सरकारचे हीना रब्बानींशी ‘गुलूगुलू’ सुरू असतानाच दहशतवाद्यांचे क्रौर्य
हिंदुस्थानी जवानांचा शिरच्छेद; मुंडकी पाकिस्तानात नेली!!नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) - लोकल, बसगाड्या आणि बाजारपेठांमध्ये बॉम्बस्फोटांचे धमाके घडवत निष्पाप नागरिकांच्या रक्ताचे सडे पाडत आलेल्या दहशतवाद्यांनी आता क्रौर्याचा कळस गाठला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रणरेषेवर घुसखोरीविरुद्ध प्राणपणाने लढणार्या दोन हिंदुस्थानी जवानांचा दहशतवाद्यांनी शिरच्छेद तर केलाच, पण त्यांची धडापासून अलग झालेली मुंडकी ते पाकिस्तानात घेऊन गेले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकार हे पाकिस्तानाच्या ‘खूबसुरत’ परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांच्याशी गुलूगुलू चर्चा करण्यात रंगले असतानाच कश्मीरात ही घटना घडली.
दहशतवाद्यांनी क्रौर्याचा कळस गाठून ज्या सैनिकांना ठार केले ते 19 राजपूत रेजिमेंटचे होते. शहीद जवानांची नावे हवालदार जयपाल सिंह अधिकारी व लान्सनायक देवेंद्र सिंग अशी समजली आहेत. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रणरेषेवर हिंदुस्थानी सैन्याशी दहशतवाद्यांची चकमक झडली होती. तेव्हाच दहशतवाद्यांनी दोन जवानांचे मुंडके उडविले आणि ते आपल्यासमवेत जणू बक्षीस म्हणून घेऊन गेले. हिंदुस्थानी लष्कराचे अधिकारी या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा देण्यास तयार नाहीत. कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणार्या अन्य सैनिकांच्या मनोधैर्यावर याचा परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटते. एका मेजरस्तरावरील अधिकार्याने 30 जुलै रोजी सायंकाळी 4.40 वा. ही नृशंस घटना घडल्याचे सांगितले

No comments:
Post a Comment