स्वयंसेवी संस्थावाले आंदोलनाचा ‘इव्हेन्ट’ करतात. त्यामुळे रसातळाला गेलेल्या मेणबत्ती उद्योगास चांगलीच बरकत आली.
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मेणबत्त्या!
अण्णा हजारे यांच्या निमित्ताने आपल्या देशात ज्या गमतीजमती सुरू आहेत त्यास नेमके काय म्हणावे? अण्णा हजारे यांना सरकारने सकाळी अटक केली व रात्री त्यांच्या सुटकेचे आदेश निघाले. अटकेनंतर जामीन घेण्यास नकार देणे व तुरुंगात जाणे हा आंदोलनाचाच एक भाग असतो. या कायदेशीर प्रक्रियेतून जाण्यास नकार दिल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवून अण्णांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी अण्णांना अटक करून गाडीत बसवले तेव्हा गाडीच्या काचेतून अण्णा लोकांना अभिवादन करीत आहेत, हात वगैरे दाखवीत असल्याची चांगली छायाचित्रे झळकली आहेत. कधी, कसा नेमका फोटो द्यावा हे तंत्र अण्णांना चांगलेच जमले आहे व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत आहेत. मोठ्या पदांवर आहेत. राष्ट्रपती पदावरसुद्धा मराठी व्यक्ती आहे, पण हे तंत्र कुणालाच जमलेले नाही. अण्णा फोटोत छान दिसतात व त्यांनी अलीकडेच त्यांच्या शुभ्र कपड्यांची ठेवण आणि शिवणसुद्धा बदलली आहे. महाराष्ट्रातील देसरडा, पठारे वगैरे मंडळी त्यांच्या सोबत होती तेव्हा अण्णांचे कपडे व ‘स्टाईल’ वेगळी होती व ती साध्या राबणार्या कष्टकर्यासारखी होती. अण्णा यांनी दिल्लीवर स्वारी केल्यापासून हे सर्वच बदलले आहे. केजरीवाल वगैरेंकडून या शिंप्याचा पत्ता महाराष्ट्रातील नेत्यांनी घ्यायला हवा. दिल्लीत अण्णांच्या गांधीटोपीची, कपड्यांच्या ठेवणीची चांगलीच चर्चा आहे व भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी एक ‘शुभ्र’ नेतृत्व मिळाल्याबद्दल देशातील लोकांत व अनेक स्वयंसेवी संस्थांत आनंदाचे वातावरण आहे. या देशातील बराचसा कारभार सध्या याच स्वयंसेवी संस्था चालवीत आहेत व त्यांचे पाठीराखे परदेशातून अर्थपुरवठा करीत आहेत. तिस्ता सेटलवाडनामक एक ‘बया’ स्वयंसेवी संस्था चालवते व गुजरात दंग्याच्या निमित्ताने तिने मोदी सरकार आणि हिंदुत्ववादी शक्तींना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तिचा खोटारडेपणा उघडा पडल्याने न्यायालयानेही तिला फटकारले आहे. आमच्या देशात पीकपाणी कमी व स्वयंसेवी संस्थानामक छत्र्यांचे उत्पादन जास्त वाढले आहे. हे स्वयंसेवी संस्थावाले
आंदोलनाचा ‘इव्हेन्ट’ करतात. हेच त्यांचे भांडवल असते. या स्वयंसेवी संस्थांच्या ‘इव्हेन्ट’मुळे एक मात्र झाले, ते म्हणजे रसातळाला गेलेल्या मेणबत्ती उद्योगास चांगलीच बरकत आली. कारण हाती पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन ‘मार्च’ काढायचे, अशा प्रकारचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायची असेच या संस्थांचे सुरू असते. मेणबत्तींना असलेली ही मागणी पाहून अंबानी, टाटा, मित्तल, जिंदाल वगैरे उद्योगपतीही मेणबत्ती उद्योगांत भांडवल गुंतवल्याशिवाय राहणार नाहीत व मेणबत्तीसाठी लागणारा कच्चा माल सरकारातच आहे. पंतप्रधानांसह सर्वच मंत्री हे मेणाचे वितळलेले पुतळेच आहेत. राज्य करताना जो कणखरपणा हवा तो नाहीच. त्या सोनिया बाईंपुढे तर सगळेच वितळतात. कठोर धोरणे तर कसल्याच बाबतीत नाहीत. ना दहशतवादाच्या बाबतीत ना भ्रष्टाचाराच्या बाबतीत. विरोधी पक्ष म्हणवून घेणारेही त्याच मेणाचे उत्पादन आहे. त्यामुळे निदान आमच्या देशात तरी पटकन वितळणार्या मेणाचा कच्चा माल हवा तेवढा उपलब्ध आहे. त्यापुढे ‘स्पेक्ट्रम’ घोटाळा मागे टाकेल असा मेणबत्ती घोटाळा झाला तरी आश्चर्य वाटायला नको. कधी काळी आंदोलकांच्या हातात धगधगत्या मशाली होत्या. त्यांची जागा मेणबत्त्यांनी घेतली. याच मेणबत्त्या शेवटी मतदानाच्या रांगेत उभ्या राहून त्याच भ्रष्ट शासनास मतदान करतात. ‘२६/११’ चा हल्ला, मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका जेथे झाल्या तेथे शेवटी कोण निवडून आले? मेणबत्तीवाल्यांनी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदावरून घालवले म्हणून महाराष्ट्रातील दहशतवाद आणि भ्रष्टाचार कमी झाला नाही. चेहरे बदलले. सत्तेचे मोहरे मात्र तेच आहेत. अण्णा हजारे व त्यांच्या लोकांना संपूर्ण परिवर्तन करायचे आहे व तोच त्यांचा नारा आहे. अर्थात देशभरातील टीव्ही चॅनल्स काय ठरवणार तेच होईल. भ्रष्टाचाराच्या विरोधात सैतानाने जरी लढाई पुकारली तरी आम्ही त्यास पाठिंबा देतो. हे तर महाराष्ट्रातलेच अण्णा आहेत. मुळात फक्त अण्णा आणि टीम कशाला, देशभरातील जनता
भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट शासन व्यवस्था याविरुद्ध पेटून उठायला हवी. तरच भ्रष्ट राज्यकर्ते सत्तेवरून पायउतार होतील. शेवटी हा अधिकार जनतेलाच आहे आणि तो जनतेने गाजवायला हवा. अर्थात, सरकार जनतेचा हा अधिकारच दडपशाहीच्या मार्गाने दडपून टाकीत आहे. शेतकरी, वारकर्यांना गोळ्या घालून ठार मारीत आहे. आता अण्णांच्या आंदोलनाबाबतही केंद्रातील सत्ताधार्यांनी तीच दमननीती वापरली, पण ती अंगाशी आली. त्यामुळे सकाळी अटकेत टाकलेल्या अण्णांना संध्याकाळी सोडण्याची वेळ सरकारवर आली. अर्थात सरकारने सुटकेचे आदेश देऊनही अण्णा तिहार तुरुंगातून बाहेर पडायला तयार नाहीत व त्यांनी आतमध्येच ठाण मांडले आहे. आपल्या सर्व अटी मान्य केल्या तरच बाहेर पडतो वगैरे अटी व शर्ती त्यांनी सरकारपुढे ठेवल्या असल्याने गांगरलेल्या व भेदरलेल्या कॉंग्रेसवाल्यांची मोठीच पंचाईत झाली. अण्णा हे आतमध्ये काय करीत आहेत. उभे आहेत की बसले आहेत. झोपले आहेत की ‘लेटले’ आहेत, अशा मिनिटामिनिटाच्या खबरी आतून बाहेर येत आहेत. हजारे यांच्यापुढे केंद्रातील सरकार आधीच इतके हतबल व लाचार झाले आहे की, जमीन दुभंगून आत गडप व्हावे असेच सरकारला वाटत असेल. अर्थात अण्णा हे सडाफटिंग आहेत. त्यामुळे राळेगणसिद्धीतल्या यादवबाबाच्या मंदिरात राहिले काय किंवा तिहार तुरुंगातील महासंचालकांच्या खोलीत राहिले काय, त्यांच्यासाठी सर्व सारखेच आहे. बाकी अण्णांचे जे इतर साथी आहेत त्यांना यानिमित्ताने प्रकाशझोतात राहण्याची संधी मिळाली व जणू देशाचा गोवर्धन आपल्याच करंगळीवर आता उभा आहे अशा थाटात त्यांचे सर्व चालले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध संताप हा खदखदत असतोच. त्यामुळे एखाद्याने तुतारी फुंकण्याचा अवकाश, भ्रष्टाचाराने पिचलेली जनता आता काही परिवर्तन घडेल या आशेने बाहेर पडते. कधीकाळी ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे आवाहन केले जात होते, पण आता अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मेणबत्त्या असे सांगितले जाते. चला, काही का असेना मेणबत्ती उद्योगास बरकत आली हेही नसे थोडके.

No comments:
Post a Comment