Total Pageviews

Saturday 27 August 2011

SOMALI PIRATES GET HELP FROM PAKISTAN

पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर रौद्रभीषण डोंगररांगांमधून भाडोत्री घुसखोरांना भारतात धाडत छुपे युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानने आता सोमाली सागरी चाच्यांनाही ' इंधन ' आणि रसद देण्यास सुरुवात केली असल्याचा संशय आता बळावू लागला आहे . भारतीय नौदलाने नुकत्याच ताब्यात घेतलेल्या ' नफीस ' या व्यापारी जहाजावरील चाचे त्यांच्या सामानसुमानाच्या झडतीमधून या संशयाला पुष्टी देणारा ऐवज हाती लागला आहे .

गेल्या आठवड्यात नौदलाने केलेल्या कारवाईत ' नफीस ' हे व्यापारी जहाज ताब्यात घेण्यात आले . त्यावर एके ४७ बंदुका सापडल्या . जहाज पोरबंदर येथे नेण्यात येऊन त्यावरील नऊ जणांची चौकशी सुरू करण्यात आली . त्यामध्ये पाच जण येमेनचे होते , दोन टांझानियाचे , एक केनियाचा तर एक सोमालियन होता . या सर्वांना पोरबंदर पोलिसांच्या हवाली करण्यात आले . नऊ जणांपैकी चाचे कोण आणि अपहृत कोण , याचा छडा लागला नव्हता .

या जहाजावर आढळलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये पाकिस्तानी कंपन्यांची पाकिटे सापडली आहेत . त्यावर तांदळाच्या गोणी ज्यूसचे पाऊचही होते . तसेच ८६ हजार डॉलर आणि १५०० सौदी रियाल इतके परकीय चलन त्यावर आढळले . चहाच्या पत्तीने भरलेल्या गोणीही येथे आढळल्या . सलग तासन्् तास झोपता समुद्रावर कार्यरत राहता यावे , यासाठी चाचे ही चहाची पत्ती चघळतात , अशी माहिती मिळाली आहे .
सागरी तस्करांकडे सर्वसाधारणपणे एवढी मोठे परकीय चलन आढळत नाही . शिवाय सोमाली चाचे हे एरव्ही स्पीडबोटींचा वापर करतात , त्याऐवजी यांनी कमी वेगाच्या व्यापारी जहाजाचा वापर केल्यामुळे पाकिस्तानी हात असल्याचा संशय बळावला आहे

No comments:

Post a Comment