Total Pageviews

Showing posts with label CELEBRATIES. Show all posts
Showing posts with label CELEBRATIES. Show all posts

Saturday, 23 November 2013

SEPAI MAHESH DHYGUDE MARTYERED IN KASHMIR

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत पाडळीचा जवान शहीद ऐक्य समूह Wednesday, November 20, 2013 AT 11:10 AM (IST) Tags: mn2 खंडाळा तालुक्यातील चौथा जवान धारातीर्थी लोणंद, दि. 19 : जम्मू-काश्मीर येथील सांबा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत मराठा बटालियन, 856 राष्ट्रीय रायफलमधील महेश व्यंकटराव धायगुडे (वय 23, रा.पाडळी,ता.खंडाळा) हा जवान सोमवारी रात्री शहीद झाला. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी शहीद झालेला महेश धायगुडे हा खंडाळा तालुक्यातील चौथा जवान आहे. महेश धायगुडे शहीद झाल्याची वार्ता समजताच पाडळी पंचक्रोशीसह संपूर्ण खंडाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पाडळी या लोणंदपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या गावामध्ये शहीद जवान महेश धायगुडे याचे घर व कुटुंबीय असून सांबा सेक्टर, जम्मू कश्मीर येथे सीमा रक्षणात कार्यरत असलेला महेश धायगुडे शहीद झाल्याचा दूरध्वनी संदेश आज मंगळवार, दि. 19 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ हणमंत धायगुडे यांना आला. त्यानंतर खात्री करण्यासाठी सैन्य दलातच नोकरीस असणारा महेश धायगुडे याचा धाकटा भाऊ अविनाश धायगुडे याच्याशी संपर्क केला असता त्याने या वृत्तास दुजोरा दिल्यानंतर संपूर्ण खंडाळा तालुक्यात ही वार्ता पसरली. त्यानंतर महेश धायगुडे यांच्या पाडळी येथील निवासस्थानी ग्रामस्थ व महिलांनी मोठी गर्दी केली. शहीद जवान महेश धायगुडे याच्या पश्चात आई श्रीमती संगीता धायगुडे, धाकटा भाऊ जवान अविनाश धायगुडे (आर्मी मेडिकल कोअर लखनौ), दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. शहीद जवान महेश धायगुडे याचे वडील कै.व्यंकटराव धायगुडे व चुलते सर्जेराव धायगुडे हे सैन्यदलात कार्यरत होते. सर्जेराव धायगुडे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. महेश धायगुडे याचे प्राथमिक शिक्षण पाडळी येेथे, माध्यमिक शिक्षण पंचक्रोशी विद्यालय, बोरी व लोणंद येथे झाले. 2009 मध्ये बेळगाव येथे सैन्यदलात तो दाखल झाला. जम्मू येथे तो कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवा दरम्यान तो पाडळी येथे सुट्टीवर आला होता. पाडळी प्रमाणेच लोणंद येथील माउली नगरमध्ये जागा घेऊन त्याने घराचे बांधकाम सुरू केले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचा त्याचा मानस होता. परंतु काळाने त्यापूर्वीच त्याच्यावर घाला घातला. महेश धायगुडे हा जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, गटविकास अधिकारी नानासाहेब रणदिवे, सभापती सौ. दीपाली साळुंखे, खेड पंचायत समिती गणाचे सदस्य रमेश धायगुडे (पाटील) यांनी तातडीने भाडळी येथे जाऊन अंत्यदर्शन, अंत्ययात्रा, अंत्यविधी जागांची व मार्गाची पाहणी केली. अंत्यविधीच्या जागेचे सपाटीकरण व रस्ता दुरुस्तीचे काम शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांच्यावतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. शहीद जवान महेश धायगुडे याचे पार्थिव पाडळी येथे कधी आणण्यात येणार याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. तथापि बुधवार, दि. 20 रोजी पार्थिव येथे दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खंडाळा तालुक्यात यापूर्वी सुनील यादव (पारगाव), प्रकाश शेळके (निंबोडी), संतोष ठोंबरे हे जवान देशाच्या सीमा रक्षणासाठी कार्यरत असताना शहीद झाले आहेत. महेश धायगुडे हा खंडाळा तालुक्यातील चौथा शहीद जवान आहे.

Thursday, 11 October 2012

CAPTAIN THOMAS BRAVE SOLDIER

कॅप्टन थॉमस

कधीही करू शकतो जीवनाची नवी सुरुवात- एन. रघुरमन  
थॉमस यांना नेहमी वाटत होते की, पूर्ण नावाऐवजी सर्वांनी त्यांना केवळ थॉमस म्हणून हाक मारावी. थॉमस या नावानेच भविष्यात आपली ओळख निर्माण करणार असल्याचेही ते शालेय जीवनात मित्रांना सांगायचे. त्यांनी अथक पर्शिम केले पाच वर्षांच्या संघर्षानंतर सैन्यदलात सामील झाले. त्यानंतर ते कॅप्टन थॉमस झाले. इतर तरुणांप्रमाणे थॉमसही स्वत:साठी एक उत्तम जीवनसाथी शोधत होते. त्यांच्या वडिलांचीही मनोमन हीच इच्छा होती की, आपल्या मुलाने स्वत: भावी जोडीदार निवडावा. थॉमस यांचा सीमेवर अनेकदा दुश्मनांशी सामना व्हायचा. परंतु त्यांच्या वडिलांना याची थोडीही काळजी नव्हती. कारण, त्यांच्या पिढय़ान्पिढय़ांनी देशासाठी सेवा केलेली होती. त्यांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य रणभूमीवर शहीद झाला नाही. मात्र, कॅप्टन थॉमसच्या बाबतीत असे घडले नाही. ते एकदा सुरुंगांचे प्रात्यक्षिक घेत होते. त्याचवेळी तेथे मोठा स्फोट झाला आणि त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. कॅप्टन थॉमस यांना विशेष उपचार मिळावेत यासाठी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत हवाईमार्गे पुण्यातील विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्टिफिशियल लिंब सेंटर (एएलसी) हे असेच एक विशिष्ट रुग्णालय आहे. या ठिकाणी युद्धात किंवा प्रशिक्षणात जखमी झालेल्या हात-पाय गमावलेल्या धाडसी सैनिकांना कृत्रिम अंग, उपकरण आणि पुनर्वास सुविधा उपलब्ध करण्यात येते. थॉमस यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते. आपले लग्न कधी होणार संसार कसा करायचा याची काळजी त्यांना वाटत होती. नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट मेरी ही एएलसीची इंचार्ज होती. ती अनेक रुग्णांना कधी प्रेमाने तर कधी कडक शब्दांत बोलून सांभाळायची. युद्धादरम्यान आपले अवयव गमावणार्‍या 99 टक्के रुग्ण एएलसीमधून गर्वाने आणि आत्मविश्वासाने तेथून जात असे. कृत्रिम अवयवासोबतही आनंदी जीवन जगता येते ही बाब मेरीने चार महिने थॉमस यांना समजावल्यानंतर ती गोष्ट त्यांना समजली. सहा महिन्यांनंतर ते कृत्रिम पायांवर उभे राहू लागले आणि तीन महिने झाल्यानंतर ते हळूहळू चालू लागले. तोपर्यंत दोघांनाही कळाले नाही की, ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. ते नेहमी रुग्णालयाच्या परिसरात एक-दुसर्‍यासोबत हसत-खेळत राहत असत. परंतु कोणीही त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत नव्हते. कारण, सर्वांना माहिती होते की, मेरी रुग्णाची खूप काळजी घेते. शेवटी कॅप्टन थॉमस यांचा डिस्चार्ज होण्याचा दिवस उजाडला. थॉमस तेथून जात असताना मेरीच्या डोळ्यांतून अर्शू येत होते. मेरी जवळपास एक आठवड्यापर्यंत निराश आणि गुमसुम राहत होती. बरोबर एक आठवड्यानंतर कॅप्टन थॉमस त्यांच्या फियाट कारने एएलसीमध्ये आले. कारवर एक बॅनर होता त्यावर लिहिले होते, ‘मेरी, विल यू मॅरी मी ? युवर थॉमस.’ त्यानंतर जे झाले तो इतिहास आहे. आता 2012 मध्ये ब्रिगेडियर थॉमस आणि कर्नल मेरी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या दोघांना सायंकाळच्या वेळी पुण्यातील साळुंके विहार कॉलनीत एकमेकांसोबत फेरफटका मारताना आपण पाहू शकतो.
फंडा काय आहे?
शरीराचा कुठलाही अवयव गमावल्यानंतर जीवन समाप्त होत नाही. जीवनाची एक नवी सुरुवात आपण करू शकतो. परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतात ? याचा विचार केला तर मी स्तब्ध होऊन जातो

Friday, 24 June 2011

AISHYARY RAIs BABY BECOMES SUPERSTAR EVEN BEFORE BIRTH

ऐश्वर्या रायनं झेंडा लावला काय? ऐक्य समूह Friday, June 24, 2011 AT 11:24 PM (IST) - वासुदेव कुलकर्णी
 
.
हिंदी चित्रपटसृष्टीतला ज्येष्ठ अभिनेता-बिग बी अमिताभ बच्चननं ट्विटरवरच्या आपल्या ब्लॉगवर, आपल्या सूनबाई ऐश्वर्या राय गर्भवती असल्याचं लिहिलं आणि या वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकार, संपादक, वार्ताहरांना अक्षरश: हर्षवायू झाला. कुत्रं जसं हाडं चघळतं, तसं गेले दोन दिवस वृत्तवाहिन्या हाच विषय सातत्यानं अमिताभ बच्चन, जया बच्चन आजी होणार, अभिषेक बच्चन बाप होणार, ऐश्वर्या राय आई होणार याच बातम्या रंगवून रंगवून सातत्यानं प्रक्षेपित करायला लागल्या. ऐश्वर्या राय गर्भवती राहिली, यात विशेष काय? आणि हा बातमीचा विषय कसा होवू शकतो? हे सर्वसामान्याच्या सुख-दु:, व्यथा-वेदनांशी कसलंही नातं नसलेल्या उपग्रह वाहिन्यांनाच माहिती! ती गर्भवती आहे, यात तीनं कोणता झेंडा लावला? याचा विचार याच बातमीचा रतिब घालणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी केलेला नाही. सवंग लोकप्रियता मिळवायसाठी तिखट-मिठ लावून अशा भंपक बातम्या प्रक्षेपित करायला सोकाव-लेल्या या वाहिन्यांना हा विषय मिळाला इतकंच! अमिताभ बच्चनचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते. पण, अमिताभ बच्चनला हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हायसाठी झगडावं लागलं. आता मात्र ऐश्वर्या रायचं मूल जन्माला येईल तेव्हा ते आपोआपच सुपरस्टार असेल. ऐश्वर्या राय प्रसुत झाल्यावर ती आणि तिच्या नवजात बाळाची छायाचित्र, तिच्या-तिच्या नवऱ्याच्या अभिषेकच्या मुलाखती प्रक्षेपित करून ही प्रसारमाध्यमं त्याला जन्मत: सुपरस्टार करून टाकतील. किंबहुना हे बाळ जन्माला यायच्या आधीच सुपरस्टार पदाला पोहोचवायची कामगिरीही या वाहिन्यांनी करून टाकली. काही ज्योतिष पंडितांनी अमिताभच्या जन्माला येणाऱ्या नातवाची जन्मकुंडली बनवायला सुरुवात केली, तर काही संख्या ज्योतिषांनी, ऐश्वर्याचं बाळ कसं असेल, त्याचं भविष्य कसं असेल, हे ही सांगायचा सपाटा लावला. काहींनी तर ऐश्वर्याला जुळं होईल, असं भविष्यही वर्तवून टाकलं. अमिताभ बच्चन आजोबा होणार, यात त्यानं काही जग जिंकल्याचा पराक्रम केलेला नाही. चार वर्षांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकचा विवाह झाला.तो होण्यापूर्वी ती दोघं गळ्यात गळा घालून बनारसपासून अमेरिकेपर्यंत मुक्तपणे हिंडत होतीच. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा याच प्रसार माध्यमांनी तेव्हाही रंगवलेली होतीच.त्या आधी विश्वसुंदरी झालेल्या ऐश्वर्याची बिकीनीतली उन्मादक छायाचित्र जगभर झळकली होती. पुढं हिंदी चित्रपटात तिला भूमिका मिळाल्या. जगातली सुंदर स्त्री असा तिचा लौकिक झाला. प्रसिध्दीच्या झोतात राहायची सवय झालेल्या ऐश्वर्याला सलमान खाननं कसं चोपून काढलं, तिच्या मुंबईतल्या सदनिकेसमोर कसा धिंगाणा घातला होता, त्या सवंग बातम्याही वृत्तवाहिन्यांनी रंगवून रंगवून दिल्या होत्या. 31 वर्षाचा अभिषेक आणि त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याचा अखेर विवाह झाला आणि तिच्या लफड्यांची चर्चा हळूहळू कमी होत गेली. मग, ऐश्वर्याला मुल कसं होत नाही, ती एकटीच फ्रान्समधल्या "कान' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कशी गेली, मधुर भांडारकरच्या आगामी चित्रपटात ती अंग-प्रदर्शनाचं उघडं प्रदर्शन कसं करणार आहे, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात भांडणं कशी सुरु झाली? या बातम्या वृत्त आणि मनोरंजन वाहिन्यांनी द्यायचा सपाटा लावला. आता ती आई होणार, ही बातमी त्यांना जागतिक आश्चर्याची वाटते आहे. दारिद्र्यरेषेखालच्या चाळीस टक्के कुटुंबियांच्या बालकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. आदिवासींच्या बालकांचे कुपोषणानं अपमृत्यू होतात. झोपडपट्ट्यातल्या-श्रमिक-शेतमजूर-भटक्या समाजातल्या गर्भवती महिलांना योग्य आहार मिळत नाही. त्यांना भुकेल्या पोटी श्रम करावे लागतात. त्यांच्या प्रसुतीची नीट व्यवस्थाही होत नाही. या साऱ्या व्यथा-वेदना सोसत या माता आपल्या बाळांना अपार कष्ट करीत सांभाळतात, जीवापाड जपतात, मोठं करतात. त्या उद्याच्या मातांचा, त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या आनंदाची-व्यथांची दखलही या वृत्तवाहिन्यांना घ्यावीशी वाटत नाही.