Total Pageviews

Monday, 15 August 2011

DO NOT TROUBLE INNOCENT MUSLIMS

आणखी किती अमानुल्ला?
स्वातंत्र्यदिनाच्या आधीच अफझल गुरूच्या फाशीवर गृहमंत्रालयाने निर्णय घेतला. सरकारचा नाइलाज झाला अफझलसारख्यांना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा करावा लागला. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदुस्थानातील 20 कोटी मुस्लिमांचे काय करायचे? त्यांचे देशातील स्थान काय? मुस्लिमांची ताकद एकगठ्ठा मतदानात आहे, पण दहशतवाद बॉम्बस्फोटांचा तपास, संशयाच्या नजरा त्यांना जगू देत नाहीत. ही दरी कशी कमी होणार?
संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरूच्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सात वर्षांपासून त्याचा दयेचा अर्ज गृहखात्यात निर्णयाशिवाय पडून होता अफझल मुसलमान आहे म्हणून त्याला वाचविले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता. आता त्यालादया’ दाखवू नये. राष्ट्राध्यक्षांनी फाशीच्या निर्णयावर सही करावी असे ठरले. लाल किल्ल्यावर हल्ला करणार्‍या अश्फाकचीही वधस्तंभाच्या दिशेने पावले चालत आहेत. मुसलमान आहे म्हणून न्यायालयात कोणी वाचले असे झाले नाही. अफझल गुरू उद्या फासावर जाईल. अश्फाकही वधस्तंभावर चढेल.हिंदुस्थानात झपाट्याने वाढणार्‍या मुस्लिमांचे करायचे काय? पाकिस्तान आणि इंडोनेशिया या इस्लामी राष्ट्रांपेक्षा हिंदुस्थानात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. देशाचे नाव हिंदुस्थान असले तरी त्याच्या पोटात एक मुस्लिम राष्ट्र अवाढव्य पसरले आहे भविष्यात हिंदुस्थानला देशांतर्गत पाकिस्तानशी लढावे लागेल. हिंदू समुदाय आणि मुसलमानांत आज सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. कश्मीरातील इस्लामी अतिरेक्यांचा उद्रेक, मुंबईसह देशभरात इस्लामी दहशतवाद्यांनी घडवलेले बॉम्बस्फोट यामुळे मुस्लिम समाज हा तिरस्काराचा विषय बनला आहे. तरीही 20-22 कोटी मुसलमान समाजाचे नक्की करायचे काय, या प्रश्‍नाचे उत्तर एकही हिंदू चाणक्य देऊ शकत नाही. मुस्लिम समुदाय ही राजकीय व्होट बँक झाल्याने मुसलमानांचा मताधिकार काढून घ्यावा अशी सूचना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांंनी केली. हीच मागणी गेल्या 20 वर्षांपासून हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरेसुद्धा करीत आहेत. 20 कोटी मुसलमानांना मताधिकार नाकारल्याने या देशातील हिंदूंना सुखाचे दिवस येतील, दंगली बॉम्बस्फोटांना पूर्णविराम मिळेल जगात आपण एकमेव हिंदू राष्ट्र बनू हा विचार भ्रमिष्टांचा आहे. मुसलमानांचे प्रकरण हाताबाहेर गेले आहे या देशाची ध्येयधोरणे मुस्लिमांकडे पाहून ठरवली जातात हेच चित्र आहे.दरी का वाढली?
हिंदू आणि मुसलमानांत वाढलेली दरी अधिक धोके निर्माण करणार आहे. मुंबईसह देशभरातील बॉम्बस्फोट धर्मांध मुसलमानांनीच घडवले आहेत, पण हे स्फोट घडविणारे माथेफिरू कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत. यात अनेकदा निरपराधी मुसलमानच भरडला जातो. प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नाही, पण पकडलेला प्रत्येक अतिरेकी हा मुसलमान का असतो?’ असे प्रश्‍न वारंवार विचारले गेले. त्यामुळे सरकारने खासकरून महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचे धागेदोरे हिंदू संघटनांकडे वळवले हिंदूंनाही अतिरेक्यांच्या पंक्तीत बसवले. गडकरी रंगायतनच्यालवंगी फटाका’ स्फोटाचे धागेसनातन प्रभात’कडे वळवून चार-पाच लोकांना अटक केली त्यांना दहशतवादी ठरवले. मुसलमानांत अतिरेकी निर्माण झाले म्हणून हिंदूंनाही अतिरेकी ठरवून पोलिसांनी मूर्खपणाच केला. हिंदू अतिरेक्यांचे धागे देशाच्या लष्करापर्यंत नेऊन कर्नल पुरोहितांना पकडणे खटला चालवणे यात फक्त मुस्लिमांचेच लांगूलचालन होते. या देशात फक्तमुसलमान’च बदनाम नाहीत तर हिंदूही तितकेच बदनाम आहेत असे जगापुढे चित्र निर्माण करणारेच मुसलमानांतील धर्मांधता जास्त पेटवीत आहेत.त्यांना कसे शोधणार?
बॉम्बस्फोट अनेक झाले, पण किती खरे आरोपी पकडले गेले? दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी पकडले गेले नाहीत. पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातले आरोपी मोकाट आहेत आणि कालच्या मुंबई स्फोटमालिकेतही पोलिसांना काहीच हाती लागले नाही. 20 कोटी मुसलमानी लोकसंख्येतून हे आरोपी कसे शोधणार? खरे आरोपी सापडत नाहीत म्हणून निरपराध्यांना पकडून फासावर देऊ नका म्हणजे झाले. ‘ओपन’ या इंग्रजी नियतकालिकात ज्योती पुनवानी यांनी एक चांगला विषय हाताळला आहे. The Agony of the usual suspects अशी ती कहाणी. बॉम्बस्फोटातील त्याच त्याच संशयित आरोपींच्या जीवनातील ही वेदना आहे. ते मुसलमान आहेत म्हणून प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस त्यांना उचलतात त्यांचा अपमान केला जातो. त्यांच्याकडून हवे ते वदवून घेतले जाते. हा आता प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर नित्याचाच कार्यक्रम झाला आहे.यादी तयार आहे!
‘‘
यावेळी मी मानसिकदृष्ट्या तयारीतच होतो. ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादरच्या बॉम्बस्फोटांची बातमी पाहताच आता कोणत्याही क्षणी पोलीस मला घेण्यासाठी येतील त्याच त्याच प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतील या अपेक्षेत मी होतो. पोलीस रात्री 11.30 वाजता मला घेऊन गेले पहाटे 4 वाजता त्यांनी मला सोडले.’’ ही कहाणी एका अमानुल्लाची आहे. पण तपास चौकशी इकडेच संपली का? पुढच्या दोन दिवसांत त्याला आणखी चार पोलीस स्टेशनांकडून समन्स आले. दहशतवादविरोधी पथक, गुन्हा अन्वेषण विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन सगळ्यांच्याच निमंत्रणावरून गेलो त्यांच्या प्रश्‍नांच्या त्याच त्याच फैरी झेलून लोकांच्या नजरा चुकवीत आलो. सर्वच पोलीस स्टेशनांचे प्रश्‍न काय असतात? तेच तेच असतात. बॉम्बस्फोटांच्या दिवशी तू कोठे होतास? काय करीत होतास? चित्ता कॅम्पमध्ये (मुस्लिमांची झोपडपट्टी) त्या दिवशी गेला होतास काय? इंडियन मुजाहिदीन संघटनेतील कुणाला ओळखतोस काय? पाकिस्तानात किती वेळा गेलास? फक्त तुझेच नाव आमच्या समोर का आले? तुझ्या घराची कागदपत्रे सादर कर. याबॉम्बस्फोट’ मालिकेनंतरही अमानुल्ला सर्व कागदपत्रांसह तयारीत होता. पोलिसांनी त्याकडे लक्षच दिले नाही. अमानुल्ला म्हणतो, ‘‘पोलीस ज्या पद्धतीने प्रश्‍न विचारतात त्यामुळे संतापाचा भडका उडतो. जणू काही मी जगातला सर्वात खतरनाक दहशतवादी आहे हे मानूनच त्यांची चौकशी सुरू असते, पण मी रागावर नियंत्रण ठेवले. माझ्या संतापाने त्याचा भडका उडावा माझी पुन्हा फरफट व्हावी असे वाटत नाही.’’ अमानुल्लाची वेदना विचार करायला लावणारी आहे.बॉम्बस्फोट होताच कुणाला चौकशीला बोलवायचे याची एक यादी कायमस्वरूपी पोलिसांकडे तयारच असते प्रत्येक स्फोटानंतर सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण मिळावे तसे त्यांना चौकशीसाठी बोलावले जाते. 1992 सालापासून हा सिलसिला सुरू आहे, पण पोलिसांना खरे अतिरेकी आरोपी सापडले नाहीत. ज्यांना पकडून खटले चालवले ते नंतर पुराव्यांअभावी निर्दोष सुटले. पोलीस प्रत्येक स्फोटानंतर त्यांच्या घरी जातात. बंद दरवाजांवर लाथा लाठ्या मारतात. कुटुंबाची लाज जाते शेजार्‍यापाजार्‍यांत तमाशा होतो तो वेगळाच. ‘‘पोलीस आम्हाला मध्यरात्री उचलून नेतात. दुसर्‍या दिवशी सकाळपासून आमची बायकामुले पोलीस ठाण्याच्या आवारात उभी असतात. आमचे काय झाले ते त्यांना माहीत नसते.’’ आणखी एका अमानुल्लाची ही कहाणी आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनाप्रिय’ असलेले हे मुस्लिम तरुण कोण आहेत? त्यातले बरेचसे तरुण स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट (सिमी)शी संबंधित होते, पण आज त्यांचा काहीच संबंध नाही असे ते कुराणावर हात ठेवून सांगतात. 2001 सालीसिमी’वर बंदी आली. त्यानंतर आम्ही सारे त्या संघटनेपासून दूर झालो. तेव्हा आम्हीतरुण’ होतो. आता तिशी ओलांडली. लग्न आणि मुले झालीत. लहानसहान उद्योग करून घर चालवीत आहोत. मुंबईत कोठेहीस्फोट’ झाला की त्यांच्या काळजात स्फोट होतो. पोलिसांच्या लाथा दारावर बसतील कोणत्याही क्षणी उचलून नेतील या भीतीने त्यांचे आयुष्य चालले आहे.चालतेफिरते मानवी बॉम्ब!
मुंबईच्याच नव्हे तर देशभरातील सर्वच बॉम्बस्फोटांत हिंदूंबरोबर मुसलमानही मारले जात आहेत. मुसलमानांनी घडवलेल्या स्फोटांना तशाच स्फोटांनी उत्तर देऊन काय साध्य होणार? अराजक निर्माण होईल ते देशाचे आणखी तुकडे करील. मुसलमानांच्या याद्या बनवून त्याच याद्यांवरून पुन:पुन्हा चौकशा करून खरे आरोपी कधीच मिळणार नाहीत. एकच अमानुल्ला किती स्फोट घडवू शकेल? मुळात अमानुल्लाचा त्यात सहभाग आहे काय? पोलिसांनी जुनी यादी फेकून नवी यादी तयार केली तरच आरोपी सापडतील. स्फोट झाल्यावर टेबलांच्या खणातीलयादी’ बाहेर काढण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून निगराणी करावी. त्यामुळे असे स्फोटच घडणार नाहीत निरपराध्यांचे बळी जाणार नाहीत आणि स्फोट झाल्यावर मुंबईतील अनेक अमानुल्ला पोलिसांच्या प्रतीक्षेत तळमळत बसणार नाहीत.इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात विध्वंस घडवायचे ठरवलेच आहे. त्या विध्वंसास हातभार लावण्याचे काम पोलिसांनी करू नये.पोलिसांच्या यादीतील अनेकअमानुल्ला’ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या यादीत नव्या अमानुल्लाची भर टाकू नका.चालत्याफिरत्या मानवी बॉम्बची निर्मिती त्यामुळे वाढेल!

No comments:

Post a Comment