Total Pageviews

Sunday, 7 August 2011

HANG KASAB CAMPAIGN SAMANA

वाचकांचा आवाज
कसाब नावाचा जहरी साप! त्याला ठेचून मारा!

क्रूरकर्मा अजमल कसाब याने फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले आहे. या दहशतवाद्याच्या मागणीविरुद्ध वाचकांनी आपल्या संतप्त भावना प्रकट केल्या त्याचे हे संकलन.
- भिवंडी येथील व्यावसायिक दिनेश भास्कर भोळे म्हणतात, मुंबई 26/11 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर झालेला अजमल कसाब याने म्हणे सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. अशा देशद्रोह्याचा हा अर्ज तत्काळ फेटाळून लावावा. कसाबला फाशीही तत्काळ द्यावी. उद्या हा कसाब राष्ट्रपतींकडेही दयेचा अर्ज करून वेळकाढू धोरणाचा लाभ उठवेल. कसाब हा जहरी साप आहे, त्याला ठेचूनच मारावा.
- ऍड. सत्यजीत सा. दिवटे यांनी मुंबईतल्या विक्रोळी येथून पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, कसाबला फाशी एवढी मर्यादित शिक्षा देणे म्हणजे शिक्षेचा अपमान केल्यागत होईल. कसाबला गेटवे समोरच्या फूटपाथवर मोकळा सोडा आणि बॉम्बस्फोटातल्या दिवंगतांच्या नातेवाईच्या हवाली द्या. त्याच्या जीवाचे हाल करूनच मारावे. हीच शिक्षा योग्य ठरेल.
- नाशिक येथील कॉलेज रोड येथील सारिका द. लोटलीकर यांनी चार पानी पत्रात देशाच्या व महाराष्ट्राच्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा वेध घेऊन चिंता व्यक्त केलीय. त्या म्हणतात, पाक परराष्ट्रमंत्री हिना हिला फालूत प्रसिद्धी देण्यात पुढाकार घेणार्‍या मीडियाला जबाबदारीचे भान नाही. हिनाच्या सौंदर्यावर भाष्य करण्यापेक्षा पाकने केलेल्या दहशतवादी हल्ल्यावर अधिक प्रकाश टाकणे मीडियाचे कर्तव्य होते. असा स्त्रीलंपटपणा आणि तोही पाक परराष्ट्रमंत्र्यांचा दाखवून मीडियाने हसे करून घेतले. जरा देशप्रेम जागृत ठेवा. कसाबला ठेचा.
- संभाजीनगर इथून एक व्यापारी निवृत्ती बार्शीकर पाटील लिहितात, सरकारला अजून किती बॉम्बस्फोट हवे आहेत? माणूस म्हणजे किड्यामुंग्या नाहीत. दहशतवादी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ भाषणबाजी आणि कागदी पत्रके ही पुरेशी नाही. त्यासाठी सरकारची प्रामाणिक इच्छाशक्ती हवी आहे.
- पुणे, चिंचवड येथील प्रकाश कोटकर पत्रात म्हणतात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारा क्रूरकर्मा कसाब याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे धाडस केले. हा कसाब म्हणजे कुणी महात्मा नाही किंवा देशभक्तही नाही. त्याचा अर्ज फाडून फेकून द्यावा. विशेष न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणे योग्य नाही. आजही कसाबची मस्ती उतरलेली नाही म्हणूनच तो न्यायालयात आव्हानाची भाषा करतो. कसाबला भरचौकात फासावर लटकावा, हेच योग्य ठरेल.
- मुंबईतील जोगेश्‍वरी येथील ऍड. चंद्रप्रकाश नकाशे यांनी कसाबला तीन प्रश्‍न विचारले आहेत. ते यानुसार 1. गोळीबारात निष्पाप माणसांची हत्या करताना जो क्रूरपणा दाखविला तोच तुझ्यावर दाखविण्यात गैर ते काय? जैसी करनी वैसी भरनी! 2. फाशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यापूर्वी तू केलेल्या दहशतवादी कृत्याबद्दल तुला काहीच कसं काय वाटत नाही? का तुझ्या भावनाच मेल्या आहेत? 3. पाकिस्तानात जर असे कृत्य केले असते तर त्यांनी जी शिक्षा दिली असती ती तुला का देऊ नये? तू तुझा केलेला अर्ज मागे घे.
- उल्हासनगर, ठाणे येथील वाचक संकेत कांबळे म्हणतात, हलकट, नालायक कसाब हा सरकारचा जावई आहे काय? अशी शंका मनात येते. त्याचे सारे लाड पुरविणे कितपत योग्य आहे? त्याला बिर्याणी खिलवून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करणे हे समर्थनीय कदापि नाही. आता तर त्याने फाशीला आव्हान दिले आहे. त्याच्याच जिवंतपणाला आव्हान देऊन त्याला मृत म्हणून पोलिसांनी घोषित करावे. अशा कसाबचे पाय या पवित्र हिंदुस्थानच्या भूमीवर क्षणभरही नकोत.
- अमरावतीचे दिवाकर चौधरी यांच्या मते, कसाबचा वाढदिवस, कसाबची बिर्याणी, कसाबची सुरक्षा हे सारे विषय वाचले की मन संतापते. तो आपल्या हिंदुस्थानींची हत्या करतो. पण आपण मात्र त्याच्यावर नको तेवढ्या पैशांची उधळण करतो. अशा दहशतवाद्याला ठार मारावे. त्यासाठी कुठल्याहाी कोर्टाची वाट बघून कायद्याच्या चौकटीत हा विषय अडकवू नका. नाहीतर कसाबची डोकेदुखी संपण्याऐवजी ती अधिकच वाढेल. त्याचा विनंती किंवा आव्हान अर्ज फेकून द्यावा.
- मुंबईतील विलेपार्ले येथील महाविद्यालयीन विद्यार्थी राजेश द. साने आपल्या पत्रात म्हणतात, ‘कसाब म्हणजे दहशतवादाचा अस्सल चेहरा. त्याचे फालतू लाड किती दिवस करणार? प्रश्‍न देशाच्या सुरक्षेचा आहे. त्यावर आता आणखीन दळण दळत बसण्यापेक्षा कसाबला प्राणिसंग्रहालयातल्या भुकेलेल्या वाघांसमोर टाकावे. त्याचे हाल झाले पाहिजेत. त्याच्या भयानक मरणाने त्याचे समर्थक दहशतवादीही हादरले तरच दहशत बसेल. पण आपण फालतू मानवतावादाच्या गोष्टी करण्यात धन्यता मानतो.
माहिम येथील दिनकर भोळे हे म्हणतात की, कसाबच्या बातम्या वाचून कुणावर हसावे? हा प्रश्‍न मनात येतो. कारण आपणच नाकर्तेपणा दाखवून सरकार निवडून देतो आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. सरकार निवडून देतांना आपल्या भावनांची कदर करणार्‍यांना निवडून द्यावयास हवे. असे कसाब जपून ठेवायचे. त्याचे लाड पुरवायचे हे कदापि योग्य नव्हे. पण लोकशाहीत हे असे चालायचेच!
- ‘कसाबला फासावर लटकवा. त्याच्या कुठल्याही अर्जावर कुठलीही सहानुभूती कुणीही दाखवू नका’, अशी मागणी करणारे हे पत्रलेखक :
- प्रा. एम. पी. भालेराव, नांदेड रोड, लातूर
- श्रीधर कृ. राजे, गोरेगाव, मुंबई
- दत्ताराम साळवी, देवपूर, धुळे
- विजया क्षीरसागर वाळवा, सांगली
- दिनकर पाटील, राहता, नगर
- शिवाजी गुरव, शिरोळ, कोल्हापूर
- भालचंद्र अभ्यंकर, नौपाडा, ठाणे
- गोविंद दा. भोळे, चोपडा, जळगाव
- वसंत बारशे, मालेगाव, नाशिक
- भाई विजयकर, वसई, ठाणे
- साहेबराव शेलार, कर्जत, रायगड
- त्रिभुवन सावंत, पाली, रत्नागिरी
- भाग्यश्री शिगवणे, विलेपार्ले, मुंबई
- सुवर्णा रावराणे, रत्नागिरी
- दिनेश शृंगारे, वसई रोड
- भारती सोनाळकर, ठाणे
- पंढरीनाथ दुसाने, जळगाव
- वासंती परांजपे, सावंतवाडी
- दीनानाथ सुळे, दहिसर, मुंबई

No comments:

Post a Comment