तरुण पिढीने स्वतःच्या विचारांना गहाण न टाकता , पूढील पिढीला मानसिक गुलामगिरीची मते मुलांवर लादली नाहीत, तर त्यांच्या पूढील पिढीला त्यांचे स्वातंत्र विचार करण्याचे बळ अंगी येईल . ही अशी नुसती रक्ता मासाच्या शरीरान मध्ये माणुसकीचे व नीतीचे बीज ही नविन पिढी पेरेल! नव्या पिढीच्या हातीच आहे आता या जगाचा वारसा! संस्कृतीचे अर्थ समजून न घेता धर्म,रूढी,परंपरान मध्ये काळा प्रमाणे बदल न करून ही स्थिती निर्माण झाली. धर्म-अर्थ व राजकारण यांचा समन्वय न साधल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. या पिढीने केलेल्या चुका पाहून नव्या पिढीने त्या चुका करू नये याचे भान तरुणांना येणे गरजेचे आहे! आताची पिढी स्वबळावर आपले मार्ग निवडत आहे,ती नक्कीच हे चित्र पालटेल ही आशा आहे. आपण सर्वच ईश्वराचे अंश आहोत,परंतु त्याचे अस्तित्व जाणून घेवून या चैतन्याची अनुभूती घेणे या साठीच मानव जन्म आहे,पण स्वतःचा शोध सोडून मायाजालात अखंडपणे भरकटत राहिल्याने स्वतःच पारतंत्र्यात जगणारी माणसे घडत गेली. स्वतःला जेव्हा खरा स्वातन्त्र्याचा अर्थ कळेल,आपले काबूत असलेले मन हेच बौद्धिक विचार शक्तीने नीतीचा विचार करू शकेल. हा चैतन्य स्वरूप आत्मा तेजस्वी व निर्मळ,पवित्र आहे. ते सर्वाना गवसू दे हीच माझी प्रामाणिक इच्छा!
भारतीय स्वातन्त्र्याचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करायचा म्हणजे कर्कश आवाजात रक्त सळसळवणारी गाणी लावून पांढरे कपडे घालून राष्ट्र गीत म्हणायचे किंव्हा सुट्टी म्हणून कुटुंबासह सहलीला जायचे! ज्यांचे भ्रष्टाचाराने डागाळलेले जिवन आहे,त्यांनी पांढरे कपडे परिधान केल्याने काय ते स्वच्छ होणार आहे का? स्वातंत्र्याचा अर्थ न उमजून घेता उगाचच गाणी म्हणणे व रक्त तापण्या ऐवजी ते शिथिल राहणे हे षंढ पणाचे लक्षणं आहे. क्रिकेटची स्पर्धा जिंकल्यावर उत्साहाने रस्त्यावर येवून देशाचा अभिमान दिसून येतो,तो या भ्रष्ट राजवटीला उलथून पाडण्यासाठी केंव्हा येईल? उद्या मना पासून देश भक्ती पर गीत म्हणू या ,संचारेल अंगात शिवबा, घेवू या सुराज्याची शपथ,बघा कसा देशाचा काया पालट करण्याची या जनतेत शक्ती येईल व हाच जनता जनार्दन सुराज्याची पताका फडकावेल! प्रत्येकात पुरूषार्थ संचारू दे,नैतिकता अंतरात वसू दे ,सुराज्याचे गीत ओठी, रक्त असें तापू दे! सुराज्याचे बिगुल आज असें वाजू दे! स्वातंत्र्या दिनाच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा! भारत माता की जय! वन्दे मातरम!
मंगला
पपुरूषार्थ संचारू दे,नैतिकता अंतरात वसू दे ,सुराज्याचे गीत ओठी, रक्त असें तापू दे! सुराज्याचे बिगुल आज असें वाजू दे!
रकीयांना देशा बाहेर धाडून आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो,पण खरया अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळले आहे का आपल्याला! आपलेच लोक आपल्याच माणसांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. झोपड पट्ट्यांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढते आहे. गरिबी हटाव म्हणताना गरिबी वाढलीच आहे,शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. साठ लाख लोक मुंबईत उघड्यावर शौच करतात,हे चित्र काय सांगते? म्हणजे आपल्या देशाचा स्वर्ग करण्या ऐवजी नरक बनवणे चालले आहे. शेजारील इतर राष्ट्रांनी केलेली प्रगतीचे आचरण आपण करू शकत नाही हे आपले दुर्दैव आहे. भ्रष्टाचार,महागाई,गुंडगिरी,साऱ्याला उधाणच आले आहे. ज्यांनी देशाला नैतिकतेच्या मार्गावर न्यायचे तेच अनैतिकतेने राज्य करीत आहेत. कोणाला आता फासावर देणार आणि कोणाला हाकलून देणार सारे आपलेच! गुलामी मनोवृत्तीने जगणे हे पारतंत्र्याचे लक्षणं आहे. येथे आता लढाई स्वतःची स्वतःशी आहे. प्रत्येकाला मी बरोबर व दुसरा चूक करीत आहे असें वाटते,तेव्हा आधी आपले वर्तन तपासून बघणे गरजेचे आहे. आपल्या तिरंग्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तेजस्विता,पावित्र्य,नैतिकता,उत्साह अंगी बनून आपल्या स्वराज्याचे सुराज्या करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
देशाच्या स्वातंत्र्य साठी ज्यांनी आपले रक्त सांडले, फाशीवर गेले,तुरुंगवास भोगले त्यांची आठवण ठेवून आपण या देशाला गर्तेतून बाहेर काढायला हवे. आजही आपले संरक्षण करण्या साठी सीमेवर थंडी-ऊन-पावसात सैनिक आपले घर-दार सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत आणि आपण आपल्याच चौकोनी कुटुंबाचा विचार करण्यात इतके मश्गुल आहोत,की या राजकारण्यांनी भ्रष्टाचाराने सर्व देशाला वाळवी सारखे पोखरले व आपण पाहत राहिलो. मेलेल्या मनांची ही स्थिती कधी सुधारणार,कधी या बोथट वेदनाना वाचा फुटणार? भौतिक सुखाच्या मागे धावून सर्वांनी मती गहाण टाकली आहे. अरे आपण या स्वतंत्र देशात आहोत म्हणून आप-आपल्या मर्जीने जगू शकतो ,पण या मर्जीने जगण्याला आळा घालायला हवा.
आपले कुटुंबासह आपला समाज व देश याचा विचार करा. मर्जीने वागणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे,येथे बौद्धिक विचार,नैतिकतेचे आचरण गरजेचे आहे. हतबलता माणसाला षंढ बनवत आहे. आपल्या चुकीच्या वागण्याने आपण दुसऱ्यावर अन्याय करीत आहोत ही भावना जागरूक व्हायला हवी. इतके धर्म,देव,महाराज, यांच्याकडे जावून काय शिकतो आपण? सारे पवित्र ग्रंथ नुसते वाचण्या साठी नसून ते आचरण करण्यासाठी आहेत. पापे करून गंगेत आंघोळ केल्याने पवित्र कसे होणार? माणसाने माणसाशी माणसा सारखे वर्तन करून माणुसकी हा धर्म प्रत्येकाने अंगीकारावा,तेव्हा प्रत्येकाला एक-मेकाचे सुखं-दुखं कळेल. सारे संत-महंत,राष्ट्र पुरुषांनी दिलेली शिकवण अंगी बाणू ,तेव्हाच खरा सुराज्याचा उदय होईल!
No comments:
Post a Comment