Total Pageviews

Tuesday, 16 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT

भ्रष्टाचाराचा हमरस्ता भारत सोडणार?
-
Wednesday, August 17, 2011 AT 02:45 AM (IST)
Tags:
anna hazare, lokpal bill, corruption भ्रष्टाचारमुक्त देशांमध्ये भारताचा जगात ८४ वा क्रमांक आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी भ्रष्ट देशांच्या मार्गावरून भारताला यू टर्न घ्यावा लागेल.
भ्रष्टाचार निर्देशांक म्हणजे काय?कोणत्याही देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण किती आहे याची माहिती घेण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो. तो -१० या स्केलवर काढला जातो. यात शून्यची () स्थिती शंभर टक्के; म्हणजे पूर्ण भ्रष्टाचार दर्शविते, तर दहाची (१०) स्थिती शून्य टक्के भ्रष्टाचार दर्शविते. अर्थात, पूर्ण दहा गुण मिळविणारा एकही देश नाही. पण या स्केलनुसार सिंगापूर, स्वीडनसारख्या देशांत भ्रष्टाचाराचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसते. या स्केलवर जगातील १८० देशांत भारताचा क्रमांक ८४ वा आहे. स्केलवर भ्रष्टाचाराचे प्रमाण .२७ आहे. भारतीय नागरिक वर्षाला सहा अब्ज डॉलर, म्हणजे २६० अब्ज रुपये लाच देतात.
(
संदर्भ ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ऑफ इंडिया)

आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही प्रमुख उपाय
अप्रामाणिक अधिकाऱ्यांना हेरणे.वशिलेबाजी रोखून गुणवत्तेवर आधारित भरती करणे नोकरीवर घेताना बाहेरून गुणवत्तेची हमी घेणे
अधिकाऱ्यांना मोठी बक्षिसे देणे; पण त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात दंडही आकारणे
भ्रष्ट मार्गाने मिळवले जाणारे उत्पन्न रोखण्यासाठी पगारात वाढ
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ करून त्यांना कामगिरीनुसार बढती वेळोवेळी चांगले काम करणाऱ्यांना त्या त्या वेळी विविध मार्गांनी बक्षीस देणे.आर्थिक फायद्याचा संबंध नसलेले विषय कामगिरीशी जोडणे. उदा. प्रशिक्षण, बदली, प्रवास, प्रचार, कौतुक आदी.शिक्षेची व्याप्ती वाढविणे. त्यासाठी सबंधित प्रमुखांच्या अधिकारात वाढ करणे
मूल्यमापन आणि व्यवस्थापन माहिती यंत्रणेत सुधारणा करणे. म्हणजे जिथे भ्रष्टाचार करणे शक्‍य आहे, तेथील माहिती सातत्याने मिळवत राहणे.भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा वाढविणे. उदा. लोकपाल, विशेष चौकशी समिती, चौकशी आयोग आदी.अवाजवी अधिकार कमी करून जबाबदारी अधिक निश्‍चित करणे.स्पर्धात्मक वातावरण तयार करणे.कॉर्पोरेट संस्कृतीत बदल करणे
 

No comments:

Post a Comment