सायबरविश्वातही अण्णांचा बोलबाला
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 17, 2011 AT 03:15 AM (IST)
मुंबई - समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाला जगभरात पसरवणाऱ्या "फेसबुक', "ट्विटर' अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर आज केंद्र सरकारचा निषेध करत, "ही लोकशाही की हुकूमशाही' असा सवाल "नेटकर' मंडळींनी केला.
अण्णांच्या आंदोलनाबाबत "फेसबुक'-"ट्विटर'-"ऑर्कुट'वर काही दिवसांपासून संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. "आंदोलन दिल्लीतच कशाला', या "स्टेटस'पासून "आंदोलन करायचे तर दिल्लीतच का नाही', अशा दोन टोकांच्या प्रतिक्रिया होत्या.
दिल्ली पोलिसांनी आज सकाळी सव्वासातच्या सुमारासच अण्णांना अटक केल्याचे पडसाद "ऑनलाईन' समुदायातही उमटले. "कायदा तोडण्याआधीच त्यांना का उचलले,' असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. "अण्णांना जेपी पार्कमध्ये जाऊ तरी द्यायला हवे होते', असे मत अश्विनी मिलोरेने व्यक्त केले. "सरकार उघडे पडले', "आताच वेळ आहे विरोध करण्याची', "222 खासदार विरुद्ध 121 कोटी भारतीय जनता', "जर सरकारचा विजय झाला; तर आमच्यासारखे षंढ आम्हीच', "सरकारच्या या कृतीने जनतेला गाढ झोपेतून जागे केले आहे', "महात्माजींच्या गांधीवादाची सरकारने अवहेलना केली', अशा प्रतिक्रियांनी "फेसबुक'वरील "वॉल्स' भरल्या जात होत्या. "आवरा' ग्रुपने तर "जोपर्यंत अण्णांची सुटका होत नाही; तोपर्यंत कोणीही जोक पोस्ट करू नयेत', असे आवाहन केले

No comments:
Post a Comment