Total Pageviews

Monday, 10 February 2025

मराठा रेजिमेंटचा 258 वा स्थापना दिवस साजरा केला बुलढाणा शहरांमध्ये 10 f...

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक्स सर्विस मॅन संख्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे, यामुळे याआधी रेजिमेंटचा स्थापना दिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये कधीच साजरा झाला नव्हता

परंतु  वेळेस तिथल्या मराठी सैनिक नियोजन समितीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम नऊ तारखेला साजरा केला. अध्यक्ष होते कॅप्टन सिताराम सोनवणे ,7 मराठा, सुभेदार मेजर अशोक शेळके, सुभेदार प्रधान साहेब आणि इतर अनेक.

कार्यक्रमाचा खर्च पूर्णपणे क्राउंड फंडिंग द्वारे केला गेला.

भव्य सैनिक रॅली काढण्यात आली. मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. 9 तारखेला सुरुवातीला अनेक महापुरुषांच्या समाध्यांवर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि शेवटी बुलढाणा जिल्ह्यातील वार मेमोरियल वर कार्यक्रमाची सांगता झाली.

त्यानंतर कार्यक्रम  महात्मा फुले मंडळाच्या शाळेच्या मैदानावरती करण्यात आला

सुरुवातीला स्वागत गीत सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा व शहिदांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांनी आणि अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संघटना सध्या काय करत आहे याबाबतची माहिती आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेची वाटचाल कशी असेल याविषयीची माहिती देण्यात आली.

मी माझ्या पत्नीसह या कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा म्हणुन खास पुण्यावरुन गेलो होतो.

त्यानंतर मराठा स्फूर्ती गीत गाण्यात आले आणि कार्यक्रमाचा शेवट दुपारच्या सह भोजनाने झाला.कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.  हजर राहिलेल्या  एक्स सर्विसमेन ची सख्या 750  हून जास्त होती. 

कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आणि याकरता या भागातील मराठा रेजिमेंटच्या जेसीओ आणि जवानांचा हातभार महत्त्वाचा होता. 

येणाऱ्या काळात वर्षामधून महत्त्वाचे पाच दिवस हे सैनिक वार मेमोरियल वरती कार्यक्रम करण्याचे नियोजन करत आहे. हे दिवस म्हणजे विजय दिवस, कारगिल दिवस, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि आर्मी डे. 

मराठा रेजिमेंटचा 258 वा स्थापना दिवस बुलढाणा शहरांमध्ये साजरा करणे ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. यामुळे या भागातील लोकांना मराठा रेजिमेंटच्या इतिहासाची माहिती होईल आणि देशभक्तीची भावना जागृत होईल. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मराठी सैनिक नियोजन समितीचे अभिनंदन!यामुळे शहीदांच्या स्मरणार्थ आदराने कार्यक्रम साजरे केले जातील आणि लोकांना त्यांच्या बलिदानाची आठवण राहील.

कार्यक्रमाची युट्युब ची लिंक आपल्या माहिती करता पाठवत आहे.

No comments:

Post a Comment