सोनिया गांधी यांनी नेमलेली चौकडी कोणाकोणाला खांदा देते की प्रत्यक्षात कॉंग्रेसलाच खांदा देण्याचे ‘कर्तव्य’ पार पाडते तेच आता पाहायचे.
जॉन, जानी, जनार्दन!
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नाही. त्या घाईघाईने अमेरिकेत रवाना झाल्या. न्यूयॉर्क येथील एका इस्पितळात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ज्या इस्पितळात सोनिया गांधी यांच्यावर शस्त्रक्रिया झाली ते इस्पितळ ‘कॅन्सर’वरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी नावाजलेले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांना नक्की काय झाले? याबाबत कॉंग्रेस वर्तुळातच तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सोनिया गांधी अचानक परदेशी पोहोचल्या व त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर आजाराबाबत वृत्त समोर आले. कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. मोठी माणसे त्यांच्या मोठ्या गोष्टी. जाता जाता बाईसाहेबांनी एक केले, ते म्हणजे पक्षाच्या व देशाच्या कारभाराची सूत्रे ‘चौकडी’च्या खांद्यावर दिली. अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी, संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी आणि युवराज राहुल गांधी यांच्या शिरावर म्हणा किंवा खांद्यावर म्हणा, पक्षाचा तसेच देशाचा भार सोपवला आहे. शेवटी कॉंग्रेस पक्षाला चौकडी ही लागतेच. मग ती चौकडी साधीसुधी असते नाहीतर चांडाळ चौकडी असते. चौकडी आली म्हणजे तो चांडाळपणा आलाच. अर्थात इंदिराजी, राजीव यांच्या काळातही या चौकड्या होत्याच व आज राजकीय पक्ष कोणताही असो, दिल्ली असो की राज्य, तो अशाच चौकड्यांच्या हाती खेळत असतो. सोनिया गांधी या महिनाभर न्यूयॉर्क येथे आजारपणाच्या रजेवर असल्याने त्यांनी नेमलेली चौकडी कोणाकोणाला खांदा देते की प्रत्यक्षात कॉंग्रेसलाच खांदा देण्याचे ‘कर्तव्य’ ही चौकडी पार पाडते तेच आता पाहायचे. माणूस प्राणी म्हटल्यावर आजारपण हे आलेच. प्रत्यक्ष परमेश्वरही आजारपणाच्या फेर्यातून सुटले नाहीत. इटलीचे राष्ट्राध्यक्षही सर्दी, खोकला, शिंका, पोटदुखी वगैरेने आजारी पडत असतात, पण सोनिया गांधी यांचा आजार म्हणजे कॉंग्रेसचा आजार व त्यामुळे देश बेजार असे जे चित्र रंगवले जात आहे ते बरोबर नाही. कारण जाता जाता आपल्या मर्जीतील चारचौघांना त्यांनी कारभाराची सूत्रे सोपवली व त्यात युवराजांनाही सामील केले. म्हणजे घराणेशाहीस महत्त्व देण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. सध्या कॉंग्रेस पक्षात आणि देशात तसे अराजकच माजले आहे. अर्थात, देशाच्या या अराजकाचे व दु:खाचे मूळच मुळी गांधी घराण्याच्या मतलबी कारभारात व कॉंग्रेसच्या हुजरेगिरीत आहे. आपापल्या गाद्या उबवायच्या व गांधी घराण्याचा उदोउदो करायचा या पलीकडे कॉंग्रेसला दुसरे धोरण नाही. महागाई व दहशतवादाचा प्रश्न देशाला गिळतो आहे, पण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत जाहीर केले, ‘काय करावे? आमच्या हातात काही जादूची छडी नाही’ प्रणवदादांचे म्हणणे कदाचित खरे असेल. त्यांच्याकडे जादूची छडी नाही. पण नुसती छडी हातात घेऊन त्या छडीचा प्रसाद भ्रष्टाचारी, काळाबाजारवाले, सट्टेबाजांना द्यायला काय हरकत आहे? भ्रष्टाचाराला आळा घातला आणि काळा पैसा विदेशातून आणला तरी महागाई कमी होईल. पण छडीने फोडून काढण्याची हिंमत या दुबळ्या लोकांत राहिली आहे काय? दुसरा विषय दहशतवादाचा. त्यात तरी देशाच्या गृहखात्याचा कारभार हिमतीने सुरू असावा; तर तोदेखील नाही. गृहमंत्री चिदंबरम यांना आम्ही लुंगीपुचाट म्हणतो ते काही उगीच नाही. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातले आरोपी अद्याप सापडले नाहीत व आता मुंबईतील स्फोटांबाबतही गृहखात्याच्या हाती भोपळाच आहे. चिदंबरम म्हणतात, मुंबईतील बॉम्बस्फोटांमागे देशातील अतिरेकीच असावेत! व्वा. व्वा! काय पण शोध लावलाय हो या लुंगीपुचाटाने. हे सांगायला तुमची गरज नाही महाशय. प्रेरणा पाकड्यांची असली तरी दहशतवाद घडविणारे आणि बॉम्ब पेरणारे हात येथील मिनी पाकिस्तानातीलच आहेत. पण त्या मिनी पाकिस्तानात घुसण्याची व कठोर ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्याची तुमची हिंमत नाही. सोनिया गांधींचे ‘ऑपरेशन’ झालेच हो. पण देशाची प्रकृती सुधारण्यासाठी गरज आहे ती ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची! पोलिसांना संशयित आरोपी शोधण्यासाठी मिनी पाकिस्तानात घुसू दिले जात नाही आणि कॉंग्रेसचे पचपचवीर दिग्विजय म्हणतात, स्फोटांमागे हिंदू संघटनांचा हात असू शकतो. कॉंग्रेसवाल्यांचे हे मुस्लिम लांगूलचालन आणि हिंदूद्वेष यामुळेच देशाची वाट लागली आहे. सोनिया गांधी यांना देश माहीत नाही. त्यांचे ज्ञान कुणीतरी लिहून दिलेल्या भाषणापुरतेच मर्यादित आहे. सोनियांची भाषणे लिहून देण्याचे काम जनार्दन द्विवेदी करतात. त्या जनार्दनांचा समावेश देशाला खांदा देणार्या चौकडीत करून सोनियाजी आजारी रजेवर गेल्या. या चौकडीची रचनाही धर्मनिरपेक्षच म्हणायला हवी. अहमदभाई मुस्लिमांचे प्रतिनिधी, ए. के. ऍण्टोनी ख्रिश्चनांचे प्रतिनिधी, राहुल गांधी हे ख्रिस्ती की हिंदू हे तेसुद्धा सांगू शकणार नाहीत. राहिले जनार्दन महाराज. त्यांचा धर्म हा सोनिया धर्म असल्यानेच या खांदेवाल्यांतही कुणी हिंदू नाहीच. देशाचा कारभार धर्मनिरपेक्ष करायचा म्हटल्यावर हिंदूंना लाथाडायलाच हवे. असो, सोनियांच्या प्रकृतीस आराम पडो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. शेवटी मानव धर्मास जागायलाच पाहिजे हो! सोनियांनी नेमलेले खांदेवाले जॉन, जानी, जनार्दन महिनाभरात काय दिवे पाजळतात ते पाहू!

No comments:
Post a Comment