Total Pageviews

Monday, 24 February 2025

विषय - बांगलादेशी घुसखोरांची समस्या-By ब्रिगेडियर हेमंत महाजन, 25 FEB 25. वेळ - सायंकाळी ७.०० ते ८.०० स्थळ - रोटरी हॅाल , शिक्षण महाविद्यालय , एस एन डी टी विद्यापीठ,PUNE

 

विषय - बांगलादेशी घुसखोरांची समस्या-By ब्रिगेडियर हेमंत महाजन, 25 FEB 25. वेळ - सायंकाळी ७.०० ते ८.००

स्थळ - रोटरी हॅाल , शिक्षण महाविद्यालय , एस एन डी टी विद्यापीठ

 

मा. ब्रिगेडियर हेमंत महाजन ,

     सस्नेह नमस्कार .

विषय - बांगलादेशी घुसखोरांची समस्या .

        स्नेह सेवा ही सेवाभावी व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे . समाजाविषयी आपुलकी स्नेह आणि त्यापायी समाजसेवा करण्यात आनंद मानणारी .

        लष्करी अधिकारी म्हणून आपण गाजवलेला अतुलनीय पराक्रम आणि सेवानिवृत्तीनंतरही आपण करत असलेल्या भरघोस कार्याचा परिचय आम्हाला आमचे ज्येष्ठ सभासद प्रा . रवींन्द्र कोठावदे यांनी करून दिला . बांगला देशी घुसखोरांचा उपद्रव बंगालपुरताच मर्यादित न राहता देशाच्या सर्व भागांत कमी अधिक प्रमाणात जाणवतो आहे , अगदी पुण्यातही तो जाणवू लागला आहे . आपला या विषयाचा सखोल अभ्यास असून आपण या विषयी विस्तृत लिखाणही केले आहे . या विषयीचे आपले विचार , अनुभव ऐकायला आमच्या सदस्यांना नक्कीच आवडेल . आमच्या सभासदांशी या विषयावर संवाद साधण्यासाठी आमच्या मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या सभेत सहभागी होण्यासाठी आपणास हे विशेष निमंत्रण . आपला विषय मांडायला आपल्याला ४०/४५ मिनिटांचा कालावधी उपलब्ध असेल . आपल्याबरोबर आपले परिचित येणार असल्यास त्यांचेही स्वागतच आहे .

वेळ - सायंकाळी ७.०० ते ८.००

स्थळ - रोटरी हॅाल , शिक्षण महाविद्यालय , एस एन डी टी विद्यापीठ

    धन्यवाद

डॅा राधा संगमनेरकर , अध्यक्ष

2

सर्व स्नेही जनांना सस्नेह नमस्कार

विषय - बांगला देशी घुसखोरांची समस्या

      बांगला देशी घुसखोर , रोहिंग्या यांचा उपद्रव केवळ पूर्वोत्तर राज्यांपुरता मर्यादित राहिला नसून सर्व देशभर त्यांचा मुक्त संचार झाला आहे . फुटकळ चोऱ्यांपासून ते दंगल , जाळपोळ यासारख्या समाजविघातक गुन्ह्यांमधे त्यांचा सहभाग आढळतो . आपल्या पुण्यातही त्यांच्या वस्त्या आढळल्या आहेत . एकूण या समस्येचे स्वरूप आणि त्यावर उपाय तरी काय हे प्रश्न आपल्याला भेडसावतात . याविषयी सविस्तर विवेचन करण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या सभेत सहभागी होणार आहेत . आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या या प्रश्नावरील चर्चा आपल्या सर्वांना निश्चितच आवडेल . म्हणून सर्व सभासदांनी अवश्य उपस्थित रहावे .

वेळ - सायंकाळी ७.०० ते ८.००

स्थळ - रोटरी हॅाल , शिक्षण महाविद्यालय , एस एन डी टी विद्यापीठ

    धन्यवाद

नीला सरपोतदार , सचीव .

No comments:

Post a Comment