Total Pageviews

Saturday, 20 August 2011

THREE POLICE KILLED IN GADCHIROLI

IS HOME MINISTER BOTHERED OP GREEN HUNT ONLY ON PAPER

गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव व माकडचुहा अशा दोन ठिकाणी पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिस शिपायासह तीन जवान शहीद झाले. तर एका पोलिस सब इन्स्पेक्टरसह केंदीय सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून यातील एका महिलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे पालिसांनी सांगितले.

नक्षलवाद्यांनी गुरुवारी पोटेगाव पोलिस ठाण्यापासून आठ किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराची यंत्रसामग्री जाळली होती. या घटनेनंतर नक्षलवादी याच ठिकाणी तळ ठोकून आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून शनिवारी पहाटे पोटेगाव पोलिसांनी केंदीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांना सोबत घेऊन शोध मोहीम राबवली.

जवान जंगलात शोध घेत असताना तेथे दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. यात पोटेगाव पोलिस ठाण्यातील कार्यरत असलेला परदेशी सुखलाल देवांगण हे शिपाई शहीद झाले. तर केंदीय राखीव सुरक्षा दलाचे चंदननाथ शिशीरकुमार हा जवान जबर जखमी झाला. या घटनेची माहिती कळताच मुख्यालयातून अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. यात सी-६० व केंदीय सुरक्षा दलाच्या कोब्रा बटालियनचे जवान होते.

हे जवान पोटेगावहून घटनास्थळाकडे जात असताना माकडचुहा गावाजवळ दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात कोब्रा बटालियनचा याशीर खान व चंदशेखर कोरे हे दोन जवान व सी-६०च्या पथकाचे नेतृत्व करणारे पोलिस सब इन्स्पेक्टर विठ्ठल पवार हे गंभीर जखमी झाले. या तिघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना खान आणि कोरे यांची प्राणज्योत मालवली. कोरे हे सांगलीचे राहणारे होते. शुक्रवारी दंतेवडा येथे झालेल्या चकमकीत ११ जवान शहीद झाले

No comments:

Post a Comment