.पोलीसदादांची डिस्कव्हरी5 Aug 2011, 0420 hrs IST
भल्याभल्यांना वठणीवर आणणाऱ्या पोलीसदादांचे चोचले पुरवणं सोप्पं नसतं. त्यातच तो बंदुकधारी साहेब, असेल तर मग विच ारायलाच नको खरेदीसाठी भटकंती करणाऱ्या अशाच एका साहेबाची ही फिरस्ती. नोकरीत अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले हे साहेब त्यांच्या डिस्कव्हर गाडीवरनं घरगुती बाजारहाटासाठी सदैवं 'तत्पर' दिसतात.
'गृहमंत्र्यां'चे आदेश म्हणून की काय, खरेदीसाठीचा त्यांची ही 'डिस्कवरी' रविवार कारंजापासून ते कॉलेज रोडपर्र्यंत दिवसभरातल्या कुठल्याही वेळेत सुरू असते. गणवेश, डोक्यावर टोपी, कमरेला बंदुक, विकसित देहयष्टी अशा भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचा कुणावरही छाप पडावी. हाच रुबाब पदरी पाडून घेत, हे साहेब रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून फळ-भाजीपाला घेताना, भेळवाल्यालाही सोडत नाहीत. साहेबच दारी आला, तर त्याला नाही तरी कसं म्हणणार. दुकान अतिक्रमणात असल्याने, उगाच आफत कशाला म्हणून, साहेबांनी बोट दाखवलं ते मुकाट्याने द्यावं लागतं. उलट साहेबांनी खिशातून थोडेफार पैसे काढलेच तर, 'साहेब कशाला. राहू द्या', असं विक्रेत्यांना नाईलाजाने म्हणावं लागतं. साहेबांची पिशवी भरते.
मुंबईतल्या गृहमंत्र्यांचे आदेश पाळले जात असतील किंवा नसतीलही; मात्र घरच्या गृहमंत्र्यांचे आदेश मात्र 'सरआँखोपे', असा विचार मनात आणत विक्रेता आजचं संकट टळलं म्हणत सलाम ठोकतो आणि साहेबांची डिस्कवर 'सरकारी वाड्या'च्या दिशेने निघून जाते

No comments:
Post a Comment