Total Pageviews

Wednesday, 17 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 19

अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनामागे परकीय शक्तीचा हात असल्याचा जावईशोध काँग्रेसने लावला असून , त्यामागे अमेरिकेची फूस असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे . एकटा समाजसेवक इतकी प्रचंड गर्दी जमवू शकतोच कसा ? या प्रश्नानेही काँग्रेस हैराण झाली आहे .

' अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाने भारतातील एकाही आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही . मात्र , यंदा प्रथमच अण्णांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी भारतातील आंदोलनाला समर्थन दिले आहे . अमेरिकेची ही भूमिका शंकास्पद वाटते . त्यांना असे उद्योग करण्याची गरजच काय ?' असा सवाल पक्षाचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनी बुधवारी केला . ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते .

' देशातील जनतेचा अण्णांच्या आंदोलनाला असलेला पाठिंबा आणि त्यांना असणारे अमेरिकेचे समर्थन यात नक्कीच काहीतरी शिजते आहे . या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची बाजू समजून घेणे गरजेचे आहे ,' असे ते म्हणाले . अण्णांच्या लढ्याबाबत काँग्रेसची भूमिका विचारली असता , पक्ष यूपीए सरकारच्या पाठीशी असल्याचे अल्वी यांनी स्पष्ट केले . आंदोलनाच्या मागे नक्की कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी केंद्र सरकारने करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले

जनलोकपाल विधेयक संसदेत सादर करा, अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू करणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तचर खात्याचे लक्ष आहे. अण्णांच्या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन घातपात केला जाण्याचा संशय गुप्तचरांनी व्यक्त केला आहे.

अण्णा गुरुवारी दुपारी तिहार जेलमधून बाहेर पडून आणि रामलीला मैदान येथे उपोषण करण्यासाठी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिहार जेल आणि रामलीला मैदान येथे बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक यांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

रामलीला मैदान येथील उपोषणाचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर गुरुवारी तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तिहार जेलची कसून तपासणी करण्यात आली. जेल बाहेर अण्णांच्या समर्थकांनी अन्न तसेच पाण्याची प्लॅस्टिकची पाऊच आणि बाटल्या यांचा खच पाडला आहे. कच-याचा हा ढीग देखील तपासण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा तिहार जेलबाहेर आलेल्या एका अँब्युलन्समुळे अण्णांच्या समर्थकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अण्णांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचे उपोषण मोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे वाटल्याने जेल बाहेर जमलेल्या नागरिकांनी अँब्युलन्सचा मार्ग अडवला होता. अखेर पोलिसांनीच नागरिकांचा गैरसमज दूर केला

No comments:

Post a Comment