SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label CRICKET. Show all posts
Showing posts with label CRICKET. Show all posts
Friday, 23 June 2017
आता लाड पुरेत!सुनील गावसकर यांनी म्हटल्यानुसार आता खेळाडूंना सरावातून सुटी देऊन शॉपिंग करा, असे सांगणारा मार्गदर्शक हवा आहे. हे चित्र बदलणे आणि क्रिकेटपटूंचे लाड कमी करणे आवश्यक आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारताने गमाविल्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहली आणि मुख्य मार्गदर्शक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदांची विकोपाला गेल्याचे समोर आले. याबाबतची चर्चा स्पर्धेआधीपासून होती; परंतु वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे प्रशिक्षक असतील, असे स्पष्ट करण्यात आल्याने तिला विराम मिळाला होता. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर कुंबळे यांनी थेट पदाचा राजीनामा दिल्याने मार्गदर्शकाविनाच भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना झाला. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कुंबळेची पाठराखण करताना सध्याच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठविली आहे. कुंबळे यांचा शिस्तीचा आग्रह अनेक खेळाडूंना जाचक ठरत असल्याने त्यांनी बंड केले, असा सुनील यांचा सूर आहे. अशा खेळाडूंना संघातून नारळ देण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. अर्थात, भारतीय क्रिकेट संघाला हे काही नवीन नाही. बिशनसिंग बेदींपासून ग्रेग चॅपेलपर्यंतच्या अनेक मार्गदर्शकांना याच मार्गाने जावे लागले आहे. कुंबळे हा या मालिकेतील आणखी एक बळी ठरले आहेत. क्रिकेटपटूंना मिळणारी लोकप्रियता, त्यांच्या कमाईचे आकडे या सर्वांमुळे हा सगळा खटाटोप केवळ आपल्यामुळेच चालतो असा समज त्या संघातील प्रत्येकाचा होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समितीदेखील आपल्या वागण्यातून या खेळाडूंचा समज दृढ करीत राहते. त्यातून दर दोन-चार वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर ऑलिंपिक सुवर्णपदक नेमबाज अभिनव बिंद्राचे वक्तव्यही महत्त्वाचे ठरते. न पटणाऱ्या मार्गदर्शकाबरोबर आपण एक दोन नव्हे तर तब्बल वीस वर्षे काढल्याचे बिंद्राने म्हटले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त कोणत्यात खेळामध्ये खेळाडूंच्या म्हणण्याला महत्त्व देण्याची पद्धत आपल्या देशात नसल्याने बिंद्राला सहन करण्यावाचून पर्यायही नव्हता. क्रिकेटपटूंना मात्र हे भाग्य लाभते. क्रिकेटपटू कितीही व्यावसायिक खेळाडू असल्याचा आव आणत असले तरीही त्यांची व्यावसायिकता ही फक्त जाहिरातींची कंत्राटे मिळविण्यापुरती किंवा बोर्डाकडून मिळणारे वार्षिक करार मिळविण्याइतकीच आहे. प्रत्यक्ष खेळताना त्यांच्यात या व्यावसायिकतेचा अभाव दिसून येतो. शारीरिक तंदुरूस्ती, मनाची एकाग्रता, शंभर टक्के संघभावना या निकषांवर भारतीय क्रिकेटपटू अनेकदा नापास ठरतात. अशा गोष्टींचा आग्रह धरणारी कोणतीही यंत्रणा त्यांना लगेचच नकोशी होती. सुनील गावसकर यांनी म्हटल्यानुसार आता खेळाडूंना सरावातून सुटी देऊन शॉपिंग करा, असे सांगणारा मार्गदर्शक हवा आहे. हे चित्र बदलणे आणि क्रिकेटपटूंचे लाड कमी करणे आवश्यक आहे. एका वेळेस दोन संघ तयार करणे, कोणत्याही क्रिकेटपटूला आपले संघातील स्थान टिकविण्यासाठी कामगिरी हा एकच निकष ठेवणे आदी उपाय तातडीने करायला हवेत. त्याचप्रमाणे मार्गदर्शकाची कर्तव्ये, त्यांची भूमिका याची जाणीव खेळाडूंना करून देण्याची आवश्यकता आहे. मैदानावर खेळाडू खेळत असले तरीही त्यामागचा विचार मार्गदर्शक करतो. त्यानुसार तो धोरणे आखत असतो, हे या सगळ्यांचे कान धरून सांगण्याची वेळ आली आहे. ती जाणीव जितक्या लवकर दिली जाईल तितके भारतीय क्रिकेटला बरे दिवस येतील. अन्यथा चॅपेल-तेंडुलकर, चॅपेल-द्रविड, कुंबळे-कोहली ही कटूमालिका सुरूच राहील
Sunday, 10 August 2014
SACHIN TENDULKAR THE CELEBRATY MP
Thursday, 13 February 2014
IPL BLACK SIDE OF CRICKET-एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपनअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा -
Tuesday, 21 May 2013
क्रिकेटपटू व बुकी जेलमध्ये-खरे ‘फिक्सर’ कुठे आहेत?-- प्रभाकर पवार
क्रिकेटपटू व बुकी जेलमध्ये-खरे ‘फिक्सर’ कुठे आहेत?-- प्रभाकर पवार
कोणताही बुकी आपला धंदा सुरू करण्यापूर्वी पोलिसांपासून ते बड्या बड्या राजकीय व्यक्तींना मॅनेज करूनच गुप्त ठिकाणी आपली यंत्रणा उभी करतात आणि बेटिंग सुरू करीत असतात. बुकींचे बड्या बड्या व्यक्तीेशी संबंध असतात. लाखो रुपये दिल्यानंतरच त्या बुकींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळतो. परंतु कुणी बुकी किंवा क्रिकेटपटू पकडले गेल्यानंतर मात्र कुणा राजकीय व्यक्तीचे नाव पुढे येत नाही. मोठे मासे व खरे फिक्सर कायम नामानिराळेच राहतात.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमध्ये खेळणारे काही खेळाडू मॅच फिक्सिंग स्कॅण्डलमध्ये पकडले गेल्याचा धक्का सार्या क्रिकेट चाहत्यांना जसा बसला आहे, तसा धक्का आपणासही बसल्याचा दावा क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्यांनी केल्याने माहीतगारांना भोवळच आली आहे. प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर सारेच हात वर करतात. ज्या क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे ते संशयित क्रिकेटपटू व त्यांचे नातेवाईकही आपल्या मुलांना गुंतविण्यात आल्याचा आरोप करीत आहेत. सत्य काय आहे हे फक्त दिल्ली पोलिसांनाच माहीत, परंतु आग लागल्याशिवाय धूर येत नाही. क्रिकेट मॅच फिक्सिंग हा प्रकार काही नवीन नाही. हिंदुस्थानात बुकी कोणत्याही खेळावर बेटिंग घेत असतात. खेळत असतात. ठरल्याप्रमाणे किंवा हरल्यावर कुणी पैसे दिले नाहीत तर मग हे बुकी अंडरवर्ल्डचीही मदत घेतात. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. क्रिकेट बुकींवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव आहे हे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कप्तान अझरुद्दीन याचे तर दाऊदचा उजवा हात शरद शेट्टी याच्याबरोबर घनिष्ट संबंध असल्याचे काही फोटो आजही मुंबई क्राइम ब्रँचच्या दफ्तरी आहेत. शरद शेट्टीच्या इशार्यावरून अझरुद्दीन याने बर्याच मॅच फिक्स केल्या होत्या. शरद शेट्टी ऊर्फ ‘अण्णा’ यास २००३ साली छोटा राजनच्या गुंडांनी दुबईत गोळ्या घालून ठार मारले. दाऊदला हादरा देण्यासाठीच हा ‘गेम’ करण्यात आला. त्याचा परिणाम दुबईत झाला. मुंबईतील गँगवॉर दुबईत पोचल्याने तेथील पोलीस व सरकार हादरून गेले. त्यांनी तत्काळ दुबईत शोध घेऊन मुंबईतील गुंडांना हाकलण्यास सुरुवात केली. त्यात दाऊदचा भाऊ इकबाल कासकर व कांजूरमार्गचा अनिल परब ऊर्फ ‘वांग्या’ आदी गुंंड होते. आपले बिंग फुटेल, आपली सारी गुपिते इकबाल पोलिसांना व गुप्तहेर संघटनांना सांगेल म्हणून पाकिस्तानात आयएसआयचे बाहुले बनून राहिलेल्या दाऊदने इकबालला हिंदुस्थानात न जाता पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले. त्याला विनंतीही केली, परंतु इकबालने ऐकले नाही. तो दाऊदला म्हणाला, ‘मी पाकिस्तानात लपून बसणार नाही. त्यापेक्षा मुंबईच्या जेलमध्ये मला राहणे आवडेल’ असे सांगून त्याने आपण हिंदुस्थानी असून आपणास हिंदुस्थानात ‘डिपोर्ट’ करावे असेही दुबई सरकारला सांगितलेे. त्याप्रमाणे २००३ साली इकबाल मुंबईत परतला. त्यावेळी त्याने मुंबईतील महत्त्वाच्या कोण कोण व्यक्ती दुबईला जातात, कुणाकुणाला भेटतात, कुणाचे दाऊदशी घनिष्ट संबंध आहेत याची आकडेवारीच मुंबई क्राइम ब्रँचला सादर केली होती. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांच्या दुबईवारीवर तर इकबाल कासकरने जळजळीत प्रकाश टाकला होता, परंतु माहिती मिळूनही मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली कुणाही राजकीय नेत्याची कधीही चौकशी केली नाही. त्यामुळेच अबू आझमीसारखे नेते शिरजोर झाले. अतिरेकी व पोलिसांवर हल्ले करणार्यांच्या नातेवाईकांना मदत करू लागले.
आयपीएल क्रिकेट मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटू व बुकींना अटक केल्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनीही क्रिकेट बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पत्रकार परिषदेत नुकतेच सांगितले आहे. परंतु त्यात काही नवीन नाही. इकबाल कासकरनेही दहा वर्षांपूर्वी मुंबई क्राइम ब्रँचलाही हेच सांगितले होते, परंतु क्रिकेट बोर्डाने त्याची काही गंभीरपणे दखल घेतली नाही. इकबाल म्हणाला होता, ‘शारजा येथील क्रिकेट स्टेडियमचा मालक बुखातीर याच्याशी दाऊद व शरद शेट्टीचे संबंध आहेत. बुखातीरशी सल्लामसलत करूनच मॅच फिक्स केली जायची. चार फलंदाज व दोन गोलंदाजांना ‘मॅनेज’ केले जायचे. त्यासाठी अझरुद्दीन व अजय जाडेजा हे दोघे महत्त्वाची भूमिका बजवायचे अशी माहिती देताना इकबाल पुढे म्हणतो, ‘शरद शेट्टी बेट हरल्यानंतर बुकींना पैसे द्यायचा नाही. छोटा शकील बुकींंना धमकवायचा आणि शरद शेट्टीला माफ करायला लावायचा. सगळ्यात कमी पैशात वेस्ट इंडीजचा संघ ‘मॅनेज’ व्हायचा असेही कासकर याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे. तेव्हा क्रिकेटपटू व बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध यात काहीच नवीन नाही. आता तर सिनेअभिनेता विंदू दारा सिंह यासही मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्याने बॉलीवूडचे क्रिकेट बुकींबरोबरचे कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झाले होते. तेव्हा क्रिकेट हा एकेकाळचा जंटलमनचा आदर्श खेळ आता रसातळाला गेला आहे. पैशांसाठी क्रिकेट चाहत्यांना उल्लू बनविण्याचा हा धंदा गंदा झाला आहे. तेव्हा क्रिकेटच्या चाहत्यांनी क्रिकेटवर आता किती विश्वास ठेवावा याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एका ओव्हरमध्ये १४ पेक्षा अधिक धावा देण्यासाठी एका गोलंदाजाला क्रिकेट बुकींनी ४० लाख रुपये देऊ केले होते. म्हणजे या आयपीएल मॅचेसच्या माध्यमातून किती करोडो रुपयांची उलाढाल होत आहे ते पहा! आयपीएल मॅचेसमधील नफ्यातील एक-दोन टक्के जरी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत केली तरी लोक क्रिकेट बोर्डाला दुवा देतील, पण गरीबांना कोण विचारतो?
कोणताही बुकी आपला धंदा सुरू करण्यापूर्वी पोलिसांपासून ते बड्या बड्या राजकीय व्यक्तींना मॅनेज करूनच गुप्त ठिकाणी आपली यंत्रणा उभी करतात आणि बेटिंग सुरू करीत असतात. बुकींचे बड्या बड्या व्यक्तीेशी संबंध असतात. लाखो रुपये दिल्यानंतरच त्या बुकींना ‘ग्रीन सिग्नल’ मिळतो. परंतु कुणी बुकी किंवा क्रिकेटपटू पकडले गेल्यानंतर मात्र कुणा राजकीय व्यक्तीचे नाव पुढे येत नाही. मोठे मासे व खरे फिक्सर कायम नामानिराळेच राहतात.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमध्ये खेळणारे काही खेळाडू मॅच फिक्सिंग स्कॅण्डलमध्ये पकडले गेल्याचा धक्का सार्या क्रिकेट चाहत्यांना जसा बसला आहे, तसा धक्का आपणासही बसल्याचा दावा क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्यांनी केल्याने माहीतगारांना भोवळच आली आहे. प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर सारेच हात वर करतात. ज्या क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली आहे ते संशयित क्रिकेटपटू व त्यांचे नातेवाईकही आपल्या मुलांना गुंतविण्यात आल्याचा आरोप करीत आहेत. सत्य काय आहे हे फक्त दिल्ली पोलिसांनाच माहीत, परंतु आग लागल्याशिवाय धूर येत नाही. क्रिकेट मॅच फिक्सिंग हा प्रकार काही नवीन नाही. हिंदुस्थानात बुकी कोणत्याही खेळावर बेटिंग घेत असतात. खेळत असतात. ठरल्याप्रमाणे किंवा हरल्यावर कुणी पैसे दिले नाहीत तर मग हे बुकी अंडरवर्ल्डचीही मदत घेतात. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. क्रिकेट बुकींवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव आहे हे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. हिंदुस्थानी क्रिकेटचा माजी कप्तान अझरुद्दीन याचे तर दाऊदचा उजवा हात शरद शेट्टी याच्याबरोबर घनिष्ट संबंध असल्याचे काही फोटो आजही मुंबई क्राइम ब्रँचच्या दफ्तरी आहेत. शरद शेट्टीच्या इशार्यावरून अझरुद्दीन याने बर्याच मॅच फिक्स केल्या होत्या. शरद शेट्टी ऊर्फ ‘अण्णा’ यास २००३ साली छोटा राजनच्या गुंडांनी दुबईत गोळ्या घालून ठार मारले. दाऊदला हादरा देण्यासाठीच हा ‘गेम’ करण्यात आला. त्याचा परिणाम दुबईत झाला. मुंबईतील गँगवॉर दुबईत पोचल्याने तेथील पोलीस व सरकार हादरून गेले. त्यांनी तत्काळ दुबईत शोध घेऊन मुंबईतील गुंडांना हाकलण्यास सुरुवात केली. त्यात दाऊदचा भाऊ इकबाल कासकर व कांजूरमार्गचा अनिल परब ऊर्फ ‘वांग्या’ आदी गुंंड होते. आपले बिंग फुटेल, आपली सारी गुपिते इकबाल पोलिसांना व गुप्तहेर संघटनांना सांगेल म्हणून पाकिस्तानात आयएसआयचे बाहुले बनून राहिलेल्या दाऊदने इकबालला हिंदुस्थानात न जाता पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले. त्याला विनंतीही केली, परंतु इकबालने ऐकले नाही. तो दाऊदला म्हणाला, ‘मी पाकिस्तानात लपून बसणार नाही. त्यापेक्षा मुंबईच्या जेलमध्ये मला राहणे आवडेल’ असे सांगून त्याने आपण हिंदुस्थानी असून आपणास हिंदुस्थानात ‘डिपोर्ट’ करावे असेही दुबई सरकारला सांगितलेे. त्याप्रमाणे २००३ साली इकबाल मुंबईत परतला. त्यावेळी त्याने मुंबईतील महत्त्वाच्या कोण कोण व्यक्ती दुबईला जातात, कुणाकुणाला भेटतात, कुणाचे दाऊदशी घनिष्ट संबंध आहेत याची आकडेवारीच मुंबई क्राइम ब्रँचला सादर केली होती. समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांच्या दुबईवारीवर तर इकबाल कासकरने जळजळीत प्रकाश टाकला होता, परंतु माहिती मिळूनही मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली कुणाही राजकीय नेत्याची कधीही चौकशी केली नाही. त्यामुळेच अबू आझमीसारखे नेते शिरजोर झाले. अतिरेकी व पोलिसांवर हल्ले करणार्यांच्या नातेवाईकांना मदत करू लागले.
आयपीएल क्रिकेट मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटू व बुकींना अटक केल्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनीही क्रिकेट बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पत्रकार परिषदेत नुकतेच सांगितले आहे. परंतु त्यात काही नवीन नाही. इकबाल कासकरनेही दहा वर्षांपूर्वी मुंबई क्राइम ब्रँचलाही हेच सांगितले होते, परंतु क्रिकेट बोर्डाने त्याची काही गंभीरपणे दखल घेतली नाही. इकबाल म्हणाला होता, ‘शारजा येथील क्रिकेट स्टेडियमचा मालक बुखातीर याच्याशी दाऊद व शरद शेट्टीचे संबंध आहेत. बुखातीरशी सल्लामसलत करूनच मॅच फिक्स केली जायची. चार फलंदाज व दोन गोलंदाजांना ‘मॅनेज’ केले जायचे. त्यासाठी अझरुद्दीन व अजय जाडेजा हे दोघे महत्त्वाची भूमिका बजवायचे अशी माहिती देताना इकबाल पुढे म्हणतो, ‘शरद शेट्टी बेट हरल्यानंतर बुकींना पैसे द्यायचा नाही. छोटा शकील बुकींंना धमकवायचा आणि शरद शेट्टीला माफ करायला लावायचा. सगळ्यात कमी पैशात वेस्ट इंडीजचा संघ ‘मॅनेज’ व्हायचा असेही कासकर याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले आहे. तेव्हा क्रिकेटपटू व बुकींचे अंडरवर्ल्डशी संबंध यात काहीच नवीन नाही. आता तर सिनेअभिनेता विंदू दारा सिंह यासही मॅच फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्याने बॉलीवूडचे क्रिकेट बुकींबरोबरचे कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड झाले होते. तेव्हा क्रिकेट हा एकेकाळचा जंटलमनचा आदर्श खेळ आता रसातळाला गेला आहे. पैशांसाठी क्रिकेट चाहत्यांना उल्लू बनविण्याचा हा धंदा गंदा झाला आहे. तेव्हा क्रिकेटच्या चाहत्यांनी क्रिकेटवर आता किती विश्वास ठेवावा याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एका ओव्हरमध्ये १४ पेक्षा अधिक धावा देण्यासाठी एका गोलंदाजाला क्रिकेट बुकींनी ४० लाख रुपये देऊ केले होते. म्हणजे या आयपीएल मॅचेसच्या माध्यमातून किती करोडो रुपयांची उलाढाल होत आहे ते पहा! आयपीएल मॅचेसमधील नफ्यातील एक-दोन टक्के जरी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत केली तरी लोक क्रिकेट बोर्डाला दुवा देतील, पण गरीबांना कोण विचारतो?
Monday, 20 May 2013
IPL WATCHERS ANTINATIONAL
आयपीएलचे प्रेक्षकही देशद्रोही
सुहास फडकेसध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेचा आनंद लुटणारे आपण सारे भारतीय देशद्रोही आहोत हे बहुधा आपल्या लक्षात आलेले नाही. आयपीएलच्या बहुतेक लढतींचा निकाल आधी ठरलेला असतो अशी चर्चा ही स्पर्धा सुरू झाल्यापासून सुरू होती. ही बाब कधीच सिध्द झाली नाही हेही खरे.मात्र एखाद्या षटकात किती धावा द्यायच्या, किती नो बॉल टाकायचे हे आधी ठरते ही बाब श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला ह्यांना अटक झाल्यानंतर उघडकीस आली आहे. ह्या पैकी चंडिलाचा स्थानिक स्पर्धांमधील कामगिरी इतकी टुकार आहे की त्याला राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी विकत घेतले ही बाबच संशयास्पद वाटते.
पोलिसांनी ह्या तिघांविरुध्द पुरावा म्हणून इतक्या बाबी पुढे आणल्या आहेत की, हे प्रकरण त्यांनी पुढे रेटले तर तिघेही तुरुंगात जातील. अर्थात माझा मुद्दा हा नाही. पोलिस सांगत आहेत की बुकींच्या कटात हे सामील होते आणि बुकींचा बोलाविता धनी भारताविरुध्द कटकारस्थाने करणारा दाऊद इब्राहीम आहेत ही बाब माझ्यासाठी धोकादायक वाटते.
मुंबईत १९९३ मध्ये झालेले बाँबस्फोट असोत किंवा कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत भारताशी पुकारलेले युध्द असो किंवा देशभरात अनेक ठिकाणी घडलेले बाँबस्फोट असोत, त्यात दाऊदचा हात असतो. भारतातल्या तरुणांना हाताशी धरून तो हे सारे घडवून आणतो हेही स्पष्ट झालेले आहे.
अशा वेळी आपण आयपीएलच्या सामन्यांना गर्दी करून किंवा ते उत्साहाने चॅनलवर बघून दाऊदला आर्थिक मदत करत असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण आपण आपल्या खिशात हात घालतो म्हणून आयपीएल चालते. ह्यातला काही भाग कराचीतून, दुबईतून भारताविरुध्द कट करणाऱ्यांकडे बुकींमार्फत जातो. बुकी हे अशांच्या इशा-यावर काम करत असतात हेही दिसून आले आहे.
अशा वेळी केवळ बॉलीवूडचे सितारे, राजकारणी आणि त्यांची मुले तेथे जातात म्हणून आपण त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही. किंबहुना अशा त-हेचे फिक्सिंग सुरू असेल तर आयपीएलमधील मैदानावर घडणाऱ्या अनेक बाबी संशयास्पद वाटू लागतात. एखाद्याचे शतक किंवा त्याने भोपळा न फोडणे अथवा एखाद्याने भरमसाठ नो बॉल टाकणे ह्या प्रत्येक घटनेबाबत आपण विचार करायला हवा.
आयपीएल हे मसाला सामने आहेत असे दिसते. इतके असताना आयपीएलमध्ये वेळ घालवणे हे शहाणपणाचा अभाव असण्याचे लक्षत आहे ह्यात शंका नाही
Sunday, 19 May 2013
IPL SPOT FIXING PLOY TP DIVERT ATTENTION
दिल्लीसह कॉंग्रेजी राजवटीतील अनेक राज्यांत कॉंग्रेजी मंत्र्यांच्या तोंडास काळे फासले गेले आहे. या सर्व घटनांवरून लोकांचे लक्ष उडविण्याकरिता हे अचानक आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण गाजवले गेले काय? अशी शंका आता येऊ लागली आहे.
दिल्लीतील ‘स्पॉट फिक्सिंग’
सरकारचे थोबाड साफ
करण्यासाठी आयपीएल घोटाळा!
ईश्वर ज्याप्रमाणे चराचरात भरला असल्याचे म्हटले जाते त्याप्रमाणे हिंदुस्थानात भ्रष्टाचारही चराचरात ठासून भरला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खालून वर जातो की वरून खाली झिरपतो यावर वायफळ चर्चा करण्यात अर्थ नाही. भ्रष्टाचार धर्मातही आहे आणि खेळातही आहे. आयपीएल क्रिकेटमधील सट्टेबाजीचे जे प्रकरण सध्या गाजवले आणि सजवले जात आहे तो सर्व प्रकार धक्कादायक आहे हे खरेच, पण हा सर्व प्रकार अगदी ठरल्याप्रमाणे, ठरवलेल्या वेळकाळानुसार स्फोट घडवून समोर आणला आहे. दिल्लीसह कॉंग्रेजी राजवटीतील अनेक राज्यांत भ्रष्टाचार व लाचखोरीने थैमान घातले आहे व कॉंग्रेजी मंत्र्यांच्या तोंडास काळे फासले गेले आहे. खासकरून रेल्वे घोटाळा, कोळसा घोटाळाप्रकरणी तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच तथाकथित स्वच्छ प्रतिमेचा साफ कोळसा झाला आहे. या सर्व घटनांवरून लोकांचे लक्ष उडविण्याकरिता हे अचानक आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण गाजवले गेले काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. क्रिकेटमध्ये सट्टेबाजी चालते हे आता काही नवीन राहिलेले नाही आणि आपल्याच देशातील राजकारण्यांनी ‘मतभेद’ व ‘पक्षभेद’ विसरून आयपीएल क्रिकेट सुरू केले. तो एक सट्टेबाजीचा धांगडधिंगाच आहे. आयपीएलची सुरुवात काही नैतिक व उदात्त गोष्टींसाठी झालेली नाही. राजकारणी, उद्योगपती, सिने अभिनेते यांनी एकत्र येऊन हा जुगाराचा अड्डा सुरू केला. आता जुगाराच्या अड्ड्यांवर ‘सट्टा’ नाही लावणार तर काय ताक आणि लस्सी विकणार? आयपीएलमुळे काही नवोदित खेळाडूंना संधी मिळाली. पैसे मिळाले हे खरे, पण आज क्रिकेटच्या खेळात जितका पैसा व झगमगाट आहे तेवढा अन्य कुठेच दिसत नाही. कारण जगभरातल्या सट्टेबाजांची या खेळात मोठी गुंतवणूक आहे व हे लपून राहिलेले नाही. दिल्लीचे पोलीस आयुक्त श्रीमान नीरजकुमार यांनी आयपीएल खेळातील तीन-चार कोंबड्या पकडल्या व वाघ मारल्याचा आविर्भाव आणून ते मीडियासमोर आले. विनोद कांबळी याने चांगले सांगितले. ‘छोटे मासे पकडलेत. मगर केव्हा जाळ्यात येणार?’ क्रिकेटच्या दिल्लीतील ‘स्पॉट फिक्सिंग’
सरकारचे थोबाड साफ
करण्यासाठी आयपीएल घोटाळा!
आयपीएल सट्टेबाजीत अंडरवर्ल्ड आहेच. आताही नेहमीप्रमाणे दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांची नावे समोर आलीत. त्यांचे ‘हस्तक’ मुंबईसह देशभरात ही उलाढाल करीत आहेत. त्यापैकी कितीजणांपर्यंत दिल्ली पोलीस आयुक्तांचे हात पोहोचले आहेत? मुंबई, गुडगाव, चेन्नईसारख्या शहरांत छापेमारी करून काही मोबाईल्स, काही सीमकार्ड व थातूरमातूर ‘बुकी’ नामक लोकांना अटका करायच्या, गाजावाजा करून त्यांना मीडियासमोर उभे करायचे, फोटो काढायचे हेच धंदे सध्या सुरू आहेत. जणू काही सोनिया व मनमोहन सिंगांच्या सर्व सरकारी घोटाळ्यांना मागे टाकणारा हा घोटाळा आहे असेच ढोल पिटले जात आहेत. पुन्हा एकंदरीत मीडियाच्या अवताराकडे पाहिल्यावर सरकारचा हेतू सफल झाला असेच वाटते. सर्व घोटाळे, बलात्काराच्या घटना, दिल्ली पोलिसांची नपुंसकगिरी या फिक्सिंग प्रकरणाने मागे पडली आहे व देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली पोलिसांना खास शाबासकी देऊन जोरदार पाठ थोपटली आहे. खरे तर राजधानीत दोन नृशंस बलात्कार प्रकरणांत दिल्ली पोलीस आयुक्त व त्यांच्या दलाची इज्जत धुळीस मिळाली आहे. त्यांची अकार्यक्षमता उघड झाली. पोलीस आयुक्त नीरजकुमारांना हाकला, बडतर्फ करा अशी मागणी रस्त्यांवर उतरून लाखोंचा जमाव करीत होता, पण सरकारने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना अभय दिले व आता मनमोहन, सोनिया गांधींच्या यूपीए सरकारचा भ्रष्टाचार गाजत असतानाच त्यावर ‘मात’ करण्यासाठी दिल्ली पोलीस आयुक्तांनी आयपीएलच्या जुगाराचा उतारा समोर आणला. आयपीएल जुगारात जे क्रिकेटपटू अटकेत आहेत त्यांची चौकशी यथावकाश होईलच, पण या प्रकारामुळे पवन बन्सल यांच्या रेल्वे भरती घोटाळ्यावर पाणी पडले आहे. शिवाय पंतप्रधानांचा कोळसा घोटाळा दाबण्यासाठी कायदा मंत्र्यांनी सीबीआयचे प्रतिज्ञापत्र बदलण्याचा जो निर्लज्ज प्रयत्न केला होता त्या दडपेगिरीवरून लोकांचे लक्ष हटविण्यात सत्ताधार्यांना यश मिळाले आहे. अशा तर्हेने दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरजकुमार हे संकटात सापडलेल्या मनमोहन सरकारच्या मदतीस धावून गेले. त्याबद्दल सोनिया सरकारचे फौजदार सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांची पाठ थोपटली आणि स्वत:चीही पाठ सोनियांकडून थोपटून घेण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे.
देशाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात कॉंग्रेसवाल्यांचा हात कोणीच धरणार नाही. केंद्रातील सध्याच्या राज्यकर्त्यांनी देश विकला आहे. रॉबर्ट वढेरासारख्यांनी तर जागोजाग देशाचा लिलाव मांडला आहे. कोळशापासून स्पेक्ट्रमपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार आहे व ही सरकारी तिजोरीची लूट आहे. पाकड्यांचा दहशतवाद देशाला रोज रक्तबंबाळ करीत आहे. अबलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत. सत्तेतील या दरोडेखोरांच्या टोळीचे नेतृत्व जणू मनमोहन सिंग करीत आहेत, पण आपल्या दरोडेखोरीवरचे लक्ष उडावे म्हणून आयपीएलच्या जुगारी अड्ड्यांवर धाडी घातल्या जात आहेत. सीबीआयने रेल्वे भरतीमधला सगळ्यात मोठा घोटाळा उघड केला. रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला ‘लाच’खोरी करताना पकडले. शेवटी रेल्वेमंत्री बन्सल यांना जनमताच्या रेट्यामुळे राजीनामा द्यावा लागला. मात्र चोवीस तासांत सीबीआयने पवन बन्सल यांना ‘क्लीन चिट’ देण्याचा भीमपराक्रम गाजवला. ही आमच्या देशाची शोकांतिकाच नाही काय? मोठा घोटाळा झाकण्यासाठी दुसरा घोटाळा समोर आणायचा ही एक विचित्र पद्धत सध्या सुरू झाली आहे. आयपीएल घोटाळ्यात एखाद्या बड्या कॉंग्रेसवाल्याचे ‘नाव’ आलेच तर त्यावरून लक्ष उडविण्यासाठी दुसर्या नव्या घोटाळ्याचा पत्ता फेकला जाईल व आमचे मीडियावाले हा नवा जुगारी पत्ता खेळत बसतील. आता शेवटी एक मुद्दा मांडतो व विषय संपवतो. ९ मे रोजी दिल्लीच्या विशेष शाखेचे इन्स्पेक्टर बद्रिश दत्त यांनी ‘स्पॉट फिक्सिंग’विरोधात पहिला गुन्हा दाखल केला. मात्र लगेच दुसर्या दिवशी याच बद्रिश दत्त यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहच आढळून आला. दिल्लीचे पोलीस आयुक्त या संशयास्पद मृत्यूवर बोलायला तयार नाहीत. बद्रिश दत्त यांचा संशयास्पद मृत्यू दडपण्यासाठीच नंतर क्रिकेटपटूंच्या अटकेचे प्रकरण करून गाजावाजा केला काय? तूर्त आम्ही इथेच थांबतो, पण पुन्हा एकदा याप्रकरणी मोठा स्फोट घडवून आम्ही खर्या गुन्हेगारांचे मुखवटे टराटरा फाडणार आहोत हे मात्र नक्की
Saturday, 18 May 2013
IPL GAME OF CROOKS
नीच-दगाबाजांचा खेळ-vasudeo kulkarni
भारतात क्रिकेटचा खेळ सभ्य माणसांचा राहिलेला नाही. तो पैशाला सोकावलेल्या नीच, दगाबाज क्रिकेटपटूंचा आणि प्रेक्षकांशी दगाबाजी करून हजारो कोटी रुपये मिळवणाऱ्या क्रिकेट नियामक संघाचा झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंनी देश-विदेशात जे दिवे लावले, त्याचा जाहीर पंचनामा वारंवार झाला. देशाची आणि क्रिकेटची प्रचंड बदनामी झाली. तरीही, हा फक्त पैशाचा खेळ काही थांबलेला नसल्याचेच इंडियन प्रीमियर लीगच्या तीन सामन्यांमध्ये एस. श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनी स्पॉट फिक्सिंसाठी लाखो रुपयांची लाच खाल्ल्याची घटना पोलिसांनीच उघडकीस आणल्याने पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्याशिवाय या साऱ्या प्रकरणात एकूण 40 हजार कोटी रुपयांची सट्टेबाजी आणि खेळाडू व बुकींमध्ये पैशांची देवघेव झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. इंडियन प्रीमियर लीग ही संघ विकत घेतलेल्या पैसेवाल्या उद्योगपतींमुळे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांमुळे इंडियन पैसा लीग झाली आहे. आयपीएलच्या साखळी सामन्यांच्या गोंडस नावाखाली देश आणि विदेशातल्या क्रिकेटपटूंची जाहीर लिलावाद्वारे कोट्यवधी रुपयांना खरेदी-विक्री सुरू झाली. खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि या संघांचे मालक प्रेक्षकांना लुबाडून मालामाल झाले. प्रेक्षकांशी दगाबाजी करून, काही भारतीय खेळाडूंनीच सट्टेबाजांच्याकडून तीन सामन्यांतल्या प्रत्येकी एका षटकासाठी बेशरमपणे पन्नास-साठ लाख रुपये घेतल्याचे प्रकरण दिल्ली पोलिसांनी उघडकीला आणल्यामुळे, भारतीय क्रिकेटच्या उरल्यासुरल्या अब्रूची होळी झाली आहे. या तीन खेळाडूंनी सट्टेबाजांशी कसा संपर्क साधला, त्यांच्याशी काय बोलणे केले? स्पॉट फिक्सिंग कसे केली? लक्षावधी रुपये कसे कमावले? याचा तपशील दिल्ली पोलिसांनी या तीनही खेळाडूंना दहा बुकींसह अटक केल्यानंतर जनतेला दिला आहेच. पण त्यापेक्षाही अतिभयंकर आणि लाजिरवाणी बाब म्हणजे श्रीसंत आणि चंडिला या नतद्रष्ट-नालायक खेळाडूंनी सट्टेबाजांच्याकडून निर्लज्जपणे ललना पुरवायचीही मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. श्रीसंतला दिल्ली पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली, तेव्हा तो सट्टेबाजांनी पाठवलेल्या ललनांच्या गराड्यातच होता. न्यायाधीशांच्यासमोर हजर करायसाठी नेताना या तीनही खेळाडूंनी आपली काळी तोंडे लपवायचा प्रयत्न केला. वास्तविक या तिघांनाही भर चौकात उभे करून जोड्यांनी मारायला हवे. त्यांचे कृत्य हे भयंकर तर आहेच, पण भारतीय क्रिकेट हे आता रसातळाला गेल्याचेही जगासमोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे कडक शिस्तीचे आहे आणि ते असली बेशिस्त (!) मुळीच खपवून घेणार नाही. संबंधित खेळाडूंवर कडक कारवाई करेल, अशी पोकळ दमबाजी करणाऱ्या क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना, आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेत भ्रष्टाचार-लाचखोरी झाली नसावी, असे वाटते. मुळातच या क्रिकेट नियामक मंडळानेच, भारतीय क्रिकेटची वाट लावली, पुरते वाटोळे केले आणि आता तर त्याला आगच लागली आहे.
पैसा हेच सर्वस्व
भारतातल्या क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट हा धर्म राहिलेला नाही. मिळेल त्या मार्गाने प्रचंड पैसा कमवायचा हा त्यांचा धर्म आणि उद्योग झाला आहे. क्रिकेटपटू म्हणून त्यांना सरकारी व खाजगी कंपन्या आणि सरकारी खात्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपयांचा तोबरा क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या तोंडात भरते. संघात निवड झाल्यावर, प्रत्यक्ष सामन्यात राखीव ठेवलेल्या क्रिकेटपटूंना क्रीडांगणात न उतरताही प्रत्येक सामन्यासाठी लाखो रुपये मिळतात. आता जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच बाळसे धरलेल्या ट्वेंटी-20 प्रकाराच्या जगभरात होणाऱ्या स्पर्धा आणि आयपीएलमुळे क्रिेक्रेटपटूंना पैसा मिळवायची खाणच सापडली. आयपीएलमुळे क्रिकेटचा आणि खेळाडूंचा जाहीर लिलाव सुरू झाला. संघांच्या मालकांनी कोट्यवधी रुपयांची बोली बोलून देशी व परदेशी खेळाडूंना विकत घेतले. शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आणि संपत्ती मिळवूनही राजकारण्यांच्याप्रमाणेच या खेळाडूंनाही पैसा मिळवायचा भस्म्या रोग लागला आहे. कोणतीही स्पर्धा सुरू नसताना किंवा स्पर्धा सुरू असतानाही जाहिरातींद्वारे शेकडो कोटी रुपयांची माया मिळवूनही त्यांचे समाधान होत नाही. क्रिकेट नियामक मंडळावर बड्या राजकारण्यांचेच वर्चस्व असल्यानेच, आपल्या या मालकांचाच झटपट पैसे मिळवायचा आदर्श या नादान खेळाडूंनी घेतला. पैसा मिळवायला सोकावलेल्या या खेळाडूंची राष्ट्राचा आणि राष्ट्रपतींचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मश्री उपाधीचा स्वीकार करायला दोन खेळाडू राष्ट्रपती भवनातल्या सोहळ्याला गेलेच नाहीत. त्या दिवशी ते जाहिरातीसाठी चित्रिकरण करत होते. तरीही नियामक मंडळाने त्यांच्यावर कारवाई तर सोडाच, पण साधा जाबही विचारला नाही. बेलगाम आणि उन्मत्त झालेल्या या खेळाडूंनी नियामक मंडळाने केलेल्या नियमावलीवर सह्या करतानाही थयथयाट केला होता. त्यात अगदी सचिन तेंडुलकरही होताच. स्वार्थासाठी हे सारे एक होतात. नियामक मंडळालाच आव्हान देतात. यापूर्वीही सामना निश्चितीच्या घटना उजेडात आल्यावरही नियामक मंडळाने या असल्या नालायक खेळाडूंवर काहीही कारवाई केली नाही. त्यांना फक्त संघातून काही काळापुरते हाकलले, फार तर एखाद्यावर आजन्म बंदीची शिक्षा लादली; पण त्यामुळे क्रिकेटपटूंचे फारसे नुकसान झाले नाही. आधीच त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली होतीच. माजी कर्णधार अझरउद्दीन हा सामना निश्चितीच्या प्रकरणातच संघाबाहेर गेला आणि नंतर चक्क कॉंग्रेसचा खासदार झाला. क्रिेकेट खेळताना कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या खेळाडूंना ते निवृत्त झाल्यावर पुन्हा लक्षावधी रुपयांची पेन्शन देणाऱ्या या नियामक मंडळाला देशातल्या गोरगरीब जनतेची कसलीही जाणीव नाही. जनतेच्या सुख-दु:खाशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. क्रिकेटमधून दरवर्षी हजारो कोटी रुपये मिळवायचे आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांची सोय करुन ठेवायची एवढा एककलमी धंदा या मंडळाने सुरू ठेवल्यानेच क्रिकेटपटूही मोकाट सुटले. त्यांना कुणाचीही भीती वाटेनाशी झाल्यामुळेच आयपीएलच्या सामन्यात अर्धनग्न ललना "चिअरगर्ल्स' नाचवणाऱ्या मंडळाच्या या खेळाडूंनी आता रात्रीच्या मौजमजेसाठी थेट ललनाच मागायला सुरुवात केली. क्रिकेटची इतकी अधोगती यापूर्वी कधीच झाली नव्हती. ती या घटनेने झाली असली तरी, भारतीय क्रिकेटला यापूर्वीच भ्रष्टाचाराचे-सामना निश्चितीच्या किळसवाण्या विश्वासघातकी प्रकाराचे खग्रास ग्रहण लागले होतेच. "बुकी, गॅम्बलर, फिक्सर स्पाय-अ जर्नी टू द हार्ट ऑफ क्रिकेटस् अंडरवर्ल्ड' या पुस्तकात पत्रकार ऍड हॉकिन्स यांनी भारतीय व जागतिक क्रिकेटमधल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा केला आहे. आता आयपीएल ट्वेंटी-20 स्पर्धेवर केंद्र सरकारनेच कायमची बंदी घालून, क्रिकेटचा खेळ बदमाशांच्या तावडीतून सोडवायला हवा. हाच या घटनेतून मिळालेला धडा होय.
Time for the IPL to throw in the towel?
This circushas always had the ‘spot’light
With cricket being played so late in the night
Tricks of the trade performed in the ring
Puppets on an invisible pulling string
Cheerleaders gyrating with ‘fixed’ smiles
While the myriad stakeholders make their piles
‘Owners’ who do not own up to any mistake
“Business as usual”, with so much at stake?
Maximum noise and limitless moves
Looks as if the public approves
So much going on under everybody’s nose
In a matter of minutes, one can make crores
Strategic time out to clean up the mess?
Can’t see anyone coming up to confess
Methinks the artistes will carry on with the show
But who is the ringleader – we don’t know !
Mina Anand
Chennai
Thursday, 16 May 2013
IPL SPOT FIXING
क्रिकेटच्या आयपीएलच्या बैलबाजाराला आता बेईमानीचा कलंक
क्रिकेटच्या आयपीएलच्या बैलबाजाराला आता बेईमानीचा कलंक लागला आहे. जगातल्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ही बेईमानी झाल्याने आणि त्यात भारतीय कसोटीपटू श्रीसंत याला अटक झाल्याने, बेईमानीची ही बदनामी सगळ्या जगभर झाली आहे. हा सगळाच प्रकार अतिशय संतापजनक आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघातून हा फिक्सिंगचा व्हायरस पसरला आहे. याच संघातीन तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमध्ये भाग घेतल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या तीन खेळांडूसोबतच क्रिकेटवर सट्टा खेळत लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ११ बुकींनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली काही वर्षांपूर्वी भारताने अझरुद्दीन, अजय जडेजा अशा अगदी बिनीच्या खेळाडूंना आयुष्यभरासाठी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून बाहेर काढण्याची जबर शिक्षा दिली होती. त्यापासून या लोकांनी काही धडा घेतलेला दिसत नाही.
क्रिकेट हा खेळ विलक्षण लोकप्रिय होण्यामागे, या खेळातील प्रत्येक चेंडूबरोबर येणारे नाट्य, अनिश्चितता, त्याबरोबर येणारी उत्कंठा, अशा गोष्टी कारणीभूत आहेत. क्रिकेटचे वर्णनच ‘विलोभनीय अनिश्चिततांचा खेळ’ असे केले जाते. मात्र, या विलोभनीय अनिश्चिततांना लाच घेऊन लाजिरवाण्या निश्चिततांचा खेळ करण्याचा चंग बेईमान लोकांनी बांधला आहे. मॅच फिक्सिंग अवघड आहे आणि त्यात जबर शिक्षा होते, असे लक्षात आल्यावर त्यातून पळवाट काढत स्पॉट फिक्सिंगकडे हे सट्टेबाज वळले आहेत. मुळात सट्टा, मटका हा बेईमानीचाच धंदा! लोकांना झुलवायचे, त्यांना आशा दाखवायची आणि मोठ्या प्रमाणावर जुगारात पैसा लावायला लावून त्यांना बुडवत स्वतः गब्बर व्हायचे, असा हा बेईमानीचा धंदा आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूनंतर येणार्या अनिश्चिततेचा फायदा घेत लोकांना झुलवायचे, पुढचा चेंडू येईपर्यंत त्यावर सट्टा घ्यायचा आणि त्यात अनेकांना नादी लावून पैसे उकळायचे, असा हा काळा धंदा आहे. यात हमखास लोकांना बुडविण्यासाठी आपल्याला हवे तसे मैदानावर घडावे यासाठी खेळाडूंना फितूर करून या लोकांनी हे स्पॉट फिक्सिंग केले आहे. जास्त पैसा कमावण्याची हाव एकदा सुटली की, सारासार विवेक नष्ट होतो. मग श्रीसंत असो की आणखी कुणी! ज्यांना आपण काय करतो आहोत त्याचा विवेक नाही, आपण ज्या खेळाच्या बळावर इथवर आलो त्याच्याशी बेईमानी करू नये असे वाटणारा प्रामाणिकपणा नाही, चोरी उघड झाली तर आपल्या संपूर्ण आयुष्याचे नुकसान आपण करून घेतो आहोत याची जाणीव नाही, अशी खेळाडू मंडळी या सट्टेबाजांच्या जाळ्यात बरोबर अडकली. अतिशय रंगात आलेल्या आयपीएलचा सगळा बेरंग झाला आहे.
आयपीएलच्या सामन्यांना सुरुवातीपासूनच बेईमानीचा जणू शाप लागला आहे. क्रिकेटमधील रंगत वाढवत २० षट्कांत वेगवान क्रिकेट रसिकांसमोर खेळवत, मनोरंजन करण्याच्या कल्पनेतून या स्पर्धेचा उगम झाला असला, तरी या स्पर्धा खेळवणार्या लोकांनी सुरुवातीपासूनच यात बेईमानीला वाव ठेवला. सरकारचे कर न भरता कमावलेला काळा पैसा यात गुंतवण्याचा जणू हा एक मार्ग आहे, अशा प्रकारे यात हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा आला. ते प्रकरण नंतर बाहेर आले. त्या सर्कशीचा रिंगमास्टर ललित मोदी हा अखेर पायउतार होऊन आरोपी म्हणून न्यायालयात चकरा मारू लागला. ‘पेरिले ते उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते
|’ या उक्तीप्रमाणे जे पेरले तेच जणू आता या स्पॉट फिक्सिंगच्या रूपाने उगवू लागले आहे.वास्तविक, अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात काही चूक नाही. मात्र, त्या आयोजित करताना त्याचे जे चित्र सुरूवातीपासून उभे केले जात आहे ते काही चांगले नाही. स्पर्धा आयोजित करण्यामागचा जो सकारात्मक चांगला संकल्प आहे तो आयोजनाच्या पद्धतीतून जगासमोर प्रकट झाला पाहिजे. येथे कमी कपड्यांत निरर्थक नाच करणार्या चीअर लीडर्स, बैलबाजारासारखे खेळाडूंचे होणारे जाहीर लिलाव, भडक जाहिरातबाजी यामुळे खेळाच्या आनंदापेक्षा हा एक चमकधमक दाखविण्याचा आणि खोर्याने पैसे ओढण्याचा धंदा आहे, असेच चित्र जगासमोर उभे राहते आहे. आता उघड झालेले स्पॉट फिक्सिंग हा त्या बीभत्स प्रदर्शनाचाच एक परिणाम आहे. हे सगळे ओंगळवाणे प्रदर्शन या स्पर्धेतून वजा केले, तरी यातील रंगत, आवड, प्रतिसाद यात काहीच फरक पडण्यासारखा नाही. मात्र, खेळ, त्यातील रंगत, क्रीडारसिकांचे मनोरंजन यापेक्षाही लोकांना नादी लावून पैसा कमावण्याचा नाद ज्यांना लागला आहे त्यांना या परिणामाची काही चिंता आहे असे दिसत नाही.
क्रिकेटला थेट मूल्यहीन धंदेवाईक रूप दिल्यामुळे त्यात या सट्टेबाजीला ऊत आला आहे. ही सट्टेबाजी होणार याचा अंदाज घेऊन, त्याला रोखण्याचे काही प्रयत्न व्हायला हवे होते, ते कणभरही झालेले दिसत नाहीत. गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घेण्याला बहुधा या देशातील सुरक्षायंत्रणेला वेळ, सवलत, इच्छा, वाव असे काही दिसत नाही. या क्रिकेटमधील सट्टेबाजीने अनेकांना जीवनातून उठविल्याची उदाहरणे समोर येत आहेत. एक दोन दिवसांपूर्वीच क्रिकेटमधील सट्ट्यात पैसे हरल्यामुळे पैशाची गरज आहे म्हणून सख्ख्या चुलत भावाचे अपहरण करून खून केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. माणसाला समाजापासून, माणसाला संस्कृतीपासून आणि माणसाला देशापासून तोडणे, हाच चंगळवादाचा जाहीरनामा आहे. आयपीएलमधून हा जाहीरनामा खरा होताना दिसतो आहे. नाते, इमानदारी, देशभक्ती सगळे काही या चंगळवादाच्या खेळात विकायला काढलेले दिसते आहे. या सट्टेबाजी आणि फिक्सिंगचे धागेदोरे परदेशात आहेत, असे सांगितले जात आहे. फिक्सिंग प्रकरणाचा मास्टर माईंड परदेशात आहे. भारतात दहशतवाद आणि गुन्हेगारीचा नंगानाच घालणार्या अंडरवर्ल्डशी या फिक्सिंगचे संबंध आहेत, असे आता बाहेर येते आहे. त्यामुळे ही बेईमानी केवळ पैशासाठी खेळापुरती मर्यादित नाही, तर तिचा परिणाम आणि संबंध समाज आणि देशाची शांतता, सार्वभौमत्व याला आव्हान देणार्या गोष्टींशी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आयपीएलमधील ही फिक्सिंगची लाजिरवाणी गोष्ट जाहीर होताच, हे सामनेच रद्द करा, अशा प्रकारची ओरडही सुरू झाली आहे. कोणत्याही खेळात कोणत्याही विषयात माणसे आली की, त्याबरोबर अपप्रवृत्ती येण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे तो खेळच नको, ती स्पर्धाच रद्द करा, असा अततायी विचारही योग्य नाही. आयपीएलचे स्वरूप असे हवे की, त्यामध्ये अशा प्रकारच्या बेईमानीला, धंदेवाईकपणाला, पैशाची उधळण करण्याला, बेईमानीने पैसे कमावण्याला वाव आहे असे कुणाला वाटता कामा नये. मुळात स्पर्धा भरवणार्यांचा धंदेवाईकपणा मर्यादा ओलांडून पुढे जाता कामा नये. अशा प्रकारच्या लाजिरवाण्या फिक्सिंगमध्ये भाग घेणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हव्यात म्हणजे पुन्हा कुणाला अशा प्रकारच्या बेईमानीच्या वाटेला जाण्याची इच्छा होता कामा नये. मात्र, पूर्वी जे मॅच फिक्सिंगचे प्रकरण बाहेर आले त्यातील अझरुद्दीनसारख्यांना क्रिकेटमधून जरी हद्दपार केले, तरी कॉंग्रेससारख्या सत्तारूढ पक्षाने अल्पसंख्यकांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवत त्याला उत्तरप्रदेशातून उमेदवारी दिली. खासदार म्हणून संसदेत नेऊन प्रतिष्ठित केले. अशा प्रकारे बेईमानीचा धंदा केला तरी या देशात प्रतिष्ठा मिळण्याचे मार्ग बंद होत नाहीत, असे एक समीकरण या राजकीय उपद्व्यापामुळे समाजासमोर चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित झाले आहे. असे चुकीचे संकेत देणारे कॉंग्रेससारखे पक्ष याला जास्त जबाबदार आहेत.
शेवटी बेईमानी ही एक प्रवृत्ती आहे. नीतिमूल्यांचे संस्कार घर, शिक्षण आणि समाजातून प्रस्थापित केले, तरच समाज नीतीच्या मार्गावरून जात असतो. आपल्याकडे नीती, संस्कार असे शब्द उच्चारले की, त्याचा संबंध भलतीकडेच जोडून भगवेकरण... भगवेकरण अशी ओरड करण्याची एक टूम धूर्त, बेईमान लोकांनी सुरू केली आहे. मुळात तेथे जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत हे बेईमानीचे झंपिंग... झपांग... फिक्सिंग... झपांग या ना त्या स्वरूपात चालूच राहणार! गिली... गिली... करत शरमेने मान खाली घालण्याची वेळ येणार. नीतिमत्तेच्या संस्कारापासून ते स्पर्धेच्या आयोजनातील हेतूची स्पष्टता, पद्धती यात चोख दक्षता घेण्यापर्यंत काळजी घेतली, तरच या गोष्टी टाळता येतील, हे लक्षात घेतले पाहिजे! इमान विकण्याचा हा बेशरमपणाचा मार्ग बंद करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कठोर होत हे केलेच पाहिजे!
Subscribe to:
Posts (Atom)