वस्तानवी यांना सुधारणावादी कसे मानता येईल? जहीर अली नरेंद्र
प्रतिक्रिया जहीर अलींनी त्याची अगतिकताच दाखविली, वस्तान्वी सुधारणावादी आहेत कि नाहीत हे कोणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. त्यांना हटविण्याच्या खरया कारणाचा शोध अलींनी जनतेसमोर मांडला असता तर बरे झाले असते. २००२ पासून मोदीवर ज्या दंगलीचा ठपका ठेवला जातो त्याची सुरुवात कशी झाली हे का विसरले जाते. सुरुवात झाली नसती तर शेवट पण असा झाला नसता. दंगली आणि विकास हे वेगळे विषय आहेत. आणि इतिहास उगलायाचा असेल तर बात बहोत दूर तलक जायेगी. गुजरात मध्ये खरच विकास झाला आणि त्याचा मुस्लिमांना देखील फायदा झाला हे मान्यच करा सकाळ नि फालतू लेख छापू नयेत हे बरे वास्तनावी हे सुधारणावादी आहेत की नाही हा प्रश्न कुणाला पडला होता बुवा? मग तो प्रश्न आपल्या तर्कविसंगत लेखातून अलीसाहेब का मांडतायत? मोदींच्या कामाची स्तुती देवबंदच्या सनातनीना खपली नाही हा खरा मुद्दा आहे. देवबंदच्या सनातनींचे राजकारण अलीसाहेबांना दिसत नाही का? वास्तनावी सुधारणावादी नाहीत, साराभाई धर्मनिरपेक्ष आहेत व अलीसाहेब सुधारणावादी आहेत (तळ टिपेत तसे लिहिले आहे) अशी एकमेकांना Certificates देवून काय सिद्ध होते बरे ? नील, झोपलेल्याला जाग करता येत. पण झोपेच सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. तसच तुझ आहे. जरा इंटरनेटवर सर्च कर व गुजरातच्या विकासाचे आकडे सरकारी वेब साईतवर बघ. पुरोगामीपणाचा शेंदूर फसलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दगड-धोंड्यांना निवडून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेपेक्षा गुजरातची जनता व्यावहारिक आहे. मुसाल्मानावारच्या कथित अत्याचाराचे भांडवल करून सत्तेचा गुजरातमध्ये सोपान न चढता आल्यामुळे काँग्रेसी कावळ्यांची गुजरातचा विकास खोटा ठरविण्याची हि नवीन चाल आहे. वैभव देशपांडे अभीनंदन तू सुंदर दाखला दिलास नील डोळे उघडे ठेऊन वाच जरा आणि नको ते बरळू नकोस शी सहमत आहे. मोदींच्या गुजरात पेक्षा महाराष्ट्र आंध्र कर्नाटक विकासाच्या बाबत खूपच पुढे आहेत . मोडी फक्त टिमकी वाजवण्यात पुढे आहेत .. ahemdabad पेक्षा पुणे खूपच पुढे आहे पण इथले राज्यकर्ते जाहिरात्बाजीमध्ये मध्ये कमी पडतात . गुजरात ला नुकताच जाऊन आलो असल्याने हे निरीक्षण नोदावले आहे . मल्लिका साराभाई हि कॉंग्रेस च्या जवळ आहे. त्याबरोबरच तिचे पूर्वायुष्य हे समाजाने आदर्श म्हणून बघावे असे नक्कीच नाही. अशा व्यक्तीचा मताचा दाखला स्वताच्या सोयीसाठी सुद्धा देवू नये. वैभव बरोबर बोलले . मल्लिका साराभाई कॉंग्रेस च्या पाठींब्याने अडवाणींच्या विरोधात उभ्या होत्या. दुसरे म्हणजे केंद्र सरकार रिपोर्ट देत आहे कि गुजरात मध्ये मुस्लीम ज्यास्त शिकलेले आणि चांगले कमवत आहेत. लेखक कोणत्या चास्म्यातून पाहत आहेत माहित नाही पण आज देशच की जग पण ज्या मोदींना विकास पुरुष म्हणून ओळखते, ८० पेक्ष्या ज्यास्त देशांना जेथे गुंतवणूक करावीशी वाटते.त्यांची स्तुती म्हणजे चूक कशी? देश्याच्या कृषी दरापेक्ष्या ज्यास्त क्रीशिविकास दर आहे, देशातील १/४ गुंतवणूक मोदी गुजरात मध्ये आणतात बाळा नाडकर्णी (balanad27@hotmail.com)हिंदूंचा काफीर म्हणून कुराणात नक्की कुठे उल्लेख आहे? तो नसल्यास हिंदूंना काफीर कोणी ठरवलं? लेखकाने या प्रश्नाचा अवश्य शोध घ्यावा. मात्र इस्लाममध्ये सुधारणा घडवणं हे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखं आहे. असो. nil, मोदींना खोटे विकासपुरुष म्हणून रंगवलं जातंय तर गुजराती लोक निवडून का देतात मोदींना? गुजराती जनता मूर्ख आहे असं सुचवायचं आहे का तुम्हाला? तसं असलं तर महाराष्ट्रीय जनता शतमूर्ख म्हणायला पाहिजे. कारण २६/११ होऊनही आबा पाटील अजूनही गृहमंत्री आहे. झहीर साहेब, एखादा मुद्दा पेटत कसा ठेवायचा हे तुमच्या सारख्यांकडून शिकावे. वास्तनावी यांचा हेतू व्यावहारिक होता कि नाही तो मुद्दा वेगळा, पण कमीत कमी त्यांनी मुस्लिमांना दंगलीच्या आठवणी विसरून जाण्याचा सल्ला दिला होता आणि ते फार गरजेचे आहे! बाकी तुमचा देवबंद चा अभ्यासक्रम सुधारण्याचा मुद्दा पटला. मोन्दिनी २००२ मध्ये गुजराथ मध्ये मुस्लीम समाजाला किती वाचवलं हे सर्वश्रुत आहेच, आता धर्माच्या नावावर राजकारण म्हणव तितका फायदा देवू शकत नाही हे लक्षात आल्यावर (मागच्या दोन लोकसभा) मोदींना विकास पुरुष म्हणून खोटच प्रोजेक्ट केला जात आहे गुजराथच्या कुठल्याही शहरापेक्षा पुणे, मुंबई, बंगलोर, चेन्नई, दिल्ळी ही शहर दहा पटींनी पुढे आहेत विकासाचा बाबाबित, गुजराथला आय टी देखील नाही, महाराष्ट्र ऑटो हब आहे, पुणे बंगलोर आय टी हब आहेत पण तिथल्या राजकारण्यांनी कधीच टिमकी वाजवली नाही. हाच मापदंड जर लावला तर कोणीही कॉंग्रेस ची स्तुती केली तर त्याला बहिष्कृत करावे लागेल कारण दिल्लीतील १९८४ च्या शीख विरोधी दंगली मध्ये कॉंग्रेस चा सक्रीय सहभाग होता. तसेच काश्मिरी पंडित विस्थापित छावण्यांमध्ये कित्येक वर्षे जीवन जगात आहेत त्याचा अहवाल तुमच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष साराभाई बाईनी कधी प्रकाशित केलेला ऐकिवात नाही. त्यामुळे त्या धर्म निरपेक्ष आहेत हेच खोटा आहे त्यामुळे त्यांचा अहवाल खरा कसा असणार? तुम्ही सगळे चोर आहात आणि तोच देशापुढील मोठा धोका आहे. मोदिन्साराखेच ह्या देशाला वाचवतील.
On 03/08/2011 05:40 AM Vaibhav Deshpande said:
On 03/08/2011 12:51 PM nil said:
On 03/08/2011 01:41 PM Prafulla Nikam said: said:
On 03/08/2011 02:28 PM
On 03/08/2011 03:27 PM Pallavi said:
On 03/08/2011 03:53 PM sachin said:
me nil chya comment
On 03/08/2011 03:40 PM Sunil said:
On 03/08/2011 04:12 PM The Done said:
On 03/08/2011 05:00 PM Prasanna Jawalkare said:
On 03/08/2011 05:02 PM moharir said:
On 03/08/2011 06:31 PM Ek Hindu said:
On 03/08/2011 07:10 PM Nitin said: मोदी यांची केलेली स्तुती ही वस्तानवी यांच्या व्यावहारिक डावपेचाचा भाग म्हणावी लागेल. व्यावसायिक खेळी म्हणून तसे करणे योग्य असेल; पण अशा माणसाला सुधारणावादी म्हणता येणार नाही.
गुलाम महंमद वस्तानवी यांची "दारुल उलूम देवबंद'च्या कुलगुरू पदावरून झालेली हकालपट्टी ही प्रतिगामी कृती असल्याचे सर्वसाधारण मत माध्यमांमधून व्यक्त झाले. वस्तानवी हे सुधारणावादी असून, ते पदावर राहिले असते तर त्यांनी मुल्ला आणि मौलवींच्या दृष्टिकोनात परिवर्तन घडवून आणले असते, असे चित्र त्यातून निर्माण झाले. विकासकामांबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे वस्तानवी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे सांगितले जाते. राज्यात 2001 मध्ये मुस्लिमांविरोधात झालेल्या दंगलींचा काथ्याकूट करणे मुस्लिमांनी थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिल्याचे वृत्त आहे. मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणांचा लाभ गुजरातमधील इतर समाजांप्रमाणे मुस्लिम समाजासही झाला, असे अत्यंत वादग्रस्त निरीक्षण वस्तानवी यांनी त्यांच्या भाषणात नोंदविले. मोदींची भलावण करणारे त्यांचे वक्तव्य अवेळी केलेले, पूर्वग्रहदूषित आणि वस्तुस्थितीला सोडून आहे. त्यावर मुस्लिम समाजातून तर टीका झालीच; पण मल्लिका साराभाई यांच्यासारख्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्तीनेही त्यांच्यावर ताशेरे ओढले. गुजरातचा कथित विकास हा सदोष आकडेवारीआधारे रचलेला बनाव असल्याचे साराभाई यांनी म्हटले आहे. दंगलीची झळ बसलेले गुजरातमधील मुस्लिम मदत छावण्यांमध्ये खितपत पडले असल्याचे तटस्थ निरीक्षकांनी नमूद केले आहे.
दारुल उलूम देवबंदच्या कुलगुरू पदाची सूत्रे घेतल्यानंतर वस्तानवी यांनी केलेल्या वक्तव्यावर या देवबंदमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. आंदोलनेही झाली होती. उच्चपदस्थांना धक्काबुक्कीचे प्रकारही घडले होते. वस्तानवी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येऊन कुलगुरू पदावरून त्यांना निलंबित करण्यात आले. मौलाना अबुल कासीम नोमानी यांची त्यांच्या जागी कुलगुरू म्हणून गेल्या वर्षी जानेवारीत नेमणूक करण्यात आली. "चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मी स्वतःहून राजीनामा देईन, मग अहवालाचा तपशील काही का असेना' असे वस्तानवी यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तेव्हा जाहीर केले होते. चौकशी अहवालावर देवबंदच्या "मजलीस ए शुरा' या कार्यकारिणीने 23 जुलै रोजी चर्चा करून वस्तानवी यांना त्यांच्या राजीनाम्याबाबतच्या घोषणेची आठवण करून दिली. चौकशी अहवाल अपूर्ण असून, त्यात कारवाई करण्याची शिफारस केली नसल्याचे कारण देऊन त्यांनी राजीनाम्यास नकार दिला. चौकशी अहवाल वस्तुस्थिती स्पष्ट करणारा असून, त्यात कोणतेच निष्कर्ष काढण्यात आलेले नाहीत. यामुळे चौकशी समितीच्या तीन सदस्यांनी वस्तानवी यांना दोषी ठरविले नाही, या त्यांच्या समर्थकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याला अर्थ नाही. कारण अहवालात वस्तानवी यांनी राजीनाम्यास नकार दिल्याने "मजलीस ए शुरा'पुढे मतदान घेऊन कारवाई करण्यावाचून पर्यायच उरला नाही. मजलीसने बहुमताने नोमानी यांना देवबंदचे कुलगुरू करण्याचा निर्णय घेतला.
देवबंदमधील घडामोडींमागे निश्चितपणे राजकारण आहे. वस्तानवी यांनी कुलगुरू झाल्यानंतर उचललेली पावले आणि केलेली वक्तव्ये, त्यावर त्यांच्या समर्थक आणि विरोधकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, मदानी कुटुंबातील वैमनस्य, मजलीसचे सदस्य आसामचे बद्रुद्दीन अजमल यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी वस्तानवी यांना दिलेला पाठिंबा यामागे राजकीय हिशेब आहेत. अजमल हे कॉंग्रेसविरोधक मानले जातात. या पार्श्वभूमीवर देवबंदमधील वाद म्हणजे कर्मठ मुल्ला-मौलवी आणि सुधारणावादी वस्तानवी समर्थक यांच्यातील संघर्ष असल्याचे चित्र रंगविणे चुकीचे आहे. मात्र, माध्यमांमध्ये तसे ते रंगविले गेले. गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे 200 शिक्षण संस्था वस्तानवी यांच्यातर्फे चालविल्या जातात. वस्तानवी हे "एमबीए' असल्याने ते या संस्था एखाद्या उद्योगपतीसारख्या चालवितात. या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात-1) शिक्षण संस्था चालविल्याने एखादा मुल्ला इस्लामचा सुधारणावादी चेहरा ठरतो का? 2) देवबंदचा अभ्यासक्रम बदलून त्यातील जहाल, कर्मठ बाबींचा तपशील आपण वगळू असे वस्तानवी यांनी कधी जाहीर केले होते का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच आहेत. वस्तानवी यांचे वर्तन कायम एखाद्या उद्योगपतीसारखे राहिले आहे. त्यांचे गुजरातमधील शैक्षणिक हितसंबंध लक्षात घेता, त्यांनी मोदी यांची केलेली स्तुती ही त्यांच्या व्यावहारिक डावपेचाचा भाग म्हणावी लागेल. मोदींच्या मर्जीत राहण्याचा त्यांचा उद्देश त्यातून स्पष्ट होतो. व्यावसायिक खेळी म्हणून असे करणे योग्य असले तरी असा माणूस सुधारणावादी मानता येणार नाही.
इस्लाममध्ये सुधारणा घडवायच्या असतील तर देवबंदमधील शिक्षणाचाच फेरविचार केला पाहिजे. आपला देश धर्मनिरपेक्ष असल्याने सरकारने तेथील अभ्यासक्रमाची छाननी केली पाहिजे. शरियत, फिकाह यासारखे वादग्रस्त मुद्दे अभ्यासक्रमातून वगळल्याशिवाय इस्लाममध्ये सुधारणा होणार नाहीत. देवबंदमध्ये शिकविली जाणारी तत्त्वे मुस्लिमांमधील सर्व पंथांना मान्य आहेत, असे नाही. ती इस्लामची आधारभूत तत्त्वे नव्हेत. या पार्श्वभूमीवर वस्तानवी यांना सुधारणावादी म्हणता येणार नाही
Wednesday, August 03, 2011 AT 02:00 AM (IST)

No comments:
Post a Comment