नसते, तर अतिशय कठीण असते. कोरोनाचा विषाणू हा मानवजातीचा असाच अदृश्य शत्रू आहे. या विषाणूवरील प्रतिबंधक लस आणि औषध अद्याप तयार झाले नाही. ही लस आणि औषध तयार व्हायला आणखी किती काळ लागेल, तेही कोणी सांगू शकत नाही.


त्यामुळे देशातीलच नाही, संपूर्ण जगातील मानवजातीचा प्राणघातक शत्रू असलेल्या कोरोनाविरुद्धची लढाई लढताना हिंमत, संयम आणि आत्मविश्वासाची गरज आहे. यासोबत सार्वजनिक शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालनही आम्हाला करावे लागणार आहे. कोरोना हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. या शत्रूविरुद्धची लढाई सोपी नसली तरी कठीण आणि अशक्यही नाही. गरज आहे, संयमाची, सहनशीलतेची आणि सामूहिक शक्तीची. यापुढे तरी अशा गंभीर प्रसंगी आम्ही बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करणार नाही आणि आमच्या नेत्यावर मान खाली घालण्याची वेळ आणणार नाही, अशी अपेक्षा करायची काय


https://www.tarunbharat.net/Encyc/2020/3/24/Irresponsible-behavior.html

अमेरिकन डॉक्टरांचे नागरिकांना अनावृत पत्र..TARUN BHARAT-24-Mar-2020 -वसंत गणेश काणे

 

अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत असून, मृत्युदरही काळजी वाटावी, असा आहे. असे असले तरी जनतेत अनेक चुकीच्या समजुतींनी घर केले असून, समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली माहिती िंचता वाटावी, अशी आहे. अमेरिकेतील बोस्टनस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या 40/50 जगविख्यात डॉक्टरांनी जनजागृती करण्याच्या हेतूने अमेरिकन नागरिकांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या अनावृत पत्राचा हा काहीसा स्वैर, पण तरीही नेमका व संपादित भाग आपल्यालाही बोधप्रद ठरेल, असे वाटते. अमेरिका ही आज एक जागतिक महासत्ता आहे. तिथल्या विख्यात वैद्यकीय विशारदांनी स्पष्ट शब्दांत दिलेला हा इशारा अमेरिकन जनतेत जागृती व्हावी, या हेतूने दिलेला असून आपणही नोंद घ्यावी, असा आहे. तसेच याबाबत आपण घेत असलेली खबरदारी अभिमान व समाधान वाटावी, अशीच आहे.





परिस्थिती चिंता वाटावी, अशीच!
कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये असलेले संभ्रम, चुकीची माहिती आणि सोशल मीडियातील या रोगाला क्षुल्लक मानण्याची वृत्ती आमच्या अनुभवाला आल्यामुळे, सोप्या आणि स्पष्ट शब्दांत या रोगाचे गांभीर्य जाणवून देण्यास आम्ही उद्युक्त झालो आहोत. कोरोना हा सर्दीला कारण असलेल्या व्हायरससारखाच आहे, असे वृत्त ऑनलाईनवर आलेले आम्ही बघितले आहे. तसेच कोरोनाची बाधा झाल्यास जोरदार सर्दी झाल्याप्रमाणे त्रास होईल इतकेच, अशा आशयाचा मजकूर आमच्या पाहण्यात आला आहे. याचे स्वरूप यापेक्षा गंभीर असणार नाही. जिवाचे बरेवाईट होण्याचा तर प्रश्नच नाही, असा आशय आमच्या वाचण्यात आला आहे. हे खरे आहे की खोटे, ही बाब तुम्ही कोण आहात (लहान मूल, सुदृढ, अशक्त, तरुण िंकवा प्रौढ), यावर अवलंबून आहे. पण, आपण सर्व समाजाचा साकल्याने विचार केला पाहिजे, नाही का?


निसर्गनिर्मित व नवीन
कोरोना व्हायरस मानवासाठी पूर्णपणे नवीन आहे. हा सर्दीला कारणीभूत असलेल्या व्हायरसच्याच जातकुळीचा असला, तरी आणि याची लक्षणे अनेक प्रकारे सर्दीसारखीच भासत असली, तरी या व्हायरसची मानवाशी पहिल्यांदाच गाठभेट होत असल्यामुळे आपल्यापैकी कुणातही याचा सामना करण्याची क्षमता यापूर्वीच निर्माण झालेली नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.


संसर्गक्षमता दसपट
या व्हायरसची लागण अख्ख्या मानवजातीत वेगाने होत असून, श्वसनमार्गातून बाहेर पडणार्‍या स्रावांतून हा एकापासून दुसर्‍याकडे संक्रमित होत असतो. याची संसर्गक्षमता सर्दीच्या तुलनेत दसपट आहे, हे लक्षात घ्या. लागण झालेले बहुतेक (80 टक्के) बरे होतील. 20 टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया होईल व त्यांना दवाखान्यात दाखल व्हावे लागेल. 2/3 टक्क्यांसाठीच हा घातक ठरेल. पण, आमचे हे भाकीत इटलीत खोटे ठरले आहे. याचे एक कारण असे आहे की, त्या देशाची आरोग्यजपणूक यंत्रणा तोकडी पडली. तिथे 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍यांच्या बाबतीत घातक ठरण्याचे प्रमाण 8 ते 20 टक्के आहे. एखाद्या लहान मुलाला बाहेर खेळता खेळता या व्हायरसची बाधा झाली, तर घरातल्या वडीलधार्‍यांना त्याचा संसर्ग दाराच्या कडीला िंकवा टेबलाला स्पर्श झाल्यास लगेच होऊ शकतो.


साथीच्या रोगांची संपर्क गती
साथीचे रोग पसरण्याची गती मोजण्याची शास्त्रज्ञांची एक खास पद्धत आहे. हा एक अंक असून, आर झिरो िंकवा आर नॉट (नॉट म्हणजेही शून्यच) असे त्याचे नाव आहे. हा अंक काढण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. ती अशी- आजारी व्यक्ती बरे होण्यापूर्वी िंकवा दगावण्यापूर्वी किती लोकांमध्ये रोगसंक्रमण करते, यावरून हा अंक ठरतो. कोरोना व्हायरसचा आर झिरो िंकवा आर नॉट 3 असतो, असे आढळून आले आहे. म्हणजे असे की, कोरोनाचा रोगी बरा होण्यापूर्वी िंकवा दगावण्यापूर्वी सरासरीने 3 लोकांत रोगसंक्रमण करतो. ही गती किती प्रचंड आहे, हे पुढील गणनेवरून लक्षात येईल.


जॉमेट्रिकल प्रोग्रेशनने प्रसार
एका कोरोनाबाधिताने तीन लोकांना पहिल्या फेरीत बाधित केले, तर दुसर्‍या फेरीत हे तिघे प्रत्येकी आणखी तिघांना म्हणजे एकूण 9 लोकांना बाधित करतील. तिसर्‍या फेरीत ही संख्या पुन्हा तिपटीने वाढून 27 होईल. अशाप्रकारे 15 व्या फेरीत बाधितांची संख्या 1,43,48,907 (1 कोटी, 43 लक्ष, 48 हजार, 907) होईल. या 15 फेर्‍या काही आठवड्यांतच पूर्ण होतील. संख्यावाढीच्या या प्रकाराला भूमितीय श्रेढी (श्रेणी नव्हे)- जॉमेट्रिकल प्रोग्रेशन असे नाव आहे.


शाळा/महाविद्यालये, खेळाची मैदाने अशा गर्दीच्या जागी तर एका नरड्यातून संक्रमित होणार्‍या बाधितांसाठी याहीपेक्षा कमी वेळ पुरेल. पहिली व्यक्ती तरुण आणि धडधाकट असेल, तर ती बरी होईल, पण नंतरच्या लाखो लोकांचे काय? त्यात कितीतरी वयोवृद्ध, अशक्त व लहान मुले असतील, त्यांचे काय?


आर झिरो = 3 हा अंक नक्की िंकवा कायम नाही. केवळ संरक्षक व प्रतिबंधात्मक उपायांनीच तो कमी करता येतो. कारण, यावर औषध िंकवा लस उपलब्ध नाही. हा अंक जेव्हा एकपेक्षा कमी होईल, तेव्हाच या रोगाची साथ मावळेल. म्हणून बाधितांना वेगळे ठेवणे (क्वारंटाईन) व सामाजिक विलगीकरण (सोशल डिस्टंन्सिंग) महत्त्वाचे आहे. या कामाची गती आज समाधानकारक नाही. ती वाढविलीच पाहिजे.


एकमेव उपाय
व्हायरसची पसरण्याची गती कमी करणे, हा एकमेव उपाय आज अमेरिकेने आपल्या हाती घेतला आहे. आपल्या देशात हॉस्पिटलांची संख्या कितीही असली, तरी ती अपुरीच पडणार. व्हेंटिलेटर्सची संख्याही भरपूर आहे, पण तीही अपुरीच पडणार. आमच्या इटालियन मित्रांनी आपले अनुभव आम्हाला सांगितले आहेत. त्यांना व्हेंटिलेटर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, आयसीयू बेडस्‌ कमी पडत आहेत. त्यामुळे कुणाला वाचवायचे आणि कुणाला नाही, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. काहींना तर साधे उपचार देणेही शक्य होत नाही. आजमितीला आपण अमेरिकन, इटालियन लोकांच्या तुलनेत फक्त 11 दिवस मागे आहोत. त्यांच्या व आपल्या वैद्यकीय सोयी-सुविधा जवळपास सारख्याच आहेत. पेशंट्सचा भला मोठा लोंढा लवकरच आमच्यासमोर येऊन ठाकणार आहे. असे झाल्यास काय करणार? मात्र, आपल्या लहानमोठ्या सामाजिक नेत्यांच्या हाती एक प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. ते आम्हा डॉक्टरांना आक्रमक होऊन मदत करू शकतात. वेगळे ठेवणे- क्वारंटाईन/ आयसोलेशन आणि सामाजिक विलगीकरण- सोशल डिस्टंन्सिंग यासाठी समाजघटकांना प्रवृत्त करणे, हे त्यांना सहज शक्य आहे. यातून कोरोना व्हायरसचा चढता आलेख ते सहज सपाट करू शकतील आणि या रोगाचा विळखा सैल होईल व तो मावळेल.


आमची या सामाजिक नेतृत्वाला कळकळीची विनवणी (इंप्लोअर) आहे की, आमच्या मदतीला उभे राहा. ई-मेल पाठवून सर्व शिक्षण संस्थांना तातडीने सुटी देण्यास सांगा. लहान मुलांना तर एकलकोंडेपणा तापासारखा छळतो. दोस्तांना भेटू द्या म्हणून ते हट्ट करतील, वाढदिवसांच्या पार्ट्यांची व सामाजिक समारंभांची ते आतुरतेने वाट पाहात असतील. या मुलांना आवरण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आठवड्यावर आठवडे एकट्याने काढताना ते बोअर होतील. पण, आपल्या हाती आजतरी प्रतिबंधात्मक उपायच आहेत, हे लक्षात घ्या (कोरोना व्हायरसवर औषध उपलब्ध नाही).


कोणते आहेत, हे उपाय?
सर्व खेळ बंद (दोघांतला म्हणजे जोडीदाराबरोबरचासुद्धा). एकत्र येणे बंद. पार्कातल्या खेळण्यांवरचे खेळ, जिम, हॉटेिंलग, चित्रपटगृहात चित्रपट पाहणे बंद, सभागृहातले कोणतेही कार्यक्रम, या सर्वांना सरळ सुटी.
सर्व दौरे रद्द करा, अगदी आवश्यकच असेल तरच प्रवास करा. ही निवासस्थाने स्वच्छ आहेत, अशा जाहिराती येत आहेत, ती तशी असतीलही, पण तेवढे पुरेसे नाही. घरीच थांबा, घरून काम करा, किराणा व औषधे आणण्यासाठी बाहेर पडावेच लागले, तर तातडीने कामे उरकून तडक घरी परत या!


हात साबणाने धुवा. बोटांच्या बेचकांमध्येही साबण लावून 20 सेकंदभर हात धूत राहा.
परिस्थिती इतकी काही गंभीर नाही, असा उगाच बाऊ करू नका, असे समाजमाध्यमात येत असेल तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करा. हा आणिबाणीचा काळ आहे म्हणून कोणतीही अफवा पसरवू नका िंकवा तिला बळी पडू नका, कारण त्यामुळे तुमचे व तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या मित्रांचे कायमचे नुकसान होऊ शकेल.
या व अशा दक्षता घ्या आणि पुढचे काही आठवडे प्रयत्नपूर्वक सुरक्षित आणि निरोगी राहा..


https://www.tarunbharat.net/Encyc/2020/3/24/Announcement-letter-from-US-doctor-to-citizens.html

Saturday, 21 March 2020

ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!-TARUN BHARAT

नागरिकांच्या परीक्षेची घडी...
देशातच नव्हे जगात आज कुठेही गेलात, तरी तुमच्या कानी कोरोनाची चर्चा पडल्याशिवाय राहायची नाही. चीनमार्गे जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दररोज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढत असून, तो आटोक्यात आणण्यासाठी सार्‍या जगाने पुढाकार घेतलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, या रोगाची व्याप्ती बघता या संकटाला महामारी म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारनेही तातडीने पावले उचलून आपल्या देशाला आणि येथील नागरिकांना या जीवघेण्या रोगाचा फटका बसू नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत. जगात 2 लाख कोरोनाग्रस्त आढळले असून, भारतात 153 जणांना या विषाणूंची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील लागण झालेल्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे. जगातील तब्बल 120 देशांना कवेत घेणार्‍या या रोगाची लक्षणे कोणती, पॉझिटिव्ह लक्षणे आढळलेल्यांनी कुठली काळजी घ्यावी, कोरोना संशयितांनी कुठली पथ्ये पाळावी यासह स्वच्छतेबाबत कोणती काळजी घेतली जावी, याच्या सूचना सरकारतर्फे आणि आरोग्य मंत्रालयातर्फे जारी होत आहेत. सर्वाधिक लागण झालेल्या आणि मृत्यू झालेल्या चीनने तर या रोगावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता जबाबदारी भारतीयांचीही आहे.

भारतात लोकशाही आहे आणि त्यामुळेच आपली जबाबदारी जास्त आहे. सरकार कुठलीही बळजबरी करून निर्णय लादू शकत नाही. पण, म्हणून सरकारच्या निर्णयांवर विनाकारण टीका करणे योग्य ठरणार नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार ज्या काही उपाययजोना करीत आहे, त्या आपल्यातील अनेकांना अनावश्यक वाटत असतील किंवा काही जण सरकारने अतिरेक करू नये, अशा टीकेपर्यंतही आले असतील. पण ही कृती बरी नव्हे. आज प्रत्येक भारतीयाने कोरोनाविरुद्धच्या सरकारने पुकारलेल्या युद्धाचे सैनिक म्हणून त्यात सशस्त्र सहभागी झाले पाहिजे. सरकारच्या युद्धात आरोग्यरक्षकांचा सहभाग अनन्यसाधारण आहे. डॉक्टर्स, परिचारिका, अटेंडण्टस्‌ यांची भूमिका अहम्‌ आहे. कोरोनाग्रस्तांकडे हेटाळणीच्या दृष्टीने बघण्याच्या या काळात ही मंडळी रुग्णांची तपासणी करून, त्यांची विचारपूस करून, त्यांना काय हवे, काय नको याची आस्थेने विचारपूस करून, आपले कर्तव्य बजावत आहे. रुग्णांना आणि संशयितांना धीर देत आहेत. हा विषाणू ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना लक्ष्य करतो. त्यामुळे अशा वयोगटातील लोकांची विशेष काळजी देशवासीयांनीच घ्यायला हवी. आरोग्ययंत्रणेला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्व सामान्य जनतेची आहे. कारण जोवर प्रजा सहकार्य करणार नाही, तोवर या देशातील कोणताही राजा, कुठल्याही प्रकारच्या युद्धावर जय मिळवू शकणार नाही.




कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जमावबंदी लागू केली आहे, त्यामध्ये आपण प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे. अशा वेळी आपल्या घरचे धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आपापले व्यवसाय काही दिवस बंद करणे, शिक्षकांनी गरज असेल तरच शाळेत जाणे अशी कृती अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्या या मजा मारण्यासाठी नसून, त्याचा सदुपयोग करायला हवा. उगाच सहली काढून पर्यटनस्थळी गर्दी करू नये. प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, आपला वेळ अभ्यास, वाचन अथवा छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावावा. सरकारने हॉटेल्स, बार, क्लब, रस्त्यांवरील छोटी चहा-नाश्त्याची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशातच होस्टेलवर राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना डबे पोहोचविण्यासाठी पुण्याच्या काही स्वयंसेवकांनी फेसबूकवरून मोहीम चालविली आहे. अशी मोहीम खरोखरीच राज्यभरही उपयोगी ठरू शकते आणि त्यातून गरजूंना मदतीचा हात दिला जाऊ शकतो. कोरोनाच्या भीतिपोटी अथवा उपाययोजना म्हणून छोटी हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाच्या टपर्‍या, क्लब, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. कामबंदीमुळे आमदनीही बंद पडणार आहे. यामुळे मजूर िंकवा छोटे विक्रेते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील. अशांच्या उदरभरणाची काही दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. राष्ट्रीय कर्तव्य काय असते, हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. आपण आपल्या अधिकारांसाठी नेहमी जागरूक असतो. मग अशा संकटकाळी आपण सरकारची, नागरिकांची मदत करून आपली जबाबदारी ओळखायला नको?

गर्दी टाळा, स्वच्छता राखा, वर्क फ्रॉम होम, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, प्रतिकारक्षमता वाढविणारी औषधे घेणे... अशा अनेक उपाययोजना सरकारने सुचविल्या आहेत. पण, सरकारने सांगूनही आपण सूचनांचे पालन करणार नसू तर सरकारला प्रसंगी कठोर पावले उचलावी लागतील. दंडुकेशाहीचा वापर करावा लागेल. वर्क फ्रॉम होमचा शासकीय आदेश असताना व शक्य असतानाही पुण्यातील काही कंपन्या हा आदेश धुडकावून आपल्या कर्मचार्‍यांना कंपन्यांमध्ये कामासाठी बोलवत आहेत. सुशिक्षितच अशा आडमार्गाचा वापर करणार असतील, तर मग अशिक्षितांकडून काय ती अपेक्षा करावी? लोकांनी गर्दी टाळलीच नाही तर सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागेल. मुंबईत लोकल बंद पडल्या तर लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न निर्माण होतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी काही कंपन्यांनी स्वतःची उत्पादन निर्मिती वाढविण्याचे प्रयत्न केल्यास ते गर्दीला आणि प्रसंगी रोगाला आमंत्रण देणारे ठरतील. कोरोनाच्या दुसर्‍या फेजमधून आपण तिसर्‍या फेजमध्ये जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त पसरू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही. तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगायला हवे. आपल्या भागात असे कुणी रुग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याला त्याची कल्पना द्यायला हवी.

नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आणि उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणाही दिवस आहे. मात्र, तो रुग्ण ज्या वस्तीत राहतो, तेथील नागरिकांनी त्याच्या कुटुंबावर जणू बहिष्कारच घातला आहे. त्यांच्या घरी येणे-जाणे, त्यांच्याशी बोलणे आणि त्यांच्याशी व्यवहार करणे थांबविले. ही कुठली माणुसकी म्हणावी? अखेर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी यातून मार्ग काढून या रुग्णाच्या घरी भेट दिली आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, असा धीरही त्या रुग्णाच्या कुटुंबाला दिला. महापौरांची ही कृती निश्चितच स्वागतार्ह आणि एक नवा पायंडा पाडणारी म्हणावी लागेल. काहीही झाले तरी मी माणुसकी सोडणार नाही, असा प्रणच कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या निमित्ताने उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज आहे. आज जगात महायुद्ध होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण, कोरोनाच्या विषाणूंनी संपूर्ण जगाविरुद्ध युद्ध पुकारून युद्ध झाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते, याची प्रचीती आणून दिली आहे. ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!

जनता कर्फ्यूचे पालन करा दिनांक :22-Mar-2020 अभिजित वर्तक-TARUN BHARAT


धोकादायक कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.
जनता कर्फ्यू म्हणजे काय?
‘जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी सकारात्मक वृत्तीने आणि स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला पाहिजे. कारण जनता कर्फ्यूला वैज्ञानिक आधार आहे. खुद्द इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासीयांना जनता कर्फ्यूचे पालन करायचे आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. हा प्रयोग आपला आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पार पाडण्याच्या संकल्पाचे एक मजबूत प्रतीक असेल, असेही मोदींनी सांगितले आहे.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेवढा आपण सार्वजनिक संपर्क टाळू तसेच कमीत कमी लोकांशी संपर्कात येऊ तेवढा विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 10 हजारांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णसं‘या 281 पर्यंत पोहोचली आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ही सं‘या कमी दिसत असली तरी धोका पत्करण्यात काहीही अर्थ नाही.
कारण भारतातील अपुरी डॉक्टरांची सं‘या, कमी परिचारिका, अपुरे बेड तसेच अपुर्‍या प्रयोगशाळा आणि मर्यादित वैद्यकीय संसाधने यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी भारताला प्रचंड अडचणी येणार आहेत. इटली, स्पेन, इंग्लंड, अमेरिकेसार‘या बलाढ्य देशांना कोरोनाशी लढता लढता नाकी नऊ आले आहे. तेव्हा 130 कोटी लोकसं‘या असलेल्या भारताची स्थिती कशी होऊ शकते याची कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा सध्यातरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांशी संपर्क टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळेच रविववारच्या जनता कर्फ्यूचे पालन आपण कटाक्षाने केले पाहिजे.
 कोरोनाचे एकूण एकूण 4 टप्पे
पहिला टप्पा
चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा विषाणू वेगाने जगभरात पसरत आहे. कोराना विषाणू संक‘मित असलेल्या देशांमध्ये वास्तव्य असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही अधिक असते. तसेच त्याचा संसर्ग झाल्यास इतरांना देखील तो होण्याचा धोका अधिक आहे. भारतात कोरोना विषाणू हा बाहेरून आला आहे. पहिल्या टप्प्यात हा विषाणू एखाद्या ठिकाणी शिरकाव करतो.
दुसरा टप्पा
सध्या भारतात दुसर्‍या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक‘मित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे.
तिसरा टप्पा
तिसर्‍या टप्प्यात कोरोना हा देशात असलेल्या व्यक्तींमुळे पसरतो. म्हणजेच स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसर्‍या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. भारतात सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे. मात्र संसर्ग झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत राहिला तर तो तिसर्‍या टप्प्यात जाईल आणि त्यासोबतच नियंत्रण मिळवण कठीण होईल. तिसर्‍या टप्प्यात सरकारला मॉल, दुकाने, शाळा आणि गर्दीची ठिकाणे सक्तीने बंद करावी लागतात. सुदैवाने सरकाने हा निर्णय आधीच घेतला आहे. मात्र, त्यात सरकारला पूर्णपणे यश आलेले नाही. कारण सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणा आणि बेफिकीर वृत्तीमुळे लोक हॉटेल, पानटपर्‍या किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीतच आहेत. म्हणूनच जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक आहे.
चौथा टप्पा
सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची सं‘या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे.
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद अवश्य करा
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करून कोरोनाविरुद्ध लढणार्‍यांना प्रोत्साहन देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टर्स व परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलिस, माध्यमे यांचे मनोधैर्य वाढते. तेव्हा या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता पाच मिनिटे लोकांनी गॅलरीत, गच्चीत, दरवाजे, खिडक्यात उभे राहून अवश्य टाळ्या, थाळ्या वाजविल्या पाहिजेत आणि घंटानाद केला पाहिजे. सरकारबरोबरच लोकांची इच्छाशक्ती, मनोबल आणि धैर्य या गुणांच्या बळावर आपण भारतीय नक्कीच कोरोनाला परतवून लावू आणि याची खात्री प्रत्येकाने बाळगली पाहिजे

Friday, 20 March 2020

जैविक युद्ध आणि व्यवस्थेचं भवितव्य दिनांक 20-Mar-2020-TARUN BHARAT- मल्हार कृष्ण गोखले

वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे.


‘एम आय ६’ या ब्रिटिश गुप्तचर खात्यातला यशस्वी अधिकारी कमांडर जेम्स बाँड याला त्याचा बॉस अ‍ॅडमिरल ‘एम’ सूचना देतो की, त्याने स्वित्झर्लंडला जायचं आहे. स्वित्झर्लंडच्या पिझ ग्लोरिया नामक अत्यंत निसर्गरम्य पर्यटनस्थळी काउंट बाल्थाझार डि ब्ल्यूव्हिल हा उमराव कसले तरी शास्त्रीय प्रयोग करतो आहे. त्याच्या गोटात शिरायचं आणि त्याचं नेमक उद्दिष्ट शोधून काढायचं. काउंट बाल्थाझारच्या ऐतिहासिक वंशावळीचा संशोधक म्हणून बाँड त्याच्या प्रयोगशाळेत शिरतो. तिथे त्याला कळतं की, पाळीव गुरंढोरं आणि शेतमाल यांच्यामुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीवर तो संशोधन करीत आहे. प्रत्यक्षात ते संशोधन, शेतमाल आणि अन्नधान्य विषारी बनवून ब्रिटनचं मनुष्यबळ संपवून टाकण्याच्या उद्देशाने चालू असतं आणि ‘काउंट बाल्थाझार’ हे नाव धारण केलेला इसम दुसरा तिसरा कोणी नसून अर्न्स्ट ब्लोफेल्ड असतो. डॉ. अर्न्स्ट स्टाव्हरो ब्लोफेल्ड! महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवामुळे संतापलेला आणि ब्रिटनचा सूड घेण्यासाठी टपलेला जर्मन वैज्ञानिक डॉ. ब्लोफेल्ड!



ब्लोफेल्ड बाँडला ओळखतो, पण कोणत्याही क्षणी ठार होण्याची शक्यता असलेला बाँड अखेर ब्लोफेल्डवर मात करून यशस्वी होतो. ब्रिटन आणि अन्य लोकशाही देशांविरोधात जैविक युद्ध पुकारण्यास सज्ज झालेल्या ब्लोफेल्डची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली जाते. तो स्वतः मात्र निसटतो. इयान फ्लेमिंग या जेम्स बाँड कथामालेच्या लेखकाच्या ‘ऑन हर मॅजेस्टीज सीक्रेट सर्व्हिस’ या १९६३ साली लिहिल्या गेलेल्या कांदबरीचं हे कथानक आहे. इयान फ्लेमिंगचं वैशिष्ट्य असे आहे की, तो स्वतःच एकेकाळी गुप्तहेर होता. ब्रिटिश रॉयल नेव्हीचं स्वतःचं असं ‘नेव्ही इंटेलिजन्स डिपार्टमेंट’ ऊर्फ ‘निड’ हे गुप्तवार्ता खातं होतं. त्यात स्वत: फ्लेमिंगनेच अनेक गुप्त कामगिर्‍या पार पाडलेल्या होत्या. शिवाय त्याच्या अन्य सहकार्‍यांनी पार पाडलेल्या कामगिर्‍याही त्याला माहीत होत्या. निवृत्तीनंतर फ्लेमिंग ब्रिटन सोडून वेस्ट इंडिजमध्ये जमैका इथे स्थायिक झाला. तिथेच त्याने ‘जेम्स बाँड’ ही गुप्तहेर कथामाला लिहायला सुरुवात केली. पाहिलेल्या, ऐकलेल्या असंख्य जुन्या-नव्या गुप्त कामगिर्‍यांचा मसाला वापरून त्याने आपली कथानकं सजवली. त्यामुळे त्याच्या कथानकांमध्ये पूर्णपणे काल्पनिक असं काही नसतं. घडलेल्या घटनाच भरपूर रंगवून, फुलवून तो मांडतो. मग वरील कथानकात काही सत्य होतं का? ब्रिटनविरुद्ध खरोखरच कुणी एखादा सूडाने पेटलेला वैज्ञानिक किंवा एखादी गुप्त संघटना असं जैविक युद्ध खेळायला सिद्ध झाली होती का? या प्रश्नाला मात्र कुणीही, कसलंही अधिकृत उत्तर देत नाही.



‘वूहान कोरोना’ मुळे संपूर्ण मानवजात भयभीत झालेली असताना जैविक आणि रासायनिक युद्धांच्या अशा अनेक गोष्टी पुढे येतात. विशेष म्हणजे कोरोनासाठी संपूर्ण पाश्चिमात्त्य जग जरी चीनला जबाबदार धरत असलं तरी असले घातक प्रयोग करण्यात कुणीही मागे नाही. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जगभरात, हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये अणुहल्ल्यात ठार झालेल्या जपानी नागरिकांचे स्मरण केले जाते. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या वरील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून लाखो लोकांना अवघ्या काही मिनिटांमध्ये ठार केलं होतं. जपानने त्यामुळे ताबडतोब शरणागती पत्करली आणि त्यामुळे सहा वर्षं सुरू असलेलं आणि संहारक असं महायुद्ध संपलं, हे आपल्याला माहीतच आहे. दर ऑगस्ट महिन्यात हिरोशिमा-नागासाकीच्या मृतांना आदरांजली वाहतानाच अमेरिकेच्या नावानेही बोटं मोडण्यात येतात. का? तर त्यांनी निरपराध नागरिकांवर अणुबॉम्ब टाकला. हे असं घडणं अपरिहार्यच आहे. पण, हे करताना एक महत्त्वाची गोष्ट विसरली जाते. किंबहुना, ती मुळातच कुणाला माहीत नसते. ती म्हणजे जपानने अमेरिकेविरुद्ध जैविक युद्ध पुकारण्याची सुरू केलेली जय्यत तयारी.

‘इंपीरियल जॅपनीज आर्मी युनिट ७३१’ हे जपानी लष्कराचं वैज्ञानिक अस्त्र शोधपथक अत्यंत गुप्तपणे अनेक प्रकारच्या रोगजंतूंवर प्रयोग करीत होतं. लेफ्टनंट जनरल डॉ. शिरो अशीई हा नामवंत जपानी वैज्ञानिक या पथकाचा प्रमुख होता. जपानने १९३१ साली चीनवर स्वारी करून चीनचा मांचुरिया हा प्रांत हडपला होता. या मांचुरियात डॉ. शिरो अशीई आणि त्याचे लोक चिनी युद्धकैद्यांवर नाना प्रकारच्या जंतूंचे नि विषाणूंचे प्रयोग करीत. जपानने १९४१ साली अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविक तळावर हल्ला करून तिची दाणादाण उडवली. पण, अमेरिकेची सामरिक शक्ती अवाढव्य आहे. पूर्ण क्षमतेने युद्धात उतरलेल्या अमेरिकेसमोर आपण किरकोळ आहोत, ही जाणीव जपानला होती. त्यामुळे जपानने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, पण तितकाच क्रूर आणि गलिच्छ बेत आखला होता. २२ सप्टेंबर, १९४५च्या रात्री जपानी विमानं अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील कॅलिफोर्निया प्रांतातील सानदिलॉगो शहरावर बॉम्बफेक करणार होती. या बॉम्बमध्ये स्फोटकं नव्हती, तर ‘प्लेग’ या अत्यंत सांसर्गिक आणि प्राणघातक रोगाचे जंतू होते. ‘प्लेग’ किंवा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ब्युबॉनिक प्लेग’ असं म्हटलं जातं, त्या रोगाने एकेकाळी युरोप खंडात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘ब्लॅक डेथ’ या नावानेही ओळखल्या जाणार्‍या प्लेगने अक्षरशः लाखो माणसं किड्यामुंग्यांप्रमाणे मेली होती. त्याच प्लेगचे रोगजंतू अमेरिकेतसोडून द्यायचे नि हाहाकार माजवून द्यायचा, असा जपानचा बेत होता. या मोहिमेचं सांकेतिक लष्करी नाव होतं, ‘ऑपरेशन चेरी ब्लॉसम अ‍ॅट नाईट.’ पण, ती मोहीम झालीच नाही. ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकन अणुबॉम्ब पडले नि हादरलेल्या जपानने १५ ऑगस्ट १९४५ ला संपूर्ण शरणागती पत्करली.



पण, या सगळ्या तर पाऊणशे वर्षांपूर्वीच्या गोष्टी झाल्या. १९९१ सालचं आखाती युद्ध आठवतं का? इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैन याने शेजारच्या कुवेत या चिमुकल्या देशावर हल्ला करून तो हडप केला. तेव्हा सौदी अरेबिया आणि अमेरिका यांनी इराकवर हल्ला करून सद्दामचा पराभव करून कुवेत मुक्त केला. या युद्धाच्या वेळी इराकने संयुक्त राष्ट्रसंघाकडे अशी अधिकृत कबुली दिली की, “आम्ही ‘बोटुलिनम’ नावाचं अतिजहाल विषारी रसायन १९ हजार किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवून त्यापैकी १० हजार किलो बाँब्समध्ये भरलंदेखील होतं. पण, त्याचा उपयोग आम्ही केला नाही.” हे रसायन इतकं घातक आहे की, १० हजार किलोमध्ये पृथ्वीवरील सर्व सजीव तीनवेळा संपूर्ण नष्ट झाले असते. १९८७-८८ मध्ये सद्दामने इराकच्या उत्तरेकडच्या डोंगराळ भागात राहणार्‍या कुर्द जमातीच्या बंडखोरांना चिरडून टाकण्यासाठी खुशाल विषारी वायू आणि विषारी रसायनं वापरली होती. ४५०० गावांमधल्या किमान १ लाख, ८२ हजार कुर्द लोकांना मस्टर्ड गॅस, नर्व्ह एजंट जीबी, सरीन इत्यादी अतिविषारी वायू किंवा रसायनांचा वापर करून सरळ ठार मारण्यात आलं. त्यापूर्वी सद्दामने आपल्या सैनिकांना आदेश दिला होता म्हणे की, कुर्दांची घरंदारं, गुरंढोरं, पैसाअडका, मुलंबाळं, बायकामुली या तुमच्याच आहेत. तेव्हा पहिल्यांदा हवं ते उचला नि मग कुर्दांना संपवा. सद्दामच्या सैनिकांनी आनंदाने आज्ञापालन केलं. सद्दाम स्वतःला ‘समाजवादी’ म्हणवत असे. कसला सॉलिड समाजवाद आहे ना!



असो. तर मुद्दा काय की, वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे. लोकशाहीवादी अमेरिकेला अशी महत्त्वाकांक्षा नाही, असं बिलकुल नव्हे, पण आता प्रत्यक्ष एखादा देश, भूभाग हा हातात ठेवून, त्याचं शोषण करत राहाणं हे खर्चिक आहे, हे ओळखून अमेरिकेने जगावर राज्य करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेला एक मायावी सोेफिस्टिकेटेड रूप दिलं. ते म्हणजे ‘ग्लोबलायझेशन.’ एकीकडे तिचे नवनवीन शस्त्र आणि जैविक वा अन्य वैज्ञानिक अस्त्र बनवण्याचे प्रयोग चालू आहेतच. ते थांबलेले नाहीत, पण दुसरीकडे जागतिकीकरणामुळे अमेरिकेकडे जगातील अफाट संपत्ती आपोआप येतेच आहे.



‘वूहान कोरोना’च्या जागतिक संकटामुळे मनुष्यहानी होईल, न होईल, कमीत कमी होईल, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. पण, ही साथ आटोक्यात आल्यानंतरचा काळ हा जास्तच कसोटी पाहणारा असेल. जगातल्या प्रत्येक देशाची नुसती अर्थव्यवस्थाच नव्हे, तर संपूर्ण समाजरचना, समाजव्यवस्थाच ढवळून निघणार आहे. पुरवठा आणि मागणीची जागतिक साखळी व्यवस्था मागे पडून पुन्हा स्थानिक मागणी, पुरवठा प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कारणांसाठी मोठमोठ्या कार्यालयांमधून एकत्र येणं, प्रवास, परिषदा, बैठका, सेमिनार्सऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे कामं होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांऐवजी स्थानिक छोटी रुग्णालयं प्रभावी नि उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त केंद्रीकरण म्हणजेच ‘ग्लोबलायझेशन’ संपून विकेंद्रीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. बघू या काय नि कसं घडतं?