SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Showing posts with label CYBER SECURITY. Show all posts
Showing posts with label CYBER SECURITY. Show all posts
Friday, 5 March 2021
Tuesday, 2 March 2021
Monday, 17 August 2020
Monday, 20 January 2020
सायबर सुरक्षा – उपयुक्त टिप्स-NAVSHAKTI-– उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत
टीसीजीएन -Take Care Good nigh, या नावाचा एक मराठी चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. त्यातून नवीन इलेक्ट्रॉनिक संपर्क साधने आणि आर्थिक व्यवहार याविषयी बर्यापैकी प्रबोधन केले होते. तो चित्रपट असल्याने खात्यातून गायब झालेली जन्माची पुंजी अखेर मूळ मालकाला प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्ष अनुभव खूप त्रासदायक आणि वेगळा असू शकतो.
सन 2021पर्यंत भारतातील 73 कोटी लोक इंटरनेट वापरतील असतील, असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील 70 टक्के व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसऍप, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करताना अनेक साध्या साध्या गोष्टीतून आपण आपली खाजगी माहिती जाहीर करीत असतो. यातून आपल्या संबंधीच्या एक एक बारीकसारीक माहितीचा तपशील एकत्र होऊन त्यावर झटकन पृथक्करण करून एक अहवाल तयार होत असतो. याचा उपयोग प्रामुख्याने मार्केटिंगसाठी करण्यात येतो. याचा सदुपयोग करणारे लोक जसे आहेत तसाच दुरुपयोग करणारे लोक आहेत.
काळाबरोबर राहायचे म्हणजे या गोष्टी आपण टाळू शकत नाही. अनेकदा नव्हे प्रत्येकवेळी आपणच ही माहिती कळत नकळत जाहीर करत असतो. तेव्हा ही माहिती सुरक्षित कशी ठेवावी याची माहितीही आपल्याला असणे आवश्यक आहे. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, तरी सर्व सामान्य वापरकर्त्यांना स्वहित रक्षण करण्यासाठी सजग आणि शिक्षित व्हायला हवेच. त्याला पर्याय नाही. म्हणून काही टिप्स :
- आपले सायबर संबंधित कोणतेही खाते योग्य लॉगइन आयडी पासवर्ड टाकूनही किंवा पासवर्ड विसरल्यास तो नव्याने मिळवता येत नसल्यामुळे आपल्याला वापरता न येणे म्हणजे हॅकिंग.
- सार्वजनिक वाय फाय (रेल्वे स्टेशन, हॉटेल, मॉल) तात्पुरते जॅम करून अल्पावधीत तशाच प्रकारचे आपले स्वतंत्र नेटवर्क निर्माण करून (Man Of Middle Attack) आपली माहिती चोरली जाते. त्यामुळे आपण नक्की कोणते नेटवर्क नेमके वापरतोय तेच समजत नाही. तेव्हा यावर उपाय हाच,की सार्वजनिक वायफायचा (अगदी विमानतळावरील सुद्धा) वापर शक्यतो करू नये. तिथून खरेदी अगर आर्थिक व्यवहार नकोतच. शक्यतो स्वतःचे नेटवर्क वापरावे.
- दुसर्याचा कम्प्युटर/मोबाईल वापरून आपले व्यवहार शक्यतो करू नयेत. यामध्ये आधीच टाकलेल्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने आपली महत्त्वाची माहिती युजरनेम/पासवर्ड चोरीस जाऊ शकतो.
- आपले प्रत्येक खाते सुरू करण्यासाठी एकदा वापरता येईल असा तात्पुरता सांकेतिक क्रमांक मिळतो (OTP).ही अतिशय चांगली सोय असून (Two Factor Authentication) यामुळे आपला लॉग इन आय डी व पासवर्ड समजूनही हे खाते चालू करता येऊ शकत नाही. अनेक लोकांना गुगलने अशी सोय उपलब्ध करून दिली आहे याची माहितीच अनेकांना नसते.
- आपण सहज विश्वासाने जी माहिती देतो; (उदा. फीडबॅक फॉर्म, व्हिजिटर रजिस्टर, ऍप डाऊनलोड करताना दिलेल्या परवानग्या) तिचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
- ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूच्या पॅकेटवरील नाव, नंबर, पत्ता आपण सहजपणे टाकून देतो; तो कुणाच्या हाती लागणार नाही, अशा प्रकारे खोडूनच टाकायला हवा.
- डियर कस्टमर, डियर क्लायंट, डियर यूजर या संबोधनाने येणारे मेल हे ‘फेक’ असण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांना उत्तर न देता नष्ट करावेत.
- http: ने सुरू होणार्या सुरक्षिततेचे निळे कुलूप असलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. व्यवहार करताना Encrypted Payment Gatewayचा वापर करावा. हा अतिशय सुरक्षित मार्ग असून तो सीलबंद पाकिटासारखा आहे.
- सोशल इंजिनिअरिंग अटॅक म्हणजे व्यक्तीच्या बोलण्यातून त्याच्या नकळत त्याची सर्व माहिती मिळवून त्या माहितीचा तिच्याविरुद्ध वापर करणे हे प्रकार घडतात, त्यामुळे कोणतीही माहिती पटकन देऊ नये.
- इंटरनेट बँकिंग करणार्यांनी बँकेस जो मोबाईल नंबर आणि मेल दिला असेल, तो कुणाशीही शेअर करू नये. नेटबँकिंग करताना स्क्रीनवरील की बोर्ड वापरावा. थोडक्यात म्हणजे , आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक वेगळा आणि केवळ त्याच कामासाठी राखून ठेवलेला फोन नंबर आणि इ-मेल पत्ता असला पाहिजे.
- पासवर्ड सहज अंदाजाने ओळखता येणार नाही, पण आपल्याला सहज लक्षात राहील, असा ठेवावा.
- अनोळखी लोकांच्या, सामायिक मित्र असलेल्या व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Requests) मान्य करू नयेत. ही गोष्ट विशेषतः किशोरवस्थेत असणार्या वयात आलेल्या मुलामुलींनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
- आपला मोबाइल, लॅपटॅप, डेस्क टॅप सहजासहजी कोणासही देऊ नये.
- आपल्याला आलेली फाईल/ लिंक वापरण्यास योग्य आहे का Vovirustototal.com येथून तपासून पहावे. संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही हे आपण transparancyreport.google.com येथे जाऊन तपासू शकतो.
- अनेक उपाय योजूनही जर कोणतेही अकाउंटहॅक झाल्यास रिकव्हरी लिंक वापरून आपल्या मॅक अड्रेसवरून (ज्या उपकरणावरून आपण हे अकाऊंट सुरू केले) विनंती करता येते.
- पोलिसांकडे सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवताना मुद्देसुद (पंचनाम्यात जेवढी माहिती आवश्यक असते त्याप्रमाणे) आणि स्क्रीनशॉट पुराव्यांसहीतनोंदवावी.
- प्रस्तावित डेटा प्रोटेक्शन बिल 2020 मध्ये डेटा होल्डरचे हित जपले जाईल याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे आपली माहिती का आणि कशासाठी वापरणार हे जाणून घेण्याचा हक्क आपल्याला मिळणार आहे.
- न विचारता कुणी आपल्याला मदत करत असेल तर त्याचा हेतू तपासून पाहावा. आपले खाजगी फोटो शेअर करू नका.
Saturday, 17 November 2018
सायबर सुरक्षा हा विषय शालेय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे आणि मुलांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, -ASHOK PANWALKAR-MAHARASHTRA TIMES
इंटरनेट आणि त्यावरील समाजमाध्यमांमुळे आपण एखाद्या देशाचे नव्हे, तर अवघ्या जगाचे नागरिक झालो आहोत. देशाचा नागरिक म्हणून आपल्यावर जी बंधने असतात, त्यापेक्षा जगाचा नागरिक म्हणून कितीतरी अधिक असतात. म्हणूनच समाजमाध्यमांचाच नव्हे, तर एकंदरीतच इंटरनेटचा वापर करताना खूप जबाबदारीने वागावे लागते. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले आजकाल त्यांच्या आईवडिलांशी मन मोकळे करण्याच्या ऐवजी समाजमाध्यमांवर करतात आणि त्यावरील कृत्रिम प्रेम, जिव्हाळा खरा आहे असे मानून त्यात अतीव समाधान मानतात. इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे, जितका उपयोग तितकाच धोकाही. हे लक्षात येईपर्यंत काही वेळा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच सायबर सुरक्षा या शब्दांना दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्व येत आहे. आपले मूल रडत आहे ना, मग त्याला हातात मोबाइल देऊन गप्प करा असे आईबापाला वाटू लागले की, त्या मुलाची इंटरनेटशी पहिल्यांदा ओळख होते. ते मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे इंटरनेटचे जग त्याला आपल्याकडे ओढून नेते आणि मग नको त्या गोष्टी घडायला लागतात. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाइल वर काय बघते, याचा बऱ्याच आईबापांना पत्ता नसतो. त्यांनाही जाग येते ती पोलिसांची थाप दारावर पडल्यावर. म्हणून मुलांवर इतर संस्कार करतानाच ‘इंटरनेट संस्कार’ही करायला हवेत, याची जाणीव पालक, शिक्षक आणि विशेष म्हणजे स्वतः मुलांनाही वाटू लागली आहे. मुले, पालक, शिक्षक आणि पोलिस या सर्वांची मोट बांधून त्यांना सायबर जागृत करण्याचा उपक्रम करणाऱ्या काही संस्था आज चांगले काम करत आहेत. ‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही ठाण्यातील संस्था त्यातीलच एक आहे.
त्यांनी अलीकडेच ‘सायबर अलर्ट स्कूल’ या नावाने एक प्रकल्प हाती घेतला होता. मुंबईच्या एच वॉर्डमधील २५ शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक त्यात सहभागी झाले होते. प्रामुख्याने इंटरनेटवरील गैरवर्तनाचे कायदेशीर परिणाम, इंटरनेटच्या अनिर्बंध वापराचे मानसिक परिणाम यांची जाणीव करून देण्याचे काम या प्रकल्पात झाले. त्याच बरोबर इंटरनेट व गॅझेटचा सुरक्षित, सकारात्मक वापर करायला शिकवून सायबर सुरक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. या प्रकल्पाची व्याप्ती बघितली, तर निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत, त्याचा अंदाज येईल. यात इयत्ता सहावी ते दहावीचे वीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी, पाच हजार पालक आणि ६५० शिक्षक यात सहभागी झाले होते. आधी मुलांना सायबर सुरक्षेचे किती ज्ञान आहे ते पाहण्यात आले आणि प्रकल्प संपताना त्या ज्ञानात किती वाढ झाली, तेही पाहण्यात आले. त्याचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना देण्यात येईल आणि मग तो पॅटर्न राज्यभर लागू व्हावा, अशी अपेक्षा आहे. या साऱ्या पाहणीत काय आढळले? पस्तीस टक्के मुलांचा स्क्रीन टाइम (म्हणजे इंटरनेट हाताळण्याची वेळ) एक ते दोन तास आहे. तीस टक्के मुलांचा दोन ते तीन तास आहे, तर पंधरा टक्के मुलांचा चार ते पाच तास आहे. दहा टक्के मुलांचे स्क्रीन टाइम पाच ते सहा तास आहेत, तर दहा टक्के मुलांचा स्क्रीन टाइम सात ते दहा तास आहे. यापैकी ६५ टक्के मुलं मोबाईलमधून इंटरनेटचा वापर करतात. त्याखालोखाल कम्प्युटर, लॅपटॉप व टॅबचा वापर करतात. ३२ टक्के मुलांची प्रथम पसंती युट्युबला आहे. यात १० ते १५ वयोगटातील मुले आहेत. सत्तर टक्के मुले त्यांच्या वयासाठी कायदेशीर नाही, अशा समाजमाध्यमांचा वापर करतात. विशेष म्हणजे, ६५ टक्के मुलांना सायबरविश्वातील धोक्यांबद्दल अजिबात माहिती नाही. ८१ टक्के मुलांना सायबर सुरक्षिततेबद्दल ज्ञान नाही. साठ टक्के मुलांना समाजमाध्यमांवरील प्रायव्हसी सेटिंगबद्दल माहीत नाही. मुळातच सायबरविश्वातील धोके माहीत नसल्याने खूप मुले खूप धोके पत्करताना दिसतात. कारण त्यात धोका आहे, हेच त्यांना कळत नाही.
चार महिने मुलांबरोबर काम केल्यावर सायबर सुरक्षितता, त्याचे फायदे आणि सायबरविश्वातील धोके याबद्दल मुलांच्या ज्ञानात ६५ टक्केपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून आली. अशा प्रकारच्या उपक्रमांची आज फार गरज आहे. त्या उपक्रमांमध्ये मुलांशी सतत संवाद करणे, त्यांना चांगले आणि वाईट यांची जाणीव करून देणे खूप आवश्यक आहे. खुद्द मुलांनीच सांगितले की, अभ्यासक्रमात सायबर सुरक्षिततेबद्दला माहिती असायला हवी. यात पालकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मूल अगदी लहान असताना त्याला गप्प बसविण्यासाठी हातात मोबाइल किंवा आयपॅड देणारे पालक जबाबदार श्रेणीत कसे मोजले जातील? आपणच चूक करायची आणि मग मुले वाहवत गेली, असे म्हणायचे हा कोणता न्याय? इंटरनेटचा सकारात्मक वापर करता येतो आणि त्यातून ज्ञान मिळू शकते, हे जेव्हा मुलांना कळेल तेव्हा इंटरनेटचा गैरवापर थांबेल. अन्यथा आजकाल काही मुले एवढी मोबाइल अथवा अन्य गॅजेटना चिकटलेली असतात आणि खऱ्या विश्वाऐवजी आभासी जगालाच खरे मानू लागतात आणि मग गोंधळ होतो. मुलाने अभ्यास करावा म्हणून आईने त्याच्या हातातला मोबाइल काढून घेतला आणि त्या रागातून मुलाने आत्महत्या केली किंवा तत्सम टोकाचे पाऊल उचलले, या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. किंवा सायबर सुरक्षेविषयी काहीही माहिती नसताना इंटरनेटचा वापर केल्यामुळे मोठे आर्थिक अथवा अन्य प्रकारचे नुकसान झाल्याच्या घटनाही अनेक वाचनात आल्या असतील. समाजमाध्यमांवर एखाद्याचे बोगस खाते उघडून त्याची वा तिची बदनामी करणे हे तर सर्रास होऊ लागले आहे. ही सगळी कृत्ये मुलेच करतात असे मला म्हणायचे नाही. मोठी माणसेही करतात, परंतु त्यांचा बळी ठरण्याची वेळ मात्र किशोरवयीन मुलांवर येऊ शकते.
‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही संस्था सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत असली, तरी टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सरकार व पोलिस यंत्रणेचा भक्कम पाठिंबा या चळवळीला मिळायला हवा. तरच याचे दृश्य परिणाम समाजात दिसायला लागतील. कारण ‘रेस्पॉन्सिबल नेटिझम’ ही संस्था नफा मिळविण्यासाठी अथवा आर्थिक व्यवहार करून गलेलठ्ठ होण्यासाठी काढलेली संस्था नाही. प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून सायबर सुरक्षेचे कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था व असेच काम करणाऱ्या इतर संस्था यांच्यावर सरकारचा आणि सुरक्षा यंत्रणेचा वरदहस्त असला, तर खूप चांगले काम होऊ शकेल. मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ. अनुराधा सोवनी या नेटिझमच्या प्रकल्पाचे काम पाहण्यात अग्रणी होत्या. सोनाली पाटणकर, उन्मेष जोशी आणि त्यांचे असंख्य मित्र हे या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. या मंडळींबरोबर काही वेळा ‘महाराष्ट्र टाइम्स’ही कार्यक्रमात सहभागी झाला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य किती महत्त्वाचे आहे याची माहिती आहे.
सरकारने सायबर सुरक्षा हा विषय शालेय पुस्तकात समाविष्ट केला पाहिजे आणि मुलांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी वेळ येऊन ठेपली आहे. निर्णय सरकारच्या हातात आहे. तो कधी होतो त्याची वाट पाहायची!
Subscribe to:
Posts (Atom)