Total Pageviews

Showing posts with label B DESH. Show all posts
Showing posts with label B DESH. Show all posts

Saturday, 11 March 2017

स्वत:ला आध्यात्मिक गुरू, मार्गदर्शक म्हणून मदरसे, शाळा आणि अन्य संस्थांमधून त्याच देशाच्या विरोधात काम करायचे, दहशतवाद्यांना छुपी मदत करायची, हा नवा धंदा जाकीर नाईकच्या रूपाने नुकताच आपण पाहिला. या जाकीर नाईकला बांगलादेश आणि अन्य काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याच बांगलादेशातील जाकीर नाईकचा नवा अवतार मौलाना अबु काशेम याला नुकतीच बांगलादेशी पोलिसांनी अटक केली आहे


जाकीरचा नवा अवतार!March 4, 2017022 स्वत:ला आध्यात्मिक गुरू, मार्गदर्शक म्हणून मदरसे, शाळा आणि अन्य संस्थांमधून त्याच देशाच्या विरोधात काम करायचे, दहशतवाद्यांना छुपी मदत करायची, हा नवा धंदा जाकीर नाईकच्या रूपाने नुकताच आपण पाहिला. या जाकीर नाईकला बांगलादेश आणि अन्य काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याच बांगलादेशातील जाकीर नाईकचा नवा अवतार मौलाना अबु काशेम याला नुकतीच बांगलादेशी पोलिसांनी अटक केली आहे. हा काशेम उत्तर बांगलादेशात एका शिक्षण संस्थेत शिक्षकाचे काम करतो. पण, त्याच्या कारवाया संशयास्पद वाटल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. अखेर बांगलादेशात प्रतिबंधित असलेल्या जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या अतिरेकी संघटनेसोबत त्याचे जवळचे संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्याला अटक झाली आहे. ढाका येथे गतवर्षी जुलै महिन्यात परराष्ट्रीय मुत्सद्यांच्या निवास संकुलांनजीक असलेल्या एका हॉटेलवर याच प्रतिबंधित अतिरेकी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १७ लोक ठार आणि अनेक जखमी झाले होते. त्या हल्ल्यात काशेम याचा संबंध असल्याचे व प्रमुख सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. बांगलादेशात जन्मलेला कॅनेडियन तामेम चौधरी हा प्रतिबंधित अतिरेकी संघटनेसोबत जुळला होता आणि तामेमसोबत काशेम याचे निकटचे संबंध होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. अशाच एका हल्ल्याचे वेळी पोलिसांकडून तामेम हा गेल्या ऑगस्टमध्ये मारला गेला होता. तेव्हापासून शामेम हा या अतिरेकी संघटनांच्या अन्य म्होरक्यांसोबत संबंध ठेवून होता. पंतप्रधान शेख हसीना यांनी सर्व प्रतिबंधित अतिरेकी संघटनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोलिस आणि सुरक्षा दलांनी ४० संशयितांना ठार मारले होते. गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारल्याचे म्हटले होते. पण, बांगलादेशच्या गुप्तचर विभागाच्या तपासात या हल्ल्यात जेएमबीचा हात असल्याचे म्हटले आहे. अतिरेक्यांनी आतापर्यंत मुक्त विचार व्यक्त करणारे लेखक, ब्लॉगर्स, पत्रकार यांना वेचून ठार मारले होते. शामेमच्या अटकेनंतर बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा कयास आहे. पाक, अफगाण, चीन… मुस्लिम अतिरेकी संघटनांनी केवळ बांगलादेशातच नव्हे, तर अफगाणिस्ता, चीन आणि पाकिस्तानातही आपल्या कारवायांत वाढ केली आहे. यात तालिबान, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद यांसह अनेक संघटना सामील आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर इसिसच्या हालचाली वाढल्या आहेत. नुकत्याच काबूल येथे झालेल्या हल्ल्यात १४ जणांना प्राणास मुकावे लागले. अफगाणिस्तानचे भारतासोबत सलोख्याचे संबंध हे पाकिस्तानच्या पोटात दुखत आहेत. त्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तानमधील अतिरेकी संघटनांसह तालिबानलाही आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत करीत असल्याचा आरोप अफगाण राष्ट्रपती अब्दुल गनी यांनी केला आहे. त्यात खूप तथ्य आहे. अफगाणमध्ये पकडण्यात आलेल्या अनेक अतिरेक्यांनी हे कबूल केले आहे की, आम्हाला पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. पण, पाकिस्तानही अतिरेकी हल्ल्यांपासून मुक्त नाही, हे त्याने ओळखले पाहिजे. केवळ हाफीज सईदला नजरबंद करून चालणार नाही, तर त्याच्यावर मानवी हत्यांचा खटला भरून त्याला फाशी दिली पाहिजे. हीच मागणी अमेरिका पाकिस्तानकडे वारंवार करीत आहे. पण, पाकिस्तानने अद्याप तरी त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी रसद कमी झ्राल्यानंतर आता पाकने चीनकडे भिकेची झोळी पसरली आहे. तिकडे चीनच्या सीमासुद्धा सुरक्षित नाहीत. अगदी प्रथमच तेथे झिंझियांग प्रांतातील मुस्लिमांनी चीनविरुद्ध जेहाद छेडला असून, त्यांनी इसिसची मदत मागितली आहे. इसिसने नुकताच अर्ध्या तासाचा व्हिडीओ तयार करून, आता आमची सारी शक्ती आम्ही चीनमध्ये लावू, असा इशारा दिला आहे. एकूणच, दक्षिण आशियातील वातावरण हे अतिरेक्यांच्या सावलीमुळे काळेकुट्‌ट दिसत आहे. या नव्या आव्हानामुळे चीनने त्या भागात दहा हजार सैनिक तैनात केले आहेत. तेथे दाढी वाढविण्यावर आणि महिलांनी बुरखा टाकण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. इसिसचा इराकमध्ये पाडाव झाल्याच्या बातम्या येत असल्या, तरी एक बाब विसरून चालणार नाही की, इसिसचे स्लीपर सेल्स हे जगभर विखुरले आहेत. अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या हल्ल्यात रासायनिक पदार्थांचा वापर केला गेला आहे. ही बाब लक्षात घेता भारताने आतापासूनच संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तत्पर असले पाहिजे आणि सदेैव अतिशय सतर्क राहण्याची गरज

Friday, 27 December 2013

SPREADING VIOLENCE AGAINST HINDUS IN BANGLADESH

अशांत बांगलादेश आणी बांगलादेशीं हिंदूवर वाढते अत्याचार मुक्तिसंग्रामात पाकिस्तानच्या बाजूने लढणाऱ्या अब्दुल कादर मुल्लाला फाशी शिक्षा दिल्याचे जाहीर करताच बांगलादेशात 'जमात-ए-इस्लामी' पक्षाने हिंसक प्रदर्शने सुरू केली आहेत. जानेवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, बांगलादेश नॅशनल पार्टी आणि 'जमात-ए- इस्लामी'ची भूमिका पाहता येणारा काळ बांगलादेशाच्या लोकशाही व्यवस्थेची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. आपल्या शेजारचा बांगलादेश येथे येत्या ५ जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र त्या निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात होतील काय, हा तेथील आजचा मुख्य प्रश्न नाही. त्या होतील की नाही, हा खरा प्रश्न आहे, विरोधी पक्षनेत्या बेगम खलिदा झिया यांना निवडणुकीची तारीखच मंजूर नाही. निवडणूक झाली तर ती पक्षनिरपेक्ष काळजीवाहू सरकारच्या देखरेखीखाली व्हावी, अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने या निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.माजी राष्ट्राध्यक्ष एच. एम. इर्शाद यांची जातीय पार्टी व छोटय़ामोठय़ा विरोधी पक्षांनीही निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली आहे . जमाते-इस्लामीच्या लोकांनी केवळ बांगलादेशातच नव्हे, तर भारतातही या निर्णयाविरुद्ध मोठे आंदोलन केले. कादर मुल्लाचा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाला विरोध कादरला मुक्ती फेब्रुवारी २०१३मध्ये संग्रामातील युद्धविरोधी अपराधांमधील पाच आरोपांमध्ये दोषी ठरविण्यात आले होते. ६५ वर्षीय कादर जमातचे उपमहासचिव होते. कादर मुल्ला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९६६ मध्ये 'जमात-ए-इस्लामी'शी जोडले गेले होते. १९६६मध्ये जमात-ए-इस्लामी विद्यार्थी संघटना म्हणून काम करीत होती. त्यावेळी कादर यांची संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. १९७१मध्ये कादर मुल्लाने बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाला विरोध केला. 'इस्लामी देश तोडणे इस्लामच्याविरुद्ध आहे,' असे ते सांगत होते. त्यांनी मूलतत्त्ववादी संघटना अल-बदरशी संधान साधले. त्यामुळे कादर याचा विरोध अधिक हिंसक आणि मानवताविरोधी झाला. मुक्तिसंग्राम समर्थकांच्या म्हणण्यानुसार कादर मूलतत्त्वावाद्यांना धार्मिक हिंसेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी भाषण करी. त्याने आणि अल-बदरच्या समर्थकांनी संग्राम समर्थक बंगाली कार्यकर्त्यांना हेरून हत्या करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला मदत केली. नऊ महिने चालल्या या युद्धात सरकारी आकड्यानुसार ३० लाख लोक मारले गेले होते. बांगलादेश संस्थापक आणि राष्ट्रपती शेख मुजिबूर रेहमान यांची १९७५ ला हत्या आणि लष्करी हस्तक्षेपानंतर सत्तेवर आलेल्या जनरल जियाउर रहमान यांनी जमातला पुन्हा राजकाणात सक्रिय होण्याची संधी दिली. बांगलादेश नॅशनल पार्टीची सत्ता आल्यानंतर २००१ ते २००६ मध्ये त्याने मुजहिद समाज कल्याण मंत्री म्हणून काम केले. जमातचे चौथ्या क्रमाकाचे नेते दरम्यान, कादरला तीन मार्च २०१३ रोजी शेख हसीना सरकारने कादरला फाशीची शिक्षा देण्याची अपील सुप्रीम कोर्टात केली. त्यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने १७ सप्टेबर २०१३ ला मुक्ती संग्रामात मीरपूर भागात हजरत अली लस्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येच्या आरोपाखाली कादरला फाशीची शिक्षा दिली. या निर्णयाविरोधात बांगलादेशात असंतोष पसरला आणि कादरला फाशी शिक्षा देण्यात यावी, यासाठी व्यापक आंदोलने झाली.जमात-ए-इस्लामीची त्यावरील प्रतिक्रिया स्वाभाविकच तीव्र होती. बांगलादेश हा कायद्याने तसा धर्मनिरपेक्ष देश, पण देशात इस्लामची स्थापना करून लोक या घटनेचा बदला घेतील, असे जमातच्या नेत्यांनी म्हटले आहे. मुल्लाच्या फाशीनंतर ठिकठिकाणी सत्ताधारी अवामी लीगच्या बाजूचे मुस्लीम आणि हिंदू नागरिक यांच्यावर हल्ले चढवण्यात आल्याच्या बातम्या आहेत. तिकडे पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांनीही घसाफाडू भाषणे करण्यास सुरुवात केली आहे. पीडित हिंदू बांगलादेशी शरणार्थींना स्थायी आश्रय देण्यास नकार राजकीय व्यासपीठावरून आता हिंदूंच्या वेदना, त्यांचे प्रश्न साफ गायब झाले आहेत . हिंदूंना उद्ध्वस्त होण्याची, दबून राहण्याची, सतत तडजोडी करण्याची आणि थोडेबहुत फायदे पदरात पडल्यास आपले दु:ख विसरण्याची सवयच पडून गेली आहे. ही अशी परिस्थिती असताना बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळ वेळ असणार आहे?ज्या अफगाणिस्तानला भारतातील बहुसंख्यक हिंदूंकडून दिल्या जाणार्या करातून अब्जावधी डॉॅलर्सची मदत केली जात आहे आणि जेथील नव्या संसदभवनाची निर्मिती भारत करीत आहे तेथील संसदेने एक जागासुद्धा हिंदू आणि शिखांसाठी राखीव ठेवण्यास नकार दिला आहे.अफगाणिस्तानात हिंदू आणि शीख मोठ्या मुश्किलीने केवळ एक टक्काच शिल्लक राहिले आहेत. कराचीत एक प्राचीन हिंदू मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. तेथे बलुचिस्तान, सिंध, पेशावर, पंजाब इत्यादी प्रांतांत हिंदूंवर सातत्याने भयानक अत्याचार होत आहेत. विडंबना ही आहे की, आंतरराष्ट्रीय लवादाच्या या निर्णयाची शिक्षा बांगलादेशातील हिंदूंना भोगावी लागत आहे. त्यांच्या घरांवर जमाते-इस्लामीचे गुंड सातत्याने हल्ले करीत आहेत. घरांची जाळपोळ तसेच लुटालूट करीत आहेत व हिंदू स्त्रियांची विटंबना करीत आहेत. ढाका राजशाही, खुलना, बारिशाल, रंगपूर, नौआखाली, बाघेरहाट, लक्ष्मीपूरसारख्या जिल्ह्यांत हजारो हिंदूंवर हल्ले झाले आणि त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. परिणामी, हिंदूंना आपले प्राण वाचविण्यासाठी प्रचंड संख्येत भारतात आश्रय घेणे भाग पडत आहे. हे हिंदू पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर १९४७ मध्ये भारतात शरणार्थी म्हणून आले होते. संपूर्ण पन्नासच्या दशकात पूर्व पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदूंना भारतात परतणे भाग पडत होते. पुन्हा १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि जमाते-इस्लामीसारख्या संघटनांनी सर्वाधिक अत्याचार व छळ हिंदूंचाच केला. त्यामुळे पुन्हा काही लाख हिंदू भारतात आले. एवढे भीषण अत्याचार होऊनही आता पुन्हा त्यांना शरणार्थी बनविण्यात येत आहे. भारत सरकार आणि आसाम व त्रिपुरासारखी राज्य सरकारे एकीकडे पीडित हिंदू बांगलादेशी शरणार्थींना स्थायी आश्रय देण्यास नकार देत आहे, तर दुसरीकडे बांगलादेशातून येथे लुटालूट करण्यास आलेल्या आणि दहशत पसरविणार्या कट्टर मुस्लिम घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही मिळत आहे. भारताची भूमिका १२ डिसेंबरला कादर मुल्लाला फाशी दिल्यानंतर बांगलादेश अशांत झाला आहे. हिंदूबहुल भागात जमातने हिंसक कारवाया वाढविल्या आहेत. बांगलादेशच्या लोकशाहीला आणि धर्मनिरपेक्षतेला हा खरा धोका आहे. २००७मधील निवडणुकीच्या वेळी अशा परिस्थितीत लष्कराने हाती सत्ता घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता एकीकडे आहे, तर दुसरीकडे मुस्लीम जातीयवादाला या अराजकातून हमखास बळ मिळणार आहे. तसे झाल्यास ती भारतासाठी मोठीच डोकेदुखी ठरेल.सन १९७१च्या मुक्तिसंग्रामाच्या धगीत आजही बांग्लादेश होरपळत आहे. देशभरात निर्माण झालेला तणाव आणि मूलतत्त्ववादी शक्तींचा प्रशासनावर असलेला दबाव पाहता. बांगलादेशाला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.