दिल्ली डायरीउष:काल होता होता...
आपल्या देशाला गणतंत्र म्हणून मोठ्या अभिमानाने संबोधले जाते. मात्र 65 वर्षांच्या इतिहासात या गणतंत्रामधील गण म्हणजे जनता व तंत्र म्हणजे व्यवस्था (सिस्टीम) ही पूर्णत: वेगळी झाली आहे. त्यामुळे सध्याचा झगडा हा जनतेचा व्यवस्थेविरुद्धचा झगडा आहे. आज गणतंत्र घोटाळातंत्र झाले आहे. या गण व तंत्रामध्ये वारंवार संघर्षाची ठिणगी पडत आहे.
देशाचा 65 वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा झाला. सरकारी सोपस्कारानुसार पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधणारे भाषणही झाले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर सलग आठव्यांदा ध्वजारोहण करण्याचा बहुमान कोणतीही निवडणूक न लढविणार्या मनमोहन सिंगांना मिळाला. मात्र त्यामुळे सामान्य माणसाच्या पदरी काय पडले, असा प्रश्न निर्माण होतो. दारिद्य, उपासमार, शिक्षण, आरोग्य, महागाई, भष्टाचार हे प्रश्न जसेच्या तसे आ वासून उभे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे यंदाचे भाषणही देशात दररोज उपाशीपोटी झोपणार्या गरिबाच्या नशिबी उष:काल आणणार नाहीत व त्यामुळे त्याच्या पोटात दोन घासही पडणार नाहीत. त्यामुळे उष:कालाची उज्ज्वल संधी असतानाही, नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे त्याची काळरात्र होण्याच्या दिशेने देशाची दुर्दैवी वाटचाल सुरू आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.
देशाचा सध्या ढोल झाला आहे. ‘कोणीही या ढोल वाजवून जा,’ अशी स्थिती निर्माण झाली आहे व या ढोल वाजविण्यातच आपला उष:काल असल्याची खात्री संबंधितांना झाली आहे. पंतप्रधानांना आपण पुढील वर्षीही स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करू, असा उष:काल मनात आहे. एकदा का लोकपाल विधेयक मंजूर झाले की, पोटापाण्यासह सर्वच प्रकारचे प्रश्न सुटतील, देशात रामराज्य येईल, असा उष:काल अण्णा हजारे जागवत आहेत. राहुल गांधी लवकरच पंतप्रधानापदाचा मुकुट परिधान करतील, या उष:कालावर कॉंगे्रसवाले आपले मांडे खात आहेत. एरव्ही मतदानाच्या दिवशी पिकनीक केली तरी, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात व दहशतवादविरोधी आंदोलनात मेणबत्त्या पेटवल्याने या मेणबत्त्यांच्या ‘दिव्य’ तेजाने उष:काल होईल, असा मेणबत्तीवाल्या सोशल नेटवर्किंग पिढीचा बाणा आहे. जो तो देशाचा ढोल वाजवून आपला उष:काल कशात आहे, याचा ध्यास घेऊन उभा आहे.
आपल्या देशाला गणतंत्र म्हणून मोठ्या अभिमानाने संबोधले जाते. मात्र 65 वर्षाच्या इतिहासात या गणतंत्रामधील गण म्हणजे जनता व तंत्र म्हणजे व्यवस्था (सिस्टीम) ही पूर्णत: वेगळी झाली आहे. त्यामुळे सध्याचा झगडा हा जनतेचा व्यवस्थेविरुद्धचा झगडा आहे. आज गणतंत्र घोटाळातंत्र झाले आहे. या गण व तंत्रामध्ये वारंवार संघर्षाची ठिणगी पडत आहे. देशाला महासत्ता बनवू, भ्रष्टाचार कमी करू, देशाला विकासाच्या रस्त्यावर नेऊ, असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून म्हणणे म्हणजे आता मोठा विनोद मानला जाऊ लागला आहे. भ्रष्टाचार, महागाई, घोटाळे, महागडे शिक्षण यामुळे आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीमुळे गण (जनता) आक्रोश करीत आहे व तंत्र त्यावर अधिकच आकमक पवित्र्याने तुटून पडत आहे. देशाचे हे चित्र आहे.
इंदिरा गांधी यांनी याच लाल किल्ल्यावरून ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. मात्र आज देशातील गरीबांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे ‘गरिबी हटाव’ या घोषणेचे काय झाले व त्यामुळे गरिबी कुणाची हटली, हा विषय संशोधनाचा ठरावा. लालबहादूर शास्त्रींसारख्या सचोटीच्या पंतप्रधानाने ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. दुर्दैवाने आज शेतकर्यांइतकी वाईट अवस्था देशातील कोणत्याही समाजघटकाची नाही. या पार्श्वभूमीवर पंतपधान मनमोहन सिंगाच्या विक्रमी आठव्या भाषणाने देशाच्या नवनिर्माणाचे तांबडे लाल किल्ल्याच्या दिशेने फुटण्याची सुतराम शक्यता नाही. उलट पहिल्यांदाच मनमोहन सिंगांनी आपल्या भाषणात ‘भ्रष्टाचार’ या शब्दाचा उल्लेख करून त्याला जणू शिष्टाचाराचीच भरजरी वस्त्रे नेसवली, असे म्हणावे लागेल. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्या एका कायद्याने या देशातील भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट होऊ शकणार नाही, अशी थेट कबुलीच देशाला दिली. माझ्या हातात काही जादूची छडी नाही, असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. मनमोहन सिंग म्हणतात त्याप्रमाणे कायद्याने भ्रष्टाचाराचा प्रश्न निकाली निघणार नसला तरी, त्यासाठी एवढी हतबल भूमिका जाहीर करून पंतप्रधानांनी आपल्या असहाय्यतेचेच दर्शन घडविले.
स्वातंत्र्योत्तर काळातील दिवस भारलेले होते. त्यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला कोणता संदेश देतात याकडे देशातील आबालवृद्धाचे कान लागलेले असायचे. इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल नेटवर्किंगचा ‘चिवचिवाट’ नसतानाही संपूर्ण देश आपला नेता कोणती मार्गदर्शक दिशा दाखवतो याकडे डोळे लावून असायचा. मात्र आता पंतप्रधानांचे भाषण ही केवळ औपचारिकता राहिली आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आहुती दिल्यानंतर 15 आगस्ट 1947 रोजी दीडशे वर्षांची जुलमी ब्रिटिश सत्ता उलथवणार्या हिंदुस्थानला उष:कालाने खुणावले होते. मात्र उष:कालाच्या तेजामध्ये जनसामान्यांचे प्रश्न फिके पडल्याने हा उष:कालही कालांतराने काळवंडला. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा अजूनही कायमच आहेत. सामान्यांचे प्रश्न तसेच धूळ खात पडून आहेत. गणतंत्रामधील गणाची, म्हणजे जनतेची ताकद, तंत्राला म्हणजे व्यवस्थेला दाखवून देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. देशात कितीही प्रबळ कायदा केला तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर रोखता येणार नाही. कारण तो आता हिंदुस्थानच्या व्यवस्थेरूपी धमन्यांमध्ये खेळत आहे. त्यामुळे कायदा हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. भ्रष्टाचार रोखायचा तर भ्रष्टांना सत्तेवरून खाली खेचणे व व्यवस्थेत बदल करणे, हेच त्यावरचे उत्तर असेल. त्यासाठी मतदानासारखे मोठे शस्त्र सामान्य माणसाच्या हाती आहे. भ्रष्ट व सत्तांध झालेल्या हिरण्यकश्यपूरूपी व्यवस्थेला व सत्ताधार्यांचा नि:पात करण्यासाठी सामान्य माणसाने नृसिंहाचे रूप धारण करण्याची आवश्यकता आहे. मतदानाला दांडी मारून हॉलिडे साजरा करणारी जनरेशन नेक्स्ट, एरव्ही पश्चात्तापाच्या भावनेने मेणबत्त्या पेटविण्याऐवजी ‘नृसिंहा’सारखी गर्जना करून ‘हिरण्यकश्यपू’ला कापरे भरवेल काय

No comments:
Post a Comment