रविवारी दिल्लीत काही महिलांनी लैंगिक छळाविरोधात 'बेशरमी मोर्चा' काढला त्याच्या तिसऱ्याच दिवशी सकाळी प्रशांत लह ाने नावाच्या तिशीतील तरुणाने आपल्या बहिणीच्या
च्या तिशीतील तरुणाने आपल्या बहिणीच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची कोणीही दाद घेत नसल्याने संतापून उल्हासनगर महापालिकेच्या इमारतीसमोर आत्मदहन केले.
अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने नोकरदार महिलांकरिता लैंगिक छळ विरोधातील कायद्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. गेल्यावषीर्च्या रुचिका गेहरोत्रा प्रकरणानंतर आता संगीता लहाने प्रकरणाने साऱ्यांना हलवून सोडले आहे. शिक्षणामुळे अनेक क्षेत्रांत पुढे गेलेल्या स्त्रियांना वासनांध शिकारी पुरुषांचा ससेमिरा सहन करावा लागतो आणि त्यातच त्यांची निम्मी ऊर्जा संपून जातेे, ही शरमेची गोष्ट आहे. प्रशांत लहानेची थोरली बहीण संगीता ही उल्हासनगर महापालिकेतील शिक्षण खात्याच्या सर्व शिक्षा अभियानातील अपंग विभागाची समन्वयक म्हणून काम करीत असताना या खात्याचे प्रशासकीय अधिकारी एस. बी. गायकवाड नावाचे गृहस्थ तिला त्रास देत होते.
या विरोधात संगीताने पालिका आयुक्त अशोक रणखांब व ठाणे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडेही लेखी तक्रार केली होती. परंतु अशा तक्रारी सहसा गंभीरपणे न घेण्याकडेच सरकारी-बिनसरकारी, खाजगी आस्थापनांत मोक्याच्या जागांवर बसलेल्या तथाकथित पुरुष वरिष्ठांचा कल असतो. त्यातून जिच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे ती व्यक्ती त्या आस्थापनेत महत्त्वाची असेल किंवा प्रभावशाली असेल तर त्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाते. संगीता लहानेची तक्रार अशीच बेदखल केली गेली. उलट गायकवाडने पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांना हाताशी धरून संगीताच्या विरोधातच भ्रष्टाचाराची प्रकरणे तयार केली व पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे कारस्थान केले.
ही कारवाई करण्याबाबत मात्र सर्व नगरसेवक व आयुक्त यांचे एकमत होते. यावरूनही व्यवस्था कुणाविरुद्ध व कुणासाठी राबत असते हे कळून येईल. अशा निष्ठूर व्यवस्थेशी झुंज घेताना संगीता थकून गेली आणि तिच्या भावाला स्वत:चा बळी द्यावा लागला. आता संबंधितांवर गुन्हे नोंदविले गेले असले तरी ह्या निर्लज्ज लोकांची सामाजिक अप्रतिष्ठा होणार नाही, तोवर अशा प्रकरणांमध्ये न्याय झाला असे मुळीच म्हणता येणार नाही

No comments:
Post a Comment