मावळच्या शेतकर्यांच्या मागण्यांवर राहुल गांधी काहीच का बोलले नाहीत? ‘गोळीबार का केला म्हणून’ मुख्यमंत्र्यांना का नाही खडसावले?
सापडले एकदाचे!
ऐका होऽऽ ऐका... हरवलेले राहुल गांधी सापडले आहेत. महाराष्ट्रातील कॉंग्रेजी सरकारने मावळ खोर्यातील तीन शेतकर्यांचे हत्याकांड केल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी युवराज राहुल गुरुवारी सकाळी अचानक मावळ खोर्यात अवतरले. कॉंग्रेसची सत्ता नसलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकर्यांसाठी चमकोगिरी करून मगरीचे अश्रू ढाळणारे राहुल गांधी पवना-मावळच्या शेतकर्यांसाठी तीन आसवे का सांडत नाहीत, असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकर्यांना पडला होता. मराठी मुलखातील शेतकर्यांच्या मनातील हीच वेदना आम्ही ‘सामना’तून मांडली. राहुल गांधी ‘हरवले आहेत’ अशी जाहिरातच आम्ही ‘सामना’तून प्रसिद्ध केली. त्याचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. मायावतींच्या राज्यात प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या म्हणून याच राहुल गांधींनी केवढा गळा काढला होता. तेथील शेतकर्यांना मायावती सरकारविरुद्ध चिथावणी देण्यासाठी या महाशयांनी शेतकर्यांच्या ‘महापंचायती’ही भरवल्या; पण कॉंग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांवर मायावती सरकारपेक्षाही भयंकर अत्याचार झाले तेव्हा मात्र कॉंग्रेसचे हे युवराज दडी मारून बसले. हरवले म्हणा किंवा बिळात लपून बसले म्हणा, पण त्यांना शोधून काढण्यासाठीच आम्ही आमच्या ‘ठाकरी’ शैलीत राहुल हरवल्याची जाहिरात केली. त्याचे ‘वर्णन’ छापले. त्याच्या ‘सवयी’ लिहिल्या. महाराष्ट्रातील शेतकरी राहुल गांधींना कसे शोधत आहेत तेही त्यात सांगितले. राहुल गांधी हरवल्याची ही ‘जाहिरात’ देशभरातील प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. मावळमध्ये कॉंग्रेजी सरकारने शेतकर्यांचे खून पाडून नऊ दिवस उलटले तरी राहुल गांधी सापडत नव्हते. मात्र परवा
15 ऑगस्टला कॉंग्रेसच्या मुख्यालयात झेंडावंदन करताना काही लोकांनी त्यांना पाहिले अशी बातमी होती. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातील त्यांच्या कॉंग्रेजी पित्त्यांनी लोकलज्जेस्तव का होईना, पण या कॉंग्रेजी युवराजांना मावळच्या खोर्यात शेतकर्यांच्या सांत्वनासाठी आणले असावे. अर्थात ‘हूल’ देण्यात पटाईत असलेल्या ‘राहुल’ने यावेळीही सर्व यंत्रणांना चकमा देत हा दौरा ‘गुपचूप’च केला. सडवली, येळशी आदी गावांना भेट देऊन गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले, त्यांचे दु:ख वगैरे समजून घेतले असे आता सांगितले जात आहे. म्हणजे कॉंग्रेसच्याच सरकारने बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून शेतकर्यांचे मुडदे पाडायचे आणि कॉंग्रेसच्याच युवराजाने ‘फार लागले का तुला?’ अशी फुंकर घालायची! हा भंपकपणा आहे. हे ढोंग आहे. शेतकर्यांबद्दल खरोखरच एवढा कळवळा असेल आणि त्यांचे दु:ख समजले असेल तर ‘गोळीबार का केला म्हणून’ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का नाही खडसावले? विरोधी सरकारविरुद्ध तुमची जीभ जशी चरचर चालते तशी कॉंग्रेजी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल का नाही रेटत? राहुल गांधी पोलीस गोळीबारातील मृतांच्या नातेवाईकांना भेटले, पण गोळीबारातील जखमींची भेट घ्यायला मात्र गेले नाहीत. तळेगावच्या रुग्णालयात उपचार घेणारे जखमी त्यांची वाट बघत होते, पण इथेही त्यांनी ‘हूल’च दिली. रुग्णालयात गेले असते तरच जखमींची अवस्था बघून आपल्या सरकारने कसे राक्षसी क्रौर्य केले याची कल्पना त्यांना आली असती. कॉंग्रेसच्या चाणक्यांना याचा अंदाज असणार म्हणूनच तळेगावची भेट ऐनवेळी रद्द केली गेली असावी. तिकडे दिल्लीत अण्णा हजारेंनी कॉंग्रेसला ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. मीडियाने अण्णा हजारेंना डोक्यावर घेतल्याने कॉंग्रेजी मंडळींना राजधानीत तोंड लपवून फिरण्याची वेळ आली आहे. मीडियाचे अण्णा हजारेंवरील लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी राहुलबाबाने मावळचा दौरा ‘प्लॅन’ केला असू शकतो. खरे-खोटे त्यांनाच माहीत; पण मावळच्या शेतकर्यांनी केलेल्या मागण्यांवर राहुल गांधी काहीच का बोलले नाहीत? मावळ खोर्यातील शेतकर्यांच्या मुळावर उठलेला बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा, गोळीबाराचे आदेश देणार्यांवर गुन्हे दाखल करा,
40 वर्षांपासून रखडलेले धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा या मागण्यांचे पुटकुळे घेऊनच कॉंग्रेसच्या युवराजांचे विमान दिल्लीला उडाले. जेवढ्या गुपचूप ते आले तेवढ्याच गुपचूप परत गेले. राहुल गांधी ‘हरवले’ होते; मावळ गोळीबारकांडानंतर नऊ दिवसांनी का होईना ते सापडले! काही काळ तेथे हिंडल्या-फिरल्यानंतर ते परत ‘हरवले!’ मावळ खोर्यातील शेतकर्यांचे दु:ख मात्र कायम आहे. त्यांच्यासाठी एखादा ‘अण्णा हजारे’ लढेल काय

No comments:
Post a Comment