Total Pageviews

Monday, 1 August 2011

POLICE CORRUPTION

बनावट नोटांप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास अटक

Story Summary: 
बनावट नोटांप्रकरणी संशयाच्या घेर्‍यात सापडलेला वास्को पोलीस स्थानकाचा उपनिरीक्षक वैभव नाईक यास अखेर काल या प्रकरणी तपास करत असलेले कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी अटक केली.
बागा येथे एका कॅसिनोत बनावट नोटा वापरण्यात आल्याच्या संशयावरून कळंगुट पोलिसांकडून तिघांना पकडण्यात आले होते. यांपैकी एकाने पोलिसांना दिलेल्या जबानीत उपनिरीक्षक नाईक यांनी आपणास तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले होते. यामुळे वैभव नाईक संशयाच्या घेर्‍यात सापडला होता.
त्यानंतर खात्यांतर्गत त्याची कसून चौकशी केली जात होती. यात त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे सापडल्यामुळे त्याला अटक झाल्याचे समजते.
दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी पुण्याहून आयबी या गुप्तचर संस्थेचे पथक गोव्यात तपासासाठी दाखल झाले होते.
याप्रकरणी हेमंत चोडणकर, सुदेश गौड आणि चिंतामणी यादव यांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. ते फिरत होते ती कारही जप्त केली आहे. चिंतामणी यादव याने दिलेल्या जबानीत म्हटले होते की, दि. २२ रोजी उपनिरीक्षक नाईक यांनी आपणास वास्को पोलीस स्थानकात बोलावून तीन लाख रु.च्या बनावट नोटा दिल्या होत्या. नंतर आपण हेमंत चोडणकर याला कॅसिनोत जाण्याबाबत विचारले व सोबत र्ेघेतले.
या आरोपींनी या बनावट नोटा गोव्यात एकूण सहा कॅसिनोंवर वटविल्याचा अंदाज आहे. ते या नोटा देऊन खेळण्यासाठी ‘कॉइन्स’ घ्यायचे व जिंकल्यानंतर ते ‘कॉइन्स’ परत करून खर्‍या नोटा घ्यायचे. अशाचप्रकारे बागा येथील एका कॅसिनोत ते गेले असता तिथे त्यांचा संशय आला व त्यांना पकडण्यात आले होते

No comments:

Post a Comment