हेच ते मुंबईला खड्ड्यात घालणारे
पावसाच्या तडाख्यात रस्ते उखडल्याने मुंबईकरांचे कंबरडे मोडले असताना गेल्या चार वर्षात मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई पालिकेने तब्बल २२२ कोटी रुपये खर्च केल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे खड्डे भरले जातात की कंत्राटदारांचे खिसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईत कुलाब्यापासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतचे रस्ते पावसाच्या तडाख्याने उखडून निघाले आहे. आधीच मोनो व मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच रस्त्यांत जागोजागी खड्डे पडल्याने मुंबईची दुरवस्था झाली आहे. अंधेरीच्या पूवेर्कडील रस्ते, कुरार व्हिलेज, दफ्तरी रोड कुर्ला, एलबीएस रोड आदी भागात सर्वत्र खड्डे आहेत.
खड्ड्यांच्या विषयावरून विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मंगळवारी प्रशासनाला धारेवर धरले. माहीम, धारावी, वांदे, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, विक्रोळी, विलेपालेर् भागांत सर्वत्र खड्डे पडल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे समीर देसाई यांनी गेल्या चार वर्षात खड्डे बुजवण्यावर सुमारे २२२ कोटी रुपये खर्च केल्याची आकडेवारी सभागृहात सादर केली. एवढी रक्कम खर्च करून खड्डे भरतात की कंत्राटदारांचे खिसे भरतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी रवींद वायकर, वकारुन्नीसा अन्सारी भास्कर खुरसुंगे, रुपाली पावसकर, मोहन लोकेगावकर यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधले.आज जवळपास सारी मुंबई खड्ड्यात गेली असताना, हे ' महान ' रस्ते बनवणारे कॉन्ट्रॅक्टर मात्र कोट्वधींची मलई खाऊन गप्प आहेत. त्यातील पहिल्या पाच कॉन्ट्रॅक्टरची यादी पाहिली की, कधीकाळी साधी कारकुनी करणारे राजकीय वरदहस्तामुळे गब्बर झाले आहेत, हे स्पष्ट होत आहे.
मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली असली तरी प्रशासन मात्र ढिम्म आहे. या खड्ड्यांवर जरा कुठे बोंब झाली की लगेच त्यावर तात्पुरता भराव घालून मलमपट्टी करण्याखेरीज काहीही होत नाही. पण हे रस्ते बनवणारे मूळ काँन्ट्रॅक्टर कोण याचा शोध घेतला की धक्कादायक माहिती सामोरी येते.
शहरातील रस्यांची जबाबदारी असणा-या पहिल्या पाच कंपन्यांपैकी दोन कंपन्या पीडब्लूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग) विभागातील कारकुनी करणा-यांच्या आहेत. तर एक महापालिकेत ज्युनिअर इंजिनिअर असणा-याची आहे. तर उरलेल्या कंपन्याही महापालिकेच्या कृपाप्रसादावर मोठे झालेल्यांच्याच आहेत.
त्याचप्रमाणे या कंपन्यांच्या मालकांची नावे काहीही असली तरी त्यामागे असलेलील राजकीय हातही स्पष्ट होतो. यातील प्रत्येक कंपनीच्या डोक्यावर एक राजकीय नेतृत्त्व असून, या राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या भ्रष्टयुतीचा त्रास सा-या मुंबईकरांना भोगावा लागत आहे.
सामान्य करदात्यांच्या जीवावर ही कोट्यवधींची उधळण सुरू असून, त्यांच्या तक्रारींना कोणीही विचारत नसल्याचे चित्र दिसत आहे. एवढेच नाही तर आता जो भराव घालण्याची बिनकामाची मलमपट्टी सुरू आहे, त्यासाठीसुद्धा पुन्हा अशाच जुन्या कॉन्ट्रॅक्टर्सना पुन्हा सांगण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे.
मुबंईच्या पहिल्या पाच कॉन्ट्रक्टर्सची माहिती अशी...
१. आरपीएस लिमिटेड : पीडब्लूडीमध्ये क्लार्क असलेल्या आर. पी. शाह यांची सुरू केलेली ही कंपनी सध्ये नितीन आणि केतन ही त्यांची मुले चालवतात. वार्षिक २०० कोटींची उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या डोक्यावर एका वादग्रस्त काँग्रेस नेत्याचा हात असल्याचे दिसते आहे.
२. रेलकॉन : पीडब्लूडीमध्येच क्लार्क असलेल्या पी. सी. शाह यांनी सुरू केलेली ही कंपनी सध्या त्यांची चार मुले (तेजस, राकेश, जयेश आणि दीपक) चालवतात. या कंपनीची उलाढाल वार्षिक उलाढाल साधारणतः ३०० कोटींची आहे. इन्कम टॅक्स आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या रडारवर असलेल्या एका काँग्रेस नेत्यांशी या कंपनीचे जवळचे संबंध असल्याचे कळते आहे.
३. प्रकाश इंजिनिअर्स : नंद बिजलानी या महापालिकेत ज्युनिअर इंजिनिअर पदावर असणा-याने ही कंपनी सुरू केली आहे. तिची साधारणतः ७० ते १०० कोटींची उलाढाल आहे.
४. महावीर आणि कंपनी : महापालिकेला कच्चा माल पुरवणा-या जितेंद्र केकावत यांची ही कंपनी त्यांचे पंकज आणि अमित हे दोन भाऊ चालवतात. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले मोठे नाव या कंपनीच्या पाठीमागे असल्याचे कळते आहे. या कपनीची साधारणतः २५० कोटींची उलाढाल आहे.
५. शांतीनाथ रोडवेज : महापालेकेचेच जुने कॉन्ट्रॅक्टर असणारे शांतीलाल शाह यांची ही कंपनी सध्या त्यांची मुले आश्विन आणि हर्षद चालवतात. साधारणतः १०० कोटींची उलाढाल असणा-या कंपनीच्या डोक्यावर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदाराचा हात असल्याचे कळते आहे. याच आमदारांकडे एकेकाळी महापालिकेतील महत्त्वाची पदे होती

No comments:
Post a Comment