SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label CYBER TERRORISM. Show all posts
Showing posts with label CYBER TERRORISM. Show all posts
Friday, 5 March 2021
Tuesday, 2 March 2021
Monday, 17 August 2020
Wednesday, 29 January 2020
E TERROR ई-तिकीट टेरर फंडिंगप्रकरणी नवी धक्कादायक माहिती उघड- :29-Jan-2020 अवघ्या 40 सेकंदात बुक करायचे अर्ध्यापेक्षा जास्त रेल्वे तिकीटा
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेतील बेकायदेशीर ई-तिकीट रॅकेटचा
पर्दाफाश केल्यानंतर, अटकेतील आरोपींच्या चौकशीतून
धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रॅकेट अवघ्या 40 सेकंदात अर्ध्यापेक्षा जास्त रेल्वे तिकीटा बुक करायचे, अशी ही माहिती आहे. या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई
ठरली आहे. तिकीट बुक करणारी टोळी कार्पोरेट कंपनीप्रमाणे काम करायची. यासाठी
सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची एक चमू दुबईतून काम बघायची. भारतात एक प्रमुख, व्यवस्थापक, मुख्य विक्रेते आणि एजंट असे सुमारे 20 हजार लोक यात कार्यरत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाला हा घोटाळा उघडकीस आणून, त्याची पाळमुळे खणून काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. या
रॅकेटचा सूत्रधार हमीद अशरफ असून, तो दुबईत
वास्तव्याला आहे. त्याला 2016 मध्ये उत्तरप्रदेशच्या गोंडा येथे
तिकिटात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये गोंडा येथे झालेल्या बॉम्बस्फोटही हात असल्याचे पुरावे तपास
यंत्रणांकडे आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारतातील या रॅकेटचा सूत्रधार गुलाम
मुस्तफाचाही समावेश आहे. त्याला बंगळुरूतून अटक करण्यात आली. या रॅकेटची विभागवार
सूत्रे सांभाळणार्यांना हस्तकांनाही अटक करण्यात आली आहे.
रेल्वेची ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्यानंतर 40 सेकंदातच अर्ध्यापेक्षा जास्त तिकिटे खरेदी केली जात असत. यासाठी
देशातील 20 हजार एजंट्सने असे सॉफ्टवेअर
वापरले होते, ज्यामुळे सिक्युरिटी क्लिअरन्स
करण्याची आवश्यकता पडत नव्हती. या प्रक्रियेत ओटीपीही द्यावा लागत नव्हता. या
रॅकेटमधील ‘गुरुजी’ नावाने ओळखल्या जाणार्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. रॅकेटमधील
पैशांची व्यवस्था तो सांभाळत होता.
या रॅकेटचा आणखी एक म्होरक्या गुलाम मुश्तफा हा सॉफ्टवेअर डेव्हलपर
असून, त्याला रेल्वे सुरक्षा जवानांनी
भुवनेश्वर येथून अटक केली आहे. त्याच्याजवळ 563 आयआरसीटीसी आयडी, स्टेट बँक आणि 600 ग्रामीण बँकांच्या 2400 शाखांची यादी आढळून आली. या सर्व बँकांमध्ये त्याची खाती असल्याचे
चौकशीतून समोर आले आहे. या रॅकेटचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील
अतिरेक्यांशी असल्याचा संशय आहे. ई-तिकीट व्यवहारातून मिळणारा पैसाही अतिरेक्यांना
मिळत असल्याची माहितीही उघडकीस आली आहे. ई-तिकिटांच्या विक्रीतून हे रॅकेट
प्रत्येक महिन्याला सुमारे 15 कोटी रुपयांची
कमाई करत असे.
Wednesday, 18 July 2018
सायबर व्यसनाधीनता धोकादायक वळणावर By shambhuraj.pachindre | Publish Date: Jul 18
महेश कोळी
तुम्ही सोशल मीडियावर दिवसातले किती तास खर्ची घालता? हा प्रश्न दुर्लक्षित करण्याजोगा नक्कीच नाही. जर सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या सान्निध्यात तुम्ही अधिक काळ व्यतीत करीत असाल, तर ती धोक्याची घंटा आहे, हे वेळीच ओळखलेले बरे. इंटरनेटने जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली, तरी हेच इंटरनेट आता जगभरातील लहान मुले, किशोरवयीन मुले आणि युवकांना मोठ्या संख्येने इंटरनेट व्यसनी (सायबर अॅडिक्ट) बनवीत चालले आहे. अमली पदार्थांचा व्यापार जगभरात ज्या वेगाने पसरला, त्याहीपेक्षा किती तरी अधिक वेगाने इंटरनेट पसरले असून, त्याचे व्यसन जडणार्या व्यक्तींचे प्रमाणही तितक्याच झपाट्याने वाढत आहे.
सद्यःस्थितीत विशेषतः युवावर्गामध्ये सायबर व्यसनाधीनतेचे आणि त्यातही सोशल मीडियाचे व्यसन जडण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि अल्जेरियासह जगातील अनेक देशांमध्ये या व्यसनातून लोकांना बाहेर काढण्यासाठी खास क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. आपल्या देशातील दिल्ली आणि बंगळुरू शहरांमध्येही सायबर व्यसनमुक्ती केंद्रे उघडण्यात येत आहेत. वस्तुतः, देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगात सायबर व्यसन ही प्रचंड मोठी समस्या होऊन बसली आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेले हे इंटरनेटचे आणि सोशल मीडियाचे व्यसन कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रांची गरज निर्माण होणे दुर्दैवी आहे. या केंद्रांमध्ये व्यसनाधीन व्यक्तीचे जीवन ‘ऑफलाईन’ करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या डिजिटल व्यसनामुळे लोक आपल्या जीवनातील मूळ समस्यांपासून दूर पळू पाहत आहेत, हा सर्वात मोठा तोटा आहे. त्याचप्रमाणे मूलभूत चिंतन आणि विवेकी विचार कमी होत चालला आहे. लोकांचा सामाजिक परीघही संकोचत चालला असून, गर्दीतही माणूस एकटा होत चालला आहे. सायबर व्यसन ही मनाची अशी स्थिती आहे, ज्यामुळे लोक ऑनलाइन गेम, नेट सर्फिंग आणि सोशल नेटवर्कवर दिवसातील सर्वाधिक वेळ व्यतीत करू लागले आहेत. या व्यसनाला वेळेची मर्यादा उरलेली नाही. त्यामुळे स्वतःवरील नियंत्रण कमी होत चालले आहे. इंटरनेट मिळाले नाही, तर लोक अधीर, बेचैन होऊ लागले आहेत. कधी कधी तर, ते नैराश्याच्या गर्तेतही सापडू लागले आहेत. या व्यसनाने ग्रस्त लोक खोटे बोलणे, समस्यांंपासून दूर पळणे अशा टप्प्यांमधून अखेर नकारात्मक मनःस्थितीपर्यंत पोहोचत आहेत.
एका सर्वेक्षणानुसार भारतात 18 ते 30 वयोगटातील पाचपैकी तीन जण असे आहेत, ज्यांच्या हातात मोबाइल नसल्यास ते असे काही बेचैन होतात, जणू त्यांचा एखादा अवयवच कुणी तरी गायब केला आहे. यातील 96 टक्के लोक सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी सोशल मीडियावर हजेरी लावतात. सत्तर टक्के युवकांचे असे म्हणणे आहे की, ई-मेल आणि सोशल मीडिया चेक केल्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. कॅस्पर्सकी लॅब या जागतिक पातळीवरील आयटी सुरक्षा फर्मने टप्प्याटप्प्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार, एकूण 1007 भारतीय युवकांमधील 73 टक्के असे होते, ज्यांना डिजिटल व्यसन जडल्याचे दिसून आले. असंख्य युवक रात्री उशिरापर्यंत जागून आभासी
दुनियेत आपला बहुमूल्य वेळ खर्ची घालतात. काही किशोरवयीन आणि युवावस्थेतील व्यक्ती तर सातत्याने आभासी दुनियेतच राहतात आणि गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे, बातम्या आणि वृत्तान्त वाचणे, ई-कॉमर्स साइट्स पाहणे, चॅट करणे, ट्वीट-रीट्वीट करणे आणि सोशल मीडियावर आपले अनुयायी तयार करणे, एवढेच काम सदासर्वकाळ करतात. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, फोन हरवणे हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठ्ठा धक्का असतो. गेल्या वर्षी दहा देशांमधील दहा हजार लोकांच्या मुलाखती घेऊन केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, 53 टक्के भारतीय दर तासाला इंटरनेटवर जातात. हा आकडा जागतिक सरासरीच्या 51 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातील 77 टक्के लोक सोशल नेटवर्किंग साइट्सवर दररोज लॉगइन करतात. गेल्या दोन वर्षांपासून
स्मार्टफोनवरून केले जाणारे व्हॉइस कॉल आणि एसएमएसमध्ये वीस टक्क्यांची घट झाली आहे आणि मेसेजिंग तसेच नेटआधारित व्हॉइस कॉलची संख्या अनुक्रमे दहा आणि बावीस टक्क्यांनी वाढली आहे.
आपल्या कामाचा वेळ आणि रिकामा वेळ यातील फरक कळेनासा होऊन व्यक्ती जेव्हा सोशल मीडियाला अधिक महत्त्व देऊ लागते आणि स्मार्टफोनला चिकटून राहू लागते, तेव्हा या व्यसनाची सुरुवात झाली आहे, असे ओळखावे.
डिजिटल व्यसनामुळे देशातील युवकांना बेरोजगारीच्या चटक्यांचीही जाणीव होईनाशी झाली आहे. भारतासाठी चिंतेचा विषय असा की, 2017 ते 2019 या कालावधीत बेरोजगारीचा दर 3.4 वरून 3.5 टक्के वाढणार असला, तरी 15 ते 24 वर्षे वयोगटातील बेरोजगारांचा दर 2019 मध्ये 10.7 टक्के एवढा असेल. 2014 मध्ये हा दर 10 टक्के होता. अहवालानुसार, देशभरातील 11 टक्के लोकसंख्या सध्या बेरोजगार आहे. ही अशी मंडळी आहेत, जी काम करण्यास सक्षम असूनही बेकार आहेत. या अहवालाव्यतिरिक्त श्रम मंत्रालयातील श्रम ब्यूरोच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर सध्या गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
भारतात डाटा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील लोकही स्मार्टफोन घेऊन त्याचा वापर करीत आहेत; परंतु त्याचा चांगल्या कारणांसाठी वापर होण्यापेक्षा दुरुपयोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, ते वाढत चालले आहे. एका सर्वेक्षणानुसार, गरीबवर्गातील सुमारे 92 टक्के युवक इंटरनेटचा वापर करीत असून, 65 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. दुसरीकडे, चांगली कमाई असलेल्या घरांतील, तब्बल 97 टक्के मुले इंटरनेटचा वापर करीत असून, 69 टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहेत. आपल्या दैनंदिन जीवनावर हे आभासी जीवन प्रभाव पाडत आहे आणि आपण व्यसनाधीन आहोत, हेच बहुतांश लोकांना समजत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपल्या युवा पिढीचा इंटरनेट व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करू शकतो. घराघरांत आई-वडील त्यांना या व्यसनाची भयावहता लक्षात आणून देऊ शकतात.
Thursday, 26 April 2018
डिजिटल भारत व माहितीची सुरक्षितता By arun.patil
डिजिटल व्यवस्था वेगाने वाढत आहे. 21 व्या शतकातील मानवी जीवनाचा बोटांकन हा अविभाज्य, अपरिहार्य घटक बनत आहे. आधारकार्ड, करपत्रक, बँक खाती, भ्रमणध्वनी, प्रवेश परीक्षा, पासपोर्ट, परस्पर निधी, विमा, महसूल नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, खरेदी-विक्री नोंदी, रेशनकार्ड, भत्ता नोंदी, पेमेंट कार्ड, प्रवास नोंदी, शिक्षण नोंदी आदी अनेक स्वरूपात व्यक्तीच्या व्यक्तिगत वित्तीय, जैविक तथा शैक्षणिक नोंदीचे बोटांकीकरण होत चालले आहे. या सर्व गोष्टी आधारकार्डशी जोडण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे.
अशा खासगी माहितीचा (ऊरींर) गैरवापर, चोरी किंवा अनधिकृत वापर व हस्तांतर होण्याची शक्यता मोठी आहे व ती वाढली आहे. एका 2016 च्या वर्षात क्रेडिट/डेबिट कार्ड/रकमांची 32 लाख प्रकरणांत चोरी झाल्याची अधिकृत माहिती आहे. साहजिकच, या सर्व प्रक्रियेत माहिती हस्तांतर प्रक्रियेतील खासगीपणा, गुप्तता या बाबींत व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी सुरक्षा (उूलशी डशर्लीीळीूं) व खासगीपणावर अतिक्रमण हे महत्त्वाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्न होत आहेत. लोकशाही निवडणुकीत मतदारांचा कल विशिष्ट नेत्याकडे, राजकीय पक्षाकडे, विचार सरणीकडे वळविणे अशी माहिती साध्य करू शकणार्या, त्यांचे विश्लेषण करू शकणार्या केंब्रिज अॅनॅलिटिका तथा फेस बुकसारख्या जागतिक संस्थांच्या बाबतीत घडले हे आता सर्वज्ञात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत आस्ते कदम जात खासगीपणाचा हक्क मूलभूत हक्क मानणे योग्य ठरेल, अशी भूमिका घेतली आहे. व्यक्तिगत आवश्यक कागदपत्रे आधारकार्डशी जोडण्यासंबंधात मुदतवाढ मिळाली आहे. प्राईस वाटर-कूपर्स तसेच असोकॅमच्या मते माहिती सुरक्षा (उूलशी डशर्लीीळीूं) प्राप्त करण्यासाठी येणारा प्रतिव्यक्ती खर्च तसा नाममात्र असतो. 12 अंकांचे आधारकार्ड सुरक्षित करण्यासाठी 16 अंकांची आभासी सुरक्षा व्यवस्था करता येते, अशी भूमिका आधारच्या ‘युडाई’ने घेतली आहे.
माहिती जितकी अधिक, तिची विद्युतक यांच्या आधारे नोंदणी जितकी अधिक, तितक्या अधिक प्रमाणात माहिती अधिकाधिक असुरक्षित होत जाते.
सध्या देशात 119 कोटी लोक आहेत. त्यासाठी 119 कोटी आधार कार्डे आहेत. ती वाढताहेत. वस्तू व सेवा कराखाली 200 लाख विक्रेत्यांची नोंद झाली आहे. प्राप्तिकर खात्याकडे 600 लाख व्यक्तींची माहिती आहे. पासपोर्ट सेवा केंद्राकडे 2500 लाख नागरिकांची नोंद आहे. ई-गव्हर्नन्स खाली 7000 लाख अर्ज विविध दाखले, ओळखपत्रे, प्रमाणपत्रासाठी आले आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात संकलित होणारी ही माहिती डिजिटल पद्धतीने संगणक स्मृती व्यवस्थेत संचित होत आहे. संगणकाची तांत्रिक बैठक सर्वच संस्थांसाठी एकच असल्यामुळे त्यातून अंतर्गत व बाह्य गळती वा चोरी होण्याची प्रचंड मोठी शक्यता आहेच.
माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढील प्रकारची काळजी व खबरदारी, सावधगिरी पाळण्याच्या सूचना सामान्यतः दिल्या जातात.
समान पासवर्ड वापरू नयेत, पासवर्ड लिहून देऊ नयेत, व्यक्तिगत माहिती मर्यादितच द्यावी, सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळावा, सार्वजनिक प्रिंटरवर माहितीच्या कॉपीज काढू नयेत, बँक व्यवहार शक्यतो व्यक्तीशः करावेत.
या सर्व गोष्टी लक्षात घेता आधार कार्डाशी इतर सर्व माहिती व्यवहार सक्तीने संलग्न करणे निश्चितच धोक्याचे आहे.
विशेष म्हणजे, माहितीचा गैरवापर कोण, कसा, किती, केव्हा व कशासाठी करेल हे कळणे फार कठीण आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय व्यवस्थेत अनेक प्रकारच्या प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. त्या केव्हा मोहाला बळी पडतील, हे स्पष्ट नसते. व्यवस्थेत सातत्याने व्यवस्थापकीय व तांत्रिक बदल होत असतात. साहजिकच, 100 टक्के माहिती सुरक्षा देण्याचे आश्वासन फारसे विश्वसनीय नाही, अशी 100 टक्के माहिती सुरक्षा कल्पनेचा खेळ मानावा लागेल.
सध्या खबरदारी म्हणून युडाई या संस्थेने 16 अंकांचा आभासी पासवर्ड वापरण्याची सोय केली आहे. सेक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने सायबर सेक्युरिटी नेट व सायबर रेसिलिअन्स फ्रेम तयार केली आहे. बिगर वित्तीय संस्थांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आयटी फ्रेमवर्क केले आहे. तसेच बँकांसाठी सायबर सेक्युरिटी तयार केली आहे. भारतीय विमा नियामक मंडळाने विमा कंपन्यांसाठी सेक्युरिटी नोट तयार केली आहे. तसेच केंद्रीय वीज खात्याने कॉम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (उएठढ) 4 ठिकाणी केली आहे.
एकंदरीत पाहता, माहितीची नोंदणी, वर्गीकरण, संरक्षण, हस्तांतर आदी बाबतीत संगणक क्षेत्रात ज्या वेगाने बदल होत चाललेत, ज्या वेगाने मानवी समाज संगणक व डिजिटलचा वाढता वापर करणार त्याच्याच अनेक पटींनी समाजातील विघातक घटक त्याच परक्यांच्या माहितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी, इतरांच्या नुकसानीसाठी करण्याची प्रवृत्ती व प्रेरणा वाढतच जाणार. व्यक्तीच्या खासगी जीवनावर सार्वजनिक व छिद्रान्वेषी घटकाचे सतत वाढते लक्ष राहणार. एका अर्थाने हा व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे. म्हणूनच माहितीच्या सुरक्षेचा (उूलशी डशर्लीीळीूं) विचार करताना व्यक्ती स्वातंत्र्य, खासगी मालमत्ता व खासगीपणा हे महत्त्वाचे निकष ठरतात. ज्या सामाजिक, तंत्र वैज्ञानिक बदलाने व्यक्ती स्वातंत्र्याचे आकुंचन होण्याची शक्यता असते, त्याच्या बाबतीत राज्य धोरणाचा निकष ‘स्वातंत्र्याचे रक्षण’ हाच एकमेव असू शकतो, असलाच पाहिजे.
Tuesday, 20 March 2018
अत्याधुनिक सायबर हल्ल्याला तोंड देण्यासआपण कितपत सक्षम आहोत? विनोद तळेक
आगामी काळात हा विषय फक्त सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी यंत्रणा विकसित करणे, एवढ्यापुरताच मर्यादित राहणार नाही, तर समाजात सायबर गुन्हे तसेच त्यांच्या धोक्याबाबत एक व्यापक जागृती निर्माण करणे ही बाब सायबर सुरक्षेत अपेक्षित असणार आहे. त्या अनुषंगाने शालेय अभ्यासक्रमातच जर या विषयाचा समावेश केला तर अधिक व्यापकपणे सायबर सुरक्षेबाबत जागृती होऊ शकेल, असे मत मांडले जाऊ लागले आहे. इस्रायलसारख्या देशात या योजनेवर कामालाही सुरुवात झाली आहे.
सध्याच्या डिजिटल युगात एक व्यक्ती साधारण चार ते पाच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करते. मोबाइल फोन तर हल्ली सर्वदूर पोहोचला आहे, क्लाऊड सेवांमुळे तर आपले डेस्क टॉप्स, लॅपटॉप, टॅब्स आणि मोबाइल एकाच पातळीवर जोडले गेले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अजस्र माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. अशा वेळी आपल्यापैकी प्रत्येक जण पाचव्या टप्प्यातील सायबर हल्ल्याच्या कक्षेत आला आहे. अवघे विश्व एकमेकांशी संलग्न होऊ घातल्याने कल्पना करा की, हवाई वाहतूक, दळणवळण किंवा आरोग्य व्यवस्थेशी संबंधित एखाद्या शासकीय प्रकल्पाशी संबंधित माहिती स्रोतांवर सायबर हल्ला झाला, तर त्यावर उपाययोजना केली जाणापूर्वी होणाऱ्या हानीची कल्पनाच न केलेली बरी. एकट्या दुकट्या हल्लेखोराद्वारे फक्त गंमत म्हणूनही एखाद्या देशाच्या माहिती स्रोतांवर हल्ला करणे आता सहज शक्य आहे. किंबहुना असे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. शिवाय हल्लेखोरांनाही आता अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध असल्याने अतिशय अत्याधुनिक अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अधिकाधिक सक्षम आणि तितकीच वेगवान सुरक्षा यंत्रणा वापरण्याची गरज आहे. मात्र, आपल्याशी संबंधित माहितीस्रोतांवर असा हल्ला होऊ शकेल अशी कल्पनाच नसल्याने अनेक बड्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये सायबर सुरक्षेची अद्ययावत यंत्रणाच विकसित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. २०१७ मध्ये अनेक देशांच्या उद्योग आणि अर्थव्यवस्थांना हादरवणाऱ्या, ‘लॉकी रॅन्समवेअर’ आणि ‘वॅन्नाक्राय’सारख्या अत्याधुनिक सायबर हल्ल्याच्या घटनांद्वारे अवघ्या सायबर विश्वाचा गाफीलपणा प्रकर्षाने दिसून आला. इस्रायलमधील तेल अविव येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या सायबर टेक परिषदेतही ही चिंता व्यक्त करण्यात आली.
२०१७ हे वर्ष सायबर सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारे ठरले आहे. मात्र, ही फक्त आगामी धोक्याची नांदी असून आगामी काळ तर सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक धोकादायक असेल. याबाबत चेक पॉइंट या सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीचे सीईओ गील श्वेड यांनी सायबर टेक परिषदेत भविष्यातील सायबर सुरक्षेचे चित्र स्पष्ट केले. सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची गरज तर आहेच, शिवाय शासकीय स्तरावरूनही अशी यंत्रणा विकसित करण्यासाठी सक्रिय सहभाग वाढवावा लागेल, असे मत श्वेड यांनी मांडले. आपल्या सादरीकरणात त्यांनी दशकनिहाय आतापर्यंतच्या सायबर हल्ल्याचे विविध टप्पे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा यंत्रणेचे विश्लेषण केले. श्वेड यांच्या मते सायबर हल्ल्यांचे तंत्रज्ञान आता पाचव्या टप्प्यात आले आहे. एेंशीच्या दशकात एकटा दुकटा संगणक सायबर हल्ल्याचा बळी ठरायचा. हा सायबर हल्ल्याचा पहिला टप्पा मानला जातो. पहिल्या टप्प्यातील या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्या काळी अँटी व्हायरस सॉफ्टवेअर जन्माला आले. नव्वदच्या दशकात इंटरनेट युगाची सुरुवात झाल्याने इंटरनेटच्या माध्यमातून सायबर हल्ले होऊ लागले, त्यामुळे या प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी फायरवॉल हे तंत्रज्ञान विकसित झाले. त्यानंतर २००० च्या दशकात हॅकर्सनी विविध असुरक्षित स्वरूपाची अॅप्लीकेशन हे आपल्या सायबर हल्ल्यांचे माध्यम बनवले. अॅप्सद्वारे झालेले हे हल्ले रोखण्यासाठी इंट्र्युजन प्रिव्हेन्शन सारखी यंत्रणा विकसित केली गेली. २०१० च्या दशकात पॉलिमॉर्फिक कंटेंट म्हणजे बहुस्तरीय माहितीला लक्ष्य करून चौथ्या टप्प्यातील सायबर हल्ले होऊ लागल्यावर त्यापासून आपला माहिती स्रोत वाचवण्यासाठी सॅँडबॉक्सिंग किंवा अँटीबॉटसारख्या आयुधांचा वापर केला जात आहे.
या टप्प्यावरच सर्वात गंभीर मुद्दा उद्भवतो, तो म्हणजे अाजही जागतिक स्तरावरील जवळपास पन्नास टक्के उद्योग किंवा कंपन्या या चौथ्या टप्प्यातील सुरक्षा तंत्राच्या कक्षेबाहेर अाहेत. खासगी स्तरावर तर या टप्प्यातील सुरक्षा तंत्राचा वापर फक्त पाच ते सात टक्के इतका आहे.
अशा परिस्थितीत २०१७ सालात सायबर हल्ला मात्र पाचव्या टप्प्यात पोहोचला आहे. या पाचव्या टप्प्यातील सायबर हल्ल्याचे स्वरूप एकाच वेळी अनेक देशांतील राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पांनाही झळ पोहोचेल, इतके उग्र झाले आहे. लॉकी रॅन्समवेअर किंवा वॅन्नाक्राय यांसारख्या सायबर हल्ल्यांनी तर त्यातली भीषणताही दाखवून दिली आहे.
श्वेड यांच्या चेक पॉइंटने सायबर सुरक्षेबाबत केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार आपल्या माहिती स्रोतांची सुरक्षा करण्यासाठी कालबाह्य तंत्र वापरणारी उत्पादक कंपनी सायबर हल्ल्याचा बळी ठरल्यास हल्ल्याचे स्वरूप ओळखून त्यावर उपाययोजना करण्यास त्या कंपनी व्यवस्थापनास किमान चाळीस दिवस लागतात. तर साधारण ७ लाख डॉलर्सच्या आसपास त्यावर खर्च होतो. मात्र, अत्याधुनिक आणि काळाशी सुसंगत असे सायबर सुरक्षेचे तंत्र वापरलेल्या एखाद्या कंपनीच्या माहिती स्रोतांवर पाचव्या टप्प्यातील सायबर हल्ला झाला तर त्याचे स्वरूप ओळखून त्यावर उपाययोजना करण्यास अवघे दोन तीन दिवस पुरेसे ठरतात, तसेच त्याचा खर्चही जवळपास शंभर पटींनी घटतो. किमान आज तरी सायबर सुरक्षेचा एक प्रमुख नियम आहे, तो म्हणजे हल्ल्याला तोंड देण्यासाठी सतत नवनव्या तंत्राद्वारे सज्ज राहणे. मात्र आगामी काळात हा विषय फक्त सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी यंत्रणा विकसित करणे, एवढ्यापुरताच मर्यादित राहणार नाही. तर समाजात सायबर गुन्हे तसेच त्यांच्या धोक्याबाबत एक व्यापक जागृती निर्माण करणे ही बाब सायबर सुरक्षेत अपेक्षित असणार आहे. त्या अनुषंगाने शालेय अभ्यासक्रमातच जर या विषयाचा समावेश केला तर अधिक व्यापकपणे सायबर सुरक्षेबाबत जागृती होऊ शकेल, असे मत मांडले जाऊ लागले आहे. इस्रायलसारख्या देशात या योजनेवर कामालाही सुरूवात झाली आहे. तेल अविव विद्यापीठातील सायबर स्टडी सेंटरचे प्रमुख प्रा. इसाक बेन इस्रायल यांनी हा मुद्दा त्यांनी अधिक विस्ताराने स्पष्ट केला.
सायबर सुरक्षा हा विषय इस्रायलमधील शाळांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट झाला, त्यास आता बराच काळ लोटला आहे. कारण आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना तुम्ही ऑनलाइन जाण्यापासून रोखू शकत नाही. एखादी गोष्ट करू नका, असे सांगितले, तर मुले तीच गोष्ट हमखास करू पाहतात. तेल अविव विद्यापीठाच्या भेटीदरम्यान प्रा. इस्रायल यांनी मुलांच्या मानसिकतेविषयी असे नेमके भाष्य केले. गेल्या तीस वर्षांपासून इस्रायल सरकारसोबत डिजिटल युगाची तसेच सायबर इकोसिस्टिमची निर्मिती करण्यात ज्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे, त्यापैकी एक आहेत प्रा. इस्रायल. देशातील सायबर जगताचा सरकारशी समन्वय साधत विविध निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेले नॅशनल सायबर डायरेक्टरेट हीदेखील प्रा. इस्रायल यांचीच संकल्पना आहे. शिवाय शालेय अभ्यासक्रमात सायबर सुरक्षेचा विषय असावा या निर्णय प्रक्रियेतही त्यांचा सहभाग होता.
एखादा रस्ता ओलांडू नकोस, असे तुम्ही कधी तुमच्या मुलाला सांगत नाही, त्याऐवजी रस्ता कसा ओलांडावा याबाबतचे मार्गदर्शन तुम्ही करता, त्याच प्रमाणे ऑनलाइनच्या जमान्यात तुम्ही मुलांना सायबर विश्वातील धोके काय आहेत हे समजावून देतानाच सुरक्षेचेही धडे दिले पाहिजेत. आमच्या माध्यमिक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये तसेच सैन्य प्रशिक्षणातही सायबर सुरक्षा हा अभ्यासक्रम विविध टप्प्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती प्रा. इस्रायल यांनी दिली. प्राथमिक शालेय स्तरावर आम्ही ऑनलाइनवर आपला सुरक्षित वावर कसा असावा, याचे धडे देतो. माध्यमिक शालेय स्तरावर सायबर सुरक्षेची आदर्श आचारसंहिता अभ्यासली जाते. शालांत परीक्षेत तर सायबर सुरक्षा हा विषय अनिवार्य आहे. या विषयात जे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होतात, त्यांना पुढे सक्तीच्या सैनिक प्रशिक्षणादरम्यान सायबर सुरक्षेशी निगडित अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या प्रशिक्षणापैकी किमान एक तृतीयांश अभ्यासक्रम हा सायबर विश्वातील नैतिकता जपण्यावर भर देतो. एकदा मुलांना काय नैतिक आणि काय अनैतिक याची कल्पना त्यांना दिली की त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असे ते सांगतात. सायबर सुरक्षेबाबत आज इस्रायल किंवा अमेरिकेपुरते मर्यादित असलेले हे चित्र जगभरातील देशांमध्ये दिसणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर वाढत्या सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी काळानुरूप तंत्राचा वापर ही बाब जशी आवश्यक आहे. पुढच्या डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी तंत्राचा नैतिक वापर करणारी तंत्रस्नेही पिढी घडवण्यासाठीही विशेष प्रयत्न करावे लागतील.
Thursday, 6 July 2017
सोशल मीडिया आणि दहशतवाद
Sunday, 21 May 2017
सायबर सुरक्षा आणि भारत- अभिजित वर्तक
Monday, 8 May 2017
Kashmir’s video warfare-Dailyexcelsior
Sunday, 25 December 2016
Cybersecurity is India's Achilles heel Sandeep Kumar Shukla,
Thursday, 15 December 2016
2017 could be a year of cyberwars
Thursday, 3 November 2016
MUST READ CYBER SECURITY BANKING SECURITY INSTRUCTIONS FROM BANK OF INDIA
Thursday, 27 October 2016
Cyber technology as potent terror tool in jihadi hands
Friday, 21 October 2016
CERT-In had instructed banks about cyber attacks on October 7 to stay alert in wake of surgical strikes
Saturday, 15 October 2016
स्मार्ट हेरगिरी
स्मार्ट हेरगिरी
September 11, 20160138
Share on Facebook Tweet on Twitter
मुळात ‘भ्रमणध्वनी’ या संपर्क साधनाने लोकांना वेड लावलेलच आहे. त्यात आता ‘स्मार्टफोन’ या नव्या प्रकाराने ते वेड आणखीच वाढलेले आहे. इतकी असंख्य ऍप्लिकेशन्स या स्मार्टफोनवर उपलब्ध असतात की, वेड न लागलं तर नवल! आता ह्या ऍप्लिकेशन्सचे आणखी नवनवे प्रकार आपल्या फोनमध्ये उपलब्ध करून देण्याची वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
त्यात ‘झाओमी’ या चीनी मोबाईल कंपनीने खूपच धडक मारली आहे. साधारणपणे माणूस एखाद्या दुकानात जातो नि सतरा प्रकारचे भ्रमणध्वनी उलटेपालटे करून पाहतो आणि मग आपल्या सोईनुसार एखादा खरेदी करतो. जमल्यास किंमत कमी करूनही मागतो. पण, झाओमीचे मोबाईल असे मिळत नाहीत. निदान भारतात तरी, झाओमी कंपनीची ‘रेड मी वन एस’ आणि ‘एम आय- ३’ ही दोन मॉडेल्स् फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावरूनच मिळू शकतात. कंपनीने आतापर्यंत ही दोन्ही मॉडेल्स् अनुक्रमे ५ लाख ८० हजार आणि ९५ हजार एवढ्या संख्येत विकली आहेत. लोकांना झाओमीची ही दोन्ही मॉडेल्स् भलतीच पसंत पडली आहेत. कारण, इतर स्मार्टफोन्स्पेक्षा त्यांच्यामध्ये जास्त ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. शिवाय, त्यांचा दर्जाही अधिक चांगला आहे. जगभर सर्वत्र त्यामुळेच झाओमी कंपनीला ‘चायनीज ऍपल’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. जगभरात अनेक नामवंत सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. पण, स्टीव्ह जॉब्सच्या ‘ऍपल’ या कंपनीच्या नावाला एक वेगळंच वजन, एक वेगळाच मान आहे.
तर, या चिनी ऍपल झाओमी कंपनीने भारतातल्या अनुकूल प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन भारतीय बाजारपेठेत आता ‘रेड मी नोट’ आणि ‘एम आय-४’ ही आणखी नवी मॉडेल्स् उतरवायचं ठरवलं आहे.
झाओमी स्मार्टफोनच्या नानाविध सुबक ऍप्लिकेशन्सवर पब्लिक अगदी फिदा आहे. पण, त्यात काही दोष आहेतच. एक म्हणजे, हा फोन लवकर तापतो आणि बोलण्याचा कालावधी वाढत गेल्यावर बोलण्या- ऐकण्याच्या प्रवाहात अडथळे येऊ लागतात. हे अगदी उघड दोष झाले. पण, वापरणार्या सर्वांना, खोल कुठेतरी अशी जाणीव होते की, माझा ‘यूझर डेटा’ कोणीतरी पाहतंय्, कोणीतरी ऐकतंय्.
आणि आता भारतीय हवाई दलाने चक्क एक परिपत्रकच काढून आपले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना सावध केलंय् की, झाओमी कंपनीचे तथाकथित सर्वसामान्यांना परवडणारे स्मार्टफोन्स हे कॅरियर नेम, फोन नंबर, डिव्हाईस आयडेंटीफायर, ऍड्रेस बुकमधले नंबर्स आणि टेक्स्ट मॅसेजेस् या सर्व गोष्टी आपल्या बीजिंगमधल्या मुख्यालयाकडे फॉर्वर्ड करतात. म्हणजेच, झाओमी कंपनीचा प्रत्येक स्मार्टफोन हा एक हेर आहे आणि तो तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या बॉसकडे पाठवतो आहे.
पूर्वी स्टॅलिनच्या काळात सोवियत रशियाच्या के.जी.बी. या गुप्तहेर खात्याने हेरगिरीची एक अत्यंत अभिनव, पण निर्दयी अशी पद्धत शोधून काढली होती. नवरा आणि बायको एकमेकांवर नजर ठेवायचे, पालक आणि मुलं एकमेकांवर नजर ठेवायचे, शिक्षक-प्राध्यापक आणि विद्यार्थी एकमेकांवर नजर ठेवायचे, अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांवर नजर ठेवायचे. साम्यवादी राजवटीविरुद्ध तोंडाने ब्र काढणं सोडा, तसा विचार मनातल्या मनात कुणी केला, तरी केजीबीला तो कळायचा आणि मग तो माणूस एकदम नाहीसाच व्हायचा.
आता चीनची ही हेरगिरी त्याच्याही पुढची आहे. हल्ली गंंमतीने असं म्हटलं जातं की, मोबाईल फोन हा तुमच्या अंडरवेअरसारखाच आहे. एक म्हणजे, तुम्ही त्याच्यावाचून राहू शकत नाही. मग आता तुमचा अंडरवेअरच तुमच्यावर हेरगिरी करू लागला आणि तुमच्या सर्व गोष्टी कुणी तिसर्या माणसाला कळवू लागला, तर तुमच्या जीवनाचं खाजगी असं राहिलंच काय?
आपल्याकडे संतांनी एक फार उत्तुंग कल्पना मांडलीय्. माणूस जे जे म्हणून काम करतोय्, ते परमेश्वर पाहतोय्. कितीही लपूनछपून एखादं काम पूर्ण केलं, तरी सर्वव्यापी ईश्वरापासून ते गुप्त राहूच शकत नाही. कविवर्य जयदीश खेबुडकरांनी एका सुंदर गीतात ही कल्पना मांडताना म्हटलंय्- ‘आभाळाचा डोळा सारे, खेळ तुझे पाही सावधान होई वेड्या, सावधान होई. साधुसंत सांगून गेले, त्याचा बोध घेई, सावधान होई वेड्या, सावधान होई…’(राम कदमांच्या संगीत दिग्दर्शनाखाली खुद्द देशपांंड्यांनी हे गीत गायलंय्) पण, सर्वव्यापी ईश्वराच्या आभाळाच्या डोळ्यांची ही जागा, आज चीन घेऊ पाहतोय् आणि तुम्ही पुण्य करताय् की पाप करताय्, यात त्याला काही रस नाहीये्. त्याला रस आहे, तुमच्या लष्करी, हवाई नाविक दलात काय चाललंय् यात! त्याला रस आहे, तुमच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक जगात काय चाललंय् यात. त्याला रस आहे, तुमच्या व्यापार आणिा आर्थिक क्षेत्रात काय चाललंय् यात. चीनला जागतिक महासत्ता बनायचंय्. आज यासाठी त्याची स्पर्धा मुख्यत: अमेरिका आणि नंतर रशिया व युरोपिय प्रगत देशांशी असली, तरी तो भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यातही जोपर्यंत भारतात नेभळट आणि अस्मिताविहीन अ-राष्ट्रीय लोकांची सत्ता होती, तोपर्यंत भारताची दखल घेण्याचं कारण नव्हतं. पण, आता तसं करून चालणार नाही, याची चीनला जाणीव आहे. त्यामुळेच ही स्मार्ट हेरगिरी किंवा सायबर हेरगिरी वाढत चालली आहे.
आता या सायबर हेरगिरी प्रकाराची गंमत अशी आहे की, चीनने भारतात किंवा जगभर चालवलेली ही हेरगिरी हा काही नवा उपक्रम नाही. हे उद्योग अमेरिका आणि युरोपिय देश पार शीतयुध्द काळापासून करतातच आहेत. १९४५ साली दुसरं महायुध्द संपलं. ते संपेपर्यंत ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका-रशिया यांच्या युतीविरुद्ध जर्मनी-इटली-जापान असं चित्र होतं. पण, जर्मनी-जपान-इटलीचा पराभव आल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात आता जगावर वर्चस्व कुणाचं, अशी स्पर्धा लागली. या स्पर्धेने प्रत्यक्ष युध्दाचं स्वरूप घेतलं नाही, पण सतत एकमेकांवर राजकीय, औद्योगिक, वैचारिक कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयत्न अखंड सुरू राहिले. त्यालाच म्हणतात युद्ध! या युद्धातला फार महत्त्वाचा भाग म्हणजे, सर्वच क्षेत्रातल्या एकमेकांच्या गुप्त बातम्या काढणं, हा होता.
वर्षे उलटत गेली. विज्ञान आणखी पुढारत गेलं. संदेशांची देवाणघेवाण अधिकाअधिक सुंलभ होत गेली. १९७० साली तर हे शीतयुद्ध अगदी कळसाला पोहोचलं. तेव्हा, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा ऑष्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या पान देशांच्या गुप्तहेर खात्यांनी एकत्रितपणे एक यंत्रणा निर्माण केली. तिचं सांकेतिक नाव होतं- ‘फाईव्ह आईज्!’ म्हणजे पाच नेत्र. या पाच डोळ्यांनी सोवियत रशियानी आणि त्यांंच्या मित्र देशांवर सतत नजर ठेवायची होती. नंतरच्या काळात अमेरिकेने अक्षरश: असंख्य उपग्रह गुप्तपणे अवकाशात पाठविली. हे उपग्रह पृथ्वीवरून प्रक्षेपित होणारा प्रत्येक दृक अथवा श्राव्य संदेश पकडू शकतात. म्हणजेच ‘फाईव्ह आईज्’ यंत्रणेपासून पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट गुप्त राहूच शकत नव्हती.
पुढच्या काळात संगणक, ई-मेल या गोष्टी जगभर सर्वत्र सर्रास प्रचलित झाल्या. लवकरच त्यात मोबाईल फोनची भर पडली. तेव्हा, या देशांनी ‘फाईव्ह आईज्’ यंत्रणेला पूर्णपणे आत्याधुनिक स्वरूप दिलं आणि नाव ठेवलं- ‘इचेलॉन!’ या यंत्रणेपसून जगातील कोणतीही गोष्ट गुप्त राहू शकत नाही. समजा, तुम्ही हे काम पंचवीस मजली टॉवरच्या बेसमेण्टमध्ये तुमची गाडी पार्क करताय्, तर उपग्रहाचा डोळा वरच्या पंचवीस मजल्यांच्या भिंतींचा भेद करीत हे दृश्य पाहू शकतो. हे तंत्र आता इतलं सुलभ झालं आहे की, मध्यंतरी अमेरिकेने ते भाड्याने कुणालाही उपलब्ध करून दिलं होतं. त्याचा गैरफायदा घेऊन काही आचरट, आंबटशौकी लोकांनी एका अमेरिकन नटीच्या बाथरूममधील दृष्याची व्हिडीओ क्लिप काढून ती ई-मेलद्वारे जगभर फिरवली होती.
असो. २००९ साली हॉलिवूडने या हेरगिरीवर ‘इचेलॉन कॉन्स्पिरसी’ नावाचा चित्रपटच काढला. गंमत म्हणजे, अमेरिकन हेरखातं ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ उर्फ एनएसएचा एक अधिकारी एडवर्ड स्नोडेन याने या चित्रपटापासून स्फूर्ती घेऊन आपल्याजवळचा सायबर डेटा सर्वत्र प्रसारित केला. अमेरिकेने स्नोडेनला देशद्रोही घोषित केल्यावर त्याने रशियात राजकीय आश्रय घेतला.
स्नोडेन प्रकरण आणि चीन व इस्लामी अतिरेक्यांचा वाढता उपद्रव यामुळे ‘फाईव्ह आईज्’ गटाने आपला विस्तार केला आहे. मूळ पाच देशांखेरीज आता यात फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, नॉर्वे, नेदरर्लंड, बेल्जियम, इटली, स्पेन आणि स्वीडन हे नऊ देश सामील झाले आहेत. आता अधिकृतपणे या यंत्रणेचं नाव ‘फोर्टीन आईज्’ असं ठेवण्यात आलेलं आहे. थोडक्यात, अमेरिका आणि पश्चिम युरोप पुन्हा एकत्र आले आहेत.
अमेरिका, रशिया, पश्चिम युरोपीय देश, चीन किंवा इस्लामी देश एकमेकांचं जे काही करायचं ते करोत, आपण आपल्या सायबर सुरक्षेची काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठीच भारताने इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातला आशिया खंडातला प्रगत देश जपान याच्याशी हातमिळवणी केलेली आहे. जपान आणि चीन यांचं फार जुनं हाडवैर आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! वैयक्तिकरीत्या आपण घ्यायची काळजी म्हणजे, कोणतीही चिनी उत्पादनं ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या कंपन्या नीट तपासून घ्या. ऑनलाईन कंपन्या मागणी नोंदवून घेताना तुमच्या वैयक्तिक जीवनातले अनेक बारीक-सारीक तपशील विचारत असतात. उदा. तुमच्या आईचं मेडन नेम म्हणजे लग्नापूर्वीचं माहेरचं नाव काय? आता आमच्या नावाशी यांना काय करायचंय्? तुमचा माल द्या, पैसे घ्या की विषय संपला..! तेव्हा मुळातच ऑनलाईन खरेदी करायची का, हे ही ठरवून घ्या.
Saturday, 8 October 2016
After conducting a large-scale cyber attack, Indian hackers are also in full capacity of destroying the entire Pakistan cyberspace.
Monday, 22 August 2016
दहशतवादाविरोधातील ऑनलाईन लढाई-By pudhari
Subscribe to:
Posts (Atom)