Total Pageviews

Showing posts with label RECRUITMENT/ CAREERS. Show all posts
Showing posts with label RECRUITMENT/ CAREERS. Show all posts

Wednesday, 1 August 2012

सैन्यदलांत महिलांसाठी संधी आनंद मापुस्कर

सैन्यदल म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हे. त्यामध्ये महिलांसाठीही अनेक संधी उपलब्ध आहेत. इंजिनीयरिंग , एरोनॉटिकल इंजिनीयरिंग , एअर ट्रॅफिक कंट्रोलर , फ्लाईंग विभाग , शिक्षण , कायदा , ग्राउंड ड्युटी विभाग अशा विविध विभागात त्यांना काम करता येतं.

सैन्यदलांमध्ये महिलांना पदवीनंतरच प्रवेश करता येतो. महिलांचा प्रवेश हा बहुधा शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधून होतो. शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यदलांमध्ये जास्तीत जास्त १४ वर्ष काम करता येतं. यामध्ये सुरूवातीची १० वर्ष व त्यानंतर ४ वर्ष वाढवून दिली जातात.

निवडप्रक्रिया

पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाते. तुम्हाला पदव्युत्तर परीक्षेत जर जास्त गुण असतील तर ते निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. निवड झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी बोलावलं जातं. एसएसबीने(सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतीची विभागणी दोन टप्प्यात केलीय.

पहिल्या टप्प्यातील परीक्षेत इंटेलिजन्स टेस्ट , पिक्चर पर्सेप्शन व डिस्कशन टेस्ट आदींचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवाराना दुसरा टप्पाही पार पाडावा लागतो. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट , ग्रुप टेस्ट व मुलाखत असते.

तिन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.

भूदल

सर्वसाधारणपणे भूदलात महिला उमेदवारांना कायमस्वरूपी कमिशनमध्ये वैद्यकीय अधिकारी , नर्स अशा सहाय्यभूत सेवांमध्ये घेण्यात येत. मात्र याव्यतिरिक्त महिला विशेष भरती योजनेद्वारे ' शॉर्ट सर्व्हिस कमिशन ' मध्ये विविध अधिकारीपदांवर महिला अधिकाऱ्यांची निवड केली जाते. यात टेक्निकल , नॉन टेक्निकल व स्पेशालिस्ट अशा शाखा असतात. भूदलामध्ये महिला अधिकारी कॅप्टन , मेजर , लेफ्टनंट कर्नल या पदांवर काम करतात.
अधिक माहितीसाठी वेबसाईट - www.joinindianarmy.nic.in

भूदलातील महिला अधिकारी भरतीचे विविध मार्ग -

भरती योजना वय पात्रता

एन.सी.सी.(विशेष) महिला भरती १९ ते २५ वर्षे पदवीधर तसंच एन.सी.सी. ' सी ' प्रमाणपत्र परीक्षा ' बी ' ग्रेडमधून उत्तीर्ण होणं आवश्यक

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -

टेक्निकल महिला २० ते २७ वर्षे इंजिनीयरिंग पदवी

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -

नॉन टेक्निकल महिला १९ ते २५ वर्षे पदवी

किमान ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण २१ ते २७ वर्षे एल.एल.बी./एल.एल.एम. पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण

भारतीय नौदल

भारतीय नौदलात महिलांना अधिकारी पदांसाठी एक्झिक्युटिव्ह , शिक्षण व इंजिनीयरिंग शाखांमध्ये प्रवेश घेता येतो. अधिक माहितीसाठी वेबसाईट -www.nausena-bharti.nic.in

नौदल भरती योजनांसंबंधी माहिती खालीलप्रमाणे

एक्झिक्युटिव्ह शाखा

भरती योजना वयोमर्यादा पात्रता

शॉर्ट सर्व्हिस कमिशन -एअर ट्रॅफिक कंट्रोलर साडेएकोणीस ते २५

बीएस्सी(भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स) किमान ६० % गुण आवश्यक किंवा एमएस्सी(भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स) किमान ५५ % गुण

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - ऑब्झर्व्हर १९ ते २३ कोणत्याही विषयातील पदवीधर. किमान ५५ % गुण तसंच १२वीला भौतिकशास्त्र व गणित विषय

असणं आवश्यक.

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - लॉ २२ ते २७ कायद्यातील पदवीधर किमान ५५ % गुण आवश्यक

शॉर्ट सर्व्हिस कमिशन - लॉजिस्टिक साडेएकोणीस ते २५ खालील विषयातील पदवीधर वा पात्रता धारक (प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणं आवश्यक) बीए

(अर्थशास्त्र) , बीकॉम , बीएस्सी(आयटी) , सीए , कॉस्ट अकाउंटंस , केटरिंग टेक्नोलॉजी , बीसीए/एमसीए , बीई/बीटेक

(मेकॅनिकल/मरिन/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/आय.टी) , आर्किटेक्चर किंवा पीजी डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट

नौदल शिक्षण शाखा

वयोमर्यादा - २१ ते २५ वर्षे

पुढील विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

भौतिकशास्त्र (बीएस्सीला भौतिकशास्त्र विषय आवश्यक)

गणित (बीएस्सीला भौतिकशास्त्र विषय आवश्यक) ,

रसायनशास्त्र (बीएस्सीला भौतिक व गणित विषय आवश्यक)

कम्प्युर सायन्स/अॅप्लिकेशन

इंग्रजी , अर्थशास्त्र , इतिहास , राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी.

मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , संगणकशास्त्रातील बीई पदवी.

नौदल इंजिनीयरिंग शाखा

भरती योजना वयोमर्यादा पात्रता

शॉर्ट सर्व्हिस कमिशन

( नेव्हल आर्किटेक्चर) २१ ते २५ वर्षे बी.ई./बी.टेक ( नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल / सिव्हिल / एरोनॉटिकल/मेटॅलर्जी /एरोस्पेस इंजिनीयरिंग) किमान ६० %

गुण आवश्यक.

विद्यापीठ भरती योजना

( नेव्हल आर्किटेक्चर) १९ ते २४ वर्षे बी.ई./बी.टेक ( नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल / सिव्हिल / एरोनॉटिकल / मेटॅलर्जी /एरोस्पेस इंजिनीयरिंग) किमान ६०

% गुण आवश्यक.


फ्लाईंग ब्रँच

भारतीय हवाईदल

इंजिनीअरिंग पदवीप्राप्त महिला शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे हवाईदलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये प्रवेश करू शकतात.

वयोमर्यादा : १९ ते २३ वर्ष तसंच अविवाहित असणं आवश्यक.

शिक्षणः कोणत्याही विषयातील पदवीधर किमान ६० % गुण तसेच १२वीला भौतिकशास्त्र व गणित विषय असणे आवश्यक. किंवा इंजिनीयरिंगचा चार

वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक (किमान गुण ६०%) .

एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स)

परमनंट तसंच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये तंत्र शाखेत एरोनॉटिकल इंजिनीयर्सना इलेक्ट्रॉनिक्स विभागात घेतलं जातं. विमानांची दुरुस्ती व देखभाल करणं तसंच एअरफोर्स स्टेशनवरील संदेशवहन व सिग्नल्सच्या कामाची जबाबदारी यांच्यावर असते. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्सची पदवी परीक्षा वा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं.

एरोनॉटिकल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) :

या अभियंत्यांना विमानाची देखभाल , दुरुस्ती तसेच भव्य वाहनांची दुरुस्ती हे काम असतं. फायर आर्म्स व अॅम्युनेशनच्या सुरक्षेची व देखभालीची
जबाबदारी यांची असते.

यासाठी एरॉनॉटिक्स , मेकॅनिकल , प्रॉडक्शन या विषयांतील इंजिनियरिंग पदवी असणं आवश्यक आहे.

याबरोबरच ग्राऊंड ड्युटी विभागातील प्रशासकीय लेखा विभाग , लॉजिस्टिक्स आदी शाखांमध्येदेखील अन्य पदवीधरांना प्रवेश दिला जातो.

ग्राउण्ड ड्युटी विभाग

ग्राऊण्ड ड्युटी विभागात पाच प्रकार आहेत.

किमान २० वर्षं तर कमाल वयोमर्यादा शिक्षणानुसार खालीलप्रमाणे ठरते.

पदवीधर-२३ वर्षं , पदव्युत्तर पदवीधर-२५ वर्षं , एमएड/पीएचडी/आयसीडब्ल्यूए-२७ वर्षं

अॅडमिनिस्ट्रेशन:

या विभागात मनुष्य व साधनसामुग्री या दोन्हीच्या व्यवस्थापनाचे काम पहावं लागतं. या विभागातील काही अधिकाऱ्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलर वा फायटर

कंट्रोलर म्हणूनही काम करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक.

लॉजेस्टिक विभाग -

हवाईदलाचे मटेरियल मॅनेजमेंटचे काम या विभागाद्वारे केले जाते. हवाईदलांमध्ये लागणाऱ्या विविध उपकरणांची खरेदी प्रक्रिया तसंच आपल्याकडील
सामानाची यादी करुन त्याची निगराणी करणं हे काम करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्यक.

अकाऊंटस विभाग :

यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटचं काम करावं लागतं. इंटर्नल ऑडिटरचं कामही करावं लागतं.

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम (६० टक्के गुण आवश्यक.) , एमकॉम/सीए/कॉस्ट अकाऊंट (५० टक्के गुण आवश्यक)

हवामानशास्त्र : हवामान विभागात काम करत असताना उपग्रहाद्वारे पाठवलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करुन तसंच हवामान निरीक्षणाच्या विविध

उपकरणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवरुन हवामानाविषयक सल्ला ऑपरेटर्संना द्यायचा असतो.

शैक्षणिक पात्रता : विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी(मास्टर्स)मध्ये ५० टक्के गुण आवश्यक व पदवीस्तरावर गणित व भौतिकशास्त्र (कोणत्याही वर्षी) ५५

टक्के गुण आवश्यक.

इ) शिक्षण विभाग :

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स)मध्ये ५० टक्के गुण आवश्यक. वेबसाईट - www.careerairforce.nic.in

महत्वाचं - भूदल , नौदल , हवाईदलातील विविध भरतीसंबंधीच्या जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये पाहाव्या. तिन्ही सैन्यदलांच्या वेबसाईटवरही यांची माहिती

आणि कोणत्या काळात जाहिरात प्रकाशित केली जाते , याचीही माहिती या साइटवर असते

Thursday, 23 February 2012

चला सैन्यात...22 Feb 2012, शॉर्ट सर्व्हिस कमिशन शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल) पुरुष शॉर्ट सव्हिर्स कमिशन (टेक्निकल) महिला भरती योजना :
३९वे शॉर्ट सव्हिर्स कमिशन (पुरुष):
५० जागा
शैक्षणिक पात्रता : यासाठी इंजिनीअरिंग पदवीधर आणि जागांची संख्या पुढे दिलेली आहे.
सिव्हिल-११, इलेक्ट्रिकल-, मेकॅनिकल-, ऑटोमोबाइल-, प्रोडक्शन/आकिर्टेक्चर- जागा, इलेक्ट्रॉनिक्स-, कम्युनिकेशन-, कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी-, कम्प्युटर सायन्स- जागा.
१०वे शॉर्ट सव्हिर्स कमिशन (महिला) :
३४ जागा
सिव्हिल-, इलेक्ट्रिकल-, मेकॅनिकल-, इन्फोमेर्शन टेक्नोलॉजी-, प्रोडक्शन-, इलेक्ट्रॉनिक्स-, कम्युनिकेशन-, हाउस बिल्डिंग टेक्नोलॉजी/आकिर्टेक्चर-, कम्प्युटर सायन्स- जागा.
संरक्षणदलातील शहीद सैनिकांच्या पत्नी : जागा
शॉर्ट सव्हिर्स कमिशनमधील नॉन टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र असतात. तर, टेक्निकल पदासाठी इंजिनीअरिंग पदवीधर पात्र असतात.
निवडप्रक्रिया -
पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना निवडण्यात येतं. यानंतर दोन टप्प्यातील मानसशास्त्रीय कलचाचणीद्वारे उमेदवारांती अंतिम निवड करण्यात येते. यातील यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
प्रशिक्षण :
निवड झालेल्या उमेदवारांचे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी येथे होतं. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शॉर्ट सव्हिर्स कमिशन (प्रोबेशन) बहाल केलं जातं. या काळात लेफ्टनंट पदासाठीचं पूर्ण वेतन इतर भत्ते दिले जातात. अधिकाऱ्यांना (पुरुष-महिला) शॉर्ट सव्हिर्स कमिशनमध्ये १४ वर्षं काम करता येतं. (सुरुवातीचा दहा वर्षांचा कालावधी नंतर वर्षांची मुदतवाढ मिळू शकते.) पुरुष अधिकाऱ्यांची दहा वर्षांची सेवा शॉर्ट सव्हिर्स कमिशनमध्ये पूर्ण केल्यावर, जर उमेदवार पात्र असेल तर त्याला परमनंट कमिशनमध्ये सामावून घेतलं जातं. महिला उमेदवारांना या योजनेद्वारे परमनंट कमिशनमध्ये सामावून घेतलं जात नाही.
पदोन्नती :
लेफ्टनंट ते लेफ्टनंट कर्नलपर्यंत पदोन्नतीच्या सेवेच्या काळानुसार प्राप्त होते. यानंतरच्या पदोन्नतीच्या संधीसाठी पात्रतेेचे निकष पूर्ण करावे लागतात. लेफ्टनंट जनरल पदापर्यंत शॉर्ट सव्हिर्स कमिशनच्या माध्यमातून जाता येतं.
लेफ्टनंटची मासिक मिळकत साधारण ६५ हजार रुपये इतकी असते.
प्रवेश अर्ज प्रक्रिया :
प्रवेश अर्ज हे केवळ ऑनलाइनच भरता येतील. यासाठी
प्रा. मीनल मापुस्कर


(

Friday, 18 November 2011

ARMY RECRUITMENT IN SOLHAPUR MAHARASHTRA

मुंबई : आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसच्या कोल्हापूर विभागातर्फे सहा आणि आठ डिसेंबर २०११ रोजी सोलापूर येथे सैन्यभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तरुण यात सहभागी होऊ शकतील. सहा डिसेंबरला सोल्डर जनरल ड्यूटी पदासाठी भरती होणार असून त्यासाठी साडे सतरा ते एकवीस वषेर् वयोमर्यादा आहे. किमान १६८ सेमी उंची आवश्यक आहे. तर आठ डिसेंबरला सोल्जर टेक्निकल तसेच नसिर्ंग असिस्टंट पदासाठी भरती होणार असून त्यासाठी साडेसतरा ते २३ वषेर् वयोमर्यादा आहे. त्यासाठी १६७ सेमी उंची असणे आवश्यक आहे. दोन्ही विभागांसाठी किमान ५० किलो वजन असणे आवश्यक आहे

Friday, 16 September 2011

how to join army

How to join Indian Army, Navy, Air Force

All about the National Defence Academy & Naval Academy Exam.


The warriors of the land, guardians of the sea, and air have a common background. Most of these officers have cleared the NDA exam to join the elite forces. The candidates need to first specify the choice of Academy they wish to join: either National Defence Academy or Executive Branch of Naval Academy. The candidate can then indicate his preference as per his interest viz. Army, Navy and Air Force.
The NDA Exam, conducted at 41 centres across the country, is followed by intelligence & personality test by the Services Selection Board (SSB) for the shortlisted candidates.
Eligibility: Apart from nationality, age, sex and marital status; the educational qualifications vary for each wings of the National Defence Academy (refer Table 1).
Fee: Examination fee is Rs. 50 payable to the Commission through a single Central Recruitment Fee Stamp available at Post Offices. Fee is exempted for all candidates belonging to SC and ST category.
Results: The UPSC prepares a list of candidates who get the minimum qualifying marks in the written examination as fixed by the Commission. Based on their preference, the candidates are called for intelligence and personality test (that includes psychological aptitude) by the respective SSB.
Those who are shortlisted for the Air Force wing are assessed in Pilot Aptitude Test. Based on the performance at the SSB, final selection is made in order of merit subject to medical fitness and suitability.
About the Exam
Written Examination: For admission to Army, Navy and Air Force wings of the NDA and the Executive Branch of the Naval Academy, the candidates are tested in Mathematics and General Ability.
Each paper is of 2 hours and thirty minutes duration and carries 300 & 600 marks respectively.
The test papers in all subjects consist of objective type questions in Hindi and English. The UPSC has the discretion to fix qualifying marks in all the subjects in the examination.
Paper-I (Mathematics): The assessment is based on a candidate's understanding of the subject and has questions from Algebra; Matrices and Determinants; Trigonometry; Analytical Geometry of two and three dimensions; Integral Calculus and Differential Equations; Vector Algebra and Statistics & Probability.
Paper-II (General Ability): It is divided into two parts: Part A on English and Part B on General Knowledge (GK). English paper that consists of 200 marks evaluates a candidate's understanding and proficiency of the language and the syllabus covers various aspects on grammar and usage; vocabulary; comprehension and cohesion in extended text. In GK, one is expected to know the current events and knowledge on matters of everyday observation and experience. It has six sections and includes questions on Physics, Chemistry, General Science, History of India and Freedom Movement; Geography and Current Events. The allocation of weightages in these six sections are approximately 25%, 15%, 10%, 20%, 20% and 10% respectively.
Intelligence and Personality Test: This test includes both verbal and non-verbal assessment primarily to evaluate the basic intelligence and mental calibre of a candidate. This also comprises Group tests, group discussions, group planning as also giving individual short presentation or lectures on specified subjects or topics.

Tuesday, 21 June 2011

JOBS FOR RETIRED JCO OR IN CRPF AS EXPLOSIVE EXPERTS

MY FRIEND Brig Anil Ram ( ex Raj Rif ) is now ADVISER TO  CRPF in Delhi. He is looking for retired JCOs / NCOs trained in explosives / worked in CI Ops. Salary is very lucrative !! His Mob - 09911242717, Id - anilpopsie@yahoo.co.in
 

Monday, 16 May 2011

ARMY RECRUIT MENT IN MAHARASHTRA

13 जूनपासून सैन्यभरती
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 17, 2011 AT 01:15 AM (IST)

कोल्हापूर - येथील सेना भरती कार्यालयाच्या वतीने कार्यालयांतर्गंत 9 ते 16 जून या दरम्यान होणाऱ्या सहा जिल्ह्यातील सैन भरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 13 जूनला कोल्हापुरातील उमेदवारांची तर 14 जूनला केवळ माजी सैनिक, विधवा अथवा युद्ध विधवांच्या पाल्यांची कवठेमहांकाळ (सांगली) येथील महाकाली विद्यानिकेतन स्कूलवर भरती होणार आहे. सोल्जर जीडी, सोल्जर टेक्‍निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर क्‍लार्क एसकेटी आदी पदांसाठी भरती होईल. याचबरोबर भरती प्रक्रियेत केवळ दहावी पास असलेल्यांना स्वतंत्रपणे सोल्जर जीडी पदासाठी सहभागी होता होणार आहे.

ज्यांना भरतीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या मुळ प्रती व अन्य सर्व बाबींसह भरतीस्थळी उपस्थित राहावे. शारीरिक पात्रता अथवा अन्य माहितीसाठी उमेदवारांनी टेंबलाई टेकडी येथील सेना भरती कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सैनिक कार्यालयाने केले आहे.

Wednesday, 4 May 2011

EMPLOYMENT OPPERTUNITIES ONLINE TESTS

EMPLOYMENT OPPERTUNITIES ONLINE TESTS


Our office will be responsible for the Supervision of conduct of online tests across the country. We require a few volunteers for Mumbai / Pune /  Nagpur / Sangli / Kolhapur / Panaji / Nashik/ Hyderabad  to Supervise this conduct.

They should be more than 21 yrs, M / F and graduate with good fluency in English. Should have a mobile with camera.

They will be paid Rs 1000/- per day ( 0800 to 1630 hrs )

Initially it will be two / three days in a month. It will increase based on response from candidates in each centre.

Please contact Lt Col V Jayaraman - 09823132336 ( Pune / Kolhapur / Sangli / Nagpur / Panaji / Nashik ) / Col Saibal Dutt - 07799017680 (Hyderabad ) /  Col SK Batra - 09920112204 ( Mumbai )
In addition, we require volunteers across the country. Please forward your willingness to pune@globedetective.com indicating your city of preference.I will forward the same.


Tuesday, 3 May 2011

JOB IN Nagpur/Nashik / Sangli / Kolhapur / Panaji / Hyderabad to Supervise Online Tests

 

 Online Tests
Our office will be responsible for the Supervision of conduct of online tests across the country. We require a few volunteers for Nagpur/Nashik  / Sangli / Kolhapur / Panaji / Hyderabad  to Supervise this conduct.

They should be more than 21 yrs, M / F and graduate with good fluency in English. Should have a mobile with camera.

They will be paid Rs 1000/- per day
Initially it will be two / three days in a month. It will increase based on response from candidates in each centre.

Please contact Lt col V Jayaraman - 09823132336